मनसर: विदर्भातील बौद्ध सर्कीट | Mansar Travel Guide | Vidarbha Buddhist Circuit

नागपूरपासून ४० किमी अंतरावर रामटेकजवळ असलेले मनसर हे गाव प्राचीन काळात विदर्भातील फार मोठे धार्मिक केंद्र होते. येथील तलावाच्या बाजूला दोन मोठ्या टेकड्या आहेत. त्यापैकी एक हिडिंबा टेकडी या नावाचे ओळखली जाते. तर दुसऱ्या टेकडीची नोंद महाविहार अशी करण्यात आली आहे. वाकाटककालीन बांधकामासह बौद्ध संस्कृतीच्या खुणा येथे आढळून आल्या आहेत. मौर्य-शुंग काळातील स्तूप आणि चैत्यगृहे या ठिकाणी सापडली आहेत.

या दोन्ही टेकड्यांवर केंद्रीय पुरातत्व विभाग आणि नागार्जुन बोधीसत्व शोध प्रतिष्ठानकडून करण्यात आलेल्या उत्खननात प्राचीन इतिहासातील अनेक महत्वाची पाने उलगडली आहेत.

हिडिंबा टेकडीवर मौर्यकालीन विटांच्या स्तुपाचे अवशेष आढळले आहेत. हा स्तूप ८ मीटर व्यासाचा आहे. स्तुपाच्या पूर्वेला उतरावर स्तुपाकडे जाण्यास पायऱ्या बनविण्यात आल्या आहेत. स्तुपाभोवताल १०५५ मीटर मातीला मलबा घालून तो मजबूत करण्यात आला. हा पहिला स्तूप मौर्यकालीन म्हणजेच इ.स. पूर्व दुसऱ्या शतकापासून ते इ.स.च्या पहिल्या शतकाच्या कालावधीतील आहे. या स्तुपाची नंतरच्या काळात पडझड झाली. पुढे शुंग राजवटीच्या प्रारंभी या स्तुपावर नवीन स्तूप बांधण्यात आला. या स्तुपाच्या दक्षिणपूर्व भागात विटांनी बांधलेल्या ८ मीटर लांब व ५.५० मीटर आयाताकार चैत्यगृहाचे अवशेष आहेत. दुसऱ्या एका मतानुसार महाविहार टेकडीवर जलाशयाच्या दिशेने एक राजवाडा बांधण्यात आला होता.वाकाटक राजा प्रवरेश्वर द्वितीय (इ.स. ४२० ते ४५०) याने त्याच्या कारकीर्दीच्या ११ व्या ते १६ व्या वर्षादरम्यान आपली राजधानी नंदीवर्धनवरुन प्रवरपूरला म्हणजेच आजच्या मनसरला स्थलांतरित केली होती. तेव्हा हा राजप्रसाद इ.स. ४२५ च्या दरम्यान उभारण्यात आला. पुढे नळ राजा भवदत्तवर्मन याने हा प्रासाद इ.स. ५६३ च्या आसपास आक्रमणात पूर्णत: जाळून टाकला असावा.

Mansar Travel Guide | Vidarbha Buddhist Circuit

इ.स. सहाव्या शतकात या वास्तुचा अधिष्ठानासारखा उपयोग करुन त्यावर तीन स्तरात उंचावत जाणारा प्रशस्त बौद्ध स्तूप उभारण्यात आला. त्यासाठी १० सेमीचा प्रदक्षिणापथ ठेवण्यात आला. स्तूप निर्मितीसाठी पक्क्या भाजणीच्या विटा उपयोगात आणण्यात आल्या आहेत.

स्तुपाच्या सभोवती प्रदक्षिणापथास लागून १६ लहान खोल्या निर्माण करण्यात आल्या होत्या. उत्खननात तेथे तांबड्या रंगाची खापरे तसेच बोधीवृक्ष व धम्मचक्रांचे अंकण असलेल्या प्रतिमा मिळाल्या आहेत.

कसे पोहोचाल | How to reach Mansar

नागपूर-जबलपूर-वाराणसी राष्ट्रीय महामार्ग-७ वर मनसर गाव वसलेले आहे. या ठिकाणापासून जवळच मॅंगनीजच्या खाणी आहेत.येथून रामटेक सुमारे ७ किमी अंतरावर आहे. तसेच महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान जवळ आहे.

रस्त्याने जायचे असल्यास एसटी बस उपलब्ध आहे. खासगी वाहनाने अथवा कॅबने जाऊ शकतात. रेल्वेने गेल्यास रामटेक रेल्वेस्टेशन जवळ आहे.

तुमचे मत कमेंटमध्ये लिहा आणि मित्रांसोबत शेअर करा.

Comments

🔍 शोधा
लेख लोड होत आहेत...
🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
💡
आजचा मराठी शब्द by WhatsUp मराठी
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|Eg. तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|Eg. त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|Eg. डोंगरातील पाणी नितळ आहे.
तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|Eg. तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|Eg. सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
ओंजळ|हाताचा कप्पा|देशज मराठी|हातभर|Eg. त्याने ओंजळीत पाणी घेतले.
हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|Eg. हळुवार वारा वाहत होता.
मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|Eg. तिचा आवाज मंजुळ आहे.
मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|Eg. मृद्गंध दरवळला.
आभाळमाया|असीम प्रेम|देशज मराठी|अपार माया|Eg. आईची आभाळमाया विसरता येत नाही.
धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|Eg. तो संगीतात धुंद झाला.
झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|Eg. थंड झुळूक आली.
नभ|आकाश|संस्कृत|गगन|Eg. नभ निरभ्र होते.
उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|Eg. त्याला आनंदाचा उमाळा आला.
साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|Eg. ती साजिरी दिसत होती.
गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|Eg. फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|Eg. सूर्याचा कवडसा पडला.
जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|Eg. गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|Eg. गाण्याची लय सुंदर होती.
कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|Eg. कोमेजलेली फुले दिसत होती.
दरवळ|मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|Eg. चाफ्याचा दरवळ पसरला.
सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|Eg. सावळ्या ढगांनी आकाश भरले.
सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|Eg. तिचा चेहरा सतेज दिसत होता.
मधुमालती|सुगंधी वेल|संस्कृत|फुलवेल|Eg. अंगणात मधुमालती फुलली होती.
गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|Eg. कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
हुरहूर|मनातील ओढ|देशज मराठी|व्याकुळता|Eg. जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|Eg. गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|Eg. धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|Eg. पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|Eg. दिव्याची ज्योत लवलवत होती.
उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|Eg. तरुणांमध्ये उमेद आहे.
गोजिरी|नाजूक सुंदर|देशज मराठी|साजिरी|Eg. गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|Eg. आंब्याला मोहोर आला आहे.
सुगंधी|सुगंध असलेले|संस्कृत|दरवळते|Eg. सुगंधी फुले बहरली.
अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|Eg. गावचा चहा अमृततुल्य लागतो.
झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|Eg. घंटांचा झंकार झाला.
सहजसुंदर|नैसर्गिक सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|Eg. तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|Eg. आसमंत शांत होता.
सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|Eg. सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|Eg. डोंगरातून निर्झर वाहत होता.
नादमय|संगीतपूर्ण|संस्कृत|सुरेल|Eg. सभागृह नादमय झाले.
मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|Eg. मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|Eg. संगीताचे स्पंदन जाणवत होते.
चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|Eg. वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|Eg. मृदुल वाळूवर पावले उमटली.
अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|Eg. ती अलवार हसली.
स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|Eg. पक्षी स्वैर उडत होते.
सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|Eg. फुलांची सुरभि दरवळली.
दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|Eg. तिच्या डोळ्यांत दीप्ती होती.
प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|Eg. अंगणात प्राजक्त फुलला होता.
निरभ्र|पूर्ण स्वच्छ|संस्कृत|ढगविरहित|Eg. निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.

अजून इंटरेस्टिंग...

कोकणस्पर्श: निसर्ग, संस्कृती आणि स्वप्नांचा प्रवास | Author: Eknath Acharekar | Konkansparsh; Explore the hidden treasures of Konkan | Maharashtra Tourism

सह्याद्रीतील शिल्परत्न ‘अमृतेश्वर मंदिर’ | नरेंद्र चांदेवार | Author: Narendra Chandewar | Amruteshwar Temple | Maharashtra Tourism | Incredible India

नागपुरातील संजीवनग्राममध्ये घ्या ‘वेलनेस टुरिझम’ चा आनंद | Sanjeevan Nature Cure | Wellness Tourism in Maharashtra

गड सर केला…आणि मनही | हरिश्चंद्रगडाचा धाडसी प्रवास | Author: Shubhangi Kalmegh | Harishchandragad Trekking Experience & Guide | Forts of Maharashtra

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

नागपुरातील मोहिते वाडा : संघ शाखेची जन्मभूमी | Author: Amol Pusadkar | Mohite Wada, Birthplace of the Rashtriya Swayamsevak Sangh | Heritage Tourism | Maharashtra Tourism

‘पुरण पोळी’ च्या गावाला जाऊ या....! आजनसरा | Author: Sakhi | Ajansara Temple | Temples in Maharashtra | Maharashtra Tourism

देवलापारची गढी | Deolapar Fort | Forts near Nagpur | Forts in Vidarbha

तुम्ही पण होऊ शकता पर्यटन उद्योजिका, महाराष्ट्र शासनाच्या ‘आई’ महिला पर्यटन धोरण | महाराष्ट्र स्टार्टप स्टोरीज | Tours & Travel Entrepreneurship for Women | Startups & Careers | Maharashtra Startup Stories

ज्योतिबाच्या यात्रेत सासनकाठ्या का आणतात? डॉ. संपदा नासेरी | Dr. Sampada Naseri | Jyotiba Temple Experience Kolhapur | Temples in Maharashtra