जपानसाठी ‘टेकऑफ’ आणि ‘ओचा’, ‘कोचा’ | Travel Experience in Japan in Marathi Part 1

पान-दक्षिण आशिया मैत्री कार्यक्रमासाठी जपानला जाणाऱ्या २३ सदस्यीय भारतीय प्रतिनिधी मंडळात माझी निवड झाली होती. यानिमित्ताने १९९५ साली महिनाभर या देशात राहण्याची संधी मिळाली. या दौऱ्यात आलेल्या अनुभवांची पुंजी तुमच्यासोबत शेअर करताना आनंद होतो आहे.

- सविता ‘देव’ हरकरे, मुख्य संपादक, What’s Up मराठी

आठवणीतील जपान भाग एक | Travel Experience in Japan in Marathi Part 1

अखेर ज्या क्षणाची मी आतुरतेनं प्रतीक्षा करीत होते तो क्षण आला. एअर इंडियाच्या एआय ३०२ या विमानानं सायंकाळी नवी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन जपानसाठी ‘टेक ऑफ’ घेतलं. माझा स्वप्नांच्या दुनियेतील प्रवास सुरु झाला होता. विमान जसजसं आकाशात उंच भरारी घेत होतं तसतंस माझं मनही जपानच्या दिशेनं धावू लागलं. या देशाबद्दल तशी मला फारच कमी माहिती होती. परंतु कुतुहल मात्र नेहमीच वाटत होतं. जपानची संस्कृती, तेथील लोक, त्यांची वागणूक कशी असेल याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. बाहुल्यांसारख्या दिसणाऱ्या रंगबेरंगी कपडे घालणाऱ्या हसतमुख चेहऱ्याच्या स्रिया आणि कमरेतून वाकून नमस्कार करणारे जपानी पुरुष सगळं कसं जगावेगळच.

दुसऱ्या महायुद्धात उध्वस्त झालेल्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरांची आता काय परिस्थिती असेल; एका पाठोपाठ एक असे अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण होत होते. या कार्यक्रमासाठी जपानला येत असलेल्या भारतीय प्रतिनिधी मंडळातील इतर सदस्यांची सुद्धा बहुदा अशीच मनस्थिती झाली असावी. कारण विमानात एकमेकांसोबत गप्पा मारण्याऐवजी प्रत्येक जण स्वत:च्या विचारातच रमलेला होता. आठ-दहा तासांचा विमान प्रवास असल्यानं मनात थोडी भीती होतीच. शिवाय एक महिना आपल्या लोकांपासून दूर रहावं लागणार होतं. विशेष म्हणजे माझा मुलगा राजन त्यावेळी फक्त दीड वर्षांचा होता. त्याच्या मुखातून ‘आई’ अशी हाक ऐकण्यासाठी माझं मन आसुसलं होतं. त्यामुळं जपानला असताना राजन ‘आई’ म्हणायला लागलाय हे कळल्यानंतर मला अक्षरश: रडू कोसळलं होतं.

Delegation in Japan
Delegation in Japan

आमच्या विमानानं जपानसाठी उड्डाण भरलं त्याही वेळी माझी अशीच स्थिती होती. पहिलाच विमान प्रवास. या विमानाला अपघात झाला तर आपल्या चिमुकल्या बाळाचं काय? असा विचार उगाचच मनात डोकावून गेला होता. पण तो काही क्षणापुरताच राहिला.विमानात मला खिडकीच्या बाजूची जागा मिळाली होती. त्यामुळं एखाद्या लहान  मुलाला व्हावा तसा आनंद मला झाला होता. विमानाच्या खिडकीतून सहज खाली डोकावून बघितलं. ढगांच्या मोठमोठ्या पुंजक्यांशिवाय काहीच दृष्टीस पडत नव्हतं. ढगांमधील माझा हा प्रवास एखाद्या परिकथेसारखाच होता. पांढरे शुभ्र ढग बघून मन प्रफुल्लीत झालं होतं. बँकॉकपर्यतचा प्रवास केव्हा संपला कळलं सुद्धा नाही. जवळपास  दीड तास आमचं विमान बँकॉकला थांबलं होतं. परंतु विमानातून बाहेर न पडण्याची सूचना आम्हाला देण्यात आली होती. येथून बरेच जपानी लोक आमच्या विमानात चढले. गोरा रंग, ठेंगणा बांधा आणि मिचमिच्या डोळ्यांच्या या लोकांना बघून मनात सहज विचार आला; एक महिना आपल्याला या लोकांसोबतच राहायचं आहे. यांचा स्वभाव कसा असेल. महिनाभर हे लोक आपल्याला त्यांच्यात सामावून घेतील काय? कारण आम्ही मुळात त्यांच्याशी मैत्री करण्यासाठीच निघालो होतो.

Tokyo Airport - Travel Experiences in Japan

जपानबद्दल माझं तसं अज्ञानच. शालेय इतिहासाच्या पुस्तकात हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांचा उल्लेख वाचला होता,तेवढेच. बाकी पानं कोरीच होती. उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. केव्हा एकदाचं पूर्वेकडील या देशात पोहोचतो असं झालं होतं. जपान आणि तेथील लोकांचे जीवन कसं असेल हे जाणून घेण्याची उत्कटता वाढली होती. जपानी वेळेनुसार २८ ला सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार सकाळचे ५) विमानानं जपानची राजधानी टोकियोच्या नरिता आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘लँड’ केलं. एकामागून एक सर्वच प्रवासी विमानातून खाली उतरु लागले. मी पण आपली एक छोटी बॅग घेऊन त्यांच्या मागे एकएक पायरी खाली उतरु लागले. विमानाची शेवटची पायरी उतरुन पहिले पाऊल जपानच्या धर्तीवर पडताच चंद्रावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्राँगला जेवढा आनंद झाला नसेल तेवढा मला झाला. संपूर्ण शरीरावर रोमांच उभे राहिले. आपण आपल्या मायभूमीपासून खूपखूप दूर साता समुद्रापलिकडे जपानमध्ये आहोत यावर विश्वासच बसत नव्हता. माझी नजर भिरभिर इकडे-तिकडे फिरु लागली. नरिता विमानतळाचा परिसर डोळे दिपवून टाकणारा होता. सर्वत्र चकाचक. मी यापूर्वी नागपूर आणि दिल्लीचं विमानतळ बघितलं होतं. पण हे विमानतळ मला त्यापेक्षा कितीतरी भव्य आणि सुंदर वाटलं. कर्मचाऱ्यांची धावपळ सुरु होती. प्रत्येक जण आपआपल्या कामात व्यस्त दिसत होता. कोणालाही कोणाशी गप्पा मारायला वेळ नव्हता. विमानातून उतरताच समोर बस उभी होती. ही बस आम्हाला बाहेर घेऊन आली. पासपोर्टची तपासणी झाली अन् आम्ही विमानतळाच्या बाहेर पडलो. जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीच्या सदस्यांनी आमचं उत्स्फूर्त स्वागत केलं.

जपानमधील स्वच्छता आणि टापटीपीचा पहिला अनुभव या नरिता विमानतळावरच आला. कुठे धुळीचा एक कण नजरेस पडत नव्हता. सगळंच कसं स्वच्छं होतं. टाचणी पडली तरी आवाज होईल एवढी शांतता याठिकाणी होती. विमानतळाची ही अगदी कोरी करकरीत इमारत बघून जणूकाही आताच या विमानतळाचं उद्घाटन झालं असावं असं वाटत होतं. कसलाही गोंधळ नव्हता की आवाज नव्हता. सर्व कामे अगदी शांतपणे सुरु होती. टोकियोतील ज्या हॉटेलमध्ये आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती ते हॉटेल मेट्रोपॉलिटन विमानतळापासून अडीच तासाच्या अंतरावर होतं. आमची बस टोकियोच्या रस्त्यावर धावू लागली. हा मार्ग घनदाट वनराईतून जाणारा होता. रस्त्याच्या दुतर्फा असलेली वनराई बघून जणुकाही हिरवेकंच गालिचेच आच्छादले असावेत असा सुखद भास होत होता. सांगितल्याप्रमाणं बरोबर अडीच तासात आम्ही हॉटेल मेट्रोपॉलिटनमध्ये पोहोचलो. हॉटेलमध्ये येताच सोबतच्या एका प्रतिनिधीचा पासपोर्ट हरविल्याचं कळलं आणि सर्वांची धावपळ सुरु झाली. विदेशात इतर सर्व वस्तू हरविल्या तरी चालतील परंतु पासपोर्ट हरवला म्हणजे फारच कठीण. पासपोर्ट बसमध्ये राहिला असावा असा अंदाज होता. ताबडतोब आमच्या कोऑर्डिनेटर्सना याची सूचना देण्यात आली. आम्हाला सोडायला आलेली बस निघून गेली होती. पोलिसांना कळविण्यात आलं. केवळ दोन तासात पासपोर्ट परत मिळाला. भारतीय वेंधळेपणा आणि जपानी चोखपणा याची तुलना करावीशी वाटली.

हॉटेल मेट्रोपॉलिटन सप्ततारांकित होतं. समोर प्रशस्त हॉल होता. सभोवताल छोटासा बगिचा. माझी खोली अकराव्या मजल्यावर होती. सगळंच काम किती पद्धतशीर होतं. मी खोलीत पोहोचण्यापूर्वीच माझं सामान तेथे पोहोचलं होतं. खोली कसली तो चांगला मोठा हॉलच होता. फुल आणि फुलदाणीचं जपानी लोकांना प्रचंड वेड. साध्या ब्रेडच्या दुकानात सुद्धा तुम्हाला ताज्या टवटवीत फुलांनी सजविलेली फुलदाणी दिसणार. रुममध्येही एक कोपरा फुलदाणीनं सजविलेला होता. जपानी भाषेत याला तोकोनामा म्हणतात. हा कोपरा जपानमधील प्रत्येक घरात आणि हॉटेलमध्ये दिसतो. काड्याफुलांची सुंदर पुष्परचना. जपानी महिला आकर्षक पुष्परचना आणि केशरचनेच्या कलेत निपूण आहेत. ही एक जपानी कला आणि शास्त्रही आहे. यापूर्वी इकाबानाबद्दल मी बरंच ऐकलं होतं. या देशात चहा पंडितांसारखे पुष्पपंडितही होऊन गेलेत. आपल्या येथे जशी गायनाची विविध घराणी आहेत तशी तेथे पुष्परचना कलेची घराणी आहेत. पुष्परचना शिकविणारी विद्यालये आहेत. विशेष म्हणजे ही रचना अर्थपूर्ण आणि काहीतरी संदेश देणारी असते. फुलंच काय पण वाळलेल्या काट्यातूनही हे लोक सुंदर कलाकृती निर्माण करतात.
भिंतीवर सुरेख नैसर्गिक दृष्यं असलेलं पेंटिगं लावलेलं होतं. निसर्गाशी सतत संघर्ष सुरु असतानाही त्याच्यावर चहाकॉफी करुन घेण्यासाठी इलेक्ट्रिकची शेगडी इथं होती. चहा,दुधाची पावडर, साखरेच्या क्युबस् सर्व सामान ट्रेमध्ये सजवून ठेवलेलं होतं. जपानी भाषेत चहाला ‘चा’ म्हणतात. त्यातही चहा दुधाचा असेल तर ‘ओचा’ आणि बिनदुधाचा असेल तर ‘कोचा’.चहा विकपॉईंट असल्यानं रुममध्येच ती व्यवस्था बघून हायसं वाटलं. आणि पुढील दिवसात मी तो ‘डीप डीप’ चहा गोड मानून घेतला. इंग्रजीत चहाला ‘टी’ म्हणतात. परंतु जपानमध्ये टी म्हणजे ग्रीनटीच समजला जातो. हिरव्या पानांचा हिरवा चहा.

आपल्या देशात मुली सर्वच क्षेत्रात आघाडीवर असल्या तरी हॉटेल्समधून मुली वेटरचं काम करताना सहसा दिसत नाहीत. जपानमध्ये मात्र कुठल्याही हॉटेलमध्ये जा तुम्हाला मुलीच वेटर दिसतील. येथे वेटरच्या कामासाठी तरुणींना प्राधान्य दिलं जातं. हॉटेलमध्ये फुलपाखरांसारख्या फिरणाèया या सुंदर प्रसन्न, हसतमुख आणि नम्र तरुणी हॉटेलमधील वेटर असतील यावर विश्वासच बसत नव्हता. मुळात त्या वेटर आहेत हे कळायलाही मला बराच वेळ लागला. त्यांचे पोषाख पाश्चिमात्य असले तरी वागणूक मात्र देशी होती. आणखी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे येथील लोकांना कोणाकडे बघून हसायला ओळख लागत नाही. त्यातही विदेशी पाहुणा असला तर मग विचारायलाच नको. परिचय नसला तरी ते तुमच्याकडे बघून परिचय असल्यासारखे हसतील. अभिवादन करतील. नरिता विमानतळापासूनच ही गोष्ट लक्षात आली होती. फुलाफुलांचे किमोनो, पाठीला उशीसारखी ओबी आणि पायात रंगीबेरंगी खडावा घातलेल्या स्त्रियाही हॉटेलमध्ये वावरताना दिसल्या.

टोकियोत पाय ठेवल्यापासूनच जपानी लोकांमधील गुणवैशिष्ट्यांची ओळख पटायला लागली होती. औद्योगिक क्षेत्रात संपूर्ण जगात जपान इतक्या झपाट्याने प्रगती साधण्यास यशस्वी का होत आहे,यामागील रहस्य हळुहळु उलगडू लागलं होतं. २८ चा संपूर्ण दिवस मोकळा होता. दुसऱ्या दिवशी मैत्री कार्यक्रमाचं उद्घाटन होतं.
मित्र देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंधांना बळकटी देण्यासाठी जपान सरकारतर्फे हा कार्यक्रम राबविण्यात येतो. भारताशिवाय बांगलादेश, पाकिस्तान, मालदीव, भूतान, नेपाळ आणि श्रीलंकेचे प्रतिनिधीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. माझ्यासाठी हा बोनस होता. कारण एरवी आपल्या या शेजाऱ्यांसोबत एकत्र असं भेटण्याची संधी मिळणं तसं कठीणच. या प्रतिनिधींसोबतही पुढे चांगली ओळख झाली होती.

२९ जूनला सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचं विधिवत् उद्घाटन झालं. याप्रसंगी जायकाच्या प्रशिक्षण विभागाचे कार्यकारी संचालक इहारा हिरोयोशी, परराष्ट्र मंत्रालयाच्या दक्षिणपूर्व आशिया विभागाचे उपसंचालक सुरिता काओरु, जपान ओव्हरसीज को-ऑप असोसिएशनचे महासचिव किमुरु सुतोमु, डिव्हलपमेंट असोसिएशन ऑफ युथचे महासंचालक होरिझो कात्सुमो, जपान इटरनॅशनल को-ऑपरेशन सेंटरच्या आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण विभागाचे संचालक कुमोमी मासाहिरो, द वर्ल्ड युथ व्हिजीट एक्स्चेंज असोसिएशनचे उपाध्यक्ष कन्नो मासाही आदी पाहुणे उपस्थित होते.

उद्घाटनानंतर एक महिन्याच्या मैत्री कार्यक्रमाची अतिशय उत्साहात सुरुवात झाली. या एका महिन्यात अनेक चांगल्या गोष्टी शिकायला आणि बघायला मिळाल्या.


सविता ‘देव’ हरकरे
Consulting Editor
WhatsUp मराठी

कंमेंट्स मध्ये तुमचे मत नक्की कळवा !

जपानसाठी ‘टेकऑफ’ आणि ‘ओचा’, ‘कोचा’ | Travel Experience in Japan in Marathi Part 1






Comments

  1. खूप छान माहिती 👍

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks for your support. Bookmark the site to keep supporting us!

      Delete

Post a Comment

तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️

🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
💡
आजचा मराठी शब्द by WhatsUp मराठी
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|Eg. तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|Eg. त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|Eg. डोंगरातील पाणी नितळ आहे.
तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|Eg. तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|Eg. सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
ओंजळ|हाताचा कप्पा|देशज मराठी|हातभर|Eg. त्याने ओंजळीत पाणी घेतले.
हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|Eg. हळुवार वारा वाहत होता.
मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|Eg. तिचा आवाज मंजुळ आहे.
मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|Eg. मृद्गंध दरवळला.
आभाळमाया|असीम प्रेम|देशज मराठी|अपार माया|Eg. आईची आभाळमाया विसरता येत नाही.
धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|Eg. तो संगीतात धुंद झाला.
झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|Eg. थंड झुळूक आली.
नभ|आकाश|संस्कृत|गगन|Eg. नभ निरभ्र होते.
उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|Eg. त्याला आनंदाचा उमाळा आला.
साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|Eg. ती साजिरी दिसत होती.
गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|Eg. फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|Eg. सूर्याचा कवडसा पडला.
जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|Eg. गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|Eg. गाण्याची लय सुंदर होती.
कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|Eg. कोमेजलेली फुले दिसत होती.
दरवळ|मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|Eg. चाफ्याचा दरवळ पसरला.
सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|Eg. सावळ्या ढगांनी आकाश भरले.
सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|Eg. तिचा चेहरा सतेज दिसत होता.
मधुमालती|सुगंधी वेल|संस्कृत|फुलवेल|Eg. अंगणात मधुमालती फुलली होती.
गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|Eg. कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
हुरहूर|मनातील ओढ|देशज मराठी|व्याकुळता|Eg. जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|Eg. गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|Eg. धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|Eg. पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|Eg. दिव्याची ज्योत लवलवत होती.
उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|Eg. तरुणांमध्ये उमेद आहे.
गोजिरी|नाजूक सुंदर|देशज मराठी|साजिरी|Eg. गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|Eg. आंब्याला मोहोर आला आहे.
सुगंधी|सुगंध असलेले|संस्कृत|दरवळते|Eg. सुगंधी फुले बहरली.
अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|Eg. गावचा चहा अमृततुल्य लागतो.
झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|Eg. घंटांचा झंकार झाला.
सहजसुंदर|नैसर्गिक सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|Eg. तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|Eg. आसमंत शांत होता.
सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|Eg. सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|Eg. डोंगरातून निर्झर वाहत होता.
नादमय|संगीतपूर्ण|संस्कृत|सुरेल|Eg. सभागृह नादमय झाले.
मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|Eg. मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|Eg. संगीताचे स्पंदन जाणवत होते.
चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|Eg. वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|Eg. मृदुल वाळूवर पावले उमटली.
अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|Eg. ती अलवार हसली.
स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|Eg. पक्षी स्वैर उडत होते.
सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|Eg. फुलांची सुरभि दरवळली.
दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|Eg. तिच्या डोळ्यांत दीप्ती होती.
प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|Eg. अंगणात प्राजक्त फुलला होता.
निरभ्र|पूर्ण स्वच्छ|संस्कृत|ढगविरहित|Eg. निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.

अजून इंटरेस्टिंग...

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

‘पुरण पोळी’ च्या गावाला जाऊ या....! आजनसरा | Author: Sakhi | Ajansara Temple | Temples in Maharashtra | Maharashtra Tourism

तुम्ही पण होऊ शकता पर्यटन उद्योजिका, महाराष्ट्र शासनाच्या ‘आई’ महिला पर्यटन धोरण | Tours & Travel Entrepreneurship for Women | Startups & Careers | Maharashtra Startup Stories

अलेक्झांडर बर्न्स : बुखाराकडे निघालेला ब्रिटिश प्रवासी | Alexander Burnes and Travels into Bukhara | Travellers of the World

भटाळा गावात आहे ‘भोंडा महादेव’ | Author: Himgauri Deshpande | Bhonda Mahadev Temple Bhatala | Temples of Vidarbha | Temples of Maharashtra

बांबूंच्या बेटातून करा ‘झुकझुक गाडी’ ची रम्य सफर | First Bamboo Garden of India, Amravati | Author: Parijaat | Maharashtra Tourism

महाराष्ट्रातील डार्क स्काय पर्यटन, शहरी गोंगाटापासून दूर, आकाशाच्या कुशीत | Dark Sky Tourism | Astro Tourism | Maharashtra Tourism Policy

नागपुरातील संजीवनग्राममध्ये घ्या ‘वेलनेस टुरिझम’ चा आनंद | Sanjeevan Nature Cure | Wellness Tourism in Maharashtra

भामरागडमध्ये जलक्रांतीतून निर्मित ‘तलावांचे जाळे’ | अनिकेत प्रकाश आमटे | लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte

आळंदी : ज्ञानेश्वर आणि महाराष्ट्राने घडवलेली भक्तीची क्रांती | Alandi & Bhakti Movement in India | Author: Raajan | Temples in Maharashtra | Maharashtra Tourism