कॉर्बेट ऑन! जंगलाच्या मध्यभागी सुरू झालेला थरार | Rajas Jaideo | Jim Corbett Safari Experience | Jim Corbett National Park

गोव्याला आयुष्यात एकदा तरी जायचंच, असं प्रत्येक तरुणाच्या मनात असतं. पण आमच्या मित्रमंडळींच्या गप्पांमध्ये मात्र एकच शब्द सतत घुमत होता — “कॉर्बेट ऑन!” 🌿🐾

अनेक वेळा योजना बनली, पुढे ढकलली, पुन्हा मोडली. पण शेवटी नशिबानं साथ दिली आणि जिम कॉर्बेट नॅशनल पार्क येथे राहण्याची आणि सफारीची बुकिंग झाली. आम्ही सुरुवातीपासून ठरवलं होतं की कॉर्बेटला जायचं तर फॉरेस्ट रेस्ट हाऊस मध्येच राहायचं. कारण त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे — जंगलाच्या मध्यभागी मुक्काम! आणि त्यापेक्षा रोमांचक अजून काय असू शकतं?

चार राज्यं, अनेक शहरं पार करत आम्ही अखेर Ramnagar railway station येथे पहाटे पोहोचलो. आमचा पूर्ण प्रवास अत्यंत अचूक नियोजनानं आखलेला होता — तीन रात्रींच्या मुक्कामात तब्बल सात सफारी.

Jim Corbett Safari Experience | Jim Corbett National Park

पहाटे पाच वाजता स्टेशनवरच ताजेतवाने झालो आणि आमचा ड्रायव्हर व मित्र अझीम तयारच होता. गेल्या अनेक वर्षांत भारतातील पेंच नॅशनल पार्क, कान्हा नॅशनल पार्क, ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह आणि आफ्रिकेतील जंगलांचा अनुभव घेतला असला तरी प्रत्येक सफारीचा पहिला क्षण आजही तितकाच उत्साह देतो.

झिरना झोनमधील पहिली सफारी | Jhirna Zone Safari Jim Corbett

आमची पहिली सफारी झिरना विभागात होती. जिम कॉर्बेटला मी पहिल्यांदाच आलो असल्यामुळे समोर दिसणारं प्रत्येक दृश्य मी मनात साठवत होतो. दाट, ओलसर पानझडी प्रकारचं हे जंगल वर्षभर हिरवंगार दिसतं. इथं प्रामुख्यानं साग, पिंपळ आणि आंब्याची झाडं मोठ्या प्रमाणावर दिसतात.

आम्ही आमच्या मार्गदर्शक आणि चालकाकडून जंगलाविषयी माहिती घेत होतो, आणि अर्थातच अलीकडच्या वाघदर्शनांविषयीही विचारत होतो. नेहमीच्या चर्चेसोबत आम्ही संयमानं जंगलातील आवाज ऐकत थांबलो होतो. मधूनमधून इतर वाहनांकडून बातम्या येत होत्या — आत्ताच वाघ रस्ता ओलांडून गेला. हो, सलग तीन वेळा आम्ही तो क्षण चुकवला.

वाघ नेहमी वापरत असलेल्या मार्गावर आम्ही थांबलो होतो. माकडांचे आणि हरणांचे इशारेही लक्षपूर्वक ऐकत होतो, पण नशीब साथ देत नव्हतं. जंगलाचं खरं सौंदर्य हेच — इथे काहीही निश्चित नसतं आणि प्रत्येक सफारीत काहीतरी नवीन शिकायला मिळतं. सर्व अंदाज फसल्यावर वेळ संपत आली म्हणून बाहेर पडायचं ठरवलं. पण मनाच्या समाधानासाठी नदीकाठच्या उंच भागावर शेवटची पाच मिनिटं थांबलो. आणि तेवढ्यात दूर जंगलातून एक स्पष्ट इशारा ऐकू आला. क्षणात आमच्यात उत्साह संचारला — आज तरी वाघ दिसणारच!

थोड्याच वेळात ते इशारे वाढू लागले आणि अधिक स्पष्ट झाले. आमच्या मार्गदर्शकाने खाली नदीकाठाकडे हालचाल दाखवली आणि आम्ही सगळ्यांनी एकाच दिशेने पाहिलं. आणि मग — ती दिसली. अखेर जिम कॉर्बेटमधलं आमचं पहिलं वाघदर्शन झालं. सुमारे पाच ते सहा वर्षांची ती वाघीण होती. आणि विशेष म्हणजे तीच वाघीण होती जिला आम्ही याआधी अनेकदा चुकवलं होतं.

ती जवळपास अर्धा तास चालत नदीकाठापर्यंत आली. बहुधा तिनं तिथं शिकार लपवून ठेवली असावी. पण नदीकाठावर उभ्या दुसऱ्या वाहनाच्या आवाजामुळे ती पुढे गेली नाही. ती सावलीत बसली, धापा टाकत, तहानेने त्रस्त. काही छायाचित्रं घेतल्यानंतर आणि काही वेळ तिला निवांत पाहिल्यानंतर आम्ही तिला तशीच शांत सोडून बाहेरच्या प्रवेशद्वाराकडे निघालो.

Jim Corbett Safari Experience | Jim Corbett National Park

गवताळ प्रदेशातून थेट आयुष्यातील दुर्मीळ क्षणाकडे | Amazing experience in Jim Corbett

जिप हळूहळू पुढे जात होती. आमचे ड्रायव्हर अझीम आम्हाला गवताळ प्रदेशाच्या आत खोल घेऊन जात होते. पुढे जाताना समोरचं दृश्य बदलत होतं — दाट गवत संपत आलं आणि अचानक समोर पसरलेलं पाण्याचं विशाल निळसर क्षेत्र दिसू लागलं. ते होतं कालागढ़ बांध चं बॅकवॉटर.

आम्ही थांबून दृश्याचे फोटो घ्यायचे म्हणत होतो. दूरवर हत्तींचा कळपही दिसत होता. भारतीय रानहत्ती पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहत होतो. पण अझीम लगेच म्हणाले — “हत्ती उद्याही दिसतील, पण तिकडे बघा… काही वाहनं थांबली आहेत. काहीतरी घडतंय.”

क्षणात गाडी त्या दिशेने वळली. आणि अझीमचं पुढचं वाक्य...जवळ पोहोचताना अझीम अचानक उत्साहाने म्हणाले —
“सर, तुम्ही म्हणत होतात ना perfect frame… आता त्यापेक्षा हजारपट मोठं काहीतरी दिसेल. पुढे जो हत्ती पडलेला दिसतोय… तो दोन दिवसांपूर्वी मेला आहे.” आणि मग त्यांनी पुढे सांगितलं — “आज सकाळी वाघीण Modi high bank पार करून याच दिशेने आली होती.”

माझ्या हातांवर आणि मानेवर अक्षरशः काटा आला. आम्ही आमचं वाहन हळूहळू मंद केलं, आणि समोर जे दिसलं ते मंत्रमुग्ध करणारं होतं. ते पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं, हे शब्दांत कसं सांगावं हेच मला कळत नाही. फक्त माहितीसाठी सांगायचं तर — दरवर्षी भारतातून आणि परदेशातून सुमारे ७०,००० लोक जिम कॉर्बेटला भेट देतात. त्यापैकी केवळ ०.१ टक्के लोकांना असं दृश्य पाहण्याची संधी मिळते.

आमच्या समोर जे दृश्य होतं ते म्हणजे — एका मृत हत्तीच्या अगदी शेजारी बसलेला वाघ. ती त्या परिसरातील प्रसिद्ध वाघीण होती, जिला तिथेच “ग्रासलँड वाली” म्हणून ओळखलं जातं. काही मिनिटं मी पूर्ण स्तब्ध झालो होतो आणि माझ्याकडे कॅमेरा आहे, फोटो काढायचे आहेत हेही विसरलो होतो. थोडं भानावर आल्यानंतर मी कॅमेरा हातात घेतला आणि त्या प्रत्येक क्षणाला टिपण्याचा प्रयत्न केला.

Tiger Hunt in Jim Corbett National Park
Tiger Hunt in Jim Corbett National Park

पण एक गोष्ट मान्य करावी लागेल — मी जे पाहिलं ते तुम्हाला छायाचित्रात पूर्णपणे दाखवू शकत नाही, आणि शब्दांतही तसंच मांडू शकत नाही. कारण तो अनुभव खरंच आयुष्यात एकदाच येणारा होता. कारण प्रत्यक्षात हत्ती शंभर वर्षांपेक्षा जास्त जगतात 😀 आणि रोज कुठल्या ना कुठल्या कारणाने हत्ती मृत अवस्थेत दिसत नाही. (त्या मृत प्राण्याबद्दल माझ्या मनात पूर्ण आदर आहे.)

तुमचाही वन्यजीव अनुभव घडवा | Plan Your Wildlife Journey in Jim Corbett National Park

Mr. Rajas Jaideo
For planning your trip at Jim Corbett:
संपर्क: +91 88284 47975
Instagram: musafir_hun_jungle_ka

Comments

Post a Comment

तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️

🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
💡
आजचा मराठी शब्द by WhatsUp मराठी
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|Eg. तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|Eg. त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|Eg. डोंगरातील पाणी नितळ आहे.
तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|Eg. तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|Eg. सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
ओंजळ|हाताचा कप्पा|देशज मराठी|हातभर|Eg. त्याने ओंजळीत पाणी घेतले.
हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|Eg. हळुवार वारा वाहत होता.
मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|Eg. तिचा आवाज मंजुळ आहे.
मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|Eg. मृद्गंध दरवळला.
आभाळमाया|असीम प्रेम|देशज मराठी|अपार माया|Eg. आईची आभाळमाया विसरता येत नाही.
धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|Eg. तो संगीतात धुंद झाला.
झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|Eg. थंड झुळूक आली.
नभ|आकाश|संस्कृत|गगन|Eg. नभ निरभ्र होते.
उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|Eg. त्याला आनंदाचा उमाळा आला.
साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|Eg. ती साजिरी दिसत होती.
गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|Eg. फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|Eg. सूर्याचा कवडसा पडला.
जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|Eg. गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|Eg. गाण्याची लय सुंदर होती.
कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|Eg. कोमेजलेली फुले दिसत होती.
दरवळ|मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|Eg. चाफ्याचा दरवळ पसरला.
सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|Eg. सावळ्या ढगांनी आकाश भरले.
सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|Eg. तिचा चेहरा सतेज दिसत होता.
मधुमालती|सुगंधी वेल|संस्कृत|फुलवेल|Eg. अंगणात मधुमालती फुलली होती.
गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|Eg. कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
हुरहूर|मनातील ओढ|देशज मराठी|व्याकुळता|Eg. जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|Eg. गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|Eg. धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|Eg. पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|Eg. दिव्याची ज्योत लवलवत होती.
उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|Eg. तरुणांमध्ये उमेद आहे.
गोजिरी|नाजूक सुंदर|देशज मराठी|साजिरी|Eg. गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|Eg. आंब्याला मोहोर आला आहे.
सुगंधी|सुगंध असलेले|संस्कृत|दरवळते|Eg. सुगंधी फुले बहरली.
अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|Eg. गावचा चहा अमृततुल्य लागतो.
झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|Eg. घंटांचा झंकार झाला.
सहजसुंदर|नैसर्गिक सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|Eg. तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|Eg. आसमंत शांत होता.
सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|Eg. सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|Eg. डोंगरातून निर्झर वाहत होता.
नादमय|संगीतपूर्ण|संस्कृत|सुरेल|Eg. सभागृह नादमय झाले.
मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|Eg. मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|Eg. संगीताचे स्पंदन जाणवत होते.
चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|Eg. वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|Eg. मृदुल वाळूवर पावले उमटली.
अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|Eg. ती अलवार हसली.
स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|Eg. पक्षी स्वैर उडत होते.
सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|Eg. फुलांची सुरभि दरवळली.
दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|Eg. तिच्या डोळ्यांत दीप्ती होती.
प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|Eg. अंगणात प्राजक्त फुलला होता.
निरभ्र|पूर्ण स्वच्छ|संस्कृत|ढगविरहित|Eg. निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.

अजून इंटरेस्टिंग...

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

तुम्ही पण होऊ शकता पर्यटन उद्योजिका, महाराष्ट्र शासनाच्या ‘आई’ महिला पर्यटन धोरण | महाराष्ट्र स्टार्टप स्टोरीज | Tours & Travel Entrepreneurship for Women | Startups & Careers | Maharashtra Startup Stories

‘पुरण पोळी’ च्या गावाला जाऊ या....! आजनसरा | Author: Sakhi | Ajansara Temple | Temples in Maharashtra | Maharashtra Tourism

अलेक्झांडर बर्न्स : बुखाराकडे निघालेला ब्रिटिश प्रवासी | Alexander Burnes and Travels into Bukhara | Travellers of the World

भटाळा गावात आहे ‘भोंडा महादेव’ | Author: Himgauri Deshpande | Bhonda Mahadev Temple Bhatala | Temples of Vidarbha | Temples of Maharashtra

बांबूंच्या बेटातून करा ‘झुकझुक गाडी’ ची रम्य सफर | First Bamboo Garden of India, Amravati | Author: Parijaat | Maharashtra Tourism

महाराष्ट्रातील डार्क स्काय पर्यटन, शहरी गोंगाटापासून दूर, आकाशाच्या कुशीत | Dark Sky Tourism | Astro Tourism | Maharashtra Tourism Policy

भामरागडमध्ये जलक्रांतीतून निर्मित ‘तलावांचे जाळे’ | अनिकेत प्रकाश आमटे | लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte

नागपुरातील संजीवनग्राममध्ये घ्या ‘वेलनेस टुरिझम’ चा आनंद | Sanjeevan Nature Cure | Wellness Tourism in Maharashtra

वास्को द गामा : समुद्रमार्गाने भारत गाठणारा प्रवासी | Vasco da Gama and the Sea Route to India | Travellers of the World