टेकडीचा गणपती | Tekdi Ganesh Temple Nagpur | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide | Temples near Nagpur | Temples of Vidarbha

विदर्भाच्या अष्टविनायकातील पहिला समजला जातो, तो नागपूरचा टेकडी गणेश. नागपूरकरांचे हे आराध्य दैवत आहे. रेल्वे स्थानकाला लागून सीतबर्डी टेकडीवर हे गणेशाचे मंदिर आहे. त्यामुळे या गणेशाचे नाव ‘टेकडी गणेश’ असे रूढ झाले.

भोसले राजे आणि ब्रिटिशांची लढाई ज्या ठिकाणी झाली, त्याच ठिकाणी हे गणपतीचे मंदिर आहे. सुरुवातीला मंदिर छोटेसे होते, आता त्याचा विकास झाला आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला असले, तरी मूर्ती उत्तराभिमुख आहे. गणपतीच्या मूर्तीच्या पाठीमागील भिंतीला लागून एक शिवलिंग आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगाच्या ठिकाणी नंदी बसवलेला दिसतो.

असे सांगतले जाते की, १८६६ मध्ये येथील टेकडी फोडून रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरू होते. त्यावेळी खोदकाम करताना कामगारांना गणेशाची शेंदूरचर्चित मूर्ती सापडली. कामगारांना ही मूर्ती दिसली त्यावेळी अचानक आकाश भरून आले व विजांचा कडकडाट सुरू झाला. कामगारांनी तेथून मूर्ती काढून एका पिंपळाच्या झाडाखाली तिची प्राणप्रतिष्ठापना केली. तेव्हापासून या मूर्तीची पूजाअर्चा सुरू आहे. १८६५ मधील नागपूरच्या नकाशात या मंदिराचा उल्लेख नाही; म्हणजे त्या आधीच्या काळात केव्हातरी तिथे असलेले प्राचीन गणेश स्थान जमीनदोस्त वा उद्ध्वस्त झाले असावे. कारण त्यापूर्वी मात्र येथे मंदिर असल्याची नोंद सापडते. यादवांच्या कार्यकाळात रामटेकला राम मंदिर उभारण्याबरोबरच हेमाद्री पंडितांनी टेकडीचे गणेश मंदिर बांधले. यादव घराण्याकडून या गणेशाची पूजा होत असे, अशी नोंद आहे; परंतु ही मूर्ती यादवकाळातील असण्याबाबत अभ्यासकांमध्ये साशंकता आहे.

Tekdi Ganesh Temple Nagpur | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide | Temples near Nagpur | Temples of Vidarbha
Tekdi Ganesh Temple Nagpur | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide | Temples near Nagpur

मराठा साम्राज्याचे सरदार रघुजी भोसले यांच्या मृत्यूनंतर १८९६ मध्ये इंग्रज नागपुरात आले. सध्या जेथे मंदिर आहे त्या सीताबर्डी टेकडीच्या खालीच इंग्रज रेसिडन्सी होती. तेव्हापासून हा परिसर इंग्रजांकडे होता व स्वातंत्र्यानंतर भारतीय सैन्यदलाच्या अधिपत्याखाली आहे. इंग्रजांच्या काळात सीताबर्डी किल्ल्यात कोणाही स्थानिकांना प्रवेश दिला जात नव्हता. लष्करी छावणी बाजूला असल्यामुळे इंग्रजांनी या मूर्तीवर केवळ एक पत्र्याची झोपडी उभारण्याची परवानगी दिली. त्यानुसार १९३६ मध्ये या गणेशमूर्तीभोवती झोपडी उभारण्यात आली. १९६५ पर्यंत मंदिर त्याच अवस्थेत होते. त्यानंतर उत्तरोत्तर जीर्णोद्धार व नूतनीकरण होत गेले. २०२० मध्ये केलेल्या नूतनीकरणानंतर या मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे. फिकट लालसर दगडामध्ये राजस्थानी कारागिरांनी हे भव्य मंदिर बांधले आहे. त्यावरील नक्षीकाम व मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण भासते. २०,००० चौरस फूट जागेवर हे मंदिर उभे आहे.

मंदिराच्या सभामंडपाच्या मध्यभागी असलेल्या पिंपळवृक्षाखाली उजव्या सोंडेची गणेशमूर्ती आहे. गणेशमूर्तीचे मुकुट व डोळे हे चांदीचे आहेत. मूर्तीच्या मागे डाव्या बाजूला ५ फूट उंचीची काळभैरवाची मूर्ती, तर उजव्या बाजूला नंदीवर आरूढ शिवलिंग आहे. येथील पिंपळ वृक्षाशेजारी राधाकृष्ण मंदिर आहे. याशिवाय येथे राम-सीता-लक्ष्मण, दक्षिणमुखी हनुमान तसेच महालक्ष्मी यांच्याही मूर्ती आहेत.

याच टेकडीवर दुसऱ्या भागात आणखी एक गणपती मंदिर आहे. तो फौजी गणपती म्हणून ओळखला जातो. शुक्रवार तलावाचे पाणी पूर्वी सीताबर्डी किल्ल्यापर्यंत होते. भोसले राजे नावेतून तेथे गणेश दर्शनासाठी येत, असे सांगितले जाते.

Tekdi Ganesh Temple Nagpur | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide | Temples near Nagpur

कसे पोहोचाल | How to reach Tekdi Ganesh Temple in Nagpur

  • नागपूर रेल्वेस्थानकापासून पायी १० मिनिटांवर
  • नागपूरसाठी राज्यातील विविध ठिकाणांहून एसटी, रेल्वे व विमान सेवा उपलब्ध
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
तुम्ही ही यात्रा केली आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा 🙏

Comments

🔍 शोधा
लेख लोड होत आहेत...
🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
💡
आजचा मराठी शब्द by WhatsUp मराठी
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|Eg. तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|Eg. त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|Eg. डोंगरातील पाणी नितळ आहे.
तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|Eg. तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|Eg. सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
ओंजळ|हाताचा कप्पा|देशज मराठी|हातभर|Eg. त्याने ओंजळीत पाणी घेतले.
हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|Eg. हळुवार वारा वाहत होता.
मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|Eg. तिचा आवाज मंजुळ आहे.
मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|Eg. मृद्गंध दरवळला.
आभाळमाया|असीम प्रेम|देशज मराठी|अपार माया|Eg. आईची आभाळमाया विसरता येत नाही.
धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|Eg. तो संगीतात धुंद झाला.
झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|Eg. थंड झुळूक आली.
नभ|आकाश|संस्कृत|गगन|Eg. नभ निरभ्र होते.
उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|Eg. त्याला आनंदाचा उमाळा आला.
साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|Eg. ती साजिरी दिसत होती.
गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|Eg. फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|Eg. सूर्याचा कवडसा पडला.
जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|Eg. गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|Eg. गाण्याची लय सुंदर होती.
कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|Eg. कोमेजलेली फुले दिसत होती.
दरवळ|मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|Eg. चाफ्याचा दरवळ पसरला.
सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|Eg. सावळ्या ढगांनी आकाश भरले.
सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|Eg. तिचा चेहरा सतेज दिसत होता.
मधुमालती|सुगंधी वेल|संस्कृत|फुलवेल|Eg. अंगणात मधुमालती फुलली होती.
गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|Eg. कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
हुरहूर|मनातील ओढ|देशज मराठी|व्याकुळता|Eg. जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|Eg. गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|Eg. धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|Eg. पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|Eg. दिव्याची ज्योत लवलवत होती.
उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|Eg. तरुणांमध्ये उमेद आहे.
गोजिरी|नाजूक सुंदर|देशज मराठी|साजिरी|Eg. गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|Eg. आंब्याला मोहोर आला आहे.
सुगंधी|सुगंध असलेले|संस्कृत|दरवळते|Eg. सुगंधी फुले बहरली.
अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|Eg. गावचा चहा अमृततुल्य लागतो.
झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|Eg. घंटांचा झंकार झाला.
सहजसुंदर|नैसर्गिक सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|Eg. तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|Eg. आसमंत शांत होता.
सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|Eg. सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|Eg. डोंगरातून निर्झर वाहत होता.
नादमय|संगीतपूर्ण|संस्कृत|सुरेल|Eg. सभागृह नादमय झाले.
मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|Eg. मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|Eg. संगीताचे स्पंदन जाणवत होते.
चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|Eg. वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|Eg. मृदुल वाळूवर पावले उमटली.
अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|Eg. ती अलवार हसली.
स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|Eg. पक्षी स्वैर उडत होते.
सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|Eg. फुलांची सुरभि दरवळली.
दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|Eg. तिच्या डोळ्यांत दीप्ती होती.
प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|Eg. अंगणात प्राजक्त फुलला होता.
निरभ्र|पूर्ण स्वच्छ|संस्कृत|ढगविरहित|Eg. निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.

अजून इंटरेस्टिंग...

कोकणस्पर्श: निसर्ग, संस्कृती आणि स्वप्नांचा प्रवास | Author: Eknath Acharekar | Konkansparsh; Explore the hidden treasures of Konkan | Maharashtra Tourism

सह्याद्रीतील शिल्परत्न ‘अमृतेश्वर मंदिर’ | नरेंद्र चांदेवार | Author: Narendra Chandewar | Amruteshwar Temple | Maharashtra Tourism | Incredible India

नागपुरातील संजीवनग्राममध्ये घ्या ‘वेलनेस टुरिझम’ चा आनंद | Sanjeevan Nature Cure | Wellness Tourism in Maharashtra

गड सर केला…आणि मनही | हरिश्चंद्रगडाचा धाडसी प्रवास | Author: Shubhangi Kalmegh | Harishchandragad Trekking Experience & Guide | Forts of Maharashtra

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

नागपुरातील मोहिते वाडा : संघ शाखेची जन्मभूमी | Author: Amol Pusadkar | Mohite Wada, Birthplace of the Rashtriya Swayamsevak Sangh | Heritage Tourism | Maharashtra Tourism

तुम्ही पण होऊ शकता पर्यटन उद्योजिका, महाराष्ट्र शासनाच्या ‘आई’ महिला पर्यटन धोरण | महाराष्ट्र स्टार्टप स्टोरीज | Tours & Travel Entrepreneurship for Women | Startups & Careers | Maharashtra Startup Stories

‘पुरण पोळी’ च्या गावाला जाऊ या....! आजनसरा | Author: Sakhi | Ajansara Temple | Temples in Maharashtra | Maharashtra Tourism

ज्योतिबाच्या यात्रेत सासनकाठ्या का आणतात? डॉ. संपदा नासेरी | Dr. Sampada Naseri | Jyotiba Temple Experience Kolhapur | Temples in Maharashtra

बांबूंच्या बेटातून करा ‘झुकझुक गाडी’ ची रम्य सफर | First Bamboo Garden of India, Amravati | Author: Parijaat | Maharashtra Tourism