नगरधनचा भुईकोट | Nagardhan Fort Travel Guide in Marathi | Forts near Nagpur | Forts in Vidarbha

विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

विदर्भात नागपूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र रामटेक गड जगप्रसिद्ध आहे. या गावाला २००० वर्षांचा इतिहास असून सुप्रसिद्ध वाकाटक राजवंशाचा त्यात समावेश आहे. याच गडाच्या दक्षिण-पश्चिमेस ७ किमी अंतरावर असलेला भव्य भुईकोट म्हणजे नगरधनचा किल्ला. वाकाटकांच्या काळात इ.स.च्या ४ थ्या शतकात ही जागा नंदीवर्धन या नावाने ओळखली जाई.

नागपूरपासून ४३ किमी अंतरावर असलेला नगरधन किल्ला या प्रदेशाच्या भव्य भूतकाळाचा आणि चैतन्यशील सांस्कृतिक वारशाचा जिवंत पुरावा आहे. एकेकाळी वाकाटक राजवंशाची राजधानी राहिलेल्या या भक्कम किल्ल्याने या प्रदेशाच्या संरक्षण धोरणांना आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. रामटेकला देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक श्रीरामाच्या दर्शनासाठी येतात. पण तेथून अगदी जवळ असलेल्या या दुर्गराजाची मात्र अनेकांना माहिती नसते.

नगरधन किल्ला केवळ भूतकाळाचा अवशेष नाही; हे या प्रदेशाच्या समृद्ध स्थापत्य वारशाचे आणि सांस्कृतिक विविधतेचे जिवंत उदाहरण आहे.

🧱 रचना व ऐतिहासिक काळ | Nagardhan Fort History in Marathi

काळाच्या ओघात त्याच्या काही कडा झिजल्या असल्या तरी, नगरधन किल्ला अजूनही त्याच्या वैभवशाली भूतकाळाचे अवशेष त्याच्या आकर्षक वास्तुशिल्पीय तपशीलांद्वारे अभिमानाने प्रदर्शित करतो. गावाच्या पश्चिमेस एक भव्य उंच कमानी प्रवेशद्वार आहे. लालसर व काळपट पाषाण चिऱ्यांनी दर्शनी तटबंदी चिरेबंदी बांधलेली आहे.

प्रवेशद्वाराच्या मध्यभागी श्रीगणरायाचे शिल्प आहे. आत शिरल्यानंतर लंबचतुष्कोनी कक्षात प्रवेश होतो. छत पूर्णपणे नष्ट झाले आहे. प्रवेशद्वारावर चढण्यासाठी सोपान मार्ग असून शिबंदीसाठी वर टेहळणी घुमट्या आहेत. बाजूला यक्षराज आणि हनुमंतरायाची शिल्पे दिसतात.

Nagardhan Fort, Guide in Marathi

या भुईकोटाचे क्षेत्रफळ अंदाजे ३५० फूट लांब व २०० फूट रुंद आहे. संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी साधारण एक ते दीड तास पुरेसा आहे.

⚔️ ऐतिहासिक काळ व राजवटी (Dynasties & Timeline)

मुळात हा किल्ला गोंड राजांचा असून १५ व्या शतकातील असावा. किल्ल्यात सर्वत्र भग्नावशेष आढळतात. पायऱ्यांची एक बावडी (विहीर) आजही अस्तित्वात आहे. भुयारी मार्ग, अंधार कक्ष आणि जिने पाहायला मिळतात. भुयारातील मंदिरात गिरीजेची मध्ययुगीन प्रतिमा आजही आहे पुढे हा किल्ला श्रीमंत भोसले नृपतींच्या राजवटीत आला. गावात कोटेश्वराचे अप्रतिम प्राचीन स्थापत्य असलेले हेमाडपंथी शिवालय आहे. त्यासमोरील जलाशय ११ व्या शतकातील असावा. याच गावात राष्ट्रकुट नृपतींचा ताम्रपटही सापडला होता. रामटेकला येणाऱ्या भाविकांनी या भुईकोटाला भेट देण्यास विसरू नये.

🌳 आजूबाजूची पर्यटनस्थळे | Nearby Attractions

नगरधन किल्ल्याजवळील पेंच राष्ट्रीय उद्यानात मुबलक वन्यजीव असून वाघांचे दर्शन वारंवार होते. पर्यटकांसाठी सफारी साहसांचा हा उत्तम पर्याय आहे. यासोबतच खिंडसी जलाशय आणि खेकरानाला या ठिकाणांनाही भेट देता येते.

🚗 कसे पोहोचाल | How to Reach Nagardhan Fort

  • हा किल्ला सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुला असतो.
  • रेल्वेने आल्यास रामटेक स्टेशनवर उतरावे लागेल. तेथून नगरधन किल्ला ७ किमी अंतरावर आहे.
  • नागपूरहून बसने किंवा टॅक्सीने जाता येते. साधारण एकसव्वा तासाचा प्रवास असून रस्ता चांगला आहे.

🏯 रामटेकजवळील नगरधन किल्ला आपण बघितला का? 

कंमेंट्स मध्ये तुमचे मत नक्की कळवा !

Comments

🔍 शोधा
लेख लोड होत आहेत...
🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
💡
आजचा मराठी शब्द by WhatsUp मराठी
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|Eg. तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|Eg. त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|Eg. डोंगरातील पाणी नितळ आहे.
तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|Eg. तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|Eg. सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
ओंजळ|हाताचा कप्पा|देशज मराठी|हातभर|Eg. त्याने ओंजळीत पाणी घेतले.
हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|Eg. हळुवार वारा वाहत होता.
मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|Eg. तिचा आवाज मंजुळ आहे.
मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|Eg. मृद्गंध दरवळला.
आभाळमाया|असीम प्रेम|देशज मराठी|अपार माया|Eg. आईची आभाळमाया विसरता येत नाही.
धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|Eg. तो संगीतात धुंद झाला.
झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|Eg. थंड झुळूक आली.
नभ|आकाश|संस्कृत|गगन|Eg. नभ निरभ्र होते.
उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|Eg. त्याला आनंदाचा उमाळा आला.
साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|Eg. ती साजिरी दिसत होती.
गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|Eg. फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|Eg. सूर्याचा कवडसा पडला.
जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|Eg. गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|Eg. गाण्याची लय सुंदर होती.
कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|Eg. कोमेजलेली फुले दिसत होती.
दरवळ|मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|Eg. चाफ्याचा दरवळ पसरला.
सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|Eg. सावळ्या ढगांनी आकाश भरले.
सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|Eg. तिचा चेहरा सतेज दिसत होता.
मधुमालती|सुगंधी वेल|संस्कृत|फुलवेल|Eg. अंगणात मधुमालती फुलली होती.
गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|Eg. कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
हुरहूर|मनातील ओढ|देशज मराठी|व्याकुळता|Eg. जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|Eg. गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|Eg. धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|Eg. पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|Eg. दिव्याची ज्योत लवलवत होती.
उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|Eg. तरुणांमध्ये उमेद आहे.
गोजिरी|नाजूक सुंदर|देशज मराठी|साजिरी|Eg. गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|Eg. आंब्याला मोहोर आला आहे.
सुगंधी|सुगंध असलेले|संस्कृत|दरवळते|Eg. सुगंधी फुले बहरली.
अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|Eg. गावचा चहा अमृततुल्य लागतो.
झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|Eg. घंटांचा झंकार झाला.
सहजसुंदर|नैसर्गिक सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|Eg. तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|Eg. आसमंत शांत होता.
सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|Eg. सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|Eg. डोंगरातून निर्झर वाहत होता.
नादमय|संगीतपूर्ण|संस्कृत|सुरेल|Eg. सभागृह नादमय झाले.
मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|Eg. मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|Eg. संगीताचे स्पंदन जाणवत होते.
चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|Eg. वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|Eg. मृदुल वाळूवर पावले उमटली.
अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|Eg. ती अलवार हसली.
स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|Eg. पक्षी स्वैर उडत होते.
सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|Eg. फुलांची सुरभि दरवळली.
दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|Eg. तिच्या डोळ्यांत दीप्ती होती.
प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|Eg. अंगणात प्राजक्त फुलला होता.
निरभ्र|पूर्ण स्वच्छ|संस्कृत|ढगविरहित|Eg. निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.

अजून इंटरेस्टिंग...

चंद्रपुरातील पाषाणयुगीन मानवाचे गाव माहिती आहे का? ‘बोर’ नावाचे मूळ गाव सापडले | प्रा. सुरेश चोपणे | Author: Prof. Suresh Chopane | Chandrapur Stone Age Discovery | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism | Incredible India

काळ्या कोळशाच्या साम्राज्यात निसर्गाचा महाचमत्कार | Mahatma Gandhi Eco Park | Author: Sakhi | Mine Tourism | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism

गोठवणाऱ्या थंडीत आयफेल टॉवरचा अद्‌भूत नजारा... पुस्तकांच्या पलीकडे, जगाच्या जवळ | Author: Yash Naseri | Eiffel Tower Paris | International & Global Tourism

फणिंद्रपुरातील संतमहात्म्यांची समाधीस्थळं तुम्ही बघितली काय? | Author: Mrunalini Waghmare | Samadhis in Old Nagpur | Vidarbha Tourism

नागपुरातील मोहिते वाडा : संघ शाखेची जन्मभूमी | Author: Amol Pusadkar | Mohite Wada, Birthplace of the Rashtriya Swayamsevak Sangh | Heritage Tourism | Maharashtra Tourism

चंद्रपूरच्या जंगलात दडलेले गायमुख श्री महादेव मंदिर | नरेंद्र चांदेवार | Gaaymukh Shri Mahadev Mandir | Author: Narendra Chandewar | Temples in Vidarbha | Temples in Maharashtra

दुष्काळाच्या पलीकडचा मराठवाडा: पावसाळ्यात खुलणारे अनोखे पर्यटनविश्व | Author: Dr. Mrunalini Fadnavis | Marathwada Tourism | Maharashtra Tourism

‘ये है मुंबई मेरी जान’ अनुभवांची अखंड सफर | Author: Himgauri Deshpande | Yeh Hain Mumbai Meri Jaan | Maharashtra Tourism | Incredible India

कोराडीचे महालक्ष्मी जगदंबा मंदिर : धार्मिक पर्यटन आणि विकासाचा नवा अध्याय | Author: Ram Bhakre | Koradi Mahalaxmi Jagdamba Temple | Temples in Vidarbha | Temples in Maharashtra

भगवद्गीतेच्या एका श्लोकाने घडवलेला इतिहास; ओपेनहायमर आणि ट्रिनिटी टेस्ट | मॅनहॅटन प्रोजेक्ट न्यू मेक्सिको | Author: Raajan | Trinity Site, New Mexico | First Nuclear Bomb Test 1945 | Manhattan Project