Posts

Showing posts from April, 2026

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज मोझरीत करा आध्यात्मिक साधना | Tukdoji Maharaj Mozri Ashram Travel Guide | Temples in Maharashtra

Image
३० एप्रिल: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज जयंती | April 30: Birth anniversary of Rashtrasant Tukadoji Maharaj मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव... Rashtrasant Tukdoji Maharaj गुरुकुंज मोझरी आश्रम हा विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे आध्यात्मिक व सामाजिक केंद्र आहे. हा आश्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्थापन केला. त्यांच्या कार्यामुळे हा आश्रम केवळ धार्मिक नव्हे तर समाजप्रबोधनाचे केंद्र म्हणूनही प्रसिद्ध झाला आहे. गुरुकुंज मोझरी आश्रमाची स्थापना लोकांमध्ये नैतिक मूल्ये, स्वावलंबन आणि राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी करण्यात आली. तुकडोजी महाराजांनी आपल्या कीर्तन, प्रवचन आणि लेखनातून समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद आणि अशिक्षितता या विरुद्ध जनजागृती केली. आश्रमात आजही त्यांच्या शिकवणींचे पालन केले जाते. या आश्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे तुकडोजी महाराजांची समाधी, ध्यानमंदिर आणि विविध सामाजिक उपक्रम. येथे नियमितपणे भजन, कीर्तन, योगशिबिरे आणि समाजसेवेचे कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक भक्त आणि पर्यटक येथे शांतता, आध्यात्मिकता आणि प्रेरणा मिळवण्यासाठी भेट देतात.  गुरुकुंज मो...

सालबर्डीची बौद्ध गुफा: बौद्ध सर्कीट | Lord Buddhist Cave Salbardi | Vidarbha Buddhist Circuit

Image
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्याच्या उत्तर-पूर्वेकडे असलेल्या सातपुडा पर्वतांच्या शेवटच्या रांगेत मांडु आणि गंगा नदीच्या काठावर आठ सुंदर गुफा आहेत. त्यातील सहा बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. त्यातील दोन पूर्ण तयार, एक अर्धवट आणि तीन नवीन बांधकामासह मंदिरात रुपांतरित करण्यात आल्या आहेत. दोन पूर्व निर्मित गुफांपैकी एक आता पंचावतार गुफा या नावाने ओळखली जाते. ती आता महानुभाव पंथाच्या अनुयायांच्या नियंत्रणात आहे. या गुफेत वऱ्हांडा, मंडपद्वार, त्याच्या पूर्व आणि पश्चिमेकडे कक्ष, गर्भगृहद्वार, स्तंभ आणि वर छत आहे. गर्भगृहासमोर आज श्रीकृष्ण प्रतिमा आहे. त्याच्या मागील पडदा बाजूला केल्यास आयाताकृती लहान गर्भगृहात प्रवेश करता येतो. त्यात भिंतीत बुद्ध, पद्‌मपाणी आणि वज्रपाणी यांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. इतिहास संशोधकांच्या माहितीनुसार या गुफांची निर्मिती प्रथम हीनयान पंथीयांद्वारे करण्यात आली. नंतर गर्भगृह आणि प्रतिमा निर्मिती कार्य महायान पंथीयांनी केले असावे. या गुफेच्या पश्चिमेला अर्ध्या किलोमीटरवर लंकेश्वर नामक भव्य गुफा आहे. गुफेच्या समोर भव्य अंगण आहे. त्यानंतर वऱ्हांडा आणि दोन लहान ...

रावेरखेडी आणि पेशवे बाजीराव प्रथम : नर्मदेच्या काठावर विसावलेला इतिहास | Raverkhedi Samadhi Bajirao Peshwa

Image
रावेरखेडीची ओळख | Raverkhedi Introduction Raverkhedi हे मध्यप्रदेशातील नर्मदा नदीच्या काठावर वसलेले एक ऐतिहासिक ठिकाण आहे. आज हे स्थान शांत, साधं आणि थोडं विस्मरणात गेलेलं वाटत असलं, तरी इथं मराठा साम्राज्याच्या सर्वात तेजस्वी अध्यायांपैकी एकाचा शेवट झाला. याच ठिकाणी पेशवे बाजीराव प्रथम यांची समाधी आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेली ही जागा इतिहास आणि शांततेचा संगम आहे. नर्मदेच्या वाहत्या पाण्याकडे पाहताना, या ठिकाणाशी जोडलेला इतिहास मनात आपोआप उलगडत जातो. पेशवे बाजीराव प्रथम कोण होते? | Who was Peshwa Bajirao I Baji Rao I हे मराठा साम्राज्याचे दुसरे पेशवे आणि भारतीय इतिहासातील एक अद्वितीय लष्करी रणनीतीकार होते. १७२० साली पेशव्यपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी मराठा सत्तेला केवळ टिकवून ठेवले नाही, तर तिला अभूतपूर्व विस्तार दिला. त्यांनी एक गोष्ट स्पष्ट ओळखली होती—मुघल साम्राज्याची शक्ती ढासळत आहे आणि हीच योग्य वेळ आहे मराठ्यांनी उत्तर भारतात आपला प्रभाव वाढवण्याची. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे मराठा साम्राज्याने अटकेपासून दिल्लीपर्यंत झेप घेतली. बाजीरावांची युद्धनीती आणि...

मनसर: विदर्भातील बौद्ध सर्कीट | Mansar Travel Guide | Vidarbha Buddhist Circuit

Image
नागपूरपासून ४० किमी अंतरावर रामटेकजवळ असलेले मनसर हे गाव प्राचीन काळात विदर्भातील फार मोठे धार्मिक केंद्र होते. येथील तलावाच्या बाजूला दोन मोठ्या टेकड्या आहेत. त्यापैकी एक हिडिंबा टेकडी या नावाचे ओळखली जाते. तर दुसऱ्या टेकडीची नोंद महाविहार अशी करण्यात आली आहे. वाकाटककालीन बांधकामासह बौद्ध संस्कृतीच्या खुणा येथे आढळून आल्या आहेत. मौर्य-शुंग काळातील स्तूप आणि चैत्यगृहे या ठिकाणी सापडली आहेत. या दोन्ही टेकड्यांवर केंद्रीय पुरातत्व विभाग आणि नागार्जुन बोधीसत्व शोध प्रतिष्ठानकडून करण्यात आलेल्या उत्खननात प्राचीन इतिहासातील अनेक महत्वाची पाने उलगडली आहेत. हिडिंबा टेकडीवर मौर्यकालीन विटांच्या स्तुपाचे अवशेष आढळले आहेत. हा स्तूप ८ मीटर व्यासाचा आहे. स्तुपाच्या पूर्वेला उतरावर स्तुपाकडे जाण्यास पायऱ्या बनविण्यात आल्या आहेत. स्तुपाभोवताल १०५५ मीटर मातीला मलबा घालून तो मजबूत करण्यात आला. हा पहिला स्तूप मौर्यकालीन म्हणजेच इ.स. पूर्व दुसऱ्या शतकापासून ते इ.स.च्या पहिल्या शतकाच्या कालावधीतील आहे. या स्तुपाची नंतरच्या काळात पडझड झाली. पुढे शुंग राजवटीच्या प्रारंभी या स्तुपावर नवीन स्तूप बांधण्यात आल...

ड्रॅगन पॅलेस टेम्पल | Dragon Palace Temple Nagpur Travel Guide | Vidarbha Buddhist Circuit

Image
नागपूरपासून १८ किमी अंतरावर असलेल्या कामठी येथे भव्य ड्रॅगन पॅलेस टेम्पल उभारण्यात आले आहे. स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने उत्कृष्ट ही वास्तू बघताक्षणी नजरेत भरणारी आहे. या मंदिराची रचना कमळाच्या फुलाच्या आकारात केलेली आहे, जी बौद्ध धर्मात पवित्र मानली जाते. त्यामुळे नागपुरातील ‘लोटस टेम्पल’ म्हणून ती ओळखल्या जाते. सुमारे १० एकरच्या या परिसरात बौद्ध धर्माशीसंबंधित विविध प्रार्थनास्थळे आहे. तथागत बुद्धांची मूर्ती, ध्यान केंद्र इत्यादी गोष्टींचा समावेश असलेले ड्रॅगन पॅलेस देशविदेशातील बौद्धधर्मीयांचे आकर्षणाचे केंद्र झाले आहे. इतर विचारांचे पर्यटकही ड्रॅगन पॅलेस बघायला मोठ्या संख्येत येतात. ड्रॅगन पॅलेसची स्थापना १९९९ मध्ये ओगावा सोसायटी नावाच्या जपानस्थित एका धर्मादाय संस्थेच्या निधीतून झाली. ड्रॅगन पॅलेस असलेल्या संकुलात बुद्धांशी संबंधित चंदनाची एक कोरलेली मूर्ती आहे. हे भारतातील सर्वात लोकप्रिय बौद्ध मंदिरांपैकी एक आहे.तसेच ते भारत-जपान मैत्रीचे प्रतीक देखील आहे. मूळ मंदिर संकुलाच्या पहिल्या मजल्यावर आहे. येथे एक मोठे ध्यान कक्ष असून त्याच्या एका टोकाला बुद्धांची एक आकर्षक मूर्ती स्थ...

चार्ल्स मॅलेट : पुण्यातून मराठा दरबार पाहणारा इंग्रज प्रवासी | Charles Malet in Pune | Travellers of the World

Image
मराठा दरबाराचा जवळून अनुभव घेतलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांमध्ये Charles Malet यांचं नाव विशेष महत्त्वाचं आहे. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात ते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे प्रतिनिधी म्हणून पुण्यात कार्यरत होते. त्या काळात पुणे हे मराठा सत्तेचं प्रमुख राजकीय केंद्र होतं आणि पेशवाईचा प्रभाव सर्वोच्च टप्प्यावर होता. चार्ल्स मॅलेट यांना मराठा दरबाराशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी पुण्यात नियुक्त करण्यात आलं. पुण्यातील त्यांचा काळ | Charles Malet in Pune त्या काळातील Pune हे फक्त राजकीय केंद्र नव्हतं, तर सांस्कृतिक आणि प्रशासकीय हालचालींचं मुख्य ठिकाण होतं. चार्ल्स मॅलेट यांनी पुण्यातील दरबार, सरदारांची उपस्थिती, पेशवाईतील शिस्त आणि शहरातील दैनंदिन जीवनाचं बारकाईने निरीक्षण केलं. त्यांनी विशेषतः मराठा दरबारातील शिष्टाचार, पोशाख, घोडदळाची ताकद आणि प्रशासकीय रचना याबद्दल महत्त्वाच्या नोंदी केल्या. शनिवारवाडा आणि पेशवाईचा अनुभव | Witness to Peshwa Pune मॅलेटचा संबंध विशेषतः Shaniwar Wada परिसराशी जोडला जातो, कारण पेशव्यांचा मुख्य राजकीय कारभार तिथूनच चालत होता. त्या काळात शनिवारवाडा हा केवळ...

भोन येथील स्तूप: बौद्ध सर्कीट | Bhon Stupa Travel Guide | Vidarbha Buddhist Circuit

Image
पश्चिम विदर्भाच्या बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात शेगाव-वसाली मार्गावर पातुर्डा फाट्यावरुन १० किमी अंतरावर असलेल्या भोन या गावालगत एका शेतात मौर्यकालीन स्तुपाचे अवशेष सापडले आहेत. या स्तुपाचा व्यास १४ मीटर असून याच्या निर्मितीसाठी भाजल्या विटांचा वापर झाला आहे. स्तुपाचा प्रदक्षिणा मार्ग चांगल्या स्थितीत आहे. काही विटांवर ४ अशा आकाराची चिन्हे रेखांकित केली आहेत. स्तुपाच्या अवशेषांजवळ ‘नंदिपाद’ या नावाने ओळखली जाणारी पादके आढळली असून बौद्धकाळात ते पवित्र चिन्ह मानले जात असे. स्तुपाच्या डोमाळावर निमुळता गोलाकार असलेले विटांचे बांधकाम करण्यात आले आहे. स्तुपाभोवतीचा प्रदक्षिणा पथ १४ मीटर व्यासाचा आहे. हा स्तूप इ.स.पूर्व तिसऱ्या-चौथ्या शतकापासून पहिल्या शतकापर्यंतच्या कालखंडातील असल्याचा अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. Bhon Stupa भोन गावात इ.स. पूर्व तिसऱ्या आणि चौथ्या शतकात मौर्यकालीन स्तूप व लोकवस्ती होती. त्याकाळी हे पश्चिम विदर्भाच्या पूर्णा खोऱ्यातील भक्कम तटबंदी व टेहळणीसाठी बुरुज असणारे प्रमुख व्यापारी केंद्र असावे. भोन हे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे महत्त्वाचे शहर होते. पुढे व...

चांडकापूर स्तूप: बौद्ध सर्कीट | Chandkapur Stupa Travel Guide | Vidarbha Buddhist Circuit

Image
जगन्नाथ स्तूपाच्या दक्षिणेस सुमारे दीड किलोमीटर अंतरावर चांडकापूर परिसरातील सुलेमान टेकडीवर आणखी एका स्तूपाचे अवशेष मिळाले, उत्खनन करणाऱ्यांनी या टेकडीचा उल्लेख चांडकापूर असा केला .गोलाकार असलेल्या टेकडीमधील स्तूप आठ मीटर उंच आहे. हा स्तूप कच्च्या व भाजलेल्या विटांनी निर्मित केलेला होता. सन १९७० च्या प्रारंभिक या टेकडीचे उत्खनन केले गेले. त्यावेळी सुलेमान टेकडीची उंची सुमारे नऊ मीटर होती. या स्तूपाभोवती शेतीच्या कामासाठी नांगरणी केली गेली आणि परिसर सपाट करण्यात आला. या टेकडीवर जगन्नाथ टेकडी प्रमाणे कोणत्याही प्रकारची वास्तू बांधलेली नव्हती त्यामुळे स्तूपाचे अवशेष अखंड स्वरूपात मिळाले. या स्तूपाची गणना भारतामधील महास्तुपामध्ये करता येते. स्तूपाच्या मधोमध सुमारे आठ मीटर खोलीवर विटांनी बांधलेले कुंडाकृतीत मातीचे भांडे सापडले. या मातीच्या भांड्यात मानवी हाडांचे व दानाचे अवशेष मिळाले. या अस्थिपात्रावर कच्च्या व पक्क्या विटांचा एक थर देऊन तो भाग बंद केला होता. अशा प्रकारचे भांडे भारतात दुसरीकडे कुठेही सापडले नाही. यावरून प्रमुख बौद्ध भिक्खूंच्या अस्थी जतन करण्यासाठी हा स्तूप बांधण्यात आला अस...

पातुरची लेणी: बौद्ध सर्कीट | Patur Caves Travel Guide | Vidarbha Buddha Circuit

Image
अकोला जिल्ह्यातील पातुर हे 'पराशर' नगर म्हणून ओळखले जाणारे एक प्राचीन शहर आहे. येथील गुफांमुळे या परिसराचे ऐतिहासिक आणि भूवैज्ञानिक महत्त्व वाढले आहे. पातुर शहराच्या पश्चिम भागात प्राचीन ऐतिहासिक गुफा अस्तित्वात आहेत. या भागात बौद्ध आश्रम आणि प्राचीन गुफांचे अवशेष पाहायला मिळतात, जे या परिसराचा समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा दर्शवतात. हे क्षेत्र प्राचीन बौद्ध संस्कृतीशी संबंधित मानले जाते. गावाच्या तीन किलोमीटरवर डोंगरात खोदून एक गुफा बनविण्यात आली आहे. ही गुफा ८० फुट लांब, ५५ फुट रुंद आणि १५ ते २० फुट उंच आहे. गुफेपुढे अंगण आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने एक भिंतही बनविलेली दिसते. तिची रुंदी अडीच फुट आहे. या गुफेच्या आत दोन मोठे विहार आहेत व त्याच्या दोन्ही बाजूला एल आकारात दोन मोठ्या गुफा कोरलेल्या आहेत. दक्षिणेकडील पहिल्या विहारात दोन मोठे वऱ्हांडे आहेत. त्यासमोर गर्भगृह आहे. परंतु त्यात प्रतिमा अथवा प्रतिक चिन्ह नाही. या विहाराच्या प्रवेशद्वारावर ब्राह्मी लिपीत काही अक्षरे कोरलेली आहेत. त्यावरुन ही गुफा सातवाहन काळातील पहिल्या-दुसऱ्या शतकातील असावी असा कयास आहे. दुसरा व...

ख्रिस्तोफर कोलंबस : समुद्र ओलांडून नव्या जगाचा शोध | Christopher Columbus Travel History | Travellers of the World

Image
जागतिक समुद्री प्रवासाच्या इतिहासात Christopher Columbus हे नाव अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. 1451 साली Genoa येथे जन्मलेला कोलंबस मूळचा इटालियन असला तरी त्याने आपली मोठी समुद्री मोहीम स्पेनच्या पाठबळावर सुरू केली. त्या काळात युरोपमधील देशांना आशियात जाण्यासाठी नवीन समुद्री मार्ग हवा होता, कारण व्यापारासाठी भारत आणि पूर्वेकडील प्रदेश अत्यंत महत्त्वाचे मानले जात होते. कोलंबसचा विश्वास होता की पश्चिमेकडे समुद्रमार्गाने निघाल्यास आशिया गाठता येईल. Christopher Columbus Travel History | Travellers of the World समुद्रप्रवासाची सुरुवात | The Voyage Across the Atlantic 1492 साली स्पेनमधून तीन जहाजांसह — Santa Maria, Nina आणि Pinta — कोलंबस अटलांटिक महासागर ओलांडण्यासाठी निघाला. त्या काळात अज्ञात समुद्रात एवढा लांब प्रवास करणं अत्यंत धोकादायक मानलं जात होतं. दीर्घ प्रवासानंतर अखेर त्याला भूमी दिसली, पण तो भारत नसून आजच्या कॅरिबियन बेटांचा भाग होता. कोणत्या ठिकाणी पोहोचला? | Where Did Columbus Reach समुद्राच्या अथांग पसरलेल्या निळाईत, दिवसामागून दिवस सरत होते—क्षितिजावर ना जमीन, ना कोणती...

देवटक शिलालेख: बौद्ध सर्कीट | Devtak Inscriptions | Vidarbha Buddhist Circuit

Image
विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील देवटक या ४ किमी अंतरावरील गावात मौर्य सम्राट अशोकाच्या काळातील प्राचीन शिलालेख सापडला आहे. हा शिलालेख १८७३ मध्ये जोसेफ डेव्हिड बेगलर यांनी देवटक गावातील एका चिंचेच्या झाडाखाली शोधून काढला. हा शिलालेख सम्राट अशोकाच्या किंवा वाकाटक काळातील असल्याचे मानले जाते, जो विदर्भातील धम्म महामात्रांनी कोरला होता.यात पशुपक्षी हिंसाचाराविरोधात योग्य दंडाचा उल्लेख आहे. विदर्भातील अशोकाचे प्रशासन आणि नैतिक उपदेशांची स्पष्टता यावरुन होते. या शिलालेखावर सुरुवातीला ब्राह्मी लिपीत आणि नंतरच्या काळात वाकाटक राजा रुद्रसेनच्या काळातील मजकूरही कोरलेला आहे. हा ऐतिहासिक शिलालेख सध्या नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात संरक्षित करून ठेवण्यात आला आहे. Devtak Inscriptions | Vidarbha Buddhist Circuit धम्मनागा नागपूरपासून १८ किमी अंतरावर असलेल्या माहुरझरी येथे तलावाच्या काठावर धम्मनागा केंद्र उभारलेले आहे. विपश्यना केंद्र म्हणून ते उदयास येत आहे. तिबेटियन पद्धतीची वास्तुरचना असलेले ध्यान केंद्र येथे उभारण्यात आले आहे. जपानी गार्डन आणि भगवान बुद्धांचा कांस्याचा पुतळा या...

अडम स्तुप: विदर्भातील बौद्ध सर्कीट | Adam Stupa Travel Guide | Vidarbha Buddha Circuit

Image
नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील अडम हे एक ऐतिहासिक आणि पुरातत्वीयदृष्ट्या महत्त्वाचे गाव आहे. हे गाव नागपूर शहराच्या आग्नेयेला सुमारे ५५ किमी अंतरावर वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. सातवाहन कालखंडातील (इ.स.पू. ५ वे शतक) प्राचीन 'अडम किल्ला' आणि उत्खननात सापडलेल्या स्तूपामुळे प्रसिद्ध आहे. अडम हे वर्धा-वैनगंगा खोऱ्यातील एक महत्त्वाचे प्राचीन वसाहत स्थळ मानले जाते. १९८८ मध्ये पुरातत्व विभागातर्फे करण्यात आलेल्या उत्खननात ‘असक जनपदस्य’ अशी ब्राह्मी लिपीत लेख असलेली मुद्रा येथे सापडली. त्यामुळे इ.स. पूर्व सहाव्या शतकात जी १६ जनपदे होती. त्यापैकी असक एक होते,असा कयास लावण्यात आला. अडम गावात किल्ल्याच्या बाहेर पूर्व दिशेला सुमारे ५००मीटर अंतरावर ‘देवी हुडकी’ (उंच टेकाड) आहे. याच ठिकाणी पुरातत्व विभागाला स्तुपाचे अवशेष सापडले. हा स्तूप सम्राट अशोकाच्या काळातील किंवा त्याही आधीचा (सुमारे २,५०० ते ३,००० वर्षे जुना) मानला जातो. या स्तुपाची उंची ५.६० मीटर आणि परीघ ३४ मीटर आहे. हा स्तुप माती आणि मुरुमाने बनविलेला आहे. स्तुपाच्या मध्यभागी ३.५० मीटर व्यासाची हर्मिका होती. त्यात यष्...

नागपुरातील संजीवनग्राममध्ये घ्या ‘वेलनेस टुरिझम’ चा आनंद | Sanjeevan Nature Cure | Wellness Tourism in Maharashtra

Image
आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असला, तरी मानसिक आणि शारीरिक थकवा त्याला कायम सतावत असतो. हा अनुभव आपणा सर्वांनाही निश्चित येत असणार. अशात मानसिक शांतता कशी आणि कुठे मिळणार? थोडा वेळतरी रोजच्या या दगदगीतून बाहेर पडण्याची इच्छा तुम्हाला नक्कीच होत असणार? पण हे शक्य आहे का? हो, नक्कीच आहे. आणि यावर पर्याय आहे, ‘वेलनेस टुरिझम’ ! “वेलनेस पर्यटन” ही संकल्पना केवळ प्रवासापुरती मर्यादित नाही, तर ती एक संपूर्ण आरोग्यदायी जीवनशैलीचा अनुभव आहे. हा प्रवास तुमच्या नियमित जीवनातील ताणतणाव कमी करुन मन अधिक स्थिर आणि सकारात्मक करतो. याशिवाय, शरीरातील विषारी घटक बाहेर पडून आरोग्य सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल घडतो. वेलनेस पर्यटन म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात राहून शरीर, मन आणि आत्म्याला ताजेतवाने करण्याचा प्रयत्न . यात योग, ध्यान, आयुर्वेदिक उपचार, स्पा थेरपी, नैसर्गिक आहार आणि शांत वातावरण यांचा समावेश असतो. शहरातील कोलाहलापासून दूर जाऊन स्वतः शी संवाद साधण्याची ही एक अनोखी संधी असते. भारतामध्ये वेलनेस पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून आहे. ...

विदर्भातील ‘मधाचे गाव’ बघितले का? | Honey Village Andharwadi Travel Guide | Agri Tourism in Maharashtra

Image
Tourism in Vidarbha Series महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील अंधारवाडी या चिमुकल्या आदिवासी गावाने मध संकलातून विकासाचा मार्ग साधला आहे. राज्य सरकारने या गावाच्या हातात हात घालून त्याला ‘मधाचे गाव’ ही नवी ओळख मिळवून दिली. या गावाच्या ‘विकास वाटे’ वरील प्रवासाविषयी... Andharwadi Village, Yavatmal हैदराबाद  राष्ट्रीय महामार्गालगत यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वरच्या जंगलाला लागून असलेल्या या गावात गोंड आणि कोलाम या आदिवासी जमातींचे वास्तव्य आहे. मधमाशांचा मुक्त संचार असलेल्या या परिसरातील झाडांवरच्या मधाच्या पोळ्यातील मध काढून ते २० किमीवरील पांढरकवड्याला ५० रुपये किलो दराने विकायचे . मात्र येथील मधाची उपलब्धता पाहून राज्य शासनाने मधाचे गाव म्हणून अंधारवाडी विकसित करण्याचा निर्णय घेतला आणि या गावाची वाटचाल स्वावलंबनातून समृद्धीकड़े सुरू झाली. दीड वर्षांपूर्वी पांढरकवडा येथील तत्कालीन उपविभागीय अधिकारी सुहास गाडे यांनी गावकऱ्यांची बैठक घेऊन मधामुळे त्यांचे आयुष्य कसे बदलू शकते, हे समजावून सांगितले. गावकऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आता विद्यमान उपविभागीय अधिकारी अमित रंजन यांच्या नेतृत...

प्रवासातून व्यवसाय करायचा? महाराष्ट्रात चालू शकतो ‘निसर्गशिबिर’ उपक्रम | Nature Camp Startup in Maharashtra

Image
पर्यटनाशी जोडलेले व्यवसाय म्हटलं की हॉटेल, गाडी किंवा गाईड एवढंच अनेकांच्या डोळ्यासमोर येतं. पण महाराष्ट्रात कमी गुंतवणुकीत आणि वाढत्या मागणीत उभा राहू शकणारा एक वेगळा पर्याय म्हणजे निसर्गशिबिर आयोजित करणे . शहराजवळील जंगलकाठ, तलाव परिसर, डोंगरमाथा किंवा गावाजवळची मोकळी जागा निवडून एक दिवस किंवा दोन दिवसांचं लहान निसर्गशिबिर आयोजित करता येतं. यात सूर्योदय अनुभव, पक्षीनिरीक्षण, स्थानिक अन्न, शेकोटी, लोककथा आणि चालण्याच्या फेऱ्या यांचा समावेश असू शकतो. Nature Camp Startup हा व्यवसाय कसा सुरू कराल? | How to Start This Business सुरुवातीला स्वतःची जागा असणं आवश्यक नाही. स्थानिक ग्रामपंचायत, शेतकरी किंवा गावकऱ्यांशी बोलून जागा उपलब्ध होऊ शकते. आवश्यक गोष्टी: स्वच्छ पिण्याचं पाणी साधी निवासव्यवस्था किंवा तंबू प्राथमिक उपचार पेटी स्थानिक अन्नव्यवस्था गट हाताळण्याची क्षमता सुरक्षिततेची स्पष्ट योजना सुरुवात लहान गटांपासून करावी — १० ते १५ जण पुरेसे ठरतात. नागपूरसारख्या शहरात संधी कुठे? | Potential Near Nagpur Ramtek परिसर, तलावकाठची गावं, जंगलालगतचे भाग आणि Pench National P...

विजासन बुद्ध लेणी, चंद्रपूर, बौद्ध सर्कीट | Vijasan Caves, Chandrapur Travel Guide | Vidarbha Buddha Circuit

Image
विदर्भातील सर्वात अप्रतिम लेणी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीची विजासन लेणी प्रसिद्ध आहेत. भद्रावतीपासून ३ किमी अंतरावर विजासन नावाच्या टेकडीत ही तीन शैलगृहे कोरली आहेत. प्रसिद्ध पुरातत्वज्ञ कनिंगहॅम यांनी आपल्या भारतीय पुरातत्वीय अहवालात सर्वप्रथम या लेण्यांचा उल्लेख केला आहे. या लेण्या जवळपास २००० वर्ष जुन्या आहेत. विजासन येथील बुद्ध लेणींचा परिसर १० एकर इतका आहे. यामध्ये टेकडी ५ एकर जमिनीवर वसली आहे. भिक्खु सागत नावाच्या स्थवीराच्या निमंत्रणावरुन भगवान बुद्ध याठिकाणी येऊन गेले व येथूनच ते अंब्यतिथ्यकला येथे गेल्याचे इतिहासकार सांगतात. Vijasan Caves, Chandrapur Travel Guide | Vidarbha Buddha Circuit उंच टेकडीच्या मध्यावरती पूर्वाभिमुख असलेल्या या लेण्यांपर्यंत पोहोचण्याकरिता टेकडीवरील एका अरुंद खिंडीतून जावे लागते. येथे उत्तर, पश्चिम आणि दक्षिण दिशेस प्रत्येकी एक याप्रमाणे तीन लेण्या कोरलेल्या आहेत. पूर्व दिशेने लेण्यांमध्ये जाण्यास एक संयुक्त प्रवेश मार्ग आहे. किंचित लालसर अशा वालुकापाषाणात ही लेणी कोरलेली आहेत. या लेणीत एकसारख्या विशाल आसनस्थ अशा तीन बुद्ध प्रतिमा आहेत. Vijas...

जगन्नाथ स्तूप, पवनी: बौद्ध सर्कीट | Jagannath Stupa, Pauni | Vidarbha Buddha Circuit Travel Guide

Image
पवनी हे भंडारा जिल्ह्यातील महत्वाचे आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. भंडाऱ्यापासून ४२ किमी अंतरावर ही प्राचीन नगरी वसली आहे. पवनी गावाच्या दक्षिणेला बालसमुद्र नावाचे तळे आहे. या तळ्याच्या दक्षिण काठावर सुमारे ९ मीटर उंचीची टेकडी आहे. या टेकडीवर २० व्या शतकात बांधलेले जगन्नाथाचे देऊळ आहे. या जगन्नाथ टेकडीचे उत्खनन १९६९-७० या दरम्यान करण्यात आले. त्यात एका महास्तुपाचे अवशेष आढळून आले आहेत. उत्खननात प्राचीन विटांचा भव्य गोलाकार स्तूप, अशोककालीन शिलालेख आणि मुचलिंद नाग शिल्प सापडले. सध्या या स्तूपावर जगन्नाथ मंदिर असून, याला विदर्भातील प्राचीन बौद्ध वारसा म्हणून ओळखले जाते. उत्खननातील पुराव्यानुसार मूळ स्तूप अशोकपूर्व काळात इ.स. पूर्व तिसऱ्या शतकापूर्वी बांधण्यात आला होता. त्यानंतर शुंग काळात इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात या स्तुपाचे विस्तृतीकरण झाल्याचे निदर्शनास आले. शुंग काळात या विस्तारित स्तुपाभोवती दगडी कठडा प्रदक्षिणापथ आणि चार दिशांना प्रवेशद्वारे बांधण्यात आली. मौर्यपूर्व काळात बांधण्यात आलेला हा स्तूप गोलाकार होता. त्याचा व्यास ३८.२० मीटर होता. स्तुपाचा पाया खचू नये यासाठी बांधकामात ठिकठिकाणी ...

मंगेशी: आशाताईंच्या स्वप्नात कसं आलं मंगेशी? | Mangeshi Temple | Temples of Maharashtra

Image
Temples of Maharashtra Series  मंगेशी गावाची ओळख | Mangeshi Village Introduction Mangeshi Temple मंगेशी मंदिर परिसरातील मंगेशी हे गाव गोव्याच्या सांस्कृतिक परंपरेत अत्यंत महत्त्वाचं स्थान राखून आहे. हिरवाईने नटलेला परिसर, पारंपरिक घरं, शांत रस्ते आणि मंदिराभोवतीची निवांतता यामुळे हे गाव पाहताना गोव्याचा एक वेगळाच चेहरा समोर येतो. हे गाव केवळ धार्मिक स्थळ म्हणूनच नव्हे, तर भारतीय संगीतविश्वाशी जोडलेल्या मोठ्या वारशामुळेही विशेष ओळखलं जातं. Mangeshi Temple | Temples of Maharashtra मंगेशकर घराण्याचं मूळ गाव | Mangeshkar Family Roots भारतीय संगीतविश्वाला अमूल्य योगदान देणाऱ्या लता मंगेशकर, आशा भोसले आणि दीनानाथ मंगेशकर यांचं मूळ या गावाशी जोडलेलं आहे. मंगेशकर घराण्याचं आडनाव या गावाशी निगडित असल्याचं मानलं जातं. गावातील मंदिरपरंपरा, भजन, धार्मिक वातावरण आणि सांगीतिक संस्कार यांचा या कुटुंबाच्या पुढील पिढ्यांवर खोल परिणाम झाला, अशी परंपरागत धारणा आहे. येथे काय अनुभवता येतं? | What to Experience in Mangeshi Village या गावातील मुख्य आकर्षण म्हणजे मंगेशी मंदिर. पांढऱ्या रंगातील मंद...
🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
💡
आजचा मराठी शब्द by WhatsUp मराठी
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|Eg. तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|Eg. त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|Eg. डोंगरातील पाणी नितळ आहे.
तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|Eg. तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|Eg. सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
ओंजळ|हाताचा कप्पा|देशज मराठी|हातभर|Eg. त्याने ओंजळीत पाणी घेतले.
हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|Eg. हळुवार वारा वाहत होता.
मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|Eg. तिचा आवाज मंजुळ आहे.
मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|Eg. मृद्गंध दरवळला.
आभाळमाया|असीम प्रेम|देशज मराठी|अपार माया|Eg. आईची आभाळमाया विसरता येत नाही.
धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|Eg. तो संगीतात धुंद झाला.
झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|Eg. थंड झुळूक आली.
नभ|आकाश|संस्कृत|गगन|Eg. नभ निरभ्र होते.
उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|Eg. त्याला आनंदाचा उमाळा आला.
साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|Eg. ती साजिरी दिसत होती.
गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|Eg. फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|Eg. सूर्याचा कवडसा पडला.
जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|Eg. गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|Eg. गाण्याची लय सुंदर होती.
कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|Eg. कोमेजलेली फुले दिसत होती.
दरवळ|मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|Eg. चाफ्याचा दरवळ पसरला.
सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|Eg. सावळ्या ढगांनी आकाश भरले.
सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|Eg. तिचा चेहरा सतेज दिसत होता.
मधुमालती|सुगंधी वेल|संस्कृत|फुलवेल|Eg. अंगणात मधुमालती फुलली होती.
गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|Eg. कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
हुरहूर|मनातील ओढ|देशज मराठी|व्याकुळता|Eg. जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|Eg. गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|Eg. धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|Eg. पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|Eg. दिव्याची ज्योत लवलवत होती.
उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|Eg. तरुणांमध्ये उमेद आहे.
गोजिरी|नाजूक सुंदर|देशज मराठी|साजिरी|Eg. गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|Eg. आंब्याला मोहोर आला आहे.
सुगंधी|सुगंध असलेले|संस्कृत|दरवळते|Eg. सुगंधी फुले बहरली.
अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|Eg. गावचा चहा अमृततुल्य लागतो.
झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|Eg. घंटांचा झंकार झाला.
सहजसुंदर|नैसर्गिक सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|Eg. तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|Eg. आसमंत शांत होता.
सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|Eg. सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|Eg. डोंगरातून निर्झर वाहत होता.
नादमय|संगीतपूर्ण|संस्कृत|सुरेल|Eg. सभागृह नादमय झाले.
मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|Eg. मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|Eg. संगीताचे स्पंदन जाणवत होते.
चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|Eg. वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|Eg. मृदुल वाळूवर पावले उमटली.
अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|Eg. ती अलवार हसली.
स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|Eg. पक्षी स्वैर उडत होते.
सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|Eg. फुलांची सुरभि दरवळली.
दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|Eg. तिच्या डोळ्यांत दीप्ती होती.
प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|Eg. अंगणात प्राजक्त फुलला होता.
निरभ्र|पूर्ण स्वच्छ|संस्कृत|ढगविरहित|Eg. निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.