सुरजागड | Surjagad Fort | Forts near Nagpur | Forts in Vidarbha
घनदाट जंगल मुक्त अभयारण्य नक्षलग्रस्त क्षेत्र,हिंस्र श्वापद, दळणवळणांच्या साधनांची कमतरता असलेले चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हे गोंड नृपतींच्या अखत्यारित होते. त्याआधी काही वनक्षेत्रात माना राजवंशाचे राजे होते. या भागात इंग्रजांच्या काळापासून जे गिरीदुर्ग ज्ञात आहेत त्यात टिप्पागड, वैरागड, माणिकगड, बल्लारशाह हे किल्ले भांदक,चंद्रपूर, चंदनखेडा, भटाळा ही तटबंदीची शहरे आणि अनेक गढ्या आहेत. याशिवाय सुरजागड, गडबोली व राजोली हे तीन वनदुर्ग- डोंगरी दुर्गही या जिल्ह्यात आहेत, हे विशेष.
सुरजागड किल्ला गडचिरोली जिल्ह्यात एटापल्लीपासून गड्डा मार्गावर पूर्वेला सुमारे २५ ते ३० किमी अंतरावर जंगलात आहे. मुळात डोंगरी किल्ला असून अहेरी जमीनदारीत मोडतो. उंच डोंगरावरील पठार आणि तटबंदी असे त्याचे स्वरुप आहे. गोंड माडिया जमातीची देवता श्रीठाकुरदेवाचे देवस्थान येथे आहे. मकरसंक्रमण काळात येथे जत्रा भरते. या क्षेत्रात प्राचीन काळी नागवंशीय माना राजा कुरुम प्रहोद याची सत्ता होती. हा काळ साधारण ९-१०व्या शतकातील असावा. पण त्यानंतर देवगिरीच्या यादवांनी हा सर्व मुलुख जिंकला. या वनवासींनीच वैरागड, गडबोली, राजोली व सुरजागड ही डोंगरी ठाणी बांधली. मुळात सुरजागड हा सुरजन बळवईक या सरदाराने रचला. त्यावरुन याचे नाव सुरजागड पडले. हा किल्ला घनदाट जंगलात आहे. त्यामुळे पर्यटक इकडे फिरकत नाहीत.
सुरजागड | Surjagad Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

सूचना: या तीन किल्ल्यांची माहिती ऐतिहासिक नोंद म्हणून देण्यात आली आहे. येथे पर्यटक जात नाहीत.
तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️

Comments
Post a Comment