नागपूर - प्राचीन मंदिर पर्यटनाचा हब | Temples near Nagpur | Temples of Vidarbha

विदर्भातील मंदिरे | Temples near Nagpur | Temples of Vidarbha

नागपूर ही व्याघ्र राजधानी समजली जाते. देशविदेशातील पर्यटक केवळ व्याघ्र दर्शनासाठी येथे येतात. परंतु वाघांशिवाय नागपूरसह विदर्भातील प्राचीन मंदिरे हा सुद्धा या भूमीला लाभलेला अमूल्य वारसा आहे. या मंदिरांचे योग्य पद्धतीने जतन आणि संवर्धन झाल्यास मंदिर पर्यटनाचे हब होण्याची क्षमता या क्षेत्रात आहे.

विदर्भातील प्राचीन मंदिरे आणि प्रामुख्याने भोसलेकालीन मंदिरांच्या स्थापत्यकलेचा अभ्यास व संशोधन करण्याकरिता अमेरिकेच्या वरिष्ठ संशोधक कॅथलिन कमिग्ज मध्यंतरी नागपुरात आल्या होत्या. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या. नागपुरातील प्राचीन मंदिरांचे वैभव,देखणेपण बघून त्या चकीत झाल्या.

आठवडाभराच्या मुक्कामात त्यांच्यासोबत काही मंदिरांना भेटी दिल्या. नवी शुक्रवारीतील काशीबाई मंदिरासह बहुतांश प्राचीन मंदिरांचा दौरा केला तेव्हा एकेकाळी ही मंदिरे म्हणजे केवढे मोठे वैभव होते याची प्रचिती आली. ही मंदिरे प्राचीन कृलाकृती आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. विशेषत: काशीबाई मंदिराच्या रचनेने त्या फारच प्रभावित झाल्या. मुळात हे मंदिर म्हणजे भोसलेकालीन स्मशानभूमी आहे. येथेच पहिले राजे रघुजी यांची समाधी आहे.

Swaminarayan Temple, Nagpur

कॅथलिन या बर्मिंगहम येथील द युनिव्हर्सिटी ऑफ अल्बामामध्ये कला आणि कला इतिहास या विषयाच्या सहयोगी अधिव्याख्याता आहेत. प्राचीन इतिहास आणि स्थापत्यकलेच्या संशोधक असलेल्या कॅथलिन यांना अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर इंडियन स्टडीज या संस्थेची फेलोशिप आहे. ही संस्था भारतातील १३०० वर्षांपूर्वीची मंदिरे आणि प्रामुख्याने प्राचीन हिंदू मंदिरांच्या स्थापत्यकलेला अभ्यास करते आहे. भोसलेकालीन मंदिरांची स्थापत्यकला हा त्यातील फार मोठा आणि महत्वाचा भाग आहे. भोसल्याचे अस्तित्व छत्तीसगड, मध्य प्रदेश, निजामापासून अगदी ओडिशा, उत्तर प्रदेशपर्यंत होते. गंगेवर भोसल्यांचा घाट आहे. मराठा राजकारण आणि पेशव्यांचा अभ्यास करीत असताना कॅथलिन यांना व्हर्जिनिअन म्युझिअम आफ फाईन आर्टमध्ये १८ व्या शतकातील ज्ञानेश्वरीसह इतर काही चित्रे अर्धवट अवस्थेत दिसली. उत्सुकतेपोटी खोलात जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्राचीन काळात नागपूर हे मिनिएचर मॅनस्क्रिप्ट पेंटिंगचे फार मोठे केंद्र असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या चित्रांची देखभाल न झाल्याने ती वेगवेगळ्या ठिकाणी विखुरली गेली होती. सर्वप्रथम या चित्रांच्या मुळापर्यंत पोहोचण्याची ओढ त्यांना नागपूरला घेऊन आली. आणि त्यातूनच पुढे येथील मंदिरांच्या स्थापत्यकलेचे अध्ययन करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. नागपूरचा हा त्यांचा चौथा दौरा होता. मार्कंडा,रामटेक,धापेवाडा, आदासासह विदर्भातील बहुतांश मंदिरांना त्यांनी भेट दिल्या आहेत.

या मंदिरांचे सौंदर्य बघून त्या प्रचंड भारावल्या. अनेक मंदिरे अप्रतिमच आहेत. वाड्यातील (महाल) कल्याणेश्वर, पाताळेश्वर, नागेश्वर, राजराजेश्वर तसेच रुख्मिणी मंदिराचे स्थापत्य अद्भूत आहे. शुक्रवारी तलावाच्या आग्नेय दिशेला असलेले विश्वेश्वर मंदिर हे तर उच्चकोटीच्या पाषाण कारागिरीचा उत्कृष्ट नमुना आहे,असे त्या म्हणतात. भोसल्यांच्या मंदिरांचे एक वैशिष्ट्य हे की भोसलेंचा प्रदेश फार दूरवर पसरला होता. त्याची छाप येथील मंदिरांच्या कलाकृतींवर स्पष्टपणे जाणवते.

भोंसले कालीन मंदिरे | Temples of Nagpur during Bhosles History

सव्वाशे वर्षांच्या भोसलेंनी एकट्या नागपूर शहरात शेकडो मंदिरांची निर्मिती केली. त्यापैकी काही दुरवस्था आणि देखभालीअभावी काळाच्या पडद्याआड गेली. परंतु काही मंदिरे काळाचा आघात सहन करीत आजही अस्तित्वात आहेत. त्यांच्या कलाकृती झिजल्या असल्या तरी जे काही नक्षीकाम शिल्लक आहे त्यावरुन त्यांचे सौंदर्य लक्षात येते. अनेक मंदिरे पुरातत्व सर्वेक्षण विभागाअंतर्गत येत नसून खासगी मालमत्ता आहे. त्यामुळे त्यांच्या देखभालीचा गंभीर प्रश्न आहे. अनेक मंदिरे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली आहेत. काही जीर्णावस्थेत आहेत.

राजस्थान,उत्तर प्रदेश, दक्षिणेकडील राज्यांमध्ये मंदिर पर्यटनाचा जसा विकास झाला तसाच येथेही होऊ शकतो. गरज आहे ते केवळ इच्छाशक्तीचे,असे कॅथलिन यांना वाटते. ही मंदिरे आज कुणा एकाच्या मालकीची नसली तरी मनपा स्तरावर त्यांच्या संवर्धनाची काळजी घेतली जाऊ शकते. प्राचीन मंदिरांच्या रुपातील हा अनमोल ठेवा जपला गेला पाहिजे. यादृष्टीने नागपुरांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️

Comments

Home Community
Font
🚗
आवडलं का हे ठिकाण?
यात्रा नियोजनासाठी संपर्क करा
🚗

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp community वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Join करा
आजचा मराठी शब्द by What's Up Marathi
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
स्नेह|आपुलकी|संस्कृत (मूलशब्द: स्निह)|प्रेम|Eg. त्यात स्नेह आहे.
उपमा|तुलना|संस्कृत (मूलशब्द: उपम्)|साम्य|Eg. ही सुंदर उपमा आहे.
अर्थवाही|अर्थपूर्ण|संस्कृत (मूलशब्द: अर्थ)|गर्भित|Eg. हे वाक्य अर्थवाही आहे.
लवचिक|वाकता येणारे|देशज (मूलशब्द: लव)|लचकदार|Eg. विचार लवचिक हवेत.
सौंदर्य|सुंदरता|संस्कृत (मूलशब्द: सुंदर)|रम्यता|Eg. निसर्गात सौंदर्य आहे.
मधुर|गोड|संस्कृत (मूलशब्द: मधु)|गोडवा|Eg. स्वर मधुर आहे.
सामर्थ्य|क्षमता|संस्कृत (मूलशब्द: समर्थ)|शक्ती|Eg. त्याच्यात सामर्थ्य आहे.
आल्हाददायक|आनंददायी|संस्कृत (मूलशब्द: आल्हाद)|आनंदकारक|Eg. हवामान आल्हाददायक आहे.
उज्ज्वल|प्रकाशमान|संस्कृत (मूलशब्द: ज्वल)|तेजस्वी|Eg. भविष्य उज्ज्वल आहे.
निखळ|शुद्ध|देशज (मूलशब्द: निख)|निर्मळ|Eg. निखळ आनंद मिळाला.
सुहास्य|हसतमुख|संस्कृत (मूलशब्द: हास)|हसरा|Eg. चेहरा सुहास्य आहे.
कुतूहल|जिज्ञासा|संस्कृत (मूलशब्द: कुतूहल)|उत्सुकता|Eg. मुलांमध्ये कुतूहल आहे.
संयम|धीर|संस्कृत (मूलशब्द: यम)|नियंत्रण|Eg. संयम ठेवणे गरजेचे.
निराळा|वेगळा|देशज (मूलशब्द: निर)|भिन्न|Eg. हा अनुभव निराळा आहे.
उत्स्फूर्त|स्वाभाविक|संस्कृत (मूलशब्द: स्फुर)|नैसर्गिक|Eg. प्रतिक्रिया उत्स्फूर्त होती.
संतुलन|तोल|संस्कृत (मूलशब्द: तुल)|समतोल|Eg. जीवनात संतुलन हवे.
निखार|तेज|देशज (मूलशब्द: निख)|चमक|Eg. शब्दांत निखार आहे.
शब्दबद्ध|शब्दांत मांडलेले|संस्कृत (मूलशब्द: बंध)|मांडलेले|Eg. विचार शब्दबद्ध केले.
आश्रय|सहारा|संस्कृत (मूलशब्द: श्रि)|आधार|Eg. झाडांचा आश्रय घेतला.
साक्षात्कार|गंभीर जाणीव|संस्कृत (मूलशब्द: अक्ष)|प्रत्यय|Eg. सत्याचा साक्षात्कार झाला.
अनुभूती|भावनिक अनुभव|संस्कृत (मूलशब्द: भू)|जाणीव|Eg. सुंदर अनुभूती मिळाली.
संचित|साठवलेले|संस्कृत (मूलशब्द: चि)|संग्रह|Eg. ज्ञान संचित आहे.
नितळ|स्वच्छ|देशज (मूलशब्द: तळ)|निर्मळ|Eg. पाणी नितळ आहे.
विराम|थांबा|संस्कृत (मूलशब्द: राम)|विश्रांती|Eg. थोडा विराम घ्या.
जाणीव|समज|संस्कृत (मूलशब्द: ज्ञा)|भान|Eg. त्याला जाणीव झाली.
आश्चर्य|चकित करणारी गोष्ट|संस्कृत (मूलशब्द: चर)|विस्मय|Eg. हे आश्चर्यकारक आहे.
शब्दसंपदा|शब्दांचा साठा|संस्कृत (मूलशब्द: पद)|भाषिक संपत्ती|Eg. त्याची शब्दसंपदा मोठी आहे.
विस्तार|पसरणे|संस्कृत (मूलशब्द: स्तृ)|फैलाव|Eg. विचारांचा विस्तार झाला.
शोधन|शोध घेणे|संस्कृत (मूलशब्द: शोध)|संशोधन|Eg. सत्याचे शोधन आवश्यक.
निष्ठा|प्रामाणिकता|संस्कृत (मूलशब्द: स्था)|समर्पण|Eg. कामात निष्ठा आहे.
प्रसन्न|आनंदी|संस्कृत (मूलशब्द: सद)|आनंदी|Eg. तो प्रसन्न दिसतो.
दृष्टीकोन|विचार पद्धत|संस्कृत (मूलशब्द: दृश)|दृष्टिकोन|Eg. दृष्टीकोन बदलला.
आवाहन|साद|संस्कृत (मूलशब्द: वह)|आमंत्रण|Eg. हे आवाहन महत्त्वाचे आहे.
संचार|फिरणे|संस्कृत (मूलशब्द: चर)|प्रवाह|Eg. माहितीचा संचार झाला.
विवेक|समजूतदारपणा|संस्कृत (मूलशब्द: विच)|सूज्ञता|Eg. विवेकाने निर्णय घ्या.
नवलाई|नवीनपणा|देशज (मूलशब्द: नव)|ताजेपणा|Eg. यात नवलाई आहे.
प्रकाशमान|उजळलेले|संस्कृत (मूलशब्द: काश)|तेजस्वी|Eg. घर प्रकाशमान आहे.
संवाद|बोलणे|संस्कृत (मूलशब्द: वद)|चर्चा|Eg. संवाद आवश्यक आहे.
स्मरण|आठवण|संस्कृत (मूलशब्द: स्मृ)|आठवण|Eg. ती स्मरणात आहे.
उमेद|उत्साह|फारसी (मूलशब्द: उमेद)|जोश|Eg. नवीन उमेद आहे.

अजून इंटरेस्टिंग...

कॉर्बेट ऑन! जंगलाच्या मध्यभागी सुरू झालेला थरार | Rajas Jaideo | Jim Corbett Safari Experience | Jim Corbett National Park

दीक्षाभूमीची निर्मिती कशी झाली? | Deekshabhoomi Nagpur Travel Guide & History | Vidarbha Buddha Circuit

मंगेशी: आशाताईंच्या स्वप्नात कसं आलं मंगेशी? | Mangeshi Temple | Temples of Maharashtra

होळीचा रंग... कृषी पर्यटनासंग | Amit Naseri | Joshiwadi Agri Tourism near Nagpur | Vidarbha Agri Tourism

नागार्जुन गुफा बौद्ध सर्कीट | Nagarjuna Caves Buddha Circuit | Vidarbha Buddha Circuit

विदर्भातील बौद्ध सर्किट : इतिहास, शांतता आणि अनोखा प्रवास | Vidarbha Buddhist Circuit Travel Guide

जेम्स वेल्स : पुण्याचा इतिहास रंगवणारा चित्रकार प्रवासी | James Wales in Maratha Pune | Travellers of the World

पवनीचा किल्ला व स्तुप | Pauni Fort and Stupa | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

ज्योतिबाच्या यात्रेत सासनकाठ्या का आणतात? डॉ. संपदा नासेरी | Dr. Sampada Naseri | Jyotiba Temple Experience Kolhapur | Temples in Maharashtra

शांतीवन चिंचोली | Shantivan Chincholi | Vidarbha Buddha Circuit

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा