चंद्रपुरातील पाषाणयुगीन मानवाचे गाव माहिती आहे का? ‘बोर’ नावाचे मूळ गाव सापडले | Chandrapur Stone Age Discovery | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism | Incredible India

पुरातत्त्व संशोधन आणि पर्यटनाला मिळणार नवी दिशा

चंद्रपूर म्हटले की गोंड राजांची राजधानी, किल्ला आणि मध्ययुगीन इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो. मात्र येथील इराई आणि झरपट नदीच्या संगमाजवळील ‘बोर रीठ’ या स्थळावरील संशोधनामुळे चंद्रपूरचा इतिहास आणखी हजारो वर्षे मागे जात असल्याचे संकेत मिळत आहेत. इतिहास अभ्यासक व संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांच्या संशोधनानुसार या परिसरात पाषाणयुग, सातवाहन, वाकाटक आणि यादव काळातील मानवी वस्तीचे पुरावे आढळले आहेत. या दाव्यांची अधिकृत पुरातत्त्वीय पडताळणी आणि उत्खनन झाल्यास चंद्रपूरच्या इतिहासाला नवे परिमाण मिळू शकते. त्याचबरोबर हे स्थळ विदर्भातील महत्त्वाचे पुरातत्त्वीय पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्याचीही मोठी संधी आहे. या संशोधनाबद्दल प्रा. सुरेश चोपणे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊ.

इराई–झरपट संगम परिसराचा पुरातत्त्वीय वारसा

चंद्रपूर हे महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातील एक प्राचीन आणि ऐतिहासिक शहर आहे. नैसर्गिक संपत्ती, सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक परंपरा यामुळे या शहराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वर्धा, वैनगंगा आणि इरई नदीच्या परिसरात वसलेले हे शहर प्राचीन काळापासून मानवी वस्तीचे केंद्र राहिले आहे.

Stone Age Vessels in Chandrapur

प्राचीन काळात हा प्रदेश दक्षिण भारत आणि मध्य भारत यांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गांवर असल्यामुळे व्यापार, संस्कृती आणि धर्म यांची देवाणघेवाण येथे होत असे. सातवाहन, वाकाटक आणि राष्ट्रकूट यांसारख्या राजघराण्यांच्या प्रभावाखाली हा प्रदेश काही काळ होता. या काळात शेती, व्यापार, धार्मिक स्थळे आणि सांस्कृतिक जीवनाचा विकास झाला. वेळोवेळी झालेल्या संशोधनातून या शहराच्या प्राचीनतेबाबत आजवर अनेक रोचक खुलासे झाले आहेत.

संशोधनाच्या याच श्रृंखलेत आता चंद्रपुरातील इराई आणि झरपट नदीच्या संगमाजवळ पूर क्षेत्राच्या बाहेर अतिप्राचीन गावाचे संशोधन करताना बोर नावाचे मूळ चंद्रपूरचे एक नष्ट झालेले गाव आढळले आहे. एक इतिहास अभ्यासक म्हणून मी या ठिकाणी अनेक दिवसांपासून अभ्यास करीत होतो. यातून मी अशा निष्कर्षाप्रत पोहोचलो  की, संगमाजवळ आढळलेले हे प्राचीन गाव १० हजार वर्षांपूर्वीचे पाषाण युगीन आदीमानव, २ हजार वर्षांपूर्वीचे सातवाहन, वाकाटक आणि यादव काळातील असावे. आज हे गाव बोर रिठ म्हणून गावकऱ्यांना माहिती असून ते गवळी गाव असेल असे त्यांना वाटते. परंतु माझ्या संशोधनात तिथे १० हजार वर्षापूर्वीची पाषाणयुगीन अवजारे, ३ हजार वर्षादरम्यानच्या दगडांच्या वस्तू, २ हजार वर्षांपूर्वीची मडकी, प्राण्यांची हाडे, दात आणि लोह वितळणाऱ्या भट्टीचे लोह खडक आढळले आहेत.

मंदिराचे अवशेष | Temple Remains in Chandrapur

Temple Remains in Chandrapur

येथे प्राचीन काळात एक मंदिर होते. त्यातील दोन शिवलिंग आणि मंदिराचे काही अवशेष सुद्धा तिथे पडलेले असून हनुमान मंदिर अलीकडच्या काळातील बांधलेले आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी यापूर्वी येथे प्राचीन नाणी आणि अलंकार सापडल्याची माहितीही दिली आहे. या परिसरात आज शेती होत असली तरी अनेक ठिकाणी जुन्या बांधकामांचे (घरांचे) ढिगारे आणि मातीचे उंचवटे दिसून येतात. त्यामुळे येथे पूर्वी मानवी वस्ती अस्तित्वात असावी, अशी शक्यता बळावते. अजून उत्खनन केल्यास अनेक पुरावे मिळू शकतात, असे माझे ठाम मत आहे. मी पुरातत्व विभाग आणि इतिहास अभ्यासकांना इथे अभ्यास करण्याचे निमंत्रण सुद्धा दिलेले आहे.

इराई आणि झरपट या नद्या प्राचीन काळापासून मानवी वस्तीला पोषक ठरल्या असाव्यात. दाताळा, नागाळा, देवाडा, आरवट तसेच पापामिया टेकडी परिसरातही प्रागैतिहासिक आणि प्राचीन संस्कृतीचे संकेत देणारे अवशेष आढळतात. या सर्व स्थळांचा एकत्रित अभ्यास केल्यास चंद्रपूर परिसरातील मानववस्तीचा इतिहास हजारो वर्षे मागे नेणारे पुरावे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 'बोर रिठ' येथे पाषाणयुगापासून सातवाहन, वाकाटक आणि यादव काळापर्यंतच्या विविध कालखंडांतील पुराव्यांचे संकेत आढळत असल्याने हे स्थळ संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते.

५० हजार वर्षापासून मानवाची वस्ती

झरपट आणि इराई नदीच्या काठावर पाषाणयुगीन काळात, मध्य पाषाण युगात ५० हजार वर्षापासून मानवाची वस्ती होती. पुढे ५ हजार वर्षांपासून येथे आदिवासी वस्ती करून राहायला लागले. पूर्वी सर्वत्र बारमाही नद्यांजवळच गावे असायची. ३ हजार वर्षांपूर्वी झरपट नदीजवळ पापामिया टेकडीजवळ(आजचे मेडिकल कॉलेज) गाव होते. इराई नदीजवळ आजच्या आरवट गावाजवळ, होमिओपॅथी कॉलेजजवळ तसेच पठाणपुरा गेटच्या जवळ केवळ १.२ किमी अंतरावर आणि संगमापासून १ किमी अंतरावर बोर रीठ आहे. संगमाजवळ सुद्धा एक माना गाव होते. बहुदा लालपेठ, बाबूपेठ कदाचित ह्याच गावांना हिंदू काळात लोकपूर आणि इंदूपूर म्हणत असावे. चंद्रपूर जिल्ह्यात गोंड राजांपूर्वी भद्रावती आणि भटाडा हे सर्वात मोठे गाव आणि व्यापार केंद्र होते, तसेच चंद्रपूर येथे सुद्धा पूर क्षेत्राच्या बाहेर आदिवासी गावे, हिंदू गावे होती.


Stone Age Vessels in Chandrapur

पाषाणयुगीन वस्ती

चंद्रपूर शहराचा इतिहास पाहिल्यास लक्षात येते की, इराई आणि झरपट या दोन नद्यांमुळे येथे मोठ्या संख्येने पाषाणयुगीन आदिमानव राहत होते. दाताळा, नागाळा, देवाडा आणि आरवट ह्या सर्व क्षेत्रात देशातील सर्वात मोठे पाषाणयुगीन स्थळ असून इथे मला सर्वाधिक पाषाणयुगीन अवजारे सापडली आहेत. त्याच प्रकारे झरपट नदीच्या आधारे पापामियाजवळ दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पाषाणयुगीन स्थळ आढळले. इथेसुद्धा एक गाव होते कारण ह्याच ठिकाणी शिवलिंग आणि हत्तीचे शिल्प मला सापडले आहे. या वस्त्या पाच ते दोन हजार वर्षादरम्यान तयार झाल्या.

सातवाहन ते यादव काळ

आजच्या चंद्रपूर जवळील प्राचीन वस्ती हे बोर रिठ आहे. कारण इथे एकाच ठिकाणी पाषाण युगीन अवजारे, २००० वर्षापूर्वीचे सातवाहनकालीन पुरावे, दीड हजार वर्षांदरम्यानचे वाकाटक आणि बाराव्या शतकानंतरचे यादव कालीन पुरावे आढळले आहेत. त्यावरुन बोर रिठ हे सर्वाधिक प्राचीन आणि आजच्या चंद्रपूर शहराचे मूळ गाव आहे असे पुराव्या वरून कळते. प्राचीन काळात चंद्रपूर परिसरावर सातवाहन, वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट यांसारख्या अनेक राजघराण्यांचा प्रभाव होता. वाकाटकांच्या काळात विदर्भात कला, साहित्य आणि धर्म यांची मोठी भरभराट झाली. या काळात बौद्ध, जैन आणि हिंदू धर्मांचा प्रभाव या प्रदेशात वाढला. परिसरात मंदिरे, शिलालेख आणि धार्मिक केंद्रांची निर्मिती झाल्याचे पुरातत्त्वीय पुरावे उपलब्ध आहेत.

गोंड राजे ते भोसले

चंद्रपूरच्या इतिहासात गोंड राजांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. तेराव्या शतकात गोंड राजा खांडक्या बल्लाळशाह यांनी चंद्रपूर शहराची स्थापना केली आणि येथे राजधानी वसवली. त्यांनी शहराभोवती मजबूत दगडी तटबंदी, भव्य प्रवेशद्वारे आणि किल्ल्याची उभारणी केली. आजही चंद्रपूरचा किल्ला, तटबंदी आणि ऐतिहासिक दरवाजे गोंड स्थापत्यकलेची साक्ष देतात. गोंड राजांच्या कारकीर्दीत कला, संस्कृती, प्रशासन आणि व्यापार यांचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला.

अठराव्या शतकात मराठ्यांनी चंद्रपूरवर सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर ब्रिटिश काळात शहराचा प्रशासकीय आणि औद्योगिक विकास झाला. कोळशाच्या खाणी, जंगलसंपत्ती आणि वाहतूक व्यवस्था यांमुळे चंद्रपूरचे आर्थिक महत्त्व वाढले. स्वातंत्र्यानंतर हे शहर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रांपैकी एक बनले.

गोंडकालीन, भोसले आणि ब्रिटिशकालीन इतिहास आज माहिती असला तरी चंद्रपूरचे मूळ गाव हे बोर रिठ हेच असल्याचे पुरावे मला मिळाले आहेत. आज मी ज्या पद्धतीने ग्रामीण भागात शोध आणि संशोधन करीत आहे त्यावरून अनेक नवी माहिती आणि नवे पुरावे मिळत आहेत.

पर्यटनासाठी नवे आकर्षण | Heritage Tourism Opportunity in Chandrapur

आज चंद्रपूरमध्ये येणारे बहुतांश पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्प, प्राचीन किल्ला आणि धार्मिक स्थळांना भेट देतात. भविष्यात 'बोर रिठ' आणि इराई–झरपट संगम परिसराचा पुरातत्त्वीय वारसा जतन करून त्याचा विकास करण्यात आला, तर हे ठिकाण इतिहास, पुरातत्त्व आणि निसर्ग यांचा संगम असलेले एक वेगळे पर्यटनस्थळ बनू शकते.

तुमचे मत कमेंटमध्ये लिहा आणि मित्रांसोबत शेअर करा.

प्रा. सुरेश चोपणे
इतिहास अभ्यासक आणि संशोधक
चंद्रपूर

Comments

🔍 शोधा
लेख लोड होत आहेत...
🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
💡
आजचा मराठी शब्द by WhatsUp मराठी
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|Eg. तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|Eg. त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|Eg. डोंगरातील पाणी नितळ आहे.
तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|Eg. तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|Eg. सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
ओंजळ|हाताचा कप्पा|देशज मराठी|हातभर|Eg. त्याने ओंजळीत पाणी घेतले.
हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|Eg. हळुवार वारा वाहत होता.
मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|Eg. तिचा आवाज मंजुळ आहे.
मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|Eg. मृद्गंध दरवळला.
आभाळमाया|असीम प्रेम|देशज मराठी|अपार माया|Eg. आईची आभाळमाया विसरता येत नाही.
धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|Eg. तो संगीतात धुंद झाला.
झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|Eg. थंड झुळूक आली.
नभ|आकाश|संस्कृत|गगन|Eg. नभ निरभ्र होते.
उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|Eg. त्याला आनंदाचा उमाळा आला.
साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|Eg. ती साजिरी दिसत होती.
गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|Eg. फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|Eg. सूर्याचा कवडसा पडला.
जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|Eg. गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|Eg. गाण्याची लय सुंदर होती.
कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|Eg. कोमेजलेली फुले दिसत होती.
दरवळ|मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|Eg. चाफ्याचा दरवळ पसरला.
सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|Eg. सावळ्या ढगांनी आकाश भरले.
सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|Eg. तिचा चेहरा सतेज दिसत होता.
मधुमालती|सुगंधी वेल|संस्कृत|फुलवेल|Eg. अंगणात मधुमालती फुलली होती.
गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|Eg. कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
हुरहूर|मनातील ओढ|देशज मराठी|व्याकुळता|Eg. जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|Eg. गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|Eg. धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|Eg. पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|Eg. दिव्याची ज्योत लवलवत होती.
उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|Eg. तरुणांमध्ये उमेद आहे.
गोजिरी|नाजूक सुंदर|देशज मराठी|साजिरी|Eg. गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|Eg. आंब्याला मोहोर आला आहे.
सुगंधी|सुगंध असलेले|संस्कृत|दरवळते|Eg. सुगंधी फुले बहरली.
अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|Eg. गावचा चहा अमृततुल्य लागतो.
झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|Eg. घंटांचा झंकार झाला.
सहजसुंदर|नैसर्गिक सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|Eg. तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|Eg. आसमंत शांत होता.
सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|Eg. सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|Eg. डोंगरातून निर्झर वाहत होता.
नादमय|संगीतपूर्ण|संस्कृत|सुरेल|Eg. सभागृह नादमय झाले.
मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|Eg. मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|Eg. संगीताचे स्पंदन जाणवत होते.
चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|Eg. वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|Eg. मृदुल वाळूवर पावले उमटली.
अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|Eg. ती अलवार हसली.
स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|Eg. पक्षी स्वैर उडत होते.
सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|Eg. फुलांची सुरभि दरवळली.
दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|Eg. तिच्या डोळ्यांत दीप्ती होती.
प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|Eg. अंगणात प्राजक्त फुलला होता.
निरभ्र|पूर्ण स्वच्छ|संस्कृत|ढगविरहित|Eg. निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.

अजून इंटरेस्टिंग...

फणिंद्रपुरातील संतमहात्म्यांची समाधीस्थळं तुम्ही बघितली काय? | Author: Mrunalini Waghmare | Samadhis in Old Nagpur | Vidarbha Tourism

पचमढीत राजेंद्रगिरीवर 'मक्के की रोटी और टमाटर की चटनी' !! | Author: Amit Naseri | Pachmarhi Travel Experience | Incredible India

आळंदी : ज्ञानेश्वर आणि महाराष्ट्राने घडवलेली भक्तीची क्रांती | Alandi & Bhakti Movement in India | Author: Raajan | Temples in Maharashtra | Maharashtra Tourism

दुष्काळाच्या पलीकडचा मराठवाडा: पावसाळ्यात खुलणारे अनोखे पर्यटनविश्व | Author: Dr. Mrunalini Fadnavis | Marathwada Tourism | Maharashtra Tourism

चंद्रपूरच्या जंगलात दडलेले गायमुख श्री महादेव मंदिर | नरेंद्र चांदेवार | Gaaymukh Shri Mahadev Mandir | Author: Narendra Chandewar | Temples in Vidarbha | Temples in Maharashtra

गोठवणाऱ्या थंडीत आयफेल टॉवरचा अद्‌भूत नजारा... पुस्तकांच्या पलीकडे, जगाच्या जवळ | Author: Yash Naseri | Eiffel Tower Paris | International & Global Tourism

भगवद्गीतेच्या एका श्लोकाने घडवलेला इतिहास; ओपेनहायमर आणि ट्रिनिटी टेस्ट | मॅनहॅटन प्रोजेक्ट न्यू मेक्सिको | Author: Raajan | Trinity Site, New Mexico | First Nuclear Bomb Test 1945 | Manhattan Project

कोराडीचे महालक्ष्मी जगदंबा मंदिर : धार्मिक पर्यटन आणि विकासाचा नवा अध्याय | Author: Ram Bhakre | Koradi Mahalaxmi Jagdamba Temple | Temples in Vidarbha | Temples in Maharashtra

‘ये है मुंबई मेरी जान’ अनुभवांची अखंड सफर | Author: Himgauri Deshpande | Yeh Hain Mumbai Meri Jaan | Maharashtra Tourism | Incredible India

नागपुरातील मोहिते वाडा : संघ शाखेची जन्मभूमी | Author: Amol Pusadkar | Mohite Wada, Birthplace of the Rashtriya Swayamsevak Sangh | Heritage Tourism | Maharashtra Tourism