जगन्नाथ स्तूप, पवनी: बौद्ध सर्कीट | Jagannath Stupa, Pauni | Vidarbha Buddha Circuit Travel Guide

पवनी हे भंडारा जिल्ह्यातील महत्वाचे आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. भंडाऱ्यापासून ४२ किमी अंतरावर ही प्राचीन नगरी वसली आहे. पवनी गावाच्या दक्षिणेला बालसमुद्र नावाचे तळे आहे. या तळ्याच्या दक्षिण काठावर सुमारे ९ मीटर उंचीची टेकडी आहे. या टेकडीवर २० व्या शतकात बांधलेले जगन्नाथाचे देऊळ आहे. या जगन्नाथ टेकडीचे उत्खनन १९६९-७० या दरम्यान करण्यात आले. त्यात एका महास्तुपाचे अवशेष आढळून आले आहेत.

उत्खननात प्राचीन विटांचा भव्य गोलाकार स्तूप, अशोककालीन शिलालेख आणि मुचलिंद नाग शिल्प सापडले. सध्या या स्तूपावर जगन्नाथ मंदिर असून, याला विदर्भातील प्राचीन बौद्ध वारसा म्हणून ओळखले जाते.

उत्खननातील पुराव्यानुसार मूळ स्तूप अशोकपूर्व काळात इ.स. पूर्व तिसऱ्या शतकापूर्वी बांधण्यात आला होता. त्यानंतर शुंग काळात इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात या स्तुपाचे विस्तृतीकरण झाल्याचे निदर्शनास आले. शुंग काळात या विस्तारित स्तुपाभोवती दगडी कठडा प्रदक्षिणापथ आणि चार दिशांना प्रवेशद्वारे बांधण्यात आली.

मौर्यपूर्व काळात बांधण्यात आलेला हा स्तूप गोलाकार होता. त्याचा व्यास ३८.२० मीटर होता. स्तुपाचा पाया खचू नये यासाठी बांधकामात ठिकठिकाणी काटकोन,चौकोनी आकाराच्या पेटिकांची योजना करण्यात आली. या पेटकांमध्ये विटांचे तुकडे आणि करड्या रंगाचा चिखल भरल्या गेला होता. त्यामुळे स्तुपाच्या अंडाचे वजन मर्यादित राहिले.

Jagannath Stupa, Pauni 

पवनी येथे उपलब्ध पुराव्यांमुळे पेटिका पद्धतीच्या बांधणीची प्राचिनता इ.स. पूर्व दुसऱ्या-तिसऱ्या शतकापर्यंत मागे नेता आली. येथील तीन सुची आणि अष्टकोनी खांबावर उत्कृष्ट मानवी शिल्पे आणि बुद्ध धर्माशी निगडित चिन्हे आढळली आहेत. यात स्तूप, धर्मचक्र, कल्पवृक्ष बोधीवृक्ष, भद्रासन आदींचा समावेश आहे. बुद्धप्रतिमा नसल्याने ती हीनयान पंथीयांची आहेत हे उघड होते. स्तुपाच्या अंडाचा वरील भाग मंदिराच्या बांधणीत नष्ट झाला असला तरी त्यावर दगडी हर्निका व छत्रावली होती, याबाबतचे पुरावे मिळाले आहेत.

या स्तुपाची डागडुजी आणि पूजा उत्तर सातवाहन आणि क्षत्रपकाळातही सुरू होती. ते वरच्या थरात सापडलेल्या सातवाहन क्षत्रप नाण्यावरुन तसेच इ.स. च्या दुसऱ्या व तिसऱ्या शतकात भारतात व इतर ठिकाणी सापडलेल्या रोमन खापरांच्या पवनी येथील उपलब्धीवरुन निश्चित करता येते.

अशोकपूर्व ते क्षत्रपकाळात प्रसिद्ध असलेल्या या स्तुपाच्या बांधणीत सामान्य जनांचे योगदान होते हे उत्खननात सापडलेल्या सुमारे पाऊणशे दानलेखांवरुन सिद्ध होते. इ.स. च्या तिसऱ्या शतकानंतर पवनीच्या या हीनयान बौद्ध धर्म केंद्राची ओळख संपल्याचे लक्षात येते.

हरदोला टेकडी, स्तूप | Hardola Tekdi Stupa

पवनीच्या उत्तर-पश्चिमेस हरदोला टेकडी नावाचे संरक्षित स्मारक आहे. या स्तूप टेकडीची उंची आठ मीटर आहे. हा स्तूप मातीचा होता.

कसे पोहोचाल? | How to reach Jagannath Stupa Pauni

  • रस्त्याने नागपूरवरून तुमसर-पवनी राज्यमार्गाने किंवा भंडारा मार्गे खासगी कार/बसने सहज जाता येते. प्रवासाला सुमारे १.५ ते २ तास लागतात.
  • रेल्वेने सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन 'भंडारा रोड' आहे. तेथून पवनीला जाण्यासाठी स्थानिक वाहतुकीची (एस.टी. बस किंवा रिक्षा) सोय उपलब्ध आहे.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? तुमचे मत कमेंटमध्ये लिहा आणि मित्रांसोबत शेअर करा.

Comments

🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
💡
आजचा मराठी शब्द by WhatsUp मराठी
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|Eg. तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|Eg. त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|Eg. डोंगरातील पाणी नितळ आहे.
तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|Eg. तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|Eg. सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
ओंजळ|हाताचा कप्पा|देशज मराठी|हातभर|Eg. त्याने ओंजळीत पाणी घेतले.
हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|Eg. हळुवार वारा वाहत होता.
मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|Eg. तिचा आवाज मंजुळ आहे.
मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|Eg. मृद्गंध दरवळला.
आभाळमाया|असीम प्रेम|देशज मराठी|अपार माया|Eg. आईची आभाळमाया विसरता येत नाही.
धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|Eg. तो संगीतात धुंद झाला.
झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|Eg. थंड झुळूक आली.
नभ|आकाश|संस्कृत|गगन|Eg. नभ निरभ्र होते.
उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|Eg. त्याला आनंदाचा उमाळा आला.
साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|Eg. ती साजिरी दिसत होती.
गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|Eg. फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|Eg. सूर्याचा कवडसा पडला.
जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|Eg. गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|Eg. गाण्याची लय सुंदर होती.
कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|Eg. कोमेजलेली फुले दिसत होती.
दरवळ|मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|Eg. चाफ्याचा दरवळ पसरला.
सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|Eg. सावळ्या ढगांनी आकाश भरले.
सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|Eg. तिचा चेहरा सतेज दिसत होता.
मधुमालती|सुगंधी वेल|संस्कृत|फुलवेल|Eg. अंगणात मधुमालती फुलली होती.
गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|Eg. कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
हुरहूर|मनातील ओढ|देशज मराठी|व्याकुळता|Eg. जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|Eg. गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|Eg. धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|Eg. पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|Eg. दिव्याची ज्योत लवलवत होती.
उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|Eg. तरुणांमध्ये उमेद आहे.
गोजिरी|नाजूक सुंदर|देशज मराठी|साजिरी|Eg. गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|Eg. आंब्याला मोहोर आला आहे.
सुगंधी|सुगंध असलेले|संस्कृत|दरवळते|Eg. सुगंधी फुले बहरली.
अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|Eg. गावचा चहा अमृततुल्य लागतो.
झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|Eg. घंटांचा झंकार झाला.
सहजसुंदर|नैसर्गिक सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|Eg. तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|Eg. आसमंत शांत होता.
सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|Eg. सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|Eg. डोंगरातून निर्झर वाहत होता.
नादमय|संगीतपूर्ण|संस्कृत|सुरेल|Eg. सभागृह नादमय झाले.
मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|Eg. मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|Eg. संगीताचे स्पंदन जाणवत होते.
चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|Eg. वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|Eg. मृदुल वाळूवर पावले उमटली.
अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|Eg. ती अलवार हसली.
स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|Eg. पक्षी स्वैर उडत होते.
सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|Eg. फुलांची सुरभि दरवळली.
दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|Eg. तिच्या डोळ्यांत दीप्ती होती.
प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|Eg. अंगणात प्राजक्त फुलला होता.
निरभ्र|पूर्ण स्वच्छ|संस्कृत|ढगविरहित|Eg. निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.

अजून इंटरेस्टिंग...

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

तुम्ही पण होऊ शकता पर्यटन उद्योजिका, महाराष्ट्र शासनाच्या ‘आई’ महिला पर्यटन धोरण | महाराष्ट्र स्टार्टप स्टोरीज | Tours & Travel Entrepreneurship for Women | Startups & Careers | Maharashtra Startup Stories

‘पुरण पोळी’ च्या गावाला जाऊ या....! आजनसरा | Author: Sakhi | Ajansara Temple | Temples in Maharashtra | Maharashtra Tourism

अलेक्झांडर बर्न्स : बुखाराकडे निघालेला ब्रिटिश प्रवासी | Alexander Burnes and Travels into Bukhara | Travellers of the World

भटाळा गावात आहे ‘भोंडा महादेव’ | Author: Himgauri Deshpande | Bhonda Mahadev Temple Bhatala | Temples of Vidarbha | Temples of Maharashtra

बांबूंच्या बेटातून करा ‘झुकझुक गाडी’ ची रम्य सफर | First Bamboo Garden of India, Amravati | Author: Parijaat | Maharashtra Tourism

महाराष्ट्रातील डार्क स्काय पर्यटन, शहरी गोंगाटापासून दूर, आकाशाच्या कुशीत | Dark Sky Tourism | Astro Tourism | Maharashtra Tourism Policy

भामरागडमध्ये जलक्रांतीतून निर्मित ‘तलावांचे जाळे’ | अनिकेत प्रकाश आमटे | लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte

नागपुरातील संजीवनग्राममध्ये घ्या ‘वेलनेस टुरिझम’ चा आनंद | Sanjeevan Nature Cure | Wellness Tourism in Maharashtra

वास्को द गामा : समुद्रमार्गाने भारत गाठणारा प्रवासी | Vasco da Gama and the Sea Route to India | Travellers of the World