होळीचा रंग... कृषी पर्यटनासंग | Author: Amit Naseri | Joshiwadi Agri Tourism near Nagpur | Vidarbha Agri Tourism

होळीच्या निमित्ताने मित्रांचा प्लॅन | Plan for Agri Tourism near Nagpur during Holi

"अरे अमित, उद्या आपण कॉलेजचे मित्र जमून होळी साजरी करण्याचा प्लान होतोय!!". विलास फोन वर ही कल्पना मांडत होता.

खरंतर तो खूप वर्षानंतर होळीला नागपुरात होता. त्यामुळे त्याच्या आवाजातला उत्साह मी ओळखला.

"फारच छान !! काय प्लान बनतोय मग?” माझा त्याला प्रश्न...

"काही खास नाही .. आपण एकतर श्रीपादच्या शेतावर जाऊ नाहीतर ज्ञानेश म्हणतोय हलदीराममध्ये जेवूया आणि सोबत सर्वांशी भेट सुद्धा होईल.."

"अरे होळीचा दिवस शेतावर साजरा करण्यापेक्षा हॉटेल/ रेस्टोरंट कसं काय सुचतंय त्याला?” मी थोडंसं चिडूनच म्हंटलं.

माझा सुर ऐकून विलास थोडं सावध होत म्हणाला की, थांब मी त्यालाच विचारतो.. काही वेळात ज्ञानेशचा मला फोन, 'अरे अमित आपण श्रीपादकडेच जमू आणि त्याच्या शेतावर जाऊ'...जेवण म्हणून बिर्याणीचा बेत होता आणि ते इथूनच न्यायचं आणि शेतावर जाऊन जेवायचं.. तर झाला प्रोग्राम पक्का!!

होळीनिमित्त शेतावर जाण्याचा निर्णय | Going to a farm near Nagpur during Holi

आमचा अंदाज होता कि १० कुटुंब तरी जमतील पण शेवटी 7 कुटुंब जमले.. चव्हाण, पाचखंडे, हळवे, उपाध्याय, जोशी, गायकवाड आणि आम्ही नासेरी असे कपल्स होळीनिमित्त शेतावर जाण्याच ठरलं. निघताना श्रीपादच्या घरी धनश्रीने चविष्ट थंडाईपासून होळीची सुरुवात केली. खूप दिवसानंतर होळीचा रंग सर्वांवर उठून दिसत होता. जेवणासाठी बिर्याणी पाचखंडे आणि चव्हाण कुटुंबीय घेऊन आले होते. सोबत मिसेस चव्हाण यांनी मसाले भात सुद्धा आणला असल्याने व्हेजवाल्यांच जमलं. आम्ही सुद्धा पाणीपुरीच्या तयारी सकट आलो होतो.

कृषि पर्यटनाचा अनुभव : शेतावर पोहोचल्यावर | Agri Tourism Experience near Nagpur

तीन गाड्यांमधून सर्व निघालो. शेतावर पोहोचल्यावर सर्वात आधी पाणी पुरीवर ताव मारला. हा चटपटीत आनंद घेताना कॉलेजमधल्या आठवणी आणि त्या वेळच्या गमतीजमती सुरू होत्याच. श्रीपादच्या फार्म हाऊस मध्ये आजूबाजूला खूप झाडं आहेत. त्यामुळे आपण जंगलाच्या मध्ये आहोत असाच फील येतो.

कृषि पर्यटनाचा अनुभव : शेतावर पोहोचल्यावर | Agri Tourism Experience near Nagpur
कृषि पर्यटनाचा अनुभव : शेतावर पोहोचल्यावर | Agri Tourism Experience near Nagpur

एक लक्षात आलं . जवळपास सर्वांचीच मुलं-मुली एकतर अभ्यासासाठी बाहेर आहेत किंवा जॉबवर आहेत. चव्हाण कुटुंबीयांची मुलगी लग्न होऊन सासरी होती. विलास-स्मिता यांच्या मूलाचं लग्न झालं होतं त्यामुळे ते अगदी ताजे ताजे सासू-सासरे झाले होते. म्हणजे आम्ही सर्वच आयुष्याच्या अश्या वळणावर होतो किंवा आहोत जिथे प्रत्येकाला आता थोडी सवड मिळाली आहे. तर चला थोडी मजा करूया.

कृषि पर्यटनाचा अनुभव : शेतावर पोहोचल्यावर | Agri Tourism Experience near Nagpur
कृषि पर्यटनाचा अनुभव : शेतावर पोहोचल्यावर | Agri Tourism Experience near Nagpur

एवढ्यात एक ट्रेंड दिसून येतो अलुमनी मीटिंग किंवा गेट-टुगेदरचा!! वर्षातून एकदा कॉलेज मधले जुने मित्र-मैत्रिणी भेटतात!! तर होळीच्या निमित्ताने हे सर्व जुळून आलं.

पाणी पुरी खाऊन शिवार फेरवर सर्वच निघालो. शेतात हिरवी मिरची, कारली, टमाटे आणि थाई लेमन होतच पण सोबत पत्ता कोबी आणि फूल गोभी सुद्धा असल्याने या भाज्याना स्वतःच्या हाताने तोडायचा/ वेचायचा आनंद घेतला. सोबत होता हिरव्यागार कोथिंबिरीच्या सुगंध. शेतावर फिरताना श्रीपाद नेहेमीप्रमाणे नवीन माहिती देतच होता.

कृषि पर्यटनाचा अनुभव : शेतावर पोहोचल्यावर | Agri Tourism Experience near Nagpur

भाजी-फळे तोडताना फोटो सेशन सुद्धा झाले. शेतावरची मजाच वेगळी!! इथे आल्यावर न बोलणारी व्यक्ति सुद्धा बोलू लागते .. शिवार फेरी करताना बऱ्याच पक्ष्यांचे आवाज कानी पडत होते. शेतावर बकऱ्या सुद्धा होत्या. श्रीपादचा मत्स्य पालनात उत्साह असल्याने या वेळेस त्यांनी 'मरळ' या मास्याना तलावात वाढवत असल्याचे सांगितले.

जवळपास दीड तासाचा फेरफटका मारल्यावर आता भूक लागली होती. परतल्यावर सर्वच जण बिर्याणीवर ताव मारायला तयारच होते. खूप दिवसानंतर जेवताना मजा आली. जेवताना विलास म्हणालाच की, अमित कसा रागावला होता हलदीराममध्ये होळी साजरी करण्याबद्दल.

जेवण आणि मिठाई खाण्यापेक्षा मला जे जास्त लक्षात राहिलं ते सर्वांचे एकत्र बसून गप्पा मारणं आणि सोबतच गमती जमती सुद्धा सुरूच होत्या. झाडांवर बसलेली कोकीळ सुद्धा मधून-मधून कंपनी देत होती. खूप झाडं असल्याने पक्ष्यांची रेलचेल होतीच. दुपारचा चहा घेतांना असं ठरलं की आता दर होळीला सर्वांनी असच भेटायचं. ज्याला सर्वांकडून संमती दिली गेली.

कृषि पर्यटनाचा अनुभव : शेतावर पोहोचल्यावर | Agri Tourism Experience near Nagpur

तर यावेळेची जोशिवाडीतली होळी आणि कृषि पर्यटन असं जमून आल्यामुळे आम्हा सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता!!

जोशीवाडीला पोहोचण्यासाठी | How to reach Joshiwadi from Nagpur

  • जोशीवाडी नागपूरपासून अंदाजे 15 किमी अंतरावर आहे.
  • सावनेर रोडवर कोलार नदीच्या पलीकडे 3००-४०० मीटर गेल्यावर यू टर्न घ्यायचा.. काश्मीर डेकोरेशनच्या बाजूला कच्चा रस्ता धरायचा आणि जवळपास दीड किमी वर जोशीवाडीत पोहोचता येतं.
कमेंट्स मध्ये आपले मत / अनुभव नक्की कळवा! 😊😊

अमित नासेरी
लेखक
पर्यटन क्षेत्रात सल्लागार म्हणून २२ वर्षांपासून कार्यरत

Comments

  1. सुंदर और रोचक संस्मरण। होली पर पुराने मित्रों के साथ मिलना और गपशप करना आनंद से भर देता है।

    ReplyDelete
    Replies
    1. बिलकुल सही कहा आपने! 😊 पुराने दोस्तों के साथ होली की मुलाकातें सच में खास होती हैं। अगर आपके पास भी ऐसी कोई प्यारी याद या अनुभव हो, तो जरूर हमारे साथ साझा करें—पढ़कर बहुत अच्छा लगेगा!

      Please share your travel experience here - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfZi1ZNIKjfCYpOZaf01k7N7c79BoU1TGumkX_DWO3bw8JZwA/viewform

      We would love to publish some of your experiences!

      Delete

Post a Comment

तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️

🔍 शोधा
लेख लोड होत आहेत...
🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
💡
आजचा मराठी शब्द by WhatsUp मराठी
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|Eg. तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|Eg. त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|Eg. डोंगरातील पाणी नितळ आहे.
तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|Eg. तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|Eg. सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
ओंजळ|हाताचा कप्पा|देशज मराठी|हातभर|Eg. त्याने ओंजळीत पाणी घेतले.
हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|Eg. हळुवार वारा वाहत होता.
मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|Eg. तिचा आवाज मंजुळ आहे.
मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|Eg. मृद्गंध दरवळला.
आभाळमाया|असीम प्रेम|देशज मराठी|अपार माया|Eg. आईची आभाळमाया विसरता येत नाही.
धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|Eg. तो संगीतात धुंद झाला.
झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|Eg. थंड झुळूक आली.
नभ|आकाश|संस्कृत|गगन|Eg. नभ निरभ्र होते.
उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|Eg. त्याला आनंदाचा उमाळा आला.
साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|Eg. ती साजिरी दिसत होती.
गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|Eg. फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|Eg. सूर्याचा कवडसा पडला.
जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|Eg. गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|Eg. गाण्याची लय सुंदर होती.
कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|Eg. कोमेजलेली फुले दिसत होती.
दरवळ|मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|Eg. चाफ्याचा दरवळ पसरला.
सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|Eg. सावळ्या ढगांनी आकाश भरले.
सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|Eg. तिचा चेहरा सतेज दिसत होता.
मधुमालती|सुगंधी वेल|संस्कृत|फुलवेल|Eg. अंगणात मधुमालती फुलली होती.
गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|Eg. कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
हुरहूर|मनातील ओढ|देशज मराठी|व्याकुळता|Eg. जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|Eg. गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|Eg. धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|Eg. पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|Eg. दिव्याची ज्योत लवलवत होती.
उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|Eg. तरुणांमध्ये उमेद आहे.
गोजिरी|नाजूक सुंदर|देशज मराठी|साजिरी|Eg. गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|Eg. आंब्याला मोहोर आला आहे.
सुगंधी|सुगंध असलेले|संस्कृत|दरवळते|Eg. सुगंधी फुले बहरली.
अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|Eg. गावचा चहा अमृततुल्य लागतो.
झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|Eg. घंटांचा झंकार झाला.
सहजसुंदर|नैसर्गिक सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|Eg. तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|Eg. आसमंत शांत होता.
सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|Eg. सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|Eg. डोंगरातून निर्झर वाहत होता.
नादमय|संगीतपूर्ण|संस्कृत|सुरेल|Eg. सभागृह नादमय झाले.
मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|Eg. मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|Eg. संगीताचे स्पंदन जाणवत होते.
चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|Eg. वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|Eg. मृदुल वाळूवर पावले उमटली.
अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|Eg. ती अलवार हसली.
स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|Eg. पक्षी स्वैर उडत होते.
सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|Eg. फुलांची सुरभि दरवळली.
दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|Eg. तिच्या डोळ्यांत दीप्ती होती.
प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|Eg. अंगणात प्राजक्त फुलला होता.
निरभ्र|पूर्ण स्वच्छ|संस्कृत|ढगविरहित|Eg. निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.

अजून इंटरेस्टिंग...

कोकणस्पर्श: निसर्ग, संस्कृती आणि स्वप्नांचा प्रवास | Author: Eknath Acharekar | Konkansparsh; Explore the hidden treasures of Konkan | Maharashtra Tourism

सह्याद्रीतील शिल्परत्न ‘अमृतेश्वर मंदिर’ | नरेंद्र चांदेवार | Author: Narendra Chandewar | Amruteshwar Temple | Maharashtra Tourism | Incredible India

नागपुरातील संजीवनग्राममध्ये घ्या ‘वेलनेस टुरिझम’ चा आनंद | Sanjeevan Nature Cure | Wellness Tourism in Maharashtra

गड सर केला…आणि मनही | हरिश्चंद्रगडाचा धाडसी प्रवास | Author: Shubhangi Kalmegh | Harishchandragad Trekking Experience & Guide | Forts of Maharashtra

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

नागपुरातील मोहिते वाडा : संघ शाखेची जन्मभूमी | Author: Amol Pusadkar | Mohite Wada, Birthplace of the Rashtriya Swayamsevak Sangh | Heritage Tourism | Maharashtra Tourism

‘पुरण पोळी’ च्या गावाला जाऊ या....! आजनसरा | Author: Sakhi | Ajansara Temple | Temples in Maharashtra | Maharashtra Tourism

देवलापारची गढी | Deolapar Fort | Forts near Nagpur | Forts in Vidarbha

तुम्ही पण होऊ शकता पर्यटन उद्योजिका, महाराष्ट्र शासनाच्या ‘आई’ महिला पर्यटन धोरण | महाराष्ट्र स्टार्टप स्टोरीज | Tours & Travel Entrepreneurship for Women | Startups & Careers | Maharashtra Startup Stories

ज्योतिबाच्या यात्रेत सासनकाठ्या का आणतात? डॉ. संपदा नासेरी | Dr. Sampada Naseri | Jyotiba Temple Experience Kolhapur | Temples in Maharashtra