भटाळा गावात आहे ‘भोंडा महादेव’ | Author: Himgauri Deshpande | Bhonda Mahadev Temple Bhatala | Temples of Vidarbha | Temples of Maharashtra

विदर्भातील सर्वात मोठं शिवलिंग | Largest Shivalinga of Vidarbha

आपण भविष्याचं चित्र कितीही सुंदर रंगवत असलो, तरीसुद्धा आपल्याला आपल्या वर्तमानासोबत इतिहासाची मदत ही घ्यावीच लागते. इतिहासाच्या पानांवर लिहिलेला प्रत्येक क्षण आपल्याला आपल्या देशामध्ये प्रांतामध्ये असलेल्या भव्य वास्तूंची, शिल्पांची, देवस्थानांच्या महतीची प्रचिती देतो. कालौघात काही वास्तू दुर्लक्षित राहिल्या तरीही त्या आपला सुवर्ण इतिहासाच्या कथा सांगत उभ्या असतात. अशीच एक वास्तू म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्‍यात येत असलेल्या भटाळा या गावातील ‘ भोंडा महादेव' मंदिर!

Bhonda Mahadev Temple
Bhonda Mahadev Temple

मंदिराच्या डोक्‍यावर कळस आणि अमलक नसल्याने या मंदिराला ‘भोंडा महादेव' असे नाव पडले. भटाळा येथील मंदिरात विदर्भातील सर्वात मोठं शिवलिंग आहे. या मंदिराला शिखर नाही, कारण शतकांपूर्वी वीज पडून शिखर नष्ट झालं होतं, त्यामुळे याला ‘भोंडा महादेव’ म्हटलं जातं, असा संदर्भ आहे. गर्भगृहात १० फूट x ४ फूट आकाराचे एकाश्म काळ्या दगडाचे शिवलिंग आहे.

Bhoda Mahadev Shivlinga
Bhoda Mahadev Shivlinga

महाशिवरात्रीच्या वेळी येथे मोठी यात्रा भरते. भटाळा गावातच ११-१२ व्या शतकातील वाकाटककालीन भवानी मंदिरही पाहण्यासारखे आहे. अत्यंत स्वच्छ, सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणाने परिपूर्ण असं हे गाव आहे. प्राचीन भारतीय आणि बौद्ध दगडी शिल्पकलेमध्ये ‘चैत्य गवाक्ष’ अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. भटाळा हे गाव पूर्वीपासूनच एक ‘शिल्पग्राम’ म्हणून ओळखलं जातं.

Bhonda Mahadev Temple

उत्कृष्ट शिल्पकलेची साक्ष देणारे वालुकाश्म दगडात बांधलेले हे मंदिर राष्ट्रकूट राजांच्या काळातलं असावं, असं अभ्यासकांचं मत आहे. या गावातील ह्या देवस्थानांचे वैशिष्ट्य म्हणजे याच मंदिराच्या बाजूला चैत्य गवाक्षाचे नक्षीकाम आणि विविध बारीक कोरीव कामे समाविष्ट आहेत.

भवानी मंदिर | Bhawani Temple

Bhawani Temple
Bhawani Temple

महादेव मंदिराव्यतिरिक्त, भटाळा गावात ११ व्या-१२ व्या शतकातील वाकाटककालीन ‘भवानी मंदिर’, लहान लेणी आणि इतर प्राचीन अवशेष आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथून रस्त्याने सहजपणे भटाळा गावाला पोहोचता येते. आपण ज्या प्रांतात राहतो त्याचं वैशिष्ट्य हे इतिहासातूनच आपल्याला उलगडत जातं. या देवस्थानाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे आजही सुस्थितीत आहे. सालोरी मार्गावर हे भवानी मंदिर आहे. या मंदिराच्या पूर्वेला अखंड दगडामध्ये कोरलेली आकर्षक आणि प्राचीन लेणी आहेत. हे पिवळ्या वाळूच्या दगडात बांधलेलं एक छोटं मंदिर असून, त्यात गर्भगृह, शिखर आणि सपाट दगडी छत असलेला एक मंडप आहे. मंदिराच्या आत आणि बाहेर देवतांच्या अनेक मूर्ती आहेत, ज्यात प्रवेशद्वारातील गणेशाचाही समावेश आहे. असं वाचण्यात आलं की - मौर्य, सातवाहन, वाकाटक, गुप्त शासकांसह अनेक प्रमुख राजवंशांनी वेगवेगळ्या वेळी या प्रदेशावर राज्य केले.

सुंदर नक्षी, खडकात कोरलेल्या गुहा


Gajlaxmi
Gajlaxmi

राष्ट्रकूट काळातील ही भटाळा मंदिरातील शिवपिंड, पिवळ्या पाषाणावर असलेल्या सुंदर नक्षी, खडकात कोरलेल्या गुहा इतिहास संशोधकांसाठी अत्यंत आवडीचा विषय ठरतो. अनेक तज्ञ मंडळी तसेच इतिहासकारांनी या देवस्थानाचा अत्यंत सखोल आणि विस्तृत अभ्यास केलेला आहे. या शिवमंदिराची विशेषतः उंचीच्या संदर्भातील स्थापत्यरचना ही असामान्य आहे. मंदिर परिसरात प्रवेश करताना समोर अनेक मोठमोठे त्रिशूळ दिसतात. भाविकांनी नवसपूर्तीनंतर ते ठेवल्याचे सांगितलं जातं. प्रांगणात संपूर्ण फरसबंदी आहे. मंदिरातील गर्भगृह मोठ्या आकाराचे असून त्यात चार स्तंभ आहेत. स्तंभावर राष्ट्रकुटकालीन कलश व गवाक्षाची चिन्हे कोरलेली आहेत. शिवपिंडीला प्रदक्षिणा घातली जात नाही. याचा विचार करून या पिंडीचे टोक गाभाऱ्याच्या भिंतीला टेकविले असावे असा अंदाज आहे/अभ्यासकांचे मत आहे. कुठेही काळा पाषाण अस्तित्वात नसताना ही अवाढव्य व अखंड काळ्या पाषाणाची “शिवपिंडी” या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.

Bhonda Mahadev Temple

ग्वाल्हेरमधील तेलीका मंदिर आणि भटाळ्याचे शिव मंदिर यात साम्य आहे, असं इतिहासकारांचं मत आहे. शिवमंदिराच्या विशालतेचा उल्लेख व्यापक भौगोलिक क्षेत्राच्या संदर्भात केला जातो, ज्यामुळे त्याचे वेगळेपण अधोरेखित होते.

प्रागैतिहासिक वारसा

याव्यतिरिक्त भटाळा गावाचे वैशिष्ट्य म्हणजे हे गाव इ.स. ४५ पासून अस्तित्वात असल्याचा इतिहास आहे.  इतिहास, शिल्पकला आणि निसर्गाचा संगम असलेल्या या गावाचा पर्यटन विकास वेगाने होत असून, ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत पावले उचलली जात आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट देणारे पर्यटक बहुतांश वेळा या ऐतिहासिक वारश्याचा आनंद घेण्यासाठी येथे येतात.

कसे पोहोचाल | How to reach Bhonda Mahadev Temple Warora

चंद्रपूर जिल्ह्यापासून हे गाव सुमारे ६४ किलोमीटर अंतरावर आहे. तर वरोरा तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे १२ ते १८ किलोमीटर अंतरावर आहे. या गावाला जाण्यासाठी चिमूर मार्गे तसेच नागपूर रस्त्यावरील टेंभुर्डा मार्गे सुद्धा जाता येते. एस.टी.ची सुविधा, खासगी वाहनांचा वापर करून पोहचू शकतात.

तुम्ही येथे गेले आहात का? कंमेंट्स मध्ये तुमचे मत नक्की कळवा !

हिमगौरी देशपांडे
लेखक
वरोरा (चंद्रपूर)

Comments

  1. Great writing by the author

    ReplyDelete
  2. छान लेख

    ReplyDelete
  3. ऐतिहासिक वैभव🌺🌺

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
      अशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿

      Delete
  4. चांगली माहिती मिळाली

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
      अशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿

      Delete
  5. छान लेख!

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
      अशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿

      Delete
  6. उत्तम लेख 👍

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
      अशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿

      Delete
  7. व्वा अगदी सुरेश, सुगम्यपणे लिलया रेखाटन केल. योग्य दाखले, पुरावे दिले इतिहासाचे.!फक्त भोंडा महादेवच नाही तर संपूर्ण भटाळा गावातील इतर ऐतिहासिक वास्तूचाही उलगडा केला नक्कीच हा लेख वाचकास समुद्ध करेल. धन्यवाद मॅडम

    ReplyDelete
  8. Replies
    1. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
      अशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿

      Delete
  9. Wow. Nice article.

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
      अशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿

      Delete
  10. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
    अशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿

    ReplyDelete

Post a Comment

तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️

🔍 शोधा
लेख लोड होत आहेत...
🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
💡
आजचा मराठी शब्द by WhatsUp मराठी
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|Eg. तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|Eg. त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|Eg. डोंगरातील पाणी नितळ आहे.
तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|Eg. तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|Eg. सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
ओंजळ|हाताचा कप्पा|देशज मराठी|हातभर|Eg. त्याने ओंजळीत पाणी घेतले.
हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|Eg. हळुवार वारा वाहत होता.
मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|Eg. तिचा आवाज मंजुळ आहे.
मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|Eg. मृद्गंध दरवळला.
आभाळमाया|असीम प्रेम|देशज मराठी|अपार माया|Eg. आईची आभाळमाया विसरता येत नाही.
धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|Eg. तो संगीतात धुंद झाला.
झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|Eg. थंड झुळूक आली.
नभ|आकाश|संस्कृत|गगन|Eg. नभ निरभ्र होते.
उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|Eg. त्याला आनंदाचा उमाळा आला.
साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|Eg. ती साजिरी दिसत होती.
गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|Eg. फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|Eg. सूर्याचा कवडसा पडला.
जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|Eg. गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|Eg. गाण्याची लय सुंदर होती.
कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|Eg. कोमेजलेली फुले दिसत होती.
दरवळ|मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|Eg. चाफ्याचा दरवळ पसरला.
सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|Eg. सावळ्या ढगांनी आकाश भरले.
सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|Eg. तिचा चेहरा सतेज दिसत होता.
मधुमालती|सुगंधी वेल|संस्कृत|फुलवेल|Eg. अंगणात मधुमालती फुलली होती.
गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|Eg. कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
हुरहूर|मनातील ओढ|देशज मराठी|व्याकुळता|Eg. जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|Eg. गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|Eg. धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|Eg. पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|Eg. दिव्याची ज्योत लवलवत होती.
उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|Eg. तरुणांमध्ये उमेद आहे.
गोजिरी|नाजूक सुंदर|देशज मराठी|साजिरी|Eg. गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|Eg. आंब्याला मोहोर आला आहे.
सुगंधी|सुगंध असलेले|संस्कृत|दरवळते|Eg. सुगंधी फुले बहरली.
अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|Eg. गावचा चहा अमृततुल्य लागतो.
झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|Eg. घंटांचा झंकार झाला.
सहजसुंदर|नैसर्गिक सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|Eg. तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|Eg. आसमंत शांत होता.
सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|Eg. सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|Eg. डोंगरातून निर्झर वाहत होता.
नादमय|संगीतपूर्ण|संस्कृत|सुरेल|Eg. सभागृह नादमय झाले.
मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|Eg. मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|Eg. संगीताचे स्पंदन जाणवत होते.
चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|Eg. वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|Eg. मृदुल वाळूवर पावले उमटली.
अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|Eg. ती अलवार हसली.
स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|Eg. पक्षी स्वैर उडत होते.
सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|Eg. फुलांची सुरभि दरवळली.
दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|Eg. तिच्या डोळ्यांत दीप्ती होती.
प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|Eg. अंगणात प्राजक्त फुलला होता.
निरभ्र|पूर्ण स्वच्छ|संस्कृत|ढगविरहित|Eg. निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.

अजून इंटरेस्टिंग...

‘ये है मुंबई मेरी जान’ अनुभवांची अखंड सफर | Author: Himgauri Deshpande | Yeh Hain Mumbai Meri Jaan | Maharashtra Tourism | Incredible India

चंद्रपूरच्या जंगलात दडलेले गायमुख श्री महादेव मंदिर | नरेंद्र चांदेवार | Gaaymukh Shri Mahadev Mandir | Author: Narendra Chandewar | Temples in Vidarbha | Temples in Maharashtra

दुष्काळाच्या पलीकडचा मराठवाडा: पावसाळ्यात खुलणारे अनोखे पर्यटनविश्व | Author: Dr. Mrunalini Fadnavis | Marathwada Tourism | Maharashtra Tourism

पचमढीत राजेंद्रगिरीवर 'मक्के की रोटी और टमाटर की चटनी' !! | Author: Amit Naseri | Pachmarhi Travel Experience | Incredible India

कोराडीचे महालक्ष्मी जगदंबा मंदिर : धार्मिक पर्यटन आणि विकासाचा नवा अध्याय | Author: Ram Bhakre | Koradi Mahalaxmi Jagdamba Temple | Temples in Vidarbha | Temples in Maharashtra

गोठवणाऱ्या थंडीत आयफेल टॉवरचा अद्‌भूत नजारा... पुस्तकांच्या पलीकडे, जगाच्या जवळ | Author: Yash Naseri | Eiffel Tower Paris | International & Global Tourism

भगवद्गीतेच्या एका श्लोकाने घडवलेला इतिहास; ओपेनहायमर आणि ट्रिनिटी टेस्ट | मॅनहॅटन प्रोजेक्ट न्यू मेक्सिको | Author: Raajan | Trinity Site, New Mexico | First Nuclear Bomb Test 1945 | Manhattan Project

फणिंद्रपुरातील संतमहात्म्यांची समाधीस्थळं तुम्ही बघितली काय? | Author: Mrunalini Waghmare | Samadhis in Old Nagpur | Vidarbha Tourism

कोकणस्पर्श: निसर्ग, संस्कृती आणि स्वप्नांचा प्रवास | Author: Eknath Acharekar | Konkansparsh; Explore the hidden treasures of Konkan | Maharashtra Tourism

डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर: राष्ट्रभक्ती, प्रेरणा आणि संस्कारांचे पवित्र केंद्र | Author: Amol Pusadkar | Dr. Hedgewar Smruti Mandir Nagpur | Vidarbha Tourist Spots