नागपुरातील संजीवनग्राममध्ये घ्या ‘वेलनेस टुरिझम’ चा आनंद | Sanjeevan Nature Cure | Wellness Tourism in Maharashtra

आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असला, तरी मानसिक आणि शारीरिक थकवा त्याला कायम सतावत असतो. हा अनुभव आपणा सर्वांनाही निश्चित येत असणार. अशात मानसिक शांतता कशी आणि कुठे मिळणार? थोडा वेळतरी रोजच्या या दगदगीतून बाहेर पडण्याची इच्छा तुम्हाला नक्कीच होत असणार? पण हे शक्य आहे का? हो, नक्कीच आहे. आणि यावर पर्याय आहे, ‘वेलनेस टुरिझम’!

“वेलनेस पर्यटन” ही संकल्पना केवळ प्रवासापुरती मर्यादित नाही, तर ती एक संपूर्ण आरोग्यदायी जीवनशैलीचा अनुभव आहे. हा प्रवास तुमच्या नियमित जीवनातील ताणतणाव कमी करुन मन अधिक स्थिर आणि सकारात्मक करतो. याशिवाय, शरीरातील विषारी घटक बाहेर पडून आरोग्य सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल घडतो.

वेलनेस पर्यटन म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात राहून शरीर, मन आणि आत्म्याला ताजेतवाने करण्याचा प्रयत्न. यात योग, ध्यान, आयुर्वेदिक उपचार, स्पा थेरपी, नैसर्गिक आहार आणि शांत वातावरण यांचा समावेश असतो. शहरातील कोलाहलापासून दूर जाऊन स्वतः शी संवाद साधण्याची ही एक अनोखी संधी असते.

भारतामध्ये वेलनेस पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून आहे. योग आणि आयुर्वेद यांसारख्या शास्त्रांनी जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. केरळमधील आयुर्वेदिक रिसॉर्ट्स, ऋषिकेशमधील योग केंद्रे आणि हिमालयीन परिसरातील ध्यानधारणा स्थळे ही वेलनेस पर्यटनाची उत्तम उदाहरणे आहेत. पण तुम्हाला इतक्या दूर जाण्याची अजिबातच गरज नाही. कारण नागपूर जिल्ह्यातच तुम्ही हा आनंद घेऊ शकता.

Sanjeevan Nature Cure
Sanjeevan Nature Cure Center

नागपूरपासून सुमारे २२ किमी अंतरावर 

हिंगणा तालुक्यात असलेल्या आमगाव देवळी येथे निसर्गरम्य परिसरात वसलेला संजीवनग्राम प्रकल्प यासाठी सज्ज आहे. गेल्या चार दशकांपासून वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय आणि थ्रोट कॅन्सर सर्जन म्हणून सुविख्यात असलेले डॉ. संजय उगेमुगे यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली आहे.

निसर्गोपचार आणि योग केंद्र | Sanjeevan Nature Cure Wellness Centre

संजीवन निसर्गोपचार आणि योग केंद्रात नैसर्गिक उपचार पद्धतींवर आधारित सेवा दिली जाते. त्यात मसाज थेरपी (हॉट स्टोन, व्हायब्रो), स्टीम बाथ, मड थेरपी, अक्युपंक्चर-अक्युप्रेशर, सर्क्युलर जेट बाथ, हिप बाथ, स्पाइनल स्प्रे, शिरोधारा, कोलन थेरपी, ओझोन थेरपी, फिजिओथेरपी आदींचा त्यात समावेश आहे. वजन नियंत्रण, डिटॉक्स, योग-ध्यान यासाठी पाच दिवसांची निवासी शिबिरे घेतली जातात. पुरुष आणि महिलांसाठी वेगळे विभाग आहेत. एक दिवसाच्या भेटीचे कार्यक्रमही आयोजित करण्यात येतात.

Sanjeevan Nature Cure | Wellness Tourism in Maharashtra

टेकडीवर भव्य शिव मंदिर

संजीवन गोशाळा स्वयंपूर्णतेसाठी सुरू करण्यात आली आहे. गाई-म्हशींद्वारे दूध पुरवठा. शेणापासून बायोगॅस (स्वयंपाक आणि वीज उत्पादन). त्याचा खत म्हणून शेती व बागकामासाठी वापर. धार्मिक आणि अध्यात्मिक उपक्रमांतर्गत टेकडीवर भव्य शिव मंदिर उभारण्यात आले आहे. ध्यान मंडपात ध्यान, योग, प्रार्थना, मानसिक शांती आणि आरोग्यासाठी उपयुक्त उपक्रम चालविले जातात. पर्यावरण आणि ऊर्जा संरक्षण अंतर्गत सौर ऊर्जा, बायोगॅस, विंड टर्बाइन, वृक्षारोपण, उद्याने, तळे, जल-मृदा संरक्षण, आदर्श ग्राम विकास या सगळ्याच अभिनव गोष्टी संजीवन ग्राममध्ये डॉ. संजय उगेमुगे यांनी उभारल्या आहेत.

निसर्गाच्या सान्निध्यात...

संजीवनग्राममध्ये वृद्धाश्रमासोबतच विविध सामाजिक, वैद्यकीय आणि पर्यावरणीय उपक्रम चालवले जातात. मुख्य उद्देश ज्येष्ठ नागरिकांची सेवा, नैसर्गिक आरोग्य आणि ग्रामीण विकास हा आहे. त्यांनी दोन लाखावर झाडे लावल्याने हा परिसर सौंदर्याने फुलला आहे.गेल्या काही वर्षात त्यांनी निसर्गोपचारासोबत ऑस्टिओपॅथी उपचार सुरु केला आहेत. त्यामुळे अनेक व्याधींवर कमी खर्चात रुग्णांवर उपचार होतो. इथे अनेक आरोग्य शिबिरे चालवली जातात. एकाच प्रकल्पात आणि नैसर्गिक परिसरात सर्व आरोग्य सुविधा असलेले विदर्भातील एकमेव सुसज्ज केंद्र म्हणून संजीवनग्राम नावारूपास आले आहे. संजीवन वृद्धाश्रम (Old Age Home) २००२ पासून सुरू करण्यात आले असून सुमारे २०,००० चौरस फूट क्षेत्रफळाची दोन मजली सुसज्ज इमारत आहे. ५० ज्येष्ठ नागरिकांच्या राहण्याची क्षमता असून स्वतंत्र खोल्या, स्वयंपाकघर, डायनिंग हॉल, ध्यान मंडप आहे. समर्पित स्वयंसेवक आणि कर्मचारी वृद्धांची देखभाल करतात. आर्थिकदृष्ट्या सक्षम ज्येष्ठांसाठी स्वतंत्र कॉटेजेस उपलब्ध आहेत.

बाबा आमटेंकडून घेतली प्रेरणा | Inspired by Baba Amte

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रद्धेय बाबा आमटे यांनी रुग्णसेवेतून सामाजिक परिवर्तन घडवले. लाखो तरुणांना त्यांनी सामाजिक सृजनशीलतेचा मार्ग दाखवला. बाबांचे आनंदवन असो, सोमनाथची भारत जोडो श्रम संस्कार छावणी असो किंवा हेमलकसा भामरागडचा आदिवासींसाठी उभारण्यात आलेला लोक बिरादरी प्रकल्प, ते तरुणांना सामाजिक जाणिवेने मार्गस्थ करीत असतात. बाबांचे सुपुत्र डॉ. विकास आणि डॉ. प्रकाश यांनीही रुग्णसेवेची कास धरली. कालांतराने तरुणांची एक खूप मोठे फळी निर्माण झाली. बाबांनी त्यांना युवाकम्प असे म्हटले. बाबांनी दिलेली शिकवण आणि आशीर्वाद घेत अनेक तरुणांनी देशाच्या कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि आरोग्याचे प्रकल्प उभारले. यात अनेक डॉक्टरही होते. त्यात नागपूरचे डॉ. संजय उगेमुगे हे नाव अग्रस्थानी आहे.'संजय तू डॉक्टर झालास, गरिबांची सेवा करायला विसरू नकोस' हा बाबांनी दिलेला मंत्र डॉ. संजय उगेमुगे यांनी इतका मनावर घेतला की नागपूरनजीक संजीवन ग्राम उभे राहिले. वृध्दाश्रमापासून सुरुवात झालेल्या या प्रकल्पात सर्वोत्तम निसर्गोपचार, ऑस्टियोपॅथी, योगा, आधुनिक शेती असे कितीतरी उपक्रम सुरु झालेत.

नागपूर जिल्ह्यातील हा प्रकल्प विदर्भातील लोकांना नवसंजीवनी देणारा निश्चित आहे. प्रत्येकाने एकदा तरी या निसर्गरम्य संजीवन ग्रामला अवश्य भेट द्यावी.

डॉ. संजय उगेमुगे
९६१९१११८८८
९८२२४७००११
 या मोबाईलवर अवश्य संपर्क साधावा


Author
विकास झाडे
ज्येष्ठ पत्रकार

Comments

  1. amazing center wellness.

    ReplyDelete
  2. छान सेंटर आहे डॉ उगेमुगे यांच

    ReplyDelete
  3. Wellness tourism is great. I have visited this place.

    ReplyDelete
  4. Dr Ugemuge has done great initiative in sanjeevan

    ReplyDelete
  5. This center is good. Congrats Dr. Ugemuge

    ReplyDelete
  6. वेलनेस टूरिज्म चा चांगला अनुंभव आहे. अशे अजून ठिकाण विदर्भात असावे

    ReplyDelete
  7. Excellent and Affordable

    ReplyDelete

Post a Comment

तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️

🔍 Search
Topics
Authors
📰 सर्व लेख
लोड होत आहे...
🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
💡
आजचा मराठी शब्द by WhatsUp मराठी
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|Eg. तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|Eg. त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|Eg. डोंगरातील पाणी नितळ आहे.
तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|Eg. तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|Eg. सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
ओंजळ|हाताचा कप्पा|देशज मराठी|हातभर|Eg. त्याने ओंजळीत पाणी घेतले.
हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|Eg. हळुवार वारा वाहत होता.
मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|Eg. तिचा आवाज मंजुळ आहे.
मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|Eg. मृद्गंध दरवळला.
आभाळमाया|असीम प्रेम|देशज मराठी|अपार माया|Eg. आईची आभाळमाया विसरता येत नाही.
धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|Eg. तो संगीतात धुंद झाला.
झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|Eg. थंड झुळूक आली.
नभ|आकाश|संस्कृत|गगन|Eg. नभ निरभ्र होते.
उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|Eg. त्याला आनंदाचा उमाळा आला.
साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|Eg. ती साजिरी दिसत होती.
गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|Eg. फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|Eg. सूर्याचा कवडसा पडला.
जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|Eg. गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|Eg. गाण्याची लय सुंदर होती.
कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|Eg. कोमेजलेली फुले दिसत होती.
दरवळ|मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|Eg. चाफ्याचा दरवळ पसरला.
सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|Eg. सावळ्या ढगांनी आकाश भरले.
सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|Eg. तिचा चेहरा सतेज दिसत होता.
मधुमालती|सुगंधी वेल|संस्कृत|फुलवेल|Eg. अंगणात मधुमालती फुलली होती.
गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|Eg. कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
हुरहूर|मनातील ओढ|देशज मराठी|व्याकुळता|Eg. जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|Eg. गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|Eg. धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|Eg. पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|Eg. दिव्याची ज्योत लवलवत होती.
उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|Eg. तरुणांमध्ये उमेद आहे.
गोजिरी|नाजूक सुंदर|देशज मराठी|साजिरी|Eg. गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|Eg. आंब्याला मोहोर आला आहे.
सुगंधी|सुगंध असलेले|संस्कृत|दरवळते|Eg. सुगंधी फुले बहरली.
अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|Eg. गावचा चहा अमृततुल्य लागतो.
झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|Eg. घंटांचा झंकार झाला.
सहजसुंदर|नैसर्गिक सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|Eg. तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|Eg. आसमंत शांत होता.
सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|Eg. सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|Eg. डोंगरातून निर्झर वाहत होता.
नादमय|संगीतपूर्ण|संस्कृत|सुरेल|Eg. सभागृह नादमय झाले.
मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|Eg. मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|Eg. संगीताचे स्पंदन जाणवत होते.
चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|Eg. वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|Eg. मृदुल वाळूवर पावले उमटली.
अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|Eg. ती अलवार हसली.
स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|Eg. पक्षी स्वैर उडत होते.
सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|Eg. फुलांची सुरभि दरवळली.
दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|Eg. तिच्या डोळ्यांत दीप्ती होती.
प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|Eg. अंगणात प्राजक्त फुलला होता.
निरभ्र|पूर्ण स्वच्छ|संस्कृत|ढगविरहित|Eg. निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.