अनंत ज्यांची इच्छाशक्ती ! गतवैभवासह डौलात उभं आहे हिरोशिमा | Author: Savita Deo Harkare | Travel Experience in Japan in Marathi Part 7

आठवणीतील जपान भाग सात (अंतिम) | Travel Experience in Japan in Marathi Part 7


जपान-दक्षिण आशिया मैत्री कार्यक्रमाअंतर्गत भारताच्या २३ सदस्यीय प्रतिनिधीमंडळात निवड झाली तेव्हापासूनच माझ्या मनाला एक हुरहुर लागली होती. कारण जपान म्हटलं की हिरोशिमा आणि नागासाकी आपसुकच आठवतात. आपल्याला ही दोन शहरं बघायला मिळतील काय? याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. आणि प्रत्यक्षात हिरोशिमाचा प्रवास सुरु झाला तेव्हा तर अंगावर रोमांच उभे झाले होते. नगोयावरुन आम्ही निघालो त्या क्षणापासून अगदी तेथे पोहोचेपर्यत मनात विचारांचं काहुर माजलं होतं. जगातील साऱ्या मानवजातीला कलंक फासणारा पहिला अणुबॉम्ब ज्या शहरावर टाकला ते हिरोशिमा शहर आता कुठल्या परिस्थितीत असेल, तेथील लोक या धक्क्यातून सावरले असतील काय? असे प्रश्न मनात डोकावत होते. आणि साक्षात हिरोशिमा शहरात पाऊल ठेवल्यानंतर आश्चर्याचा सुखद धक्का बसला. अणुबाम्बनं उद्ध्वस्त झालेलं हेच ते हिरोशिमा यावर क्षणभर विश्वासच बसेना. अतिशय वेगानं पुन्हा डौलात उभं झालेलं हे शहर बघितल्यानंतर आम्ही जपानी लोकांच्या जिद्दीला सलाम ठोकला.

Hiroshima

हिरोशिमाचा इतिहास | Hiroshima History in Marathi

इतिहासाची पानं चाळली तेव्हा एकएका गोष्टीचा उलगडा होत गेला. १५ व्या शतकाच्या मध्यापासून हिरोशिमाचा इतिहास प्रारंभ होतो. १६ व्या शतकाच्या अखेरीस मोरीक्लॅम चुगोकु जिल्ह्यावर प्रभाव असणाऱ्या हिरोशिमाला राजधानी म्हणून विकसित केलं. तेव्हापासूनच संपूर्ण चुगोकु जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर म्हणून हिरोशिमा ओळखू जाऊ लागलं. अतिशय सुंदर अशा विलो वृक्षांनी वेढलेलं एक स्थळ अशी हिरोशिमाची जपानभर ख्याती होती. अनेक शतकांपासून या शहराचं नाव जगाला ऐकून माहिती होतं मात्र पहिल्या अणुबॉम्बचं लक्ष्य ठरल्यानंतर ते जगासमोर आलं. मेडजी युगात हिरोशिमा व्यापार आणि शिक्षणाचं मोठं केंद्र मानलं जायचं. कालांतरानं या शहरातील सैनिकी साधनेही वाढू लागली. हिरोशिमा सैनिक शिक्षण क्षेत्रात नावारुपास येऊ लागलं. परंतु अचानक अणुबॉम्बच्या रुपात काळानं या शहरावर झडप घातली.




ती काळीकुट्ट सकाळ

Hiroshima Atomic Bomb Attack

६ ऑगस्ट १९४५ ची ती सकाळ हिरोशिमावासीयांकरिता अंधकारच घेऊन आली. नेहमीप्रमाणे त्या दिवशीही पहाटेपासून सर्व व्यवहार सुरू झाले होते. लोक आपआपल्या कामाला लागले होते. रविवारचा दिवस म्हणजे शाळांमधील मुलांचा समाजसेवेचा दिवस होता. त्यामुळं शाळकरी मुलांची रस्त्यांवर वर्दळ होती. सर्वच जण मोठ्या उत्साहानं कामाला लागले होते. त्याचवेळी काळ त्यांच्या डोक्यावरुन घिरट्या घालत होता. एका क्षणात सर्वत्र हाहाकार माजला. कोणाला काही कळण्यापूर्वीच आगीचे लोळचे लोळ पसरले. इमारती जमीनदोस्त झाल्या. हजारावर लोक क्षणात मृत्युमुखी पडले. साºया मानवजातीला कलंक फासणारा पहिला अणुबॉम्ब हिरोशिमावर टाकण्यात आला होता. ‘लिटील बॉय’ नावाच्या या बॉम्बची नरसंहारक क्षमता टीएनटीच्या जवळपास १५ हजार टन एवढी होती. या भीषण स्फोटात ९९ टक्के शहर उध्वस्त झालं होतं. लहान मुलं आगीत होरपळली होती. मात्र या जबर धक्क्यानंतरही युद्धोत्तर काळात हे शहर एक आधुनिक आणि प्रगतशील शहर म्हणून ओळखलं जात आहे. येथील शांती स्मृती पार्कमधील पांढरी कबुतरे आकाशात उडत असल्याचं आणि चिमुकली बालकं निरागसपणे हसतखेळत असल्याचं दृष्य बघितल्यानंतर कोणे एकेकाळी या शहरावर बॉम्ब टाकण्यात आला होता यावर विश्वासच बसत नव्हता. पाण्यावर वसलेले शहर म्हणून ओळखल्या जाणाºया या शहरात नद्या आणि पुलांची भरमार आहे. आवश्यक औद्योगिक कारखान्यांशिवाय येथे स्वयंचलित वाहने, पोलाद, जहाज बांधणी, फर्निचरशिवाय इतरही अनेक उद्योग मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. हिरोशिमात पोहोचल्यानंतर दुसºया दिवशी सकाळी येथील शांती उद्यानात गेलो. ओटा नदीच्या किनारी उभारलेल्या या उद्यानात सर्वत्र हिरवळच हिरवळ आहे. याच ओटा नदीच्या दोन शाखांवरचा पुल ‘एनोला गे’ चं मुख्य लक्ष होता,असं सांगण्यात आलं. ज्या विमानातून हिरोशिमावर अणुबॉम्ब फेकण्यात आला त्या विमानाचं नाव ‘एनोला गे’ होतं. स्मारकात लहान मुलांसोबतच तरुण आणि वृद्ध लोकांचेही येणे जाणे सुरु होते. आजही विश्वशांतीची प्रार्थना करण्याकरिता दररोज असंख्य लोक येथे येत असतात. बॉम्बस्फोटात अपंगत्व आलेले एकदोन जण व्हिलचेअरवर येथे आलेले दिसले.

ऑटोमिक बॉम्ब डोम

Atomic Bomb Dome, Hiroshima
Atomic Bomb Dome, Hiroshima

या पार्कच्या अगदी बाजूला असलेल्या हिरोशिमा इंडस्ट्रीयल प्रोमोशन हॉलचे अवशेष हिरोशिमातील बॉम्बस्फोटांची जणू साक्षच देत होते. एकेकाळी याच इमारतीत चांगली चहेलपहेल राहात होती. बॉम्ब स्फोटानंतर शिल्लक राहिलेल्या या इमारतीचे अवशेष काळजीपूर्वक जतन करण्यात आले आहेत. या इमारतीवरील घुमटाच्या छत्रीसारख्या आकारामुळे येथील जनतेने त्याला ‘ऑटोमिक बॉम्ब डोम’ असं नाव दिलं. बॉम्बस्फोटानंतर झालेली जखम भरुन काढताना लोकांना या जखमेचा संपूर्ण विसर पडू नये म्हणून कदाचित हे अवशेष कायम ठेवण्यात आले आहेत.

याच उद्यानामध्ये एक शांती ज्योत आहे. ही ज्योत वर्षभर जळत असते. पृथ्वीवरील अण्वस्त्रे जोपर्यत नष्ट होत नाहीत तोपर्यत ही ज्योत अशीच तेवत ठेवण्याचा निर्धार जपानी लोकांनी केला आहे. येथील एका शाळकरी मुलीच्या स्मृतीत बांधण्यात आलेल्या स्मारकाचा इतिहास तर मन हेलावून टाकणारा आहे. विस्फोटात ठार झालेल्या या मुलीला रंगीबेरंगी कागदांच्या पट्ट्या जमविण्याचा छंद होता. हजारो पट्ट्या जमविण्याची तिची इच्छा होती. तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी लहान मुलं तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी सोबत रंगीत कागदाच्या पट्ट्या घेऊन येतात. आणि या ठिकाणी विश्व शांतीची प्रार्थना करतात.या स्मारकाच्या सभोवताल रंगीबेरंगी कागदी पट्ट्यांचे ढीग साचले आहेत. पार्कच्या मध्यभागी भव्य अणुबॉम्ब स्मृती स्मारक बांधण्यात आलं आहे. या स्मारकाचं काम १९५२ मध्ये पूर्ण झालं. या स्मारकामधील उध्वस्त हिरोशिमाची आठवण ताज्या करणाºया वस्तु बघितल्यानंतर मन सुन्न झालं होतं. स्फोटाच्या भीषणतेची जाणीव झाली. घरातील भांडी, लोकांचे फाटलेले कपडे, शाळकरी मुलांचे रक्ताने माखलेले गणवेश बघताना डोळ्यातून केव्हा अश्रु वाहू लागले कळलेच नाही. विशेष म्हणजे या विस्फोटानंतर अमेरिकेनं काढलेली छायाचित्रे येथे लावण्यात आली आहेत. या घटनेची संपूर्ण माहिती देणारी कॅसेट येथे होती. स्मारकात प्रवेश केल्यानंतर ही कॅसेट आणि टेपरेकॉर्डर आम्हाला देण्यात आला. हे वर्णन ऐकता ऐकता स्मारकातील अवशेष बघताना या भीषण घटनेचं जिवंत चित्रच डोळ्यासमोर उभं ठाकलं होतं. किती विदारक परिस्थिती निर्माण झाली असेल त्यावेळी.

ओटा नदीच्या किनारी


येथील ओटा नदी या विद्ध्वंसाची फार मोठी साक्षीदार आहे. बॉम्बस्फोटानंतर संपूर्ण शहर एका विराट वादळाच्या आवर्तनात सापडलं असताना अग्निज्वाळा आणि वादळापासून बचावाकरिता हजारो अगतिक नागरिकांनी स्वत:ला या नदीत झोकून दिलं होतं. परंतु समुद्राला मिळणाºया या नदीत आणि समुद्रातही प्रचंड लाटा निर्माण झाल्यानं या सर्वांचा अंत झाला. ओटा नदीच्या किनारी आमच्या सोबत असलेल्या जपानी मैत्रिणीनं स्फोटानंतरचं विदारक चित्र वर्णन केलं तेव्हा सर्वांचे डोळ पाणावले. ओटा नदीचा प्रवाह मात्र संथपणे वाहात होता.

बॉम्बस्फोटाचा केंद्रबिंदू बघताना..

हे स्मारक बघण्यासाठी आम्हाला फक्त दीड तासांचा वेळ देण्यात आला होता. त्यामुळं सुरुवातीपासूनच आम्ही थोडं नाराज होतो. वेळ केव्हा निघून गेला कळलेच नाही. आमच्या समन्वयकांनी जेवणासाठी जाण्याची घाई सुरु केली होती. पाय निघत नव्हता पण नाईलाज होता. जेवतानाही मन अस्वस्थ होतं. या स्मृती उद्यानात आणखी काही वेळ घालवण्याची इच्छा होती. आमच्या जवळ शहराचा संपूर्ण नकाशा होताच. शिवाय ज्या हॉटेलमध्ये आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती ते हॉटेलही या स्मृती उद्यानापासून जवळच होतं. जपानमधील वास्तव्याला बरेच दिवस लोटून गेल्याने हिंमत वाढली होती.आम्ही पाच-सहा जण दुपारी पुन्हा या ऐतिहासिक स्मृती उद्यानात गेलो. तेथील एकएक वस्तु परत निरखून बघितली,अनुभवली. हे सर्व बघत असतानाच बॉम्ब नेमका कुठे पडला, त्याचा केंद्रबिंदू कुठे होता हे बघण्याची उत्सुकता लागली होती. कारण ते स्थळ या स्मृती उद्यानात नव्हतं. जवळ असलेल्या नकाशातून आम्ही ते स्थळ शोधून काढलं. दीड दोन तास भटकल्यानंतर एका गल्लीत एक छोटासा स्तंभ दिसला. त्या स्तंभावर लिहिलेले लिखाण वाचलं. ६ ऑगस्ट १९४५ रोजी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी हिरोशिमावर टाकण्यात आलेला अणुबॉम्ब नेमका याच ठिकाणी पडला होता. भरवस्तीतील ही जागा स्मारकापासून काही अंतरावर आहे. याच्या बाजूलाच मोठा बाजारही आहे. बॉम्ब स्फोटानंतर येथं भला मोठा खड्डा पडला होता. आता मात्र हा खड्डा बुजविण्यात आला असून याठिकाणी हिरवं गवत उगवलं आहे. जगातील पहिला अणुबॉम्ब ज्या शहरावर पडला ते हिरोशिमा आणि नेमका ज्या ठिकाणी पडला ते ठिकाण बघितल्यानंतर या दौºयाचं खºया अर्थानं सार्थक झाल्यासारखं वाटलं. आणि येथील आजचे वैभव बघून जपानी लोकांचं कौतुकही वाटलं. दुसºया महायुद्धात अमेरिकेनं केलेल्या अणुबॉम्ब हल्ल्यात जपान बेचिराख झाला. मात्र अल्पावधीतच या देशानं आपलं पूर्वीचं वैभव प्राप्त करुन पुन्हा आपला दबदबा सिद्ध केला. तो केवळ जपानी नागरिकांच्या देशभक्तीमुळे.

देशभक्तीने ओतप्रोत जपानी माणूस

जपानी माणूस देशासाठी कोणताही त्याग करण्यास सदैव तत्पर असतो. अणुबॉम्ब स्फोटानंतरही त्याची प्रचिती आली. त्यावेळी येथील दाखविलेल्या धाडसाच्या अनेक कथा ऐकायला मिळाल्या. आग शहरभर पसरु नये म्हणून हिरोशिमात सत्तर हजारांवर घरे पाडून तीन लांबलचक अग्निरोधक पट्टे तयार करण्यात आले होते. लाखावर लोकांना शहर सोडून बाहेर जावं लागलं.
जपानी सरकारनं देशवासीयांना त्यांच्या घरात असलेलं निरुपयोगी लोखंड (भंगार )सरकार जमा करण्याचं आवाहन केलं. या आवाहनाला लगेच प्रतिसाद मिळाला. प्रत्येक जण आपल्या घरातील निरुपयोगी लोखंड आणून रस्त्यामधील मोठ्या चौकात टाकू लागला. बघता बघता केवळ चारपाच दिवसात चौकाचौकात भंगाराचे ढिगारे जमा झाले. सरकारने ते सर्व लोखंड जमा करुन कारखान्यात नेलं व त्या भंगारापासून थोड्याच दिवसात रेल्वेची सात इंजिने तयार केली.



जगाला शांतीचा संदेश
या महाभयंकर घटनेच्या स्मृती अजूनही येथील जनतेच्या मनातून पुसल्या गेलेल्या नाहीत. प्रत्येकाच्या मनात ही आठवण अजूनही ताजी असली तरी या डोंगराऐवढ्या दु:खाने हे लोक खचले नाहीत किंवा रडतही बसले नाहीत. उलट नव्या जोमाने, नव्या जिद्दीने परत कामाला लागले. आणि एका नवीन हिरोशिमाची निर्मिती केली. युद्धाला युद्धानेच उत्तर अशी बदल्याची भावना मनात न बाळगता जगाला शांतीचा संदेश देण्याचे कार्य येथील जनता करीत आहे.

तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️


सविता ‘देव’ हरकरे
Consulting Editor
WhatsUp मराठी

जपानसाठी ‘टेकऑफ’ आणि ‘ओचा’, ‘कोचा’ | Travel Experience in Japan in Marathi Part 1





Comments

  1. जपानी लोकांची इच्छाशक्ती आणि मेहनतीला सलाम

    ReplyDelete

Post a Comment

🌍✍️ तुमचं मत नक्की कळवा. तुमची ओळख न सांगताही तुमचा अभिप्राय देऊ शकता.

🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
आजचा मराठी शब्दआजचा प्रश्न
या शब्दाचा अर्थ काय आहे?तुम्हाला याचे उत्तर माहीत आहे का?
उत्तरासाठी कार्ड उलटा
अर्थउत्तर
उगमअधिक माहिती
समानार्थीश्रेणी
वाक्यात उपयोग
WhatsUp मराठी पुन्हा उलटा
जानेवारी|फेब्रुवारी|मार्च|एप्रिल|मे|जून|जुलै|ऑगस्ट|सप्टेंबर|ऑक्टोबर|नोव्हेंबर|डिसेंबर
WORD|अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
WORD|लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
WORD|नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|डोंगरातील पाणी नितळ आहे.
WORD|तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
WORD|रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
WORD|ओंजळ|दोन्ही हातांचा केलेला कप्पा|देशज मराठी|हातभर|त्याने ओंजळीत पाणी घेतले.
WORD|हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|हळुवार वारा वाहत होता.
WORD|मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|तिचा आवाज मंजुळ आहे.
WORD|मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|पहिल्या सरीनंतर मृद्गंध दरवळला.
WORD|आभाळमाया|असीम, अपार प्रेम|देशज मराठी|अपार माया|आईची आभाळमाया विसरता येत नाही.
WORD|धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|तो संगीतात धुंद झाला.
WORD|झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|संध्याकाळी थंड झुळूक आली.
WORD|नभ|आकाश|संस्कृत|गगन|पहाटे नभ निरभ्र होते.
WORD|उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|त्याला आनंदाचा उमाळा आला.
WORD|साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|ती साजिरी दिसत होती.
WORD|गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
WORD|कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|फटीतून सूर्याचा कवडसा पडला.
WORD|जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
WORD|लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|गाण्याची लय सुंदर होती.
WORD|कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|फुलदाणीत कोमेजलेली फुले दिसत होती.
WORD|दरवळ|पसरणारा मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|चाफ्याचा दरवळ पसरला.
WORD|सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|सावळ्या ढगांनी आकाश भरले.
WORD|सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|तिचा चेहरा सतेज दिसत होता.
WORD|मधुमालती|सुगंधी फुलांची वेल|संस्कृत|फुलवेल|अंगणात मधुमालती फुलली होती.
WORD|गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
WORD|हुरहूर|मनातील अस्वस्थ ओढ|देशज मराठी|व्याकुळता|जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
WORD|निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
WORD|तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
WORD|मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
WORD|लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|दिव्याची ज्योत लवलवत होती.
WORD|उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|तरुणांमध्ये नवी उमेद आहे.
WORD|गोजिरी|नाजूक व सुंदर|देशज मराठी|साजिरी|गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
WORD|मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|आंब्याला मोहोर आला आहे.
WORD|अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|गावचा चहा अमृततुल्य लागतो.
WORD|झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|मंदिरातील घंटांचा झंकार झाला.
WORD|सहजसुंदर|नैसर्गिकरीत्या सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
WORD|आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|पहाटेचा आसमंत शांत होता.
WORD|सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
WORD|निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|डोंगरातून निर्झर वाहत होता.
WORD|नादमय|संगीताने भरलेला|संस्कृत|सुरेल|सभागृह नादमय झाले.
WORD|मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
WORD|स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|संगीताचे स्पंदन जाणवत होते.
WORD|चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
WORD|मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|मृदुल वाळूवर पावले उमटली.
WORD|अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|ती अलवार हसली.
WORD|स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|पक्षी स्वैर उडत होते.
WORD|सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|फुलांची सुरभि दरवळली.
WORD|दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|तिच्या डोळ्यांत वेगळीच दीप्ती होती.
WORD|प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|अंगणात प्राजक्त फुलला होता.
WORD|निरभ्र|ढगविरहित, पूर्ण स्वच्छ|संस्कृत|स्वच्छ|निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?|रायगड|६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातून वाहणारी सर्वात लांब नदी कोणती?|गोदावरी|त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे उगम पावणारी गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी असून तिला 'दक्षिण गंगा' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली?|१ मे १९६०|संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये अस्तित्वात आली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?|कळसूबाई|अहिल्यानगर जिल्ह्यातील हे शिखर सुमारे १,६४६ मीटर उंच असून ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे.|भूगोल
GK|संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' कोणत्या गावी लिहिली?|नेवासे|अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथे भगवद्गीतेवरील ही मराठी टीका लिहिली गेली.|संस्कृती
GK|लोणार सरोवर कशामुळे तयार झाले?|उल्कापातामुळे|बुलढाणा जिल्ह्यातील हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बेसाल्ट खडकात उल्का आदळून तयार झालेले जगातील दुर्मीळ सरोवर आहे.|भूगोल
GK|तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला?|सिंहगड (कोंढाणा)|१६७० मधील या लढाईत तानाजी धारातीर्थी पडले; 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार प्रसिद्ध आहेत.|इतिहास
GK|अफझलखानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला?|प्रतापगड|१६५९ मध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाजवळ ही ऐतिहासिक भेट व संघर्ष घडला.|इतिहास
GK|मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?|दर्पण|बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये 'दर्पण' सुरू केले; त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक मानले जाते.|संस्कृती
GK|'केसरी' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?|लोकमान्य बाळ गंगाधर टिळक|१८८१ मध्ये मराठीतून 'केसरी' आणि इंग्रजीतून 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू झाली.|इतिहास
GK|'सत्यशोधक समाज' कोणी स्थापन केला?|महात्मा जोतिराव फुले|२४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात स्थापन झालेली ही संस्था सामाजिक समतेसाठी कार्यरत होती.|इतिहास
GK|'श्यामची आई' या पुस्तकाचे लेखक कोण?|साने गुरुजी|पांडुरंग सदाशिव साने यांनी नाशिकच्या कारागृहात हे पुस्तक लिहिले.|साहित्य
GK|'नटसम्राट' या गाजलेल्या नाटकाचे लेखक कोण?|वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)|कुसुमाग्रजांना १९८७ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.|साहित्य
GK|मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा होतो?|२७ फेब्रुवारी|कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.|संस्कृती
GK|वेरूळ येथील कैलास लेणे कोणत्या राजवटीत कोरले गेले?|राष्ट्रकूट|एकाच अखंड खडकात वरून खाली कोरलेले हे मंदिर जगातील स्थापत्यशास्त्रीय आश्चर्य मानले जाते.|इतिहास
GK|अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?|छत्रपती संभाजीनगर|बौद्ध चित्रकला व शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेली ही लेणी युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहेत.|पर्यटन
GK|एलिफंटा लेणी कोणत्या देवतेला समर्पित आहेत?|शिव|मुंबईजवळील घारापुरी बेटावरील त्रिमूर्ती शिल्प जगप्रसिद्ध आहे.|पर्यटन
GK|महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत?|पाच|भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ — बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत.|संस्कृती
GK|अष्टविनायक म्हणजे किती गणपती मंदिरे?|आठ|पुणे, रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विखुरलेली ही आठ स्वयंभू गणपती मंदिरे आहेत.|संस्कृती
GK|कृष्णा नदीचा उगम कोठे होतो?|महाबळेश्वर|सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्या उगम पावतात.|भूगोल
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?|शिवनेरी|पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या या किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी त्यांचा जन्म झाला.|इतिहास
GK|संत तुकाराम महाराजांचे गाव कोणते?|देहू|पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीकाठचे देहू हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.|संस्कृती
GK|संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?|आळंदी|पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली.|संस्कृती
GK|सेवाग्राम आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?|वर्धा|महात्मा गांधींनी १९३६ मध्ये येथे वास्तव्य सुरू केले; हे स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्वाचे केंद्र ठरले.|इतिहास
GK|पवनार आश्रम कोणाशी संबंधित आहे?|आचार्य विनोबा भावे|वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून विनोबांनी भूदान चळवळीचे कार्य केले.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते?|ताडोबा|चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा १९५५ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झाले; पुढे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तयार झाला.|वन्यजीव
GK|'संत्रानगरी' म्हणून कोणते शहर ओळखले जाते?|नागपूर|संत्र्यांच्या व्यापारामुळे मिळालेले हे नाव; नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.|भूगोल
GK|महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणते शहर मानले जाते?|पुणे|शिक्षण, साहित्य, नाट्य आणि संगीत परंपरेमुळे पुण्याला हे स्थान मिळाले आहे.|संस्कृती
GK|रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते?|रायरी|शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केली.|इतिहास
GK|पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?|१७६१|मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यातील या लढाईचा मराठा साम्राज्यावर मोठा परिणाम झाला.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेचे नाव काय?|जिजाबाई|जिजाऊंनी शिवरायांवर स्वराज्याचे संस्कार केले; त्यांना राजमाता म्हणून ओळखले जाते.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळ घोषित झाले?|२००४|व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतील ही वास्तू मुंबईचे प्रतीक मानली जाते.|पर्यटन
GK|गेट वे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे?|मुंबई|१९२४ मध्ये पूर्ण झालेली ही वास्तू अरबी समुद्राच्या काठी उभी आहे.|पर्यटन
GK|'लोकहितवादी' या टोपणनावाने कोण लेखन करत असत?|गोपाळ हरी देशमुख|त्यांच्या 'शतपत्रे' या लेखमालेने एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारणेला दिशा दिली.|साहित्य
GK|मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?|वि. स. खांडेकर|'ययाति' या कादंबरीसाठी १९७४ मध्ये त्यांना हा सन्मान मिळाला.|साहित्य
GK|जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?|गोदावरी|छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या धरणाच्या जलाशयाला 'नाथसागर' म्हणतात.|भूगोल
GK|कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?|सातारा|जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या धरणाच्या जलाशयाला 'शिवसागर' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते?|ताम्हण (जारूळ)|जांभळ्या रंगाची ही फुले पावसाळ्यात सह्याद्रीत मोठ्या प्रमाणात दिसतात.|निसर्ग
GK|महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?|शेकरू|मोठी उडणारी खार असलेला शेकरू भीमाशंकर अभयारण्यात प्रामुख्याने आढळतो.|वन्यजीव
GK|कास पठार कशासाठी प्रसिद्ध आहे?|रानफुलांच्या बहरासाठी|सातारा जिल्ह्यातील हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ पावसाळ्यानंतर फुलांच्या गालिच्यासाठी ओळखले जाते.|पर्यटन
GK|भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी ओळखले जाते?|शेकरू|पुणे जिल्ह्यातील हे अभयारण्य ज्योतिर्लिंगासाठीही प्रसिद्ध आहे.|वन्यजीव

अजून इंटरेस्टिंग...

विदर्भात समुद्र होता तेव्हा...! | Author: Prof Suresh Chopne | Ocean in Vidarbha Maharashtra? | Heritage Tourism | Maharashtra Tourism

श्रीकृष्णाच्या नगरीत... द्वारकाधीशांच्या चरणी, भाग १ | Author: Mrs. Manik Joshi | Dwarkadheesh Temple | Heritage Tourism | Incredible India

महाराष्ट्रातील डार्क स्काय पर्यटन, शहरी गोंगाटापासून दूर, आकाशाच्या कुशीत | Dark Sky Tourism | Astro Tourism | Maharashtra Tourism Policy

भारताचा प्राचीन 'सिल्क रूट’ नाणेघाट | Author: Narendra Chandewar | Silk Route of India, Naneghat | Maharashtra Tourism

चंद्रपूर: निसर्ग, इतिहास, संस्कृती, लोकजीवन आणि वारशाचा समृद्ध पर्यटनपट | Author: Dr. Pallavi Tajne | Chandrapur Culture and Heritage | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

गोठवणाऱ्या थंडीत आयफेल टॉवरचा अद्‌भूत नजारा... पुस्तकांच्या पलीकडे, जगाच्या जवळ | Author: Yash Naseri | Eiffel Tower Paris | International & Global Tourism

भामरागडमध्ये जलक्रांतीतून निर्मित ‘तलावांचे जाळे’ | अनिकेत प्रकाश आमटे | लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte

विदर्भातही येऊन गेले होते गौतम बुद्ध: विदर्भातील बौद्ध सर्किट | Vidarbha Buddhist Circuit Travel Guide

भटाळा गावात आहे ‘भोंडा महादेव’ | Author: Himgauri Deshpande | Bhonda Mahadev Temple Bhatala | Temples of Vidarbha | Temples of Maharashtra