आमच्याबद्दल

WhatsUp मराठी हे प्रवास, पर्यटन आणि अनुभव यांवर केंद्रित मराठी डिजिटल व्यासपीठ आहे. 

व्हिजन | Our Vision

  • वाचक प्रथम, जाहिराती नंतर
  • मराठी भाषिकांसाठी सक्षम डिजिटल व्यासपीठ
  • सकारात्मक विचार आणि मानसिक स्वास्थ्यासाठी व्यासपीठ
  • मराठी संस्कृतीत रुजलेले, जागतिक आणि व्यापक विचारांनी समृद्ध
  • महाराष्ट्र आणि भारताच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी कटिबद्ध

आमचे प्रत्येक मूल्य, एकाच शब्दात सांगायचे तर.. MARATHI!

  • Mindful: सकारात्मकता आणि तरुण पिढीचे मानसिक आरोग्य
  • Audience First: जाहिरातींपेक्षा वाचक आधी
  • Rooted: मराठी संस्कृतीत घट्ट रुजलेले
  • Aspirational: जागतिक दृष्टिकोन
  • Trusted: विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ
  • Holistic: सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी कटिबद्ध
  • Inclusive: प्रत्येक मराठी भाषिकासाठी

स्टोरी | Our Story

एखाद्या ठिकाणाचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि त्यामागील कथा जाणून घेण्याची ओढ आमच्यात नेहमीच होती. अनेक माध्यमांमध्ये प्रामुख्याने राजकारण, तात्कालिक घडामोडी किंवा वादग्रस्त विषयांना अधिक जागा दिली जाते; परंतु प्रवास, पर्यटन, स्थानिक वारसा आणि ठिकाणांच्या कहाण्या यांवर मराठीतून सातत्याने बोलणारे व्यासपीठ कमी जाणवले. याच जाणिवेतून अशा एका माध्यमाची कल्पना आकाराला आली, जे ठिकाणांबद्दल, त्यांच्या इतिहासाबद्दल आणि संस्कृतीबद्दल मनापासून बोलते.

प्रवास माणसाच्या विचारविश्वाला विस्तार देतो. एखाद्या प्रदेशाबद्दल, तेथील लोकजीवनाबद्दल, संस्कृतीबद्दल आणि इतिहासाबद्दल जाणून घेतल्याने स्थानिक मन अधिक व्यापक बनते. आपला परिसर समजून घेत असताना दूरच्या प्रदेशांशीही नाते जोडले जाते आणि तेथूनच मराठी वाचकांसाठी विविध ठिकाणांचा आनंद देणारे, माहिती देणारे आणि विचारांना चालना देणारे व्यासपीठ उभारण्याची कल्पना पुढे आली.

या व्यासपीठाची संकल्पना करताना दोन गोष्टी विशेष लक्षात ठेवण्यात आल्या. पहिली म्हणजे वाचन अनुभव आनंददायी असावा, जेणेकरून मराठीत वाचताना वाचकांना सहजता, आकर्षण आणि आपलेपणा वाटेल. दुसरी म्हणजे हे व्यासपीठ स्थानिकतेशी जोडलेले असले तरी विचारांच्या पातळीवर व्यापक असावे; जे नव्या पिढीला आपल्या मुळांशी जोडून ठेवत जगाकडे पाहण्याची दृष्टी देईल.

प्रवास आणि पर्यटन यांना चालना देणे हा देखील आमच्या प्रयत्नाचा महत्त्वाचा भाग आहे. स्थानिक पर्यटन वाढल्यास स्थानिक उद्योगांना बळ मिळते, नव्या संधी निर्माण होतात आणि प्रदेशाची ओळख अधिक व्यापक होते. त्याच वेळी प्रवास हा केवळ विरंगुळा नसून ज्ञान वाढवण्याचा, अनुभव समृद्ध करण्याचा आणि स्वतःला अधिक समजून घेण्याचा एक मार्ग आहे; या विश्वासातून हे व्यासपीठ उभे राहत आहे.

Team

Savita Deo Harkare
Consulting Editor


सविता 'देव' हरकरे या गेल्या ३८ वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. लोकमत दैनिकाच्या नागपूर आवृत्तीत त्यांनी विविध पदांवर जबाबदारी सांभाळली आहे. त्यांना सामाजिक विषयावर लिहिण्याची आवड असून वन्यजीव, पर्यावरण आणि एचआयव्ही/एडस् या विषयावर मुबलक लेखन केले आहे.

पुरस्कार
  • देशातील विविध राजकीय पक्षांच्या २० महिला नेत्यांवर आधारित  ‘इंदिरा ते ममता - भारतीय महिला राजकीय नेतृत्व’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला  विदर्भ साहित्य संघाचा नवोदित लेखक पुरस्कार प्राप्त झाला आहे.
  • झिंग’ या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या देशाला भेडसावणाऱ्या एका ज्वलंत प्रश्नाला हात घातला आहे. तो प्रश्न आहे तरुणांच्या व्यसनाधिनतेचा.
🔍 शोधा
लेख लोड होत आहेत...
🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
💡
आजचा मराठी शब्द by WhatsUp मराठी
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|Eg. तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|Eg. त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|Eg. डोंगरातील पाणी नितळ आहे.
तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|Eg. तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|Eg. सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
ओंजळ|हाताचा कप्पा|देशज मराठी|हातभर|Eg. त्याने ओंजळीत पाणी घेतले.
हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|Eg. हळुवार वारा वाहत होता.
मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|Eg. तिचा आवाज मंजुळ आहे.
मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|Eg. मृद्गंध दरवळला.
आभाळमाया|असीम प्रेम|देशज मराठी|अपार माया|Eg. आईची आभाळमाया विसरता येत नाही.
धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|Eg. तो संगीतात धुंद झाला.
झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|Eg. थंड झुळूक आली.
नभ|आकाश|संस्कृत|गगन|Eg. नभ निरभ्र होते.
उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|Eg. त्याला आनंदाचा उमाळा आला.
साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|Eg. ती साजिरी दिसत होती.
गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|Eg. फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|Eg. सूर्याचा कवडसा पडला.
जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|Eg. गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|Eg. गाण्याची लय सुंदर होती.
कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|Eg. कोमेजलेली फुले दिसत होती.
दरवळ|मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|Eg. चाफ्याचा दरवळ पसरला.
सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|Eg. सावळ्या ढगांनी आकाश भरले.
सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|Eg. तिचा चेहरा सतेज दिसत होता.
मधुमालती|सुगंधी वेल|संस्कृत|फुलवेल|Eg. अंगणात मधुमालती फुलली होती.
गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|Eg. कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
हुरहूर|मनातील ओढ|देशज मराठी|व्याकुळता|Eg. जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|Eg. गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|Eg. धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|Eg. पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|Eg. दिव्याची ज्योत लवलवत होती.
उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|Eg. तरुणांमध्ये उमेद आहे.
गोजिरी|नाजूक सुंदर|देशज मराठी|साजिरी|Eg. गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|Eg. आंब्याला मोहोर आला आहे.
सुगंधी|सुगंध असलेले|संस्कृत|दरवळते|Eg. सुगंधी फुले बहरली.
अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|Eg. गावचा चहा अमृततुल्य लागतो.
झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|Eg. घंटांचा झंकार झाला.
सहजसुंदर|नैसर्गिक सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|Eg. तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|Eg. आसमंत शांत होता.
सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|Eg. सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|Eg. डोंगरातून निर्झर वाहत होता.
नादमय|संगीतपूर्ण|संस्कृत|सुरेल|Eg. सभागृह नादमय झाले.
मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|Eg. मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|Eg. संगीताचे स्पंदन जाणवत होते.
चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|Eg. वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|Eg. मृदुल वाळूवर पावले उमटली.
अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|Eg. ती अलवार हसली.
स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|Eg. पक्षी स्वैर उडत होते.
सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|Eg. फुलांची सुरभि दरवळली.
दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|Eg. तिच्या डोळ्यांत दीप्ती होती.
प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|Eg. अंगणात प्राजक्त फुलला होता.
निरभ्र|पूर्ण स्वच्छ|संस्कृत|ढगविरहित|Eg. निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.

अजून इंटरेस्टिंग...

चंद्रपुरातील पाषाणयुगीन मानवाचे गाव माहिती आहे का? ‘बोर’ नावाचे मूळ गाव सापडले | प्रा. सुरेश चोपणे | Author: Prof. Suresh Chopane | Chandrapur Stone Age Discovery | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism | Incredible India

काळ्या कोळशाच्या साम्राज्यात निसर्गाचा महाचमत्कार | Mahatma Gandhi Eco Park | Author: Sakhi | Mine Tourism | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism

गोठवणाऱ्या थंडीत आयफेल टॉवरचा अद्‌भूत नजारा... पुस्तकांच्या पलीकडे, जगाच्या जवळ | Author: Yash Naseri | Eiffel Tower Paris | International & Global Tourism

फणिंद्रपुरातील संतमहात्म्यांची समाधीस्थळं तुम्ही बघितली काय? | Author: Mrunalini Waghmare | Samadhis in Old Nagpur | Vidarbha Tourism

नागपुरातील मोहिते वाडा : संघ शाखेची जन्मभूमी | Author: Amol Pusadkar | Mohite Wada, Birthplace of the Rashtriya Swayamsevak Sangh | Heritage Tourism | Maharashtra Tourism

चंद्रपूरच्या जंगलात दडलेले गायमुख श्री महादेव मंदिर | नरेंद्र चांदेवार | Gaaymukh Shri Mahadev Mandir | Author: Narendra Chandewar | Temples in Vidarbha | Temples in Maharashtra

दुष्काळाच्या पलीकडचा मराठवाडा: पावसाळ्यात खुलणारे अनोखे पर्यटनविश्व | Author: Dr. Mrunalini Fadnavis | Marathwada Tourism | Maharashtra Tourism

‘ये है मुंबई मेरी जान’ अनुभवांची अखंड सफर | Author: Himgauri Deshpande | Yeh Hain Mumbai Meri Jaan | Maharashtra Tourism | Incredible India

भगवद्गीतेच्या एका श्लोकाने घडवलेला इतिहास; ओपेनहायमर आणि ट्रिनिटी टेस्ट | मॅनहॅटन प्रोजेक्ट न्यू मेक्सिको | Author: Raajan | Trinity Site, New Mexico | First Nuclear Bomb Test 1945 | Manhattan Project

कोराडीचे महालक्ष्मी जगदंबा मंदिर : धार्मिक पर्यटन आणि विकासाचा नवा अध्याय | Author: Ram Bhakre | Koradi Mahalaxmi Jagdamba Temple | Temples in Vidarbha | Temples in Maharashtra