Posts

Showing posts from February, 2026

श्रीभृशुंड गणेश | Shri Bhrushund Ganesh Temple | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide | Temples near Nagpur | Temples of Vidarbha

Image
विदर्भ अष्टविनायक | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide श्रीभृशुंड गणेश श्री भृशुंड गणेश मूर्तीचा इतिहास फारच प्राचीन आहे. भंडारा शहरापासून पूर्वेला तुमसर मार्गाला लागले की अवघ्या तीन किलोमीटरवरच मेंढा नावाचं गाव आहे. याच गावात इ.स. पूर्व ११ व्या शतकात भृशुंड ऋषींनी या गणेशाची स्थापना केली, अशी आख्यायिका आहे. आजचं मेंढा गाव म्हणजे पूर्वीचं नागांचं पद्‌मपूर राज्य. भृशुंडी ऋषी नाग वंशातीलच. त्यांनी स्थापन केलेली ही मूर्ती बघता क्षणीच थोडी चमत्कारीक वाटते. कारण या मूर्तीच्या मुखमंडळाच्या जागी मानवी नाकपुड्या,डोळे आणि किंचित दाढीमिशाही आढळतात. त्यामुळे ही गणेश मूर्ती दुर्मिळ ठरते. श्रींच्या वेगळ्या रुपामुळेच भाविकांमध्ये ही गणेश मूर्ती लोकप्रिय आहे. अखंड रक्ताश्म शीळेवर कोरलेली ही मूर्ती गाभाऱ्यात तळापासून आठ फूट उंच व चार फूट रूंद आहे. पूर्ण सिंदूर चर्चित मूर्ती चतुर्भूज असून मूशकारूढ आहे. उजवा पाय खाली सोडलेला व डाव्या पायाची मांडी घातलेली मूर्ती आहे. चारही हातांमध्ये पाश, अंकूश, मोदक असून उजवा वरद हस्त आहे. शिरोभागी पंचमुखी शेषफणा आहे. भृशुंड गणेशाचं मंदिर हेमाडपंथी आहे. मूर्तीची स्थाप...

अष्टादशभुजा गणपती | Ashtadashbhuja Ganpati | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide | Temples near Nagpur | Temples of Vidarbha

Image
विदर्भ अष्टविनायक | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide अष्टादशभुजा गणपती प्रभू श्रीरामाच्या पदकमलांनी पवित्र झालेल्या रामटेकजवळच्या शैवल्य पर्वतावर अष्टादश भुजा गणपती विराजमान आहेत. हा शैवल्य पर्वत म्हणजे शम्बूक ऋषींचं आश्रयस्थान. या पर्वतावर विद्याधराची संस्कृती होती. अठरा विश्वाच्या विज्ञानाचे ज्ञान असलेल्या या विद्याधराची दृष्टीच या अठरा भुजा गणपतीत आढळते. अभय हस्त व मोदक हस्त वगळता मूर्तीच्या प्रत्येक हातात अंकुश, पाश, खटवांग, त्रिशूळ अशी शस्त्रं आहेत. या देवळाचा घुमट भोसलेकालीन असला तरी मूर्ती ५०० वर्षांपूर्वीची आहे. विशेष म्हणजे गणेशाची मूर्ती प्रामुख्याने चार हातांतीच असते. पण ही मूर्ती मात्र दुर्गेसारखी अष्टादश भुजा आहे. साडेचार ते पाच फूट उंचीची ही मूर्ती पांढऱ्या दगडापासून (संगमरवर) बनविलेली असून, या मूर्तीची सोंड दोन्ही बाजूंना वळलेली आहे.हे मंदिर रामटेक गडाच्या पायथ्याशी आहे. मंदिरात महागणपतीच्या मध्यभागी रिद्धी-सिद्धी आणि गणेशजींच्या हातात शस्त्रे आहेत. ही मूर्ती साधारण अकराव्या किंवा बाराव्या शतकातील असावी, असं मानलं जातं. अष्टादशभुजा गणपती | Ashtadashbhuja Ganpati | Vida...

राजोलीचा नागवंशीय किल्ला | Rajoli Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

Image
विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha बस्तर-चंद्रपूर क्षेत्रात प्राचीन काळापासून नावंशींचे राज्य होते. राजोली हे गाव चंद्रपूर जिल्ह्यातील मुल गावापासून इशान्येस १६ किमी अंतरावर आहे. या गावाच्या दक्षिणेला असलेल्या डोंगरावर हा दुर्ग असून केवळ भग्न खिंडारे आणि जीर्ण स्थापत्य शिल्लक आहे.माना सरदाराने हा किल्ला गावाचे संरक्षण म्हणून बांधला असावा. आज हा किल्ला इतिहासजमा झाला आहे. कालचक्राच्या गतीनुसार या किल्ल्याची आवश्यकता राहिलेली नाही. येथे माणसाचा वावर नाही. Reference Pic: Rajoli Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा!  🌍✍️

गडबोरी किल्ला | Gadbori Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

Image
विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha चं द्रपूर- नागभीड रस्त्यावर सिंदेवाही फाट्यापासून ९ किमी अंतरावर  गडबोरी  नावाचे गाव आहे. हे गावच डोंगरावर असून पायथ्याशी एक प्राचीन मंदिर आहे. पठारावर सर्वत्र बांधकामाची खिंडारं उभी आहेत. तेथेच श्री केशवनाथाचे छोटेखानी मंदिर आहे. १७३४ साली येथील मोकासदाराने चंद्रपूरच्या गोंड राजाविरुद्ध बंड पुकारले. राजाने सेमाजी ढुम्यास किल्ल्यावरील बंड मोडून काढण्यास पाठविले. येथे हाताघाईची लढाईही झाली. याच ढुम्यास राजाने (रामशहा) पुढे  गडबोरीची  रचना केली. जवळच नवरगाव नावाचे गाव आहे. त्याची सनद आपला मुलगा नारायण याच्या नावे केली.  Reference Pic: Gadbori Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha या क्षेत्रात गोंड काळात मोकासदारी व फौजदारी शासन व्यवस्था राबविण्यात आली. तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा!  🌍✍️

पितरांचा किल्ला द्रुग | Pitarancha Drug Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

Image
विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha य वतमाळ जिल्ह्यातील श्री कळंब- चिंतामणी या विदर्भातील अष्टगणेश स्थानांपैकी एक अशा एका गावाजवळ केवळ ११-१२ किमीवर घनदाट अरण्यात एक किल्ला लपलेला असून त्याचे नाव द्रुग-दुर्ग आहे. दुर्गम भाग आणि घनदाट जंगलांमुळे मानव इकडे फिरकत नाही. हा किल्ला पितरांचा असून कुणी धाडसी इकडे गेला की भूतखेत त्याला पळवून नेतात अशी धारणा जनमनात निर्माण झाली. हा किल्ला म्हणजे मध्यम उंचीवरील काळ्याशार दगडांची तटबंदी आहे.बंदुकी व टेहळणीसाठी गवाक्ष, बुरुज प्रवेशद्वार आणि तेलातुपाचे रांजण असे पुरावशेष आहेत. तटावरुन नजर फिरविताना किल्ल्याभोवती अष्टदळाकृती खंदक दिसतो. किल्ल्याच्या पायथ्याशी यक्षराज कपीमुखी हनुमंताचे मंदिर आहे. हा किल्ला इ.स. १५-१६ व्या शतकात बांधला असावा. माहुरच्या उदाराम देशमुख या राजवंशाच्या अधिपत्याखाली हे स्थान असावे,असा तर्क आहे. तुरुंगसदृष्य अशी या किल्ल्याची रचना आहे. जलाशयाचे शुष्क क्षेत्रही दिसते. द्रुग किल्ला ट्रेकर्स आणि फिरस्त्यांसाठी एक आव्हानच आहे. Reference Pic: Pitarancha Drug Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha कसे पो...

रामटेक डोंगरी दुर्ग | Ramtek Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

Image
विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha वि दर्भात श्री क्षेत्र रामटेक हे एक अतिप्राचीन तीर्थक्षेत्र आहे. दोन हजार वर्षांचा इतिहास असलेलं हे गाव सुप्रसिद्ध वाकाटक नृपतींच्या इतिहासाशी निगडित आहे. रामटेकजवळच ७ किमी दक्षिणेस नंदीवर्धन नावाचं एक गाव असून ते वाकाटकांचं राजधानीचं नगर होतं. रामटेक गावात अगदी मध्यभागी एका टेकडीवर हा दुर्ग आहे. त्याला चारही बाजुंनी उतार आहे. संपूर्ण पठार तटबंदीने परिवेष्टित असून डोंगरांच्या रांगा दोन दिशांना विस्तारल्या आहेत. केवळ नृसिंहाचे मंदिर असलेली एक सोंड आणि वामनावताराचे मंदिर असलेली दुसरी सोंड आहे. गावातूनही गडावर चढता येतं. तेथे पायऱ्या आहेत. पूर्वेकडे थेट अंबाळा तलावापर्यंत उतरत्या पायऱ्या आहेत. शिवाय एसटी बसनेही श्री कालीदास स्मारकापर्यंत जाण्याची सोय आहे. अंबाळा तलावाच्या स्पर्शरेषेपासून वर जाण्यास छोटासा पण सुंदर घाटमार्ग आहे. किल्ल्याचे श्री वराह महाद्वार भव्य आणि ऐटदार आहे. तेथून पुढे गेल्यावर आपण पुन्हा एका दक्षिणांगी प्रवेशद्वारातून प्रवेश करुन श्री गोकुळ दरवाजापर्यंत पोहोचतो. हा दरवाजा ११ व्या-१२ व्या शतकातील असावा. दरवाजावरी...

बाळापूरचा किल्ला | Balapur Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

Image
विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha व ऱ्हाडात (पश्चिम विदर्भ) अकोला जिल्ह्यातील बाळापूरचा डोंगरी किल्ला हा सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जात असे. ज्याचे हाती बाळापूर त्याचे हाती वऱ्हाड असे जणू समिकरणच होते. दक्षिण भारतात जाणाऱ्या मार्गावर हा किल्ला पडतो. दक्षिण विदर्भात माहुरगडला जसे महत्व आहे तसे वऱ्हाडात बाळापूरला. शिवछत्रपतींच्या काळात बाळापुरातूनच वऱ्हाडाच्या मोहिमा आखल्या जात. बाळापूरजवळचे अकोला हे गाव औरंगजेबाच्या काळात इ.स. १६९० साली आसदखान नावाच्या सरदाराने वसविले. त्यानेच येथे आसदगड या नावाने येथे एक छोटेखानी भुईकोट बांधला. बाळापूर बसस्थानकापासून किल्ला कार्यालय २ किमी अंतरावर असल्याने दुरुनच तटबंदी व बुरुजाचे दर्शन होते. प्रवेशद्वार भव्य असून त्यावरील मेहरपीचे स्थापत्यशिल्प अप्रतिम आहे. बाळापूरचा किल्ला | Balapur Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha प्रवेशमार्ग उत्तरेकडून आहे. या प्रवेशमार्गावर तीन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा चौरस अशा भक्कम बुरुजामध्ये आहे. या उत्तराभिमुख दरवाजातून आत गेल्यावर दुसरा दरवाजा असून तो पश्चिमेकडे तोंड करून आहे. ह...

नरनाळा दुर्ग | Narnala Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

Image
विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha अ कोला जिल्ह्याच्या आकोट शहरापासून केवळ १९ किमी अंतरावर उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांगांच्या हिरव्यागार टेकड्यांच्या माथ्यावर वसलेला, नरनाळा किल्ला महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहास आणि स्थापत्यशैलीचा एक स्मारकीय पुरावा आहे. ३६२ एकरांवर पसरलेला, हा प्राचीन किल्ला शाहनूर किल्ला या नावानेही ओळखला जातो. नरनाळा किल्ला १० व्या शतकात गवळी राजांनी बांधला होता. एक शूर राजपूत शासक राजा नरनाळ सिंह यांच्या नावावरून हा किल्ला या प्रदेशाच्या लष्करी आणि सांस्कृतिक उत्क्रांतीचा पुरावा म्हणून उभा आहे. शतकानुशतके, अनेक शक्तिशाली राजवंशांनी नरनाळ्यावर राज्य केले, प्रत्येक राजवंशाने त्याच्या रचनेवर आणि महत्त्वावर अमिट छाप सोडली. नरनाळा दुर्ग | Narnala Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha यादव राजवंशाने दख्खनमध्ये किल्ल्याचा प्रभाव वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली तर देवगड-नागपूरच्या राजगोंडांनी त्याच्या संरक्षण यंत्रणेला बळकटी दिली. नंतर बहमनी सल्तनतने नियंत्रण मिळवले आणि पर्शियन आणि इस्लामिक स्थापत्य शैली सुरू केल्या ज्या आजही दिसून येतात. फा...

गाविलगड | Gavilgad Killa | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

Image
विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha अ मरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या पर्वत रांगात चिखलदऱ्याच्या पठारावर दक्षिण दिशेस सुमारे ६ किमी अंतरावर समुद्र सपाटीपासून २९४० फूट उंचावर गाविलगड उभा आहे. मेळघाटच्या घनदाट अरण्यात वसलेला गाविलगड जणू दक्षिण दिशेचा पहारेकरीच आहे. हा किल्ला गवळी लोकांनी बांधला, अशी अख्यायिका स्थानिक लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. परंतु या संदर्भात कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. मुजाहिद वंशाच्या अहमदशहा वली पहिला यांनी गाविलगड किल्ला निर्माण केल्याचा उल्लेख फार्सी इतिहासकार फिरिश्ता करतो. गाविलगड | Gavilgad Killa | Forts near Nagpur | Forts of Vidarbha हा किल्ला उत्तरेतून दख्खनमध्ये येणाऱ्या मार्गावर बांधण्यात आला. त्यामुळे या किल्ल्याला दख्खनचे प्रवेशद्वार मानले जात असे. उत्तरेतून येणाऱ्या मुस्लीम सरदारांना दख्खनमध्ये प्रवेश करताना काही प्रमाणात संघर्षाला सामोरे जावे लागत असे. हा किल्ला नंतरच्या काळात बहमनी, निजामशाही, इमादशाही यांच्या अधिपत्याखाली होता. शेवटी १८ व्या शतकात भोसल्यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतल्याची नोंद उपलब्ध आहे. या किल्ल्याच्या तटबंदीत...

माहुरगड | Mahurgad Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

Image
विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha व ऱ्हाडच्या इतिहासात माहुरगडचे राजकीय व संरक्षणात्मक ठाणे म्हणून महत्व होते. सुभे वाशिम, परगणे माहुर, अचलपूर असे अनेक उल्लेख प्राचीन दस्तावेजांमध्ये आढळतात. गाविलगड, नरनाळा, बाळापूर आणि माहुर ही वऱ्हाडातील चार महत्त्वाची ठाणी होत. बहामनी, देशमुख, निझाम व भोसले या चार राजवंशांचा इतिहास या किल्ल्यांभोवती गुंतला आहे. परंतु आज माहुर ओळखल्या जाते ते श्रीक्षेत्र रेणुका देवीच्या पुनीत वास्तव्यासाठी. हे स्थान मराठवड्याच्या नांदेड जिल्ह्यात समाविष्ट असले तरी माहुरचा किल्ला हा वऱ्हाडातील किल्ला (यवतमाळजवळ) म्हणून ओळखल्या जातो.  माहुरगड | Mahurgad Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha माहुरगड | Mahurgad Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha किल्ल्याची तटबंदी, काही बुरुज अजूनही शाबूत आहेत. आतील भागात भग्न इमारतींचे अवशेष आहेत. येथे एकूण १९ बुरुज होते. त्यातील रेणुका बुरुज, धन बुरुज व कालिका बुरुज या तीन बुरुजांना धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. रेणुका माता मंदिरा समोरील बुरुजास तिच्याच नावे रेणुका बुरुज असे नामकरण झाले आहे...

सुरजागड | Surjagad Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

Image
विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha घ नदाट जंगल मुक्त अभयारण्य नक्षलग्रस्त क्षेत्र,हिंस्र श्वापद, दळणवळणांच्या साधनांची कमतरता असलेले चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हे गोंड नृपतींच्या अखत्यारित होते. त्याआधी काही वनक्षेत्रात माना राजवंशाचे राजे होते. या भागात इंग्रजांच्या काळापासून जे गिरीदुर्ग ज्ञात आहेत त्यात टिप्पागड, वैरागड, माणिकगड, बल्लारशाह हे किल्ले भांदक,चंद्रपूर, चंदनखेडा, भटाळा ही तटबंदीची शहरे आणि अनेक गढ्या आहेत. याशिवाय सुरजागड, गडबोली व राजोली हे तीन वनदुर्ग- डोंगरी दुर्गही या जिल्ह्यात आहेत, हे विशेष. सुरजागड | Surjagad Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha सुरजागड किल्ला गडचिरोली जिल्ह्यात एटापल्लीपासून गड्डा मार्गावर पूर्वेला सुमारे २५ ते ३० किमी अंतरावर जंगलात आहे. मुळात डोंगरी किल्ला असून अहेरी जमीनदारीत मोडतो. उंच डोंगरावरील पठार आणि तटबंदी असे त्याचे स्वरुप आहे. गोंड माडिया जमातीची देवता श्रीठाकुरदेवाचे देवस्थान येथे आहे. मकरसंक्रमण काळात येथे जत्रा भरते. या क्षेत्रात प्राचीन काळी नागवंशीय माना राजा कुरुम प्रहोद याची सत्ता होती. हा काळ साधा...

टिपागड | Tipagarh Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

Image
विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha ग डचिरोली हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. येथील गाढवी, खोब्रागडी, प्राणहिता, इरई, झरपट, वैनगंगा, वैलोचना, टिपागडी अशा अनेक लहानमोठ्या नद्यांच्या खोऱ्यात घनदाट जंगल असून या जंगलांमध्ये बहुतांश आदिवासींचेच वास्तव्य आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या ठिकाणापासून ८० ते ८५ किमी अंतरावर कोरची तालुक्यात किर्र जंगलात मुरुम गावापासून ७ किमी अंतरावर टिपागड आजही अस्तित्वात आहे. पलिकडे छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्याची सीमा लागते, एवढा तो अतिदुर्गम भागात आहे. या किल्ल्याभोवतालचा परिसर वन व वन्यप्राण्यांनी घेरलेला आहे. हा किल्ला नेमका कुणी आणि केव्हा बांधला याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. टिपा या शब्दाचा अर्थ गोंडी भाषेत द्विप असा होतो. विविध आकाराच्या दगडांचा हा डोंगर उन-वारा-पावसाचा मारा सहन करीत उभा आहे. या पठारावर एक जलाशय असून त्याला पायऱ्या आहेत. या तलावातून एक नदी झिरपते तिला टिप्पागढी नदी असे म्हणतात. पुढे तील खोब्रागढी नदीस मिळते. त्याच तलावाजवळ एका खिंडीचे अवशेष आहेत. या खिंडीत गुरु टिपाबाबा यांची समाधी आहे. तेथून आत प्रवेश करता येतो. तलावाच्या दक...

बाळापूरचा किल्ला | Balapur Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

Image
विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha व ऱ्हाडात (पश्चिम विदर्भ) अकोला जिल्ह्यातील बाळापूरचा डोंगरी किल्ला हा सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जात असे. ज्याचे हाती बाळापूर त्याचे हाती वऱ्हाड असे जणू समिकरणच होते. दक्षिण भारतात जाणाऱ्या मार्गावर हा किल्ला पडतो. दक्षिण विदर्भात माहुरगडला जसे महत्व आहे तसे वऱ्हाडात बाळापूरला. शिवछत्रपतींच्या काळात बाळापुरातूनच वऱ्हाडाच्या मोहिमा आखल्या जात. बाळापूरजवळचे अकोला हे गाव औरंगजेबाच्या काळात इ.स. १६९० साली आसदखान नावाच्या सरदाराने वसविले. त्यानेच येथे आसदगड या नावाने येथे एक छोटेखानी भुईकोट बांधला. बाळापूर बसस्थानका पासून किल्ला कार्यालय २ किमी अंतरावर असल्याने दुरुनच तटबंदी व बुरुजाचे दर्शन होते. प्रवेशद्वार भव्य असून त्यावरील मेहरपीचे स्थापत्यशिल्प अप्रतिम आहे. बाळापूरचा किल्ला | Balapur Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha प्रवेशमार्ग उत्तरेकडून आहे. या प्रवेशमार्गावर तीन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा चौरस अशा भक्कम बुरुजामध्ये आहे. या उत्तराभिमुख दरवाजातून आत गेल्यावर दुसरा दरवाजा असून तो पश्चिमेकडे तोंड करून आहे....

श्री चिंतामणी | Chintamani Ganesh | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide | Temples near Nagpur | Temples of Vidarbha

Image
विदर्भ अष्टविनायक | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide श्री चिंतामणी ऋग्वेदाशी संबंध दाखविणाऱ्या श्रीक्षेत्र कदम्बपूर म्हणजेच आजचे विदर्भातील यवतमाळपासून २० किमी अंतरावर असणारे कळंब क्षेत्री श्री चिंतामणीचं मंदिर आहे.कळंबचा गणपती म्हणून लोकप्रिय असलेल्या या गणपतीची प्राणप्रतिष्ठा प्रत्यक्ष कदंब ऋषींनी केली आहे. त्यांच्या नावावरुनच गावाला कळंब हे नाव पडले. श्रीचिंतामणी अतिशय जागृत देवस्थान आहे. या मूर्तीची स्थापना खूप खोलवर करण्यात आली आहे. मंदिराचा गाभारा चक्क सभामंडपाच्या पातळीपासून २३ फूट खोल आहे. खाली उतरण्यासाठी २९ पायऱ्या आहेत. गाभाऱ्यात गणेशकुंड आहे. या कुंडात दर १२ वर्षांनी गंगा अवतरते. त्याला गणेशभेट असं म्हटल्या जातं. या कुंडातील पाण्यात त्वचारोग, कुष्ठनाश करण्याची क्षमता असते,अशी श्रद्धा आहे. या काळात येथे भरणाऱ्या यात्रेत हजारो भाविक त्या तीर्थात स्नान करुन पापक्षालन करतात. श्री चिंतामणी | Chintamani Ganesh | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide गौतम ऋषीच्या शापाने कुष्ठरोगी झालेल्या इंद्राला गणपतीने शापमुक्त करुन स्वस्थानी विराजिले असं म्हणतात. त्याकरिता इंद्राने येथील गणपतीची...

वक्रतुंड श्री शमी विघ्नेश | Shami Vignesh Ganpati | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide | Temples near Nagpur | Temples of Vidarbha

Image
विदर्भ अष्टविनायक | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide वि दर्भातील पंढरपूर म्हणून नावारुपाला आलेल्या नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात धापेवाडाजवळ आदासा नावाचं एक लहानसं गाव आहे. हे गाव नागपूरपासून ३५ किमी अंतरावर येतं. या गावात श्रीगणेशाची भव्य त्रिभंगी मूर्ती आहे. तिचं गंडस्थळ तिरपं असल्यानं गणेश नृत्यमुद्रेतील असल्याचं जाणवतं. अर्थात मूर्तीवरील शेंदराच्या लेपामुळं मूळ रुप लक्षात येत नाही. महाराष्ट्रातील २१ गणेशात या शमी विघ्नेशाची गणना होते. वक्रतुंड श्री शमी विघ्नेश | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide अठरा फूट उंच, सात फूट रुंद, अष्टभुज आणि वाहन सिंह असलेली ही गणेश मूर्ती आहे. प्रचंड आकारामुळं ती भक्तांना अधिक भावते. तिची पूजा करणं म्हणजे भाविकांची परीक्षाच असते. गाभाऱ्यावर चढल्यावरच तिची पूजा शक्य आहे. नवसाला पावणारा गणेश अशी धारणा आहे. गणेश कोषातही या गणेशाची माहिती आढळते. या माहितीनुसार प्राचीन काळी पाप आणि दृष्ट प्रवृत्तींचं स्तोम माजलं असताना त्याचं उच्चाटन करण्यासाठी शिव पार्वतीरुपी शमी वृक्षातून हा गणेश प्रगट झाला. म्हणून याला शमी विघ्नेश म्हणतात. संत रामदासांनी त्यांच्या ...

विदर्भ अष्टविनायक | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide | Temples near Nagpur | Temples of Vidarbha

Image
🕉️ विदर्भ अष्टविनायक | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide वि दर्भ म्हटलं की डोंगररांगा, किल्ले , जंगलं आणि समृद्ध संस्कृती डोळ्यासमोर येते. पण याच विदर्भात गणरायाची अनेक प्राचीन आणि जागृत मंदिरं आहेत. पश्चिम महाराष्ट्रात अष्टविनायक यात्रा प्रसिद्ध आहे; तसंच विदर्भातही भक्तिभावाने ओळखली जाणारी ‘विदर्भ अष्टविनायक यात्रा’ आहे. ही यात्रा श्रद्धा, इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि चंद्रपूर परिसरात विखुरलेली ही गणेश मंदिरं भक्तांना आध्यात्मिक समाधान देतात. विदर्भ अष्टविनायक | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide 📿 विदर्भातील अष्टविनायक मंदिरांची यादी | List of Vidarbha Ashtavinayak श्री विघ्नेश (आदासा) – नागपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि भव्य स्वयंभू गणेशमूर्ती. चिंतामणी (कळंब) – भक्तांच्या चिंतेचा नाश करणारे प्राचीन स्थान. सिद्धीविनायक (केळझर) – डोंगरमाथ्यावर वसलेले शांत आणि निसर्गरम्य गणेश मंदिर. सर्वतोभद्र (पवनी) – वैणगंगा नदीकाठी असलेले ऐतिहासिक आणि पवित्र स्थान. वरदविनायक (भद्रावती) – हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील प्राचीन गणेश मंदिर...

देवगड | Deogarh Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

Image
विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha ना गपूर येथून छिंदवाड्यास जाणाऱ्या रस्त्यावर थोडे आडमार्गात घनदाट अरण्यात देवगडचा भव्य किल्ला आहे. किल्ला भग्न असला तरी तेथील अवशेष श्रीमंत गोंड नृपतींचा इतिहास सांगतात. छिंदवाड्याच्या आधी देवगड फाटा लागतो. तेथून ९ किमीवर मोहरवेड (मोखेड) नावाचे गाव आहे. तेथून पुढे ९ किमी लोहांगी गाव आणि मग ७ किमी आत गेलो की देवगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. घाटातून जपून जावे लागते. दक्षिणेला पायथ्याशी देवगड नावाचे खेडे असून उत्तरेला उंचावर अंडगोलाकृती देवगड दिसतो.किल्ल्यावर चढण्यास उतरत्या पायऱ्या आहेत. सर्वप्रथम एका मध्ययुगीन देवालयाचे भग्न अवशेष दिसतात.द्रवीड-नागर स्थापत्यशैलीचा प्रभाव वास्तुंवर दिसतो. चुन्यात बांधकाम केलेले प्रवेशद्वार ४५ फूट उंच आहे. नगारखान्याची वास्तू डौलदार असून गोंड स्थापत्य शैलीचा अद्वितीय नमुना आहे.पश्चिम दिशेला एका उंच ठिकाणी गोंड राजाच्या कुलदेवतांची बैठक असून त्यावर आरोहण करण्यासाठी प्रशस्त पायऱ्या आहेत. Deogarh Fort | Forts of Vidarbha near Nagpur देवगड ही १८ व्या शतकात गोंड साम्राज्याची राजधानी होती. मध्यप्रदे...

माणिकगड | Manikgarh Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

Image
विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha माणिकगड चं द्रपूर या जिल्ह्याच्या ठिकाणापासून दक्षिणेस राजुरा नावाचे गाव आहे. या गावाच्या नैऋत्य दिशेला गडचांदूरपासून १० ते १२ किमी अंतरावर जिवती गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या बाजूला घनदाट अरण्यात माणिकगड किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून ५०७ मीटर उंच हा दुर्ग पूर्वी गोंडांच्या अधिपत्याखाली होता. पण हा किल्ला त्यापूर्वीही माना राजवंशाच्या नाग जमातीपैकी एक गहिलु राजाने नवव्या शतकात बांधला असावा,असे मानतात. कारण याच्या मुख्य प्रवेश द्वाराच्या उजव्या भागाला दोन फणा काढलेल्या नागाची आकृती स्पष्ट दिसते. शादुर्ल हत्तीवर आक्रमण करणारी मुद्रा हे गोंडांचे वैशिष्ट्य या द्वारावर दिसत नाही. वनविभागाचे फाटक ओलांडून डावीकडे वळल्यावर अतिसुंदर प्रस्तर शिल्पीत प्रवेशद्वार लागते. हे स्थापत्य यादवपूर्व काळातील (इ.स. ११ व १२ वे शतक) आहे. प्रवेशद्वारात निवासी घुमट्या असून त्यात तत्कालीन पहारेकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था असावी. संपर्ण दुर्ग काळ्या चिरेबंद प्रस्तरांनी तटबंदीत आहे. दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत जाताच एक तोफ आहे. बुरुजापासून १ किमीवर एक पा...

बल्लाळशाह किल्ला | Ballarshah Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

Image
विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha बल्लारपूरचा किल्ला (बल्लाळशाह किल्ला) चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात जसे गिरीदुर्ग आहेत तसे भुईकोट सुद्धा आहेत. त्यात प्रत्यक्ष चंद्रपूर, भांदक, बल्लारशा या वास्तुंचा अंतर्भाव होतो. विदर्भातील विशाल पात्राच्या वर्धा (वरदा) नदीमुळे विदर्भाचे भौगोलिदृष्ट्या दोन भाग स्पष्ट दिसतात. ही वर्धा उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहात जात असून या नदीच्या पूर्व तिरावर हा प्रसिद्ध बल्लारपूर किल्ला आहे. बल्लारपूर किल्ल्याची स्थापना गोंडराजा खांडक्या बल्लाळशाह (१४३७-६२) यांनी केली होती. ते चंद्रपूर शहराचे संस्थापकही होते. राजाला चमत्कारी पाण्याचा एक तलाव सापडला ज्यामुळे त्याचे फोडे आणि ट्यूमर बरे झाले. याला अंकलेश्वर तीर्थ असे नाव देण्यात आले, अशी कथा आहे. किल्ला तसेच आजूबाजूचे शहर हे बल्लाळ यांचे शहर म्हणजेच बल्लाळपूर आत्ताच्या स्थितीपर्यंत वाढले. बऱ्याच वर्षांपर्यंत बल्लारपूर शहरात गोंड राजाची राजधानी होती, चंद्रपूर शहर नंतर स्थापित केले गेले. शेवटचा गोंड राजा निळकंठ-शाह बल्लारपूर येथे तुरुंगात मरण पावला. Ballarshah Fort | Forts of Vidarbha near Nagpur आ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्प | Melghat Tiger Reserve | Tiger Reserves of Vidarbha and Nagpur

Image
विदर्भातील व्याघ्र प्रकल्प | Tiger Reserves near Nagpur | Maharashtra Tiger Reserves - Vidarbha मे ळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात वसलेला निसर्गाचा एक अद्भुत खजिना आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत पसरलेला हा प्रदेश १९७४ साली व्याघ्र  प्रकल्पअंतर्गत स्थापन झाला आणि आज तो देशातील महत्त्वाच्या व्याघ्र संवर्धन क्षेत्रांपैकी एक मानला जातो. सुमारे २,७६८ चौ.कि.मी. क्षेत्रफळात पसरलेल्या मेळघाटमध्ये उंच डोंगररांगा, खोल दऱ्या, घनदाट जंगले आणि नद्यांचे जाळे यामुळे एक समृद्ध व वैविध्यपूर्ण परिसंस्था तयार झाली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प | Tiger Reserves of Vidarbha | Maharashtra Tiger Reserves येथील जंगल मुख्यतः उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी प्रकारचे असून सागवान, ऐन, हलदू आणि बांबू यांसारख्या वृक्षांनी नटलेले आहे. पावसाळ्यात संपूर्ण परिसर हिरवळीने बहरून जातो आणि जंगल जणू नवजीवन घेतल्यासारखे भासते. ही वनसंपदा अनेक प्राण्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान ठरते. मेळघाटची खरी ओळख येथे आढळणाऱ्या बंगाल वाघांमुळे आहे. वाघांसोबतच बिबट्या, गौर, अस्वल, सांबर, चितळ, नीलगाय, रानडुक्क...

विदर्भातील २६ किल्ले तुम्ही बघितलेत का? | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

Image
विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha वि दर्भात एक समुद्र दुर्ग सोडल्यास किल्ल्यांचे जवळपास सर्वच प्रकार आढळतात. येथील किल्ल्यांचा इतिहास प्राचीन आहे. सातवाहन, वाकाटक, बहामनी, मुघल ते भोसले अशा विविध कालखंडांशी हा इतिहास जोडलेला आहे. नरनाळा, नगरधन (नंदीवर्धन), पवनी, आदम आणि चंद्रपूरचे किल्ले हे या प्रदेशातील ऐतिहासिक वारशाचे प्रमुख साक्षीदार आहेत, जे भौगोलिकदृष्ट्या सातपुडा आणि सपाट प्रदेशात वसलेले आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील वनदुर्ग म्हणजे पर्यटक आणि विशेषत: ट्रेकर्ससाठी आव्हान आहेत. तुम्हाला यापैकी किती किल्ले माहिती आहेत? कोणत्या किल्ल्यांना तुम्ही भेटी दिल्या आहेत? हे किल्ले बघितले नसतील तर नक्की बघा! या किल्ल्यांच्या रुपात पर्यटनाची एक मोठी संधी उपलब्ध आहे. तिचा लाभ घ्या. मध्ययुगीन व उत्तर मध्ययुगीन काळात विदर्भावर वेगवेगळ्या राजवंशांनी आपल्या सत्ता स्थापन केल्या व किल्ले बांधले. जवळपास २६ किल्ले आहेत. यापैकी ९ किल्ले एकट्या नागपूर जिल्ह्यात आहेत. Pauni Fort near Nagpur Forts near Nagpur अंदाजे १२-१३ व्या शतकात पूर्व विदर्भावर माना जातीच्या नागवंश...
Home Community
Font
🚗
आवडलं का हे ठिकाण?
यात्रा नियोजनासाठी संपर्क करा
🚗

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp community वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Join करा
आजचा मराठी शब्द by What's Up Marathi
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
स्नेह|आपुलकी|संस्कृत (मूलशब्द: स्निह)|प्रेम|Eg. त्यात स्नेह आहे.
उपमा|तुलना|संस्कृत (मूलशब्द: उपम्)|साम्य|Eg. ही सुंदर उपमा आहे.
अर्थवाही|अर्थपूर्ण|संस्कृत (मूलशब्द: अर्थ)|गर्भित|Eg. हे वाक्य अर्थवाही आहे.
लवचिक|वाकता येणारे|देशज (मूलशब्द: लव)|लचकदार|Eg. विचार लवचिक हवेत.
सौंदर्य|सुंदरता|संस्कृत (मूलशब्द: सुंदर)|रम्यता|Eg. निसर्गात सौंदर्य आहे.
मधुर|गोड|संस्कृत (मूलशब्द: मधु)|गोडवा|Eg. स्वर मधुर आहे.
सामर्थ्य|क्षमता|संस्कृत (मूलशब्द: समर्थ)|शक्ती|Eg. त्याच्यात सामर्थ्य आहे.
आल्हाददायक|आनंददायी|संस्कृत (मूलशब्द: आल्हाद)|आनंदकारक|Eg. हवामान आल्हाददायक आहे.
उज्ज्वल|प्रकाशमान|संस्कृत (मूलशब्द: ज्वल)|तेजस्वी|Eg. भविष्य उज्ज्वल आहे.
निखळ|शुद्ध|देशज (मूलशब्द: निख)|निर्मळ|Eg. निखळ आनंद मिळाला.
सुहास्य|हसतमुख|संस्कृत (मूलशब्द: हास)|हसरा|Eg. चेहरा सुहास्य आहे.
कुतूहल|जिज्ञासा|संस्कृत (मूलशब्द: कुतूहल)|उत्सुकता|Eg. मुलांमध्ये कुतूहल आहे.
संयम|धीर|संस्कृत (मूलशब्द: यम)|नियंत्रण|Eg. संयम ठेवणे गरजेचे.
निराळा|वेगळा|देशज (मूलशब्द: निर)|भिन्न|Eg. हा अनुभव निराळा आहे.
उत्स्फूर्त|स्वाभाविक|संस्कृत (मूलशब्द: स्फुर)|नैसर्गिक|Eg. प्रतिक्रिया उत्स्फूर्त होती.
संतुलन|तोल|संस्कृत (मूलशब्द: तुल)|समतोल|Eg. जीवनात संतुलन हवे.
निखार|तेज|देशज (मूलशब्द: निख)|चमक|Eg. शब्दांत निखार आहे.
शब्दबद्ध|शब्दांत मांडलेले|संस्कृत (मूलशब्द: बंध)|मांडलेले|Eg. विचार शब्दबद्ध केले.
आश्रय|सहारा|संस्कृत (मूलशब्द: श्रि)|आधार|Eg. झाडांचा आश्रय घेतला.
साक्षात्कार|गंभीर जाणीव|संस्कृत (मूलशब्द: अक्ष)|प्रत्यय|Eg. सत्याचा साक्षात्कार झाला.
अनुभूती|भावनिक अनुभव|संस्कृत (मूलशब्द: भू)|जाणीव|Eg. सुंदर अनुभूती मिळाली.
संचित|साठवलेले|संस्कृत (मूलशब्द: चि)|संग्रह|Eg. ज्ञान संचित आहे.
नितळ|स्वच्छ|देशज (मूलशब्द: तळ)|निर्मळ|Eg. पाणी नितळ आहे.
विराम|थांबा|संस्कृत (मूलशब्द: राम)|विश्रांती|Eg. थोडा विराम घ्या.
जाणीव|समज|संस्कृत (मूलशब्द: ज्ञा)|भान|Eg. त्याला जाणीव झाली.
आश्चर्य|चकित करणारी गोष्ट|संस्कृत (मूलशब्द: चर)|विस्मय|Eg. हे आश्चर्यकारक आहे.
शब्दसंपदा|शब्दांचा साठा|संस्कृत (मूलशब्द: पद)|भाषिक संपत्ती|Eg. त्याची शब्दसंपदा मोठी आहे.
विस्तार|पसरणे|संस्कृत (मूलशब्द: स्तृ)|फैलाव|Eg. विचारांचा विस्तार झाला.
शोधन|शोध घेणे|संस्कृत (मूलशब्द: शोध)|संशोधन|Eg. सत्याचे शोधन आवश्यक.
निष्ठा|प्रामाणिकता|संस्कृत (मूलशब्द: स्था)|समर्पण|Eg. कामात निष्ठा आहे.
प्रसन्न|आनंदी|संस्कृत (मूलशब्द: सद)|आनंदी|Eg. तो प्रसन्न दिसतो.
दृष्टीकोन|विचार पद्धत|संस्कृत (मूलशब्द: दृश)|दृष्टिकोन|Eg. दृष्टीकोन बदलला.
आवाहन|साद|संस्कृत (मूलशब्द: वह)|आमंत्रण|Eg. हे आवाहन महत्त्वाचे आहे.
संचार|फिरणे|संस्कृत (मूलशब्द: चर)|प्रवाह|Eg. माहितीचा संचार झाला.
विवेक|समजूतदारपणा|संस्कृत (मूलशब्द: विच)|सूज्ञता|Eg. विवेकाने निर्णय घ्या.
नवलाई|नवीनपणा|देशज (मूलशब्द: नव)|ताजेपणा|Eg. यात नवलाई आहे.
प्रकाशमान|उजळलेले|संस्कृत (मूलशब्द: काश)|तेजस्वी|Eg. घर प्रकाशमान आहे.
संवाद|बोलणे|संस्कृत (मूलशब्द: वद)|चर्चा|Eg. संवाद आवश्यक आहे.
स्मरण|आठवण|संस्कृत (मूलशब्द: स्मृ)|आठवण|Eg. ती स्मरणात आहे.
उमेद|उत्साह|फारसी (मूलशब्द: उमेद)|जोश|Eg. नवीन उमेद आहे.

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा