Posts

मंडाले: लोकमान्य टिळकांच्या विचारांना नवी दिशा देणारी भूमी, कैदेतून घडलेलं गीतारहस्य | Tilak in Mandalay & Gita Rahasya | Author: Raajan | International Heritage Tourism

Image
"काही शहरे त्यांच्या राजवाड्यांमुळे प्रसिद्ध होतात, काही युद्धांमुळे, तर काही एका महान व्यक्तिमत्त्वाच्या आठवणींमुळे. म्यानमारमधील मंडाले हे असेच एक शहर. आज ते बौद्ध संस्कृतीचे केंद्र म्हणून ओळखले जाते; पण भारतीयांसाठी मंडाले म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे दुसरे घर. एक असे ठिकाण, जिथे ब्रिटिशांनी त्यांना शिक्षा दिली; पण त्यांनी त्याच शिक्षेचे रूपांतर भारतीय विचारविश्वातील अमर ठेव्यात केले." आजचे मंडाले – इतिहास, श्रद्धा आणि शांततेचे शहर | Mandalay City Today म्यानमारच्या मध्यभागी वसलेले मंडाले हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर. एकेकाळी बर्मा साम्राज्याची शेवटची राजधानी असलेले हे शहर आज बौद्ध धर्माचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. मंडाले हिल, कुतोदॉ पॅगोडा, महा मुनि बुद्ध मंदिर, इरावडी नदीचे किनारे आणि प्राचीन राजवाडा यामुळे जगभरातील पर्यटक येथे येतात. दुसऱ्या महायुद्धानंतर शहराने मोठे नुकसान सोसले, पण मंडालेने स्वतःला पुन्हा उभे केले. आज येथे आधुनिक रस्ते, बाजारपेठा आणि पर्यटनाची चांगली सुविधा आहे. मात्र या शहराच्या एका कोपऱ्यात भारतीय इतिहासाची एक वेगळीच कहाणी दडल...

काळ्या कोळशाच्या साम्राज्यात निसर्गाचा महाचमत्कार | Mahatma Gandhi Eco Park | Author: Sakhi | Mine Tourism | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism

Image
‘माइन-टूरिझम’ने रचला जागतिक कीर्तीचा नवा इतिहास जिथे कधी काळ्या कोळशाची धूळ, अथांग खड्डे आणि अजस्र यंत्रांच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाचे साम्राज्य होते, तिथे आज डोळे दिपवणारी विलोभनीय हिरवाई आणि आधुनिक विज्ञानाचा एक अद्भुत आविष्कार आकाराला आला आहे. वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडने (वेकोलि) नागपूर आणि चंद्रपूरच्या खाण पट्ट्यात सुरू केलेले ‘माइन-टूरिझम’ (खाण पर्यटन) आता केवळ जुन्या चौकटीत उरलेले नाही.   Mine Tourism आता २०२६ ला चित्र काय? तर, भंगारात निघणाऱ्या कोळसा वॅगन्सचे अलिशान आणि देखण्या ‘टूरिस्ट डब्यांमध्ये’ झालेले रूपांतर आणि संपूर्ण खाण परिसराचे ‘कार्बन सिंक’मध्ये झालेले रूपांतर; या अभूतपूर्व कायापालटासह हे अनोखे मॉडेल आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर एका अत्यंत प्रगत अवतारात दिमाखात झळकत आहे. विदर्भाच्या मातीतून आकाराला आलेली ही निसर्गाची किमया आणि विज्ञानाचा थरार संपूर्ण राज्याला आणि देशातील पर्यटकांना भुरळ पाडत आहे. 'कचऱ्यातून कांचन' या संपूर्ण प्रकल्पाचे सर्वात मोठे आणि मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथल्या ‘टॉय ट्रेन’चा झालेला संपूर्ण मेकओव्हर! पूर्वी ज्या जुन्या, गंजलेल्या ...

चंद्रपुरातील पाषाणयुगीन मानवाचे गाव माहिती आहे का? ‘बोर’ नावाचे मूळ गाव सापडले | प्रा. सुरेश चोपणे | Author: Prof. Suresh Chopane | Chandrapur Stone Age Discovery | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism | Incredible India

Image
पुरातत्त्व संशोधन आणि पर्यटनाला मिळणार नवी दिशा चंद्रपूर म्हटले की गोंड राजांची राजधानी, किल्ला आणि मध्ययुगीन इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो. मात्र येथील इराई आणि झरपट नदीच्या संगमाजवळील ‘बोर रीठ’ या स्थळावरील संशोधनामुळे चंद्रपूरचा इतिहास आणखी हजारो वर्षे मागे जात असल्याचे संकेत मिळत आहेत. इतिहास अभ्यासक व संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांच्या संशोधनानुसार या परिसरात पाषाणयुग, सातवाहन, वाकाटक आणि यादव काळातील मानवी वस्तीचे पुरावे आढळले आहेत. या दाव्यांची अधिकृत पुरातत्त्वीय पडताळणी आणि उत्खनन झाल्यास चंद्रपूरच्या इतिहासाला नवे परिमाण मिळू शकते. त्याचबरोबर हे स्थळ विदर्भातील महत्त्वाचे पुरातत्त्वीय पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्याचीही मोठी संधी आहे. या संशोधनाबद्दल प्रा. सुरेश चोपणे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊ. इराई–झरपट संगम परिसराचा पुरातत्त्वीय वारसा चंद्रपूर हे महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातील एक प्राचीन आणि ऐतिहासिक शहर आहे. नैसर्गिक संपत्ती, सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक परंपरा यामुळे या शहराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वर्धा, वैनगंगा आणि इरई नदीच्या परिसरात वसलेले हे शहर प्रा...

मेळघाट व्याघ्र प्रकल्प | विदर्भातील व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्ये | Melghat Tiger Reserve | Vidarbha Wildlife Tourism | Maharashtra Tourism

Image
विदर्भातील अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा एक प्रमुख आणि १९७४ साली भारताच्या महत्त्वाकांक्षी “प्रोजेक्ट टायगर” योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांमधील एक आहे. २,७६९ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेला हा परिसर त्याच्या अथांग दऱ्या, घनदाट जंगल, उंच डोंगर, नद्या आणि विहंगम नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. वन्यजीव प्रेमी आणि साहसप्रेमींसाठी हा प्रकल्प म्हणजे निसर्गाचा खजिना आहे. वाघांसह बिबटे, अस्वल, सांबर, चितळ, नीलगाय आणि असंख्य पक्ष्यांच्या प्रजाती येथे आढळतात. येथे निसर्गप्रेमींना जंगल सफारी, ट्रेकिंग आणि पक्षीनिरीक्षणाचा रोमांचक अनुभव घेता येतो. सातपुडा पर्वतरांगांच्या दक्षिणेकडे वसलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत आविष्कार आहे. “मेळघाट” या नावाचा अर्थच “घाटांचा संगम” असा होतो आणि खरोखरच हा प्रदेश डोंगर रांगांचे नयनरम्य मिश्रण, खोल दऱ्या आणि दाट जंगलांनी नटलेला आहे. अभयारण्याच्या ईशान्य सीमेवर तापी नदी शांतपणे वाहते तर खंडू, खापरा, सिपना, गडगा आणि डोलार या पाच उपनद्या त्यांच्या समृद्ध जैवविविधतेन...

सज्जनांना शक्तीशाली बनण्याची प्रेरणा देणारा सज्जनगड शिव-समर्थांच्या पवित्र स्मृतींचा प्रवास | Sajjangad Travel Guide | Author: Sakhi | Forts in Maharashtra | Maharashtra Tourism

Image
सज्जनगडाची एकएक पायरी चढत असताना मन केव्हा इतिहासाच्या त्या सोनेरी पानांमध्ये शिरलं कळलच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला तेव्हा येथे कसं वातावरण असेल, पुढे रामदास स्वामी राहण्यास आल्यावर किल्ल्यावरील दिनचर्या कशी राहात असेल? महाराज आणि स्वामींच्या भेटीगाठी कशा होत असतील? गडाचा इतिहास पुस्तकांमधून वाचला होता. पण आज प्रत्यक्ष या ऐतिहासिक गडाच्या पायथ्याशी उभं असताना सगळं कसं रोमांचक वाटत होतं. इतिहासातील प्रत्येक क्षणाची जणू मी नव्यानं साक्षीदार ठरत होते. आदिलशाही मुलूखातील हा किल्ला २ एप्रिल १६७३ रोजी शिवछत्रपतींनी जिंकून घेतला आणि त्याचं नामकरण झालं सज्जनगड. समर्थ रामदासांनी जी अनेक नावं धारण केली होती त्यामध्ये रामी रामदास, सज्जन आणि उदास ही नावं प्रसिद्ध होती. त्यामुळं छत्रपतींनी या किल्ल्याचं नाव सज्जनगड असं ठेवलं होतं. Sajjangad मुळात हा परळीचा किल्ला म्हणजे प्राचीन काळची अश्वलायन ऋषींची तपोभूमी. त्यामुळं त्याचं मूळ नाव होतं अश्वलायन गड. पुढे अश्वलायन शब्दाचा अपभ्रंश होऊन हा किल्ला ‘अस्वल गड’ या नावानं ओळखला जाऊ लागला. ११ व्या शतकात शिलाहारांनी या किल्ल्याची उभार...

उमरेड-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य | Umred Karhandla Wildlife Sanctuary | Vidarbha Wildlife Tourism | Maharashtra Tourism

Image
उमरेड-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य हे विदर्भातील एक प्रमुख निसर्ग संवर्धन क्षेत्र आहे. नागपूरपासून सुमारे ५८ किमी अंतरावर असलेले हे अभयारण्य वाघांचा अधिवास, संपन्न जैवविविधता आणि विस्तीर्ण जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. भारताच्या समृद्ध जैवविविधतेची नेत्रदीपक झलक सादर करणारे ते एक छुपे रत्न आहे. २०१३ मध्ये अस्तित्वात आलेले हे अभयारण्य सुमारे १८९ चौरस किलोमीटर (६३७ हेक्टर) क्षेत्रात पसरलेले आहे. हे अभयारण्य नागपूर (उमरेड, कुही, भिवापूर) आणि भंडारा (पवनी) या जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेले आहे. या अभयारण्यात वाघ, बिबट्या, रानगवे, अस्वल, चितळ, सांबर, नीलगाय आणि रानडुक्कर यांसारखे अनेक वन्यप्राणी आढळतात. तसेच, येथे विविध प्रजातींचे पक्षीही पाहायला मिळतात. येथे जंगली कुत्रे आणि क्वचितच दिसणारे सस्तन प्राणी जसे की मधू मुंगूस (हनी बॅजर) व खवले मांजर (पँगोलिन) आढळतात. दुर्मिळ लांडगे आणि तरसदेखील या वनक्षेत्रात गस्त घालतात. Umred Karhandla Wildlife Sanctuary हे अभयारण्य 'जय' नावाच्या भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध वाघाचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. हा ताडोबा-अंधारी, पेंच, बोर आणि नवेगाव-...

फणिंद्रपुरातील संतमहात्म्यांची समाधीस्थळं तुम्ही बघितली काय? | Author: Mrunalini Waghmare | Samadhis in Old Nagpur | Vidarbha Tourism

Image
नागपूरच्या आध्यात्मिक आत्मगौरवाचा इतिहास महाराष्ट्राची उपराजधानी व सतत आणि निरंतर विकसित होणारे भारतातले एक महत्त्वाचे महानगर म्हणजे नागपूर होय. पण काय तुम्हाला माहित आहे काय की, नागपूरचे आधीचे नाव होते फणिंद्रपूर . याबाबत अनेक दस्तऎवजात उल्लेख आढळतो. ‘फणिपुरे महाग्रामे, समस्ता: पुरवासिन:’ अशी ओळही प्रसिध्द आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुमारास कदाचित नागपूर हा उल्लेख करणे प्रारंभ झाले असावे. आज जरी हा भाग मनुष्यवस्तीनी गजबजलेला असला तरी कोणी एकेकाळी येथे घनदाट अरण्य होते. परंतु नागपूर येथे जरी पूर्वी अरण्य व वन असले तरी ही  तपोभूमी होती. इथे पूर्वी गुफाही होत्या. या गुफांमध्ये तपश्चर्या करणारे अनेक साधु-संत॒-ॠषी-मुनी-तपस्वी राहत असावेत. कालांतराने येथे मनुष्य वस्ती व तिचा सर्वांगिण विकास, प्रगत व प्रगल्भ अशी जीवनपद्धती विकसित होत गेली. त्याचाच अलीकडचा वारसा म्हणजे जुन्या नागपुरात घरोघरी दिसणारी समाधी स्थळे होत. अनेक पुरातत्त्वांच्या पुराव्यानुसार नागपूर येथे रामायण काळापासून वस्ती असल्याचे आढळते . गझेटिअर (१९०३) यात नोंद आहे की रामायणात नागपूरचा उल्लेख आला आहे. २००८ मध्ये राष्ट्रसंत ...

चंद्रपूरच्या जंगलात दडलेले गायमुख श्री महादेव मंदिर | नरेंद्र चांदेवार | Gaaymukh Shri Mahadev Mandir | Author: Narendra Chandewar | Temples in Vidarbha | Temples in Maharashtra

Image
चंद्रपूर जंगल क्षेत्र म्हटलं की महादेवाची पिंड गर्द जंगलात सुद्धा दिसून येतात. त्यांची नावे सुद्धा वेगवेगळी आणि स्थानिक संस्कार दिसून येतात - जसे पातळेश्वर, गुप्तेश्वर, मार्कंडेश्वर इत्यादी. गोंड या संरचनेत पेरसापेन महादेव अशी नावे आहेत. गायमुख हा प्रकार सुद्धा अशाच संरचनेचा भाग आहे. भारत देशात विशेषतः महाराष्ट्रात गायमुख संरचना कोकण ते पूर्व विदर्भ दिसून येतात. गायमुख बाबत पौराणिक कथा :-यास अनेक स्रोत दिसून येतात त्यापैकी एक अख्यायिका खाली दिलेली आहे. महाभारतातील युद्धामध्ये अनेक अस्त्र/ शस्त्रांचा वापर करण्यात आला विशेषतः ब्रह्मास्त्र आणि त्यामुळे सृष्टीची खूप हानी झालेली होती. ती भरून काढण्याकरिता ऋषीं मुनींनी तपश्चर्या करून भगवान महादेवाना प्रसन्न करून सृष्टीची हानी भरून काढण्याची विनंती केली. याकरिता भुगर्भ पाण्याचे झरे निर्माण केले आणि गाईच्या मुखातून पाणी येईल अशी व्यवस्था केली. यालाच गायमुख संरचना म्हटली जाते. गायमुख श्री महादेव मंदिर चंद्रपूर वन विभागांतर्गत येणाऱ्या चिचपल्ली वन परिक्षेत्रातील उथळपेठ या गावाच्या शेजारी डोंगराळ परिसरात गायमुख हे प्रसिद्ध व ऐतिहासिक स्थळ आहे. ग...

दुष्काळाच्या पलीकडचा मराठवाडा: पावसाळ्यात खुलणारे अनोखे पर्यटनविश्व | Author: Dr. Mrunalini Fadnavis | Marathwada Tourism | Maharashtra Tourism

Image
मराठवाड्याचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते दुष्काळ, पाणीटंचाई आणि रखरखीत भूमीचं चित्र. मात्र हीच ओळख मराठवाड्याचं संपूर्ण वास्तव सांगत नाही. पावसाळ्याच्या आगमनानंतर हा प्रदेश नव्या रूपात खुलतो. हिरवाईने नटलेले डोंगर, फेसाळत कोसळणारे धबधबे, पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजलेले जलाशय आणि जागतिक वारसा लाभलेल्या ऐतिहासिक वास्तू यामुळे मराठवाडा पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देतो. अजिंठा-वेरूळच्या लेण्यांपासून म्हैसमाळच्या धुक्याने वेढलेल्या टेकड्यांपर्यंत, नाथसागरच्या विस्तीर्ण जलाशयापासून सहस्त्रकुंडच्या रौद्र सौंदर्यापर्यंत अनेक ठिकाणं पावसाळ्यात नव्याने जिवंत होतात. मराठवाड्याच्या या दुर्लक्षित पण समृद्ध पर्यटन वारशाची ओळख करून घेणं आज काळाची गरज आहे. मराठवाड्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. छ. संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, बीड, नांदेड, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, परभणी, हिंगोली या मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांत बरीच लहान मोठी पर्यटनस्थळे आणि धार्मिक स्थळे आपल्याला बघायला मिळतात. सुरुवातीपासूनच इथल्या स्थानिक नेत्यांनी इथे कधीच लक्ष दिलं नाही. त्यामुळे जिथे सामान्य सुख सोयी मिळण्याचीच भ...
🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
आजचा मराठी शब्दआजचा प्रश्न
या शब्दाचा अर्थ काय आहे?तुम्हाला याचे उत्तर माहीत आहे का?
उत्तरासाठी कार्ड उलटा
अर्थउत्तर
उगमअधिक माहिती
समानार्थीश्रेणी
वाक्यात उपयोग
WhatsUp मराठी पुन्हा उलटा
जानेवारी|फेब्रुवारी|मार्च|एप्रिल|मे|जून|जुलै|ऑगस्ट|सप्टेंबर|ऑक्टोबर|नोव्हेंबर|डिसेंबर
WORD|अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
WORD|लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
WORD|नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|डोंगरातील पाणी नितळ आहे.
WORD|तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
WORD|रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
WORD|ओंजळ|दोन्ही हातांचा केलेला कप्पा|देशज मराठी|हातभर|त्याने ओंजळीत पाणी घेतले.
WORD|हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|हळुवार वारा वाहत होता.
WORD|मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|तिचा आवाज मंजुळ आहे.
WORD|मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|पहिल्या सरीनंतर मृद्गंध दरवळला.
WORD|आभाळमाया|असीम, अपार प्रेम|देशज मराठी|अपार माया|आईची आभाळमाया विसरता येत नाही.
WORD|धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|तो संगीतात धुंद झाला.
WORD|झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|संध्याकाळी थंड झुळूक आली.
WORD|नभ|आकाश|संस्कृत|गगन|पहाटे नभ निरभ्र होते.
WORD|उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|त्याला आनंदाचा उमाळा आला.
WORD|साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|ती साजिरी दिसत होती.
WORD|गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
WORD|कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|फटीतून सूर्याचा कवडसा पडला.
WORD|जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
WORD|लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|गाण्याची लय सुंदर होती.
WORD|कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|फुलदाणीत कोमेजलेली फुले दिसत होती.
WORD|दरवळ|पसरणारा मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|चाफ्याचा दरवळ पसरला.
WORD|सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|सावळ्या ढगांनी आकाश भरले.
WORD|सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|तिचा चेहरा सतेज दिसत होता.
WORD|मधुमालती|सुगंधी फुलांची वेल|संस्कृत|फुलवेल|अंगणात मधुमालती फुलली होती.
WORD|गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
WORD|हुरहूर|मनातील अस्वस्थ ओढ|देशज मराठी|व्याकुळता|जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
WORD|निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
WORD|तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
WORD|मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
WORD|लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|दिव्याची ज्योत लवलवत होती.
WORD|उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|तरुणांमध्ये नवी उमेद आहे.
WORD|गोजिरी|नाजूक व सुंदर|देशज मराठी|साजिरी|गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
WORD|मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|आंब्याला मोहोर आला आहे.
WORD|अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|गावचा चहा अमृततुल्य लागतो.
WORD|झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|मंदिरातील घंटांचा झंकार झाला.
WORD|सहजसुंदर|नैसर्गिकरीत्या सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
WORD|आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|पहाटेचा आसमंत शांत होता.
WORD|सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
WORD|निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|डोंगरातून निर्झर वाहत होता.
WORD|नादमय|संगीताने भरलेला|संस्कृत|सुरेल|सभागृह नादमय झाले.
WORD|मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
WORD|स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|संगीताचे स्पंदन जाणवत होते.
WORD|चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
WORD|मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|मृदुल वाळूवर पावले उमटली.
WORD|अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|ती अलवार हसली.
WORD|स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|पक्षी स्वैर उडत होते.
WORD|सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|फुलांची सुरभि दरवळली.
WORD|दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|तिच्या डोळ्यांत वेगळीच दीप्ती होती.
WORD|प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|अंगणात प्राजक्त फुलला होता.
WORD|निरभ्र|ढगविरहित, पूर्ण स्वच्छ|संस्कृत|स्वच्छ|निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?|रायगड|६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातून वाहणारी सर्वात लांब नदी कोणती?|गोदावरी|त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे उगम पावणारी गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी असून तिला 'दक्षिण गंगा' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली?|१ मे १९६०|संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये अस्तित्वात आली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?|कळसूबाई|अहिल्यानगर जिल्ह्यातील हे शिखर सुमारे १,६४६ मीटर उंच असून ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे.|भूगोल
GK|संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' कोणत्या गावी लिहिली?|नेवासे|अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथे भगवद्गीतेवरील ही मराठी टीका लिहिली गेली.|संस्कृती
GK|लोणार सरोवर कशामुळे तयार झाले?|उल्कापातामुळे|बुलढाणा जिल्ह्यातील हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बेसाल्ट खडकात उल्का आदळून तयार झालेले जगातील दुर्मीळ सरोवर आहे.|भूगोल
GK|तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला?|सिंहगड (कोंढाणा)|१६७० मधील या लढाईत तानाजी धारातीर्थी पडले; 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार प्रसिद्ध आहेत.|इतिहास
GK|अफझलखानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला?|प्रतापगड|१६५९ मध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाजवळ ही ऐतिहासिक भेट व संघर्ष घडला.|इतिहास
GK|मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?|दर्पण|बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये 'दर्पण' सुरू केले; त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक मानले जाते.|संस्कृती
GK|'केसरी' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?|लोकमान्य बाळ गंगाधर टिळक|१८८१ मध्ये मराठीतून 'केसरी' आणि इंग्रजीतून 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू झाली.|इतिहास
GK|'सत्यशोधक समाज' कोणी स्थापन केला?|महात्मा जोतिराव फुले|२४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात स्थापन झालेली ही संस्था सामाजिक समतेसाठी कार्यरत होती.|इतिहास
GK|'श्यामची आई' या पुस्तकाचे लेखक कोण?|साने गुरुजी|पांडुरंग सदाशिव साने यांनी नाशिकच्या कारागृहात हे पुस्तक लिहिले.|साहित्य
GK|'नटसम्राट' या गाजलेल्या नाटकाचे लेखक कोण?|वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)|कुसुमाग्रजांना १९८७ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.|साहित्य
GK|मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा होतो?|२७ फेब्रुवारी|कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.|संस्कृती
GK|वेरूळ येथील कैलास लेणे कोणत्या राजवटीत कोरले गेले?|राष्ट्रकूट|एकाच अखंड खडकात वरून खाली कोरलेले हे मंदिर जगातील स्थापत्यशास्त्रीय आश्चर्य मानले जाते.|इतिहास
GK|अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?|छत्रपती संभाजीनगर|बौद्ध चित्रकला व शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेली ही लेणी युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहेत.|पर्यटन
GK|एलिफंटा लेणी कोणत्या देवतेला समर्पित आहेत?|शिव|मुंबईजवळील घारापुरी बेटावरील त्रिमूर्ती शिल्प जगप्रसिद्ध आहे.|पर्यटन
GK|महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत?|पाच|भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ — बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत.|संस्कृती
GK|अष्टविनायक म्हणजे किती गणपती मंदिरे?|आठ|पुणे, रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विखुरलेली ही आठ स्वयंभू गणपती मंदिरे आहेत.|संस्कृती
GK|कृष्णा नदीचा उगम कोठे होतो?|महाबळेश्वर|सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्या उगम पावतात.|भूगोल
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?|शिवनेरी|पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या या किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी त्यांचा जन्म झाला.|इतिहास
GK|संत तुकाराम महाराजांचे गाव कोणते?|देहू|पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीकाठचे देहू हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.|संस्कृती
GK|संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?|आळंदी|पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली.|संस्कृती
GK|सेवाग्राम आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?|वर्धा|महात्मा गांधींनी १९३६ मध्ये येथे वास्तव्य सुरू केले; हे स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्वाचे केंद्र ठरले.|इतिहास
GK|पवनार आश्रम कोणाशी संबंधित आहे?|आचार्य विनोबा भावे|वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून विनोबांनी भूदान चळवळीचे कार्य केले.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते?|ताडोबा|चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा १९५५ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झाले; पुढे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तयार झाला.|वन्यजीव
GK|'संत्रानगरी' म्हणून कोणते शहर ओळखले जाते?|नागपूर|संत्र्यांच्या व्यापारामुळे मिळालेले हे नाव; नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.|भूगोल
GK|महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणते शहर मानले जाते?|पुणे|शिक्षण, साहित्य, नाट्य आणि संगीत परंपरेमुळे पुण्याला हे स्थान मिळाले आहे.|संस्कृती
GK|रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते?|रायरी|शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केली.|इतिहास
GK|पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?|१७६१|मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यातील या लढाईचा मराठा साम्राज्यावर मोठा परिणाम झाला.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेचे नाव काय?|जिजाबाई|जिजाऊंनी शिवरायांवर स्वराज्याचे संस्कार केले; त्यांना राजमाता म्हणून ओळखले जाते.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळ घोषित झाले?|२००४|व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतील ही वास्तू मुंबईचे प्रतीक मानली जाते.|पर्यटन
GK|गेट वे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे?|मुंबई|१९२४ मध्ये पूर्ण झालेली ही वास्तू अरबी समुद्राच्या काठी उभी आहे.|पर्यटन
GK|'लोकहितवादी' या टोपणनावाने कोण लेखन करत असत?|गोपाळ हरी देशमुख|त्यांच्या 'शतपत्रे' या लेखमालेने एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारणेला दिशा दिली.|साहित्य
GK|मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?|वि. स. खांडेकर|'ययाति' या कादंबरीसाठी १९७४ मध्ये त्यांना हा सन्मान मिळाला.|साहित्य
GK|जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?|गोदावरी|छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या धरणाच्या जलाशयाला 'नाथसागर' म्हणतात.|भूगोल
GK|कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?|सातारा|जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या धरणाच्या जलाशयाला 'शिवसागर' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते?|ताम्हण (जारूळ)|जांभळ्या रंगाची ही फुले पावसाळ्यात सह्याद्रीत मोठ्या प्रमाणात दिसतात.|निसर्ग
GK|महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?|शेकरू|मोठी उडणारी खार असलेला शेकरू भीमाशंकर अभयारण्यात प्रामुख्याने आढळतो.|वन्यजीव
GK|कास पठार कशासाठी प्रसिद्ध आहे?|रानफुलांच्या बहरासाठी|सातारा जिल्ह्यातील हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ पावसाळ्यानंतर फुलांच्या गालिच्यासाठी ओळखले जाते.|पर्यटन
GK|भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी ओळखले जाते?|शेकरू|पुणे जिल्ह्यातील हे अभयारण्य ज्योतिर्लिंगासाठीही प्रसिद्ध आहे.|वन्यजीव