दीक्षाभूमीची निर्मिती कशी झाली? | Deekshabhoomi Nagpur Travel Guide & History | Vidarbha Buddha Circuit

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, यानिमित्त देशभरातून असंख्य भाविक त्यांना अभिवादन करण्यासाठी नागपुरातील दीक्षाभूमीवर येत असतात. डॉ. बाबासाहेबांच्या धम्मचक्रातून निर्माण झालेली ही दीक्षाभूमी म्हणजे केवळ एक पर्यटन स्थळ नव्हेतर मानवाने निर्दोष जीवन कसे जगावे याची ती पथदर्शक आहे. मानवाच्या जगण्याचे अधिष्ठान असणारी ही भूमी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुतेबरोबरच प्रज्ञा, शील करुणा आणि मैत्रीचा आनंद चाखायला देणारी रम्य बाग आहे. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब यांनी आपल्या विचारांनी ती फुलवलेली आहे. या भूमीतून मानवाची जीवनाची व जगण्याची ऊर्मी आणि अखंड उर्जेचा झरा कायम वाहात असतो.

१४ ऑक्टोबर १९५६ च्या ऐतिहासिक धम्मदीक्षेपूर्वी पडिक असलेली ही जागा निव्वळ खाचखळणे, दगडधोंडे, लहानमोठी झाडेझुडपे आणि गवताचे रान होती. परंतु डॉ. बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेनंतर ही भूमी विचारांचे उर्जास्रोत बनली.

भारतीय संविधानानंतरच्या काळात दीक्षाभूमीचा उदय झाला आणि संपूर्ण भारतीय समाजाला नव्या विचारांचे, नव्या प्रेरणेचे, नव्या नैतिक मूल्यांचे पाठबळ मिळत गेले. यातूनच पुढे या देशात नव्या सांस्कृतिक व प्रबोधनवादी चळवळीचा प्रारंभ झाला.

दीक्षाभूमी एक उर्जास्थान | Deekshabhoomi Nagpur Stupa

नागपुरातील दीक्षाभूमी हे जगभरातील बौद्ध अनुयायांचे एक महत्वाचे केंद्र आहे. प्रेरणास्थान आहे. याच ठिकाणी अशोक विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळेच या स्थानाला दीक्षाभूमी संबोधले गेले. बाबासाहेबांनी आपल्या या अनुयायांना धम्मदीक्षेपूर्वी स्वत:च्या २२ प्रतिज्ञा दिल्या. एकाच वेळी व शांततामय मार्गाने घडून आलेले हे जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर आहे. सम्राट अशोकांनी इसवी सन पूर्व तिसऱ्या कलिंग युद्धानंतर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि इतिहासात हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून गणना गेला.

Deekshabhoomi Nagpur
Deekshabhoomi Nagpur

वर्षभर बौद्ध अनुयायी व पर्यटक दीक्षाभूमीला भेट देत असतात. मात्र अशोक विजयादशमी किंवा १४ ऑक्टोबरला महामानवाला नमन करण्याकरिता लाखो अनुयायी येथे जमतात. त्यात प्रामुख्याने जपान, श्रीलंका,थायलंड येथील अनुयायांचा समावेश असतो. हा बौद्ध धर्मांतर सोहळा धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो.

दीक्षाभूमीचा डोम हा १२० फूट उंचीचा आहे. हा परिसर विस्तारलेला असून कलेचा एक उत्तम नमुना आपल्याला येथे बघायला मिळतो. जवळपास ५००० कारागिरांनी अहोरात्र परिश्रमातून निर्माण केलेला येथील भव्य स्तूप जनतेसाठी १८ डिसेंबर २००१ रोजी खुला करण्यात आला. विशेष म्हणजे हा स्तूप आतून पोकळ आहे. अशा प्रकारचा हा जगातील सगळ्यात मोठ्या स्तुपांपैकी एक मानला जातो. दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी धौलपूर येथून आणलेल्या मार्बल आणि ग्रेनाईटचा वापर केलेला आहे.

Dr. Ambedkar at Deekshabhoomi
Dr. Ambedkar at Deekshabhoomi

स्तुपाचा परीघ आणि उंची ३७ मीटर आहे. तळमजल्यावर १२२० चौरस मीटरचे सभागृह आहे. त्या सभागृहातील भगवान बुद्धाची मूर्ती नागपूर विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या थायलंडच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे. याठिकाणी बाबासाहेबांचा अस्थिकलश ठेवण्यात आला आहे. येथील भव्य सभागृहाला प्रशस्त व्हरांडा आहे. त्याला साचीच्या स्तुपारसारखेच चार दिशांना चार आर्चेस आहेत. या चारही द्वारातून भव्य पटांगणात आपण प्रवेश करतो. याच परिसरात बौद्ध विहार आहे. तिथे बोधीवृक्ष लावण्यात आला आहे. हा वृक्ष म्हणजे श्रीलंकेतील अनुराधापुरम्‌ येथील वृक्षाची एक शाखाच आहे. विजयादशमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी म्हणजेच १४ एप्रिल रोजी येथे आंबेडकरी जनतेची प्रचंड गर्दी असते.

कसे पोहोचाल | How to reach Deekshabhoomi Nagpur

  • नागपूर रेल्वे स्टेशन प्रमुख शहरांशी चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. तेथून ऑटो आणि कॅब सहज उपलब्ध होतात.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुमारे ६-७ किमी अंतरावर आहे. 
  • दीक्षाभूमीजवळून स्थानिक बस, ऑटो आणि टॅक्सी नियमितपणे जातात.

केव्हा जायचे

  • धम्मचक्र प्रवर्तन दिन काळात गर्दीमुळे प्रवासाला जास्त वेळ लागू शकतो, त्यामुळे नियोजनासाठी पुरेसा वेळ राखून ठेवा.
  • दीक्षाभूमी सामान्यतः सकाळपासून संध्याकाळपर्यंत खुली असते.
विशेष कार्यक्रम किंवा सोहळ्याच्या दिवसांमध्ये प्रवेशाच्या वेळेत थोडा बदल होऊ शकतो. संग्रहालयाप्रमाणे येथे बंद होण्याची कोणतीही निश्चित वेळ नसते, पण दिवसा किंवा संध्याकाळच्या सुरुवातीला भेट देणे सहसा अधिक चांगले असते. सकाळ अधिक शांत वाटते. संध्याकाळ चिंतनाला चालना देणारी असते. दीक्षाभूमीवर प्रवेश विनामूल्य आहे. तिकिटाची किंवा ऑनलाईन बुकिंगची आवश्यकता नाही.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? तुमचे मत कमेंटमध्ये लिहा आणि मित्रांसोबत शेअर करा.

Comments

Post a Comment

तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️

🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
💡
आजचा मराठी शब्द by WhatsUp मराठी
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|Eg. तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|Eg. त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|Eg. डोंगरातील पाणी नितळ आहे.
तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|Eg. तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|Eg. सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
ओंजळ|हाताचा कप्पा|देशज मराठी|हातभर|Eg. त्याने ओंजळीत पाणी घेतले.
हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|Eg. हळुवार वारा वाहत होता.
मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|Eg. तिचा आवाज मंजुळ आहे.
मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|Eg. मृद्गंध दरवळला.
आभाळमाया|असीम प्रेम|देशज मराठी|अपार माया|Eg. आईची आभाळमाया विसरता येत नाही.
धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|Eg. तो संगीतात धुंद झाला.
झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|Eg. थंड झुळूक आली.
नभ|आकाश|संस्कृत|गगन|Eg. नभ निरभ्र होते.
उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|Eg. त्याला आनंदाचा उमाळा आला.
साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|Eg. ती साजिरी दिसत होती.
गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|Eg. फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|Eg. सूर्याचा कवडसा पडला.
जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|Eg. गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|Eg. गाण्याची लय सुंदर होती.
कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|Eg. कोमेजलेली फुले दिसत होती.
दरवळ|मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|Eg. चाफ्याचा दरवळ पसरला.
सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|Eg. सावळ्या ढगांनी आकाश भरले.
सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|Eg. तिचा चेहरा सतेज दिसत होता.
मधुमालती|सुगंधी वेल|संस्कृत|फुलवेल|Eg. अंगणात मधुमालती फुलली होती.
गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|Eg. कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
हुरहूर|मनातील ओढ|देशज मराठी|व्याकुळता|Eg. जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|Eg. गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|Eg. धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|Eg. पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|Eg. दिव्याची ज्योत लवलवत होती.
उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|Eg. तरुणांमध्ये उमेद आहे.
गोजिरी|नाजूक सुंदर|देशज मराठी|साजिरी|Eg. गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|Eg. आंब्याला मोहोर आला आहे.
सुगंधी|सुगंध असलेले|संस्कृत|दरवळते|Eg. सुगंधी फुले बहरली.
अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|Eg. गावचा चहा अमृततुल्य लागतो.
झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|Eg. घंटांचा झंकार झाला.
सहजसुंदर|नैसर्गिक सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|Eg. तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|Eg. आसमंत शांत होता.
सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|Eg. सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|Eg. डोंगरातून निर्झर वाहत होता.
नादमय|संगीतपूर्ण|संस्कृत|सुरेल|Eg. सभागृह नादमय झाले.
मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|Eg. मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|Eg. संगीताचे स्पंदन जाणवत होते.
चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|Eg. वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|Eg. मृदुल वाळूवर पावले उमटली.
अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|Eg. ती अलवार हसली.
स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|Eg. पक्षी स्वैर उडत होते.
सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|Eg. फुलांची सुरभि दरवळली.
दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|Eg. तिच्या डोळ्यांत दीप्ती होती.
प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|Eg. अंगणात प्राजक्त फुलला होता.
निरभ्र|पूर्ण स्वच्छ|संस्कृत|ढगविरहित|Eg. निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.

अजून इंटरेस्टिंग...

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

तुम्ही पण होऊ शकता पर्यटन उद्योजिका, महाराष्ट्र शासनाच्या ‘आई’ महिला पर्यटन धोरण | महाराष्ट्र स्टार्टप स्टोरीज | Tours & Travel Entrepreneurship for Women | Startups & Careers | Maharashtra Startup Stories

‘पुरण पोळी’ च्या गावाला जाऊ या....! आजनसरा | Author: Sakhi | Ajansara Temple | Temples in Maharashtra | Maharashtra Tourism

अलेक्झांडर बर्न्स : बुखाराकडे निघालेला ब्रिटिश प्रवासी | Alexander Burnes and Travels into Bukhara | Travellers of the World

भटाळा गावात आहे ‘भोंडा महादेव’ | Author: Himgauri Deshpande | Bhonda Mahadev Temple Bhatala | Temples of Vidarbha | Temples of Maharashtra

बांबूंच्या बेटातून करा ‘झुकझुक गाडी’ ची रम्य सफर | First Bamboo Garden of India, Amravati | Author: Parijaat | Maharashtra Tourism

महाराष्ट्रातील डार्क स्काय पर्यटन, शहरी गोंगाटापासून दूर, आकाशाच्या कुशीत | Dark Sky Tourism | Astro Tourism | Maharashtra Tourism Policy

भामरागडमध्ये जलक्रांतीतून निर्मित ‘तलावांचे जाळे’ | अनिकेत प्रकाश आमटे | लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte

नागपुरातील संजीवनग्राममध्ये घ्या ‘वेलनेस टुरिझम’ चा आनंद | Sanjeevan Nature Cure | Wellness Tourism in Maharashtra

वास्को द गामा : समुद्रमार्गाने भारत गाठणारा प्रवासी | Vasco da Gama and the Sea Route to India | Travellers of the World