गोंड राजाचा किल्ला | Gond Raja Fort Nagpur | Forts near Nagpur | Forts in Vidarbha

विदर्भातील किल्ले | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

नागपूर शहरातील पहिली भव्य वास्तू म्हणजे गोंड राजे बख्त बुलंद शाह (बुऱ्हानशाह) यांचा महालातील किल्ला. हा मातीचा किल्ला भुईकोट प्रकारात मोडतो. १७०२ मध्ये गोंड राजे बख्त बुलंद शाह यांनी नागपूरला राजधानीचा दर्जा दिला असला, तरी हा किल्ला मात्र त्यापूर्वी बांधण्यात आला होता.
इ.स.च्या १५ व्या, १६ व्या शतकात छिंदवाडाजवळील देवगड या किल्ल्यावर गोंडांची अधिसत्ता होती तरी नागपूरला लष्करी ठाणे म्हणून महत्व होते.

⚔️ इतिहास व लढाया | History of Gond Raja Fort Nagpur

१६३७ साली खानदौराने नागपूर किल्ल्यावर आक्रमण करण्याचे ठरविले व आपल्या सैन्यासह बुटीबोरीला तळ ठोकला. त्यावेळी देवाजी हा या किल्ल्याचा ठाणेदार होता. त्याला खानदौराने शांतीचा संदेश पाठवून किल्ला आपल्या ताब्यात देण्यास सांगितले. देवाजीने नकार दिल्याने खानदौराच्या सैन्याने किल्ल्याला वेढा दिला. किल्ल्याच्या उत्तरकेडील बुरूज त्यांनी बारुद लावून पाडला व खानदौराचे सैन्य आत घुसले. या सैन्याने गोंड सैन्याची कत्तल केली. याबाबत कळताच गोंड राजे कोकशहा देवगडवरून नागपूरला आले व त्यांनी खानदौराची भेट घेतली. खानाला त्यांनी १ लाख रुपये किमतीची भेट, ५० हजार रुपये रोख, १ हजार हत्ती दिले व दर तीन वर्षांनी मोगलांच्या खजिन्यात ४ लाख रुपये जमा करण्याचे वचन दिले. त्यामुळे खानाने हा किल्ला गोंड राजांना परत दिला.

असा हा ऐतिहासिक किल्ला जाटबाने बांधला होता. सोळाव्या शतकात देवगडमध्ये तुळोजीचे राज्य होते. नागपूर, भानारा (भंडारा) हे त्याच्या राज्याचे प्रदेश होते. पराक्रमी गोंडवीर जाटबाला तुळोजींनी नागपूरला ठाणेदार म्हणून पाठविले व त्यांनीच जाटबाला नागपूरला किल्ला बांधण्यास सांगितले होते. आज महालातील कल्याणेश्वर मंदिराच्या पुढील मार्गावर असलेल्या या किल्ल्याला त्यावेळी ४५ फूट उंचीचे चार भक्कम बुरूज होते. किल्ल्याभोवती परकोट व त्या भोवती २४ फूट रूंद खंदक होता. या किल्ल्याचा आता एक बुरूज शिल्लक आहे. त्यावर त्यावेळच्या खानदौरासोबत झालेल्या युद्धात वापरली गेलेली मरियम तोफ आजही अस्तित्वात आहे. ही तोफ पंचधातूंची आहे. ही तोफ चारही दिशांना ३६० अंशात कोठेही फिरवता येते.

🏛️ महाल परिसर | Mahal Area Nagpur

महालमध्ये फाटे शाळेपासून (चौक) पश्चिमेस कल्याणेश्वराच्या मंदिरापर्यंत हा परिसर आहे. हे देऊळ प्रत्यक्ष श्रीमंत भोसलेंच्या नगारखान्यात आजही आहे. कल्याणेश्वर महाद्वार म्हणजे भोसलेंच्या देत्रदीपक राजवाड्याचे नगारखाना द्वार. हा राजवाडा १७९० च्या अखेरीस बांधून पूर्ण झाला. बख्त बुलंद शाह यांचे पुत्र चाँद सुल्तान यांनी किल्ल्याभोवतीच्या परकोटाला आठ दरवाजे बांधले होते. आज गांधी गेट किंवा शुक्रवार दरवाजा म्हणून परिचित प्रवेशद्वार हे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार होते. भंडार दरवाजा, दसरा दरवाजा, छोटी खिडकी, तुळशीबाग, भुत्या दरवाजा, गाडीखाना, शुक्रवार दरवाजा, बुधवार दरवाजा व इतवार दरवाजा अशी आठ प्रवेशद्वारे या किल्ल्याला होती. आतील महालापुढे आलीशान दरबार होता. दरबाराच्या पुढे संगमरवरी फवारा होता. आता दरबार नसला तरी फवारा अजूनही आहे. पूर्व दक्षिण भागात असलेल्या बगिचातील झाडांना पाणी देण्यासाठी छोटे कालवे होते. दक्षिणेकडे पायऱ्या असलेली विहीर आहे. याच भागात पूर्वी टांकसाळ होती. तेथे तांब्याची नाणी तयार व्हायची. महालाच्या मागील भागात चाँद सुलतानचे पुत्र मीर बहादूरचा मकबरा आहे. मीर बहादूरचे लग्न ठरले होते. त्यामुळे त्याला हळद लागली होती. तशा स्थितीत बख्त बुलंद शाहंचा दासीपुत्र वलीशाहने त्याची हत्या केली. किल्ल्यावर याच ठिकाणी मीर बहादूरची समाधी आहे. ती जागा हल्दीवाले बाबा का मकबरा म्हणून ओळखली जाते.

Gond Raja Fort, Nagpur
Gond Raja Fort, Nagpur

📍 सध्याची स्थिती
सध्या या किल्ल्यात बख्त बुलंद शाह यांचे वंशज राहतात. या महालातील दिवाणखान्यात जाताना दोन्ही बाजूला सिंहाच्या प्रतिकृती आहेत. किल्ल्याच्या पश्चिमेकडे मशीद आहे. राजघराण्यातील सदस्यांसाठी ती बांधण्यात आली होती. १९९३ साली तेथे नवीन मशीद बांधण्यात आली. राजनगर भागातही गोंड राजांचा एक महाल होता. तेथून ज्या मार्गाने राजे या महालात यायचे तो मार्ग आजही किंग्जवे म्हणून ओळखला जातो. राजे शुक्रवार दरवाजापाशी आले की नगारे वाजवून महाराज येत असल्याची वर्दी दिली जायची. गोंड राजा जाटबा हा महाराणा प्रताप आणि अकबराच्या समकालीन होता.

🗺️ कसे जायचे | How to Reach Gond Raja Fort Nagpur

महालमध्ये पकवासा हॉस्पिटलजवळ हा किल्ला आहे. रेल्वेस्टेशनवरून रिक्षाने १० मिनिटांत पोहोचता येईल. हा किल्ला बघायला गेलात की जवळच असलेले गांधी गेट जुमा दरवाजा, केशव द्वार, चिटणवीस वाडा, श्रीमंत महाराणी सती काशीबाई साहेब भोसले समाधी बघायला विसरू नका. आठवड्याचे सर्व दिवस येथे भेट देता येईल. नागपूरची ही आद्य वास्तू असलेला हा भुईकोट तुम्ही बघितला का? 

कंमेंट्स मध्ये तुमचे मत नक्की कळवा !

Comments

🔍 शोधा
लेख लोड होत आहेत...
🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
💡
आजचा मराठी शब्द by WhatsUp मराठी
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|Eg. तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|Eg. त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|Eg. डोंगरातील पाणी नितळ आहे.
तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|Eg. तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|Eg. सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
ओंजळ|हाताचा कप्पा|देशज मराठी|हातभर|Eg. त्याने ओंजळीत पाणी घेतले.
हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|Eg. हळुवार वारा वाहत होता.
मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|Eg. तिचा आवाज मंजुळ आहे.
मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|Eg. मृद्गंध दरवळला.
आभाळमाया|असीम प्रेम|देशज मराठी|अपार माया|Eg. आईची आभाळमाया विसरता येत नाही.
धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|Eg. तो संगीतात धुंद झाला.
झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|Eg. थंड झुळूक आली.
नभ|आकाश|संस्कृत|गगन|Eg. नभ निरभ्र होते.
उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|Eg. त्याला आनंदाचा उमाळा आला.
साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|Eg. ती साजिरी दिसत होती.
गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|Eg. फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|Eg. सूर्याचा कवडसा पडला.
जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|Eg. गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|Eg. गाण्याची लय सुंदर होती.
कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|Eg. कोमेजलेली फुले दिसत होती.
दरवळ|मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|Eg. चाफ्याचा दरवळ पसरला.
सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|Eg. सावळ्या ढगांनी आकाश भरले.
सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|Eg. तिचा चेहरा सतेज दिसत होता.
मधुमालती|सुगंधी वेल|संस्कृत|फुलवेल|Eg. अंगणात मधुमालती फुलली होती.
गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|Eg. कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
हुरहूर|मनातील ओढ|देशज मराठी|व्याकुळता|Eg. जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|Eg. गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|Eg. धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|Eg. पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|Eg. दिव्याची ज्योत लवलवत होती.
उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|Eg. तरुणांमध्ये उमेद आहे.
गोजिरी|नाजूक सुंदर|देशज मराठी|साजिरी|Eg. गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|Eg. आंब्याला मोहोर आला आहे.
सुगंधी|सुगंध असलेले|संस्कृत|दरवळते|Eg. सुगंधी फुले बहरली.
अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|Eg. गावचा चहा अमृततुल्य लागतो.
झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|Eg. घंटांचा झंकार झाला.
सहजसुंदर|नैसर्गिक सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|Eg. तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|Eg. आसमंत शांत होता.
सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|Eg. सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|Eg. डोंगरातून निर्झर वाहत होता.
नादमय|संगीतपूर्ण|संस्कृत|सुरेल|Eg. सभागृह नादमय झाले.
मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|Eg. मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|Eg. संगीताचे स्पंदन जाणवत होते.
चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|Eg. वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|Eg. मृदुल वाळूवर पावले उमटली.
अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|Eg. ती अलवार हसली.
स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|Eg. पक्षी स्वैर उडत होते.
सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|Eg. फुलांची सुरभि दरवळली.
दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|Eg. तिच्या डोळ्यांत दीप्ती होती.
प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|Eg. अंगणात प्राजक्त फुलला होता.
निरभ्र|पूर्ण स्वच्छ|संस्कृत|ढगविरहित|Eg. निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.

अजून इंटरेस्टिंग...

चंद्रपुरातील पाषाणयुगीन मानवाचे गाव माहिती आहे का? ‘बोर’ नावाचे मूळ गाव सापडले | प्रा. सुरेश चोपणे | Author: Prof. Suresh Chopane | Chandrapur Stone Age Discovery | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism | Incredible India

काळ्या कोळशाच्या साम्राज्यात निसर्गाचा महाचमत्कार | Mahatma Gandhi Eco Park | Author: Sakhi | Mine Tourism | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism

गोठवणाऱ्या थंडीत आयफेल टॉवरचा अद्‌भूत नजारा... पुस्तकांच्या पलीकडे, जगाच्या जवळ | Author: Yash Naseri | Eiffel Tower Paris | International & Global Tourism

फणिंद्रपुरातील संतमहात्म्यांची समाधीस्थळं तुम्ही बघितली काय? | Author: Mrunalini Waghmare | Samadhis in Old Nagpur | Vidarbha Tourism

नागपुरातील मोहिते वाडा : संघ शाखेची जन्मभूमी | Author: Amol Pusadkar | Mohite Wada, Birthplace of the Rashtriya Swayamsevak Sangh | Heritage Tourism | Maharashtra Tourism

चंद्रपूरच्या जंगलात दडलेले गायमुख श्री महादेव मंदिर | नरेंद्र चांदेवार | Gaaymukh Shri Mahadev Mandir | Author: Narendra Chandewar | Temples in Vidarbha | Temples in Maharashtra

दुष्काळाच्या पलीकडचा मराठवाडा: पावसाळ्यात खुलणारे अनोखे पर्यटनविश्व | Author: Dr. Mrunalini Fadnavis | Marathwada Tourism | Maharashtra Tourism

‘ये है मुंबई मेरी जान’ अनुभवांची अखंड सफर | Author: Himgauri Deshpande | Yeh Hain Mumbai Meri Jaan | Maharashtra Tourism | Incredible India

कोराडीचे महालक्ष्मी जगदंबा मंदिर : धार्मिक पर्यटन आणि विकासाचा नवा अध्याय | Author: Ram Bhakre | Koradi Mahalaxmi Jagdamba Temple | Temples in Vidarbha | Temples in Maharashtra

भगवद्गीतेच्या एका श्लोकाने घडवलेला इतिहास; ओपेनहायमर आणि ट्रिनिटी टेस्ट | मॅनहॅटन प्रोजेक्ट न्यू मेक्सिको | Author: Raajan | Trinity Site, New Mexico | First Nuclear Bomb Test 1945 | Manhattan Project