सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

त्या अंधाऱ्या कोठड्यांत अजूनही घुमतो स्वातंत्र्यलढा

Cellular Jail, Photo Credits: Aishwarya H

अंदमान बेटावरील सेल्युलर जेल म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा जिवंत इतिहास. पोर्टब्लेअरमध्ये पाऊल टाकताच निळ्याशार समुद्राच्या सौंदर्यामागे दडलेली वेदना आणि बलिदानाची कहाणी मनाला स्पर्श करून जात होती. त्या काळ्या पाण्याच्या शिक्षेचे प्रतीक असलेला हा सेल्युलर जेल केवळ एक वास्तू नसून, हजारो क्रांतिकारकांच्या त्यागाचा साक्षीदार आहे. आपल्यासारखा मराठी माणूस तेथे पोहोचतो तेव्हा त्याला सर्वप्रथम स्मरण होते ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदार सावरकर यांचे. त्यांनी देशासाठी सोसलेल्या अमानवीय अत्याचाराचे. कसे दिवस कंठले असतील त्यांनी येथे. आपण तर येथील कोठडीत एक दिवसही राहू शकणार नाही.

Cellular Jail Model, Photo Credits: Aishwarya H
Cellular Jail, Photo Credits: Aishwarya H

जेलच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाताना अंगावर एक वेगळाच शहारा आला. उंच भिंती, अरुंद कोठड्या आणि शांततेतही ऐकू येणारा इतिहास… प्रत्येक विट जणू स्वातंत्र्यवीरांच्या वेदना सांगत होती. त्या कोठड्यांपैकी एक कोठडी होती विनायक दामोदर सावरकर यांची. त्या छोट्याशा अंधाऱ्या खोलीसमोर उभे राहिल्यावर मन नकळत भरून आले. देशासाठी सर्व सुखांचा त्याग करून इतक्या कठोर यातना सहन करणाऱ्या त्या महान व्यक्तिमत्त्वाची आठवण मनाला खोलवर भिडली.

आमचा गाईड आम्हाला येथे कैद्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या भीषण कथा सांगत होता आणि त्या ऐकताना आमचे मन केव्हा इतिहासाच्या त्या काळ्या आठवणीत पोहोचले कळलेच नाही. इंग्रजांच्या काळात येथे कैद्यांवर अमानुष अत्याचार केले जात असत. त्यांना तेल घाण्यावर बैलांप्रमाणे जुंपले जाई, उपाशी ठेवले जाई, चाबकाचे फटके मारले जात. बोलण्यास, भेटण्यास किंवा एकमेकांना पाहण्यासही मनाई होती. प्रत्येक कैद्याला स्वतंत्र कोठडीत ठेवून मानसिक छळ केला जाई. त्या कोठड्या पाहताना मनात प्रश्न निर्माण झाला, एवढ्या यातना सहन करूनही या वीरांनी देशप्रेमाची ज्योत कशी तेवत ठेवली असेल?

सेल्युलर जेल, ज्याला “काळापाणी” म्हणूनही ओळखले जाते, हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे अत्यंत महत्त्वाचे स्मारक आहे. ब्रिटिश सत्तेने भारतीय क्रांतिकारकांना मुख्य भूमीपासून दूर ठेवण्यासाठी आणि कठोर शिक्षा देण्यासाठी ही तुरुंगव्यवस्था उभारली होती. आज हे ठिकाण राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्यात आले आहे. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर ब्रिटिशांनी अनेक क्रांतिकारकांना देशाच्या मुख्य भूमीपासून दूर ठेवण्यासाठी अंदमान बेटांवर पाठवण्यास सुरुवात केली. ब्रिटिशांना वाटत होते की समुद्राने वेगळे असलेले हे बेट कैद्यांना मानसिकदृष्ट्या खचवेल.

सेल्युलर जेलची रचना | Structure of Cellular Jail

Cellular Jail Model, Photo Credits: Aishwarya H
Cellular Jail Model, Photo Credits: Aishwarya H

सेल्युलर जेलचे बांधकाम १८९६ मध्ये सुरू झाले आणि १९०६ मध्ये पूर्ण झाले. तुरुंगाची रचना अशी करण्यात आली होती की, प्रत्येक कैदी पूर्णपणे एकाकी राहील. त्यामुळेच त्याला सेल्युलर (कोठड्यांवर आधारित) हे नाव देण्यात आले. तुरुंगाला सुरुवातीला ७ पंख (wings) होते. सर्व पंख मध्यवर्ती मनोऱ्याशी जोडलेले होते. एकूण ६९८ एकाकी कोठड्या होत्या. प्रत्येक कोठडी साधारणतः १३.५ फूट × ७ फूट आकाराची होती. कैद्यांमध्ये संपर्क होऊ नये यासाठी कोठड्या वेगळ्या ठेवण्यात आल्या होत्या.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशिवाय बटुकेश्वर दत्त, बिरेंद्रकुमार घोष, सचींद्रनाथ सन्याल यांच्यासारखे अनेक क्रांतिकारक येथे कैदेत होते. काही कैद्यांनी उपोषणेही केली होती. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने अन्न देण्याचा प्रयत्न केल्याने काहींचा मृत्यू झाला.

Cellular Jail Model, Photo Credits: Aishwarya H
Cellular Jail Model, Photo Credits: Aishwarya H.

जपानी ताबा आणि स्वातंत्र्य लढा

दुसऱ्या महायुद्धात १९४२ ते १९४५ या काळात जपानने अंदमान बेटांवर कब्जा केला. त्या काळातही तुरुंगाचा वापर करण्यात आला. सुभाषचंद्र बोस यांनी १९४३ मध्ये पोर्ट ब्लेअर येथे भारतीय ध्वज फडकावला होता. हे स्वातंत्र्यलढ्यातील प्रतीकात्मक महत्त्वाचे क्षण मानले जातात.

स्वातंत्र्यानंतरची स्थिती

भारत स्वतंत्र झाल्यानंतर तुरुंगाच्या काही भागांचे पाडकाम करण्यात आले. याला अनेक माजी कैद्यांनी विरोध केला, कारण हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा जिवंत पुरावा होता. नंतर उरलेला भाग जतन करण्यात आला. १९७९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी याला “राष्ट्रीय स्मारक” घोषित केले. आज सेल्युलर जेल हे भारतातील प्रमुख ऐतिहासिक पर्यटनस्थळ आहे. सध्या मूळ ७ पंखांपैकी फक्त ३ पंख शिल्लक आहेत. येथे संग्रहालय, छायाचित्र दालन आणि स्वातंत्र्यसैनिकांची माहिती प्रदर्शित केली जाते. संध्याकाळी लाईट ॲण्ड साऊंड शो आयोजित केला जातो, ज्यात स्वातंत्र्यसैनिकांच्या यातना आणि संघर्षाचे वर्णन केले जाते.
सेल्युलर जेलला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात.

सेल्युलर जेल हे केवळ तुरुंग नव्हते; ते भारतीय स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, धैर्य आणि देशभक्तीचे प्रतीक आहे. “काळापाणी” ही शिक्षा त्या काळात मृत्यूपेक्षाही भयंकर मानली जात होती. आज हे स्मारक भारतीयांना स्वातंत्र्याची किंमत आणि संघर्षाची जाणीव करून देते.

सावरकरांच्या आठवणी | Memories of Veer Savarkar

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे अंदमानच्या सेल्युलर जेलमधील (काळे पाणी) वास्तव्य हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अमानुष अत्याचार आणि अदम्य इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. त्यांना ५० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली होती, ज्यामध्ये त्यांनी १० वर्षे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत घालवली. “काळ्या पाण्याची शिक्षा” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तुरुंगात त्यांनी १९११ ते १९२१ दरम्यान शिक्षा भोगली. त्या काळातील काही प्रसिद्ध कथा, आठवणी आणि किस्से मन हेलावून टाकणारे आहेत. गाईड एकएक किस्सा सांगत होता आणि आम्ही सुन्न मनाने ऐकत होतो.

Cellular Jail Model, Photo Credits: Aishwarya H
Cellular Jail Model, Photo Credits: Aishwarya H

सेल्युलर जेलच्या कोठड्या अशा बांधलेल्या होत्या की कैद्यांना एकमेकांशी बोलताही येत नव्हते. सावरकरांची कोठडी समुद्राकडे होती. असे सांगितले जाते की, ते छोट्याशा खिडकीतून समुद्र पाहत भारताच्या स्वातंत्र्याची कल्पना करत असत. त्यांनी सहकाऱ्यांना सांगितले होते, ‘हा समुद्र आपल्याला भारतापासून वेगळं करतो, पण एक दिवस हाच समुद्र स्वातंत्र्याचा संदेश घेऊन येईल.’ जेलमध्ये कागद-पेन मिळत नसल्यामुळे सावरकरांनी तुरुंगाच्या भिंतींवर काट्याने किंवा कोळशाने कविता लिहिल्या, अशी कथा प्रसिद्ध आहे. त्यांनी हजारो ओळी पाठ करून ठेवल्या. नंतर सुटका झाल्यावर त्या पुन्हा लिहून काढल्या गेल्या असे सांगितले जाते. त्यांच्या “कमला”, “सागरप्राण तळमळला” यांसारख्या रचनांची बीजे याच काळात रुजली, असे सांगतात.

Veer Savarkar

येथे कैद्यांना बैलांसारखे तेलाच्या घाण्याला जुंपले जात असे. सावरकरांनाही दिवसाचे ठरावीक प्रमाण पूर्ण करावे लागे. काम पूर्ण न झाल्यास फटके किंवा उपाशी ठेवण्याची शिक्षा मिळे. हा प्रसंग भारतीय क्रांतिकारकांवरील ब्रिटिश अत्याचाराचे प्रतीक म्हणून अनेकदा सांगितला जातो.

Cellular Jail Model, Photo Credits: Aishwarya H
Cellular Jail, Photo Credits: Aishwarya H

आणखी एक भावनिक आठवण अशी की,सावरकरांचे मोठे भाऊ गणेश दामोदर सावरकर(बाबाराव सावरकर) यांनाही सेल्युलेर जेमध्येच ठेवण्यात आले होते. पण दोघा भावंडांना याची कल्पना नव्हती. एकदा तुरुंगात अचानक आवाजावरून त्यांना एकमेकांची उपस्थिती समजली.

एवढ्या जीवघेण्या परिस्थितीतही सावरकरांनी तुरुंगात इतर कैद्यांना इतिहास, राजकारण आणि मराठी-हिंदी शिकवण्याचा प्रयत्न केला. काही कैदी निरक्षर होते. त्यांनी स्मरणशक्तीच्या मदतीने कविता, इतिहास आणि देशभक्तीपर विचार पसरवले. त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांना ते नेहमीच धोकादायक वाटत असत.

कठोर छळामुळे अनेक कैदी मानसिकदृष्ट्या खचत असत. काही कथांनुसार सावरकर सहकाऱ्यांना धीर देत आणि “स्वातंत्र्यासाठी जगणंही तितकंच महत्त्वाचं आहे” असे सांगत असत. सेल्युलर जेलची शिक्षा म्हणजे फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक एकाकीपणाही होता. कैद्यांना बोलण्यास मनाई, कठोर श्रम, कमी अन्न आणि सतत शिक्षा यामुळे अनेक जण कोसळत. सावरकरांनी नंतर लिहिलेल्या आठवणींमध्ये या एकटेपणाचा उल्लेख आढळतो.

Cellular Jail Model, Photo Credits: Aishwarya H
Cellular Jail Model, Photo Credits: Aishwarya H

काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे काय?

स्वातंत्र्य लढ्याच्या काळात ब्रिटिश सरकारने क्रांतिकारकांना भारतापासून हजारो किलोमीटर दूर अंदमान बेटांवर पाठवण्याची शिक्षा सुरू केली. यालाच “काळ्या पाण्याची शिक्षा” म्हणत.

“काळापाणी” हे नाव का पडले?

लहानपणी याबाबत वाचत असताना येथील समुद्राचे पाणी काळे असल्याने काळ्या पाण्याची शिक्षा असे संबोधले जात असावे, असा समज झाला होता. आणि तो अनेक वर्ष कायम होता. परंतु अंदमानला आल्यावर त्याचा खरा अर्थ कळला. अंदमान बेटे समुद्राच्या मधोमध दूर असल्यामुळे कैद्यांचा समाजाशी पूर्ण संपर्क तुटत असे. त्या काळी समुद्र ओलांडणे धार्मिकदृष्ट्या “अपवित्र” मानले जाई. कैद्यांना आयुष्यभरासाठी समाजापासून तोडले जाई, जणू जिवंतपणी मृत्यू. सेल्युलर जेलमध्ये गेल्यावर परतीचा मार्ग बंदच. म्हणजे मृत्यू. त्यामुळे त्याला काळापाणी संबोधत असत. येथील फाशीघर बघताना अंगावर काटा आला. एकाचवेळी तीन कैद्यांना येथे फासावर लटकवले जात असे.
 
अप्रतिम लाईट ॲण्ड साऊंड शो

सेल्युलर जेलमधील लाईट ॲण्ड साऊंड शो फारच अप्रतिम आहे. आम्हाला रात्रीच्या शोची तिकिटं मिळाली होती.
हा लाईट ॲण्ड साऊंड शो आमच्या प्रवासातील सर्वात भावूक क्षण ठरला. मंद प्रकाश, गंभीर आवाज आणि पार्श्वभूमीवर ऐकू येणाऱ्या स्वातंत्र्यवीरांच्या कथा… संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. त्या शोमध्ये कैद्यांच्या वेदना, त्यांचे संघर्ष आणि मातृभूमीसाठी दिलेले बलिदान इतक्या प्रभावीपणे मांडले होते की डोळ्यांत नकळत अश्रू आले. विशेषतः सावरकरांच्या संघर्षाची कथा मन हळवं करीत होती.

Cellular Jail Model, Photo Credits: Aishwarya H
Cellular Jail Model, Photo Credits: Aishwarya H

सेल्युलर जेलमधून बाहेर पडताना मनात अभिमान आणि वेदना दोन्ही भावना होत्या. आपण आज देशात मुक्तपणे जगत आहोत, कारण या वीरांनी आपल्या आयुष्याचे बलिदान दिले म्हणून. त्यांना शतश: नमन. सेल्युलर जेलची ही भेट हा केवळ प्रवास नव्हता, तर भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा अनुभव होता. त्या जागेने देशभक्तीची नवी जाणीव दिली आणि स्वातंत्र्याची खरी किंमत समजावून सांगितली.
Cellular Jail Model, Photo Credits: Aishwarya H
Cellular Jail Model, Photo Credits: Aishwarya H

केव्हा जायचे | How to plan Cellular Jail Tour in Andaman & Nicobar Islands

  • ऐतिहासिक सेल्युलर जेल (काळापाणी) अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे स्थित आहे.
  • भेट देण्यासाठी उत्तम वेळ: ऑक्टोबर ते मार्च (हिवाळा).
  • जेल सकाळी ९ ते दुपारी १२.३० आणि दुपारी १.३० ते संध्याकाळी ५ या वेळेत उघडे असते.
  • सोमवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी जेल बंद राहते.
  • लाइट अँड साउंड शो संध्याकाळी ६:०० वाजता सुरू होतो.
  • जेल फिरण्यासाठी साधारण ३-४ तास लागतात, त्यामुळे संध्याकाळच्या शोसह दुपारी भेट देणे सोयीचे ठरते.

सागरा प्राण तळमळला by Veer Savarkar

तुमच्यासाठी खास 📖 — स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘माझी जन्मठेप’ हे आत्मकथन वाचा आणि काळ्या पाण्याच्या इतिहासात डोकावून पाहा. 👇


कंमेंट्स मध्ये तुमचे मत नक्की कळवा !

डॉ. संपदा नासेरी
नागपूर
लेखक

Comments

  1. amazing writing by writer

    ReplyDelete
  2. great experience

    ReplyDelete
  3. थरारक अनुभव

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
      अशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿

      Delete
  4. संपदा मॅडम, तुम्ही केवळ एका ऐतिहासिक स्थळाला भेट नाही तर तेथील अनुभव शब्दांकित करून मराठी माणूस म्हणून देशा प्रतीअसणाऱ्या भावनेची ओळख करून दिली
    - डॉ . नीलिमा चरडे . नागपूर .

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद 🙏

      Delete
    2. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
      अशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿

      Delete
  5. Replies
    1. Thanks

      Delete
    2. Thank you all 🙏. Keep reading our Articles 🙏

      Delete
    3. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
      अशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿

      Delete
  6. great writing by Dr. Naseri

    ReplyDelete
  7. छान लिखाण आहे. अशे अजून लेख पाहिजे

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you 🙏. येतील असे लेख अजून.

      Delete
  8. Sampada madam articles are good. More are expected.

    ReplyDelete
  9. डाॅ. संपदा
    तुझ्या लेखणी ला सलाम
    सेल्युलर जेल च्या इतिहासातील काळ्या आठवणी मन हेलावून टाकतात
    स्वातंत्र्यवीरां ची असलेली निस्सीम देशभक्ति,त्याग, समर्पण...
    तुझ्या शब्दा शब्दातून डोळ्यासमोर उभं राहतयं
    तुझी लेखणी अशीच बहरत जावो
    करिता खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  10. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! 🙏
    अशाच आणखी वाचनासाठी आमच्या WhatsApp समुदायात सहभागी व्हा आणि विशेष अपडेट्स व ऑफर्स मिळवण्यासाठी subscribe करा. 🌿

    ReplyDelete
  11. Great article by Dr sampada naseri

    ReplyDelete

Post a Comment

तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️

🔍 शोधा
लेख लोड होत आहेत...
🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
💡
आजचा मराठी शब्द by WhatsUp मराठी
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|Eg. तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|Eg. त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|Eg. डोंगरातील पाणी नितळ आहे.
तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|Eg. तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|Eg. सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
ओंजळ|हाताचा कप्पा|देशज मराठी|हातभर|Eg. त्याने ओंजळीत पाणी घेतले.
हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|Eg. हळुवार वारा वाहत होता.
मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|Eg. तिचा आवाज मंजुळ आहे.
मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|Eg. मृद्गंध दरवळला.
आभाळमाया|असीम प्रेम|देशज मराठी|अपार माया|Eg. आईची आभाळमाया विसरता येत नाही.
धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|Eg. तो संगीतात धुंद झाला.
झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|Eg. थंड झुळूक आली.
नभ|आकाश|संस्कृत|गगन|Eg. नभ निरभ्र होते.
उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|Eg. त्याला आनंदाचा उमाळा आला.
साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|Eg. ती साजिरी दिसत होती.
गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|Eg. फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|Eg. सूर्याचा कवडसा पडला.
जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|Eg. गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|Eg. गाण्याची लय सुंदर होती.
कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|Eg. कोमेजलेली फुले दिसत होती.
दरवळ|मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|Eg. चाफ्याचा दरवळ पसरला.
सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|Eg. सावळ्या ढगांनी आकाश भरले.
सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|Eg. तिचा चेहरा सतेज दिसत होता.
मधुमालती|सुगंधी वेल|संस्कृत|फुलवेल|Eg. अंगणात मधुमालती फुलली होती.
गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|Eg. कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
हुरहूर|मनातील ओढ|देशज मराठी|व्याकुळता|Eg. जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|Eg. गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|Eg. धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|Eg. पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|Eg. दिव्याची ज्योत लवलवत होती.
उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|Eg. तरुणांमध्ये उमेद आहे.
गोजिरी|नाजूक सुंदर|देशज मराठी|साजिरी|Eg. गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|Eg. आंब्याला मोहोर आला आहे.
सुगंधी|सुगंध असलेले|संस्कृत|दरवळते|Eg. सुगंधी फुले बहरली.
अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|Eg. गावचा चहा अमृततुल्य लागतो.
झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|Eg. घंटांचा झंकार झाला.
सहजसुंदर|नैसर्गिक सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|Eg. तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|Eg. आसमंत शांत होता.
सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|Eg. सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|Eg. डोंगरातून निर्झर वाहत होता.
नादमय|संगीतपूर्ण|संस्कृत|सुरेल|Eg. सभागृह नादमय झाले.
मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|Eg. मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|Eg. संगीताचे स्पंदन जाणवत होते.
चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|Eg. वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|Eg. मृदुल वाळूवर पावले उमटली.
अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|Eg. ती अलवार हसली.
स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|Eg. पक्षी स्वैर उडत होते.
सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|Eg. फुलांची सुरभि दरवळली.
दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|Eg. तिच्या डोळ्यांत दीप्ती होती.
प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|Eg. अंगणात प्राजक्त फुलला होता.
निरभ्र|पूर्ण स्वच्छ|संस्कृत|ढगविरहित|Eg. निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.

अजून इंटरेस्टिंग...

चंद्रपुरातील पाषाणयुगीन मानवाचे गाव माहिती आहे का? ‘बोर’ नावाचे मूळ गाव सापडले | प्रा. सुरेश चोपणे | Author: Prof. Suresh Chopane | Chandrapur Stone Age Discovery | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism | Incredible India

काळ्या कोळशाच्या साम्राज्यात निसर्गाचा महाचमत्कार | Mahatma Gandhi Eco Park | Author: Sakhi | Mine Tourism | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism

गोठवणाऱ्या थंडीत आयफेल टॉवरचा अद्‌भूत नजारा... पुस्तकांच्या पलीकडे, जगाच्या जवळ | Author: Yash Naseri | Eiffel Tower Paris | International & Global Tourism

फणिंद्रपुरातील संतमहात्म्यांची समाधीस्थळं तुम्ही बघितली काय? | Author: Mrunalini Waghmare | Samadhis in Old Nagpur | Vidarbha Tourism

नागपुरातील मोहिते वाडा : संघ शाखेची जन्मभूमी | Author: Amol Pusadkar | Mohite Wada, Birthplace of the Rashtriya Swayamsevak Sangh | Heritage Tourism | Maharashtra Tourism

चंद्रपूरच्या जंगलात दडलेले गायमुख श्री महादेव मंदिर | नरेंद्र चांदेवार | Gaaymukh Shri Mahadev Mandir | Author: Narendra Chandewar | Temples in Vidarbha | Temples in Maharashtra

दुष्काळाच्या पलीकडचा मराठवाडा: पावसाळ्यात खुलणारे अनोखे पर्यटनविश्व | Author: Dr. Mrunalini Fadnavis | Marathwada Tourism | Maharashtra Tourism

‘ये है मुंबई मेरी जान’ अनुभवांची अखंड सफर | Author: Himgauri Deshpande | Yeh Hain Mumbai Meri Jaan | Maharashtra Tourism | Incredible India

कोराडीचे महालक्ष्मी जगदंबा मंदिर : धार्मिक पर्यटन आणि विकासाचा नवा अध्याय | Author: Ram Bhakre | Koradi Mahalaxmi Jagdamba Temple | Temples in Vidarbha | Temples in Maharashtra

भगवद्गीतेच्या एका श्लोकाने घडवलेला इतिहास; ओपेनहायमर आणि ट्रिनिटी टेस्ट | मॅनहॅटन प्रोजेक्ट न्यू मेक्सिको | Author: Raajan | Trinity Site, New Mexico | First Nuclear Bomb Test 1945 | Manhattan Project