बाळापूरचा किल्ला | Balapur Fort | Forts near Nagpur | Forts in Vidarbha

ऱ्हाडात (पश्चिम विदर्भ) अकोला जिल्ह्यातील बाळापूरचा डोंगरी किल्ला हा सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जात असे. ज्याचे हाती बाळापूर त्याचे हाती वऱ्हाड असे जणू समिकरणच होते. दक्षिण भारतात जाणाऱ्या मार्गावर हा किल्ला पडतो. दक्षिण विदर्भात माहुरगडला जसे महत्व आहे तसे वऱ्हाडात बाळापूरला. शिवछत्रपतींच्या काळात बाळापुरातूनच वऱ्हाडाच्या मोहिमा आखल्या जात. बाळापूरजवळचे अकोला हे गाव औरंगजेबाच्या काळात इ.स. १६९० साली आसदखान नावाच्या सरदाराने वसविले. त्यानेच येथे आसदगड या नावाने येथे एक छोटेखानी भुईकोट बांधला.

बाळापूर बसस्थानका पासून किल्ला कार्यालय २ किमी अंतरावर असल्याने दुरुनच तटबंदी व बुरुजाचे दर्शन होते. प्रवेशद्वार भव्य असून त्यावरील मेहरपीचे स्थापत्यशिल्प अप्रतिम आहे.

बाळापूरचा किल्ला | Balapur Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha
बाळापूरचा किल्ला | Balapur Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

प्रवेशमार्ग उत्तरेकडून आहे. या प्रवेशमार्गावर तीन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा चौरस अशा भक्कम बुरुजामध्ये आहे. या उत्तराभिमुख दरवाजातून आत गेल्यावर दुसरा दरवाजा असून तो पश्चिमेकडे तोंड करून आहे. हे लाकडी दरवाजे अजूनही पहायला मिळतात. दारावरच्या कमानीवर महिरप आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूला तटबंदी असून समोर उत्तराभिमुख असा तिसरा दरवाजा आहे. यालाही महिरप केलेली आहे.

या तिसऱ्या दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्यामध्ये आपला प्रवेश होतो. आतल्या इमारती जुन्या असून त्यांची जुजबी दुरुस्ती करून त्यामध्ये काही सरकारी कार्यालये केलेली आहेत.

तटबंदीवर चढण्यासाठी जागोजागी पायऱ्या केलेल्या दिसतात. या पायऱ्यांवरून चढून प्रशस्त रुंदीच्या तटावर पोहोचता येते. तटावरून किल्ल्याला फेरी मारता येते. या तटबंदीवरून बाहेरील तटबंदीचेही दर्शन होते.

बाळापूरचा किल्ला | Balapur Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

याच गावात महिषा व मनकर्णिका या दोन नद्यांच्या संगमावर त्रिपुरसुंदरी-बालसुंदरीचे देवालय आहे. समर्थ रामदास स्वामी १६३३ साली या मंदिरात आले असावे असे तर्क आहे. त्यावेळी वऱ्हाडात इतमादशाहीची सत्ता होती. समर्थांनी याच देवळात शिष्य-महंतांची भेट घेतली असे सांगतात.

बाळापूरच्या किल्ल्यात १७२० साली मराठा-निझाम-मोघल यांचे तुंबळ युद्ध झाले होते. त्या लढाईस बाळापूरची लढाई म्हणतात. याच किल्ल्यात श्रीमंत माधवराव पेशवे आणि राघोबादादा डिसेंबर १६६५ मध्ये नागपूरकर भोसलेंवर चालून आले तेव्हा पेशवे व निझाम यांचे सैन्य भोसलेंच्या मागावर होते. बाळापूर गावाच्या दक्षिणेकडे नदीकाठावर मोगली सरदार मिर्झाराजे जयसिंग यांनी बांधलेली छत्री आहे. बाळापूरच्या किल्ल्याच्या भ्रमंतीमध्ये ही छत्रीही आवर्जून पहावी अशीच आहे.

कसे पोहोचाल | How to go to Balapur Fort

बाळापूर हे जळगाव ते अकोला या राष्ट्रीय महामार्गावर आहे. ते बुलढाणा तसेच वाशीम या जिल्ह्यांच्या ठिकाणांना गाडीमार्गाने जोडलेले आहे.अकोल्यापासून सुमारे २६ किमी अंतरावर आहे.

हा किल्ला शेगाव रेल्वे स्टेशनपासून केवळ १९ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे तुम्ही शहरातील कोणत्याही भागापासून शेगाव रेल्वे स्टेशन पर्यंत येऊ शकता किंवा मग बस स्टॉप सुद्धा आहेत. बसने यायचे असल्यास शेगाव बस तुम्हाला कोणत्याही मुख्य शहरापासून मिळू शकते. तेथून तुम्ही टॅक्सी किंवा स्थानिक बस पकडून सुद्धा बाळापूरला जाऊ शकता.

तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️

Comments

🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
💡
आजचा मराठी शब्द by WhatsUp मराठी
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|Eg. तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|Eg. त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|Eg. डोंगरातील पाणी नितळ आहे.
तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|Eg. तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|Eg. सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
ओंजळ|हाताचा कप्पा|देशज मराठी|हातभर|Eg. त्याने ओंजळीत पाणी घेतले.
हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|Eg. हळुवार वारा वाहत होता.
मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|Eg. तिचा आवाज मंजुळ आहे.
मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|Eg. मृद्गंध दरवळला.
आभाळमाया|असीम प्रेम|देशज मराठी|अपार माया|Eg. आईची आभाळमाया विसरता येत नाही.
धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|Eg. तो संगीतात धुंद झाला.
झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|Eg. थंड झुळूक आली.
नभ|आकाश|संस्कृत|गगन|Eg. नभ निरभ्र होते.
उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|Eg. त्याला आनंदाचा उमाळा आला.
साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|Eg. ती साजिरी दिसत होती.
गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|Eg. फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|Eg. सूर्याचा कवडसा पडला.
जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|Eg. गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|Eg. गाण्याची लय सुंदर होती.
कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|Eg. कोमेजलेली फुले दिसत होती.
दरवळ|मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|Eg. चाफ्याचा दरवळ पसरला.
सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|Eg. सावळ्या ढगांनी आकाश भरले.
सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|Eg. तिचा चेहरा सतेज दिसत होता.
मधुमालती|सुगंधी वेल|संस्कृत|फुलवेल|Eg. अंगणात मधुमालती फुलली होती.
गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|Eg. कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
हुरहूर|मनातील ओढ|देशज मराठी|व्याकुळता|Eg. जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|Eg. गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|Eg. धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|Eg. पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|Eg. दिव्याची ज्योत लवलवत होती.
उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|Eg. तरुणांमध्ये उमेद आहे.
गोजिरी|नाजूक सुंदर|देशज मराठी|साजिरी|Eg. गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|Eg. आंब्याला मोहोर आला आहे.
सुगंधी|सुगंध असलेले|संस्कृत|दरवळते|Eg. सुगंधी फुले बहरली.
अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|Eg. गावचा चहा अमृततुल्य लागतो.
झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|Eg. घंटांचा झंकार झाला.
सहजसुंदर|नैसर्गिक सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|Eg. तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|Eg. आसमंत शांत होता.
सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|Eg. सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|Eg. डोंगरातून निर्झर वाहत होता.
नादमय|संगीतपूर्ण|संस्कृत|सुरेल|Eg. सभागृह नादमय झाले.
मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|Eg. मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|Eg. संगीताचे स्पंदन जाणवत होते.
चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|Eg. वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|Eg. मृदुल वाळूवर पावले उमटली.
अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|Eg. ती अलवार हसली.
स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|Eg. पक्षी स्वैर उडत होते.
सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|Eg. फुलांची सुरभि दरवळली.
दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|Eg. तिच्या डोळ्यांत दीप्ती होती.
प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|Eg. अंगणात प्राजक्त फुलला होता.
निरभ्र|पूर्ण स्वच्छ|संस्कृत|ढगविरहित|Eg. निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.

अजून इंटरेस्टिंग...

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

तुम्ही पण होऊ शकता पर्यटन उद्योजिका, महाराष्ट्र शासनाच्या ‘आई’ महिला पर्यटन धोरण | महाराष्ट्र स्टार्टप स्टोरीज | Tours & Travel Entrepreneurship for Women | Startups & Careers | Maharashtra Startup Stories

‘पुरण पोळी’ च्या गावाला जाऊ या....! आजनसरा | Author: Sakhi | Ajansara Temple | Temples in Maharashtra | Maharashtra Tourism

अलेक्झांडर बर्न्स : बुखाराकडे निघालेला ब्रिटिश प्रवासी | Alexander Burnes and Travels into Bukhara | Travellers of the World

भटाळा गावात आहे ‘भोंडा महादेव’ | Author: Himgauri Deshpande | Bhonda Mahadev Temple Bhatala | Temples of Vidarbha | Temples of Maharashtra

बांबूंच्या बेटातून करा ‘झुकझुक गाडी’ ची रम्य सफर | First Bamboo Garden of India, Amravati | Author: Parijaat | Maharashtra Tourism

महाराष्ट्रातील डार्क स्काय पर्यटन, शहरी गोंगाटापासून दूर, आकाशाच्या कुशीत | Dark Sky Tourism | Astro Tourism | Maharashtra Tourism Policy

भामरागडमध्ये जलक्रांतीतून निर्मित ‘तलावांचे जाळे’ | अनिकेत प्रकाश आमटे | लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte

नागपुरातील संजीवनग्राममध्ये घ्या ‘वेलनेस टुरिझम’ चा आनंद | Sanjeevan Nature Cure | Wellness Tourism in Maharashtra

वास्को द गामा : समुद्रमार्गाने भारत गाठणारा प्रवासी | Vasco da Gama and the Sea Route to India | Travellers of the World