भोन येथील स्तूप: बौद्ध सर्कीट | Bhon Stupa Travel Guide | Vidarbha Buddhist Circuit
पश्चिम विदर्भाच्या बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात शेगाव-वसाली मार्गावर पातुर्डा फाट्यावरुन १० किमी अंतरावर असलेल्या भोन या गावालगत एका शेतात मौर्यकालीन स्तुपाचे अवशेष सापडले आहेत. या स्तुपाचा व्यास १४ मीटर असून याच्या निर्मितीसाठी भाजल्या विटांचा वापर झाला आहे. स्तुपाचा प्रदक्षिणा मार्ग चांगल्या स्थितीत आहे. काही विटांवर ४ अशा आकाराची चिन्हे रेखांकित केली आहेत.
स्तुपाच्या अवशेषांजवळ ‘नंदिपाद’ या नावाने ओळखली जाणारी पादके आढळली असून बौद्धकाळात ते पवित्र चिन्ह मानले जात असे. स्तुपाच्या डोमाळावर निमुळता गोलाकार असलेले विटांचे बांधकाम करण्यात आले आहे. स्तुपाभोवतीचा प्रदक्षिणा पथ १४ मीटर व्यासाचा आहे. हा स्तूप इ.स.पूर्व तिसऱ्या-चौथ्या शतकापासून पहिल्या शतकापर्यंतच्या कालखंडातील असल्याचा अभ्यासकांचा निष्कर्ष आहे.
Bhon Stupa
भोन गावात इ.स. पूर्व तिसऱ्या आणि चौथ्या शतकात मौर्यकालीन स्तूप व लोकवस्ती होती. त्याकाळी हे पश्चिम विदर्भाच्या पूर्णा खोऱ्यातील भक्कम तटबंदी व टेहळणीसाठी बुरुज असणारे प्रमुख व्यापारी केंद्र असावे. भोन हे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे महत्त्वाचे शहर होते. पुढे विविध कारणांने या शहराचे महत्त्व कमी होत गेले, असे येथील उत्खननातून स्पष्ट झाले आहे.
कसे पोहोचाल | How to go to Bhon Stupa Buddhist Circuit
नागपूरहून संग्रामपूर ३४८ किमी आहे. समृद्धी मार्गाने गेल्यास साडेपाच तास लागतात. एसटी बस किंवा खासगी गाडीने जाता येईल. संग्रापूरहून भोन २०.९ किमी आहे. अर्धा तासात पोहोचतो.
✨ तुम्ही विदर्भातील या बौद्ध स्थळांना भेट दिली आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा!

Comments
Post a Comment
कमेंट करून संवादात सहभागी व्हा!