जपानी तलवारबहाद्दरांसोबत ‘केन्डो’ चा आनंद | Kendo in Japan | Travel Experience in Japan in Marathi Part 4

आठवणीतील जपान भाग चार | Travel Experience in Japan in Marathi Part 4

आधुनिक जपानचा जन्म १८६० सालानंतर झाला असं सांगितलं जातं. सरंजामशाहीचा एक दीर्घ अध्याय याच काळात संपला. आपल्या येथे पेशवाई होती तशीच जपानमध्ये शोगुनाई ! या शोगुनांनी जपानी राजाला देव्हाऱ्यातील देव बनवून संपूर्ण सत्ता बळकावली होती. ‘सामुराई ’ हे त्या काळातील धंदेवाईक योद्धे होते. अत्यंत प्रामाणिक आणि कट्टर. युद्ध करणे हाच त्यांचा धर्म. चित्रविचित्र पोषाख केलेले, डोक्यावर वस्तऱ्याने पट्टे ओढून शेंड्या ठेवणारे हे सामुराई आता फक्त नाटकांमध्ये बघायला मिळतात. या लोकांजवळ नेहमी दोन तलवारी असत. एक छोटी आणि एक मोठी. युद्ध कौशल्याचे अनेक प्रकार त्या काळात या देशात विकसित झाले.

टोकियोतील प्रसिद्ध कोडोकन ज्युडो इन्स्टिट्यूटमध्ये अशा अनेक शस्त्रकला बघायला मिळाल्या. पहिला ज्युडो प्रशिक्षणार्थी याच संस्थेतून बाहेर पडला,असं सांगण्यात आलं. याठिकाणी आम्ही केवळ शस्त्रकलांचं प्रात्यक्षिकच बघितलं नाही तर येथील खेळाडूंसोबत आम्ही चांगलं अर्धापाऊण तास ज्युडो सुद्धा खेळलो.

पूर्वी युद्धांमध्ये या शस्त्रकलांचा वापर होत असे. यापैकी काही कला आता कालबाह्य झाल्या असतील. परंतु जपानी लोक हे जुनं ते सोनं मानणाऱ्यांपैकी आहेत. त्यांनी या कला अतिशय आदरानं जतन केल्या आहेत. सामुराईंबद्दलही समाजात असाच आदर कायम आहे. या सामुराईंचा इतिहासही मोठा रोचक आहे. आपल्या धन्याविषयीचे इमान आणि मानअपमानाच्या त्यांच्या कल्पना फार विचित्र होत्या. धन्याच्या अपमानाचा सूड घेता आला नाही तर सामुराई आत्महत्या करीत असत. समाजात त्यांना एखाद्या ऋषीमुनीप्रमाणं मान असायचा म्हणे.

Kendo Fight - Travel Experience in Japan in Marathi

भारताप्रमाणं जपानमध्येही वर्णव्यवस्था होती. जपानी चातुर्वण्यात शेतकरी हा सर्वोच्च स्थानी होता. त्यानंतर कारागीर. व्यापारी सर्वात कनिष्ठ. शिवाय गुलाम आणि अस्पृष्यही होतेच. परंतु या संपूर्ण वर्णव्यवस्थेत सामुराईंचं स्थान मात्र स्वतंत्र होतं. तेजस्वी आणि कर्तव्यनिष्ठ. कर्तव्यात काही चूक झाल्यास ‘हाराकिरी’ करण्याची पद्धत होती. हाराकिरी म्हणजे आत्महत्याच पण साधीसुधी नाही. साध्या आत्महत्येला जपानी भाषेत ‘सेप्पुक’ म्हणतात. आणि पोटात एका खास पद्धतीने खंजीर खुपसून आपले जीवन संपविणे म्हणजे हाराकिरी. त्यातही खंजीर पोटात किती इंच आत खुपसायचा आणि कसा फिरवायचा याचेही शास्त्र आहे. सामुराई आता अस्तिवात नाही. परंतु त्याचा आदर्श टिकून आहे.

दुसऱ्या महायुद्धातील सेप्पुकासंदर्भात एक घटना कळली. ती फार धक्कादायक वाटली. पॉटस्डॅम येथे तयार केलेल्या घोषणापत्रात जपानी सम्राट किंवा जनतेनं नव्हेतर जपानच्या सशस्त्र दलांनी शरणागती पत्करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. तरीही जपानी युद्धमंत्री जनरल अनामी पराभव मानायला तयार नव्हते. ‘एकवेळ गवत खाऊ पण लढत राहू’,असा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. काही लष्करी अधिकारीही याच मताचे होते. सम्राटांच्या शरणागतीची टेप हस्तगत करण्याचे दोन प्रयत्न त्यांनी केले. पण ते निष्फळ ठरले. जपानची शरणागती प्रसृत होताच जनरल अनामी यांनी आत्मघात (सेप्पुक)केला. त्यानंतर किमान आठ लष्करी अधिकाऱ्यानी आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं.मेजी काळात शोगुन संपले. त्यांच्यासोबत सामुराईही गेले. राजा पुन्हा सत्तेत आला. जपानी  लोक राजाला देव मानतात. अगदी मनापासून. राजा किंवा राजकुमाराचं नाव जोरानं उच्चारलेलं आजही चालत नाही. आपल्या मुलांची नावे त्यांच्या नावानं ठेवल्या जात नाहीत, असं म्हणतात.

हे लोक फार राष्ट्रप्रेमी आहेत. आपले राष्ट्र, आपली भाषा, परंपरा, कला यांना ते फार मानतात. या सर्वात जुन्या मार्शल आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही जवळपास तीन तास होतो. देशातील एक आदर्श म्हणून या संस्थेकडे बघितलं जातं आणि खरोखरच येथील खेळाडूंची या कलांबद्दलची भक्ती बघून आश्चर्य वाटलं. ज्युडो, कराटे हे सगळे खेळ जपानमधूनच तर बाहेर आलेत. मार्शल आर्टमध्ये मोडणारा ज्युडो हा अत्यंत लोकप्रिय खेळ आहे. विशेष म्हणजे आत्मसंरक्षणाचे साधन या अर्थानं तो अधिक ओळखला जातो. जपानमध्येच जिगोरो कानो याने १८८२ साली सर्वप्रथम ज्युडोची निर्मिती केली. त्यानंच कोडोकन इन्स्टिट्यूटही स्थापन केले. शारीरिक आणि मानसिक उर्जेचा सर्वाधिक परिणामकारक वापर म्हणजे ज्युडो होय,असं कानोचं मत होतं. निशस्त्र असतानाही शत्रूशी लढत देण्याचं कसब एक ज्यडोपटू दाखवू शकतो. जपानी लोकांच्या मते हे धार्मिक विकासाचंही साधन आहे आणि म्हणूनच या देशात या कलेला अधिक महत्व दिल्या गेलं आहे. जपानमध्ये प्राथमिक स्तरापासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यत ज्युडोचं प्रशिक्षण अनिवार्य आहे. विशेषत: लष्कर आणि पोलिस प्रशिक्षणार्थींना ज्युडो शिकावंच लागतं अन्यथा त्यांची हकालपट्टी झालीच म्हणून समजा. मुळात शैक्षणिक मानसशास्त्रावर आधारित ज्युडो तंत्रज्ञानात नागेवाझा (थ्रोज), कात-अमे-वाझा (कुस्तीतंत्र), आक्रमण आणि पायांचा विद्युत गतीने वापर करुन शत्रुच्या नाजूक भागावर डोळ्याचे पाते लवते न लवते तोच मारा करणे अशा तीन मुख्य पद्धतींचा समावेश आहे. १९६४ सालच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये ज्युडोला आशियातील पहिला ऑलिम्पिक दर्जाचा अधिकृत क्रीडा प्रकार म्हणून मान्यता देण्यात आली, अी माहिती या संस्थेत मिळाली.

Judo Karate - Travel Experience in Japan in Marathi

एकिडो हा जपानमधील मार्शल आर्ट साखळीतील एक नवा प्रकार.मोरीहेई उशीबा यांनी १९२० साली तो शोधून काढला. मोरीहेई हे शास्त्रीय मार्शल आर्टचे एक विशेषज्ञ. जपान सरकारनं १९४० साली द एकिडो फाऊंडेशनला मान्यता दिली. आक्रमणकर्त्याचा हल्ला परतवायचा वा रोखायचा मात्र त्याला जखमी वा ठार न करता यात एक वेगळं कसब आहे. आणि ते एकिडो शिकतानाच आत्मसात होऊ शकतं. म्हणूनच कदाचित एकिडोचं वर्णन ‘मार्शल आर्ट ऑफ लव्ह’ असं केलं जातं आणि ते यथार्थच म्हणावं लागेल. तरुणतरुणी, म्हातारे कोतारे कोणालाही एकिडो शिकता येतं. जपानमध्ये ‘एकिडो’ धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतील एक साखळी असल्याची भावना आहे.

केन्डो म्हणजे जपानी तलवारबहाद्दरांची कला. या पुरातन कलेचा फार मोठा इतिहासही आहे. तसं बघता जपानी शस्त्रे आणि योद्धांवर चीनचा मोठा प्रभाव असल्याचं दिसून येतं. जपानी योद्ध्यांजवळील तलवारी चपट्या आणि सरळ राहात. आताच्या काळातील जपानी लढवय्यांजवळील तलवारी समोरच्या भागात किंचित वाकलेल्या असतात. १५,१६ आणि १७ व्या शतकात तलवार युद्धाच्या सहाशे वेगवेगळ्या पद्धती विकसित झाल्या. त्यापैकी अनेक पद्धती जपानच्या मार्शल आर्टस्ने उचलल्या. केन्डो तलवारबाजीची कला म्हणजे तलवार युद्ध तंत्रातील तत्वे स्वीकारुन स्वत:चा विकास करणे होय,असं जपानमध्ये समजलं जातं. जुन्या पद्धतीच्या तलवारींनी केन्डो खेळताना योद्ध्यांना जखमा होत. त्या काही वेळा गंभीर असत. जीव सुद्धा जाई. त्यामुळं सुरक्षित अशा बांबूच्या तलवारींचा वापर १७१० मध्ये सुरु झाला. शिवाय धोका होऊ नये म्हणून योद्धे शिरस्त्राण आणि चिलखतही वापरु लागले. जपानी शाळांमध्ये शारीरिक शिक्षणात केन्डो प्रशिक्षणाला फार महत्व आहे. याशिवाय जगातील इतर देशांमध्ये केन्डोचा प्रसार करण्यासाठी इंटरनॅशनल केन्डो फेडरेशन कार्यरत आहे.

जगात सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय जपानी मार्शल आर्टमध्ये कराटेला साहजिकच प्रथम स्थान द्यावं लागेल. आत्मसंरक्षणासोबतच प्रतिहल्ला आणि शत्रुला चारीमुंड्या चीत करण्याचं कसब कराटेपटूच जाणो. राहत्या गल्लीतील एकदोन लहान मुलांना मी कराटेचे हातवारे करताना बघितलं होतं. परंतु या संस्थेतील कराटेचे सादरीकरण म्हणजे ‘थरार’ होता. कोणतेही शस्त्र न बाळगता केवळ हात, हाताचं मनगट, पंजा,बोटे आणि पायांचा विद्युल्लतेच्या चपळाईनं वापर करुन शत्रुला लोळवणं. ही जगावेगळी कला आता साèया जगासाठी आवश्यक बाब झाली आहे. कराटेमुळं मन आणि शरीर दोघांचाही विकास होतो,असा जपानी लोकांचा विश्वास आहे. त्यामुळं जपानमधील शिक्षण संस्थांमध्ये कराटेला एक आगळं महत्व आहे. येथे विद्यापीठे आणि महाविद्यालयांचे स्वत:चे कराटे क्लब असून विद्यार्थी विद्यार्थिनी केव्हाही येथे सराव करु शकतात. वेळेचं वगैरे काही बंधन नाही. जगातील पहिली जागतिक कराटे स्पर्धा १९७० साली टोकियोतच झाली होती.

जपानच्या परंपरागत युद्धशास्त्रातील महत्वाचं शास्त्र म्हणजे नागिनाता. जपानी पायदळातील सैनिक लांब काठ्या आणि काठीच्या समोरच्या भागाला आखूड आणि किंचित वाकलेली तलवार घेऊन शत्रूवर तुटून पडत तेव्हा शत्रुची दाणादाण उडत असे. येथील पेटिंग्ज आणि साहित्य बघितल्यानंतर असं लक्षात आलं की नागिनाताचा वापर सर्वप्रथम 11 व्या शतकातील नागरी युद्धात करण्यात आला असावा. 1963 मध्ये अमेरिकेत नागिनाता फेडरेशनची स्थापना करण्यात आल्यानंतर नागिनाताचा जगभर प्रसार झाला. नागिनाताचा उद्देश आत्मविश्वास वृद्धींगत करणे तसेच संतुलित मानसिक आणि शारीरिक विकास करणे होय असे जपानी लोक सांगतात. आधुनिक काळात नागिनातामध्ये बराच बदल करण्यात आला आहे.
Samurai Fight - Travel Experience in Japan

शोरिजी केम्पो हा असाच एक मार्शल आर्टचा अफलातून प्रकार. दक्षिण जपानमधील तादोत्सू शहरात १९४७ साली डोशिन सो याने हा प्रकार शोधून काढला. डोशिन सो दुसèया महायुद्धाच्या अंतिम टप्प्यात चीनमध्ये राहात होता. चीन आणि जपानमधील वास्तव्यात आलेल्या विविध अनुभवांचा अभ्यास करुन त्याने चीनमधील मार्शल आर्टचा आधार घेत शोरिजी केम्पो या स्वरक्षणासाठीच्या कलेची निर्मिती केली. शोरिजी केम्पोचे तंत्र पूर्णत: बचावात्मक आहे. शत्रूचा हल्ला निष्प्रभ केल्यानंतर किंवा त्याला थकविल्यानंतर त्याच्यावर प्रतिहल्ला करणं हे केम्पोचं वैशिष्ट्य. आजच्या या हिंसक जगात स्वत:चा बचाव करणं प्रत्येकाला शक्य व्हावं हा डोशिनचा मूळ उद्देश होता. पुरुष अथवा स्त्रियांनाही प्रबळ प्रतिस्पर्धी वा शत्रूवर मात करावयाची असेल तर प्रथम स्वत:चा बचाव करणे जमले पाहिजे. स्वत:ला वाचविले तरच शत्रूवर प्रतिहल्ला करता येईल,अशी डोशिनची धारणा होती.

या आणि इतरही काही कला संस्थेत बघायला मिळाल्या. अनुभवायला मिळाल्या. वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. पण हे सर्व बघत असताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे एकीकडे पाश्चात्य पद्धतींचं अनुकरण करणारे जपानी लोक दुसरीकडे आचारधर्माचंही पालन करतात.


सविता ‘देव’ हरकरे
Consulting Editor
WhatsUp मराठी

कंमेंट्स मध्ये तुमचे मत नक्की कळवा !

जपानसाठी ‘टेकऑफ’ आणि ‘ओचा’, ‘कोचा’ | Travel Experience in Japan in Marathi Part 1





Comments

🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
आजचा मराठी शब्दआजचा प्रश्न
या शब्दाचा अर्थ काय आहे?तुम्हाला याचे उत्तर माहीत आहे का?
उत्तरासाठी कार्ड उलटा
अर्थउत्तर
उगमअधिक माहिती
समानार्थीश्रेणी
वाक्यात उपयोग
WhatsUp मराठी पुन्हा उलटा
जानेवारी|फेब्रुवारी|मार्च|एप्रिल|मे|जून|जुलै|ऑगस्ट|सप्टेंबर|ऑक्टोबर|नोव्हेंबर|डिसेंबर
WORD|अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
WORD|लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
WORD|नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|डोंगरातील पाणी नितळ आहे.
WORD|तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
WORD|रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
WORD|ओंजळ|दोन्ही हातांचा केलेला कप्पा|देशज मराठी|हातभर|त्याने ओंजळीत पाणी घेतले.
WORD|हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|हळुवार वारा वाहत होता.
WORD|मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|तिचा आवाज मंजुळ आहे.
WORD|मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|पहिल्या सरीनंतर मृद्गंध दरवळला.
WORD|आभाळमाया|असीम, अपार प्रेम|देशज मराठी|अपार माया|आईची आभाळमाया विसरता येत नाही.
WORD|धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|तो संगीतात धुंद झाला.
WORD|झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|संध्याकाळी थंड झुळूक आली.
WORD|नभ|आकाश|संस्कृत|गगन|पहाटे नभ निरभ्र होते.
WORD|उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|त्याला आनंदाचा उमाळा आला.
WORD|साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|ती साजिरी दिसत होती.
WORD|गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
WORD|कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|फटीतून सूर्याचा कवडसा पडला.
WORD|जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
WORD|लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|गाण्याची लय सुंदर होती.
WORD|कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|फुलदाणीत कोमेजलेली फुले दिसत होती.
WORD|दरवळ|पसरणारा मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|चाफ्याचा दरवळ पसरला.
WORD|सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|सावळ्या ढगांनी आकाश भरले.
WORD|सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|तिचा चेहरा सतेज दिसत होता.
WORD|मधुमालती|सुगंधी फुलांची वेल|संस्कृत|फुलवेल|अंगणात मधुमालती फुलली होती.
WORD|गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
WORD|हुरहूर|मनातील अस्वस्थ ओढ|देशज मराठी|व्याकुळता|जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
WORD|निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
WORD|तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
WORD|मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
WORD|लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|दिव्याची ज्योत लवलवत होती.
WORD|उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|तरुणांमध्ये नवी उमेद आहे.
WORD|गोजिरी|नाजूक व सुंदर|देशज मराठी|साजिरी|गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
WORD|मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|आंब्याला मोहोर आला आहे.
WORD|अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|गावचा चहा अमृततुल्य लागतो.
WORD|झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|मंदिरातील घंटांचा झंकार झाला.
WORD|सहजसुंदर|नैसर्गिकरीत्या सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
WORD|आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|पहाटेचा आसमंत शांत होता.
WORD|सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
WORD|निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|डोंगरातून निर्झर वाहत होता.
WORD|नादमय|संगीताने भरलेला|संस्कृत|सुरेल|सभागृह नादमय झाले.
WORD|मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
WORD|स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|संगीताचे स्पंदन जाणवत होते.
WORD|चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
WORD|मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|मृदुल वाळूवर पावले उमटली.
WORD|अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|ती अलवार हसली.
WORD|स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|पक्षी स्वैर उडत होते.
WORD|सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|फुलांची सुरभि दरवळली.
WORD|दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|तिच्या डोळ्यांत वेगळीच दीप्ती होती.
WORD|प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|अंगणात प्राजक्त फुलला होता.
WORD|निरभ्र|ढगविरहित, पूर्ण स्वच्छ|संस्कृत|स्वच्छ|निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?|रायगड|६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातून वाहणारी सर्वात लांब नदी कोणती?|गोदावरी|त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे उगम पावणारी गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी असून तिला 'दक्षिण गंगा' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली?|१ मे १९६०|संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये अस्तित्वात आली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?|कळसूबाई|अहिल्यानगर जिल्ह्यातील हे शिखर सुमारे १,६४६ मीटर उंच असून ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे.|भूगोल
GK|संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' कोणत्या गावी लिहिली?|नेवासे|अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथे भगवद्गीतेवरील ही मराठी टीका लिहिली गेली.|संस्कृती
GK|लोणार सरोवर कशामुळे तयार झाले?|उल्कापातामुळे|बुलढाणा जिल्ह्यातील हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बेसाल्ट खडकात उल्का आदळून तयार झालेले जगातील दुर्मीळ सरोवर आहे.|भूगोल
GK|तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला?|सिंहगड (कोंढाणा)|१६७० मधील या लढाईत तानाजी धारातीर्थी पडले; 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार प्रसिद्ध आहेत.|इतिहास
GK|अफझलखानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला?|प्रतापगड|१६५९ मध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाजवळ ही ऐतिहासिक भेट व संघर्ष घडला.|इतिहास
GK|मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?|दर्पण|बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये 'दर्पण' सुरू केले; त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक मानले जाते.|संस्कृती
GK|'केसरी' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?|लोकमान्य बाळ गंगाधर टिळक|१८८१ मध्ये मराठीतून 'केसरी' आणि इंग्रजीतून 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू झाली.|इतिहास
GK|'सत्यशोधक समाज' कोणी स्थापन केला?|महात्मा जोतिराव फुले|२४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात स्थापन झालेली ही संस्था सामाजिक समतेसाठी कार्यरत होती.|इतिहास
GK|'श्यामची आई' या पुस्तकाचे लेखक कोण?|साने गुरुजी|पांडुरंग सदाशिव साने यांनी नाशिकच्या कारागृहात हे पुस्तक लिहिले.|साहित्य
GK|'नटसम्राट' या गाजलेल्या नाटकाचे लेखक कोण?|वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)|कुसुमाग्रजांना १९८७ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.|साहित्य
GK|मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा होतो?|२७ फेब्रुवारी|कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.|संस्कृती
GK|वेरूळ येथील कैलास लेणे कोणत्या राजवटीत कोरले गेले?|राष्ट्रकूट|एकाच अखंड खडकात वरून खाली कोरलेले हे मंदिर जगातील स्थापत्यशास्त्रीय आश्चर्य मानले जाते.|इतिहास
GK|अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?|छत्रपती संभाजीनगर|बौद्ध चित्रकला व शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेली ही लेणी युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहेत.|पर्यटन
GK|एलिफंटा लेणी कोणत्या देवतेला समर्पित आहेत?|शिव|मुंबईजवळील घारापुरी बेटावरील त्रिमूर्ती शिल्प जगप्रसिद्ध आहे.|पर्यटन
GK|महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत?|पाच|भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ — बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत.|संस्कृती
GK|अष्टविनायक म्हणजे किती गणपती मंदिरे?|आठ|पुणे, रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विखुरलेली ही आठ स्वयंभू गणपती मंदिरे आहेत.|संस्कृती
GK|कृष्णा नदीचा उगम कोठे होतो?|महाबळेश्वर|सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्या उगम पावतात.|भूगोल
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?|शिवनेरी|पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या या किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी त्यांचा जन्म झाला.|इतिहास
GK|संत तुकाराम महाराजांचे गाव कोणते?|देहू|पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीकाठचे देहू हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.|संस्कृती
GK|संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?|आळंदी|पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली.|संस्कृती
GK|सेवाग्राम आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?|वर्धा|महात्मा गांधींनी १९३६ मध्ये येथे वास्तव्य सुरू केले; हे स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्वाचे केंद्र ठरले.|इतिहास
GK|पवनार आश्रम कोणाशी संबंधित आहे?|आचार्य विनोबा भावे|वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून विनोबांनी भूदान चळवळीचे कार्य केले.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते?|ताडोबा|चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा १९५५ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झाले; पुढे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तयार झाला.|वन्यजीव
GK|'संत्रानगरी' म्हणून कोणते शहर ओळखले जाते?|नागपूर|संत्र्यांच्या व्यापारामुळे मिळालेले हे नाव; नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.|भूगोल
GK|महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणते शहर मानले जाते?|पुणे|शिक्षण, साहित्य, नाट्य आणि संगीत परंपरेमुळे पुण्याला हे स्थान मिळाले आहे.|संस्कृती
GK|रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते?|रायरी|शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केली.|इतिहास
GK|पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?|१७६१|मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यातील या लढाईचा मराठा साम्राज्यावर मोठा परिणाम झाला.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेचे नाव काय?|जिजाबाई|जिजाऊंनी शिवरायांवर स्वराज्याचे संस्कार केले; त्यांना राजमाता म्हणून ओळखले जाते.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळ घोषित झाले?|२००४|व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतील ही वास्तू मुंबईचे प्रतीक मानली जाते.|पर्यटन
GK|गेट वे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे?|मुंबई|१९२४ मध्ये पूर्ण झालेली ही वास्तू अरबी समुद्राच्या काठी उभी आहे.|पर्यटन
GK|'लोकहितवादी' या टोपणनावाने कोण लेखन करत असत?|गोपाळ हरी देशमुख|त्यांच्या 'शतपत्रे' या लेखमालेने एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारणेला दिशा दिली.|साहित्य
GK|मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?|वि. स. खांडेकर|'ययाति' या कादंबरीसाठी १९७४ मध्ये त्यांना हा सन्मान मिळाला.|साहित्य
GK|जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?|गोदावरी|छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या धरणाच्या जलाशयाला 'नाथसागर' म्हणतात.|भूगोल
GK|कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?|सातारा|जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या धरणाच्या जलाशयाला 'शिवसागर' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते?|ताम्हण (जारूळ)|जांभळ्या रंगाची ही फुले पावसाळ्यात सह्याद्रीत मोठ्या प्रमाणात दिसतात.|निसर्ग
GK|महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?|शेकरू|मोठी उडणारी खार असलेला शेकरू भीमाशंकर अभयारण्यात प्रामुख्याने आढळतो.|वन्यजीव
GK|कास पठार कशासाठी प्रसिद्ध आहे?|रानफुलांच्या बहरासाठी|सातारा जिल्ह्यातील हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ पावसाळ्यानंतर फुलांच्या गालिच्यासाठी ओळखले जाते.|पर्यटन
GK|भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी ओळखले जाते?|शेकरू|पुणे जिल्ह्यातील हे अभयारण्य ज्योतिर्लिंगासाठीही प्रसिद्ध आहे.|वन्यजीव

अजून इंटरेस्टिंग...

विदर्भात समुद्र होता तेव्हा...! | Author: Prof Suresh Chopne | Ocean in Vidarbha Maharashtra? | Heritage Tourism | Maharashtra Tourism

श्रीकृष्णाच्या नगरीत... द्वारकाधीशांच्या चरणी, भाग १ | Author: Mrs. Manik Joshi | Dwarkadheesh Temple | Heritage Tourism | Incredible India

चंद्रपूर: निसर्ग, इतिहास, संस्कृती, लोकजीवन आणि वारशाचा समृद्ध पर्यटनपट | Author: Dr. Pallavi Tajne | Chandrapur Culture and Heritage | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism

महाराष्ट्रातील डार्क स्काय पर्यटन, शहरी गोंगाटापासून दूर, आकाशाच्या कुशीत | Dark Sky Tourism | Astro Tourism | Maharashtra Tourism Policy

भारताचा प्राचीन 'सिल्क रूट’ नाणेघाट | Author: Narendra Chandewar | Silk Route of India, Naneghat | Maharashtra Tourism

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

गोठवणाऱ्या थंडीत आयफेल टॉवरचा अद्‌भूत नजारा... पुस्तकांच्या पलीकडे, जगाच्या जवळ | Author: Yash Naseri | Eiffel Tower Paris | International & Global Tourism

भामरागडमध्ये जलक्रांतीतून निर्मित ‘तलावांचे जाळे’ | अनिकेत प्रकाश आमटे | लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte

विदर्भातही येऊन गेले होते गौतम बुद्ध: विदर्भातील बौद्ध सर्किट | Vidarbha Buddhist Circuit Travel Guide

भटाळा गावात आहे ‘भोंडा महादेव’ | Author: Himgauri Deshpande | Bhonda Mahadev Temple Bhatala | Temples of Vidarbha | Temples of Maharashtra