पातुरची लेणी: बौद्ध सर्कीट | Patur Caves Travel Guide | Vidarbha Buddha Circuit

अकोला जिल्ह्यातील पातुर हे 'पराशर' नगर म्हणून ओळखले जाणारे एक प्राचीन शहर आहे. येथील गुफांमुळे या परिसराचे ऐतिहासिक आणि भूवैज्ञानिक महत्त्व वाढले आहे.

पातुर शहराच्या पश्चिम भागात प्राचीन ऐतिहासिक गुफा अस्तित्वात आहेत. या भागात बौद्ध आश्रम आणि प्राचीन गुफांचे अवशेष पाहायला मिळतात, जे या परिसराचा समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा दर्शवतात. हे क्षेत्र प्राचीन बौद्ध संस्कृतीशी संबंधित मानले जाते.

गावाच्या तीन किलोमीटरवर डोंगरात खोदून एक गुफा बनविण्यात आली आहे. ही गुफा ८० फुट लांब, ५५ फुट रुंद आणि १५ ते २० फुट उंच आहे. गुफेपुढे अंगण आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने एक भिंतही बनविलेली दिसते. तिची रुंदी अडीच फुट आहे. या गुफेच्या आत दोन मोठे विहार आहेत व त्याच्या दोन्ही बाजूला एल आकारात दोन मोठ्या गुफा कोरलेल्या आहेत. दक्षिणेकडील पहिल्या विहारात दोन मोठे वऱ्हांडे आहेत. त्यासमोर गर्भगृह आहे. परंतु त्यात प्रतिमा अथवा प्रतिक चिन्ह नाही. या विहाराच्या प्रवेशद्वारावर ब्राह्मी लिपीत काही अक्षरे कोरलेली आहेत. त्यावरुन ही गुफा सातवाहन काळातील पहिल्या-दुसऱ्या शतकातील असावी असा कयास आहे. दुसरा विहारही याचप्रमाणे असून गर्भगृहात पद्‌मासनातील एक प्रतिमा स्थापित आहे. ती भगवान बुद्ध अथवा जैन तीर्थकारांची असावी, असे इतिहासतज्ञ सांगतात.

Patur Caves | Vidarbha Buddha Circuit
Patur Caves | Vidarbha Buddha Circuit

शहराच्या पूर्वेला असलेल्या डोंगरावर बौद्ध विहार किंवा मठ आहेत. या गुफांची निर्मिती दुसऱ्या ते तिसऱ्या शतकाच्या दरम्यान वाकाटक घराण्यातील राजा हरिषेण आणि त्यांचे प्रधान मंत्री वराहदेव यांनी केल्याचे मानले जाते.

शहराच्या पश्चिमेला प्राचीन जैन गुफा आहेत. असे म्हटले जाते की, इसवी सन १०५७-१०५८ च्या सुमारास जैन राजा इल्ल याच्या काळात या गुफांची निर्मिती झाली.

या गुफा बेसाल्ट खडकात कोरलेल्या असून त्यांची रचना काही प्रमाणात हेमडपंती मंदिरांच्या शैलीशी साधर्म्य दर्शवते. येथून जवळच शाहबाबू दर्गा, रेणुका माता मंदिर, १५०० वर्षे जुने वडाचे झाड आणि पातुर धरण (मोर्णा) ही बघण्यासारखी ठिकाणे आहेत.

Patur Caves

कसे पोहोचाल | How to reach Patur Caves Akola

पातुर-अलेगाव रोडवर, अकोला शहरापासून साधारण ३०-३५ किमी अंतरावर. बस अथवा खासगी वाहनाने पोहोचता येते.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? तुमचे मत कमेंटमध्ये लिहा आणि मित्रांसोबत शेअर करा.

Comments

🤖
🚗

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp community वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Join करा
💡
आजचा मराठी शब्द by What's Up Marathi
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
स्नेह|आपुलकी|संस्कृत (मूलशब्द: स्निह)|प्रेम|Eg. त्यात स्नेह आहे.
उपमा|तुलना|संस्कृत (मूलशब्द: उपम्)|साम्य|Eg. ही सुंदर उपमा आहे.
अर्थवाही|अर्थपूर्ण|संस्कृत (मूलशब्द: अर्थ)|गर्भित|Eg. हे वाक्य अर्थवाही आहे.
लवचिक|वाकता येणारे|देशज (मूलशब्द: लव)|लचकदार|Eg. विचार लवचिक हवेत.
सौंदर्य|सुंदरता|संस्कृत (मूलशब्द: सुंदर)|रम्यता|Eg. निसर्गात सौंदर्य आहे.
मधुर|गोड|संस्कृत (मूलशब्द: मधु)|गोडवा|Eg. स्वर मधुर आहे.

अजून इंटरेस्टिंग...

कॉर्बेट ऑन! जंगलाच्या मध्यभागी सुरू झालेला थरार | Rajas Jaideo | Jim Corbett Safari Experience | Jim Corbett National Park

मुक्तागिरी : विदर्भातील डोंगररांगांमध्ये दडलेलं जैन तीर्थक्षेत्र | Muktagiri Jain Temple Vidarbha | Temples of Vidarbha

नागपुरातील संजीवनग्राममध्ये घ्या ‘वेलनेस टुरिझम’चा आनंद | Sanjeevan Nature Cure | Wellness Tourism in Maharashtra

ज्योतिबाच्या यात्रेत सासनकाठ्या का आणतात? डॉ. संपदा नासेरी | Dr. Sampada Naseri | Jyotiba Temple Experience Kolhapur | Temples in Maharashtra

विदर्भातील ‘मधाचे गाव’ बघितले का? | Honey Village Andharwadi Travel Guide | Agri Tourism in Maharashtra

दीक्षाभूमीची निर्मिती कशी झाली? | Deekshabhoomi Nagpur Travel Guide & History | Vidarbha Buddha Circuit

थकवा वाढलाय? मग असा प्रवास करून पाहाल का? नागपूरकरांसाठी आरोग्यदायी भटकंतीचे नवे मार्ग | Wellness Spots Near Nagpur for Mindful Travel | Wellness Tourism in Maharashtra

मंगेशी: आशाताईंच्या स्वप्नात कसं आलं मंगेशी? | Mangeshi Temple | Temples of Maharashtra

विदर्भातही येऊन गेले होते गौतम बुद्ध: विदर्भातील बौद्ध सर्किट | Vidarbha Buddhist Circuit Travel Guide

जेम्स वेल्स : पुण्याचा इतिहास रंगवणारा चित्रकार प्रवासी | James Wales in Maratha Pune | Travellers of the World

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा