विजासन बुद्ध लेणी, चंद्रपूर, बौद्ध सर्कीट | Vijasan Caves, Chandrapur Travel Guide | Vidarbha Buddha Circuit
विदर्भातील सर्वात अप्रतिम लेणी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीची विजासन लेणी प्रसिद्ध आहेत. भद्रावतीपासून ३ किमी अंतरावर विजासन नावाच्या टेकडीत ही तीन शैलगृहे कोरली आहेत. प्रसिद्ध पुरातत्वज्ञ कनिंगहॅम यांनी आपल्या भारतीय पुरातत्वीय अहवालात सर्वप्रथम या लेण्यांचा उल्लेख केला आहे. या लेण्या जवळपास २००० वर्ष जुन्या आहेत.
विजासन येथील बुद्ध लेणींचा परिसर १० एकर इतका आहे. यामध्ये टेकडी ५ एकर जमिनीवर वसली आहे. भिक्खु सागत नावाच्या स्थवीराच्या निमंत्रणावरुन भगवान बुद्ध याठिकाणी येऊन गेले व येथूनच ते अंब्यतिथ्यकला येथे गेल्याचे इतिहासकार सांगतात.
Vijasan Caves, Chandrapur Travel Guide | Vidarbha Buddha Circuit
उंच टेकडीच्या मध्यावरती पूर्वाभिमुख असलेल्या या लेण्यांपर्यंत पोहोचण्याकरिता टेकडीवरील एका अरुंद खिंडीतून जावे लागते. येथे उत्तर, पश्चिम आणि दक्षिण दिशेस प्रत्येकी एक याप्रमाणे तीन लेण्या कोरलेल्या आहेत. पूर्व दिशेने लेण्यांमध्ये जाण्यास एक संयुक्त प्रवेश मार्ग आहे. किंचित लालसर अशा वालुकापाषाणात ही लेणी कोरलेली आहेत. या लेणीत एकसारख्या विशाल आसनस्थ अशा तीन बुद्ध प्रतिमा आहेत.
Vijasan Caves, Chandrapur Travel Guide | Vidarbha Buddha Circuit
गुफेत मंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आहे. गर्भगृहात १५८ से.मी. उंच बुद्ध प्रतिमा पद्मासनात आणि ध्यानमुद्रेत विराजमान आहे. मध्यवर्ती गुफेत प्रवेशद्वारातून आत गेले असता एक कक्ष आहे. या कक्षाच्या दोन्ही बाजूला दोन छोटे कक्ष आहेत. त्या कक्षात झोपण्यासाठी उंच चबुतरा बनविलेला आहे. त्यावरुन हे कक्ष भिक्षुंच्या झोपण्यासाठी वापरले जात असावेत, असे लक्षात येते. गर्भगृहात उंच ठिकाणी भगवान बुद्धाची दगडाची प्रतिमा आहे.
Vijasan Caves, Chandrapur Travel Guide | Vidarbha Buddha Circuit
डावीकडील गुफा सगळ्यात लहान असून मंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा रचनेत आहे. मंडपाच्या डावीकडे आसनयुक्त भिक्षुगृह आहे. गर्भगृहात चबुतऱ्यावर १.५० मीटर उंच पद्मासनातील ध्यानमुद्रेतील बुद्ध प्रतिमा कोरलेली आहे. गुफेच्या दर्शनी भागात वरील बाजूस तीन स्तुप कोरलेले दिसून येतात.
विजासन गुफेत प्रतिकाच्या रुपात स्तुपाचे अंकन ठिकठिकाणी दिसून येते. यावरुन असे लक्षात येते की सुरुवातीला ही गुफा हीनयान पंथीयांच्या ताब्यात होती. कालांतराने महायान पंथाच्या प्रभाव काळात ही गुफा १०-२० फूट आत कोरुन त्यात बुद्ध प्रतिमांची निर्मिती केली गेली असावी. विजय सातकर्णी नामक सातवाहन राजाने या गुफेची निर्मिती केली असे एक मत आहे. परंतु पूर्वेपासून अस्तित्वात असलेल्या गुफेत काही फेरबदल करुन विजय सातकर्णीने ही गुफा भिक्षु संघास दान केली असावी, असा अंदाज आहे.
कसे पोहोचाल? | How to reach Vijasan Caves
नागपूरपासून भद्रावती १२८ किमी आहे. रस्त्याने गेल्यास अडीच तास लागतात. एसटी बसेस उपलब्ध आहेत. भद्रावतीपासून विजासन ३ किमी आहे
तुम्हाला हा लेख कसा वाटला? तुमचे मत कमेंटमध्ये लिहा आणि मित्रांसोबत शेअर करा.

Comments
Post a Comment
तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️