पारंपारिक उद्योगांची जपूण करणारा देश | Travel Experience in Japan in Marathi Part 6

आठवणीतील जपान भाग सहा | Travel Experience in Japan in Marathi Part 6


उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गगनभरारी घेणाऱ्या जपानमध्ये परंपरागत उद्योगांचीही अत्यंत काळजीपूर्वक जपणूक करण्यात आली आहे. जुनीच काय पण नवीन पिढी सुद्धा अतिशय आवडीनं या उद्योगात रुची घेत असल्याचं दिसून आलं. विशेषत: येथील कागदावरील कलाकृती आणि शिल्पकाम बघितल्यानंतर मनापासून दाद द्यावीशी वाटली. दगडांसाठी प्रसिद्ध असलेलं ओकाझाकी शहर आणि दगडी कलाकृती यांचं नातं ५०० वर्षे जुनं आहे. येथील राजवाडे बघताना राजेमहाराजांच्या सुरस कथाही ऐकायला मिळाल्या.

त्सुगुयोशी सैगो हा ओकाझाकीचा राजा असतानाच्या काळात ग्रॅनाईड दगडाचा उपयोग करुन येथे अनेक घरे व राजवाडे बांधण्यात आले. यानंतर योशोमासा तानाका यानं १५९० नंतर इझुमी किंवा कावाचे येथून विविध प्रकारचे दगडं आणून शहराला वेगळं स्वरुप दिलं. बहुदा त्या काळापासूनच ओकाझाकी हे दगडांचं शहर म्हणून ओळखलं जाऊ लागलं असावं. येथील दगडांची उच्च गुणवंता आणि कारागिरांचं अप्रतिम हस्तकौशल्य साèया जगात प्रसिद्ध आहे. एवढा पांढरा आणि चकचकीत दगड; विशेषत: ग्रॅनाईडची विविध आकारातील रुपे मी पहिल्यांदाच बघत होते. एरवी एखाद्या मठ्ठ व्यक्तीला ‘काय दगड आहे हा’ किंवा ‘दगडासारखा काय वागतोस’ असं म्हणण्याची आपली परंपरा. परंतु हे दगड तर लक्षवेधक आणि बोलायला लावणारे होते. बोलके होते. जपानमधील लोकांप्रमाणंच येथील दगडांचंही आकर्षण वाटायला लागलं. दगडांना आकार देणारं हे शहर दगडांच्या उत्पादनातील अव्वल क्रमांकाचं शहर मानलं जातं. येथील दगडांपासून तयार करण्यात आलेले दागिने आणि शोभिवंत वस्तू बघतात डोळे फाटतात की काय असे वाटायला लागलं होतं.

Okazaki Stone Art
Okazaki Stone Art

शांतप्रिय जपानी लोकांना बॉम्ब फोडणं आवडत नसलं तरी फटाके फोडण्यात ते पटाईत आहेत. विविध उत्सवांमध्ये आपल्या येथे जशी आतिशबाजी करण्याची पद्धत आहे तशीच जपानमध्येही फार पूर्वीपासून आहे. त्यामुळं येथे फटाक्याचा उद्योग अतिशय महत्वाचा समजला जातो. एक वेगळे स्थान या उद्योगाला प्राप्त आहे. जपानचा दुसरा शोगून हितेदाता तोकुगावा यानं बारुदकामाला मनोरंजनाचं साधन म्हणून स्थान दिल्यानंतर कार्यक्रमात आतिशबाजी प्रसिद्ध होऊ लागली. उत्सवात किंवा गर्भश्रीमंतांच्या खासगी कार्यक्रमांमध्ये बारुदकामाचं प्रदर्शन केलं जाई. देशात मिकावा येथील बारुदकाम प्रसिद्ध आहे. या शहरातील कामगार जीव ओतून ‘शो’ च्या बारुदचा भरणा करतात. मात्र त्यांच्या या उद्योगाविषयी अत्यंत गोपनीयता बाळगली जाते. येथे फिरत असताना,सर्वकाही बघत असताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे जपानी लोक स्वत:च्या अप्रतिम कौशल्याचं रहस्य सहसा सांगत नाहीत. परंतु येथील दोन शाळांमध्ये बारुदकाम शिकविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Okazaki Castle, Japan
Okazaki Castle, Japan

Okazaki Castle, Japan today

आमचा हा दौरा म्हणजे सांस्कृतिक देवाणघेवाणीचा कार्यक्रम असल्यानं एरवी केवळ पर्यटक म्हणून गेल्यानंतर बघायला मिळाल्या नसत्या अशा अनेक गोष्टी बघता आल्या. एवढेच नाही तर काही कापड आणि कागदी कला,कॅलिग्राफी हे सगळे प्रत्यक्ष करायला मिळाले. हा अनुभवच खूप वेगळा होता. जपानमध्ये एका रुमालावर केलेलं पेंटिग मी आजही जपून ठेवलं आहे. अशीच निशीजीन ब्रोकेड ही कला परंपरागत जपानी कापड उद्योगाचं प्रतिनिधीत्व करते. प्राचीन काळात क्योयेचा पश्चिम भाग असलेला निशीजीन जिल्हा हे या कलेचं उगमस्थान असल्यानं त्याचं नाव या जिल्ह्यावरुनच पडलं, असं समजलं. निशीजीन ब्रोकडचा इतिहास ८ व्या शतकापासून प्रारंभ होतो. मात्र या कलेला खरी लोकप्रियता १६ व्या शतकापासून मिळायला लागली. आणि १७ व्या शतकात केवळ व्यापाऱ्यांमध्येच नव्हे तर अतिसामान्य जनतेच्या मनातही या अप्रतिम कलाकौशल्यानं स्थान मिळविलं. जपानी विणकरांची स्थिती आपल्या येथील विणकरांसारखी दयनीय नाही. उलट त्यांना समाजात फार सन्मानाचं स्थान आहे. निशीजीन ब्रोकेड कलेचा वापर करुन निर्मित कपडे म्हणजे तर विणकरांच्या कलाकौशल्याचा एक अप्रतिम नमुनाच आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रोद्योगाच्या स्पर्धेतही जपानी विणकरांनी आपलं एक आगळंवेगळं स्थान टिकवून ठेवलं आहे. औद्योगिक भरभराटीच्या सर्वोच्च शिखरावर असलेल्या जपाननं या कलेला आता यशस्वी तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरणाच्या नव्या आयामात बसविलं आहे. निशीजीन जिल्ह्यात आजच्या घटकेला विणकरांची अशी 3 हजार दुकाने आहेत. १९ व्या शतकापासून येथील विणकर लिऑन आणि फ्रांसमध्येही आपल्या कलेच्या प्रसारासाठी जाऊ लागले आहेत. शासनातर्फे त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिलं जातं. खरं तर आपल्या येथील विणकरही काही कमी नाहीत. त्यांच्याकडेही कलात्मक दृष्टी आहे. परंतु आधुनिकीकरणाच्या हवेत आम्हाला त्यांच्या कलेचा विसर पडला. बातम्यांच्या निमित्तानं नागपुरातील विणकरांच्या वस्त्यांमध्ये मी बरेचदा जाऊन आले आहे. घराघरात हातमाग दिसत होते. बऱ्याच ठिकाणी कामही होत होतं. आता तर या वस्त्यांमध्ये शोधून हातमाग सापडत नाही.

Japanese Calligraphy
Japanese Calligraphy

कपड्याला रंग देण्याच्या प्रक्रियेला जपानमध्ये युझेन म्हणतात. युझेन प्रिंटिंग हा क्योटो शहरातील पारंपारिक उद्योगांपैकीच एक आहे. सिल्कच्या कपड्यांना वा धाग्यांना रंगविण्याचा व्यवसाय येथे ८ व्या शतकाच्या अखेरीस अथवा ९ व्या शतकाच्या प्रारंभापासून सुरु झाला,असे इतिहास सांगतो. आजही या उद्योगाने स्वत:ची अत्यंत उच्च गुणवत्ता आणि कारागिरांच्या मेहनतीने जगात वरचे स्थान मिळविले आहे. क्योटो हे मुळात गुणवंत शहरच आहे. युझेन कलेचा खरा विकास तसा १७ व्या शतकापासून सुरु झाला. जपानच्या चाकोरीबद्ध रंगकाम तंत्रज्ञानाच्या इतिहासाला वेगळं वळण देणाèया युझेनचा शोध मिआझाकी युझनसाई यानं लावल्याचं समजतं. एम्ब्रॉयडरी करुन वा कपड्यांना न बांधता केवळ ब्रशच्या वापराद्वारे अप्रतिम आणि बहुविध रंग कपड्यांना देणं म्हणजे युझेन रंगकाम प्रक्रिया. या प्रक्रियेच्या दोन पद्धती आहेत. पेपरट्यूबमध्ये रंग भरुन त्याचं एक टोक बंद केलं जातं आणि दुसèया टोकानं कपड्यांना विविध डिझाईन व रंग दिले जातात. कोनने हातावर मेहंदी काढतो तसलाच हा प्रकार. दुसèया पद्धतीत बारीक काडीच्या मदतीनं कपड्यांवर आडव्या रेषा मारल्या जातात. जपानमध्ये सुमारे ५०० ठिकाणं अशी आहेत जेथे या पद्धतीनं रंग भरण्याची प्रक्रिया केली जाते. हे रंग कसे भरले जातात त्याचा प्रत्यक्ष अनुभवच घेतला. रुमालावर डिझाईन कसं काढायचं हे आम्हाला शिकविण्यात आले. आपल्या येथे रांगोळी काढण्यासाठी आजकाल डिझाईनच्या प्लेट मिळतात. रांगोळी त्या प्लेटवर पसरवून प्लेट बाजूला केली की जमिनीवर डिझाईन तयार होतं. रुमालावर डिझाईन काढण्याची पद्धतही बरीचशी तशाच प्रकारची होती. प्लेट थोडीही हलली की गेलं. विशेषत: आमच्यासोबत असलेल्या पुरुषमंडळींनी या रुमलांवर रंगविलेली चित्रे म्हणजे वेगवेगळ्या देशांचे नकाशेच होते. पण या सर्व कलांचा प्रत्यक्ष आनंद घेता आल्यानं खरच खूप मज्जा आपल्या देशात सिऱ्यामिक कलेला महत्व आलं आहे. कुंड्यांवरील किंवा मातीच्या नानाविध आकारांच्या भांड्यांवरील सिरॅमिक कला छान दिसते. हीच कला जपानमध्येही एक पारंपारिक कला म्हणून ओळखली जाते. परंतु त्याचं नाव शिप्पो टोकेनम आणि आकाझु असं आहे. मातीची भांडी तयार करुन त्यावर अप्रतिम नक्षीकाम किंवा पेंटिंग केलं जातं. जपानच्या आयची प्रांतात याचे विविध नमुने आढळतात. अत्यंत लक्षवेधी आणि आकर्षक पद्धतीनं तयार झालेली ही भांडी म्हणजे जपानचा पारंपारिक खजिनाच आहे. प्राचीन काळात जपानमध्ये स्वयंपाकासाठी मातीची भांडी उपयोगात आणली जात. विशेषत: चहाची भांडी. या देशातील टी सेरेमनीला असलेले महत्व सर्वश्रुत आहे. या कार्यक्रमात चहा ठेवण्यासाठी एकाहून एक सुरेख भांडी वापरली जातात. ही चहाची भांडी त्यातील चहा पिण्यापेक्षा न्याहाळत राहावीशी वाटतात.

आगेभात्सु नारुमी शिबेरो ही पण एक कापड उद्योगातील पारंपारिक कला आहे. कापड घट्ट बांधून त्यावर विविध रंगीत धाग्यांनी कलाकुसर केली जाते. जपानमध्ये कपड्यांवरील विविधरंगी कलाकृती ,डिझाईन्स आणि तऱ्हेतऱ्हेचे आकार प्रसिद्ध आहेत.

Doing Japanese Paper Art
Doing Japanese Paper Art

ओबारा येथील कागदावरील कला म्हणजे जपानमधील एक वेगळाच अनुभव आहे. कागद तयार करण्याची एक वेगळी पद्धत याठिकाणी बघायला मिळाली. तसे तर कागदी कलेचे येथे अनेक प्रकार आहेत. परंतु प्रामुख्यानं रंगीत कागद तयार करीत असताना तो वाळण्यापूर्वी त्यावर डिझाईन काढण्याची ती पद्धत मला खूप भावली. स्वत:च्या हाताने कागद तयार करुन त्यावर डिझाईन काढण्याचा हा अनुभव म्हणजे मला मिळालेली एक आगळीवेगळी भेटच होती.

या देशात पारंपारिक उद्योगांना मिळणारे महत्व बघून आश्चर्य वाटलं. आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारताना जपाननं आपले पारंपारिक उद्योग मागे पडू दिले नाहीत. याउलट आपल्या देशात मात्र आज विणकरांची काय परिस्थिती आहे हे सर्वांनाच माहिती आहे. केवळ विणकरच नाही तर इतरही पारंपारिक उद्योगांचे असेच हाल आहेत. जपानमधील हे पारंपारिक उद्योग बघितल्यानंतर हेवा वाटला आणि मनात विचार आला आपणही आपल्या देशातील अशा उद्योगांची योग्यप्रकारे जपणूक, विकास करु शकणार नाही काय?


सविता ‘देव’ हरकरे
Consulting Editor
WhatsUp मराठी

कंमेंट्स मध्ये तुमचे मत नक्की कळवा !

जपानसाठी ‘टेकऑफ’ आणि ‘ओचा’, ‘कोचा’ | Travel Experience in Japan in Marathi Part 1





Comments

🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
आजचा मराठी शब्दआजचा प्रश्न
या शब्दाचा अर्थ काय आहे?तुम्हाला याचे उत्तर माहीत आहे का?
उत्तरासाठी कार्ड उलटा
अर्थउत्तर
उगमअधिक माहिती
समानार्थीश्रेणी
वाक्यात उपयोग
WhatsUp मराठी पुन्हा उलटा
जानेवारी|फेब्रुवारी|मार्च|एप्रिल|मे|जून|जुलै|ऑगस्ट|सप्टेंबर|ऑक्टोबर|नोव्हेंबर|डिसेंबर
WORD|अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
WORD|लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
WORD|नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|डोंगरातील पाणी नितळ आहे.
WORD|तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
WORD|रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
WORD|ओंजळ|दोन्ही हातांचा केलेला कप्पा|देशज मराठी|हातभर|त्याने ओंजळीत पाणी घेतले.
WORD|हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|हळुवार वारा वाहत होता.
WORD|मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|तिचा आवाज मंजुळ आहे.
WORD|मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|पहिल्या सरीनंतर मृद्गंध दरवळला.
WORD|आभाळमाया|असीम, अपार प्रेम|देशज मराठी|अपार माया|आईची आभाळमाया विसरता येत नाही.
WORD|धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|तो संगीतात धुंद झाला.
WORD|झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|संध्याकाळी थंड झुळूक आली.
WORD|नभ|आकाश|संस्कृत|गगन|पहाटे नभ निरभ्र होते.
WORD|उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|त्याला आनंदाचा उमाळा आला.
WORD|साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|ती साजिरी दिसत होती.
WORD|गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
WORD|कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|फटीतून सूर्याचा कवडसा पडला.
WORD|जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
WORD|लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|गाण्याची लय सुंदर होती.
WORD|कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|फुलदाणीत कोमेजलेली फुले दिसत होती.
WORD|दरवळ|पसरणारा मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|चाफ्याचा दरवळ पसरला.
WORD|सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|सावळ्या ढगांनी आकाश भरले.
WORD|सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|तिचा चेहरा सतेज दिसत होता.
WORD|मधुमालती|सुगंधी फुलांची वेल|संस्कृत|फुलवेल|अंगणात मधुमालती फुलली होती.
WORD|गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
WORD|हुरहूर|मनातील अस्वस्थ ओढ|देशज मराठी|व्याकुळता|जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
WORD|निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
WORD|तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
WORD|मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
WORD|लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|दिव्याची ज्योत लवलवत होती.
WORD|उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|तरुणांमध्ये नवी उमेद आहे.
WORD|गोजिरी|नाजूक व सुंदर|देशज मराठी|साजिरी|गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
WORD|मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|आंब्याला मोहोर आला आहे.
WORD|अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|गावचा चहा अमृततुल्य लागतो.
WORD|झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|मंदिरातील घंटांचा झंकार झाला.
WORD|सहजसुंदर|नैसर्गिकरीत्या सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
WORD|आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|पहाटेचा आसमंत शांत होता.
WORD|सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
WORD|निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|डोंगरातून निर्झर वाहत होता.
WORD|नादमय|संगीताने भरलेला|संस्कृत|सुरेल|सभागृह नादमय झाले.
WORD|मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
WORD|स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|संगीताचे स्पंदन जाणवत होते.
WORD|चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
WORD|मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|मृदुल वाळूवर पावले उमटली.
WORD|अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|ती अलवार हसली.
WORD|स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|पक्षी स्वैर उडत होते.
WORD|सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|फुलांची सुरभि दरवळली.
WORD|दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|तिच्या डोळ्यांत वेगळीच दीप्ती होती.
WORD|प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|अंगणात प्राजक्त फुलला होता.
WORD|निरभ्र|ढगविरहित, पूर्ण स्वच्छ|संस्कृत|स्वच्छ|निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?|रायगड|६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातून वाहणारी सर्वात लांब नदी कोणती?|गोदावरी|त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे उगम पावणारी गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी असून तिला 'दक्षिण गंगा' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली?|१ मे १९६०|संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये अस्तित्वात आली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?|कळसूबाई|अहिल्यानगर जिल्ह्यातील हे शिखर सुमारे १,६४६ मीटर उंच असून ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे.|भूगोल
GK|संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' कोणत्या गावी लिहिली?|नेवासे|अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथे भगवद्गीतेवरील ही मराठी टीका लिहिली गेली.|संस्कृती
GK|लोणार सरोवर कशामुळे तयार झाले?|उल्कापातामुळे|बुलढाणा जिल्ह्यातील हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बेसाल्ट खडकात उल्का आदळून तयार झालेले जगातील दुर्मीळ सरोवर आहे.|भूगोल
GK|तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला?|सिंहगड (कोंढाणा)|१६७० मधील या लढाईत तानाजी धारातीर्थी पडले; 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार प्रसिद्ध आहेत.|इतिहास
GK|अफझलखानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला?|प्रतापगड|१६५९ मध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाजवळ ही ऐतिहासिक भेट व संघर्ष घडला.|इतिहास
GK|मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?|दर्पण|बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये 'दर्पण' सुरू केले; त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक मानले जाते.|संस्कृती
GK|'केसरी' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?|लोकमान्य बाळ गंगाधर टिळक|१८८१ मध्ये मराठीतून 'केसरी' आणि इंग्रजीतून 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू झाली.|इतिहास
GK|'सत्यशोधक समाज' कोणी स्थापन केला?|महात्मा जोतिराव फुले|२४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात स्थापन झालेली ही संस्था सामाजिक समतेसाठी कार्यरत होती.|इतिहास
GK|'श्यामची आई' या पुस्तकाचे लेखक कोण?|साने गुरुजी|पांडुरंग सदाशिव साने यांनी नाशिकच्या कारागृहात हे पुस्तक लिहिले.|साहित्य
GK|'नटसम्राट' या गाजलेल्या नाटकाचे लेखक कोण?|वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)|कुसुमाग्रजांना १९८७ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.|साहित्य
GK|मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा होतो?|२७ फेब्रुवारी|कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.|संस्कृती
GK|वेरूळ येथील कैलास लेणे कोणत्या राजवटीत कोरले गेले?|राष्ट्रकूट|एकाच अखंड खडकात वरून खाली कोरलेले हे मंदिर जगातील स्थापत्यशास्त्रीय आश्चर्य मानले जाते.|इतिहास
GK|अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?|छत्रपती संभाजीनगर|बौद्ध चित्रकला व शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेली ही लेणी युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहेत.|पर्यटन
GK|एलिफंटा लेणी कोणत्या देवतेला समर्पित आहेत?|शिव|मुंबईजवळील घारापुरी बेटावरील त्रिमूर्ती शिल्प जगप्रसिद्ध आहे.|पर्यटन
GK|महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत?|पाच|भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ — बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत.|संस्कृती
GK|अष्टविनायक म्हणजे किती गणपती मंदिरे?|आठ|पुणे, रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विखुरलेली ही आठ स्वयंभू गणपती मंदिरे आहेत.|संस्कृती
GK|कृष्णा नदीचा उगम कोठे होतो?|महाबळेश्वर|सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्या उगम पावतात.|भूगोल
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?|शिवनेरी|पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या या किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी त्यांचा जन्म झाला.|इतिहास
GK|संत तुकाराम महाराजांचे गाव कोणते?|देहू|पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीकाठचे देहू हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.|संस्कृती
GK|संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?|आळंदी|पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली.|संस्कृती
GK|सेवाग्राम आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?|वर्धा|महात्मा गांधींनी १९३६ मध्ये येथे वास्तव्य सुरू केले; हे स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्वाचे केंद्र ठरले.|इतिहास
GK|पवनार आश्रम कोणाशी संबंधित आहे?|आचार्य विनोबा भावे|वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून विनोबांनी भूदान चळवळीचे कार्य केले.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते?|ताडोबा|चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा १९५५ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झाले; पुढे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तयार झाला.|वन्यजीव
GK|'संत्रानगरी' म्हणून कोणते शहर ओळखले जाते?|नागपूर|संत्र्यांच्या व्यापारामुळे मिळालेले हे नाव; नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.|भूगोल
GK|महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणते शहर मानले जाते?|पुणे|शिक्षण, साहित्य, नाट्य आणि संगीत परंपरेमुळे पुण्याला हे स्थान मिळाले आहे.|संस्कृती
GK|रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते?|रायरी|शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केली.|इतिहास
GK|पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?|१७६१|मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यातील या लढाईचा मराठा साम्राज्यावर मोठा परिणाम झाला.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेचे नाव काय?|जिजाबाई|जिजाऊंनी शिवरायांवर स्वराज्याचे संस्कार केले; त्यांना राजमाता म्हणून ओळखले जाते.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळ घोषित झाले?|२००४|व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतील ही वास्तू मुंबईचे प्रतीक मानली जाते.|पर्यटन
GK|गेट वे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे?|मुंबई|१९२४ मध्ये पूर्ण झालेली ही वास्तू अरबी समुद्राच्या काठी उभी आहे.|पर्यटन
GK|'लोकहितवादी' या टोपणनावाने कोण लेखन करत असत?|गोपाळ हरी देशमुख|त्यांच्या 'शतपत्रे' या लेखमालेने एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारणेला दिशा दिली.|साहित्य
GK|मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?|वि. स. खांडेकर|'ययाति' या कादंबरीसाठी १९७४ मध्ये त्यांना हा सन्मान मिळाला.|साहित्य
GK|जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?|गोदावरी|छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या धरणाच्या जलाशयाला 'नाथसागर' म्हणतात.|भूगोल
GK|कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?|सातारा|जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या धरणाच्या जलाशयाला 'शिवसागर' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते?|ताम्हण (जारूळ)|जांभळ्या रंगाची ही फुले पावसाळ्यात सह्याद्रीत मोठ्या प्रमाणात दिसतात.|निसर्ग
GK|महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?|शेकरू|मोठी उडणारी खार असलेला शेकरू भीमाशंकर अभयारण्यात प्रामुख्याने आढळतो.|वन्यजीव
GK|कास पठार कशासाठी प्रसिद्ध आहे?|रानफुलांच्या बहरासाठी|सातारा जिल्ह्यातील हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ पावसाळ्यानंतर फुलांच्या गालिच्यासाठी ओळखले जाते.|पर्यटन
GK|भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी ओळखले जाते?|शेकरू|पुणे जिल्ह्यातील हे अभयारण्य ज्योतिर्लिंगासाठीही प्रसिद्ध आहे.|वन्यजीव

अजून इंटरेस्टिंग...

विदर्भात समुद्र होता तेव्हा...! | Author: Prof Suresh Chopne | Ocean in Vidarbha Maharashtra? | Heritage Tourism | Maharashtra Tourism

श्रीकृष्णाच्या नगरीत... द्वारकाधीशांच्या चरणी, भाग १ | Author: Mrs. Manik Joshi | Dwarkadheesh Temple | Heritage Tourism | Incredible India

चंद्रपूर: निसर्ग, इतिहास, संस्कृती, लोकजीवन आणि वारशाचा समृद्ध पर्यटनपट | Author: Dr. Pallavi Tajne | Chandrapur Culture and Heritage | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism

महाराष्ट्रातील डार्क स्काय पर्यटन, शहरी गोंगाटापासून दूर, आकाशाच्या कुशीत | Dark Sky Tourism | Astro Tourism | Maharashtra Tourism Policy

भारताचा प्राचीन 'सिल्क रूट’ नाणेघाट | Author: Narendra Chandewar | Silk Route of India, Naneghat | Maharashtra Tourism

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

गोठवणाऱ्या थंडीत आयफेल टॉवरचा अद्‌भूत नजारा... पुस्तकांच्या पलीकडे, जगाच्या जवळ | Author: Yash Naseri | Eiffel Tower Paris | International & Global Tourism

भामरागडमध्ये जलक्रांतीतून निर्मित ‘तलावांचे जाळे’ | अनिकेत प्रकाश आमटे | लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte

विदर्भातही येऊन गेले होते गौतम बुद्ध: विदर्भातील बौद्ध सर्किट | Vidarbha Buddhist Circuit Travel Guide

भटाळा गावात आहे ‘भोंडा महादेव’ | Author: Himgauri Deshpande | Bhonda Mahadev Temple Bhatala | Temples of Vidarbha | Temples of Maharashtra