What’s Up Marathi हे प्रवास, पर्यटन आणि अनुभव यांवर केंद्रित असलेलं मराठी डिजिटल माध्यम आहे. आम्ही सुंदर ठिकाणं, पर्यटन स्थळं, संस्कृती आणि जीवनशैली यांची माहिती साध्या आणि समजण्यास सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतो. आमचा उद्देश वाचकांना फिरायला प्रेरित करणं, नवीन ठिकाणांची ओळख करून देणं आणि खरा अनुभव देणं हा आहे. 

व्हिजन

  • वाचक आधी, जाहिराती नंतर
  • मराठी भाषिकांसाठी एक मजबूत डिजिटल व्यासपीठ
  • सामाजिक आणि आर्थिक प्रगती साठी कटिबद्ध

Team

Savita Deo Harkare
Consulting Editor
       

सविता 'देव' हरकरे या गेल्या ३८ वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. लोकमत दैनिकाच्या नागपूर आवृत्तीत त्यांनी विविध पदांवर जबाबदारी सांभाळली आहे. त्यांना सामाजिक विषयावर लिहिण्याची आवड असून वन्यजीव, पर्यावरण आणि एचआयव्ही/एडस् या विषयावर मुबलक लेखन केले आहे.

पुरस्कार
  • एचआयव्ही/ एडस्‌वरील लिखाणाबद्दल २००७-०८ साली पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रतिष्ठेचा रामनाथ गोएंका पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. पुरस्काराच्या रुपात मिळालेल्या जॉन हॉफकिन्स विद्यापीठाच्या फेलोशिप  अंतर्गत त्या २०१० साली व्हिएतनाम येथे आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत सहभागी होण्यास गेल्या होत्या. १९९५ साली जपान-दक्षिण आशिया मैत्री कार्यक्रमाअंतर्गत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली.  एक महिना जपानमध्ये राहून तेथील संस्कृतीचे अध्ययन त्यांना करता आले.
  • वन्यजीव विषयावर लिहिलेल्या बातमीसाठी लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे दिला जाणारा २०११-१२ चा म.य. दळवी शोधपत्रकारिता पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
  • नागपूर आकाशवाणीवर अनेक वर्ष रविवारच्या गप्पांचे लिखाण केले. याशिवाय पाच वर्षे राज्याच्या व्याघ्रगणनेत सहभाग घेतला आहे.

देशातील विविध राजकीय पक्षांच्या २० महिला नेत्यांवर आधारित  ‘इंदिरा ते ममता- भारतीय महिला राजकीय नेतृत्व’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला  विदर्भ साहित्य संघाचा नवोदित लेखक पुरस्कार प्राप्त झाला आहे.

सविता हरकरे यांनी ‘झिंग’ या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या देशाला भेडसावणाऱ्या एका ज्वलंत प्रश्नाला हात घातला आहे. तो प्रश्न आहे तरुणांच्या व्यसनाधिनतेचा. ड्रग्जने तरुण-तरुणींना खच्ची करण्याचे कार्य कसे चालवले आहे,याची अनेक उदाहरणे लेखिकेने या क्षेत्रातील स्वत: केलेल्या कामाच्या अनुभवातून या पुस्तकात मांडली आहेत. त्यातील व्यक्तींची नावे बदलली असली तरी त्या घटना वास्तवात घडलेल्या आहेत व त्यांचे चित्रण या पुस्तकाद्वारे मांडण्यात आले आहे.


📲 अधिक अपडेट्स आणि ताज्या माहितीसाठी What's Up मराठी ला नक्की फॉलो करा!



तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता? 😊

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा.

👉 अनुभव पाठवा

तुमच्यासाठी निवडक...

जपानसाठी ‘टेकऑफ’ आणि ‘ओचा’, ‘कोचा’ | Travel Experience in Japan in Marathi Part 1

नगरधनचा भुईकोट | Nagardhan Fort Travel Guide in Marathi | Forts near Nagpur Forts of Vidarbha

ही वेबसाइट कशी वापरायची? | What's Up Marathi Website Guide

टोकियोतील ‘गिंझा’ आणि भूकंपाचा धक्का | Travel Experience in Japan in Marathi Part 2

🌅🌿 अंबाझरी तलाव: नागपूरच्या गजबजातील शांत हिरवळ | Lakes near Nagpur | Lakes in Vidarbha

सीताबर्डी किल्ला | Sitabuldi Fort Nagpur | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

जपानी कुटुंबासह ‘तानाबाना’ उत्सवाचा आनंद 🌸 | Travel Experience in Japan in Marathi Part 5

चिटणवीस वाडा, नागपूर | Chitnavis Wada Nagpur Heritage

ब्रँड सहयोग व भागीदारी

What's Up मराठी हे वाचक-केंद्रित डिजिटल व्यासपीठ आहे. आमचे प्राधान्य नेहमी दर्जेदार आणि विश्वासार्ह सामग्रीला आहे. जर आपल्या ब्रँडला आमच्या वाचकांशी अर्थपूर्ण पद्धतीने जोडायचे असेल, तर आम्ही निवडक आणि मूल्याधारित सहकार्यांसाठी खुले आहोत.

सहकार्याबद्दल माहिती घ्या →