Posts

देवलापारची गढी | Deolapar Fort | Forts near Nagpur | Forts in Vidarbha

Image
ना गपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील देवलापार गावाच्या पश्चिमेस एका ग्रामीण पाझर (डोंगरगाव) तलावाच्या काठाकाठाने गेलो की एका भव्य वास्तुचे भग्नावशेष आपले लक्ष वेधून घेतात. देवलापारच्या डाकबंगल्यापासून हे अंतर घनदाट जंगलात साधारण ४ किमी असावे. गोमुखापासूनही आडवाटेने येथे जाता येते. गेल्यागेल्या दृष्टीस पडते ते या गढीचे भव्य कमानी प्रवेशद्वार. विविध शिल्पांनी व चुन्याच्या लिंपणाने निर्मित हे प्रवेशद्वार गोंड स्थापत्याची चुणूक दाखवते. तटबंदीची भिंत लालसर प्रवाळ प्रस्तराची असून भव्य, उंच व रुंद आहे. उभय बाजूंना चावड्या व ओटे आहेत. लोखंडाच्या कड्या, खिळे व जोडपट्ट्या दिसतात. Devlapar Fort | Forts of Vidarbha त्यावरुन ही वास्तू मध्ययुगीन असल्याचे जाणवते. ही वास्तु गोंड सरदार राजाखानची असावी असे तज्ञांचे म्हणणे आहे. गोंड स्थापत्य शैली प्रवेशद्वारातून आत गेलो की भव्य चौकोनी वास्तूचे अवशेष दृष्टीस पडतात. ३६०० चौरसवर्ग फुटाच्या या वास्तूच्या अंतरभागात कमीतकमी ६ भव्य कक्ष, व्हरांडे, छज्जे व खिडक्या असाव्यात. गढी दुमजली असून दगडाच्या पायऱ्या आहेत. येथे भुयार असावे,असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. ...

पवनीचा किल्ला व स्तुप | Pauni Fort and Stupa | Forts near Nagpur | Forts in Vidarbha

Image
वि दर्भातील प्राचीन गावांत भंडारा जिल्ह्यातील पवनीची गणना होते. वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या या गावाला दक्षिणेची काशी म्हटल्या जाते. हे गाव २५०० वर्षांपासून म्हणजेच मौर्य काळापासून अस्तित्वात आहे. गावात टेकडीवर (जगन्नाथ टेकडी) नारायणाचे मंदिर दिसते तेथे एक अतिविशाल स्तुपस्थापत्य होते. शुंग-मौर्य-सातवाहनाच्या काळातला हा स्तुप त्यावेळी कसा दिसत असेल याची प्रचिती तेथील उत्खननात सापडलेल्या पुरावशेषांवरुन येते. Pavni Fort and Stupa | Forts of Vidarbha गावात शिरल्याबरोबर उजव्या बाजूला प्रचंड व मजबूत बांधकामाचा तटबंदी असलेला पवनीचा किल्ला दृष्टीस पडतो. भव्य कमानी प्रवेशद्वारातून आत गेले की चढण सुरू होते. उभय बाजूचे गवाक्ष,व्हरांडे,जंग्या जाळ्या यांनी सुशोभित प्रवेशद्वार म्हणजे किल्ल्याची व आजच्या पवनी गावाची ऐटबाज वास्तू आहे. पवनीचा किल्ला हा भुइकोट असावा कारण श्रीगणेशाच्या अर्वाचीन देवळासमोर साधारण यादव काळातील विटांच्या बांधकामाचा बलदंड बुरुज दिसतो. ही वास्तू भोसले अथवा गोंडकालीन नसावी. पवनीचा प्राचीन भूतकाळ राजा पवनच्या काळापासून आहे, ज्याच्यावरून या शहराचे नाव पडले असे मानले जाते. सामा...

किल्ले प्रतापगड | Pratapgarh Fort | Forts near Nagpur | Forts in Vidarbha

Image
विदर्भातील किल्ले  | Forts near Nagpur | Forts of Vidarbha प्रतापगड प्र तापगड म्हटले की सर्वांना आठवते ती छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखानाची भेट. पण अनेकांना कदाचित माहिती नसेल प्रतापगड नावाचा आणखी एक डोंगरी दुर्ग विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली या तालुक्याच्या ठिकाणापासून दक्षिणेस वळले की सानगडी किल्ला लागतो. तो पार करुन पुढे गेल्यानंतर अजुर्नी मोरगाव नावाची गावं लागतात. तेथून पूर्वेला १६ किमी अंतरावर एका पुलावरुन पश्चिमेकडे नजर टाकली की प्रतापगडाचे उंच शिखर दृष्टीस पडते. प्रतापगडाच्या पायथ्याशी एक लहानसे वनग्राम असून समोरच अखंड पाषाणातून कोरलेला गरुड स्तंभ आहे. लाल पाषाणाचा हा स्तंभ साधारण ४०० वर्ष प्राचीन आहे. या किल्ल्यावर गोंड राजे, त्यांचे किल्लेदार तसेच जमीनदारांचे अधिपत्य होते. गड चढताना अर्ध्या अंतरावर एक मजार आहे. हा किल्ला पूर्ण जंगलमय आहे. माथ्यावरील पठारातून आत गेले की भग्न तटबंदीने किल्ला घेरला आहे. तटबंदीच्या बाजूबाजृूने गेलं की भव्य नैसर्गिक तळघर लागतं. बाजूला दोन पाषाण शिल्पांकित खळगे दिसतात. त्याला स्थानिक लोक श्रावणबाळाची कावड म्हणता...

आमनेरचा किल्ला | Amner Fort | Forts near Nagpur | Forts in Vidarbha

Image
विदर्भात अर्वाचीन काळात इ.स.च्या १५ व्या शतकात श्रीमंत गोंडांची राज्ये होती. त्यानंतर हा प्रांत श्रीमंत भोसले नृपतींच्या अखत्यारित गेला. हे किल्ले आलटून पालटून गोंड व भोसलेंच्या ताब्यात होते. नागपूर जिल्ह्यात नरखेड तालुक्यात एका उंच व टणक जागेवर हा आमनेरचा किल्ला उभा आहे. वर्धा-जाम आणि वसिष्ठा नद्यांच्या त्रिवेणी संगमावर हा दुर्गराज असून या किल्ल्याच्या परिसरात तीन मध्यम लोकवस्तींची खेडे आहेत. आमनेर, मुक्तापूर आणि जलालखेडा. आमनेरचा किल्ला | Amner Fort | Forts near Nagpur | Forts in Vidarbha किल्ल्याला एकूण ८ बुरुज असून ७ शिल्लक आहेत. हा किल्ला १२ व्या, १३ व्या शतकापासून अस्तित्वात असावा. नदीच्या काठाकाठाने किल्ल्यास प्रदक्षिणा घालता येते. पण सांभाळून. तिन्ही बाजूला काळेशार पाणी आणि एका बाजूला खंदक अशी आमदेर किल्ल्याची रचना आहे. किल्ल्याच्या बुरुजाअंतर्गत खोलगट असे पठार असून जुजबी शेती चालते. दक्षिणेस श्री सोमेश्वराचे अतिभव्य मंदिर आहे. मंदिरात काही प्रतिमाही दिसतात. हे शिवमंदिर जागृत देवस्थान असून या संपूर्ण परिसरात एवढे सुंदर, भव्य व डेरेदार मंदिर नाही. निसर्गाचे उत्तम लेणे या दुर्गरा...

महदागड किल्ला | Mahadagarh Fort | Forts near Nagpur | Forts in Vidarbha

Image
विदर्भातील किल्ले  | Forts near Nagpur | Forts of Vidarbha महदागड किल्ला ना गपूर-अमरावती महामार्गावर सुमारे १८ किमी अंतरावर धामना, वडधामना नावाची गावे आहेत. त्याच्या अलिकडे जवळपास दोन ते अडीच किमीवर भुयारी गावात एक जीर्ण मंदिर आहे. हेमाडपंथी स्थापत्य शैलीत मोडणारे हे मंदिरावशेष यादव राजांच्या काळातील म्हणजेच इ.स.च्या १२ व्या व १३ व्या शतकातील असावेत. तेथून पुढे गावाच्या दक्षिणेस एक शैलगृह आहे. तेथून पुढे आणखी आत जंगलात ३ ते ४ किमीवर एका टेकडीच्या पायथ्याशी भव्य राजवाड्याचे जोते दिसते. विस्तृत पायवे, दगडविटांच्या रुंद भिंती आणि चौकोनी आकार असे त्याचे स्वरुप आहे. जंगलामुळे वास्तुचा काळ, रचना याचा अंदाज बांधता येत नाही. पण याच पायथ्यावरुन डोंगरावर वाट जाते. साध्या पाऊल वाटेने चढण चढून गेलो की पुढे विशाल दगडांच्या पायऱ्या लागतात. साधारण २०० पायऱ्या चढल्यावर एक पठार असून तेथे शिवाचे मंदिर व एक दर्गा दिसतो. तटबंदीची भिंती ही मानवनिर्मित आहे. साधारण ३०० फूट लांब व १०० फूट रुंद या पठारास पेंढाऱ्याचे ठाणे म्हणतात. गोंड आणि भोसल्यांच्या काळात पेंढाऱ्यांच्या (लुटारु)टोळ्या असायच्या. जो वतन दे...

सानगडीचा डोंगरी किल्ला | Sangadi Fort | Forts near Nagpur | Forts in Vidarbha

Image
विदर्भातील किल्ले  | Forts near Nagpur | Forts of Vidarbha सानगडीचा डोंगरी किल्ला भं डारा जिल्ह्यात साकोली तालुक्यातील सानगडी गावात शिरताच दक्षिणेला एका टेकडीवर जुन्या भिंती, तटबंदीचे अवशेष, उंच बुरुज आणि बालेकिल्ल्याचे भग्न अवशेष दिसतात.  या  किल्ल्यात निझामाच्या सैन्यासोबत एक हातघाईची लढाई झाली आणि गावातील बलदंड मल्लांनी हा हल्ला परतवून लावून निझामास विदर्भाचे म्हणजेच झाडीमंडळाचे पाणी पाजले असे सांगतात. टेकडीवर चढून जाताना विटांचे बांधकाम असलेले भव्य प्रवेशद्वार दिसते. आत कक्ष असून ते भग्न आहेत. कक्ष छान प्रशस्त असून प्रवेशद्वार राजवाड्याचे दिसते. प्रवेशद्वारासमोरील भग्न वास्तू अंबरखाना असावी. किल्ल्यात अष्टकोनी पायविहीर आहे. किल्ल्याचा महिरप दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. १२ फूट ८ इंच लांब, ३ ते ४ इंच घेर आणि सहा कड्या असलेली अष्टधातुची तोफ म्हणजे या किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य. ही तोफ ३५० ते ४०० वर्ष जुनी असून गावकरी तिला तोफमाय म्हणतात. पूर्वी ती बुरुजावर असावी आता पायथ्याशी उतारावर आहे. मुळात हा किल्ला देवगडच्या गोंड राज्यांतर्गत परगणे भांनारा (भंडारा) या क्षेत्रात अंत...

अंबागड किल्ला | Ambagarh Fort | Forts near Nagpur | Forts in Vidarbha

Image
विदर्भातील किल्ले  | Forts near Nagpur | Forts of Vidarbha वि दर्भाच्या उत्तरेला सातपुडा पर्वत रांगा आहेत. सातपुड्याच्या दक्षिण माथ्यावर भंडाऱ्यापासून अंदाजे ४० किमी अंतरावर अंबागड हा बलदंड डोंगरी किल्ला एखाद्या ढाण्या वाघासारखा उभा आहे. गोंडवनाचे मोगलांपासून संरक्षण करणाऱ्या द्वारपालासारखा. भंडाऱ्याच्या उत्तरेला गायमुख देवालय (तुमसर रोड) संस्थानपर्यंत जायचे. मार्गात आंधळगाव पडते. गायमुख डोंगर हे सातपुड्याचाच पायथा असून घनदाट अरण्याने वेढला आहे. अर्वाचीन गायमुख देवस्थानाच्या पूर्वेला मोठी गुफा आहे. डोंगारातील या ४५ फूट खोल गुफेत चालत जाता येते. आत गिरीजेची मूर्ती आहे. येथील शैलगृह नैसर्गिक आहे. येथूनच किल्ल्याची चढण सुरु होते. परंतु अनेक पर्यटक अंबागड या गोंडी गावाच्याही पुढे गडाच्याच पायथ्याशी जातात. दक्षिणामुख हनुमंताच्या देवालयापासून पूर्वेला १५०० ते २००० फूट उंच चढले की आपण एका भव्य प्रवेशद्वाराशी पोहोचतो. गोंडस्थापत्याचा हा अद्वितीय नमुना बघून पर्यटक किल्ल्याच्या प्रेमात पडतो. Ambagarh Fort | Forts of Vidarbha १७०० च्या दशकाच्या सुरुवातीला देवगडचे बख्त बुलंद शाह यांच्या नेतृत्...

अनंत ज्यांची इच्छाशक्ती ! गतवैभवासह डौलात उभं आहे हिरोशिमा | Author: Savita Deo Harkare | Travel Experience in Japan in Marathi Part 7

Image
आठवणीतील जपान भाग सात (अंतिम) |  Travel Experience in Japan in Marathi Part 7 आठवणीतील जपान सिरीस जपान-दक्षिण आशिया मैत्री कार्यक्रमाअंतर्गत भारताच्या २३ सदस्यीय प्रतिनिधीमंडळात निवड झाली तेव्हापासूनच माझ्या मनाला एक हुरहुर लागली होती. कारण जपान म्हटलं की हिरोशिमा आणि नागासाकी आपसुकच आठवतात. आपल्याला ही दोन शहरं बघायला मिळतील काय? याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. आणि प्रत्यक्षात हिरोशिमाचा प्रवास सुरु झाला तेव्हा तर अंगावर रोमांच उभे झाले होते. नगोयावरुन आम्ही निघालो त्या क्षणापासून अगदी तेथे पोहोचेपर्यत मनात विचारांचं काहुर माजलं होतं. जगातील साऱ्या मानवजातीला कलंक फासणारा पहिला अणुबॉम्ब ज्या शहरावर टाकला ते हिरोशिमा शहर आता कुठल्या परिस्थितीत असेल, तेथील लोक या धक्क्यातून सावरले असतील काय? असे प्रश्न मनात डोकावत होते. आणि साक्षात हिरोशिमा शहरात पाऊल ठेवल्यानंतर आश्चर्याचा सुखद धक्का बसला. अणुबाम्बनं उद्ध्वस्त झालेलं हेच ते हिरोशिमा यावर क्षणभर विश्वासच बसेना. अतिशय वेगानं पुन्हा डौलात उभं झालेलं हे शहर बघितल्यानंतर आम्ही जपानी लोकांच्या जिद्दीला सलाम ठोकला. Hiroshima हिरोशिमाचा इत...

पारंपारिक उद्योगांची जपूण करणारा देश | Travel Experience in Japan in Marathi Part 6

Image
आठवणीतील जपान भाग सहा | Travel Experience in Japan in Marathi Part 6 आठवणीतील जपान सिरीस उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गगनभरारी घेणाऱ्या जपानमध्ये परंपरागत उद्योगांचीही अत्यंत काळजीपूर्वक जपणूक करण्यात आली आहे. जुनीच काय पण नवीन पिढी सुद्धा अतिशय आवडीनं या उद्योगात रुची घेत असल्याचं दिसून आलं. विशेषत: येथील कागदावरील कलाकृती आणि शिल्पकाम बघितल्यानंतर मनापासून दाद द्यावीशी वाटली. दगडांसाठी प्रसिद्ध असलेलं ओकाझाकी शहर आणि दगडी कलाकृती यांचं नातं ५०० वर्षे जुनं आहे. येथील राजवाडे बघताना राजेमहाराजांच्या सुरस कथाही ऐकायला मिळाल्या. त्सुगुयोशी सैगो हा ओकाझाकीचा राजा असतानाच्या काळात ग्रॅनाईड दगडाचा उपयोग करुन येथे अनेक घरे व राजवाडे बांधण्यात आले. यानंतर योशोमासा तानाका यानं १५९० नंतर इझुमी किंवा कावाचे येथून विविध प्रकारचे दगडं आणून शहराला वेगळं स्वरुप दिलं. बहुदा त्या काळापासूनच ओकाझाकी हे दगडांचं शहर म्हणून ओळखलं जाऊ लागलं असावं. येथील दगडांची उच्च गुणवंता आणि कारागिरांचं अप्रतिम हस्तकौशल्य साèया जगात प्रसिद्ध आहे. एवढा पांढरा आणि चकचकीत दगड; विशेषत: ग्रॅनाईडची विविध आकारातील रुप...

चिटणवीस वाडा, नागपूर | Chitnavis Wada Nagpur Heritage

Image
1. नागपूरच्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार | Chitnavis Wada Nagpur नागपूरच्या महाल परिसरात वसलेला चिटणवीस वाडा हा शहराच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. भोसले राजवटीच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या चिटणवीस कुटुंबाचे हे निवासस्थान आजही नागपूरच्या वैभवशाली भूतकाळाची आठवण करून देते. या वाड्यातून नागपूरच्या प्रशासकीय आणि सांस्कृतिक जीवनाची अनेक पर्वे घडली असून, आज हा वाडा कला, साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे केंद्र बनला आहे. 🏛️✨ Chitnavis Wada Nagpur 2. भोसलेकालीन इतिहास आणि वास्तुकला | History and Architecture of Chitnavis Wada चिटणवीस वाडा ही पारंपरिक मराठी वाडा संस्कृतीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. प्रशस्त अंगण, जाड दगडी भिंती, लाकडी खांब, नक्षीदार दरवाजे आणि गवाक्षे ही याची ठळक वैशिष्ट्ये आहेत. हा वाडा भोसले राजघराण्याचे विश्वासू प्रशासक असलेल्या चिटणवीस कुटुंबाचा निवास होता. काळाच्या ओघात वाड्याचे रूप बदलले असले तरी, त्याची मूळ वास्तुरचना आणि ऐतिहासिक महत्त्व आजही टिकून आहे. सध्या येथे कला प्रदर्शन, संगीत मैफिली, व्याख्याने आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजि...

जपानी कुटुंबासह ‘तानाबाना’ उत्सवाचा आनंद 🌸 | Travel Experience in Japan in Marathi Part 5

Image
आठवणीतील जपान भाग पाच | Travel Experience in Japan in Marathi Part 5 आठवणीतील जपान सिरीस जपानमधील आमच्या एका महिन्याच्या वास्तव्यात जपानी कुटुंबासोबत घालवलेले ते दोन दिवस म्हणजे एक आगळावेगळा आणि सुखद अनुभव होता. या दोन दिवसात जपानमधील कुटुंब पद्धती आणि कौटुंबिक जीवन अगदी जवळून अनुभवायला मिळालं. मैत्री कार्यक्रमाअंतर्गत या देशातील कौटुंबिक जीवनाचा अभ्यास व्हावा या उद्देशानं हा ‘होम स्टे’ ठेवण्यात आला होता. टोकियोला पोहोचल्यानंतरच आम्हाला याबाबत कल्पना देण्यात आली होती. तब्बल दोन दिवस जपानी कुटुंबासोबत त्यांच्या घरी रहायला मिळणार हे ऐकल्यानंतर आम्ही सर्वच जाम खूष होतो. हे लोक घरात कसे वागत असतील, आपल्या येथे होतात तशीच या कुटुंबातही नवराबायकोची भांडणं होत असतील काय? स्वयंपाकघरात नवरा बायकोला मदत करत असेल काय? हे सगळं जाणून घेण्याची उत्सुकता होतीच आणि प्रत्यक्ष कुटुंबात राहिल्याशिवाय हे सगळं माहिती होणं शक्यही नव्हतं. त्यामुळं ‘होम स्टे’ चे दोन दिवस केव्हा येणार याची मी आतुरतेनं प्रतीक्षा करीत होते.                         ...
🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
आजचा मराठी शब्दआजचा प्रश्न
या शब्दाचा अर्थ काय आहे?तुम्हाला याचे उत्तर माहीत आहे का?
उत्तरासाठी कार्ड उलटा
अर्थउत्तर
उगमअधिक माहिती
समानार्थीश्रेणी
वाक्यात उपयोग
WhatsUp मराठी पुन्हा उलटा
जानेवारी|फेब्रुवारी|मार्च|एप्रिल|मे|जून|जुलै|ऑगस्ट|सप्टेंबर|ऑक्टोबर|नोव्हेंबर|डिसेंबर
WORD|अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
WORD|लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
WORD|नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|डोंगरातील पाणी नितळ आहे.
WORD|तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
WORD|रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
WORD|ओंजळ|दोन्ही हातांचा केलेला कप्पा|देशज मराठी|हातभर|त्याने ओंजळीत पाणी घेतले.
WORD|हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|हळुवार वारा वाहत होता.
WORD|मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|तिचा आवाज मंजुळ आहे.
WORD|मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|पहिल्या सरीनंतर मृद्गंध दरवळला.
WORD|आभाळमाया|असीम, अपार प्रेम|देशज मराठी|अपार माया|आईची आभाळमाया विसरता येत नाही.
WORD|धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|तो संगीतात धुंद झाला.
WORD|झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|संध्याकाळी थंड झुळूक आली.
WORD|नभ|आकाश|संस्कृत|गगन|पहाटे नभ निरभ्र होते.
WORD|उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|त्याला आनंदाचा उमाळा आला.
WORD|साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|ती साजिरी दिसत होती.
WORD|गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
WORD|कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|फटीतून सूर्याचा कवडसा पडला.
WORD|जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
WORD|लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|गाण्याची लय सुंदर होती.
WORD|कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|फुलदाणीत कोमेजलेली फुले दिसत होती.
WORD|दरवळ|पसरणारा मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|चाफ्याचा दरवळ पसरला.
WORD|सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|सावळ्या ढगांनी आकाश भरले.
WORD|सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|तिचा चेहरा सतेज दिसत होता.
WORD|मधुमालती|सुगंधी फुलांची वेल|संस्कृत|फुलवेल|अंगणात मधुमालती फुलली होती.
WORD|गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
WORD|हुरहूर|मनातील अस्वस्थ ओढ|देशज मराठी|व्याकुळता|जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
WORD|निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
WORD|तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
WORD|मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
WORD|लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|दिव्याची ज्योत लवलवत होती.
WORD|उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|तरुणांमध्ये नवी उमेद आहे.
WORD|गोजिरी|नाजूक व सुंदर|देशज मराठी|साजिरी|गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
WORD|मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|आंब्याला मोहोर आला आहे.
WORD|अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|गावचा चहा अमृततुल्य लागतो.
WORD|झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|मंदिरातील घंटांचा झंकार झाला.
WORD|सहजसुंदर|नैसर्गिकरीत्या सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
WORD|आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|पहाटेचा आसमंत शांत होता.
WORD|सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
WORD|निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|डोंगरातून निर्झर वाहत होता.
WORD|नादमय|संगीताने भरलेला|संस्कृत|सुरेल|सभागृह नादमय झाले.
WORD|मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
WORD|स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|संगीताचे स्पंदन जाणवत होते.
WORD|चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
WORD|मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|मृदुल वाळूवर पावले उमटली.
WORD|अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|ती अलवार हसली.
WORD|स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|पक्षी स्वैर उडत होते.
WORD|सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|फुलांची सुरभि दरवळली.
WORD|दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|तिच्या डोळ्यांत वेगळीच दीप्ती होती.
WORD|प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|अंगणात प्राजक्त फुलला होता.
WORD|निरभ्र|ढगविरहित, पूर्ण स्वच्छ|संस्कृत|स्वच्छ|निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?|रायगड|६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातून वाहणारी सर्वात लांब नदी कोणती?|गोदावरी|त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे उगम पावणारी गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी असून तिला 'दक्षिण गंगा' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली?|१ मे १९६०|संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये अस्तित्वात आली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?|कळसूबाई|अहिल्यानगर जिल्ह्यातील हे शिखर सुमारे १,६४६ मीटर उंच असून ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे.|भूगोल
GK|संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' कोणत्या गावी लिहिली?|नेवासे|अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथे भगवद्गीतेवरील ही मराठी टीका लिहिली गेली.|संस्कृती
GK|लोणार सरोवर कशामुळे तयार झाले?|उल्कापातामुळे|बुलढाणा जिल्ह्यातील हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बेसाल्ट खडकात उल्का आदळून तयार झालेले जगातील दुर्मीळ सरोवर आहे.|भूगोल
GK|तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला?|सिंहगड (कोंढाणा)|१६७० मधील या लढाईत तानाजी धारातीर्थी पडले; 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार प्रसिद्ध आहेत.|इतिहास
GK|अफझलखानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला?|प्रतापगड|१६५९ मध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाजवळ ही ऐतिहासिक भेट व संघर्ष घडला.|इतिहास
GK|मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?|दर्पण|बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये 'दर्पण' सुरू केले; त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक मानले जाते.|संस्कृती
GK|'केसरी' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?|लोकमान्य बाळ गंगाधर टिळक|१८८१ मध्ये मराठीतून 'केसरी' आणि इंग्रजीतून 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू झाली.|इतिहास
GK|'सत्यशोधक समाज' कोणी स्थापन केला?|महात्मा जोतिराव फुले|२४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात स्थापन झालेली ही संस्था सामाजिक समतेसाठी कार्यरत होती.|इतिहास
GK|'श्यामची आई' या पुस्तकाचे लेखक कोण?|साने गुरुजी|पांडुरंग सदाशिव साने यांनी नाशिकच्या कारागृहात हे पुस्तक लिहिले.|साहित्य
GK|'नटसम्राट' या गाजलेल्या नाटकाचे लेखक कोण?|वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)|कुसुमाग्रजांना १९८७ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.|साहित्य
GK|मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा होतो?|२७ फेब्रुवारी|कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.|संस्कृती
GK|वेरूळ येथील कैलास लेणे कोणत्या राजवटीत कोरले गेले?|राष्ट्रकूट|एकाच अखंड खडकात वरून खाली कोरलेले हे मंदिर जगातील स्थापत्यशास्त्रीय आश्चर्य मानले जाते.|इतिहास
GK|अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?|छत्रपती संभाजीनगर|बौद्ध चित्रकला व शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेली ही लेणी युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहेत.|पर्यटन
GK|एलिफंटा लेणी कोणत्या देवतेला समर्पित आहेत?|शिव|मुंबईजवळील घारापुरी बेटावरील त्रिमूर्ती शिल्प जगप्रसिद्ध आहे.|पर्यटन
GK|महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत?|पाच|भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ — बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत.|संस्कृती
GK|अष्टविनायक म्हणजे किती गणपती मंदिरे?|आठ|पुणे, रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विखुरलेली ही आठ स्वयंभू गणपती मंदिरे आहेत.|संस्कृती
GK|कृष्णा नदीचा उगम कोठे होतो?|महाबळेश्वर|सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्या उगम पावतात.|भूगोल
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?|शिवनेरी|पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या या किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी त्यांचा जन्म झाला.|इतिहास
GK|संत तुकाराम महाराजांचे गाव कोणते?|देहू|पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीकाठचे देहू हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.|संस्कृती
GK|संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?|आळंदी|पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली.|संस्कृती
GK|सेवाग्राम आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?|वर्धा|महात्मा गांधींनी १९३६ मध्ये येथे वास्तव्य सुरू केले; हे स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्वाचे केंद्र ठरले.|इतिहास
GK|पवनार आश्रम कोणाशी संबंधित आहे?|आचार्य विनोबा भावे|वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून विनोबांनी भूदान चळवळीचे कार्य केले.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते?|ताडोबा|चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा १९५५ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झाले; पुढे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तयार झाला.|वन्यजीव
GK|'संत्रानगरी' म्हणून कोणते शहर ओळखले जाते?|नागपूर|संत्र्यांच्या व्यापारामुळे मिळालेले हे नाव; नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.|भूगोल
GK|महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणते शहर मानले जाते?|पुणे|शिक्षण, साहित्य, नाट्य आणि संगीत परंपरेमुळे पुण्याला हे स्थान मिळाले आहे.|संस्कृती
GK|रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते?|रायरी|शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केली.|इतिहास
GK|पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?|१७६१|मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यातील या लढाईचा मराठा साम्राज्यावर मोठा परिणाम झाला.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेचे नाव काय?|जिजाबाई|जिजाऊंनी शिवरायांवर स्वराज्याचे संस्कार केले; त्यांना राजमाता म्हणून ओळखले जाते.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळ घोषित झाले?|२००४|व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतील ही वास्तू मुंबईचे प्रतीक मानली जाते.|पर्यटन
GK|गेट वे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे?|मुंबई|१९२४ मध्ये पूर्ण झालेली ही वास्तू अरबी समुद्राच्या काठी उभी आहे.|पर्यटन
GK|'लोकहितवादी' या टोपणनावाने कोण लेखन करत असत?|गोपाळ हरी देशमुख|त्यांच्या 'शतपत्रे' या लेखमालेने एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारणेला दिशा दिली.|साहित्य
GK|मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?|वि. स. खांडेकर|'ययाति' या कादंबरीसाठी १९७४ मध्ये त्यांना हा सन्मान मिळाला.|साहित्य
GK|जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?|गोदावरी|छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या धरणाच्या जलाशयाला 'नाथसागर' म्हणतात.|भूगोल
GK|कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?|सातारा|जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या धरणाच्या जलाशयाला 'शिवसागर' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते?|ताम्हण (जारूळ)|जांभळ्या रंगाची ही फुले पावसाळ्यात सह्याद्रीत मोठ्या प्रमाणात दिसतात.|निसर्ग
GK|महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?|शेकरू|मोठी उडणारी खार असलेला शेकरू भीमाशंकर अभयारण्यात प्रामुख्याने आढळतो.|वन्यजीव
GK|कास पठार कशासाठी प्रसिद्ध आहे?|रानफुलांच्या बहरासाठी|सातारा जिल्ह्यातील हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ पावसाळ्यानंतर फुलांच्या गालिच्यासाठी ओळखले जाते.|पर्यटन
GK|भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी ओळखले जाते?|शेकरू|पुणे जिल्ह्यातील हे अभयारण्य ज्योतिर्लिंगासाठीही प्रसिद्ध आहे.|वन्यजीव