ज्योतिबाच्या यात्रेत सासनकाठ्या का आणतात? डॉ. संपदा नासेरी | Dr. Sampada Naseri | Jyotiba Temple Experience Kolhapur | Temples in Maharashtra


नुकताच मार्च महिन्यात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे भेट देण्याचा योग आला आणि त्यानिमित्ताने ज्योतिबा देवस्थान कोल्हापूर वाडी रत्नागिरीलाही जाण्याचे भाग्य लाभले.

या डोंगराचा रस्ता अतिशय उत्तम असून आम्ही अर्टिगा या गाडीने डोंगरावर जायला निघालो. जातांना आम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूला निसर्गाची उत्तम कलाकृती आढळून येत होती, त्याचप्रमाणे रंगीबेरंगी रेग्यांमधून भाविक देवस्थानाकडे जात होते आणि काही ठिकाणी भाविक मुक्कामही करताना दिसले.आमच्या सोबत असलेले गाडी चालक दादा आम्हांला मंदिराची माहिती पण देत होते.चैत्र पौर्णिमा नुकतीच आटोपली होती आणि रविवार होता त्यामुळे मनात शंका होती की देवळात नक्कीच प्रचंड गर्दी असेल. परंतु आम्ही सकाळी सव्वासहालाच कोल्हापुरहून वाडी रत्नागिरीला निघालो आणि सात पर्यंत पोहोचलो सुद्धा.त्यामुळे आम्हाला थोडी कमी गर्दी मिळाली. त्यानंतर काही वेळाने तिथे भाविकांची गर्दी झालेली आढळून आली. दर्शनाच्या रांगेत लागलो असताना भाविकांचे मंदिराभोवती संपूर्ण लोटांगण घालून नवस फेडणे चालू होते, नुकतेच लग्न झालेली जोडपी आशीर्वाद घेत होती, त्याचप्रमाणे लहान पालखी सोहळा, सासन काठ्यांना वाजत गाजत आणल्या जात होते सर्वत्र गुलालाची उधळण चालू होती.

Jyotiba Temple Experience Kolhapur | Temples in Maharashtra
Jyotiba Temple Experience Kolhapur | Temples in Maharashtra

श्री ज्योतिबा देवाचा इतिहास | History of Jyotiba Temple Kolhapur in Marathi

श्री ज्योतिबा देवस्थान हे गुलाबी मंदिर असून येथे भगवान ज्योतिबांची पूजा केली जाते. ब्रह्मा, विष्णू,महेश आणि जमदग्नी या सगळ्यांचा मिळून एक तेजपुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा होय असे मानले जाते. आख्यायिकेनुसार, या प्रदेशाला त्रास देणाऱ्या रत्नासुर राक्षसाचा वध करण्यासाठी ब्रह्मा,विष्णु,महेश आणि जमदग्नी यांच्या एकत्रित दैवी शक्तीतून भगवान ज्योतिबांचा जन्म झाला. श्री ज्योतिबादेव, दख्खनचा राजा केदारलिंग,सौदागर, रवळनाथ या नावानेही ओळखला जातो. ज्योतिबा देवाची मूर्ती स्वयंभू असून साधारणपणे ती साडेचार फूट उंचीची आहे.मूर्ती बटू भैरवनाथाच्या अवतारातील असून चतुर्भुज आहे. कोल्हापूरच्या देवी महालक्ष्मीचे बंधू मानल्या जाणाऱ्या ज्योतिबांना त्यांच्या संरक्षक शक्तींमुळे अत्यंत पूजनिय मानले जाते.

Jyotiba Temple Experience Kolhapur | Temples in Maharashtra
Jyotiba Temple Experience Kolhapur | Temples in Maharashtra

या मूळ देवालयाचे बांधकाम ज्योतिबा भक्त किवळगावच्या नावजी साळुंखे पाटलांनी( संत नावजीनाथ) केलेले आहे असे म्हणतात. 1730 मधे राणोजीराव शिंदे यांनी या जागेवर असलेले सध्याचे देवालय बांधले.हे देऊळ 57 फुट लांब 37 फूट रुंद असून त्याच्या शिखराची उंची 77 फूट आहे.

कोल्हापूरच्या ज्योतिबा यात्रेत (चैत्र पौर्णिमा) सासनकाठ्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सासनकाठी म्हणजे नाथ केदाराचा (जोतिबाचा) विजय ध्वज मानला जातो. सुमारे ४० ते ८० फूट उंच, सजवलेल्या या काठ्या गुलाल-खोबऱ्याची उधळण करत आणि 'चांगभलं' च्या गजरात जोतिबा डोंगरावर आणल्या जातात, जो यात्रेचा प्रमुख आकर्षण सोहळा आहे. या काठ्या जोतिबाने रत्नासूर राक्षसावर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहेत.

ज्योतिबा मंदिर आणि गुलाल | Gulaal in Jyotiba Temple Kolhapur

या मंदिरात सर्वत्र गुलाल उधळला जातो. त्यामुळे सगळीकडे गुलाबी रंगाची उधळण दिसते. माहिती काढली असता असे कळले की विजयाचे प्रतीक म्हणून हवेत गुलाल उधळला जातो.कारण ज्योतीबांनीच (जे ब्रह्मा,विष्णू आणि महेश आणि जमदग्नी यांचे अवतार आहेत)महाकालीला (महालक्ष्मीचे रूप) युद्धात राक्षसांचा पराभव करण्यास मदत केली होती.

श्री ज्योतिबा मंदिर आणि चैत्र यात्रा | Pilgrimage to Jyotiba Temple Kolhapur

वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा ज्योतिबाची चैत्र यात्रा (चैत्र पौर्णिमा)हा एक भव्य धार्मिक सोहळा असतो. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी लाखो भाविक 'ज्योतिबाच्या नावाने चांगभलं' च्या गजरात गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत हा उत्सव साजरा करतात. यात्रेत मानाच्या उंच सासन काठ्यांचे (काही 80 फुटांपर्यंत उंच असतात) आकर्षण असते. यावेळेस संपूर्ण डोंगर गुलाबी रंगात न्हावून निघतो.
Jyotiba Temple Experience Kolhapur | Temples in Maharashtra

चैत्र यात्रेचे मुख्य कार्यक्रम | Chaitra Yatra Function at Jyotiba Temple Kolhapur

1. सासन काठ्यांचे आगमन - अनेक गावांमधून मानाच्या सासनकाठ्या वाजत गाजत डोंगरावर आणल्या जातात.
2. गुलाल उधळण - यात्रेच्या दिवशी भक्तीचा महासागर उसळतो आणि गुलालाची प्रचंड उधळण होते.
3. पालखी सोहळा- तोफेच्या सलामीने श्री ज्योतिबा मंदिरातून यमाई देवीकडे पालखी मार्गस्थ होते.
4. दर्शन पद्धत - तुळशी वृंदावनास नमन करून दर्शनास सुरुवात केली जाते.

महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून लाखो भाविक या यात्रेला येतात. या यात्रेला 'दक्षिण काशी' म्हणूनही ओळखल्या जाते.

Jyotiba Temple Experience Kolhapur | Temples in Maharashtra

श्री ज्योतिबा मंदिरात पोहोचायचं कसे | How to reach Jyotiba Temple Kolhapur

श्री जोतिबा मंदिराच्या सर्वात जवळचे शहर म्हणजे कोल्हापूर होय.कोल्हापूर पासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. कोल्हापूर विमानतळ हे मंदिरापासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे. विमानतळावरून थेट मंदिरासाठी टॅक्सी व कॅब उपलब्ध असतात. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी कोल्हापूर रेल्वे स्थानक हा सर्वात जवळचा पर्याय आहे.जो मंदिरापासून फक्त 17 किलोमीटर अंतरावर आहे.रेल्वे स्थानकाहून बस टॅक्सी किंवा ऑटो रिक्षा सहज मिळतात.

भेट देण्याचा योग्य कालावधी ऑक्टोबर ते मार्च हा आहे. तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️

डॉ. संपदा नासेरी
Contact: +91-9822641687

महाराष्ट्रातील
मंदिरे | Temples in Maharashtra Series

Comments

  1. खूप छान, माहितीपूर्ण लेख

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks for your support. Join our channel for more such information! https://www.whatsapp.com/channel/0029VbCEAZl4o7qTGgLSAS0Y

      Delete
  2. amazing information and article.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks for your support. Join our channel for more such information!

      Delete
  3. pandharpur baddal pan mahiti dya, ajun khup thikaan ahet maharashtrat

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks for your support. Join our channel for more such information!

      Delete
  4. पंढरपूर आणि इतर सर्व महत्वाच्या ठिकाणांची माहिती तुम्हाला नक्की वाचायला मिळेल. तुम्ही पण आम्हाला प्रवास वर्णन पाठवू शकता. धन्यवाद

    ReplyDelete

Post a Comment

तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️

🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
💡
आजचा मराठी शब्द by WhatsUp मराठी
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|Eg. तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|Eg. त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|Eg. डोंगरातील पाणी नितळ आहे.
तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|Eg. तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|Eg. सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
ओंजळ|हाताचा कप्पा|देशज मराठी|हातभर|Eg. त्याने ओंजळीत पाणी घेतले.
हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|Eg. हळुवार वारा वाहत होता.
मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|Eg. तिचा आवाज मंजुळ आहे.
मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|Eg. मृद्गंध दरवळला.
आभाळमाया|असीम प्रेम|देशज मराठी|अपार माया|Eg. आईची आभाळमाया विसरता येत नाही.
धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|Eg. तो संगीतात धुंद झाला.
झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|Eg. थंड झुळूक आली.
नभ|आकाश|संस्कृत|गगन|Eg. नभ निरभ्र होते.
उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|Eg. त्याला आनंदाचा उमाळा आला.
साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|Eg. ती साजिरी दिसत होती.
गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|Eg. फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|Eg. सूर्याचा कवडसा पडला.
जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|Eg. गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|Eg. गाण्याची लय सुंदर होती.
कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|Eg. कोमेजलेली फुले दिसत होती.
दरवळ|मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|Eg. चाफ्याचा दरवळ पसरला.
सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|Eg. सावळ्या ढगांनी आकाश भरले.
सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|Eg. तिचा चेहरा सतेज दिसत होता.
मधुमालती|सुगंधी वेल|संस्कृत|फुलवेल|Eg. अंगणात मधुमालती फुलली होती.
गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|Eg. कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
हुरहूर|मनातील ओढ|देशज मराठी|व्याकुळता|Eg. जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|Eg. गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|Eg. धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|Eg. पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|Eg. दिव्याची ज्योत लवलवत होती.
उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|Eg. तरुणांमध्ये उमेद आहे.
गोजिरी|नाजूक सुंदर|देशज मराठी|साजिरी|Eg. गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|Eg. आंब्याला मोहोर आला आहे.
सुगंधी|सुगंध असलेले|संस्कृत|दरवळते|Eg. सुगंधी फुले बहरली.
अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|Eg. गावचा चहा अमृततुल्य लागतो.
झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|Eg. घंटांचा झंकार झाला.
सहजसुंदर|नैसर्गिक सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|Eg. तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|Eg. आसमंत शांत होता.
सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|Eg. सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|Eg. डोंगरातून निर्झर वाहत होता.
नादमय|संगीतपूर्ण|संस्कृत|सुरेल|Eg. सभागृह नादमय झाले.
मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|Eg. मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|Eg. संगीताचे स्पंदन जाणवत होते.
चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|Eg. वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|Eg. मृदुल वाळूवर पावले उमटली.
अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|Eg. ती अलवार हसली.
स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|Eg. पक्षी स्वैर उडत होते.
सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|Eg. फुलांची सुरभि दरवळली.
दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|Eg. तिच्या डोळ्यांत दीप्ती होती.
प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|Eg. अंगणात प्राजक्त फुलला होता.
निरभ्र|पूर्ण स्वच्छ|संस्कृत|ढगविरहित|Eg. निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.

अजून इंटरेस्टिंग...

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

तुम्ही पण होऊ शकता पर्यटन उद्योजिका, महाराष्ट्र शासनाच्या ‘आई’ महिला पर्यटन धोरण | महाराष्ट्र स्टार्टप स्टोरीज | Tours & Travel Entrepreneurship for Women | Startups & Careers | Maharashtra Startup Stories

‘पुरण पोळी’ च्या गावाला जाऊ या....! आजनसरा | Author: Sakhi | Ajansara Temple | Temples in Maharashtra | Maharashtra Tourism

अलेक्झांडर बर्न्स : बुखाराकडे निघालेला ब्रिटिश प्रवासी | Alexander Burnes and Travels into Bukhara | Travellers of the World

भटाळा गावात आहे ‘भोंडा महादेव’ | Author: Himgauri Deshpande | Bhonda Mahadev Temple Bhatala | Temples of Vidarbha | Temples of Maharashtra

बांबूंच्या बेटातून करा ‘झुकझुक गाडी’ ची रम्य सफर | First Bamboo Garden of India, Amravati | Author: Parijaat | Maharashtra Tourism

महाराष्ट्रातील डार्क स्काय पर्यटन, शहरी गोंगाटापासून दूर, आकाशाच्या कुशीत | Dark Sky Tourism | Astro Tourism | Maharashtra Tourism Policy

भामरागडमध्ये जलक्रांतीतून निर्मित ‘तलावांचे जाळे’ | अनिकेत प्रकाश आमटे | लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte

नागपुरातील संजीवनग्राममध्ये घ्या ‘वेलनेस टुरिझम’ चा आनंद | Sanjeevan Nature Cure | Wellness Tourism in Maharashtra

वास्को द गामा : समुद्रमार्गाने भारत गाठणारा प्रवासी | Vasco da Gama and the Sea Route to India | Travellers of the World