सीताबर्डी किल्ला | Sitabuldi Fort Nagpur | Forts near Nagpur | Forts of Vidarbha
विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha
Sitabuldi Fort, Nagpur
नागपूर शहराच्या मध्यभागी विराजमान सीताबर्डी किल्ला म्हणजे या शहराची शान. सीताबर्डीची प्रसिद्ध लढाई अनेकांच्या ऐकिवात असेल. १८१७ साली २६ डिसेंबरला सायंकाळी या लढाईस सुरूवात झाली आणि ती दीड दिवस चालली. त्यात १४ ब्रिटीश अधिकारी ठार झाले. ही लढाई झाली तेव्हा आप्पासाहेब भोसले हे नागपूरचे राजे होते. आणि बहाद्दर मनगट उपाध्ये व त्यांच्या अरब सैन्याने त्यावेळी इंग्रजांना धूळ चारली. सक्करदरा, तुळशीबाग, शुक्रवारदरवाजा येथेही चकमकी झाल्या.
हा किल्ला आणखी एका दुर्दैवी घटनेचा साक्षीदार आहे. १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात क्रांतीकारक याच किल्ल्यावरील इंग्रज ठाण्यावर हल्ला करणार होते. परंतु त्यांचे हे कारस्थान उघडकीस आले. आठ क्रांतीकारकांना किल्ल्यातच फाशी देण्यात आली. एवढ्यावरच इंग्रज थांबले नाहीत तर नागपुरातील जनतेला दहशत बसावी म्हणून क्रांतीकारकांचे मृतदेह बरेच दिवस शुक्रवारी दरवाजावर टांगून ठेवण्यात आली होते. टिपू सुलतानाच्या नातवांना देखील येथे फाशी दिल्याचं सांगितलं जातं. १९११ साली इंग्लंडचे पाचवे जॉर्ज यांनी येथून जनतेस उद्देशून भाषण केले होता ते स्तंभ आजही दिसतो.
सीताबर्डीची प्रसिद्ध लढाई
आता आपल्याला जो डौलदार किल्ला दिसतो त्या मुळात दोन साध्या टेकड्या होत्या. १४ व्या शतकात या टेकड्यांवर गवळ्यांची वस्ती होती. त्यांच्या उभय अंगास शीतला प्रसाद आणि बद्री प्रसाद या गवळी लोकांचे तांडे होते. त्यांच्या नावावरुनच या टेकडीला सीताबर्डी (शीतल बद्री- शीतल बर्डी- सीताबर्डी) असे नाव पडले. याचा पुरावा फारसी ग्रंथात मिळतो.
या भागात भोसलेंचा प्रवेश झाला तेव्हाही येथे टेकड्यात होत्या. भोसले आले ते १७०७ साली. श्रीमंत शाहु महाराजांनी ( छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र) राजे परसोजी भोसले यांना सेनासाहेबसुभा हे पद बहाल केले तेव्हापासून या क्षेत्राशी भोसलेंचा प्रत्यक्ष संबंध आला. पुढे १७३६ साली भोसले नृपतींचा चंचुप्रवेश झाला. भोसले काळात (इ.स. १७४० ते १८९९) राजे व सरदार घराण्यातील कुटुंबीय आरोग्याच्या दृष्टीने बदल म्हणून येथे राहत असत. सुरूवातीला येथे किरकोळ बांधकाम आणि मंदिराचे कळस होते. पुढे द्वितीय रघुजी महाराज भोसले यांनी येथे लष्करी बाण, अग्निबाण आदी साहित्य ठेवण्यासाठी कोठार बनवले. पण तरीही त्याचे रुपांतर लष्करी संरक्षक वास्तु अर्थात किल्ल्यात झाले नव्हते.
प्रत्यक्षात या किल्ल्याचे बांधकाम इ.स. १८२२ साली कर्नल ॲडम नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने हाती घेतले. त्याने टेकडीचा पूर्व आणि दक्षिण भाग सरळ काटकोनात छिलून संरक्षण भिंती बांधल्या. आणि किल्ला उभा झाला. आज या ठिकाणी प्रादेशिक सेनेचे ठाणे आहे. समोर कस्तुरचंद पार्क आहे.
केव्हा जायचे | How to go to Sitabuldi Fort Nagpur
हा किल्ला दररोज पर्यटकांसाठी खुला नाही. केवळ २६ जानेवारी, १ मे आणि १५ ऑगस्टला येथे प्रवेश मिळतो. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत तुम्ही जाऊ शकता.
कसे पोहोचाल
बसने आरबीआय चौकात उतरल्यावर पायी चालत पाच मिनिटात किल्ल्याजवळ पोहोचता. कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनपासून १० मिनिटे लागतील. रिक्षानेपण जाऊ शकता. तो सहज मिळतो. विशेष म्हणजे पर्यटन विभागाद्वारे येथे शाळकरी विद्यार्थ्यांसाठी सहलींचे आयोजन केले जाते
🤔🤔इतक्या मोक्क्याच्या ठिकाणी भोसले राजांनी किल्ला का बांधला नसावा असा प्रश्न इतिहासकारांना पडतो.
🤔🤔इतक्या मोक्क्याच्या ठिकाणी भोसले राजांनी किल्ला का बांधला नसावा असा प्रश्न इतिहासकारांना पडतो.
कंमेंट्स मध्ये तुमचे मत नक्की कळवा!
Comments
Post a Comment
कमेंट करून संवादात सहभागी व्हा!