ड्रॅगन पॅलेस टेम्पल | Dragon Palace Temple Nagpur Travel Guide | Vidarbha Buddhist Circuit

नागपूरपासून १८ किमी अंतरावर असलेल्या कामठी येथे भव्य ड्रॅगन पॅलेस टेम्पल उभारण्यात आले आहे. स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने उत्कृष्ट ही वास्तू बघताक्षणी नजरेत भरणारी आहे. या मंदिराची रचना कमळाच्या फुलाच्या आकारात केलेली आहे, जी बौद्ध धर्मात पवित्र मानली जाते. त्यामुळे नागपुरातील ‘लोटस टेम्पल’ म्हणून ती ओळखल्या जाते. सुमारे १० एकरच्या या परिसरात बौद्ध धर्माशीसंबंधित विविध प्रार्थनास्थळे आहे. तथागत बुद्धांची मूर्ती, ध्यान केंद्र इत्यादी गोष्टींचा समावेश असलेले ड्रॅगन पॅलेस देशविदेशातील बौद्धधर्मीयांचे आकर्षणाचे केंद्र झाले आहे. इतर विचारांचे पर्यटकही ड्रॅगन पॅलेस बघायला मोठ्या संख्येत येतात.

ड्रॅगन पॅलेसची स्थापना १९९९ मध्ये ओगावा सोसायटी नावाच्या जपानस्थित एका धर्मादाय संस्थेच्या निधीतून झाली. ड्रॅगन पॅलेस असलेल्या संकुलात बुद्धांशी संबंधित चंदनाची एक कोरलेली मूर्ती आहे. हे भारतातील सर्वात लोकप्रिय बौद्ध मंदिरांपैकी एक आहे.तसेच ते भारत-जपान मैत्रीचे प्रतीक देखील आहे. मूळ मंदिर संकुलाच्या पहिल्या मजल्यावर आहे. येथे एक मोठे ध्यान कक्ष असून त्याच्या एका टोकाला बुद्धांची एक आकर्षक मूर्ती स्थापित आहे. संपूर्ण परिसर नीटनेटका, शांत आणि स्वच्छ आहे.

Dragon Palace Temple Nagpur Travel Guide | Vidarbha Buddhist Circuit
Dragon Palace Temple Nagpur Travel Guide | Vidarbha Buddhist Circuit

ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट देणे म्हणजे एक शांत आणि आध्यात्मिक अनुभव घेणे. मंदिराची सुंदर वास्तुकला आणि शांत वातावरण मनाला शांती देते. येथे ध्यानधारणा आणि प्रार्थना करून तुम्ही मानसिक ताण कमी करू शकता. ड्रॅगन पॅलेस केवळ धार्मिक स्थळ नाही, तर एक सांस्कृतिक आणि पर्यटन स्थळही आहे. नागपूरला भेट देणाऱ्या प्रत्येकाने या मंदिराला अवश्य भेट द्यावी. मंदिराच्या बाह्य आणि अंतर्गत भागात ड्रॅगनचे सुंदर नक्षीकाम केलेले आहे, जे जपानी कलात्मकतेचे दर्शन घडवते.

या परिसराच्या प्रवेशद्वारावर एक सुंदर, भव्य सोनेरी दरवाजा आहे. प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंतचा मार्ग चांगला पक्का केलेला असून तो हिरव्या झुडपांनी आणि बागेने सजवलेला आहे. संपूर्ण मार्गावर पंचशिला ध्वज लावलेले आहेत. मंदिराच्या अगदी समोर एक शांतीस्तंभ आहे, जो शांती आणि श्रद्धेचे प्रतीक असून मंदिराविषयी माहिती देतो.

मंदिर सममित असून चारही बाजूंनी त्याची उंची समान आहे. तळमजला प्रदर्शन क्षेत्र असून मुख्य मंदिर पहिल्या मजल्यावर आहे. छत तीन भव्य झुंबरांनी सजवलेले आहे. मंदिराच्या आत बुद्धाची एक मोठी मूर्ती स्थापित आहे, जिथे सर्व बौद्ध अनुयायी विशिष्ट वेळी प्रार्थना आणि बौद्ध मंत्रोच्चार करतात.

मंदिराच्या मागच्या बाजूने, शिखरावर सोनेरी शिखर असलेल्या पॅगोडा इमारतीचे (ध्यान केंद्र) सुंदर दृश्य दिसते. संपूर्ण परिसर विविध प्रकारच्या वनस्पतींनी युक्त बागेने व्यापलेला आहे.

कसे पोहोचाल? | How to reach Dragon Palace Temple

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टॅक्सी किंवा ऑटो रिक्षाने ड्रॅगन पॅलेस टेम्पलला पोहोचू शकता.
  • विमानतळापासून मंदिराचे अंतर सुमारे १५-२० किलोमीटर आहे.
  • रेल्वे स्टेशनपासूनचे अंतर सुमारे १०-१२किलोमीटर आहे.
  • नागपूर शहरातून ड्रॅगन पॅलेस टेम्पलपर्यंत अनेक बस सेवा उपलब्ध आहेत. कामठी रोडवर उतरून तुम्ही मंदिरापर्यंत पोहोचू शकता.
  • स्वत:चे वाहन असेल, तर कामठी रोडने ड्रॅगन पॅलेसला पोहोचू शकता. तेथे पार्किंगची व्यवस्था आहे.

केव्हा जायचे

ड्रॅगन पॅलेस टेंपल दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खुले असते.

तुमचे मत कमेंटमध्ये लिहा आणि मित्रांसोबत शेअर करा.

Comments

Post a Comment

तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️

🔍 शोधा
लेख लोड होत आहेत...
🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
💡
आजचा मराठी शब्द by WhatsUp मराठी
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|Eg. तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|Eg. त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|Eg. डोंगरातील पाणी नितळ आहे.
तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|Eg. तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|Eg. सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
ओंजळ|हाताचा कप्पा|देशज मराठी|हातभर|Eg. त्याने ओंजळीत पाणी घेतले.
हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|Eg. हळुवार वारा वाहत होता.
मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|Eg. तिचा आवाज मंजुळ आहे.
मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|Eg. मृद्गंध दरवळला.
आभाळमाया|असीम प्रेम|देशज मराठी|अपार माया|Eg. आईची आभाळमाया विसरता येत नाही.
धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|Eg. तो संगीतात धुंद झाला.
झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|Eg. थंड झुळूक आली.
नभ|आकाश|संस्कृत|गगन|Eg. नभ निरभ्र होते.
उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|Eg. त्याला आनंदाचा उमाळा आला.
साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|Eg. ती साजिरी दिसत होती.
गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|Eg. फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|Eg. सूर्याचा कवडसा पडला.
जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|Eg. गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|Eg. गाण्याची लय सुंदर होती.
कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|Eg. कोमेजलेली फुले दिसत होती.
दरवळ|मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|Eg. चाफ्याचा दरवळ पसरला.
सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|Eg. सावळ्या ढगांनी आकाश भरले.
सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|Eg. तिचा चेहरा सतेज दिसत होता.
मधुमालती|सुगंधी वेल|संस्कृत|फुलवेल|Eg. अंगणात मधुमालती फुलली होती.
गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|Eg. कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
हुरहूर|मनातील ओढ|देशज मराठी|व्याकुळता|Eg. जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|Eg. गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|Eg. धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|Eg. पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|Eg. दिव्याची ज्योत लवलवत होती.
उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|Eg. तरुणांमध्ये उमेद आहे.
गोजिरी|नाजूक सुंदर|देशज मराठी|साजिरी|Eg. गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|Eg. आंब्याला मोहोर आला आहे.
सुगंधी|सुगंध असलेले|संस्कृत|दरवळते|Eg. सुगंधी फुले बहरली.
अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|Eg. गावचा चहा अमृततुल्य लागतो.
झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|Eg. घंटांचा झंकार झाला.
सहजसुंदर|नैसर्गिक सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|Eg. तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|Eg. आसमंत शांत होता.
सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|Eg. सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|Eg. डोंगरातून निर्झर वाहत होता.
नादमय|संगीतपूर्ण|संस्कृत|सुरेल|Eg. सभागृह नादमय झाले.
मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|Eg. मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|Eg. संगीताचे स्पंदन जाणवत होते.
चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|Eg. वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|Eg. मृदुल वाळूवर पावले उमटली.
अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|Eg. ती अलवार हसली.
स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|Eg. पक्षी स्वैर उडत होते.
सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|Eg. फुलांची सुरभि दरवळली.
दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|Eg. तिच्या डोळ्यांत दीप्ती होती.
प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|Eg. अंगणात प्राजक्त फुलला होता.
निरभ्र|पूर्ण स्वच्छ|संस्कृत|ढगविरहित|Eg. निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.

अजून इंटरेस्टिंग...

कोकणस्पर्श: निसर्ग, संस्कृती आणि स्वप्नांचा प्रवास | Author: Eknath Acharekar | Konkansparsh; Explore the hidden treasures of Konkan | Maharashtra Tourism

सह्याद्रीतील शिल्परत्न ‘अमृतेश्वर मंदिर’ | नरेंद्र चांदेवार | Author: Narendra Chandewar | Amruteshwar Temple | Maharashtra Tourism | Incredible India

नागपुरातील संजीवनग्राममध्ये घ्या ‘वेलनेस टुरिझम’ चा आनंद | Sanjeevan Nature Cure | Wellness Tourism in Maharashtra

गड सर केला…आणि मनही | हरिश्चंद्रगडाचा धाडसी प्रवास | Author: Shubhangi Kalmegh | Harishchandragad Trekking Experience & Guide | Forts of Maharashtra

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

नागपुरातील मोहिते वाडा : संघ शाखेची जन्मभूमी | Author: Amol Pusadkar | Mohite Wada, Birthplace of the Rashtriya Swayamsevak Sangh | Heritage Tourism | Maharashtra Tourism

तुम्ही पण होऊ शकता पर्यटन उद्योजिका, महाराष्ट्र शासनाच्या ‘आई’ महिला पर्यटन धोरण | महाराष्ट्र स्टार्टप स्टोरीज | Tours & Travel Entrepreneurship for Women | Startups & Careers | Maharashtra Startup Stories

‘पुरण पोळी’ च्या गावाला जाऊ या....! आजनसरा | Author: Sakhi | Ajansara Temple | Temples in Maharashtra | Maharashtra Tourism

ज्योतिबाच्या यात्रेत सासनकाठ्या का आणतात? डॉ. संपदा नासेरी | Dr. Sampada Naseri | Jyotiba Temple Experience Kolhapur | Temples in Maharashtra

महाराष्ट्रातील डार्क स्काय पर्यटन, शहरी गोंगाटापासून दूर, आकाशाच्या कुशीत | Dark Sky Tourism | Astro Tourism | Maharashtra Tourism Policy