अडम स्तुप: विदर्भातील बौद्ध सर्कीट | Adam Stupa Travel Guide | Vidarbha Buddha Circuit

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील अडम हे एक ऐतिहासिक आणि पुरातत्वीयदृष्ट्या महत्त्वाचे गाव आहे. हे गाव नागपूर शहराच्या आग्नेयेला सुमारे ५५ किमी अंतरावर वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. सातवाहन कालखंडातील (इ.स.पू. ५ वे शतक) प्राचीन 'अडम किल्ला' आणि उत्खननात सापडलेल्या स्तूपामुळे प्रसिद्ध आहे. अडम हे वर्धा-वैनगंगा खोऱ्यातील एक महत्त्वाचे प्राचीन वसाहत स्थळ मानले जाते.

१९८८ मध्ये पुरातत्व विभागातर्फे करण्यात आलेल्या उत्खननात ‘असक जनपदस्य’ अशी ब्राह्मी लिपीत लेख असलेली मुद्रा येथे सापडली. त्यामुळे इ.स. पूर्व सहाव्या शतकात जी १६ जनपदे होती. त्यापैकी असक एक होते,असा कयास लावण्यात आला. अडम गावात किल्ल्याच्या बाहेर पूर्व दिशेला सुमारे ५००मीटर अंतरावर ‘देवी हुडकी’ (उंच टेकाड) आहे. याच ठिकाणी पुरातत्व विभागाला स्तुपाचे अवशेष सापडले. हा स्तूप सम्राट अशोकाच्या काळातील किंवा त्याही आधीचा (सुमारे २,५०० ते ३,००० वर्षे जुना) मानला जातो. या स्तुपाची उंची ५.६० मीटर आणि परीघ ३४ मीटर आहे. हा स्तुप माती आणि मुरुमाने बनविलेला आहे. स्तुपाच्या मध्यभागी ३.५० मीटर व्यासाची हर्मिका होती. त्यात यष्टी आणि त्यावर छत्रावली असल्याचे पुरावे मिळाले आहेत. स्तुपाच्या दक्षिणेला दोन भिंती आढळल्या आहेत. त्यापैकी एकेरी दगडाची भिंत मौर्योत्तर काळातील असावी. सातवाहन काळात अशीच भाजलेल्या विटांची दुसरी भिंत बांधण्यात आली. येथील उत्खननात केवळ स्तूपच नाही, तर प्राचीन नाणी, मुद्रा आणि मानवी वस्तीचे पुरावेही मिळाले आहेत, जे या परिसराचे प्राचीन व्यापारी आणि धार्मिक महत्त्व अधोरेखित करतात विशेष म्हणजे येथील उत्खननात एक मणी आढळला होता. त्याच्या उजवीकडे बोधीवृक्ष दाखविला आहे.

Adam Stupa Travel Guide | Vidarbha Buddha Circuit
Adam Stupa Travel Guide | Vidarbha Buddha Circuit

सातवाहनकाळात कलिंग नरेश खाखेलने आपल्या शासनाच्या दुसऱ्या वर्षी विदर्भावर स्वारी केली होती. त्याचे सैन्य कन्हवेना नदीपर्यंत चालत गेले. आणि त्यांनी असिकनगरचा विध्वंस केला. हे असिकनगर म्हणजेच आजचे अडम गाव होय. तर कन्हवेना ही नागपूरजवळील कन्हान व वेणा नदी होय. यांचा संयुक्त प्रवाह प्राचीन काळी कन्हवेना नावाने ओळखला जात असावा. 'असिकानगर' (असक जनपद) हे वैभवशाली संस्कृतीचे केंद्र होते.

नागपूर शहराजवळील हे गाव इतिहास संशोधक आणि पर्यटकांसाठी महत्वाचे प्राचीन स्थळ आहे. विदर्भाच्या हरवलेल्या संस्कृतीचे ते पुरातत्व प्रवेशद्वार आहे. हे गाव विदर्भाचा प्राचीन भूतकाळ आणि आधुनिक वर्तमानाच्या संगमावर उभे आहे.

कसे पोहोचाल | How to reach Adam Stupa Nagpur

  • नागपूर → कुही → अडम
  • अंतर: साधारण ४५–५५ किमी
  • नागपूरहून कुहीकडे जाणाऱ्या रस्त्याने एक ते दीड तासात थेट अडम गाव गाठता येते. नागपूरहून कुहीपर्यंत एसटी बस मिळते, तिथून शेअर ऑटो/जीपने अडम.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? तुमचे मत कमेंटमध्ये लिहा आणि मित्रांसोबत शेअर करा.

Comments

🔍 शोधा
लेख लोड होत आहेत...
🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
💡
आजचा मराठी शब्द by WhatsUp मराठी
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|Eg. तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|Eg. त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|Eg. डोंगरातील पाणी नितळ आहे.
तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|Eg. तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|Eg. सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
ओंजळ|हाताचा कप्पा|देशज मराठी|हातभर|Eg. त्याने ओंजळीत पाणी घेतले.
हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|Eg. हळुवार वारा वाहत होता.
मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|Eg. तिचा आवाज मंजुळ आहे.
मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|Eg. मृद्गंध दरवळला.
आभाळमाया|असीम प्रेम|देशज मराठी|अपार माया|Eg. आईची आभाळमाया विसरता येत नाही.
धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|Eg. तो संगीतात धुंद झाला.
झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|Eg. थंड झुळूक आली.
नभ|आकाश|संस्कृत|गगन|Eg. नभ निरभ्र होते.
उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|Eg. त्याला आनंदाचा उमाळा आला.
साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|Eg. ती साजिरी दिसत होती.
गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|Eg. फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|Eg. सूर्याचा कवडसा पडला.
जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|Eg. गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|Eg. गाण्याची लय सुंदर होती.
कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|Eg. कोमेजलेली फुले दिसत होती.
दरवळ|मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|Eg. चाफ्याचा दरवळ पसरला.
सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|Eg. सावळ्या ढगांनी आकाश भरले.
सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|Eg. तिचा चेहरा सतेज दिसत होता.
मधुमालती|सुगंधी वेल|संस्कृत|फुलवेल|Eg. अंगणात मधुमालती फुलली होती.
गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|Eg. कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
हुरहूर|मनातील ओढ|देशज मराठी|व्याकुळता|Eg. जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|Eg. गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|Eg. धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|Eg. पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|Eg. दिव्याची ज्योत लवलवत होती.
उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|Eg. तरुणांमध्ये उमेद आहे.
गोजिरी|नाजूक सुंदर|देशज मराठी|साजिरी|Eg. गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|Eg. आंब्याला मोहोर आला आहे.
सुगंधी|सुगंध असलेले|संस्कृत|दरवळते|Eg. सुगंधी फुले बहरली.
अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|Eg. गावचा चहा अमृततुल्य लागतो.
झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|Eg. घंटांचा झंकार झाला.
सहजसुंदर|नैसर्गिक सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|Eg. तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|Eg. आसमंत शांत होता.
सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|Eg. सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|Eg. डोंगरातून निर्झर वाहत होता.
नादमय|संगीतपूर्ण|संस्कृत|सुरेल|Eg. सभागृह नादमय झाले.
मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|Eg. मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|Eg. संगीताचे स्पंदन जाणवत होते.
चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|Eg. वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|Eg. मृदुल वाळूवर पावले उमटली.
अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|Eg. ती अलवार हसली.
स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|Eg. पक्षी स्वैर उडत होते.
सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|Eg. फुलांची सुरभि दरवळली.
दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|Eg. तिच्या डोळ्यांत दीप्ती होती.
प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|Eg. अंगणात प्राजक्त फुलला होता.
निरभ्र|पूर्ण स्वच्छ|संस्कृत|ढगविरहित|Eg. निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.

अजून इंटरेस्टिंग...

तुम्ही पण होऊ शकता पर्यटन उद्योजिका, महाराष्ट्र शासनाच्या ‘आई’ महिला पर्यटन धोरण | महाराष्ट्र स्टार्टप स्टोरीज | Tours & Travel Entrepreneurship for Women | Startups & Careers | Maharashtra Startup Stories

नागपुरातील मोहिते वाडा : संघ शाखेची जन्मभूमी | Author: Amol Pusadkar | Mohite Wada, Birthplace of the Rashtriya Swayamsevak Sangh | Heritage Tourism | Maharashtra Tourism

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

‘पुरण पोळी’ च्या गावाला जाऊ या....! आजनसरा | Author: Sakhi | Ajansara Temple | Temples in Maharashtra | Maharashtra Tourism

महाराष्ट्रातील डार्क स्काय पर्यटन, शहरी गोंगाटापासून दूर, आकाशाच्या कुशीत | Dark Sky Tourism | Astro Tourism | Maharashtra Tourism Policy

बांबूंच्या बेटातून करा ‘झुकझुक गाडी’ ची रम्य सफर | First Bamboo Garden of India, Amravati | Author: Parijaat | Maharashtra Tourism

भटाळा गावात आहे ‘भोंडा महादेव’ | Author: Himgauri Deshpande | Bhonda Mahadev Temple Bhatala | Temples of Vidarbha | Temples of Maharashtra

अलेक्झांडर बर्न्स : बुखाराकडे निघालेला ब्रिटिश प्रवासी | Alexander Burnes and Travels into Bukhara | Travellers of the World

हेन्री ऑक्सिंडन : शिवराज्याभिषेक पाहणारा इंग्रज प्रवासी | Henry Oxinden and His Journey to Maratha Land | Travellers of the World

भामरागडमध्ये जलक्रांतीतून निर्मित ‘तलावांचे जाळे’ | अनिकेत प्रकाश आमटे | लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte