देवगड | Deogarh Fort | Forts near Nagpur | Forts in Vidarbha

विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

नागपूर येथून छिंदवाड्यास जाणाऱ्या रस्त्यावर थोडे आडमार्गात घनदाट अरण्यात देवगडचा भव्य किल्ला आहे. किल्ला भग्न असला तरी तेथील अवशेष श्रीमंत गोंड नृपतींचा इतिहास सांगतात. छिंदवाड्याच्या आधी देवगड फाटा लागतो. तेथून ९ किमीवर मोहरवेड (मोखेड) नावाचे गाव आहे. तेथून पुढे ९ किमी लोहांगी गाव आणि मग ७ किमी आत गेलो की देवगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. घाटातून जपून जावे लागते. दक्षिणेला पायथ्याशी देवगड नावाचे खेडे असून उत्तरेला उंचावर अंडगोलाकृती देवगड दिसतो.किल्ल्यावर चढण्यास उतरत्या पायऱ्या आहेत. सर्वप्रथम एका मध्ययुगीन देवालयाचे भग्न अवशेष दिसतात.द्रवीड-नागर स्थापत्यशैलीचा प्रभाव वास्तुंवर दिसतो. चुन्यात बांधकाम केलेले प्रवेशद्वार ४५ फूट उंच आहे. नगारखान्याची वास्तू डौलदार असून गोंड स्थापत्य शैलीचा अद्वितीय नमुना आहे.पश्चिम दिशेला एका उंच ठिकाणी गोंड राजाच्या कुलदेवतांची बैठक असून त्यावर आरोहण करण्यासाठी प्रशस्त पायऱ्या आहेत.

Deogarh Fort | Forts of Vidarbha near Nagpur
Deogarh Fort | Forts of Vidarbha near Nagpur

देवगड ही १८ व्या शतकात गोंड साम्राज्याची राजधानी होती. मध्यप्रदेशातील हे सर्वात मोठे आदिवासी राज्य मानल्या जात होते. असे सांगितले जाते की देवगडला नागपूरशी जोडणारा एक भूमिगत मार्ग होता. आणीबाणीच्या काळात स्वत:च्या बचावासाठी राजे या मार्गाचा उपयोग करीत असत.

किल्ल्यावर ‘मोती टाका’ नावाचा एक तलाव आहे. असे सांगितले जाते की एकेकाळी या जलाशयाचे पाणी इतके स्वच्छ राहात होते की जलाशयाच्या तळाशी असलेले नाणे सुद्धा स्पष्ट दिसायचे. गोंड वंशाचे राजा जाटव याने हा तलाव बांधला होता. खाली उतरताना त्याची समाधी आहे.

Deogarh Fort | Forts of Vidarbha near Nagpur

देवगड किल्ल्याचे डिझाईन मोघल शैलीतील आहे. त्यावरुन हा किल्ला बख्त बुलंद शाहाने बांधला होता असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. बख्त बुलंद शाह हा राजा जाटवचा उत्तराधिकारी होता.

तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️

Comments

🚗

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp community वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Join करा
💡
आजचा मराठी शब्द by What's Up Marathi
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
स्नेह|आपुलकी|संस्कृत (मूलशब्द: स्निह)|प्रेम|Eg. त्यात स्नेह आहे.
उपमा|तुलना|संस्कृत (मूलशब्द: उपम्)|साम्य|Eg. ही सुंदर उपमा आहे.
अर्थवाही|अर्थपूर्ण|संस्कृत (मूलशब्द: अर्थ)|गर्भित|Eg. हे वाक्य अर्थवाही आहे.
लवचिक|वाकता येणारे|देशज (मूलशब्द: लव)|लचकदार|Eg. विचार लवचिक हवेत.
सौंदर्य|सुंदरता|संस्कृत (मूलशब्द: सुंदर)|रम्यता|Eg. निसर्गात सौंदर्य आहे.
मधुर|गोड|संस्कृत (मूलशब्द: मधु)|गोडवा|Eg. स्वर मधुर आहे.

अजून इंटरेस्टिंग...

कॉर्बेट ऑन! जंगलाच्या मध्यभागी सुरू झालेला थरार | Rajas Jaideo | Jim Corbett Safari Experience | Jim Corbett National Park

दीक्षाभूमीची निर्मिती कशी झाली? | Deekshabhoomi Nagpur Travel Guide & History | Vidarbha Buddha Circuit

मंगेशी: आशाताईंच्या स्वप्नात कसं आलं मंगेशी? | Mangeshi Temple | Temples of Maharashtra

होळीचा रंग... कृषी पर्यटनासंग | Amit Naseri | Joshiwadi Agri Tourism near Nagpur | Vidarbha Agri Tourism

विजासन बुद्ध लेणी, चंद्रपूर, बौद्ध सर्कीट | Vijasan Caves, Chandrapur Travel Guide | Vidarbha Buddha Circuit

नागार्जुन गुफा बौद्ध सर्कीट | Nagarjuna Caves Buddha Circuit | Vidarbha Buddha Circuit

जेम्स वेल्स : पुण्याचा इतिहास रंगवणारा चित्रकार प्रवासी | James Wales in Maratha Pune | Travellers of the World

विदर्भातील ‘मधाचे गाव’ बघितले का? | Honey Village Andharwadi Travel Guide | Agri Tourism in Maharashtra

जगन्नाथ स्तूप, पवनी: बौद्ध सर्कीट | Jagannath Stupa, Pauni | Vidarbha Buddha Circuit Travel Guide

विदर्भातील बौद्ध सर्किट : इतिहास, शांतता आणि अनोखा प्रवास | Vidarbha Buddhist Circuit Travel Guide

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा