जपानी कुटुंबासह ‘तानाबाना’ उत्सवाचा आनंद 🌸 | Travel Experience in Japan in Marathi Part 5

आठवणीतील जपान भाग पाच | Travel Experience in Japan in Marathi Part 5


जपानमधील आमच्या एका महिन्याच्या वास्तव्यात जपानी कुटुंबासोबत घालवलेले ते दोन दिवस म्हणजे एक आगळावेगळा आणि सुखद अनुभव होता. या दोन दिवसात जपानमधील कुटुंब पद्धती आणि कौटुंबिक जीवन अगदी जवळून अनुभवायला मिळालं. मैत्री कार्यक्रमाअंतर्गत या देशातील कौटुंबिक जीवनाचा अभ्यास व्हावा या उद्देशानं हा ‘होम स्टे’ ठेवण्यात आला होता. टोकियोला पोहोचल्यानंतरच आम्हाला याबाबत कल्पना देण्यात आली होती. तब्बल दोन दिवस जपानी कुटुंबासोबत त्यांच्या घरी रहायला मिळणार हे ऐकल्यानंतर आम्ही सर्वच जाम खूष होतो. हे लोक घरात कसे वागत असतील, आपल्या येथे होतात तशीच या कुटुंबातही नवराबायकोची भांडणं होत असतील काय? स्वयंपाकघरात नवरा बायकोला मदत करत असेल काय? हे सगळं जाणून घेण्याची उत्सुकता होतीच आणि प्रत्यक्ष कुटुंबात राहिल्याशिवाय हे सगळं माहिती होणं शक्यही नव्हतं. त्यामुळं ‘होम स्टे’ चे दोन दिवस केव्हा येणार याची मी आतुरतेनं प्रतीक्षा करीत होते.

                                  

आपल्या आणि जपानी लोकांच्या जीवनमानात जमीनअस्मानचा फरक आहे. त्यांची जीवन पद्धती संपूर्णत: भिन्न आहे. सर्व काही नियमानुसार चालतं. त्यामुळं जपानी कुटुंबात रहायला गेल्यानंतर त्यांच्या पद्धतीनं राहाता यावं असा आयोजकांचा मानस होता. या कुटुंबाला आमच्यामुळं त्रास होऊ नये अथवा आम्हाला घरातील छोट्या छोट्या गोष्टी कळाव्यात म्हणूनही असेल कदाचित पण होम स्टेच्या पूर्वतयारीसाठी आमचे दोन खास वर्ग घेण्यात आले. हे वर्गच एवढे कठीण वाटले की प्रत्यक्षात राहायला गेल्यानंतर काय होणार याची चिंताच वाटायला लागली होती. या कुटुंबाकडून कोणतीही तक्रार आली तर तुम्हाला तडक परत बोलावले जाईल अशी धमकीही मिळाली होती. घरात शिरण्यापूर्वी चपला कशा काढायच्या कशा ठेवायच्या इथपासून तर अगदी आंघोळ कशी करायची या बाबतही सूचना मिळाल्या होत्या. एवढा शिस्तशीरपणा ! उभ्या आयुष्यात कधी पाळला नव्हता. चप्पल ठेवायचीही दिशा असते, बापरे! प्रचंड दडपण आलं होतं. घरात वडील असले तर त्यांच्या धास्तीने चप्पल दारात इतर चप्पलांच्या रांगेत ठेवायची नाहीतर मग जशी निघेल तशीच ठेवयाची आम्हाला सवय. आपल्या घरांमध्ये सहसा चप्पलांची रॅक नेहमी रिकामीच असते. जपानी वक्तशीरपणाचा अनुभव आम्ही दररोज घेतच होतो. सकाळी ९ वाजता बस निघणार म्हणजे निघणारच. एकएका सेकंदाचा हिशेब असायचा. मला आठवतं आमच्या गटातील एकदोन जणांना एकदा उशीर झाला होता. त्यांच्यासाठी बस थांबली नाही. त्यांना दिवसभर हॉटेलमध्येच थांबावं लागलं. याबाबतीत मात्र जपानी लोक भारतीयांच्या अगदी विरुद्ध आहेत. आपण फक्त लग्नाची वेळ तेवढी पाळण्याचा प्रयत्न करतो. अन्यथा वेळेचं भान आपल्याला कधीच नसतं. एखादा कार्यक्रम सांगितल्या वेळी सुरु झाला तर ‘अरे, आश्चर्य आहे, कार्यक्रम अगदी वेळेवर सुरु झाला’अशी प्रतिक्रिया सहज उमटते. जपान एवढा प्रगती करु शकला यामागे हे सुद्धा एक महत्वाचे कारण आहे. वेळेचा सदुपयोग कसा करुन घ्यायचा हे याच लोकांकडून शिकायला हवं. जपानी लोक पाणी पितात की नाही याचीच मला शंका यायची. कारण बसमध्ये २५ लोकांसाठी फक्त एक मोठी वॉटरबॅग पाणी असायचे. आम्ही भारतीय तर सदैव पाण्यासाठी व्याकुळ असायचो. पाण्याचा एक थेंब जरी जीभेवर ठेवला तर तहान भागते या शास्त्रीय नियमाचं पालन बहुदा येथे होत असावं. त्यामुळं प्रवासात पाण्यासाठी सतत मारामार व्हायची. शेवटी पाण्याची तहान कोकवर भागविण्याची सवय मी करुन घेतली होती. कारण मार्गात ठिकठिकाणी कोक अगदी सहज उपलब्ध होते. मशीन्स लागल्या होत्या. ९० की १०० येनमध्ये कोकचा एक छोटा कॅन मिळायचा.

वर्गामध्ये आम्हाला या सर्व सूचनांव्यतिरिक्त कामापुरती जपानी भाषाही शिकविण्यात आली होती. कारण जपानमध्ये जास्त जपानी भाषाच चालते. टोकियोत अगदी बोटावर मोजण्याइतके लोक तुटकफुटक इंग्रजी बोलताना आढळले. अशा इंग्रजीला येथे ‘जॅपलिश’ म्हणतात. त्यामुळं या लोकांसोबत संवाद साधण्याकरिता थोडंबहुत जपानी येणं आवश्यक होते. आम्हाला जपानीमधील संवादाचे एक पुस्तकही देण्यात आले होते. त्यात दैनंदिन संवादाचं इंग्रजी आणि जपानीत भाषांतर होतं. या देशातील वास्तव्यात हे पुस्तक म्हणजे चांगला मित्र झाले होते. संवाद साधण्यास त्याची खूप जास्त मदत झाली.


Japanese Language in Marathi

ओहायू गोझाईमासू म्हणजे शुभप्रभात, कॉन निचिवा(गुड आफ्टरनून),कॉन बानवा (गुड इव्हिनिंग), ओयासुमी नसाय (शुभरात्री), सायोनारा (गुडबाय), सुमिमसेन(एक्सक्युज मी), गॉमेन नसाय (मला माफ करा), वकारीमसेन (मला समजले नाही), आरिगातु (धन्यवाद) हे काही शिष्टाचाराचे शब्द मी पाठच करुन घेतले होते. जपानी भाषेत ‘हाय’ म्हणजे ‘हो’ आणि ‘लाय’ म्हणजे ‘नाही’ असा अर्थ होतो.

टोकियोत दुसऱ्या दिवशी सायंकाळी आम्ही काही जण फिरायला निघालो. काही अंतरावर गेल्यानंतर एक पंधरावीस मजली डिपार्टमेंटल स्टोर लागलं. एवढे मोठे डिपार्टमेंटल स्टोअर बघूनच मला धडकी भरली होती. बापरे! बाप! पावलं आपसुकच या डिपार्टमेंटल स्टोअरच्या दिशेने वळली. फक्त लहान मुलांच्या खेळण्यासाठीच एक मजला होता. वाट्टेल तेवढी आणि हवी तशी खेळणी तेथं होती. स्त्रियांची सौंदर्य प्रसाधने,दागदागिने यांच्यासाठी एक स्वतंत्र माळा. कपबशाच कपबशा किती प्रकारच्या. एकाहून एक सुंदर नक्षीदार कपबशा. त्यात चहा पिण्यापेक्षा नुसत्या शोकेसमध्ये ठेवण्याची इच्छा व्हावी अशा कपबशा. हे डिपार्टमेंटल स्टोअर म्हणजे भुलभुलैय्या होते. या सर्व वस्तू बघता बघता सोबतचे लोक केव्हा वेगळे झाले कळलेच नाही. कोणी नजरेस पडते काय म्हणून खूप शोधण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ. रात्रीचे आठ वाजले होते. अनोळखी देश. मनात भीती घर करु लागली होती. दुकानाबाहेर कोणी थांबलं असेल या आशेनं मी या स्टोअरमधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्यास सुरुवात केली. जिन्यांवरुन खाली येतयेत आता आपण मुख्य रस्त्यावर येणार असं वाटलं असतानाच अचानक लोकांची खूप गर्दी दिसली. प्रत्येक जण धावत होता. तो स्टोअरचा भाग नक्कीच नव्हता. आपण कुठेतरी भलत्याच ठिकाणी पोहोचलो याची जाणीव होताच मनात धडकी भरली. एवढ्या गर्दीतही मी काही लोकांना स्टोअरच्या बाहेर निघण्याचा मार्ग विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु माझं बोलणं कोणालाच कळत नव्हतं. कदाचित हॉटेलचं नाव घेतल्यानंतर कोणी काही सांगेल असं वाटलं. पण नाही, काहीच प्रतिसाद नाही. मी अक्षरश: रडकुंडीला आले होते. डोळे भरुन आले होते. तेवढ्याच मला त्या पुस्तकाची आठवण झाली. सुदैवाने ते माझ्या पर्समध्येच होतं. मी ते पुस्तक बाहेर काढलं. आपण हरवलो आहे हे जपानी भाषेत कसं सांगायचं हे त्यात होते. तेवढ्यात मला एक गार्डच्या पोषाखातील इसम दिसला. त्याला थांबवून मी पुस्तकातील जपानी भाषेतील वाक्य म्हटलं. हॉटेलचं नाव सांगून मुख्य रस्त्यापर्यत सोडून देण्याची विनंती केली. त्याच्या मागेमागे जात पाचसहा पायऱ्या वर चढताच मुख्य रस्ता लागला. हॉटेल मेट्रोपॉलिटन याच रस्त्यावर आहे एवढे मला माहिती होते. हॉटेलमध्ये पोहोचेपर्यत रात्रीचे नऊ वाजले होते. आपल्या खोलीत पोहोचल्यानंतर मला हायसं वाटलं. जपानमधील भूयारी रेल्वेमार्गाचं ते माझं पहिलं दर्शन होतं. पुढे अनेकदा मुख्य रस्त्यांवर भुयारांमधून असे लोकांचे लोंढेच्या लोंढे बाहेर पडताना मी बघितले. असो.
Having Japanese Food in a restaurant

‘होम स्टे’ची जय्यत तयारी झाली होती. आणि ही तयारी बघून होम स्टेसाठी उड्या मारणाऱ्या आम्हा सर्वांचेच धाबे दणाणले होते. ७ जुलैला तर एकूणच चित्र बघण्यासारखं होतं. सायंकाळी ५ वाजता आमचं जपानी कुटुंब आम्हाला घ्यायला येणार होतं. ओकाझाकी ग्रॅण्ड हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील ‘हिरयुनोमा’ हॉलमध्ये परस्पर परिचयाचा कार्यक्रम झाला. माझ्या वाट्याला आलेल्या कुटुंबाचं आडनाव कवाई होतं. कवाईंनी त्यांची कार आणली होती. या कुटुंबासोबत जाताना उत्सुकताही होती आणि भीतीही. आमच्या हॉटेलपासून कवाईंचं घर बरंच लांब होतं. कारमध्ये बसल्यानंतरही माझ्या मनावर एकप्रकारचं दडपण होतंच. युकोसाननं कदाचित ते जाणलं असावं. तिनंच माझ्यासोबत बोलायला सुरुवात केली. स्वत:च्या कुटुंबाबद्दल माहिती दिली. तीचं इंग्रजी समजायला थोडं सोपं होतं. नवरा बायको आणि दोन लहान मुली असं हे छोेटेसं कुटुंब होतं. मोतोहिरो कवाई हे एका प्राथमिक शाळेत शिक्षक तर युकोसान गृहिणी. तरुण जोडपे होते. रिसा आणि युको या त्यांच्या दोन मुली. युकोसानच्या प्रेमळ बोलण्यानं माझ्या मनावरील दडपण हळुहळु कमी झालं. घरी पोहोचेपर्यत आम्हा दोघींची चांगलीच गट्टी जमली होती. अर्ध्या तासात आम्ही घरी पोहोचलो.

कवाईंचं घर टुमदार होतं. संपूर्ण लाकडाचा वापर करुन बनविण्यात आलेल्या या घरासमोर मोठ्ठं आंगण होतं. आम्ही दोघी घरी पोहोचलो तेव्हा मुली आणि त्यांचे वडील शाळेतून यायचे होते. दहा पंधरा मिनिटांनीच हे तिघे आले. मुलींना आपल्या घरी कोणीतरी विदेशी पाहुणी येणार याची बहुदा पूर्वकल्पना होतीच. मला बघताच खास जपानी पद्धतीनं गोड हास्य करुन मुलींनी माझे स्वागत केले. जपानी लोकांचा रंग पिंगट असावा असं मला वाटले होते. परंतु असं काही नाही. विशेषत: येथील लहान मुलांचे चहरे तर अगदी सफरचंदासारखे वाटतात. गोंडस,गोबरेगोबरे आणि टवटवीत. रिसा आणि युको सुद्धा अशाच खूप गोड होत्या. प्राथमिक शाळेतील शिक्षकाचं हे टापटीप घर बघून मला आपसुकच आपल्या प्राथमिक शिक्षकांची आठवण झाली. घरात कारपासून सगळं होतं.

येथं कचारा वेचायला येणारी बाई सुद्धा तुम्हाला स्वच्छ टापटीप दिसेल. तिला बघितल्यानंतर टोपलीत कचारा टाकायला ही आपण कचरतो. युकोसान मला माझ्या खोलीत घेऊन गेली. खोलीत शिरण्यापूर्वी स्लिपर बाहेर काढून ठेवायच्या असा नियम आहे. आम्हाला हे सगळं शिकवलं होतं. परंतु मी विसरलेच. मी स्लिपरसह खोलीत पाय ठेवताच युकोनं मला लगेच आठवण करुन दिली. स्लिपर व्यवस्थित पाहिजे त्या दिशेनं ठेवून मी खोलीत प्रवेश केला. संपूर्ण खोली जपानी पद्धतीनं सजविलेली होती. बैठा पसरट टेबल, एका कोपèयात गादी आणि टेबलपंखा. फुलदाणी. पहिल्या नजरेतच मला ती खोली खूप आवडली. प्रसन्न वाटत होतं. युकोनं मला तिचं संपूर्ण घर दाखवलं. घर अपेक्षेप्रमाणं अगदी चकाचक होतं. धुळीचा एक कण नव्हता. जपानमध्ये आल्यापासूनच आम्हाला कुठे कचारा आणि धुळ बघायला मिळाली नव्हती.किंवा थुंकलेले नव्हते , त्यामुळं चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं. घरातील दोन खोल्या जपानी पद्धतीनं सजविलेल्या होत्या. जेवण डायनिंग टेबलवरच होतं.

सायंकाळचे सात वाजून गेले होते. युकोनं स्वयंपाकाला सुरुवात केली. मी ही तिची परवानगी घेऊन स्वयंपाक खोलीत तिच्या बाजूला जाऊन उभे राहिले. हे कुटुंब मांसाहारी होतं. परंतु मी मांसाहारी नसल्यानं माझ्यासाठी जेवण काय बनवावं याचा तिला प्रश्न पडला होता. जपानमध्ये आल्यापासून जेवणाचे तसे बघता हालच सुरु होते. हॉटेल मेट्रोपॉलिटन सप्ततारांकित असल्यानं तेथे एखादा वेळेला भारतीय पदार्थ मिळतील असं वाटले होतं. परंतु घोर निराशा झाली होती. सर्वकाही उकडीव. तेलाचा कुठे थांगपत्ता नव्हता. सुरुवातीचे दोनतीन दिवस घरुन नेलेल्या चिवडा चकल्या आणि लोणच्यावर भागवले. पण पुढे काय? मांसाहारींचे थोडे तरी बरे होते. परंतु शाकाहारींनी काय जेवायचे हा प्रश्न होता. कोरडा भात नुसता खाणंही जमत नव्हतं. आमच्या गटात माझ्यासोबत आणखी एकदोन जण शाकाहारी होते.

आमची परिस्थिती सारखीच होती. त्यामुळं मेट्रोपॉलिटनजवळ एखादं भारतीय हॉटेल आहे काय याचा शोध घेणं सुरु केलं. टोकियोत सात दिवस उकडीव खाणं शक्य नव्हतं. शोधाशोधीनंतर आम्हाला भारतीय नाही पण पाकिस्तानी हॉटल सापडलं. एका गल्लीत अगदी लहानसं हॉटेल होते. परंतु जपानमध्ये त्यावेळी ते पाकिस्तानी हॉटेल आपलंसं वाटलं. या हॉटेलटमधील सर्व जण हिंदी चांगलं बोलत होते. टोकियोतील वास्तव्यात आम्ही दोनतीन दिवस या पाकिस्तानी हॉटेलमध्ये जेवण घेतलं. प्रचंड महाग. एक प्लेट समोश्यासाठी ८०० रुपये मोजावे लागले(अर्थात येनच्या स्वरुपात). भेंडी आणि आलुमटरीच भाजी ७०० रुपये! पण आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. संपूर्ण महिना काढायचा होता आणि पुढं आणखी काय खावं लागणार याची कल्पना नव्हती. परंतु नंतरच्या प्रवासात एकदोन शहरांमध्ये आम्हाला भारतीय हॉटेल्समध्येही मेजवानी मिळाली. त्या हॉटेलमधील दालफ्राय खाल्ल्यानंतर किती हायसं वाटलं होतं. काहीही असो,पण जपानमधील वास्तव्यात खूप वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळाला हे ही तेवढंच खरं! जपानी आणि चीनी खानावळीतही जाऊन आलो. बसक्या राऊंड टेबलभोवती जमिनीवर बसून चीनी शेवया (नूडल्स) खाल्ल्या. तर पारंपारिक जपानी खानावळीत अगदी पंगतीत बसून चॉपस्टीकने वाटीत भात आणि इतर अनेक पदार्थांची चव घेतली. समुद्र किनाèयावर ‘सी फूड’खाल्लं. ते पाण्यात वाढणारं वेगवेगळ्या प्रकारचं शेवाळ असावं असं मला वाटलं होतं.

घरी कधीची ब्रेडबटर न खाणारी मी जपानमध्ये मात्र याची सवय करुन घेतली होती. बरेचदा मी ब्रेड बटरवरच आपली भूक भागवली. हॉटेलमध्ये बटर आणि हनीच्या लहानलहान पाकिटं असायची. ब्रेड विकत आणावी लागायची. त्यामुळं युकोलाही माझ्या जेवणाचा उगाच त्रास होऊ नये म्हणून मला ब्रेड बटर खूप आवडतं असे मी तिला सांगून टाकलं. हे एकून तिलाही खूप हायसं वाटलं. जपानी लोक बोलायला अतिशय नम्र आहेत. कोणाशीही अदबीने बोलतात. आदरतिथ्याच्या बाबतीत तर विचारायलाच नको. अगदी तुमच्या पायातील चप्पल काढून ठेवण्यातही त्यांना कमीपणा वाटत नाही. ‘अतिथी देवो भव’ याचा अनुभव येथं पदोपदी येतो.
आपल्या भज्यांसारखा एक पदार्थ युकोसाननं खास माझ्यासाठी म्हणून केला होता. फक्त बेसनाऐवजी मैदा वापरला होता. नंतर कळलं याला ‘टेपरा’ म्हणतात. हे टेपरा वांग्याचे होते. व्हेजिटेबल करी, भात आणि टेपरा असा रात्रीचा बेत होता. कवाईंकडं प्रथमच मी तेलाचा पदार्थ खाल्ला होता. ९ वाजता युकोचे पती घरी आले. युकोनं त्यांच्याशी माझा परिचय करुन दिला. मोतोहिरो खूपच मनमिळावू आणि हसतमुख होते. युकोनं मला त्यांना हिरो म्हणण्याची परवानगी दिली होती. त्या रात्री या जपानी कुटुंबात आम्ही सर्व एकत्र जेवलो. मला चॉपस्टीकनं भात खाताना बघून चौघांनाही खूप आनंद झाला होता. मेट्रोपॉलिटनमध्ये मी चॉपस्टिकनं खाण्याचा थोडा सराव केला होता. हे लोक मोठ्या बाऊलमधील तो कोरडा भात चॉपस्टिकनं एवढ्या लवकर कसा संपवतात,हे एक कोडच आहे. मला एवढा सराव करुनही एकएक दाणाच खाता आला. दोन बोटांमध्ये चॉपस्टिक पकडण्याची एक वेगळीच पद्धत आहे. त्या पकडणच खूप अवघड जाते.

डायनिंग टेबलवर आमच्या गप्पा रंगल्या होत्या. कुठं अडले की पुस्तक बघायचं आणि बोलायचं असं सुरु होतं. युको खरच खूप प्रेमळ होती. तिच्यासोबत मोठ्या बहिणीचं नातं केव्हा जुळलं कळलच नाही. मला जपानी संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची इच्छा होती. तशीच त्यांना पण भारताबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती.

जपानमध्येही पुरुषप्रधान संस्कृती आहे. येथं एकत्रित कुटुंब फार कमी बघायला मिळतात. आम्हा दोघींनाही बोलायला खूप विषय होते. लग्नं, नवरा,मुलं, शिक्षण. कवाई दाम्पत्याचं लग्न ठरवूनच झालं होतं. परंतु युकोनं सांगितलं की आजकाल जपानमध्ये ७० ते ८८० टक्के प्रेमविवाह होतात. मी युकोला सहज विचारले,‘तुमची नवराबायकोची भांडणं होतात?’ यावर प्रथम तिनेच मला उलट प्रश्न केला.‘तुमची होतात?’ मी म्हटलं,‘होय तर खूप होतात.’ तेव्हा तिलाही बरं वाटलं. ती लगेच उत्तरली, आमची पण खूप होतात. बरेचदा त्याला काही कारणही लागत नाही. नंतर लगेच थोडी गंभीर होत ती म्हणाली, आमच्या येथे दिवसेंदिवस घटस्फोटाचं प्रमाण बरंच वाढलं आहे. यामागं विविध कारणं आहेत. प्रौढ कुमारिकांचाही प्रश्न आहे. असे अनेक विषय गप्पांमधून पुढे आहे.
रात्रं बरीच झाली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फिरायला जायचं होतं. योकोसाननं मला माझ्या खोलीपर्यत पोहोचवून दिलं. पलंग नव्हताच. जमिनीवरच गादी घातलेली होती. दिवसभराच्या धावपळीमुळे प्रचंड थकवा आला होता. मी गादीवर पाठ टेकली. पण झोप येत नव्हती.विचार सुरु होते. केव्हातरी डोळा लागला.

दुसऱ्या दिवशी कवाई कुटुंब आणि मी आम्ही दिवसभर ओकाझाकी शहरात फिरलो. बौद्ध मंदिरं आणि शिंटोंचे श्राईन बघितले. सुपर मार्केटला गेलो. त्या दिवशी दुपारचं जेवण आम्ही बाहेरच घेतलं. युकोकडे मैदा आणि तेल होतंच. मी थोडे बटाटे घेतले. बेसन मला कुठं दिसलं नाही. रात्री बटाटेवडे केले. चौघांनीही खूप आवडीनं खाल्ले. आम्ही दोघींनी मिळून भांडी घासली. भांडी धुताधुताच उद्या तुझी कुठे जायची इच्छा आहे? बाजारात जायचं काय? असं युकोनं विचारलं. परंतु बाजारात जाण्यापेक्षा घरीच गप्पा मारात बसण्याची माझी इच्छा मी तिला बोलून दाखविली. या चौघांसोबत जास्तीतजास्त वेळ राहायचं असं मी ठरविलं होतं. शाळेला सुटी असल्यानं मुली आणि हिरोही सोबत असणार होते. पहाटेपासूनच आमचे कार्यक्रम सुरु झाले. दोन दिवसातच आम्ही दोघी खूप जवळ आलो होतो. युकोला भारतीय साडी नेसून बघायची होती. मलाही किमोनोचे आकर्षण होतेच. सांस्कृतिक देवाणघेवाणीचा कार्यक्रम असल्यानं मी साड्या घेतल्या होत्या. त्यातील आवडलेली एक साडी युकोने नेसली. त्या साडीत ती खूप सुंदर दिसत होती. हिरोनं तिचे भरपूर फोटो काढले. रिसा आणि युकोही आपल्या आईकडे मोठ्या कौतुकांने बघत होत्या. त्यांना खूप गंमत वाटत होती. दोघीही गालातल्या गालात हसत होत्या. मी तिला चनियाचोलीही घालून बघण्याचा आग्रह केला. ती लगेच तयार झाली. दुपारी आम्ही दोघी एका पोषाख किरायाने देणाèया दुकानात गेलो. येथं बरेचदा लग्नातही किमोनो किरायानेच आणला जातो. जपानी स्त्रियांचा पारंपारिक वेष किमोनो घालून युकोने माझे फोटो काढले. हा किमोनो यापूर्वी मी फक्त एखाद्या चित्रातच बघितला होता. त्या दिवशी प्रत्यक्ष घालतानाचा अनुभव काही औरच होता. दिवसभर आम्ही अशीच खूप धमाल केली.

सायंकाळी मला माझ्या हॉटेलमध्ये परत जायचं होतं. कवाई दाम्पत्य आणि मुली मला सोडायला हॉटेलमध्ये आल्या होत्या. या दोन दिवसात मी त्यांना मावशी म्हणायला शिकविलं होतं. त्यांच्या तोंडून मावशी शब्द ऐकून मोठी मजा वाटत होती. मावशीला पुन्हा आपल्या घरी घेऊन चल असा हट्ट त्या आपल्या आईकडे करीत होत्या. जपानी कुटुंबात राहायला आणखी दोन दिवस जास्त मिळाले असते तर किती छान झाले असते असे मलाही वाटत होते.आमचे दोघींचेही डोळे डबडबून आले होते. माझ्यासोबत थोडावेळ हॉटेलमध्ये थांबल्यानंतर कवाई कुटुंब घरी जाण्यासाठी निघाले. युकोने तिच्या नेहमीच्याच मंजुळ आवाजात मला ‘सायोनारा’ केला. सायोनारा म्हणजे पुन्हा भेटू. मी पण तिला जड अंतकरणानं सायोनारा म्हटलं. आयुष्यात कधीतरी पुन्हा भेटू या आशेने आम्ही एकमेकींचा निरोप घेतला. कवाई कुटुंब निघून गेल्यानंतर बèयाच वेळापासून थांबलेले अश्रु डोळ्यातून घळघळ वाहू लागले. एका तिऱ्हाईताला,वेगळ्या देशातील व्यक्तीला या कुटुंबानं आपलंसं करुन घेतलं होतं. चौघांनीही दोन दिवसात माझ्यावर खूप प्रेम केलं, माझी खूप काळजी घेतली. मला थोडा खोकला झाला तर युको आणि हिरो दोघंही केवढे अस्वस्थ झाले होते.युकोने तर मोठ्या बहिणीनी माया दिली. या कुटुंबात जाताना मनावर असलेलं दडपण कधी पळालं ते सुद्धा कळलं नव्हतं. एकमेकांबद्दल जिव्हाळा निर्माण झाला होता. परदेशातही मला मायदेशी असल्यासारखं वाटलं होतं.

कवाई कुटुंबात मला मिळालेलं प्रेम आणि आपुलकीनं मन अक्षरश: भारावून गेलं होतं. माझीच नाहीतर आमच्या गटातील प्रत्येकाची अशीच मनस्थिती होती. प्रत्येक जण भारावलेला होता. रात्री कितीतरी वेळ हॉटेलच्या लॉबीमध्ये आम्ही होम स्टेचे आपले अनुभव सांगत बसलो होतो. आपण सुद्धा आपल्या घरी येणाèया पाहुण्याची एवढी खातीरदारी करु शकणार नाही हे सर्वांनीच मान्य केलं. शांत, प्रेमळ आणि नम्र स्वभावाच्या या जपानी माणसाने आम्हा सर्वांनाच आपलसं करुन घेतलं होतं.


सविता ‘देव’ हरकरे
Consulting Editor
WhatsUp मराठी

कंमेंट्स मध्ये तुमचे मत नक्की कळवा !

जपानसाठी ‘टेकऑफ’ आणि ‘ओचा’, ‘कोचा’ | Travel Experience in Japan in Marathi Part 1





Comments

🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
आजचा मराठी शब्दआजचा प्रश्न
या शब्दाचा अर्थ काय आहे?तुम्हाला याचे उत्तर माहीत आहे का?
उत्तरासाठी कार्ड उलटा
अर्थउत्तर
उगमअधिक माहिती
समानार्थीश्रेणी
वाक्यात उपयोग
WhatsUp मराठी पुन्हा उलटा
जानेवारी|फेब्रुवारी|मार्च|एप्रिल|मे|जून|जुलै|ऑगस्ट|सप्टेंबर|ऑक्टोबर|नोव्हेंबर|डिसेंबर
WORD|अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
WORD|लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
WORD|नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|डोंगरातील पाणी नितळ आहे.
WORD|तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
WORD|रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
WORD|ओंजळ|दोन्ही हातांचा केलेला कप्पा|देशज मराठी|हातभर|त्याने ओंजळीत पाणी घेतले.
WORD|हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|हळुवार वारा वाहत होता.
WORD|मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|तिचा आवाज मंजुळ आहे.
WORD|मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|पहिल्या सरीनंतर मृद्गंध दरवळला.
WORD|आभाळमाया|असीम, अपार प्रेम|देशज मराठी|अपार माया|आईची आभाळमाया विसरता येत नाही.
WORD|धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|तो संगीतात धुंद झाला.
WORD|झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|संध्याकाळी थंड झुळूक आली.
WORD|नभ|आकाश|संस्कृत|गगन|पहाटे नभ निरभ्र होते.
WORD|उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|त्याला आनंदाचा उमाळा आला.
WORD|साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|ती साजिरी दिसत होती.
WORD|गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
WORD|कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|फटीतून सूर्याचा कवडसा पडला.
WORD|जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
WORD|लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|गाण्याची लय सुंदर होती.
WORD|कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|फुलदाणीत कोमेजलेली फुले दिसत होती.
WORD|दरवळ|पसरणारा मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|चाफ्याचा दरवळ पसरला.
WORD|सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|सावळ्या ढगांनी आकाश भरले.
WORD|सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|तिचा चेहरा सतेज दिसत होता.
WORD|मधुमालती|सुगंधी फुलांची वेल|संस्कृत|फुलवेल|अंगणात मधुमालती फुलली होती.
WORD|गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
WORD|हुरहूर|मनातील अस्वस्थ ओढ|देशज मराठी|व्याकुळता|जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
WORD|निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
WORD|तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
WORD|मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
WORD|लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|दिव्याची ज्योत लवलवत होती.
WORD|उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|तरुणांमध्ये नवी उमेद आहे.
WORD|गोजिरी|नाजूक व सुंदर|देशज मराठी|साजिरी|गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
WORD|मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|आंब्याला मोहोर आला आहे.
WORD|अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|गावचा चहा अमृततुल्य लागतो.
WORD|झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|मंदिरातील घंटांचा झंकार झाला.
WORD|सहजसुंदर|नैसर्गिकरीत्या सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
WORD|आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|पहाटेचा आसमंत शांत होता.
WORD|सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
WORD|निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|डोंगरातून निर्झर वाहत होता.
WORD|नादमय|संगीताने भरलेला|संस्कृत|सुरेल|सभागृह नादमय झाले.
WORD|मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
WORD|स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|संगीताचे स्पंदन जाणवत होते.
WORD|चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
WORD|मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|मृदुल वाळूवर पावले उमटली.
WORD|अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|ती अलवार हसली.
WORD|स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|पक्षी स्वैर उडत होते.
WORD|सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|फुलांची सुरभि दरवळली.
WORD|दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|तिच्या डोळ्यांत वेगळीच दीप्ती होती.
WORD|प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|अंगणात प्राजक्त फुलला होता.
WORD|निरभ्र|ढगविरहित, पूर्ण स्वच्छ|संस्कृत|स्वच्छ|निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?|रायगड|६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातून वाहणारी सर्वात लांब नदी कोणती?|गोदावरी|त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे उगम पावणारी गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी असून तिला 'दक्षिण गंगा' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली?|१ मे १९६०|संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये अस्तित्वात आली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?|कळसूबाई|अहिल्यानगर जिल्ह्यातील हे शिखर सुमारे १,६४६ मीटर उंच असून ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे.|भूगोल
GK|संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' कोणत्या गावी लिहिली?|नेवासे|अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथे भगवद्गीतेवरील ही मराठी टीका लिहिली गेली.|संस्कृती
GK|लोणार सरोवर कशामुळे तयार झाले?|उल्कापातामुळे|बुलढाणा जिल्ह्यातील हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बेसाल्ट खडकात उल्का आदळून तयार झालेले जगातील दुर्मीळ सरोवर आहे.|भूगोल
GK|तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला?|सिंहगड (कोंढाणा)|१६७० मधील या लढाईत तानाजी धारातीर्थी पडले; 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार प्रसिद्ध आहेत.|इतिहास
GK|अफझलखानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला?|प्रतापगड|१६५९ मध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाजवळ ही ऐतिहासिक भेट व संघर्ष घडला.|इतिहास
GK|मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?|दर्पण|बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये 'दर्पण' सुरू केले; त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक मानले जाते.|संस्कृती
GK|'केसरी' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?|लोकमान्य बाळ गंगाधर टिळक|१८८१ मध्ये मराठीतून 'केसरी' आणि इंग्रजीतून 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू झाली.|इतिहास
GK|'सत्यशोधक समाज' कोणी स्थापन केला?|महात्मा जोतिराव फुले|२४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात स्थापन झालेली ही संस्था सामाजिक समतेसाठी कार्यरत होती.|इतिहास
GK|'श्यामची आई' या पुस्तकाचे लेखक कोण?|साने गुरुजी|पांडुरंग सदाशिव साने यांनी नाशिकच्या कारागृहात हे पुस्तक लिहिले.|साहित्य
GK|'नटसम्राट' या गाजलेल्या नाटकाचे लेखक कोण?|वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)|कुसुमाग्रजांना १९८७ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.|साहित्य
GK|मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा होतो?|२७ फेब्रुवारी|कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.|संस्कृती
GK|वेरूळ येथील कैलास लेणे कोणत्या राजवटीत कोरले गेले?|राष्ट्रकूट|एकाच अखंड खडकात वरून खाली कोरलेले हे मंदिर जगातील स्थापत्यशास्त्रीय आश्चर्य मानले जाते.|इतिहास
GK|अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?|छत्रपती संभाजीनगर|बौद्ध चित्रकला व शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेली ही लेणी युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहेत.|पर्यटन
GK|एलिफंटा लेणी कोणत्या देवतेला समर्पित आहेत?|शिव|मुंबईजवळील घारापुरी बेटावरील त्रिमूर्ती शिल्प जगप्रसिद्ध आहे.|पर्यटन
GK|महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत?|पाच|भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ — बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत.|संस्कृती
GK|अष्टविनायक म्हणजे किती गणपती मंदिरे?|आठ|पुणे, रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विखुरलेली ही आठ स्वयंभू गणपती मंदिरे आहेत.|संस्कृती
GK|कृष्णा नदीचा उगम कोठे होतो?|महाबळेश्वर|सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्या उगम पावतात.|भूगोल
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?|शिवनेरी|पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या या किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी त्यांचा जन्म झाला.|इतिहास
GK|संत तुकाराम महाराजांचे गाव कोणते?|देहू|पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीकाठचे देहू हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.|संस्कृती
GK|संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?|आळंदी|पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली.|संस्कृती
GK|सेवाग्राम आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?|वर्धा|महात्मा गांधींनी १९३६ मध्ये येथे वास्तव्य सुरू केले; हे स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्वाचे केंद्र ठरले.|इतिहास
GK|पवनार आश्रम कोणाशी संबंधित आहे?|आचार्य विनोबा भावे|वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून विनोबांनी भूदान चळवळीचे कार्य केले.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते?|ताडोबा|चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा १९५५ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झाले; पुढे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तयार झाला.|वन्यजीव
GK|'संत्रानगरी' म्हणून कोणते शहर ओळखले जाते?|नागपूर|संत्र्यांच्या व्यापारामुळे मिळालेले हे नाव; नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.|भूगोल
GK|महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणते शहर मानले जाते?|पुणे|शिक्षण, साहित्य, नाट्य आणि संगीत परंपरेमुळे पुण्याला हे स्थान मिळाले आहे.|संस्कृती
GK|रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते?|रायरी|शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केली.|इतिहास
GK|पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?|१७६१|मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यातील या लढाईचा मराठा साम्राज्यावर मोठा परिणाम झाला.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेचे नाव काय?|जिजाबाई|जिजाऊंनी शिवरायांवर स्वराज्याचे संस्कार केले; त्यांना राजमाता म्हणून ओळखले जाते.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळ घोषित झाले?|२००४|व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतील ही वास्तू मुंबईचे प्रतीक मानली जाते.|पर्यटन
GK|गेट वे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे?|मुंबई|१९२४ मध्ये पूर्ण झालेली ही वास्तू अरबी समुद्राच्या काठी उभी आहे.|पर्यटन
GK|'लोकहितवादी' या टोपणनावाने कोण लेखन करत असत?|गोपाळ हरी देशमुख|त्यांच्या 'शतपत्रे' या लेखमालेने एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारणेला दिशा दिली.|साहित्य
GK|मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?|वि. स. खांडेकर|'ययाति' या कादंबरीसाठी १९७४ मध्ये त्यांना हा सन्मान मिळाला.|साहित्य
GK|जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?|गोदावरी|छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या धरणाच्या जलाशयाला 'नाथसागर' म्हणतात.|भूगोल
GK|कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?|सातारा|जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या धरणाच्या जलाशयाला 'शिवसागर' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते?|ताम्हण (जारूळ)|जांभळ्या रंगाची ही फुले पावसाळ्यात सह्याद्रीत मोठ्या प्रमाणात दिसतात.|निसर्ग
GK|महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?|शेकरू|मोठी उडणारी खार असलेला शेकरू भीमाशंकर अभयारण्यात प्रामुख्याने आढळतो.|वन्यजीव
GK|कास पठार कशासाठी प्रसिद्ध आहे?|रानफुलांच्या बहरासाठी|सातारा जिल्ह्यातील हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ पावसाळ्यानंतर फुलांच्या गालिच्यासाठी ओळखले जाते.|पर्यटन
GK|भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी ओळखले जाते?|शेकरू|पुणे जिल्ह्यातील हे अभयारण्य ज्योतिर्लिंगासाठीही प्रसिद्ध आहे.|वन्यजीव

अजून इंटरेस्टिंग...

विदर्भात समुद्र होता तेव्हा...! | Author: Prof Suresh Chopne | Ocean in Vidarbha Maharashtra? | Heritage Tourism | Maharashtra Tourism

श्रीकृष्णाच्या नगरीत... द्वारकाधीशांच्या चरणी, भाग १ | Author: Mrs. Manik Joshi | Dwarkadheesh Temple | Heritage Tourism | Incredible India

महाराष्ट्रातील डार्क स्काय पर्यटन, शहरी गोंगाटापासून दूर, आकाशाच्या कुशीत | Dark Sky Tourism | Astro Tourism | Maharashtra Tourism Policy

भारताचा प्राचीन 'सिल्क रूट’ नाणेघाट | Author: Narendra Chandewar | Silk Route of India, Naneghat | Maharashtra Tourism

चंद्रपूर: निसर्ग, इतिहास, संस्कृती, लोकजीवन आणि वारशाचा समृद्ध पर्यटनपट | Author: Dr. Pallavi Tajne | Chandrapur Culture and Heritage | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

गोठवणाऱ्या थंडीत आयफेल टॉवरचा अद्‌भूत नजारा... पुस्तकांच्या पलीकडे, जगाच्या जवळ | Author: Yash Naseri | Eiffel Tower Paris | International & Global Tourism

भामरागडमध्ये जलक्रांतीतून निर्मित ‘तलावांचे जाळे’ | अनिकेत प्रकाश आमटे | लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte

विदर्भातही येऊन गेले होते गौतम बुद्ध: विदर्भातील बौद्ध सर्किट | Vidarbha Buddhist Circuit Travel Guide

भटाळा गावात आहे ‘भोंडा महादेव’ | Author: Himgauri Deshpande | Bhonda Mahadev Temple Bhatala | Temples of Vidarbha | Temples of Maharashtra