गड सर केला…आणि मनही | हरिश्चंद्रगडाचा धाडसी प्रवास | Author: Shubhangi Kalmegh | Harishchandragad Trekking Experience & Guide | Forts of Maharashtra

हरिश्चंद्रगडाचा धाडसी प्रवास | Harishchandragad Trek

सर्वप्रथम मी रिल संस्कृतीला धन्यवाद करेल की त्याच्या मोहात मी निसर्गाच्या कुशीत जाण्याचा आणि त्यातही ट्रेकिंगसाठी हरिश्चंद्रगडावर जाण्याचा निर्णय घेतला. काही गोष्टी सोशल ट्रेंड म्हणून केल्या तरी त्याने आत्मिक साद इतकी छान जुंपते की आपलं जीवनच डिस्कव्हरी वाटायला लागतं. कारण जे निसर्गात अनुभवास येतं ते चार भिंतींच्या महालात कधीच नाही येणार. रोजच्या दिनचर्येत अडकलेलो आपण या वेंधळ्या जगात अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो पण सपशेल अपयशी ठरून निराशेच्या टोकावर पोहचल्यावर निसर्गाचं शांत टोक आठवतं. मलाही आठवलं त्यामुळे माझ्यासारख्याचं ज्या दोघी मैत्रिणींना माझ्या आधी आठवलं त्यांना समोर करून मी वाट धरली मला हरवून टाकणाऱ्या वाटेची. उत्साह, थोडी भीती, आणि एक अनामिक ओढ मनात घेऊन आम्ही निघालो.

Amazing scenery during the journey

रात्रभराचा प्रवास… आणि पहाटे ३ वाजता आम्ही इगतपुरी स्टेशनला उतरलो. वातावरण थोडं गार, थोडं धूसर होतं. गाईडने जिवंत घरी पोहचून देण्याची ग्वाही दिली पण मनात तेव्हाच कूठे खरा थरार चालु झाला. थोड्या वेळाने आम्ही हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी पाचमई गावात पोहचलो. थकलेल्या शरीराला ताजेतवाणे करण्यासाठी फ्रेश झालो, गरमागरम नाश्ता केला आणि सकाळी ९ वाजता आम्ही खरं म्हणजे आमच्या 'आत्मयात्रे'ला निघालो. सुरुवातीला वाट सरळ होती, पण जसजसे पायऱ्या चढायला लागलो, तसतसं एक वेगळंच जग उलगडत गेलं. समोर हिरवीगार वाट, सभोवताली दाट धुकं, मधूनच दिसणारे झरे आणि त्याच्या मोहात वाहून जाणारे आम्ही. चालताना शरीर थकत होतं, पण मन मात्र त्या सौंदर्याचे "किती सुंदर हे" इतकंच गाणे गात होतो. बऱ्याच चढानंतर केवळ भौतिकचं नाही तर मानसिक चढानंतर आम्ही पोहोचलो हरिश्चंद्रगडावर. वर पोहचल्यावर एक क्षणभर श्वास रोखला गेला. समोरचं दृश्य इतकं अद्भुत होतं की ते शब्दांत सांगणं अशक्य.

सगळच अद्‌भूत

गडावरचं जुनं मंदिर, त्या परिसरातलं शुद्ध शांततेचं वातावरण… आणि एक झाड जे कायम माझ्या काल्पनिक दुनियेच्या चित्रांमध्ये घर करून राहणार.. इतकं ते सुंदर. तेथील मंदिरातील शिवलिंग पूर्ण पाण्याच्या परिसरात बसलेला आणि मंदिराच्या उरलेल्या एकाच खांबाविषयी वेगळ्या भाबड कथा. असो. आतापर्यंत आम्हाला भुकेच्या महामायेने ग्रासले होते... सोबत आणलेल्या प्रोटीन बारच्या मदतीने पोहचलो आम्ही नजरेला आणि बुद्धीला भारावून टाकणाऱ्या 'कोकणकडा' येथे. तो क्षण… ते दृश्य… आयुष्यात एकदातरी अनुभवायला हवं असच! त्याच ठिकाणी आम्ही गरम जेवणाचा आस्वाद घेतला… आणि मग परतीचा प्रवास सुरू झाला… आणि पावसाने खऱ्या अर्थाने परीक्षा घ्यायला सुरवात केली. पावसाचा जोर वाढलेला… वाटा ओल्या… जागोजागी धबधबे वाहत होते… पाय घसरत होते… चढण जितकी थरारक, उतरण तितकीच धाडसाची! शेवटी संध्याकाळपर्यंत आम्ही सगळे खाली आलो. अंगात त्राण नव्हतं, पण मन समाधानाने भरलेलं. दुसऱ्या दिवशी ट्रेक काहीसा सोपा होता. हपाट्याचा कडा. तिथलं दृश्यही कमालीचं सुंदर. ढगांमध्ये लपलेलं आकाश, पायाखाली खोल दरी… आणि मनात केवळ एकच भावना हे सगळं अनुभवायला मिळालं, त्यासाठी स्वतः घेतलेल्या निर्णयाचा आदर वाटायला लागला. हा ट्रेक माझ्यासाठी केवळ शारीरिक साहस नव्हतं, तर स्वतःला नवीन रूपात पाहण्याचा एक सुंदर प्रसंग, स्वतःला अनुभवण्याचा.. स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याचा... स्वतः च्या भितीला भिंतीच्या बाहेर काढण्याचा...

Amazing scenery during the journey

ट्रेकर्सची पंढरी | Amazing Trekking Spot Harishchandragag

हरिश्चंद्रगड ट्रेक हा महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एक अत्यंत लोकप्रिय आणि आव्हानात्मक गिरिदुर्ग आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे १४२४ मीटर (४६९१ फूट) उंचीवर असलेला हा किल्ला ट्रेकर्सची पंढरी मानला जातो. 

आम्ही पोहोचलो हरिश्चंद्रगडावर

येथे प्राचीन गुहा, भव्य कोकणकडा आणि निसर्गाचे विहंगम दृश्य अनुभवता येते. हा गड पुणे, ठाणे आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला आहे. हा किल्ला ६ व्या शतकातील कलचुरी राजवंशाच्या काळातील आहे. त्यानंतर मुघल आणि नंतर १७४७ मध्ये मराठ्यांनी तो जिंकून घेतला.


आम्ही पोहोचलो हरिश्चंद्रगडावर

प्रमुख आकर्षणे | Key places to visit during Harishchandragad Trek

कोकणकडा: हा महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि अर्धांगिनीच्या आकाराचा सरळ तुटलेला कडा आहे, जिथून ढगांचे आणि दऱ्यांचे नयनरम्य दृश्य दिसते.

केदारेश्वर गुहा: मंदिराच्या डाव्या बाजूला एक अतिशय प्राचीन आणि भव्य गुहा आहे, ज्यामध्ये मध्यभागी एक मोठे शिवलिंग आहे. या शिवलिंगाच्या चारही बाजूंनी पाणी आहे.

हरिश्चंद्रेश्वर मंदिर: काळ्या पाषाणात कोरलेले हे प्राचीन मंदिर शिल्पशास्त्राचा उत्तम नमुना आहे.

तारामती शिखर: हे गडावरील सर्वात उंच शिखर (सुमारे ४८५० फूट) आहे. येथून आजूबाजूच्या पर्वत रांगा आणि माळशेज घाटाचे विहंगम दृश्य दिसते.

सप्ततीर्थ पुष्कर्णी: मंदिराच्या समोर असलेले पाण्याचे सुंदर कुंड.

ट्रेकिंगचे मुख्य मार्ग

पाचनई मार्ग : हा ट्रेक करण्यासाठी सर्वात सोपा आणि कमी वेळ लागणारा मार्ग आहे. पाचनई गावावरून माथ्यावर पोहोचण्यासाठी सुमारे ३ तास लागतात.

खिरेश्वर मार्ग : हा खिरेश्वर गावातून सुरू होतो. हा मार्ग थोडा आव्हानात्मक असून घनदाट जंगलातून आणि खडकाळ वाटेवरून जातो. माथ्यावर पोहोचण्यासाठी ५ तास लागतात.

बेलपाडा मार्ग : हा सर्वात कठीण आणि दमछाक करणारा मार्ग आहे (काळू नदीच्या पात्रातून).

ट्रेकसाठी सर्वोत्तम वेळ | When and how to plan a trek to Harishchandragad

पावसाळा : निसर्गात हिरवळ, धुक्याची चादर आणि अनेक छोटे-मोठे धबधबे पाहण्यासाठी हा काळ उत्तम आहे.

हिवाळा : ट्रेकिंगसाठी सर्वात सुरक्षित आणि आल्हाददायक वातावरण असते.

खाद्य व निवास: गडावर स्थानिक गावकऱ्यांकडून (उदा. पाचनई किंवा खिरेश्वर येथील रहिवासी) राहण्याची आणि जेवणाची (झुणका-भाकर) सोय उपलब्ध असते. केदारेश्वर गुहेमध्येही पर्यटक रात्री मुक्काम करू शकतात.

कसे पोहोचाल 

नागपूरहून हरिश्चंद्रगडला जाण्यासाठी रस्ते, रेल्वे किंवा विमान प्रवासाचा पर्याय उपलब्ध आहे. नागपूर ते हरिश्चंद्रगड हे अंतर सुमारे ६६५ किमी आहे.

रेल्वे आणि बसने (सर्वात स्वस्त पर्याय): नागपूर ते इगतपुरी किंवा कल्याण रेल्वे स्टेशनपर्यंत रेल्वेगाडीने जाता येईल. तेथून पुढे आळेफाटा मार्गे माळशेज घाटातून जाणाऱ्या एसटी बसने 'खिरेश्वर' (हरिश्चंद्रगडाचे पायथ्याचे गाव) येथे पोहोचाल.विमानाने जायचे असल्यास नागपूरवरून मुंबईला जायचे. तिथून खासगी टॅक्सी किंवा एसटी बसने खिरेश्वर  गावाला जायचे.खासगी वाहनाने जाण्याचा पर्याय निवडायचा असल्यास

नागपूर ते औरंगाबाद मार्गे (समृद्धी महामार्ग) माळशेज घाट - खिरेश्वर असे जाता येईल.

तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️

शुभांगी काळमेघ
लेखक
नागपूर

Comments

🔍 शोधा
लेख लोड होत आहेत...
🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
💡
आजचा मराठी शब्द by WhatsUp मराठी
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|Eg. तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|Eg. त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|Eg. डोंगरातील पाणी नितळ आहे.
तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|Eg. तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|Eg. सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
ओंजळ|हाताचा कप्पा|देशज मराठी|हातभर|Eg. त्याने ओंजळीत पाणी घेतले.
हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|Eg. हळुवार वारा वाहत होता.
मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|Eg. तिचा आवाज मंजुळ आहे.
मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|Eg. मृद्गंध दरवळला.
आभाळमाया|असीम प्रेम|देशज मराठी|अपार माया|Eg. आईची आभाळमाया विसरता येत नाही.
धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|Eg. तो संगीतात धुंद झाला.
झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|Eg. थंड झुळूक आली.
नभ|आकाश|संस्कृत|गगन|Eg. नभ निरभ्र होते.
उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|Eg. त्याला आनंदाचा उमाळा आला.
साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|Eg. ती साजिरी दिसत होती.
गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|Eg. फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|Eg. सूर्याचा कवडसा पडला.
जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|Eg. गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|Eg. गाण्याची लय सुंदर होती.
कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|Eg. कोमेजलेली फुले दिसत होती.
दरवळ|मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|Eg. चाफ्याचा दरवळ पसरला.
सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|Eg. सावळ्या ढगांनी आकाश भरले.
सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|Eg. तिचा चेहरा सतेज दिसत होता.
मधुमालती|सुगंधी वेल|संस्कृत|फुलवेल|Eg. अंगणात मधुमालती फुलली होती.
गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|Eg. कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
हुरहूर|मनातील ओढ|देशज मराठी|व्याकुळता|Eg. जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|Eg. गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|Eg. धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|Eg. पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|Eg. दिव्याची ज्योत लवलवत होती.
उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|Eg. तरुणांमध्ये उमेद आहे.
गोजिरी|नाजूक सुंदर|देशज मराठी|साजिरी|Eg. गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|Eg. आंब्याला मोहोर आला आहे.
सुगंधी|सुगंध असलेले|संस्कृत|दरवळते|Eg. सुगंधी फुले बहरली.
अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|Eg. गावचा चहा अमृततुल्य लागतो.
झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|Eg. घंटांचा झंकार झाला.
सहजसुंदर|नैसर्गिक सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|Eg. तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|Eg. आसमंत शांत होता.
सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|Eg. सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|Eg. डोंगरातून निर्झर वाहत होता.
नादमय|संगीतपूर्ण|संस्कृत|सुरेल|Eg. सभागृह नादमय झाले.
मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|Eg. मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|Eg. संगीताचे स्पंदन जाणवत होते.
चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|Eg. वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|Eg. मृदुल वाळूवर पावले उमटली.
अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|Eg. ती अलवार हसली.
स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|Eg. पक्षी स्वैर उडत होते.
सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|Eg. फुलांची सुरभि दरवळली.
दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|Eg. तिच्या डोळ्यांत दीप्ती होती.
प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|Eg. अंगणात प्राजक्त फुलला होता.
निरभ्र|पूर्ण स्वच्छ|संस्कृत|ढगविरहित|Eg. निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.

अजून इंटरेस्टिंग...

नागपुरातील मोहिते वाडा : संघ शाखेची जन्मभूमी | Author: Amol Pusadkar | Mohite Wada, Birthplace of the Rashtriya Swayamsevak Sangh | Heritage Tourism | Maharashtra Tourism

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

तुम्ही पण होऊ शकता पर्यटन उद्योजिका, महाराष्ट्र शासनाच्या ‘आई’ महिला पर्यटन धोरण | महाराष्ट्र स्टार्टप स्टोरीज | Tours & Travel Entrepreneurship for Women | Startups & Careers | Maharashtra Startup Stories

‘पुरण पोळी’ च्या गावाला जाऊ या....! आजनसरा | Author: Sakhi | Ajansara Temple | Temples in Maharashtra | Maharashtra Tourism

महाराष्ट्रातील डार्क स्काय पर्यटन, शहरी गोंगाटापासून दूर, आकाशाच्या कुशीत | Dark Sky Tourism | Astro Tourism | Maharashtra Tourism Policy

बांबूंच्या बेटातून करा ‘झुकझुक गाडी’ ची रम्य सफर | First Bamboo Garden of India, Amravati | Author: Parijaat | Maharashtra Tourism

भटाळा गावात आहे ‘भोंडा महादेव’ | Author: Himgauri Deshpande | Bhonda Mahadev Temple Bhatala | Temples of Vidarbha | Temples of Maharashtra

अलेक्झांडर बर्न्स : बुखाराकडे निघालेला ब्रिटिश प्रवासी | Alexander Burnes and Travels into Bukhara | Travellers of the World

हेन्री ऑक्सिंडन : शिवराज्याभिषेक पाहणारा इंग्रज प्रवासी | Henry Oxinden and His Journey to Maratha Land | Travellers of the World

भामरागडमध्ये जलक्रांतीतून निर्मित ‘तलावांचे जाळे’ | अनिकेत प्रकाश आमटे | लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte