किल्ले प्रतापगड | Pratapgarh Fort | Forts near Nagpur | Forts in Vidarbha

विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

प्रतापगड

प्रतापगड म्हटले की सर्वांना आठवते ती छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखानाची भेट. पण अनेकांना कदाचित माहिती नसेल प्रतापगड नावाचा आणखी एक डोंगरी दुर्ग विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली या तालुक्याच्या ठिकाणापासून दक्षिणेस वळले की सानगडी किल्ला लागतो. तो पार करुन पुढे गेल्यानंतर अजुर्नी मोरगाव नावाची गावं लागतात. तेथून पूर्वेला १६ किमी अंतरावर एका पुलावरुन पश्चिमेकडे नजर टाकली की प्रतापगडाचे उंच शिखर दृष्टीस पडते. प्रतापगडाच्या पायथ्याशी एक लहानसे वनग्राम असून समोरच अखंड पाषाणातून कोरलेला गरुड स्तंभ आहे. लाल पाषाणाचा हा स्तंभ साधारण ४०० वर्ष प्राचीन आहे. या किल्ल्यावर गोंड राजे, त्यांचे किल्लेदार तसेच जमीनदारांचे अधिपत्य होते. गड चढताना अर्ध्या अंतरावर एक मजार आहे. हा किल्ला पूर्ण जंगलमय आहे. माथ्यावरील पठारातून आत गेले की भग्न तटबंदीने किल्ला घेरला आहे. तटबंदीच्या बाजूबाजृूने गेलं की भव्य नैसर्गिक तळघर लागतं. बाजूला दोन पाषाण शिल्पांकित खळगे दिसतात. त्याला स्थानिक लोक श्रावणबाळाची कावड म्हणतात. पायऱ्यांनी आत उतरले की अंधारी कोठडी आहे. कैद्यांना येथे ठेवले जात असावे. पठारावरुन सृर्यास्ताचा आनंद घेण्याची मजा काही औरच आहे. म्हणून या किल्ल्यास गोंदिया जिल्ह्यातील पचमढीचा डोंगर असेही म्हणतात. प्रतापगड हा चंद्रपूरच्या गोंड राजांच्या उत्तरेच्या आक्रमणास रोखणारा दुर्ग असून तो देवगडकर गोंडांनी बांधला आहे. किल्ला इ.स. च्या १६ व्या शतकातील असावा. रमणीय असा हा दुर्गराज आहे. साकोलीच्या जवळ त्याच दिशेला कुंभली येथे चुलबंदी नदीच्या काठावर दुर्गादेवीचे ठाणे असून तेथील प्रतिमा प्राचीन आहे. समोरच्या बाजूला भूगर्भाचा चमत्कार दगडी धमन्या व त्यातून जलस्त्राव असा आगळावेगळा देखावा बघायला मिळतो. या ठिकाणास विदर्भाची काशीप्रयाग म्हणतात.

Pratapgarh Fort | Forts of Vidarbha
Pratapgarh Fort | Forts of Vidarbha

सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून प्रतापगडला ओळखल्या जाते. येथे भगवान भोले शंकराची विशालकाय मूर्ती, तर दुसरीकडे ख्वाजा उस्मान गणी हारुणी बाबाचा दर्गा आहे. हिंदू-मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असल्याने लाखो भाविक दरवर्षी याठिकाणी गर्दी करतात.

पर्यटकांनी वेळेचे निट नियोजन केले तर अंबागड, गायमुख, नागझिरा, सानगडी, नवेगाव, गोठणगाव, चूलबंद व शेवटी प्रतापगड असा तीन ते चार दिवसांचा दौरा करुन महामार्गाने नागपूरला परतता येते. प्रतापगड परिसर पक्षीनिरीक्षक, वनस्पतीसंशोधन, संस्कृती अभ्यासक तसेच हौशी पर्यटकांसाठी नंदनवन आहे.शिवाय इतिहास अभ्यासकांसाठीही उत्तम ऐतिहासिक स्थळ आहे.

कसे पोहोचाल | How to reach Pratapgarh Fort | Forts of Vidarbha

येथे एसटी बस किंवा खासगी वाहनाने जाता येईल. गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव ही जोडगावे लागतात. तेथून १६ किमी अंतरावर हा किल्ला लागतो. एसटी बस, खासगी वाहनाने जाता येईल.

तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️

Comments

Post a Comment

तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️

🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
💡
आजचा मराठी शब्द by WhatsUp मराठी
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|Eg. तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|Eg. त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|Eg. डोंगरातील पाणी नितळ आहे.
तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|Eg. तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|Eg. सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
ओंजळ|हाताचा कप्पा|देशज मराठी|हातभर|Eg. त्याने ओंजळीत पाणी घेतले.
हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|Eg. हळुवार वारा वाहत होता.
मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|Eg. तिचा आवाज मंजुळ आहे.
मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|Eg. मृद्गंध दरवळला.
आभाळमाया|असीम प्रेम|देशज मराठी|अपार माया|Eg. आईची आभाळमाया विसरता येत नाही.
धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|Eg. तो संगीतात धुंद झाला.
झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|Eg. थंड झुळूक आली.
नभ|आकाश|संस्कृत|गगन|Eg. नभ निरभ्र होते.
उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|Eg. त्याला आनंदाचा उमाळा आला.
साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|Eg. ती साजिरी दिसत होती.
गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|Eg. फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|Eg. सूर्याचा कवडसा पडला.
जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|Eg. गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|Eg. गाण्याची लय सुंदर होती.
कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|Eg. कोमेजलेली फुले दिसत होती.
दरवळ|मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|Eg. चाफ्याचा दरवळ पसरला.
सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|Eg. सावळ्या ढगांनी आकाश भरले.
सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|Eg. तिचा चेहरा सतेज दिसत होता.
मधुमालती|सुगंधी वेल|संस्कृत|फुलवेल|Eg. अंगणात मधुमालती फुलली होती.
गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|Eg. कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
हुरहूर|मनातील ओढ|देशज मराठी|व्याकुळता|Eg. जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|Eg. गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|Eg. धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|Eg. पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|Eg. दिव्याची ज्योत लवलवत होती.
उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|Eg. तरुणांमध्ये उमेद आहे.
गोजिरी|नाजूक सुंदर|देशज मराठी|साजिरी|Eg. गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|Eg. आंब्याला मोहोर आला आहे.
सुगंधी|सुगंध असलेले|संस्कृत|दरवळते|Eg. सुगंधी फुले बहरली.
अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|Eg. गावचा चहा अमृततुल्य लागतो.
झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|Eg. घंटांचा झंकार झाला.
सहजसुंदर|नैसर्गिक सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|Eg. तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|Eg. आसमंत शांत होता.
सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|Eg. सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|Eg. डोंगरातून निर्झर वाहत होता.
नादमय|संगीतपूर्ण|संस्कृत|सुरेल|Eg. सभागृह नादमय झाले.
मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|Eg. मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|Eg. संगीताचे स्पंदन जाणवत होते.
चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|Eg. वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|Eg. मृदुल वाळूवर पावले उमटली.
अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|Eg. ती अलवार हसली.
स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|Eg. पक्षी स्वैर उडत होते.
सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|Eg. फुलांची सुरभि दरवळली.
दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|Eg. तिच्या डोळ्यांत दीप्ती होती.
प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|Eg. अंगणात प्राजक्त फुलला होता.
निरभ्र|पूर्ण स्वच्छ|संस्कृत|ढगविरहित|Eg. निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.

अजून इंटरेस्टिंग...

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

‘पुरण पोळी’ च्या गावाला जाऊ या....! आजनसरा | Author: Sakhi | Ajansara Temple | Temples in Maharashtra | Maharashtra Tourism

तुम्ही पण होऊ शकता पर्यटन उद्योजिका, महाराष्ट्र शासनाच्या ‘आई’ महिला पर्यटन धोरण | Tours & Travel Entrepreneurship for Women | Startups & Careers | Maharashtra Startup Stories

अलेक्झांडर बर्न्स : बुखाराकडे निघालेला ब्रिटिश प्रवासी | Alexander Burnes and Travels into Bukhara | Travellers of the World

भटाळा गावात आहे ‘भोंडा महादेव’ | Author: Himgauri Deshpande | Bhonda Mahadev Temple Bhatala | Temples of Vidarbha | Temples of Maharashtra

बांबूंच्या बेटातून करा ‘झुकझुक गाडी’ ची रम्य सफर | First Bamboo Garden of India, Amravati | Author: Parijaat | Maharashtra Tourism

महाराष्ट्रातील डार्क स्काय पर्यटन, शहरी गोंगाटापासून दूर, आकाशाच्या कुशीत | Dark Sky Tourism | Astro Tourism | Maharashtra Tourism Policy

नागपुरातील संजीवनग्राममध्ये घ्या ‘वेलनेस टुरिझम’ चा आनंद | Sanjeevan Nature Cure | Wellness Tourism in Maharashtra

भामरागडमध्ये जलक्रांतीतून निर्मित ‘तलावांचे जाळे’ | अनिकेत प्रकाश आमटे | लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte

आळंदी : ज्ञानेश्वर आणि महाराष्ट्राने घडवलेली भक्तीची क्रांती | Alandi & Bhakti Movement in India | Author: Raajan | Temples in Maharashtra | Maharashtra Tourism