मुंबई ते लंडन बाय रोड… २३ देशांचा थरार ! | Mumbai to London by Road | Author: Hemant Vijaykumar Shah | Travellers of the World Series | International Tourism
Road to London
मुंबई ते लंडन बाय रोड… २३ देशांचा थरार !
१७,८०० किलोमीटरचा प्रवास… एका स्वप्नाची अद्भुत सफर!
मुंबई ते लंडन असा प्रवास तो ही कारमधून करण्यासाठी मी इराणच्या बंदर अब्बासला पोहचलो. म्यानमार, पाकिस्तान ,अफगाणिस्तान आणि चीन यांच्या सीमा प्रवासासाठी खुल्या न झाल्यामुळे इथून आमचा प्रवास सुरू होणार होता. त्या रात्री गुजरात, कर्नाटक, बिहार, तामिळनाडू अशा वेगवेगळ्या राज्यातून आलेले माझे सहप्रवासी भेटले. या ट्रिपचे संयोजक तुषार अग्रवाल आणि संजय मदान आमच्या इतकेच उत्साही होते. गेली पंचवीस वर्षे मी अशा प्रकारची ट्रिप करण्याचे स्वप्न पाहत होतो. यापूर्वी मोटर सायकल वरून मी स्पिती व्हॅली, लेह लडाख, हिमालयाचा पायथा, भूतान अशा ट्रीप केल्या होत्या. मला गाडी घेऊन लंडनला जायचे होते.
रोड टू लंडन | Road To London
२०१८ साली मी एकट्यानेच लंडनला जाणाऱ्या बसचे बुकिंग केले. परंतु कोविड, म्यानमार, पाकिस्तान, अफगाणिस्तान यांच्या सीमा बंद असल्यामुळे लंडनच्या बसला परवानगी मिळाली नाही त्यामुळे तो प्लानही रद्द झाला. काही दिवसांनी मला रोड टू लंडन या ट्रीप विषयी कळाले आणि मी प्राथमिक माहिती घेतल्यानंतर या ट्रीपवर जायचे पक्के केले. साठ दिवस, तेवीस देश आणि सतरा हजार आठशे किलोमीटरचा प्रवास असणारी ही ट्रीप होती. व्हिसा, बँक गॅरंटी, इतर देशात गाडी घेऊन जाण्यासाठी लागणारा कार द पासेज अशा गोष्टींची पूर्तता झाली. प्रवासाचा इन्शुरन्स त्या त्या देशात वेगळा असतो त्यामुळे तो तिथेच घ्यावा लागतो.
थरारक प्रवासाला सुरुवात
मुंबईहून मी माझी गाडी इराणला पाठवून दिली आणि बंदर अब्बासकडे रवाना झालो. ती तारीख होती पाच सप्टेंबर २०२३. त्या रात्री मुक्काम केल्यानंतर सहा सप्टेंबरच्या सकाळी मी माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या आणि थरारक प्रवासाला सुरुवात केली. इराणमधील शिराज या अतिशय सुंदर शहराकडे आम्ही निघालो. येथील साहित्यिक, कवी आणि फुलं जगप्रसिद्ध आहेत. बंदर अब्बासपासून ५७५ किलोमीटरवर असणाऱ्या या शहरात एक गुलाबी पाण्याचं तळ आहे. फळा फुलांच्या बागांनी सजलेल्या या रोमँटिक शहरात हे गुलाबी तळ पाहणं म्हणजे एक वेगळा सौंदर्यानुभव होता. इस्फाहान, तेहरान, तब्रिझ या शहरातून प्रवास करत इराण देशाची सफर करत होतो.
इराणमधील लेडी टॅक्सी ड्रायव्हर
इराणमध्ये स्त्रियांवर हिजाब घालण्याची सक्ती असली तरी तिथे स्त्रिया सर्वच स्तरावर कार्यरत दिसल्या. ही जॉब घालून ड्रायव्हिंग करणाऱ्या लेडी टॅक्सी ड्रायव्हर भेटल्या. इराणचे लोक खूप प्रेमळ आहेत. आम्ही सफरीवर निघालेलो आहोत हे कळल्यानंतर स्वतः: हून हे लोक आमच्यासाठी भेटवस्तू, खाण्याचे पदार्थ, केशर घेऊन येत होते. तबरीजपासून दीड तासाच्या अंतरावर असलेल्या कॅनडोवन खेडे पाहायला आम्ही गेलो . या खेड्यात लोक पर्वत रांगांमध्ये माणसाने खोदून तयार केलेल्या गुहा सदृश्य घरांमध्ये राहतात. मंगोल आक्रमणापासून वाचण्यासाठी इराणमधील काही लोक पर्वतरांगांमध्ये गेले आणि तिथेच कायमचे कॅनडोवन हे खेडे वसले गेले. माणूस निसर्गाशी आजूबाजूच्या वातावरणाशी समायोजन करून कोणत्याही परिस्थितीत जगू शकतो याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. या खेड्यात तुम्हाला सॅटॅलाइट टीव्ही सुद्धा बघायला मिळतो.
तुर्कस्तान ते नॉर्वे आणि स्वीडन | Turkey to Norway & Sweden
इस्तंबूलची निळी मशीद
इराणनंतर आमचा कारवा तुर्कस्तानकडे रवाना झाला. अंकारा हे तुर्कस्तान मधील महत्त्वाचे शहर आहे. तुर्कस्तानमधील इस्तंबूल हे पर्यटकांचे लाडके ठिकाण. अंकारापासून साडेचारशे किलोमीटर प्रवास करत आम्ही इस्तंबूलला पोहोचलो. इथली ब्लू मशीद अतिशय भव्य आहे. इस्तंबुल तुम्हाला उत्साहाने भरून टाकत.
ब्रेकफास्ट एका देशात जेवण दुसऱ्या देशात
इस्तंबूलनंतर आम्ही युरोपमध्ये प्रवेश केला युरोपमधील देश इतके छोटे छोटे आहेत आणि त्यांच्या इतक्या सीमा लागून आहेत की एका दिवसात आम्ही तीन-तीन देश पार करत असू. गंमत म्हणजे ब्रेकफास्ट एका देशात दुपारचे जेवण एका देशात आणि रात्रीचे जेवण एका देशात असा प्रवास घडला. बेलग्रेड, बुडापेस्ट, फिनलंड या देशांमध्ये प्रवास केला. इंग्लंड हे युरोपचे उत्तर टोक आहे. आम्ही रोवेनिमी या वैशिष्ट्यपूर्ण खेड्यात पोहोचलो. हे गाव आहे सांताक्लॉज गाव. इथे तुम्हाला खराखुरा सांताक्लॉज भेटतो. सांताक्लॉजचे एक पोस्ट ऑफिस इथे आहे. जिथून तुम्ही आपल्या जगभरातील मित्रांना नातेवाईकांना ख्रिसमससाठी पोस्टकार्ड पाठवू शकता. तुम्ही रेंडीयरच्या गाडीतून बर्फावर सफर करू शकता. आम्हीही रेंडीयर आणि हस्की डॉगच्या गाडीतून सफर केली.
इथूनच आर्क्टिक सर्कल अर्थात उत्तर ध्रुववृत्त जाते. त्या रेषेवर उभे राहून मी फोटो काढला. इराणसारख्या उष्ण तापमानाच्या प्रदेशातून मी अतिथंड उत्तर ध्रुववृत्तपर्यंत आलो होतो. माणूस हा पृथ्वीवरील असा अद्भुत प्राणी आहे जो सर्व प्रकारच्या वातावरणात, हवामानात राहू शकतो,जगू शकतो,वाढू शकतो. माणसांमध्ये खरंच अद्भुत आणि अमर्याद शक्ती आहे याची जाणीव त्या क्षणी मला झाली.
जगातील सर्वाधिक लांब टनेल (नॉर्वे)
रोवनेमीपासून आम्ही आता नॉर्वेच्या दिशेने निघालो होतो. आमच्या प्रवासाला चाळीस दिवस पूर्ण झाले होते. नॉर्वेचे रस्ते खरंच आव्हानात्मक होते. एकतर इथे फक्त दूतर्फा रस्ते होते. रस्त्यामध्ये डिव्हायडर सुद्धा नव्हता. आजपर्यंत आम्हाला वेगवेगळी वेगाची मर्यादा असणाऱ्या रस्त्यांवरून प्रवास करावा लागला होता. नॉर्वेमध्ये आम्ही जगातल्या सर्वात लांबीच्या टनेलमधून जो २५ किलोमीटरचा आहे. त्यामधून प्रवास केला. नॉर्वेमध्ये सर्वात जास्त आहेत. सर्वात मोठी किनारपट्टी नॉर्मल देशाला आहे एकूणच थंडीचा पाठलाग करत प्रवास करत होतो त्यामुळे नॉर्वेमध्ये थंडी कमालीची होती. इथे बर्फामध्ये चिखल मिसळलेला होता आणि अशा प्रकारचा ब्लॅक आईस पूर्ण रस्त्यावर होता. त्यामुळे आमच्या गाड्यांचे सर्व प्रकारच्या प्रदेशात चालणारे टायर्स इथे मात्र चालणे शक्य नव्हते. त्यासाठी स्नो टायर्सची आवश्यकता होती. त्यामुळे आम्हाला नॉर्वेत प्रवास करताना तिथल्या स्थानिक गाड्या मधून प्रवास करावा लागला. आत्तापर्यंतच्या प्रवासातील नॉर्वे हा मला सर्वात सुंदर देश वाटला.
१४ छोट्या बेटांचा स्वीडन
नॉर्वेनंतर आम्ही स्वीडनमध्ये गेलो १४ छोट्या छोट्या बेटांचा हा देश आहे. स्वीडन नंतर आम्ही डेन्मार्क मध्ये पोहोचलो. प्रत्येक देशातील वाहतुकीचे नियम समजून घेऊन ड्रायव्हिंग करणे आवश्यक होते. भारतात आपण गाडी रस्त्याच्या डावीकडून चालवतो. जगाच्या बाहेर मात्र भारताच्या उलटे नियम आहेत. इथे गाडी रस्त्याच्या उजवीकडून चालवली जाते. भारतीय माणसे अशा प्रवासाला निघाली आहेत हे कळल्यानंतर सर्वांनाच आनंद होत असे.
हेलसिंकी ते लंडन | Helsinki to London
ताशी २२० किमी वेगाने गाडी चालवण्याचा थरार
इराण, तुर्की आणि रशिया या देशांमध्ये बॉलीवूड फार प्रसिद्ध आहे तिथे शाहरुख सलमान अमिताभचे लाखो चाहते आहेत. नॉर्वेनंतर आम्ही हेलीसिंकी इथे भव्य असे ऑलिम्पिक स्टेडियम मी पाहिले. जिथे कोल्हापूरचे ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांचे ऑलिम्पिक मेडल मिळवणारे पाहिले भारतीय म्हणून कोरलेले नाव पाहिले आणि अभिमानाने माझा ऊर भरून आला. आतापर्यंतच्या या प्रवासात आम्ही भारताच्या तुर्की, इस्टोनिया आणि डेन्मार्क या तिन्ही देशातील राजदूतांना भेटलो. त्यांनी आमचे खूप छान स्वागत केले. पाहुणचार केला. नोर्डकॅपमध्ये उणे आठ डिग्री सेल्सिअस तापमानात राहण्याचा अनुभव घेतला. ताशी २२० किलोमीटर वेगाने गाडी चालवण्याचा थरार अनुभवता आला. कोणत्याही वेगाने, कोणतीही गाडी तुम्ही चालवू शकता. २३ वेगवेगळ्या देशात भारतीय बनावटीची महिंद्रा थार गाडी चालवणे ही खरच अभिमानाची गोष्ट होती.
साठव्या दिवशी लंडन
आम्ही अखेर साठव्या दिवशी लंडनमध्ये पोहोचलो. दोन महिन्याच्या सलग प्रवासानंतर आम्ही आमच्या ध्येयापर्यंत पोहोचलो होतो. माझ्या बकेट लिस्टमधील एक स्वप्न पूर्ण झाले होते. एकूणच प्रवासात मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे आपण भारतीय लोक पर्यावरणाचा खूप ऱ्हास करतो. इतर देशात मात्र लोक आपल्या भोवतीच्या वातावरणाशी जुळवून घेत स्थानिक भाज्या, फळे ,अन्न खात आनंदात जगतात. मी युरोपमध्येही गरीब लोक बघितले, जे सरकारच्या पेन्शनवर जगत होते परंतु आनंदात होते. लंडनमधून आता आमच्या गाड्या मुंबईकडे रवाना होणार होत्या.
गेले ६० दिवस आम्ही सगळेजण एकत्र होतो. आता निरोपाचे क्षण जवळ येत चालले होते. चार सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर इतका कालावधी हे जग कधी स्टेरिंगच्या मागे बसून तर कधी लोकांच्या मध्ये मिसळून अनुभवले होते. त्याच अनुभवाचे संचित घेऊन मी मुंबई च्या दिशेने निघालो. तुमच्यामध्ये इच्छाशक्ती असेल तर तुम्ही जगात कुठलीही गोष्ट करू शकता हे खरे आहे. कोल्हापुरात ज्या कुणाला असा प्रवास करण्याची इच्छा असेल त्यांच्यासोबत पुन्हा प्रवास करायला मला नक्कीच आवडेल. रस्ते, प्रदेश, तिथली माणसं ,संस्कृती सगळं काही अनोळखी असलं तरी कोणत्याही प्रवासात आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्यामध्ये जिगर असेल तर आपण असे प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करू शकतो.
तुमचे मत कमेंटमध्ये लिहा आणि मित्रांसोबत शेअर करा.




जिगरबाज. थरारक अनुभव. आणखी सविस्तर वाचायला आवडले असते
ReplyDeleteGreat experience
ReplyDeleteWow
ReplyDeleteamazing
ReplyDeleteखूप छान वर्णन . आपण प्रवास करतो
ReplyDeleteअसा फील येतो.
Very interesting jourbeyl
ReplyDeleteNice
ReplyDelete