विदर्भात समुद्र होता तेव्हा...! | Author: Prof Suresh Chopne | Ocean in Vidarbha Maharashtra? | Heritage Tourism | Maharashtra Tourism

कुठून आला आणि कुठे गेला हा समुद्र?

पृथ्वीची निर्मिती ४.५ बिलियन वर्षांपूर्वी झाली. पण पुढे सजीवांची निर्मिती मात्र फार कठीण आणि धिम्या गतीने होत गेली. प्रारंभी पृथ्वी अतिशय ज्वलंत होती. हळूहळू वरचा थर थंड होत गेला आणि समुद्र तयार झाला. याच काळातील म्हणजे ४०० ते २५० कोटी वर्षांदरम्यानचे खडक आजही पूर्व विदर्भात आढळून येतात. त्यांना आर्कियन खडक म्हणतात. स्ट्रोमेटोलाईट खडक तर (निओ प्रोटेरोजोइक) विदर्भात १६० कोटी वर्षांपासून अढळस्थान राखून आहेत. पृथ्वी निर्मितीच्या ३ अब्ज वर्षांनंतर समुद्रात सायनो बॅक्टेरिया तयार झाले आणि प्राण्यांची निर्मिती सुरू झाली. नंतर कीटक, मासे, सरपटणारे प्राणी, धावणारे जीव तयार झाले.

Dinosaur & Oceans in Maharashtra

गोंडवाना कालखंड हा विदर्भाच्या ऐतिहासिक, भौगोलिक व पुरातत्त्वीय दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे. याच ३० कोटी वर्षांच्या काळात समुद्रात वाळू व माती मिसळली आणि समुद्र दूर जायला लागला. जंगलातील वृक्ष व जीव वरच्या थरात स्थिरावत गेले. जुरासिक या २० कोटी वर्षांच्या कालखंडात प्रचंड मोठे डायनासोर विकसित झाले. या शाकाहारी आणि मांसाहारी डायनासोरसोबतच विविध महाकाय प्राणीही तयार झाले. अशा मोठमोठ्या जीवांच्या निर्मितीमुळेच या काळाला ‘विशाल प्राण्यांचा काळ’ म्हणतात. क्रिटाशियस हा काळ जगात विनाशाचा काळ ठरला. पृथ्वीवर ज्वालामुखींचे उद्रेक झाले, लाव्हारस वाहू लागला. ६ कोटी वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्याकडून थेट नागपूर-चंद्रपूरपर्यंत लाव्हारस वाहात आला आणि सर्व जीव, जंगल जळून खाक झाले. पुढे लाखो वर्षांनी सजीव पुन्हा विकसित झाले. परंतु ते आकाराने लहान होते. या सर्व उलथापालथीत पृथ्वीच्या पोटात गाडल्या गेलेल्या अब्जावधी जीवांचे जीवाश्म तयार झाले. ते आजही भूगर्भात आढळतात. विदर्भात असे अनेक जीवश्म पुरावे मला आढळले आहेत. त्यात खालील जीवाश्मांचा समावेश आहे.

Stromatolites: Research by Prof. Suresh Chopane

स्ट्रोमेटोलाईट | Stromatolites in Vidarbha

पृथ्वीवर सर्वात आधी जन्म घेतलेला जीव म्हणजे सायनो बॅक्टेरिया! त्यांनी ३ अब्ज वर्षांमागे समुद्रात सूक्ष्म रुपाने जन्म घेतला. या जीवांचे खडकांच्या रुपातील तसेच जिवंत पुरावेही आज उपलब्ध आहेत. जमिनीवर पूर्वी जिथे समुद्र होता त्या भागात आजही स्ट्रोमेटोलाईट जीवाश्म आढळतात. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात अतिप्राचीन काळी चक्क समुद्र होता. आणि हे शंभर टक्के सत्य आहे. कारण त्याच गतकालीन समुद्रातील चुनखडीच्या खडकात या जीवांचे जीवश्म आढळतात. वणी आणि चंद्रपूर तालुक्यात तर हे जीवाश्म अगदी स्पष्टपणे दिसतात. ते मी माझ्या संग्रहालयात सुरक्षित ठेवले आहेत. या काळात राजस्थान, मध्य भारत, उत्तर भारत, विदर्भ आणि पुढे इतर राज्यात काही ठिकाणी हा उथळ समुद्र होता. पुढे ५० कोटी वर्षेपर्यंत असलेल्या समुद्रात हळूहळू बदल होत गेला.

महाकाय डायनासोरचा उदय | Huge Dinosaur Evolution in Vidarbha

डायनासोरचा उदय अंदाजे २३ ते २४ कोटी वर्षांपूर्वी ट्रायसिक कालखंडात झाला. ते अर्कोसॉर्स नावाच्या सरपटणाऱ्या प्राण्यांपासून उत्क्रांत झाले. सुरुवातीला हे प्राणी छोटे आणि दोन पायांवर चालणारे होते. जे काळाच्या ओघात विविध आकारात परिवर्तित होऊन पृथ्वीवर वर्चस्व गाजवू लागले. त्यांचे युग होते... मेसोजोइक युग......
डायनासोरचा काळ हा तीन प्रमुख कालखंडात विभागला जातो.

१. ट्रायसिक कालखंड - उदय आणि सुरुवात
२.जुरासिक कालखंड - विशाल आकाराच्या डायनासोरचा सुवर्ण काळ
३. क्रीटेशिअस कालखंड - अंतिम विकास आणि ६.६ कोटी वर्षांपूर्वी नामशेष होणे.


पश्चिम महाराष्ट्रात ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्यातील लाव्हारस नागपूर-चंद्रपूरपर्यंत वाहात आला. संपूर्ण जंगल आणि प्राणी नष्ट झाले. हा पृथ्वीवरचा अत्यंत भीषण विनाश होता. आजही विदर्भातील त्यात नष्ट झालेल्या जीवांच्या अवयवांचे तुकडे, अंडी, विष्टा आदी लाव्हा खडकाच्या आत तुरळक ठिकाणी आढळतात. माझ्या संग्रहालयातही ते बघायला मिळतात.

वृक्ष आणि पानांचे जीवाश्म

२० कोटी वर्षांच्या जुरासिक काळात जंगलांचा विकास झाला. अवाढव्य वृक्षांच्या सहवासातील महाकाय प्राणी तसेच अतिप्रचंड सजीवांचा तो काळ होता. नद्यांच्या प्रवाहात वाहून येणारे वृक्ष आणि पानांचे पुढे प्रतिलीपी जीवाश्म तयार झाले. असे जीवाश्म आज कोळसा खाणीत, नदीत आणि खोल भागात आढळतात. माझ्या संशोधनात मला असे जीवाश्म सापडले आहेत. विशेषत: चंद्रपूर जिल्ह्यात आणि सिरोंचा परिसरात मोठ्या झाडांचे जीवाश्म सापडतात.

Where was the sea?

मासे आणि शंख शिंपले जीवाश्म

पूर्व विदर्भात समुद्री पाण्यातील मासळ्यांचे जीवाश्म गोड्या पाण्यातील जीवाश्मांच्या तुलनेत कमी प्रमाणात आढळतात. सिरोंचा तालुक्यात मोठ्या माशांचेही जीवाश्म आढळले आहेत. तर चंद्रपूर जिल्ह्यात गोड्या पाण्यातील शंख, शिंपले सापडले आहेत. वर्धा नदीत, माणिकगड पहाड रांगेत तसेच थेट यवतमाळ जिल्ह्यापर्यंत हे जलजीव आढळतात. वर्धा आणि उमरेड तालुक्यातही त्यांचे अस्तित्व आहे. ६ कोटी वर्षांपूर्वी विदर्भात वाहून आलेल्या लाव्हारसामुळे हे जलचर अश्मरुपात उरले. मी आतापर्यंत १५ ठिकाणी असे शंख-शिंपले शोधले असून त्यापैकी बरेच माझ्या संग्रहालयात सुरक्षित आहेत.

हत्तींचे जीवाश्म

२ लाख ते ११,००० वर्षांच्या प्लेइस्टोशिन काळात, भारतात सध्या अस्तित्वात असलेले काही हत्ती आणि प्राणी होते. परंतु काही वाघ, हत्ती तसेच अन्य प्राणी कायमचे नष्ट झाले. देशातील हिमालयीन क्षेत्रात हत्तींची जीवाश्मे आढळली आहेत. परंतु महाराष्ट्रात अशी हत्तींची जीवाश्मे सापडली नव्हती. मात्र मला २०२४ साली वरोरा तालुक्यातील वर्धा नदीजवळ हत्तीच्या हाडाचे आणि दातांचे काही जीवाश्म सापडले. ते २० हजार वर्षांपूर्वीचे असून हिमयुगानंतर वितळलेल्या बर्फाच्या महापुरात वाहून आलेल्या हत्तींचे असावेत. हा अश्मरुप हत्ती २० फूट उंचीचा होता, हे या जीवाश्मांचे वैशिष्ट्य होय. या भागात तयार झालेले हे जीवाश्म अगदी नाजूक असून त्यांना ओढण्याचा प्रयत्न करताच ते तुटून जात. ते जीवाश्म मी माझ्या अश्म संग्रहालयात जपून ठेवले आहेत. विदर्भात आणि महाराष्ट्रात आढळलेले हे जीवाश्म म्हणजे एक मोठा वारसा आहे.



विदर्भातील विशिष्ट जीवाश्म स्थळे

विदर्भ हा दख्खनच्या पठाराचा भूगर्भीय भाग आहे. खरं तर सहा कोटी वर्षांपूर्वी बेसाल्ट हा ज्वालामुखी खडक हा महाराष्ट्रभर पहावयास मिळतो. परंतु त्यापूर्वी जेव्हा येथे समुद्र होता तेव्हा आजच्या बेसाल्टच्या खाली गोंडवाना सारखाच भूभाग आहे. जिथे वाळू, चुनखडक प्राचीन स्ट्रोमॅटोलाईट आणि डायनासोर सारख्या इतर प्राण्यांचे जीवाश्म सुद्धा आहेत. बेसाल्ट खडक हे खूप खोलवर असल्याने तिथे आज ते सापडत नाहीत. मात्र वर्धा, यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूर येथे मात्र अनेक भागात गोंडवाना भाग सहज उपलब्ध असल्यामुळे तेथे जीवाश्म सहज सापडतात. याच भागात १५० कोटी वर्षांपूर्वीचे स्ट्रोमॅटोलाइटचे जीवाश्म आढळतात. त्यानंतरचे वृक्ष आणि पाने,डायनासोर, शंख शिंपले सापडतात. आज जिथे डायनासोरसोबत इतर अनेक जीवांचे पुरावे आढळतात त्यात सिरोंचा, चंद्रपूर,वर्धा आणि उमरेडचा समावेश आहे.

वर्धा व्हॅली महत्वाची ठरली

आज जी वर्धा व्हॅली आहे ती चंद्रपूर, वर्धा, सिरोंचा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशपर्यंत विशेष भौगोलिक स्थळ आहे. इतर ठिकाणी बेसाल्ट राहिला. विदर्भात मात्र पाच ते सहा किलोमीटर खोल दऱ्या खोऱ्या शिल्लक राहिल्या. १० कोटी वर्षे काळापासून पुढे इथे या दरीत जंगले वाहून आली आणि कोळसा तयार झाला, मिथेन वायू जमा झाला. समुद्राच्या लांब दऱ्यात वाळू, चुना, रेती आणि खडक गोळा होत राहिले. ६ कोटी वर्षांनंतर येथील दऱ्या भरल्या आणि आजही त्या तश्याच भरून दिसतात, केवळ जिथे कोळसा खाणी आहेत तिथेच जुना काळ दिसतो. खऱ्या अर्थाने ६ कोटी वर्षापूर्वीच येथील समुद्र दक्षिण समुद्राला मिळाला आणि विदर्भात भूभाग तयार झाला.

Last Day of the Dinosaurs

समुद्र परत येणार का?

कोट्यवधी वर्षांपूर्वी गायब झालेला समुद्र भविष्यात पुन्हा वापस येईल का याचा अंदाज घेतला तर निश्चित पुन्हा येईल परंतु त्यासाठी कोट्यवधी वर्षे लागणार आहेत. अर्थात तेव्हाचे समुद्री पुरावे आणि अस्तित्व आजही आढळते. वि्ज्ञान, भूगोल, भूशास्त्र, जीवशास्त्र अशा अनेक विषयांसाठी हा इतिहास सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे.

तुमचे मत कमेंटमध्ये लिहा आणि मित्रांसोबत शेअर करा.

प्रा. सुरेश चोपणे
इतिहास अभ्यासक आणि संशोधक
चंद्रपूर

Comments

Post a Comment

🌍✍️ तुमचं मत नक्की कळवा. तुमची ओळख न सांगताही तुमचा अभिप्राय देऊ शकता.

🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
आजचा मराठी शब्दआजचा प्रश्न
या शब्दाचा अर्थ काय आहे?तुम्हाला याचे उत्तर माहीत आहे का?
उत्तरासाठी कार्ड उलटा
अर्थउत्तर
उगमअधिक माहिती
समानार्थीश्रेणी
वाक्यात उपयोग
WhatsUp मराठी पुन्हा उलटा
जानेवारी|फेब्रुवारी|मार्च|एप्रिल|मे|जून|जुलै|ऑगस्ट|सप्टेंबर|ऑक्टोबर|नोव्हेंबर|डिसेंबर
WORD|अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
WORD|लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
WORD|नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|डोंगरातील पाणी नितळ आहे.
WORD|तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
WORD|रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
WORD|ओंजळ|दोन्ही हातांचा केलेला कप्पा|देशज मराठी|हातभर|त्याने ओंजळीत पाणी घेतले.
WORD|हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|हळुवार वारा वाहत होता.
WORD|मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|तिचा आवाज मंजुळ आहे.
WORD|मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|पहिल्या सरीनंतर मृद्गंध दरवळला.
WORD|आभाळमाया|असीम, अपार प्रेम|देशज मराठी|अपार माया|आईची आभाळमाया विसरता येत नाही.
WORD|धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|तो संगीतात धुंद झाला.
WORD|झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|संध्याकाळी थंड झुळूक आली.
WORD|नभ|आकाश|संस्कृत|गगन|पहाटे नभ निरभ्र होते.
WORD|उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|त्याला आनंदाचा उमाळा आला.
WORD|साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|ती साजिरी दिसत होती.
WORD|गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
WORD|कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|फटीतून सूर्याचा कवडसा पडला.
WORD|जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
WORD|लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|गाण्याची लय सुंदर होती.
WORD|कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|फुलदाणीत कोमेजलेली फुले दिसत होती.
WORD|दरवळ|पसरणारा मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|चाफ्याचा दरवळ पसरला.
WORD|सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|सावळ्या ढगांनी आकाश भरले.
WORD|सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|तिचा चेहरा सतेज दिसत होता.
WORD|मधुमालती|सुगंधी फुलांची वेल|संस्कृत|फुलवेल|अंगणात मधुमालती फुलली होती.
WORD|गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
WORD|हुरहूर|मनातील अस्वस्थ ओढ|देशज मराठी|व्याकुळता|जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
WORD|निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
WORD|तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
WORD|मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
WORD|लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|दिव्याची ज्योत लवलवत होती.
WORD|उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|तरुणांमध्ये नवी उमेद आहे.
WORD|गोजिरी|नाजूक व सुंदर|देशज मराठी|साजिरी|गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
WORD|मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|आंब्याला मोहोर आला आहे.
WORD|अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|गावचा चहा अमृततुल्य लागतो.
WORD|झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|मंदिरातील घंटांचा झंकार झाला.
WORD|सहजसुंदर|नैसर्गिकरीत्या सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
WORD|आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|पहाटेचा आसमंत शांत होता.
WORD|सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
WORD|निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|डोंगरातून निर्झर वाहत होता.
WORD|नादमय|संगीताने भरलेला|संस्कृत|सुरेल|सभागृह नादमय झाले.
WORD|मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
WORD|स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|संगीताचे स्पंदन जाणवत होते.
WORD|चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
WORD|मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|मृदुल वाळूवर पावले उमटली.
WORD|अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|ती अलवार हसली.
WORD|स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|पक्षी स्वैर उडत होते.
WORD|सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|फुलांची सुरभि दरवळली.
WORD|दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|तिच्या डोळ्यांत वेगळीच दीप्ती होती.
WORD|प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|अंगणात प्राजक्त फुलला होता.
WORD|निरभ्र|ढगविरहित, पूर्ण स्वच्छ|संस्कृत|स्वच्छ|निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?|रायगड|६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातून वाहणारी सर्वात लांब नदी कोणती?|गोदावरी|त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे उगम पावणारी गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी असून तिला 'दक्षिण गंगा' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली?|१ मे १९६०|संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये अस्तित्वात आली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?|कळसूबाई|अहिल्यानगर जिल्ह्यातील हे शिखर सुमारे १,६४६ मीटर उंच असून ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे.|भूगोल
GK|संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' कोणत्या गावी लिहिली?|नेवासे|अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथे भगवद्गीतेवरील ही मराठी टीका लिहिली गेली.|संस्कृती
GK|लोणार सरोवर कशामुळे तयार झाले?|उल्कापातामुळे|बुलढाणा जिल्ह्यातील हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बेसाल्ट खडकात उल्का आदळून तयार झालेले जगातील दुर्मीळ सरोवर आहे.|भूगोल
GK|तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला?|सिंहगड (कोंढाणा)|१६७० मधील या लढाईत तानाजी धारातीर्थी पडले; 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार प्रसिद्ध आहेत.|इतिहास
GK|अफझलखानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला?|प्रतापगड|१६५९ मध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाजवळ ही ऐतिहासिक भेट व संघर्ष घडला.|इतिहास
GK|मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?|दर्पण|बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये 'दर्पण' सुरू केले; त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक मानले जाते.|संस्कृती
GK|'केसरी' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?|लोकमान्य बाळ गंगाधर टिळक|१८८१ मध्ये मराठीतून 'केसरी' आणि इंग्रजीतून 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू झाली.|इतिहास
GK|'सत्यशोधक समाज' कोणी स्थापन केला?|महात्मा जोतिराव फुले|२४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात स्थापन झालेली ही संस्था सामाजिक समतेसाठी कार्यरत होती.|इतिहास
GK|'श्यामची आई' या पुस्तकाचे लेखक कोण?|साने गुरुजी|पांडुरंग सदाशिव साने यांनी नाशिकच्या कारागृहात हे पुस्तक लिहिले.|साहित्य
GK|'नटसम्राट' या गाजलेल्या नाटकाचे लेखक कोण?|वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)|कुसुमाग्रजांना १९८७ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.|साहित्य
GK|मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा होतो?|२७ फेब्रुवारी|कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.|संस्कृती
GK|वेरूळ येथील कैलास लेणे कोणत्या राजवटीत कोरले गेले?|राष्ट्रकूट|एकाच अखंड खडकात वरून खाली कोरलेले हे मंदिर जगातील स्थापत्यशास्त्रीय आश्चर्य मानले जाते.|इतिहास
GK|अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?|छत्रपती संभाजीनगर|बौद्ध चित्रकला व शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेली ही लेणी युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहेत.|पर्यटन
GK|एलिफंटा लेणी कोणत्या देवतेला समर्पित आहेत?|शिव|मुंबईजवळील घारापुरी बेटावरील त्रिमूर्ती शिल्प जगप्रसिद्ध आहे.|पर्यटन
GK|महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत?|पाच|भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ — बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत.|संस्कृती
GK|अष्टविनायक म्हणजे किती गणपती मंदिरे?|आठ|पुणे, रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विखुरलेली ही आठ स्वयंभू गणपती मंदिरे आहेत.|संस्कृती
GK|कृष्णा नदीचा उगम कोठे होतो?|महाबळेश्वर|सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्या उगम पावतात.|भूगोल
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?|शिवनेरी|पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या या किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी त्यांचा जन्म झाला.|इतिहास
GK|संत तुकाराम महाराजांचे गाव कोणते?|देहू|पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीकाठचे देहू हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.|संस्कृती
GK|संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?|आळंदी|पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली.|संस्कृती
GK|सेवाग्राम आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?|वर्धा|महात्मा गांधींनी १९३६ मध्ये येथे वास्तव्य सुरू केले; हे स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्वाचे केंद्र ठरले.|इतिहास
GK|पवनार आश्रम कोणाशी संबंधित आहे?|आचार्य विनोबा भावे|वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून विनोबांनी भूदान चळवळीचे कार्य केले.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते?|ताडोबा|चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा १९५५ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झाले; पुढे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तयार झाला.|वन्यजीव
GK|'संत्रानगरी' म्हणून कोणते शहर ओळखले जाते?|नागपूर|संत्र्यांच्या व्यापारामुळे मिळालेले हे नाव; नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.|भूगोल
GK|महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणते शहर मानले जाते?|पुणे|शिक्षण, साहित्य, नाट्य आणि संगीत परंपरेमुळे पुण्याला हे स्थान मिळाले आहे.|संस्कृती
GK|रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते?|रायरी|शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केली.|इतिहास
GK|पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?|१७६१|मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यातील या लढाईचा मराठा साम्राज्यावर मोठा परिणाम झाला.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेचे नाव काय?|जिजाबाई|जिजाऊंनी शिवरायांवर स्वराज्याचे संस्कार केले; त्यांना राजमाता म्हणून ओळखले जाते.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळ घोषित झाले?|२००४|व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतील ही वास्तू मुंबईचे प्रतीक मानली जाते.|पर्यटन
GK|गेट वे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे?|मुंबई|१९२४ मध्ये पूर्ण झालेली ही वास्तू अरबी समुद्राच्या काठी उभी आहे.|पर्यटन
GK|'लोकहितवादी' या टोपणनावाने कोण लेखन करत असत?|गोपाळ हरी देशमुख|त्यांच्या 'शतपत्रे' या लेखमालेने एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारणेला दिशा दिली.|साहित्य
GK|मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?|वि. स. खांडेकर|'ययाति' या कादंबरीसाठी १९७४ मध्ये त्यांना हा सन्मान मिळाला.|साहित्य
GK|जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?|गोदावरी|छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या धरणाच्या जलाशयाला 'नाथसागर' म्हणतात.|भूगोल
GK|कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?|सातारा|जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या धरणाच्या जलाशयाला 'शिवसागर' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते?|ताम्हण (जारूळ)|जांभळ्या रंगाची ही फुले पावसाळ्यात सह्याद्रीत मोठ्या प्रमाणात दिसतात.|निसर्ग
GK|महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?|शेकरू|मोठी उडणारी खार असलेला शेकरू भीमाशंकर अभयारण्यात प्रामुख्याने आढळतो.|वन्यजीव
GK|कास पठार कशासाठी प्रसिद्ध आहे?|रानफुलांच्या बहरासाठी|सातारा जिल्ह्यातील हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ पावसाळ्यानंतर फुलांच्या गालिच्यासाठी ओळखले जाते.|पर्यटन
GK|भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी ओळखले जाते?|शेकरू|पुणे जिल्ह्यातील हे अभयारण्य ज्योतिर्लिंगासाठीही प्रसिद्ध आहे.|वन्यजीव

अजून इंटरेस्टिंग...

श्रीकृष्णाच्या नगरीत... द्वारकाधीशांच्या चरणी, भाग १ | Author: Mrs. Manik Joshi | Dwarkadheesh Temple | Heritage Tourism | Incredible India

चंद्रपूर: निसर्ग, इतिहास, संस्कृती, लोकजीवन आणि वारशाचा समृद्ध पर्यटनपट | Author: Dr. Pallavi Tajne | Chandrapur Culture and Heritage | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism

महाराष्ट्रातील डार्क स्काय पर्यटन, शहरी गोंगाटापासून दूर, आकाशाच्या कुशीत | Dark Sky Tourism | Astro Tourism | Maharashtra Tourism Policy

भारताचा प्राचीन 'सिल्क रूट’ नाणेघाट | Author: Narendra Chandewar | Silk Route of India, Naneghat | Maharashtra Tourism

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

गोठवणाऱ्या थंडीत आयफेल टॉवरचा अद्‌भूत नजारा... पुस्तकांच्या पलीकडे, जगाच्या जवळ | Author: Yash Naseri | Eiffel Tower Paris | International & Global Tourism

भामरागडमध्ये जलक्रांतीतून निर्मित ‘तलावांचे जाळे’ | अनिकेत प्रकाश आमटे | लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte

विदर्भातही येऊन गेले होते गौतम बुद्ध: विदर्भातील बौद्ध सर्किट | Vidarbha Buddhist Circuit Travel Guide

भटाळा गावात आहे ‘भोंडा महादेव’ | Author: Himgauri Deshpande | Bhonda Mahadev Temple Bhatala | Temples of Vidarbha | Temples of Maharashtra