Posts

विशेष...

विदर्भ अष्टविनायक | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide | Temples near Nagpur | Temples of Vidarbha

Image
🕉️ विदर्भ अष्टविनायक | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide वि दर्भ म्हटलं की डोंगररांगा, किल्ले , जंगलं आणि समृद्ध संस्कृती डोळ्यासमोर येते. पण याच विदर्भात गणरायाची अनेक प्राचीन आणि जागृत मंदिरं आहेत. पश्चिम महाराष्ट्रात अष्टविनायक यात्रा प्रसिद्ध आहे; तसंच विदर्भातही भक्तिभावाने ओळखली जाणारी ‘विदर्भ अष्टविनायक यात्रा’ आहे. ही यात्रा श्रद्धा, इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि चंद्रपूर परिसरात विखुरलेली ही गणेश मंदिरं भक्तांना आध्यात्मिक समाधान देतात. विदर्भ अष्टविनायक | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide 📿 विदर्भातील अष्टविनायक मंदिरांची यादी | List of Vidarbha Ashtavinayak श्री विघ्नेश (आदासा) – नागपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि भव्य स्वयंभू गणेशमूर्ती. चिंतामणी (कळंब) – भक्तांच्या चिंतेचा नाश करणारे प्राचीन स्थान. सिद्धीविनायक (केळझर) – डोंगरमाथ्यावर वसलेले शांत आणि निसर्गरम्य गणेश मंदिर. सर्वतोभद्र (पवनी) – वैणगंगा नदीकाठी असलेले ऐतिहासिक आणि पवित्र स्थान. वरदविनायक (भद्रावती) – हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील प्राचीन गणेश मंदिर...

होर्मुझची सामुद्रधुनी – समुद्र, इतिहास आणि आजचा तणाव | Strait of Hormuz Travel Guide in Marathi | Iran-Israel-USA War

Image
1. समुद्राच्या अरुंद वाटेतलं जगाचं प्रवेशद्वार | Gateway Between Seas – Strait of Hormuz पर्शियन आखातातून बाहेर पडताना समुद्र अचानक अरुंद होतो. एका बाजूला इराणचे डोंगर , तर दुसऱ्या बाजूला ओमानचा मुसंदम द्वीपकल्प . या दोन भूभागांच्या मधील समुद्री मार्ग म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) . जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री मार्गांपैकी ही एक मानली जाते. पर्शियन आखातातील तेल आणि गॅस जगभर पोहोचवण्यासाठी ही वाट अत्यंत महत्त्वाची आहे. समुद्रातून प्रवास करताना येथे मोठमोठे तेलवाहू टँकर, मालवाहू जहाजे आणि स्थानिक मच्छीमार बोटी दिसतात. शांत दिसणाऱ्या या समुद्रातून प्रत्यक्षात जगाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा प्रवाह वाहत असतो. Strait of Hormuz | Iran-Israel-USA War 2. इतिहास, व्यापार आणि पर्शियन किनाऱ्यांची कहाणी | History and Maritime Trade of Persia हजारो वर्षांपासून या समुद्री मार्गावरून पर्शियन, अरब आणि भारतीय व्यापारी प्रवास करत होते. मसाले, रेशीम, मोती आणि इतर वस्तूंचा व्यापार या मार्गाने होत असे. पर्शियन आखातातील अनेक बेटांवर अजूनही त्या जुन्या व्यापार संस्क...

टेकडीचा गणपती | Tekdi Ganesh Temple Nagpur | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide | Temples near Nagpur | Temples of Vidarbha

Image
विदर्भ अष्टविनायक | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide वि दर्भाच्या अष्टविनायकातील पहिला समजला जातो, तो नागपूरचा टेकडी गणेश. नागपूरकरांचे हे आराध्य दैवत आहे. रेल्वे स्थानकाला लागून सीतबर्डी टेकडीवर हे गणेशाचे मंदिर आहे. त्यामुळे या गणेशाचे नाव ‘टेकडी गणेश’ असे रूढ झाले. भोसले राजे आणि ब्रिटिशांची लढाई ज्या ठिकाणी झाली, त्याच ठिकाणी हे गणपतीचे मंदिर आहे. सुरुवातीला मंदिर छोटेसे होते, आता त्याचा विकास झाला आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला असले, तरी मूर्ती उत्तराभिमुख आहे. गणपतीच्या मूर्तीच्या पाठीमागील भिंतीला लागून एक शिवलिंग आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगाच्या ठिकाणी नंदी बसवलेला दिसतो. असे सांगतले जाते की, १८६६ मध्ये येथील टेकडी फोडून रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरू होते. त्यावेळी खोदकाम करताना कामगारांना गणेशाची शेंदूरचर्चित मूर्ती सापडली. कामगारांना ही मूर्ती दिसली त्यावेळी अचानक आकाश भरून आले व विजांचा कडकडाट सुरू झाला. कामगारांनी तेथून मूर्ती काढून एका पिंपळाच्या झाडाखाली तिची प्राणप्रतिष्ठापना केली. तेव्हापासून या मूर्तीची पूजाअर्चा सुरू आहे. १८६५ मधील नागपूरच्या नकाशात...

पंचानन गणेश | Panchmukhi Ganpati Pauni | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide | Temples near Nagpur | Temples of Vidarbha

Image
विदर्भ अष्टविनायक | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide भं डारा जिल्ह्यातील वैनगंगेच्या तीरावरील पवनी नामक ऐतिहासिक शहरात विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक पंचमुखी गणेश मंदिर आहे. यालाच पंचानन, सर्वतोभद्र, धुंडीराज गणेश म्हणूनही संबोधले जाते. भंडारा शहरापासून ५० आणि नागपूरहून ८७ किलोमीटर अंतरावर, केवळ विदर्भाच्याच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात प्राचीन स्थळ असा लौकिक असलेले पवनी हे स्थळ आहे. हे गाव पुरातन काळापासून बौद्ध आणि हिंदू धर्मीयांसाठी उपासनेचे केंद्र राहिले आहे. विदर्भातील काशी म्हणून ते ओळखले जाते. Panchmukhi Ganpati Pauni | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide या मंदिरातील गणेशाची मूर्ती शमी वृक्षात कोरलेली असल्याचे मानले जाते. मात्र, ही मूर्ती १०व्या शतकातील असून,ती दगडावर कोरलेली असल्याचे काही इतिहासतज्ज्ञ सांगतात. एकाच शिळेवर चारही बाजूने श्रीगणेशाची प्रतिमा कोरलेली आहे व पाचवी प्रतिमा नैऋत्य दिशेला आहे. या मूर्तीची उंची ३२ इंच आहे व पूर्व-पश्चिम लांबी १७ इंच, उत्तर-दक्षिण रुंदी १५ इंच आह़े उत्तर-पूर्व व दक्षिण दिशेला असणाऱ्या गणेशाची सोंड डाव्या बाजूला आहे. ...

एकचक्रा गणेश | Ekachakra Siddhivinayak Ganesh Temple Kelzar | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide | Temples near Nagpur | Temples of Vidarbha

Image
विदर्भ अष्टविनायक | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide रा मायण महाभारतातील अनेक घटनांना विदर्भभूती साक्ष आहे. वर्धा जिल्ह्यातील केळझर त्यापैकीच एक. या केळझर गावी टेकडीवर श्री सिद्धीविनायकाचे मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास फार प्राचीन आहे. हे केळझर म्हणजे महाभारतातील एकचक्रा नगरी. इथेच कुंतीपुत्र पांडव वास्तव्याला असताना बकासूर नावाच्या राक्षसाचा भीमाने वध केला.बकासुराचा वध केल्यावर पांडवांनी शेजारच्या टेकडीवर जाऊन श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली. तोच हा एकचक्रा गणेश. तर हे मंदिर प्रभू श्रीरामाचे गुरू वसिष्ठ ऋषींनी पूजेकरिता निर्माण केल्याचीही आख्यायिका आहे. प्रभू श्रीरामाच्या जन्मानंतर वशिष्ठ ऋषींनी हे गाव सोडल्याचंही सांगितलं जातं. याच काळात वर्धा नदीच्या निर्मितीचा देखील उल्लेख आहे. पुराणाप्रमाणे या गणपतीचे नाव वरद विनायक आणि वर्धा नदीचे नाव वरदा असल्याचे कळते.  Ekachakra Siddhivinayak Ganesh Temple Kelzar | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide नवसाला पावणारा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे. उजव्या सोंडेचा, चतुर्भुजा अशा या प्रसन्नचित्त विनायकाची मूर्ती ४ फूट ६ इंच उंच असून तिचा व्यास १...

वरदविनायक श्री गवराळा गणपती | Shree Varad Vinayak Ganesh Temple Gaurala | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide | Temples near Nagpur | Temples of Vidarbha

Image
विदर्भ अष्टविनायक | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide वि दर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती गावात दक्षिण दिशेला निसर्गाची मनमुराद उधळण असलेल्या टेकडीवर श्री गवराळा गणपतीचं मंदिर आहे. हजारो वर्षांची परंपरा असलेलं हे अतिशय पुरातन देवालय आहे. यातील गणेशमूर्ती द्विभुज आहे. ती इतकी भव्य आहे की मंदिराच्या दरवाजातूनच आपण पूर्ण गणेश दर्शन घेऊ शकत नाही. Shree Varad Vinayak Ganesh Temple Gaurala | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide प्राचीन काळात दक्षिण कोसल राज्याची राजधानी असलेलं भद्रावती किंवा भांदक हे शहर आज बौद्ध, जैन आणि हिंदू धर्मीयांचे पवित्र क्षेत्र आहे. ह्युएन त्संग (युआन श्वांग) या चिनी प्रवाशाने सातव्या शतकाच्या पूर्वार्धात भद्रावतीला भेट दिल्याचे उल्लेख आहेत. भद्रावतीच्या दक्षिणेला तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गवराळा गावातील आसन तलावाजवळच्या टेकडीवर काळ्या पाषाणात बांधलेलं वरदविनायकाचं मंदिर आहे. वरदविनायकाचं हे प्राचीन मंदिर जागृत देवस्थान म्हणून विदर्भात प्रसिद्ध असून तो विदर्भातल्या अष्टविनायकांपैकी एक आहे. या मंदिरात गणपतीची साडेपाच ते सहा फूट उंचीची भव्य एकपाषाणी मूर्ती आहे. ह...

श्रीभृशुंड गणेश | Shri Bhrushund Ganesh Temple | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide | Temples near Nagpur | Temples of Vidarbha

Image
विदर्भ अष्टविनायक | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide श्रीभृशुंड गणेश श्री भृशुंड गणेश मूर्तीचा इतिहास फारच प्राचीन आहे. भंडारा शहरापासून पूर्वेला तुमसर मार्गाला लागले की अवघ्या तीन किलोमीटरवरच मेंढा नावाचं गाव आहे. याच गावात इ.स. पूर्व ११ व्या शतकात भृशुंड ऋषींनी या गणेशाची स्थापना केली, अशी आख्यायिका आहे. आजचं मेंढा गाव म्हणजे पूर्वीचं नागांचं पद्‌मपूर राज्य. भृशुंडी ऋषी नाग वंशातीलच. त्यांनी स्थापन केलेली ही मूर्ती बघता क्षणीच थोडी चमत्कारीक वाटते. कारण या मूर्तीच्या मुखमंडळाच्या जागी मानवी नाकपुड्या,डोळे आणि किंचित दाढीमिशाही आढळतात. त्यामुळे ही गणेश मूर्ती दुर्मिळ ठरते. श्रींच्या वेगळ्या रुपामुळेच भाविकांमध्ये ही गणेश मूर्ती लोकप्रिय आहे. अखंड रक्ताश्म शीळेवर कोरलेली ही मूर्ती गाभाऱ्यात तळापासून आठ फूट उंच व चार फूट रूंद आहे. पूर्ण सिंदूर चर्चित मूर्ती चतुर्भूज असून मूशकारूढ आहे. उजवा पाय खाली सोडलेला व डाव्या पायाची मांडी घातलेली मूर्ती आहे. चारही हातांमध्ये पाश, अंकूश, मोदक असून उजवा वरद हस्त आहे. शिरोभागी पंचमुखी शेषफणा आहे. भृशुंड गणेशाचं मंदिर हेमाडपंथी आहे. मूर्तीची स्थाप...

अष्टादशभुजा गणपती | Ashtadashbhuja Ganpati | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide | Temples near Nagpur | Temples of Vidarbha

Image
विदर्भ अष्टविनायक | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide अष्टादशभुजा गणपती प्रभू श्रीरामाच्या पदकमलांनी पवित्र झालेल्या रामटेकजवळच्या शैवल्य पर्वतावर अष्टादश भुजा गणपती विराजमान आहेत. हा शैवल्य पर्वत म्हणजे शम्बूक ऋषींचं आश्रयस्थान. या पर्वतावर विद्याधराची संस्कृती होती. अठरा विश्वाच्या विज्ञानाचे ज्ञान असलेल्या या विद्याधराची दृष्टीच या अठरा भुजा गणपतीत आढळते. अभय हस्त व मोदक हस्त वगळता मूर्तीच्या प्रत्येक हातात अंकुश, पाश, खटवांग, त्रिशूळ अशी शस्त्रं आहेत. या देवळाचा घुमट भोसलेकालीन असला तरी मूर्ती ५०० वर्षांपूर्वीची आहे. विशेष म्हणजे गणेशाची मूर्ती प्रामुख्याने चार हातांतीच असते. पण ही मूर्ती मात्र दुर्गेसारखी अष्टादश भुजा आहे. साडेचार ते पाच फूट उंचीची ही मूर्ती पांढऱ्या दगडापासून (संगमरवर) बनविलेली असून, या मूर्तीची सोंड दोन्ही बाजूंना वळलेली आहे.हे मंदिर रामटेक गडाच्या पायथ्याशी आहे. मंदिरात महागणपतीच्या मध्यभागी रिद्धी-सिद्धी आणि गणेशजींच्या हातात शस्त्रे आहेत. ही मूर्ती साधारण अकराव्या किंवा बाराव्या शतकातील असावी, असं मानलं जातं. अष्टादशभुजा गणपती | Ashtadashbhuja Ganpati | Vida...

राजोलीचा नागवंशीय किल्ला | Rajoli Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

Image
विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha बस्तर-चंद्रपूर क्षेत्रात प्राचीन काळापासून नावंशींचे राज्य होते. राजोली हे गाव चंद्रपूर जिल्ह्यातील मुल गावापासून इशान्येस १६ किमी अंतरावर आहे. या गावाच्या दक्षिणेला असलेल्या डोंगरावर हा दुर्ग असून केवळ भग्न खिंडारे आणि जीर्ण स्थापत्य शिल्लक आहे.माना सरदाराने हा किल्ला गावाचे संरक्षण म्हणून बांधला असावा. आज हा किल्ला इतिहासजमा झाला आहे. कालचक्राच्या गतीनुसार या किल्ल्याची आवश्यकता राहिलेली नाही. येथे माणसाचा वावर नाही. Reference Pic: Rajoli Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha कंमेंट्स मध्ये तुमचे मत नक्की कळवा ! असेच नवीन अनुभव व माहिती करिता आमच्या चॅनेल ला क्लिक करून फॉलो करा!

गडबोरी किल्ला | Gadbori Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

Image
विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha चं द्रपूर- नागभीड रस्त्यावर सिंदेवाही फाट्यापासून ९ किमी अंतरावर  गडबोरी  नावाचे गाव आहे. हे गावच डोंगरावर असून पायथ्याशी एक प्राचीन मंदिर आहे. पठारावर सर्वत्र बांधकामाची खिंडारं उभी आहेत. तेथेच श्री केशवनाथाचे छोटेखानी मंदिर आहे. १७३४ साली येथील मोकासदाराने चंद्रपूरच्या गोंड राजाविरुद्ध बंड पुकारले. राजाने सेमाजी ढुम्यास किल्ल्यावरील बंड मोडून काढण्यास पाठविले. येथे हाताघाईची लढाईही झाली. याच ढुम्यास राजाने (रामशहा) पुढे  गडबोरीची  रचना केली. जवळच नवरगाव नावाचे गाव आहे. त्याची सनद आपला मुलगा नारायण याच्या नावे केली.  Reference Pic: Gadbori Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha या क्षेत्रात गोंड काळात मोकासदारी व फौजदारी शासन व्यवस्था राबविण्यात आली. असेच नवीन अनुभव व माहिती करिता आमच्या चॅनेल ला क्लिक करून फॉलो करा!

पितरांचा किल्ला द्रुग | Pitarancha Drug Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

Image
विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha य वतमाळ जिल्ह्यातील श्री कळंब- चिंतामणी या विदर्भातील अष्टगणेश स्थानांपैकी एक अशा एका गावाजवळ केवळ ११-१२ किमीवर घनदाट अरण्यात एक किल्ला लपलेला असून त्याचे नाव द्रुग-दुर्ग आहे. दुर्गम भाग आणि घनदाट जंगलांमुळे मानव इकडे फिरकत नाही. हा किल्ला पितरांचा असून कुणी धाडसी इकडे गेला की भूतखेत त्याला पळवून नेतात अशी धारणा जनमनात निर्माण झाली. हा किल्ला म्हणजे मध्यम उंचीवरील काळ्याशार दगडांची तटबंदी आहे.बंदुकी व टेहळणीसाठी गवाक्ष, बुरुज प्रवेशद्वार आणि तेलातुपाचे रांजण असे पुरावशेष आहेत. तटावरुन नजर फिरविताना किल्ल्याभोवती अष्टदळाकृती खंदक दिसतो. किल्ल्याच्या पायथ्याशी यक्षराज कपीमुखी हनुमंताचे मंदिर आहे. हा किल्ला इ.स. १५-१६ व्या शतकात बांधला असावा. माहुरच्या उदाराम देशमुख या राजवंशाच्या अधिपत्याखाली हे स्थान असावे,असा तर्क आहे. तुरुंगसदृष्य अशी या किल्ल्याची रचना आहे. जलाशयाचे शुष्क क्षेत्रही दिसते. द्रुग किल्ला ट्रेकर्स आणि फिरस्त्यांसाठी एक आव्हानच आहे. Reference Pic: Pitarancha Drug Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha कसे पो...

रामटेक डोंगरी दुर्ग | Ramtek Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

Image
विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha वि दर्भात श्री क्षेत्र रामटेक हे एक अतिप्राचीन तीर्थक्षेत्र आहे. दोन हजार वर्षांचा इतिहास असलेलं हे गाव सुप्रसिद्ध वाकाटक नृपतींच्या इतिहासाशी निगडित आहे. रामटेकजवळच ७ किमी दक्षिणेस नंदीवर्धन नावाचं एक गाव असून ते वाकाटकांचं राजधानीचं नगर होतं. रामटेक गावात अगदी मध्यभागी एका टेकडीवर हा दुर्ग आहे. त्याला चारही बाजुंनी उतार आहे. संपूर्ण पठार तटबंदीने परिवेष्टित असून डोंगरांच्या रांगा दोन दिशांना विस्तारल्या आहेत. केवळ नृसिंहाचे मंदिर असलेली एक सोंड आणि वामनावताराचे मंदिर असलेली दुसरी सोंड आहे. गावातूनही गडावर चढता येतं. तेथे पायऱ्या आहेत. पूर्वेकडे थेट अंबाळा तलावापर्यंत उतरत्या पायऱ्या आहेत. शिवाय एसटी बसनेही श्री कालीदास स्मारकापर्यंत जाण्याची सोय आहे. अंबाळा तलावाच्या स्पर्शरेषेपासून वर जाण्यास छोटासा पण सुंदर घाटमार्ग आहे. किल्ल्याचे श्री वराह महाद्वार भव्य आणि ऐटदार आहे. तेथून पुढे गेल्यावर आपण पुन्हा एका दक्षिणांगी प्रवेशद्वारातून प्रवेश करुन श्री गोकुळ दरवाजापर्यंत पोहोचतो. हा दरवाजा ११ व्या-१२ व्या शतकातील असावा. दरवाजावरी...

बाळापूरचा किल्ला | Balapur Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

Image
विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha व ऱ्हाडात (पश्चिम विदर्भ) अकोला जिल्ह्यातील बाळापूरचा डोंगरी किल्ला हा सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जात असे. ज्याचे हाती बाळापूर त्याचे हाती वऱ्हाड असे जणू समिकरणच होते. दक्षिण भारतात जाणाऱ्या मार्गावर हा किल्ला पडतो. दक्षिण विदर्भात माहुरगडला जसे महत्व आहे तसे वऱ्हाडात बाळापूरला. शिवछत्रपतींच्या काळात बाळापुरातूनच वऱ्हाडाच्या मोहिमा आखल्या जात. बाळापूरजवळचे अकोला हे गाव औरंगजेबाच्या काळात इ.स. १६९० साली आसदखान नावाच्या सरदाराने वसविले. त्यानेच येथे आसदगड या नावाने येथे एक छोटेखानी भुईकोट बांधला. बाळापूर बसस्थानकापासून किल्ला कार्यालय २ किमी अंतरावर असल्याने दुरुनच तटबंदी व बुरुजाचे दर्शन होते. प्रवेशद्वार भव्य असून त्यावरील मेहरपीचे स्थापत्यशिल्प अप्रतिम आहे. बाळापूरचा किल्ला | Balapur Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha प्रवेशमार्ग उत्तरेकडून आहे. या प्रवेशमार्गावर तीन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा चौरस अशा भक्कम बुरुजामध्ये आहे. या उत्तराभिमुख दरवाजातून आत गेल्यावर दुसरा दरवाजा असून तो पश्चिमेकडे तोंड करून आहे. ह...

नरनाळा दुर्ग | Narnala Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

Image
विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha अ कोला जिल्ह्याच्या आकोट शहरापासून केवळ १९ किमी अंतरावर उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांगांच्या हिरव्यागार टेकड्यांच्या माथ्यावर वसलेला, नरनाळा किल्ला महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहास आणि स्थापत्यशैलीचा एक स्मारकीय पुरावा आहे. ३६२ एकरांवर पसरलेला, हा प्राचीन किल्ला शाहनूर किल्ला या नावानेही ओळखला जातो. नरनाळा किल्ला १० व्या शतकात गवळी राजांनी बांधला होता. एक शूर राजपूत शासक राजा नरनाळ सिंह यांच्या नावावरून हा किल्ला या प्रदेशाच्या लष्करी आणि सांस्कृतिक उत्क्रांतीचा पुरावा म्हणून उभा आहे. शतकानुशतके, अनेक शक्तिशाली राजवंशांनी नरनाळ्यावर राज्य केले, प्रत्येक राजवंशाने त्याच्या रचनेवर आणि महत्त्वावर अमिट छाप सोडली. नरनाळा दुर्ग | Narnala Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha यादव राजवंशाने दख्खनमध्ये किल्ल्याचा प्रभाव वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली तर देवगड-नागपूरच्या राजगोंडांनी त्याच्या संरक्षण यंत्रणेला बळकटी दिली. नंतर बहमनी सल्तनतने नियंत्रण मिळवले आणि पर्शियन आणि इस्लामिक स्थापत्य शैली सुरू केल्या ज्या आजही दिसून येतात. फा...

गाविलगड | Gavilgad Killa | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

Image
विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha अ मरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या पर्वत रांगात चिखलदऱ्याच्या पठारावर दक्षिण दिशेस सुमारे ६ किमी अंतरावर समुद्र सपाटीपासून २९४० फूट उंचावर गाविलगड उभा आहे. मेळघाटच्या घनदाट अरण्यात वसलेला गाविलगड जणू दक्षिण दिशेचा पहारेकरीच आहे. हा किल्ला गवळी लोकांनी बांधला, अशी अख्यायिका स्थानिक लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. परंतु या संदर्भात कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. मुजाहिद वंशाच्या अहमदशहा वली पहिला यांनी गाविलगड किल्ला निर्माण केल्याचा उल्लेख फार्सी इतिहासकार फिरिश्ता करतो. गाविलगड | Gavilgad Killa | Forts near Nagpur | Forts of Vidarbha हा किल्ला उत्तरेतून दख्खनमध्ये येणाऱ्या मार्गावर बांधण्यात आला. त्यामुळे या किल्ल्याला दख्खनचे प्रवेशद्वार मानले जात असे. उत्तरेतून येणाऱ्या मुस्लीम सरदारांना दख्खनमध्ये प्रवेश करताना काही प्रमाणात संघर्षाला सामोरे जावे लागत असे. हा किल्ला नंतरच्या काळात बहमनी, निजामशाही, इमादशाही यांच्या अधिपत्याखाली होता. शेवटी १८ व्या शतकात भोसल्यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतल्याची नोंद उपलब्ध आहे. या किल्ल्याच्या तटबंदीत...

माहुरगड | Mahurgad Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

Image
विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha व ऱ्हाडच्या इतिहासात माहुरगडचे राजकीय व संरक्षणात्मक ठाणे म्हणून महत्व होते. सुभे वाशिम, परगणे माहुर, अचलपूर असे अनेक उल्लेख प्राचीन दस्तावेजांमध्ये आढळतात. गाविलगड, नरनाळा, बाळापूर आणि माहुर ही वऱ्हाडातील चार महत्त्वाची ठाणी होत. बहामनी, देशमुख, निझाम व भोसले या चार राजवंशांचा इतिहास या किल्ल्यांभोवती गुंतला आहे. परंतु आज माहुर ओळखल्या जाते ते श्रीक्षेत्र रेणुका देवीच्या पुनीत वास्तव्यासाठी. हे स्थान मराठवड्याच्या नांदेड जिल्ह्यात समाविष्ट असले तरी माहुरचा किल्ला हा वऱ्हाडातील किल्ला (यवतमाळजवळ) म्हणून ओळखल्या जातो.  माहुरगड | Mahurgad Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha माहुरगड | Mahurgad Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha किल्ल्याची तटबंदी, काही बुरुज अजूनही शाबूत आहेत. आतील भागात भग्न इमारतींचे अवशेष आहेत. येथे एकूण १९ बुरुज होते. त्यातील रेणुका बुरुज, धन बुरुज व कालिका बुरुज या तीन बुरुजांना धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. रेणुका माता मंदिरा समोरील बुरुजास तिच्याच नावे रेणुका बुरुज असे नामकरण झाले आहे...

सुरजागड | Surjagad Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

Image
विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha घ नदाट जंगल मुक्त अभयारण्य नक्षलग्रस्त क्षेत्र,हिंस्र श्वापद, दळणवळणांच्या साधनांची कमतरता असलेले चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हे गोंड नृपतींच्या अखत्यारित होते. त्याआधी काही वनक्षेत्रात माना राजवंशाचे राजे होते. या भागात इंग्रजांच्या काळापासून जे गिरीदुर्ग ज्ञात आहेत त्यात टिप्पागड, वैरागड, माणिकगड, बल्लारशाह हे किल्ले भांदक,चंद्रपूर, चंदनखेडा, भटाळा ही तटबंदीची शहरे आणि अनेक गढ्या आहेत. याशिवाय सुरजागड, गडबोली व राजोली हे तीन वनदुर्ग- डोंगरी दुर्गही या जिल्ह्यात आहेत, हे विशेष. सुरजागड | Surjagad Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha सुरजागड किल्ला गडचिरोली जिल्ह्यात एटापल्लीपासून गड्डा मार्गावर पूर्वेला सुमारे २५ ते ३० किमी अंतरावर जंगलात आहे. मुळात डोंगरी किल्ला असून अहेरी जमीनदारीत मोडतो. उंच डोंगरावरील पठार आणि तटबंदी असे त्याचे स्वरुप आहे. गोंड माडिया जमातीची देवता श्रीठाकुरदेवाचे देवस्थान येथे आहे. मकरसंक्रमण काळात येथे जत्रा भरते. या क्षेत्रात प्राचीन काळी नागवंशीय माना राजा कुरुम प्रहोद याची सत्ता होती. हा काळ साधा...

तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता? 😊

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा.

👉 अनुभव पाठवा

ब्रँड सहयोग व भागीदारी

What's Up मराठी हे वाचक-केंद्रित डिजिटल व्यासपीठ आहे. आमचे प्राधान्य नेहमी दर्जेदार आणि विश्वासार्ह सामग्रीला आहे. जर आपल्या ब्रँडला आमच्या वाचकांशी अर्थपूर्ण पद्धतीने जोडायचे असेल, तर आम्ही निवडक आणि मूल्याधारित सहकार्यांसाठी खुले आहोत.

सहकार्याबद्दल माहिती घ्या →