Posts

Showing posts from October, 2026

गुगामल नॅशनल पार्क | Gugamal National Park | Vidarbha Wildlife Tourism | Maharashtra Tourism

Image
विदर्भातील अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगेत वसलेले गुगामल राष्ट्रीय उद्यान भारतातील प्रमुख राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग म्हणून ‘गुगामल राष्ट्रीय उद्यान’ मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करते. याला ‘गाविलगड हिल्स’ असेही म्हणतात. Gugamal National Park | Vidarbha Wildlife Tourism | Maharashtra Tourism गुगामल राष्ट्रीय उद्यानात वाघांची संख्या अधिक असल्यामुळे हे उद्यान पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे व खूप लोकप्रिय आहे. हे उद्यान मेळघाट राखीव जंगलाचाच एक भाग असून १६७३.९३ चौ.कि.मी.च्या बंदिस्त क्षेत्रावर पसरलेले आहे. १९८७ मध्ये ते अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. उद्यान सातपुडा पर्वतरांगेतील डोंगराळ जंगलात तसेच अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि धारणी या दोन तालुक्यांमध्ये उद्यान पसरलेले आहे. संपूर्ण वनक्षेत्र हे डोंगरदऱ्यांनी बनलं आहे. Gugamal National Park | Vidarbha Wildlife Tourism  या उद्यानात बांबू, सागवान, तीवस, धवडा, कुसुम अशी सुमारे ७५० विविध प्रजातींची झाडं आहेत. पावसाळ्यानंतर अनेक दुर्मिळ अशा वनौषधी या भागात दिसून येतात. त्यामुळे हे उद्या...

अंबामातेच्या नगरीची रोमांचक सफर | Ambadevi Mata Amravati | Author: Parijaat | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism

Image
जिथे इतिहास भेटतो श्रद्धेला... “जय अंबे...जय जगदंबे...” असा जयघोष कानावर पडताच पावले आपोआप अंबादेवी मंदिराच्या दिशेने वळतात. मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच फुलांचा सुगंध, घंटानाद, भक्तांची लगबग आणि देवीच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगा दिसतात. समोर दिसते ती शांत, प्रसन्न आणि स्वयंभू अंबामातेची मूर्ती. त्या क्षणी जाणवते; आपण केवळ एका मंदिरात आलो नाही, तर शेकडो वर्षांचा इतिहास आणि श्रद्धा जपणाऱ्या नगरीत प्रवेश केला आहे. Ambadevi Devasthan Amravati अमरावती... नावातच दडलेला इतिहास आजची अमरावती पूर्वी ‘उदुंबरावती’, ‘उंबरावती’ आणि ‘उमरावती’ या नावांनी ओळखली जात होती. पुढे ‘अमरावती’ हे नाव रूढ झाले. या शहराचा इतिहास खूप जुना आहे. अकराव्या शतकातील पुरावे, तेराव्या शतकातील महानुभाव पंथाच्या संदर्भातील उल्लेख आणि पुढील काळातील अनेक ऐतिहासिक नोंदी या शहराच्या प्राचीनतेची साक्ष देतात. इतिहासाच्या या पाऊलखुणा मनात ठेवून आपण पुढे जातो आणि पोहोचतो अमरावतीच्या सर्वात प्रसिद्ध श्रद्धास्थानी श्री अंबादेवी मंदिरात. Ambadevi Darshan, Amravati रुक्मिणी-हरणाची रोमांचक कथा अंबादेवी मंदिरात उभे राहिल्यावर सर्...

फाहियान : भारतातील बौद्ध वारसा शोधणारा प्रवासी | Fa-Hien and His Journey Through India | Travellers of the World

Image
प्राचीन भारताचा अभ्यास करणाऱ्या परदेशी प्रवाशांमध्ये Faxian यांचं नाव अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. मराठीत त्यांना फाहियान या नावाने ओळखलं जातं. पाचव्या शतकात चीनमधून भारतात आलेला हा बौद्ध भिक्षू मुख्यतः बौद्ध धर्माचे मूळ ग्रंथ, विहार आणि धार्मिक परंपरा समजून घेण्यासाठी भारतात आला होता. त्या काळात चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार होत होता, पण अनेक ग्रंथ अपूर्ण स्वरूपात उपलब्ध होते. म्हणून फाहियानने स्वतः भारतात येऊन अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. भारताकडेचा कठीण प्रवास | Journey to India फाहियानने चीनमधून मध्य आशियामार्गे भारताचा प्रवास सुरू केला. उंच पर्वतरांगा, वाळवंटी प्रदेश आणि कठीण हवामान पार करत तो भारतात पोहोचला. त्या काळात एवढा लांब प्रवास करणं अत्यंत धाडसी मानलं जात होतं. त्याचा प्रवास केवळ धार्मिक नव्हता; तो विविध संस्कृती आणि राज्यव्यवस्था समजून घेण्याचाही होता. Fa-Hien भारतातील महत्त्वाची ठिकाणे | Important Places He Visited in India भारतामध्ये आल्यानंतर फाहियानने अनेक बौद्ध केंद्रांना भेट दिली. त्याने Pataliputra येथे काही काळ वास्तव्य केलं. त्या काळात पाटलिपुत्र अजून...

मार्को पोलो : आशियाकडे जाणारा मध्ययुगीन प्रवासी | Marco Polo Travel | Travellers of the World

Image
मध्ययुगीन प्रवाशांच्या इतिहासात Marco Polo हे नाव अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. 1254 साली Venice येथे जन्मलेला हा इटालियन प्रवासी व्यापारी कुटुंबातून आला. त्यांचे वडील आणि काका आधीपासूनच व्यापारासाठी दूरदेशी जात असत. त्यामुळे लहानपणापासूनच परदेश, व्यापारमार्ग आणि नवीन संस्कृती याबद्दल त्याला आकर्षण होतं. मार्को पोलो अवघ्या सतराव्या वर्षी आपल्या वडिलांसोबत आशियाच्या दिशेने निघाला. त्या काळात युरोपातून आशियात जाणं म्हणजे अनेक महिने चालणारा कठीण आणि धोकादायक प्रवास होता. Marco Polo त्यांनी कुठे कुठे प्रवास केला? | Where Did Marco Polo Travel मार्को पोलोचा प्रवास भूमध्य समुद्रातून सुरू होऊन मध्य आशिया, पर्शिया, वाळवंटी मार्ग आणि सिल्क रूटमधून पुढे चीनपर्यंत पोहोचला. त्यांनी अनेक व्यापारी मार्ग, पर्वतीय प्रदेश, वाळवंटं आणि शहरं पाहिली. त्या काळातील व्यापारी जग कसं कार्यरत होतं, विविध संस्कृती कशा एकमेकांशी जोडल्या होत्या याचं त्यांना प्रत्यक्ष दर्शन झालं. त्यांचा सर्वात महत्त्वाचा मुक्काम चीनमध्ये होता, जिथे ते अनेक वर्षं राहिले. चीनमधील अनुभव आणि कुबलई खान | Marco Polo in the Court ...

"ईडा-पीडा, रोगराई, घेऊन जा गे मारबत!" | Marbats of Nagpur | Tourism in Vidarbha | Maharashtra Tourism

Image
नागपूरच्या लोकसंस्कृतीतील इतिहास, परंपरा आणि जनभावनेचा जाज्वल्य वारसा विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहराला अनेक वैशिष्ट्यपूर्ण लोकपरंपरांचा वारसा लाभला आहे. त्यापैकी मारबत उत्सव ही नागपूरच्या सांस्कृतिक ओळखीशी घट्ट जोडलेली आणि देशात अत्यंत आगळीवेगळी मानली जाणारी परंपरा आहे. बैलपोळ्यानंतरच्या तान्हा पोळ्याच्या दिवशी नागपूरच्या रस्त्यांवर काळी व पिवळी मारबत, तसेच विविध ‘बडगे’ यांची भव्य मिरवणूक निघते. श्रद्धा, लोकविश्वास, सामाजिक जागृती, राजकीय भाष्य आणि जनभावना यांचा अनोखा संगम या उत्सवात पाहायला मिळतो. महाराष्ट्र पर्यटन विभागानेही मारबत उत्सवाला नागपूरच्या विशिष्ट सांस्कृतिक परंपरेचा दर्जा दिला आहे. आता तर हा उत्सव ग्लोबल करण्याची योजना महानगर पालिकेने आखली आहे. Marbats in Nagpur मारबत उत्सव आहे तरी काय? | What is Marbat Festival? ‘मारबत’ म्हणजे वाईट शक्ती, अनिष्ट प्रवृत्ती किंवा समाजातील नकारात्मकतेचे प्रतीक मानली जाणारी प्रतिकात्मक मूर्ती. तिला मिरवणुकीत सहभागी करून शेवटी तिचे दहन केले जाते. यामागे वाईटाचा नाश आणि चांगल्याचा विजय असा लोकविश्वास आहे. मार...
✕
🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
आजचा मराठी शब्दआजचा प्रश्न
या शब्दाचा अर्थ काय आहे?तुम्हाला याचे उत्तर माहीत आहे का?
उत्तरासाठी कार्ड उलटा
अर्थउत्तर
उगमअधिक माहिती
समानार्थीश्रेणी
वाक्यात उपयोग
WhatsUp मराठी पुन्हा उलटा
जानेवारी|फेब्रुवारी|मार्च|एप्रिल|मे|जून|जुलै|ऑगस्ट|सप्टेंबर|ऑक्टोबर|नोव्हेंबर|डिसेंबर
WORD|अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
WORD|लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
WORD|नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|डोंगरातील पाणी नितळ आहे.
WORD|तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
WORD|रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
WORD|ओंजळ|दोन्ही हातांचा केलेला कप्पा|देशज मराठी|हातभर|त्याने ओंजळीत पाणी घेतले.
WORD|हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|हळुवार वारा वाहत होता.
WORD|मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|तिचा आवाज मंजुळ आहे.
WORD|मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|पहिल्या सरीनंतर मृद्गंध दरवळला.
WORD|आभाळमाया|असीम, अपार प्रेम|देशज मराठी|अपार माया|आईची आभाळमाया विसरता येत नाही.
WORD|धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|तो संगीतात धुंद झाला.
WORD|झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|संध्याकाळी थंड झुळूक आली.
WORD|नभ|आकाश|संस्कृत|गगन|पहाटे नभ निरभ्र होते.
WORD|उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|त्याला आनंदाचा उमाळा आला.
WORD|साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|ती साजिरी दिसत होती.
WORD|गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
WORD|कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|फटीतून सूर्याचा कवडसा पडला.
WORD|जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
WORD|लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|गाण्याची लय सुंदर होती.
WORD|कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|फुलदाणीत कोमेजलेली फुले दिसत होती.
WORD|दरवळ|पसरणारा मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|चाफ्याचा दरवळ पसरला.
WORD|सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|सावळ्या ढगांनी आकाश भरले.
WORD|सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|तिचा चेहरा सतेज दिसत होता.
WORD|मधुमालती|सुगंधी फुलांची वेल|संस्कृत|फुलवेल|अंगणात मधुमालती फुलली होती.
WORD|गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
WORD|हुरहूर|मनातील अस्वस्थ ओढ|देशज मराठी|व्याकुळता|जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
WORD|निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
WORD|तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
WORD|मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
WORD|लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|दिव्याची ज्योत लवलवत होती.
WORD|उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|तरुणांमध्ये नवी उमेद आहे.
WORD|गोजिरी|नाजूक व सुंदर|देशज मराठी|साजिरी|गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
WORD|मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|आंब्याला मोहोर आला आहे.
WORD|अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|गावचा चहा अमृततुल्य लागतो.
WORD|झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|मंदिरातील घंटांचा झंकार झाला.
WORD|सहजसुंदर|नैसर्गिकरीत्या सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
WORD|आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|पहाटेचा आसमंत शांत होता.
WORD|सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
WORD|निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|डोंगरातून निर्झर वाहत होता.
WORD|नादमय|संगीताने भरलेला|संस्कृत|सुरेल|सभागृह नादमय झाले.
WORD|मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
WORD|स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|संगीताचे स्पंदन जाणवत होते.
WORD|चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
WORD|मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|मृदुल वाळूवर पावले उमटली.
WORD|अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|ती अलवार हसली.
WORD|स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|पक्षी स्वैर उडत होते.
WORD|सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|फुलांची सुरभि दरवळली.
WORD|दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|तिच्या डोळ्यांत वेगळीच दीप्ती होती.
WORD|प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|अंगणात प्राजक्त फुलला होता.
WORD|निरभ्र|ढगविरहित, पूर्ण स्वच्छ|संस्कृत|स्वच्छ|निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?|रायगड|६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातून वाहणारी सर्वात लांब नदी कोणती?|गोदावरी|त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे उगम पावणारी गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी असून तिला 'दक्षिण गंगा' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली?|१ मे १९६०|संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये अस्तित्वात आली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?|कळसूबाई|अहिल्यानगर जिल्ह्यातील हे शिखर सुमारे १,६४६ मीटर उंच असून ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे.|भूगोल
GK|संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' कोणत्या गावी लिहिली?|नेवासे|अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथे भगवद्गीतेवरील ही मराठी टीका लिहिली गेली.|संस्कृती
GK|लोणार सरोवर कशामुळे तयार झाले?|उल्कापातामुळे|बुलढाणा जिल्ह्यातील हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बेसाल्ट खडकात उल्का आदळून तयार झालेले जगातील दुर्मीळ सरोवर आहे.|भूगोल
GK|तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला?|सिंहगड (कोंढाणा)|१६७० मधील या लढाईत तानाजी धारातीर्थी पडले; 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार प्रसिद्ध आहेत.|इतिहास
GK|अफझलखानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला?|प्रतापगड|१६५९ मध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाजवळ ही ऐतिहासिक भेट व संघर्ष घडला.|इतिहास
GK|मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?|दर्पण|बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये 'दर्पण' सुरू केले; त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक मानले जाते.|संस्कृती
GK|'केसरी' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?|लोकमान्य बाळ गंगाधर टिळक|१८८१ मध्ये मराठीतून 'केसरी' आणि इंग्रजीतून 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू झाली.|इतिहास
GK|'सत्यशोधक समाज' कोणी स्थापन केला?|महात्मा जोतिराव फुले|२४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात स्थापन झालेली ही संस्था सामाजिक समतेसाठी कार्यरत होती.|इतिहास
GK|'श्यामची आई' या पुस्तकाचे लेखक कोण?|साने गुरुजी|पांडुरंग सदाशिव साने यांनी नाशिकच्या कारागृहात हे पुस्तक लिहिले.|साहित्य
GK|'नटसम्राट' या गाजलेल्या नाटकाचे लेखक कोण?|वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)|कुसुमाग्रजांना १९८७ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.|साहित्य
GK|मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा होतो?|२७ फेब्रुवारी|कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.|संस्कृती
GK|वेरूळ येथील कैलास लेणे कोणत्या राजवटीत कोरले गेले?|राष्ट्रकूट|एकाच अखंड खडकात वरून खाली कोरलेले हे मंदिर जगातील स्थापत्यशास्त्रीय आश्चर्य मानले जाते.|इतिहास
GK|अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?|छत्रपती संभाजीनगर|बौद्ध चित्रकला व शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेली ही लेणी युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहेत.|पर्यटन
GK|एलिफंटा लेणी कोणत्या देवतेला समर्पित आहेत?|शिव|मुंबईजवळील घारापुरी बेटावरील त्रिमूर्ती शिल्प जगप्रसिद्ध आहे.|पर्यटन
GK|महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत?|पाच|भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ — बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत.|संस्कृती
GK|अष्टविनायक म्हणजे किती गणपती मंदिरे?|आठ|पुणे, रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विखुरलेली ही आठ स्वयंभू गणपती मंदिरे आहेत.|संस्कृती
GK|कृष्णा नदीचा उगम कोठे होतो?|महाबळेश्वर|सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्या उगम पावतात.|भूगोल
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?|शिवनेरी|पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या या किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी त्यांचा जन्म झाला.|इतिहास
GK|संत तुकाराम महाराजांचे गाव कोणते?|देहू|पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीकाठचे देहू हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.|संस्कृती
GK|संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?|आळंदी|पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली.|संस्कृती
GK|सेवाग्राम आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?|वर्धा|महात्मा गांधींनी १९३६ मध्ये येथे वास्तव्य सुरू केले; हे स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्वाचे केंद्र ठरले.|इतिहास
GK|पवनार आश्रम कोणाशी संबंधित आहे?|आचार्य विनोबा भावे|वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून विनोबांनी भूदान चळवळीचे कार्य केले.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते?|ताडोबा|चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा १९५५ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झाले; पुढे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तयार झाला.|वन्यजीव
GK|'संत्रानगरी' म्हणून कोणते शहर ओळखले जाते?|नागपूर|संत्र्यांच्या व्यापारामुळे मिळालेले हे नाव; नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.|भूगोल
GK|महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणते शहर मानले जाते?|पुणे|शिक्षण, साहित्य, नाट्य आणि संगीत परंपरेमुळे पुण्याला हे स्थान मिळाले आहे.|संस्कृती
GK|रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते?|रायरी|शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केली.|इतिहास
GK|पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?|१७६१|मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यातील या लढाईचा मराठा साम्राज्यावर मोठा परिणाम झाला.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेचे नाव काय?|जिजाबाई|जिजाऊंनी शिवरायांवर स्वराज्याचे संस्कार केले; त्यांना राजमाता म्हणून ओळखले जाते.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळ घोषित झाले?|२००४|व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतील ही वास्तू मुंबईचे प्रतीक मानली जाते.|पर्यटन
GK|गेट वे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे?|मुंबई|१९२४ मध्ये पूर्ण झालेली ही वास्तू अरबी समुद्राच्या काठी उभी आहे.|पर्यटन
GK|'लोकहितवादी' या टोपणनावाने कोण लेखन करत असत?|गोपाळ हरी देशमुख|त्यांच्या 'शतपत्रे' या लेखमालेने एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारणेला दिशा दिली.|साहित्य
GK|मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?|वि. स. खांडेकर|'ययाति' या कादंबरीसाठी १९७४ मध्ये त्यांना हा सन्मान मिळाला.|साहित्य
GK|जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?|गोदावरी|छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या धरणाच्या जलाशयाला 'नाथसागर' म्हणतात.|भूगोल
GK|कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?|सातारा|जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या धरणाच्या जलाशयाला 'शिवसागर' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते?|ताम्हण (जारूळ)|जांभळ्या रंगाची ही फुले पावसाळ्यात सह्याद्रीत मोठ्या प्रमाणात दिसतात.|निसर्ग
GK|महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?|शेकरू|मोठी उडणारी खार असलेला शेकरू भीमाशंकर अभयारण्यात प्रामुख्याने आढळतो.|वन्यजीव
GK|कास पठार कशासाठी प्रसिद्ध आहे?|रानफुलांच्या बहरासाठी|सातारा जिल्ह्यातील हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ पावसाळ्यानंतर फुलांच्या गालिच्यासाठी ओळखले जाते.|पर्यटन
GK|भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी ओळखले जाते?|शेकरू|पुणे जिल्ह्यातील हे अभयारण्य ज्योतिर्लिंगासाठीही प्रसिद्ध आहे.|वन्यजीव