विलक्षण लोकांचा विलक्षण देश | रायझिंग ड्रॅगन: व्हिएतनाममधील अविस्मरणीय प्रवास अनुभव | Travel Experience in Vietnam in Marathi Part 2

जगातील अनेक देशांनी स्वत: विषयी कुतुहल जागे केले आहे. यात जपानप्रमाणेच व्हिएतनामचाही नंबर आघाडीवर आहे. जागतिक महाशक्ती असलेल्या अमेरिकेला पराभूत करणारा देश अशी या देशाची ओळख आहे. एक मोठा इतिहास आणि हालाँग बे सारखी पर्यटन स्थळे यामुळे विदेश पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. हा लाँग बेमधील जहाजावरील एक दिवस आणि हनोईतील दोन दिवसांच्या वास्तव्यात फ्रांस, स्वित्झर्लंड, झेक रिपब्लिक, अमेरिका,चीन येथून आलेल्या लोकांची भेट झाली.

बँकॉक येथून हनोईला जात असताना विमानात शेजारी बसलेले एडन विल्सन हे तर ब्रिटनहून खास पक्षी निरीक्षणासाठी येथे आले होते. व्हिएतनाम पक्षी निरीक्षणासाठीही जगात प्रसिद्ध आहे हे त्यांच्याकडूनच कळले. शास्त्रज्ञांच्या मते जगात आढळणाऱ्या पक्षांच्या ९००० जातींपैकी ८५० प्रकारचे पक्षी या देशात दिसून येतात. हा लाँंग हे तर पक्षांचे माहेरघरच आहे.

Travel Experience in Vietnam
Travel Experience in Vietnam

जोजो ही चीनी महिला आपल्या दोन मुलांसह खास ‘ तेत त्रंगु थु’ हा उत्सव साजरा करण्यासाठी येथे आली होती. शरद ऋतुतील पौर्णिमेला हा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव खास लहान मुलांसाठी असतो. मकाय आणि हिरोमाशी हे जपानी जोडपे फिरायला आले होते. व्हिएतनाममध्ये तुम्हाला जास्त काय आवडले? सहजच विचारले. यावर त्यांचे उत्तर होते ‘सीफूड’. जपानपेक्षाही येथील सीफूड चविष्ट आहे,असे त्यांचे म्हणणे होते. शाकाहारी लोकांनी मात्र येथील फळांचा आस्वाद घ्यावा. चॉमचॉम, न्यॉ, स्वाय, न्यान,मीत,बुअय अशा नानाविध फळांची चव येथे चाखता आली. टरबुजाला येथे झहयु म्हणतात.

व्हिएतनामी ही या देशाची अधिकृत भाषा असली तरी येथील विविध सम्प्रदायांमध्ये डझनावर वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. आपल्या येथे जसे राज्य बदलले की भाषा आणि संस्कृतीही बदलते तसेच या देशातही आहे. विशेषत: राजधानी हनोईत फिरताना मला आपल्याच देशात असल्यासारखे वाटत होते. रस्त्याच्या मधून जाणारे रेल्वेरुळ, फुटपाथवरील दुकाने, खाद्यपदार्थांचे ठेले आणि त्याच्या सभोवताल छोट्याछोट्या टेबलवर या पदार्थांचा आस्वाद घेत बसलेले खवय्ये.

Culture in Vietnam
Culture in Vietnam

व्हिएतनाममधील मिश्र संस्कृती | Vietnamese Culture in Marathi

या देशाच्या उत्तर, दक्षिण आणि मध्ये प्रांतातील संस्कृतीत फार मोठा फरक आहे.कार्यशाळेत या तीनही प्रांतातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यांच्या माध्यमाने व्हिएतनाममधील मिश्र संस्कृतीचा बऱ्यापैकी परिचय झाला होता. एकाच इंग्रजी शब्दाचे वेगवेगळ्या प्रकारचे उच्चारण ऐकून गंमत वाटत होती. मध्य आणि उत्तरेकडे या भाषा बोलल्या जातात. मेकॉगच्या पट्ट्यात ‘खमेर’ही कंबोडियन भाषा बोलली जाते तर लाओस आणि चीन सीमेलगतच्या क्षेत्रात चीनी भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. व्हिएतनामी लोकांना असलेले विदेशी भाषांचे ज्ञान म्हणजे या देशाचा विदेशी शक्तींसोबत आजवर आलेल्या चांगल्या किंवा वाईट संबंधांचा पुरावाच आहे. या देशातील वयोवृद्ध अजूनही दैनंदिन व्यवहारात फ्रेंच भाषा वापरतात. ट्रॅन थी तु लिअु चे आजोबा फ्रेंचमध्येच बोलतात. तिला मात्र इंग्रजीत पारंगत व्हायचे आहे. हा लाँग उपसागरातील जहाजावरील आमचा गाईड टेडीचे वडील लष्करात जवान होते. फ्रेंचविरुद्धच्या संघर्षात ते सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी ही भाषा कामासाठी शिकून घेतली होती. पुढे ती त्यांच्या अंगवळणी झाली. फ्रांससोबतचा या लोकांचा संबंध अजूनही तुटलेला नाही. आजही काही प्रमाणात फ्रेंच लोक येथे राहतात. बौद्ध धर्म येथे मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास सर्वच पंथांमध्ये या धर्माचे अनुयायी आहेत. हनोईत फिरत असताना सर्वात मोठा आणि जुना पॅगोडा बघण्यात आला. बौद्धविहारांना येथे पॅगोडा म्हणतात. परतीच्या प्रवासाला निघण्याच्या पूर्वसंध्येला थुआंगने मला तिच्या घरी रात्रीच्या जेवणाचे आमंत्रण दिले होते. तीनचार तास या व्हिएतनामी कुटुंबात राहण्याची संधी या निमित्ताने मिळाली होती. थुआंगच्या कुटुंबानेही बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. शाकाहारी असल्याचे समजल्यानंतर तिच्या आईने माझ्यासाठी खास सॉय चे, सूप बिंगो असे काही पदार्थ बनविले होते.


‘इमोशन्स’वरील ती रात्र

कार्यशाळा संपल्यानंतर एक रात्र तरी हा लाँग उपसागरातील पर्यटन जहाजामध्ये राहण्याचा आग्रह येथील माझ्या व्हिएतनामी मित्रमैत्रिणींनी धरला होता. एवढेच नाहीतर माझ्यासाठी बुकिंगही करुन टाकले. ‘इमोशन्स’ नावाच्या या चार मजली जहाजावरील एक दिवसाच्या वास्तव्यात नव्या ओळखी झाल्या होत्या. थुई ही व्हिएतनामी तरुणी तिचा फ्रेंच नवरा पास्कलसोबत येथे आली होती. त्यांचं नुकतच लग्न झालं होतं. दोन आठवडे थुईसोबत राहून पास्कल फ्रान्सला परत जाणार होता. थुईची तिच्या एका फ्रेंच मित्राच्या माध्यमानेच पास्कलसोबत ओळख झाली होती. व्हिएतनामी-फ्रेंच लग्न मोठ्या प्रमाणात होत असल्याचे थुईने सांगितले. आम्ही छोट्या नावेतून बाहेर फिरायला निघालो तेव्हा १८-२० वर्षांची एक व्हिएतनामी तरुणी गोऱ्या गोमट्या लहानग्यासह माझ्यासमोर बसली होती. माझे लक्ष जाताच तिने गोड हसत ‘इंडो इंडो’ म्हणत माझे स्वागत केले. एक लक्षात आलं; येथे कोणाशी ओळख व्हायला वेळ लागत नाही. तुमचे एखाद्या व्यक्तीकडे लक्ष गेले की ती व्यक्ती तुमचे हसून स्वागत करते. नंतर गप्पांमधून कळले की ती तिच्या फ्रेंच पण सावत्र आईसोबत येथे फिरायला आली होती. तिची सख्खी आई व्हिएतनामी होती. परंतु तिच्या वडिलांनी फ्रेंच महिलेसोबत दुसरे लग्न केले होते. पुढील प्रवासात अशी अनेक जोडपी दिसली.

येथील संस्कृतीवर पाश्चिमात्यांचा प्रभाव जाणवत असला तरी व्हिएतनामी लोकांना त्यांच्या मूळ संस्कृतीचा अजिबात विसर पडलेला नाही. प्रथा परंपरांचा पडगा कायम आहे.

हनोईत दोन दिवस पर्यटन स्थळ बघत असताना आमच्या छोट्या बसमध्ये सर्व २४ विदेशी पर्यटक होते. सॅन्डिया, गेली, लिंडा या तिघी चुलत बहिणी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथून आल्या होत्या. आणखीही काही देशात त्या फिरणार होत्या. शिक्षिका असलेली सॅन्डिया तिच्या ११ आणि १३ वर्षांच्या मुलींना वडिलांजवळ सोडून आली होती. स्त्रियांनीही मधूनमधून कौटुंबिक जबाबदारीतून काही दिवस सुटी घेऊन फिरले पाहिजे असे तिचे मत होते. ‘खरेतर राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतात येण्याची माझी खूप इच्छा होती. पुढल्या वेळी सुटीत नक्की भारतातच येईल’,असे ती म्हणाली. तिची चुलत लिंडाचा मित्र हा क्रिकेटप्रेमी आहे. आयपीएलदरम्यान भारतात येण्याची आमची दोघांची योजना असल्याचे तिने सांगितले. या सर्वांनाच भारताबद्दल खूप आकर्षण होते. स्वित्झर्लंडचा जॅक हा वडील व आजोबांसोबत व्हिएतनाम बघायला आला होता. १८ ते २० वर्षाचा हा तरुण मला बघताच लगेच जवळ आला. ‘माझा पण एक मित्र भारतीय आहे. तो मुंबईत राहतो’,अशी ओळख करुन दिली. या बसमधून दोन दिवस फिरताना कुठेही एकटेपणा जाणवला नाही.

व्हिएतनामचा निरोप घेतला तेव्हा मनात विचार आला. कुणाला ठाऊक हे लोक पुन्हा कधी आपल्याला भेटतील का? कुठे भेटतील? कोण कुठले? पण हे ऋणानुबंध मात्र कायम राहतील एवढी खात्री होती.

Ethnic Museum Vietnam
Ethnic Museum Vietnam

इथेनिक म्युझियम: भारतीय आदिवासींची आठवण | Ethnic Museum Vietnam

येथील संस्कृतीवर पाश्चिमात्यांचा प्रभाव जाणवत असला तरी व्हिएतनामी लोकांना त्यांच्या मूळ संस्कृतीचा अजिबात विसर पडलेला नाही. प्रथा परंपरांचा पडगा कायम आहे. हनोईत सेंटर फॉर कम्युनिटी रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंटच्या कार्यालयात गेले असताना सेंटरच्या संचालिका नाय हुआंग यांच्यासोबत इथेनिक म्युझियम बघण्याची संधी मिळाली. या म्युझियममध्ये व्हिएतनाममधील विविध समुदायांच्या संस्कृतेच दर्शन घडले. या देशात एकूण ५४ समुदाय आहेत. येथील ८६ टक्के लोकसंख्या किन्ह (व्हिएत) समुदायाची आहे. इतर समुदाय अल्पसंख्यक असून त्यांची लोकसंख्या १४ टक्के आहे. ऐतिहासिक पुराव्यांनुसार व्हिएत हे येथील मूळ रहिवासी आहेत. इतर वायव्य आशिया क्षेत्रातून येथे आले आहेत. त्यांचे पूर्वज शेकडो वर्षांपूर्वी व्हिएतनाममध्ये स्थलांतरित झाले होते. खमेर, माँग, चाम,पाथेन, पुपिउमो, थाय,थाओयो,लेलो,होआ आदी समुदायांनी आजही आपल्या संस्कृतीची जपणूक केली आहे. या भव्य वस्तुसंग्रहालयातील त्यांची घरे, दैनंदिन वापरातील इतर साहित्य बघितल्यानंतर भारतातील आदिवासी समाज आणि या समुदायांमध्ये बरेचसे साम्य असल्याचे आढळून आले. पारंपारिक वाद्ये भांडी, शस्त्रे सगळे काही सारखेच; फक्त नाव वेगळे. लोककलांचे भंडार येथे आहेत. हे लोक उत्कृष्ट कलाकार आहेत. लाकडी आणि सिरॅमिक भांड्यांवरील त्यांची कलाकुसर जगभरात प्रसिद्ध आहे.

Ethnology Museum, Vietnam

भूतखेतांवर या लोकांचाही प्रचंड विश्वास आहे. तुम्ही तुमच्या नातवाचे आरोग्य कसे चांगले ठेवाल? असा प्रश्न एखाद्या वृद्ध व्हिएतनामी आजोबांना विचारला तर त्यांचे उत्तर एकच असेल. भुतांपासून बचावासाठी आम्ही आमच्या नातवाच्या गळ्यात धागेदोरे बांधले आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या मातेला येथे देवी मानतात. व्हिएतनाममध्ये अशा वेगवेगळ्या अंधश्रद्धा म्हणजे सामाजिक रुढी परंपरांचाच एक भाग आहे. आणि नवीन पिढी सुद्धा त्यांचे अनुकरण करताना दिसते. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी या अंधश्रद्धा म्हणजे फार मोठा अडथळा असतो. भारतातही विशेषत: ग्रामीण भागात रोगोपचारासाठी प्रथम अशाच मार्गाचा अवलंब होताना दिसतो.

अंधश्रद्धेचे अनेक किस्से

ज्योतिष बघण्याची पद्धत येथेही आहे. पत्रिका, कुंडली सगळे आहे. लग्न ठरविताना मुलगी कुठल्या वर्षात जन्मली याला फार महत्व आहे. वर्षांना वेगवेगळी नावं आहेत. वाघांच्या वर्षात जन्मलेला मुलगा घोड्यांच्या वर्षात जन्मलेल्या मुलीसोबत लग्न करु शकत नाही. वाघ आणि घोडा एकत्र आले की वाईट होते,असा या लोकांचा समज आहे. अंधश्रद्धेचे असे अनेक किस्से ऐकायला मिळाले. या देशात झालेल्या बड्या युद्धांमध्ये सुद्धा ज्योतिषाची महत्वाची भूमिका राहिली आहे. असेही सांगितले जाते की एक अमेरिकन कमांडर आपले सैन्य तैनात करण्यापूर्वी नेहमी ज्योतिषाचा सल्ला घेत असे. आपले ग्रह चांगले नसल्याच्या कारणावरुन त्याने एकदा विरोधी पक्षावर हल्ला करण्यास नकार दिला होता. देशातील काही समाज सुधारकांच्या दृष्टीने मात्र ही अंधश्रद्धा म्हणजे व्हिएतनामच्या प्रगतीतील मोठा अडथळा आहे. व्हिएतनामला जर आधुनिक राष्ट्र बनवायचे असेल तर ही अंधश्रद्धा देशातून नामशेष होणे आवश्यक आहे असे त्यांना वाटते.

मागील भाग वाचला नसेल तर तो नक्की वाचा आणि व्हिएतनाम प्रवासाची सुरुवात अनुभवून घ्या!

सविता ‘देव’ हरकरे
मुख्य संपादक
What’s Up मराठी
संपर्क

Comments

✕
🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
आजचा मराठी शब्दआजचा प्रश्न
या शब्दाचा अर्थ काय आहे?तुम्हाला याचे उत्तर माहीत आहे का?
उत्तरासाठी कार्ड उलटा
अर्थउत्तर
उगमअधिक माहिती
समानार्थीश्रेणी
वाक्यात उपयोग
WhatsUp मराठी पुन्हा उलटा
जानेवारी|फेब्रुवारी|मार्च|एप्रिल|मे|जून|जुलै|ऑगस्ट|सप्टेंबर|ऑक्टोबर|नोव्हेंबर|डिसेंबर
WORD|अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
WORD|लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
WORD|नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|डोंगरातील पाणी नितळ आहे.
WORD|तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
WORD|रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
WORD|ओंजळ|दोन्ही हातांचा केलेला कप्पा|देशज मराठी|हातभर|त्याने ओंजळीत पाणी घेतले.
WORD|हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|हळुवार वारा वाहत होता.
WORD|मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|तिचा आवाज मंजुळ आहे.
WORD|मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|पहिल्या सरीनंतर मृद्गंध दरवळला.
WORD|आभाळमाया|असीम, अपार प्रेम|देशज मराठी|अपार माया|आईची आभाळमाया विसरता येत नाही.
WORD|धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|तो संगीतात धुंद झाला.
WORD|झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|संध्याकाळी थंड झुळूक आली.
WORD|नभ|आकाश|संस्कृत|गगन|पहाटे नभ निरभ्र होते.
WORD|उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|त्याला आनंदाचा उमाळा आला.
WORD|साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|ती साजिरी दिसत होती.
WORD|गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
WORD|कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|फटीतून सूर्याचा कवडसा पडला.
WORD|जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
WORD|लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|गाण्याची लय सुंदर होती.
WORD|कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|फुलदाणीत कोमेजलेली फुले दिसत होती.
WORD|दरवळ|पसरणारा मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|चाफ्याचा दरवळ पसरला.
WORD|सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|सावळ्या ढगांनी आकाश भरले.
WORD|सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|तिचा चेहरा सतेज दिसत होता.
WORD|मधुमालती|सुगंधी फुलांची वेल|संस्कृत|फुलवेल|अंगणात मधुमालती फुलली होती.
WORD|गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
WORD|हुरहूर|मनातील अस्वस्थ ओढ|देशज मराठी|व्याकुळता|जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
WORD|निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
WORD|तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
WORD|मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
WORD|लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|दिव्याची ज्योत लवलवत होती.
WORD|उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|तरुणांमध्ये नवी उमेद आहे.
WORD|गोजिरी|नाजूक व सुंदर|देशज मराठी|साजिरी|गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
WORD|मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|आंब्याला मोहोर आला आहे.
WORD|अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|गावचा चहा अमृततुल्य लागतो.
WORD|झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|मंदिरातील घंटांचा झंकार झाला.
WORD|सहजसुंदर|नैसर्गिकरीत्या सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
WORD|आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|पहाटेचा आसमंत शांत होता.
WORD|सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
WORD|निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|डोंगरातून निर्झर वाहत होता.
WORD|नादमय|संगीताने भरलेला|संस्कृत|सुरेल|सभागृह नादमय झाले.
WORD|मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
WORD|स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|संगीताचे स्पंदन जाणवत होते.
WORD|चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
WORD|मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|मृदुल वाळूवर पावले उमटली.
WORD|अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|ती अलवार हसली.
WORD|स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|पक्षी स्वैर उडत होते.
WORD|सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|फुलांची सुरभि दरवळली.
WORD|दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|तिच्या डोळ्यांत वेगळीच दीप्ती होती.
WORD|प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|अंगणात प्राजक्त फुलला होता.
WORD|निरभ्र|ढगविरहित, पूर्ण स्वच्छ|संस्कृत|स्वच्छ|निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?|रायगड|६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातून वाहणारी सर्वात लांब नदी कोणती?|गोदावरी|त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे उगम पावणारी गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी असून तिला 'दक्षिण गंगा' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली?|१ मे १९६०|संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये अस्तित्वात आली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?|कळसूबाई|अहिल्यानगर जिल्ह्यातील हे शिखर सुमारे १,६४६ मीटर उंच असून ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे.|भूगोल
GK|संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' कोणत्या गावी लिहिली?|नेवासे|अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथे भगवद्गीतेवरील ही मराठी टीका लिहिली गेली.|संस्कृती
GK|लोणार सरोवर कशामुळे तयार झाले?|उल्कापातामुळे|बुलढाणा जिल्ह्यातील हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बेसाल्ट खडकात उल्का आदळून तयार झालेले जगातील दुर्मीळ सरोवर आहे.|भूगोल
GK|तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला?|सिंहगड (कोंढाणा)|१६७० मधील या लढाईत तानाजी धारातीर्थी पडले; 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार प्रसिद्ध आहेत.|इतिहास
GK|अफझलखानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला?|प्रतापगड|१६५९ मध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाजवळ ही ऐतिहासिक भेट व संघर्ष घडला.|इतिहास
GK|मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?|दर्पण|बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये 'दर्पण' सुरू केले; त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक मानले जाते.|संस्कृती
GK|'केसरी' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?|लोकमान्य बाळ गंगाधर टिळक|१८८१ मध्ये मराठीतून 'केसरी' आणि इंग्रजीतून 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू झाली.|इतिहास
GK|'सत्यशोधक समाज' कोणी स्थापन केला?|महात्मा जोतिराव फुले|२४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात स्थापन झालेली ही संस्था सामाजिक समतेसाठी कार्यरत होती.|इतिहास
GK|'श्यामची आई' या पुस्तकाचे लेखक कोण?|साने गुरुजी|पांडुरंग सदाशिव साने यांनी नाशिकच्या कारागृहात हे पुस्तक लिहिले.|साहित्य
GK|'नटसम्राट' या गाजलेल्या नाटकाचे लेखक कोण?|वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)|कुसुमाग्रजांना १९८७ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.|साहित्य
GK|मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा होतो?|२७ फेब्रुवारी|कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.|संस्कृती
GK|वेरूळ येथील कैलास लेणे कोणत्या राजवटीत कोरले गेले?|राष्ट्रकूट|एकाच अखंड खडकात वरून खाली कोरलेले हे मंदिर जगातील स्थापत्यशास्त्रीय आश्चर्य मानले जाते.|इतिहास
GK|अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?|छत्रपती संभाजीनगर|बौद्ध चित्रकला व शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेली ही लेणी युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहेत.|पर्यटन
GK|एलिफंटा लेणी कोणत्या देवतेला समर्पित आहेत?|शिव|मुंबईजवळील घारापुरी बेटावरील त्रिमूर्ती शिल्प जगप्रसिद्ध आहे.|पर्यटन
GK|महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत?|पाच|भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ — बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत.|संस्कृती
GK|अष्टविनायक म्हणजे किती गणपती मंदिरे?|आठ|पुणे, रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विखुरलेली ही आठ स्वयंभू गणपती मंदिरे आहेत.|संस्कृती
GK|कृष्णा नदीचा उगम कोठे होतो?|महाबळेश्वर|सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्या उगम पावतात.|भूगोल
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?|शिवनेरी|पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या या किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी त्यांचा जन्म झाला.|इतिहास
GK|संत तुकाराम महाराजांचे गाव कोणते?|देहू|पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीकाठचे देहू हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.|संस्कृती
GK|संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?|आळंदी|पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली.|संस्कृती
GK|सेवाग्राम आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?|वर्धा|महात्मा गांधींनी १९३६ मध्ये येथे वास्तव्य सुरू केले; हे स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्वाचे केंद्र ठरले.|इतिहास
GK|पवनार आश्रम कोणाशी संबंधित आहे?|आचार्य विनोबा भावे|वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून विनोबांनी भूदान चळवळीचे कार्य केले.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते?|ताडोबा|चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा १९५५ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झाले; पुढे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तयार झाला.|वन्यजीव
GK|'संत्रानगरी' म्हणून कोणते शहर ओळखले जाते?|नागपूर|संत्र्यांच्या व्यापारामुळे मिळालेले हे नाव; नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.|भूगोल
GK|महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणते शहर मानले जाते?|पुणे|शिक्षण, साहित्य, नाट्य आणि संगीत परंपरेमुळे पुण्याला हे स्थान मिळाले आहे.|संस्कृती
GK|रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते?|रायरी|शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केली.|इतिहास
GK|पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?|१७६१|मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यातील या लढाईचा मराठा साम्राज्यावर मोठा परिणाम झाला.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेचे नाव काय?|जिजाबाई|जिजाऊंनी शिवरायांवर स्वराज्याचे संस्कार केले; त्यांना राजमाता म्हणून ओळखले जाते.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळ घोषित झाले?|२००४|व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतील ही वास्तू मुंबईचे प्रतीक मानली जाते.|पर्यटन
GK|गेट वे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे?|मुंबई|१९२४ मध्ये पूर्ण झालेली ही वास्तू अरबी समुद्राच्या काठी उभी आहे.|पर्यटन
GK|'लोकहितवादी' या टोपणनावाने कोण लेखन करत असत?|गोपाळ हरी देशमुख|त्यांच्या 'शतपत्रे' या लेखमालेने एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारणेला दिशा दिली.|साहित्य
GK|मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?|वि. स. खांडेकर|'ययाति' या कादंबरीसाठी १९७४ मध्ये त्यांना हा सन्मान मिळाला.|साहित्य
GK|जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?|गोदावरी|छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या धरणाच्या जलाशयाला 'नाथसागर' म्हणतात.|भूगोल
GK|कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?|सातारा|जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या धरणाच्या जलाशयाला 'शिवसागर' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते?|ताम्हण (जारूळ)|जांभळ्या रंगाची ही फुले पावसाळ्यात सह्याद्रीत मोठ्या प्रमाणात दिसतात.|निसर्ग
GK|महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?|शेकरू|मोठी उडणारी खार असलेला शेकरू भीमाशंकर अभयारण्यात प्रामुख्याने आढळतो.|वन्यजीव
GK|कास पठार कशासाठी प्रसिद्ध आहे?|रानफुलांच्या बहरासाठी|सातारा जिल्ह्यातील हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ पावसाळ्यानंतर फुलांच्या गालिच्यासाठी ओळखले जाते.|पर्यटन
GK|भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी ओळखले जाते?|शेकरू|पुणे जिल्ह्यातील हे अभयारण्य ज्योतिर्लिंगासाठीही प्रसिद्ध आहे.|वन्यजीव

अजून इंटरेस्टिंग...

अंबामातेच्या नगरीची रोमांचक सफर | Ambadevi Mata Amravati | Author: Parijaat | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism

फाहियान : भारतातील बौद्ध वारसा शोधणारा प्रवासी | Fa-Hien and His Journey Through India | Travellers of the World

एकदा तरी अनुभवावे रवीन्द्रनाथांचे शांतिनिकेतन | Arundhati Deshmukh | Shantiniketan Experience in Marathi

दुष्काळाच्या पलीकडचा मराठवाडा: पावसाळ्यात खुलणारे अनोखे पर्यटनविश्व | Author: Dr. Mrunalini Fadnavis | Marathwada Tourism | Maharashtra Tourism

मार्को पोलो : आशियाकडे जाणारा मध्ययुगीन प्रवासी | Marco Polo Travel | Travellers of the World

"ईडा-पीडा, रोगराई, घेऊन जा गे मारबत!" | Marbats of Nagpur | Tourism in Vidarbha | Maharashtra Tourism

सेवाग्राम: केवळ भूतकाळाचा वारसा नाही, तर वर्तमानासाठीचा आरसा | Sevagram Ashram, Wardha | Heritage Tourism | Tourism in Vidarbha | Maharashtra Tourism

कौंडण्यपूर : श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाहाचे साक्षीदार | Kaundanyapur Travel Guide | Temples in Maharashtra

चला, नागपुरातील पर्यटनस्थळांची सैर करायला! | Tourist Spots in Nagpur, Vidarbha, Maharashtra | Nagpur Travel Guide

नागपूर - प्राचीन मंदिर पर्यटनाचा हब | Temples near Nagpur | Temples of Vidarbha