सोमनाथच्या साक्षीने... एक संस्मरणीय प्रवास: भाग २ | Author: Mrs. Manik Joshi | Somnath Temple Experience | Heritage Tourism | Incredible India

काही प्रवास फक्त नकाशावरची ठिकाणे बदलत नाहीत, तर मनातली अनेक दारे उघडतात. श्रद्धेच्या वाटेवरून चालताना द्वारकाधीशांच्या चरणी मिळालेली शांतता, सोमनाथच्या सागरगर्जनेत अनुभवलेली शिवभक्ती, दीवच्या निसर्गसौंदर्याने दिलेला आनंद, गिरच्या जंगलात झालेले सिंहदर्शन आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीसमोर उभे राहून जाणवलेली राष्ट्रएकतेची भव्यता! या सगळ्यांनी हा प्रवास अविस्मरणीय करून टाकला. त्यात गरुडेश्वरच्या नर्मदातीरी लाभलेली आध्यात्मिक अनुभूती आणि मित्रमंडळींच्या सहवासातील हास्य-विनोदाने या सहलीला आणखी एक सुंदर किनार लाभली. द्वारका–सोमनाथ–दीव–गिर अभयारण्य–स्टॅच्यू ऑफ युनिटी–गरुडेश्वर असा हा प्रवास म्हणजे श्रद्धा, निसर्ग, इतिहास, संस्कृती आणि मैत्री यांचा सुंदर संगमच… पाच दिवसांच्या या सहलीने शरीराला ऊर्जा तर मिळालीच, शिवाय मनही आठवणींच्या समृद्ध ठेव्याने भरून टाकले.

Somnath Temple

शंभूमहादेवाच्या चरणी… आणि अरबी समुद्राच्या सान्निध्यात

२२ जुलैला संध्याकाळी सात वाजताच्या रेल्वेने आम्ही सोमनाथकडे निघालो. मनात उत्सुकता होती. पुढील दोन दिवसांत काय काय अनुभवायला मिळणार याची कल्पना नव्हती. प्रवास सुरू झाला आणि सोबत होती ती श्रद्धा, उत्सुकता आणि नव्या ठिकाणांना अनुभवण्याची ओढ.

२३ जुलै २०२६, गुरुवारी पहाटे पाच वाजता गाडी वेरावळ स्टेशनला पोहोचली. हॉटेलचे ऑनलाइन बुकिंग केले होते; मात्र परिसराची फारशी कल्पना नसल्याने हॉटेल थोडे बाहेरच्या बाजूला मिळाले होते. पहाटेची वेळ असल्यामुळे थोडी गैरसोय झाली. दोन फॅमिलींसाठी एकच खोली मिळाली. मग काय! चौघांनीही आपापले आवरून घेतले आणि सोमनाथ मंदिराच्या दर्शनासाठी बाहेर पडलो. हॉटेल हायवेवर असल्याने आता वाहन कसे मिळणार, हा विचार मनात येत असतानाच एक टॅक्सी अगदी पुढ्यात येऊन उभी राहिली. जणू आमच्या प्रवासाची सोयच परमेश्वराने करून ठेवली होती! त्या एका टॅक्सीमुळे पुढील दोन दिवसांची वाहतुकीची सोय अगदी सहज झाली.

सोमनाथ दर्शन - श्रद्धेचा आणि समाधानाचा क्षण

सोमनाथ मंदिरापासून साधारण दीड-दोन किलोमीटर आधी टॅक्सी सोडून पुढे पायी जावे लागते. भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग मानले जाणारे सोमनाथ मंदिर अरबी समुद्राच्या काठावर वसले आहे. कपिला, हिरण आणि सरस्वती या तीन नद्यांचा त्रिवेणी संगमही या पवित्र भूमीत होतो. सरदार पटेलांच्या प्रेरणेने १९५१ मध्ये मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली. चालुक्य अर्थात मारू-गुर्जर स्थापत्यशैलीतील या भव्य मंदिराची रचना पाहताना मन थक्क होते.

 ज्योतिर्लिंग

१. बाणस्तंभ - मंदिराच्या समुद्राकडील भिंतीवर असलेला बाणस्तंभ विशेष लक्ष वेधून घेतो. त्यावर दक्षिण ध्रुवापर्यंत कोणताही भूभाग मध्ये येत नसल्याचे संस्कृतमध्ये नमूद केले आहे. समुद्राकडे पाहताना या स्तंभाचे महत्त्व आणखी प्रकर्षाने जाणवते.

२. लाईट ॲण्ड साऊंड शो - रात्रीच्या अंधारात सोमनाथचा इतिहास सांगणारा प्रकाश आणि ध्वनी कार्यक्रमही पाहण्याची इच्छा होती. मात्र आमच्या भेटीच्या वेळी रिमझिम पाऊस सुरू असल्याने कार्यक्रम झाला नाही. काही अनुभव अपूर्ण राहतात; पण त्यामुळे पुढच्या भेटीची ओढ मात्र अधिक वाढते.

3. मंदिराचा परिसर - स्वच्छता आणि सुरक्षाव्यवस्था विशेष जाणवली. पण सगळ्यात महत्त्वाचा क्षण म्हणजे शंभूमहादेवाचे दर्शन घेताना डाव्या बाजूला दिसणारा उसळता अरबी समुद्र! गाभाऱ्यात आम्ही पोहोचलो तेव्हा सकाळी अकराची वेळ होती. नुकतीच पूजा झालेली होती. शिवलिंगावर उठून दिसणारे त्रिपुंड, मंदिरातील पवित्र वातावरण आणि समोरचे शिवरूप पाहताना मन अक्षरशः भरून आले. पवित्रता म्हणजे काय, याचा अंशात्मक का होईना अर्थ कळला. त्यात समाधानकारक दर्शनाचा आनंद खूप निखळ असतो. डोळेभरून शंकराचे ते रुप मनांत साठवले. सोमनाथ मंदिराच्या आजूबाजूचा परिसर व प्रेक्षणीय त्रिवेणी संगम घाट: मंदिराजवळच हिरण, कपिला व सरस्वती या तीन नद्यांचा संगम होतो, जिथे स्नान व पितृतर्पण केले जाते.

भालकातीर्थ- श्रीकृष्णांच्या निर्वाणभूमीचा आध्यात्मिक स्पर्श

भालकातीर्थ

हे सोमनाथपासून 3 किलोमीटरवर आहे. श्रीकृष्णांनी देहत्याग केलेली जागा म्हणून याला खूप महत्व आहे. पौराणिक कथेनुसार, महाभारत युद्धानंतर श्रीकृष्ण द्वारका सोडून प्रभास क्षेत्रात आले. इथे बाणासुर नावाच्या शिकाऱ्याने झाडाखाली ध्यान करत असलेल्या श्रीकृष्णांच्या पायाला हरीण समजून बाण मारला. हाच तो बाण लागलेला पायाचा अंगठा - त्याच जागेला "भालकातीर्थ" म्हणतात. इथेच श्रीकृष्णांनी आपला देह त्यागला आणि वैकुंठाला गमन केले. म्हणून याला *"श्रीकृष्ण निर्वाण स्थळ" असेही म्हणतात.

भालकातीर्थला ‘भालका स्तंभ’ आहे. ज्या झाडाखाली श्रीकृष्ण बसले होते त्या जागी पांढरा संगमरवरी स्तंभ आहे. त्यावर बाण लागल्याचे चिन्ह आहे. झाडाखाली ध्यानस्थ श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती आहे. एकदम शांत आणि रम्य परिसर आहे.

सोमनाथ, भालकातीर्थ आणि त्रिवेणी संगम ही तिन्ही एकाच दिवशी बघता येतात.

पोशाख: भारतीय संस्कृतीनुसार मंदिरात जाताना पारंपरिक आणि सभ्य कपडे घालावेत, हा नियम इथेही अपेक्षित आहे.

Somnath Temple

गीता मंदिर

सोमनाथ मंदिरापासून १ ते २ किलोमीटरवर असलेले गीता मंदिर हे भगवान श्रीकृष्णाला समर्पित एक पवित्र आणि सुंदर मंदिर आहे. हे मंदिर १९७० मध्ये बिर्ला ग्रुपद्वारे बांधले गेले असून येथील भगवद्गीतेच्या वचनांच्या कोरीवकामासाठी प्रसिद्ध आहे.

मंदिराचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे मंदिरात एकूण १८ खांब आहेत आणि प्रत्येक खांबावर भगवद्गीतेचा एक संपूर्ण अध्याय कोरलेला आहे. मंदिराच्या भिंतींवर भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रसंगांची सुंदर चित्रे काढलेली आहेत. याच परिसरात लक्ष्मीनारायण मंदिर, नरसिंह मंदिर आणि हनुमान मंदिरही आहे. हा संपूर्ण परिसर खूपच सुंदर आहे.

बाणगंगा

बाणगंगा

नंतर आलो ते बाणगंगा या ठिकाणी. सोमनाथजवळील पवित्र तीर्थ बाणेश्वर हे गुजरात, सोमनाथ मंदिरापासून १ किमी अंतरावर आहे. गीता मंदिर आणि त्रिवेणी संगमच्या रस्त्यावरच लागते. सोमनाथ बीचपासून पण जवळ आहे. या स्थानाचे पौराणिक महत्व म्हणजे बाणगंगेची ही कथा श्रीकृष्णाच्या निर्वाणाशी जोडलेली आहे. जेव्हा शिकारी 'जराने 'श्रीकृष्णांच्या पायाला बाण मारला, तेव्हा श्रीकृष्ण जखमी झाले. त्यांना खूप तहान लागली होती. तेव्हा श्रीकृष्णांनी स्वतः च्या बाणाने जमिनीवर वार केला आणि तिथून गंगेचे पाणी वर आले. त्याच जागेला "बाणगंगा" म्हणतात. ‘बाणाने निर्माण झालेली गंगा’ म्हणून हे नाव पडले. अशी मान्यता आहे की, इथले पाणी पिल्याने आणि स्नान केल्याने सगळी पापे नष्ट होतात. याला "पाताळगंगा" असेही म्हणतात.

बाणगंगेत काय आहे? | What is Banganga?

कुंड: एक मोठा चौकोनी पाण्याचा कुंड/तलाव आहे. पाणी नेहमी स्वच्छ असते.

श्रीकृष्ण मंदिर: कुंडाच्या काठावर श्रीकृष्णाची लहान मूर्ती आहे. इथे भक्त दिवा लावतात. काही ठिकाणी श्रीकृष्णांनी बाण मारल्याचे प्रतीक दाखवले आहे. खूप शांत आणि पवित्र जागा आहे. भाविक इथे बसून ध्यान करतात. सोमनाथला येणारा प्रत्येक भाविक या स्थानाचे दर्शन घेतोच.

मिनी गोवा ‘दीव’

इथून ८० किलोमीटरवर असलेल्या 'दीव ' या ठिकाणी गेलो, याला मिनी गोवा असेही म्हणतात. निसर्ग सौंदर्याचा पुरेपूर खजिना असलेले हे ठिकाण पर्यटकांचे मन जिंकून घेते. पोर्तुगीजांनी बराच काळ येथे घालवला होता. इथल्या बांधकामात,वातावरणात,संस्कृतीत त्यांची एक प्रकारची छाप दिसून येते. पहिले गेलो ते आयनेस कुकरी शीप म्युझियमला. बाहेरुन त्या बोटीची भव्यता कळत होती. पण प्रवेश बंद असल्याने आतून बघायला मिळाली नाही. नंतर गेलो ते "दीव फोर्ट "ला. मस्त गाडीची सोय आहे. वरपर्यंत जाण्यास अगदी थोड्याच पायऱ्या चढाव्या लागल्या. उंचीवरून जो आजूबाजूचा परिसर दिसतो, तो म्हणजे अहाहा ! काय वर्णन करावे, शब्द अपुरे आहेत,त्या निसर्गसौंदर्यापुढे! खूप खूप फोटो काढलेत इथे. संपूर्ण किल्ल्याची निगा उत्तम रितीने राखली आहे. मनं प्रसन्न होते इथे येऊन..

दीव फोर्ट


मग आलो ते - गंगेश्वर महादेवला - अतिशय सुंदर स्थान

महादेवाच्या पाच पिंडी येथे आहे. पांडवांनी येथे वास्तव्य केले होते, असे म्हणतात. या पाचही पिंडीपर्यंत समुद्राच्या लाटा येतात. प्रत्यक्ष लाटा आम्ही इथे अनुभवल्या. अतिशय सुखद अनुभव होता हा. प्रत्येक वेळेस निसर्गाचे भन्नाट, वेगळेपण अनुभवायला खूप आवडले. निसर्ग आपल्याला खूप काही शिकवून जातो .

दीवमध्येच एक मोठा चर्च आहे. वेळेअभावी तो मात्र बाहेरूनच बघितला. नंतर मात्र पोटोबा करुन
गेलो नागाव बीचला. इथल्या समुद्राची खासियत म्हणजे किनारा खूप मोठा नाही. समुद्र किनारा म्हटला की, कोकणचा आठवतो. असे किनारे इथे पाहायला मिळाले नाहीत. मोठे खडकाळ असे किनारे इथे आहेत, जिथे जायची आपल्याला भीती वाटते. संध्याकाळपर्यंत सोमनाथला परत आलो.

गंगेश्वर महादेव

जुने सोमनाथ मंदिर

२४ जुलै २०२६, शुक्रवार. सकाळीच आवरून जुने सोमनाथ मंदिरात दर्शनाला गेलो. इथे आत गाभाऱ्यातही प्रवेश आहे. इथे पूर्ण इतिहास चित्ररुपाने पहावयास मिळतो.

इंदूरच्या होळकर घराण्याच्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इ.स. १७८३ मध्ये सोमनाथ मंदिराचे पुनर्वसन (पुनर्बांधणी) केले. मुघल सम्राट औरंगजेबाने मूळ मंदिर उद्ध्वस्त केल्यानंतर भाविकांना सुरक्षितपणे पूजा करता यावी म्हणून त्यांनी मूळ मंदिराच्या जवळच एक नवीन मंदिर बांधले. हे मंदिर शत्रूंच्या हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी त्याचे मुख्य ज्योतिर्लिंग जमिनीखाली (भुयाऱ्यात) सुरक्षितपणे स्थापन करण्यात आले होते. अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले हे मंदिर आज 'जुने सोमनाथ मंदिर' किंवा 'अहिल्याबाई मंदिर' म्हणून ओळखले जाते. हे सध्याच्या मुख्य भव्य मंदिरापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर स्थित आहे. सांस्कृतिक वारसाही जपला. त्यांनी केवळ मंदिर बांधले नाही, तर मंदिराच्या आवारात सिंहद्वार आणि धार्मिक विधींसाठी उत्तम सोयी-सुविधा देखील निर्माण केल्या. ज्यामुळे कठीण काळातही सोमनाथची शिवपूजा परंपरा अखंड सुरू राहिली.

या दोन दिवसांच्या प्रवासात आम्ही केवळ काही पर्यटनस्थळे पाहिली नाहीत; तर श्रद्धा, इतिहास, निसर्ग आणि संस्कृती यांचा एक अद्भुत संगम अनुभवला.सोमनाथमध्ये महादेवाच्या दर्शनाचे समाधान मिळाले, भालकातीर्थात श्रीकृष्णांच्या निर्वाणभूमीची शांतता अनुभवली, गीता मंदिरात गीतेचा संदेश जाणवला, बाणगंगेत पौराणिक श्रद्धेचा स्पर्श झाला आणि दीवमध्ये समुद्र, किल्ले, खडक आणि निसर्गाचे मनोहारी रूप अनुभवले.कधी टॅक्सी अचानक मिळाली, कधी पावसामुळे कार्यक्रम हुकला, तर कधी समुद्राच्या लाटांनी महादेवाच्या पिंडींना स्पर्श करताना पाहिले. प्रवासातील प्रत्येक क्षणाने एक वेगळी आठवण दिली.  


सिंह, सरदार आणि सद्गुरूंच्या सान्निध्यात…

Gir Lions

परत एकदा सोमनाथ दर्शन करुन "गिर अभयारण्य" पाहण्यास निघालो. जवळ -जवळ दीड तासाचा रस्ता आहे. पहिली सफारी १२ वाजता असते. साधारण पाऊण तासाची सफारी असते. गुजरात सरकारने ठिकठिकाणी सोयी खूप चांगल्या केलेल्या आहेत. बसेस ठेवलेल्या आहेत. पोहचल्यावर १० मिनिटातच बस आली. जंगलात प्रवेश करुन ८-१० मिनिटे झाली असतील, तर दिसले ना ! सगळ्यांना जय-विरु एका कडेला दोघही शांतपणे बसले होते, सिंहाचा रुबाब कुठेच नव्हता, जीवन जगून झाल्याची शांतता मात्र नक्कीच होती.
Gir Forest

मोर, लांडोर, हरणे नीलगायी असे अनेक पशु-पक्षी पहावयास मिळाले. एका मोठ्या बंदिस्त गोलाकारात ५ चित्त्यांचे दर्शन झाले. त्यातील एक तर झाडावर वरच्या टोकावर असा बसला होता की, जणू काही आता उंच झेप घेणार! प्राण्यांचे इतक सहजगत्या दिसणे आनंददायी बाब असते.संपूर्ण सफारी ही खूपच रोमांचकारी ठरली.

'स्टॅचू ऑफ युनिटी’ | Statue of Unity Gujarat

त्याच रात्री बडोदरासाठी आमची ट्रेन होती. आणि २५ जुलै २०२६ शनिवारी सकाळी ७.३० ला बडोदरा स्टेशनवरून एकतानगरला आलो. इथे आमचे अजून काही मित्रमंडळी जॉईन झाले .

यादिवशी आषाढी एकादशी असल्याने सगळ्यांचाच उपवास होता. अहमदाबादच्या एका मैत्रिणीने उपवासाचे सगळे पदार्थ आणले होते. एकादशी -दुप्पट खाशी झाली... नंतर निघालो ते 'स्टॅचू ऑफ युनिटीला'. हा प्रवास सगळ्यात आनंददायी होता. एका कारमध्ये सगळे पुरुष मित्र एकीकडे सगळ्या मैत्रिणी मस्त धमाल करत, स्टॅचू ऑफ युनिटीला पोहचलो.

Statue of Unity

"स्टॅच्यू ऑफ युनिटी" हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. गुजरात राज्यातील नर्मदा नदीकाठावर उभारलेला हा १८२ मीटर (५९७ फूट) उंच पुतळा भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित आहे. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी याचे लोकार्पण झाले.

सरदार सरोवर धरणाजवळ उभारण्यात आलेल्या या भव्य पुतळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भारतातील प्रसिद्ध आणि मूळचे महाराष्ट्रीयन शिल्पकार राम व्ही. सुतार यांनी हा पुतळा साकारला आहे.

स्वतंत्र भारताच्या निर्मितीत व ५६२ संस्थानांच्या विलीनीकरणात सरदार पटेलांचे योगदान अतुलनीय होते. या एकतेचा पुतळा प्रकल्पासाठी देशातील लाखो गावांमधील शेतकऱ्यांकडून लोखंड गोळा करण्यात आले होते. पर्यटकांसाठी येथे व्ह्यूईंग गॅलरी, संग्रहालय, वॅली ऑफ फ्लॉवर्स आणि जंगल सफारीसारखी अनेक आकर्षणे आहेत.

लिफ्ट आणि व्ह्यूईंग गॅलरी (Viewing Gallery)
  • हाय-स्पीड लिफ्ट: पुतळ्याच्या आत अतिशय वेगवान (High-speed) लिफ्ट्स आहेत.
  • ३० सेकंदांचा प्रवास: या लिफ्ट अवघ्या ३० सेकंदात पर्यटकांना वर घेऊन जातात.
  • १५३ मीटर उंचीवर गॅलरी: लिफ्टद्वारे पर्यटक सरदार पटेलांच्या छातीच्या भागात असलेल्या व्ह्यूईंग गॅलरीपर्यंत पोहोचू शकतात.
या गॅलरीमध्ये एकाच वेळी २०० पर्यटक उभे राहून परिसर पाहू शकतात.नयनरम्य दृश्य येथून नर्मदा नदी, सरदार सरोवर धरण आणि सातपुडा-विंध्य पर्वत रांगांचे विहंगम दृश्य दिसते. पुतळ्याच्या पायाशी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित एक मोठे आधुनिक संग्रहालय आहे. संध्याकाळी पुतळ्यावर एक अप्रतिम लेझर शो होतो, ज्यामध्ये भारताच्या एकतेचा इतिहास दाखवला जातो. इथल्या परिसराची भव्यता, आधुनिक सोयी, पर्यटकांचा केलेला विचार हे सगळे पाहून मन भारावून जाते. प्रत्येक भारतीयाने इथला अनुभव अवश्य घ्यावा.

आमच्या सहलीतील शेवटचा दिवस २६ जुलै २०२६ रविवार

सकाळीच कॅक्टस पार्कमध्ये गेलो. विविध प्रकारचे कॅक्टस पाहायला मिळाले. इयत्ता १० वीला एक पाठ आहे ,"जगणं कॅक्टसचं". इथून पुढे हा पाठ शिकवताना या पार्कच उदाहरण द्यायचे मनात पक्के ठरवलेयं. कमलम् पार्क बंद असल्याने आत जाता आले नाही. परत येऊन नाश्ता करुन निघालो ते गरुडेश्वरला.

श्री क्षेत्र गरुडेश्वर


श्री क्षेत्र गरुडेश्वर हे गुजरातमधील नर्मदा नदीच्या पवित्र काठावर वसलेले दत्त संप्रदायाचे एक अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. हे स्थान प्रामुख्याने प.प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज (टेंबे स्वामी) यांचे समाधी स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. नर्मदानदी, प्रसिद्ध 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' (Statue of Unity) येथून अगदी जवळ आहे.

दत्त संप्रदायाचे थोर संत प.प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या आयुष्यातील शेवटचा काळ येथे व्यतीत केला. त्यांनी १९१४ मध्ये (आषाढ शुद्ध प्रतिपदेला) येथेच नर्मदा किनारी 'संजीवन समाधी' घेतली. गरुडेश्वराचे मूळ मंदिर हे भगवान शिवाचे आहे. पुराणातील कथेनुसार, गरुडाने येथे तपश्चर्या केली होती, म्हणून या स्थानाला 'गरुडेश्वर' हे नाव पडले. समाधी स्थळाजवळच भव्य आणि सुंदर दत्तमंदिर बांधलेले आहे. इथे रोज धार्मिक विधी, पूजा आणि आरती केली जाते. राहण्याची व जेवणाची सोय आहे. श्री दत्त संस्थान गरुडेश्वरतर्फे भक्तांसाठी महाप्रसाद असतो, मंदिरात दररोज दुपारच्या वेळी भक्तांसाठी अन्नछत्र (महाप्रसाद) चालवले जाते.

दत्त मंदिरात बसून 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ चा जप करुन मनाला शांतता मिळाली. मंदिरातील उर्जा निश्चितच जाणवते. नंतर आलो ते बडोदऱ्याच्या मार्केटमध्ये. बंधेज साड्यांची दुकाने पाहिलीत. थोडीफार खरेदी केली आणि सासू-मां या रेस्टॉरंटमध्ये मस्त गुजराती जेवणाचा आस्वाद घेतला... वेगळे पदार्थ,चव आपल्याला नेहमीच आनंद देतात. जेवण खूप चवदार होते.

इथून सगळ्यांचेच परतीचे प्रवास होते. वेगळ्याच विश्वात होतो पाच दिवस. दैनंदिन जीवनात परतायचा कंटाळाच आला होता, पण इलाज काहीच नव्हता... संस्मरणीय अशी ही द्वारका-सोमनाथ-दीव-गिर-स्टॅचू ऑफ युनिटी-गरुडेश्वर ची सहल ठरली.

तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️

सौ. माणिक प्रशांत जोशी
लेखक
पुणे

Comments

Post a Comment

🌍✍️ तुमचं मत नक्की कळवा. तुमची ओळख न सांगताही तुमचा अभिप्राय देऊ शकता.

✕
🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
आजचा मराठी शब्दआजचा प्रश्न
या शब्दाचा अर्थ काय आहे?तुम्हाला याचे उत्तर माहीत आहे का?
उत्तरासाठी कार्ड उलटा
अर्थउत्तर
उगमअधिक माहिती
समानार्थीश्रेणी
वाक्यात उपयोग
WhatsUp मराठी पुन्हा उलटा
जानेवारी|फेब्रुवारी|मार्च|एप्रिल|मे|जून|जुलै|ऑगस्ट|सप्टेंबर|ऑक्टोबर|नोव्हेंबर|डिसेंबर
WORD|अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
WORD|लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
WORD|नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|डोंगरातील पाणी नितळ आहे.
WORD|तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
WORD|रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
WORD|ओंजळ|दोन्ही हातांचा केलेला कप्पा|देशज मराठी|हातभर|त्याने ओंजळीत पाणी घेतले.
WORD|हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|हळुवार वारा वाहत होता.
WORD|मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|तिचा आवाज मंजुळ आहे.
WORD|मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|पहिल्या सरीनंतर मृद्गंध दरवळला.
WORD|आभाळमाया|असीम, अपार प्रेम|देशज मराठी|अपार माया|आईची आभाळमाया विसरता येत नाही.
WORD|धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|तो संगीतात धुंद झाला.
WORD|झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|संध्याकाळी थंड झुळूक आली.
WORD|नभ|आकाश|संस्कृत|गगन|पहाटे नभ निरभ्र होते.
WORD|उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|त्याला आनंदाचा उमाळा आला.
WORD|साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|ती साजिरी दिसत होती.
WORD|गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
WORD|कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|फटीतून सूर्याचा कवडसा पडला.
WORD|जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
WORD|लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|गाण्याची लय सुंदर होती.
WORD|कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|फुलदाणीत कोमेजलेली फुले दिसत होती.
WORD|दरवळ|पसरणारा मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|चाफ्याचा दरवळ पसरला.
WORD|सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|सावळ्या ढगांनी आकाश भरले.
WORD|सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|तिचा चेहरा सतेज दिसत होता.
WORD|मधुमालती|सुगंधी फुलांची वेल|संस्कृत|फुलवेल|अंगणात मधुमालती फुलली होती.
WORD|गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
WORD|हुरहूर|मनातील अस्वस्थ ओढ|देशज मराठी|व्याकुळता|जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
WORD|निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
WORD|तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
WORD|मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
WORD|लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|दिव्याची ज्योत लवलवत होती.
WORD|उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|तरुणांमध्ये नवी उमेद आहे.
WORD|गोजिरी|नाजूक व सुंदर|देशज मराठी|साजिरी|गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
WORD|मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|आंब्याला मोहोर आला आहे.
WORD|अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|गावचा चहा अमृततुल्य लागतो.
WORD|झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|मंदिरातील घंटांचा झंकार झाला.
WORD|सहजसुंदर|नैसर्गिकरीत्या सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
WORD|आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|पहाटेचा आसमंत शांत होता.
WORD|सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
WORD|निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|डोंगरातून निर्झर वाहत होता.
WORD|नादमय|संगीताने भरलेला|संस्कृत|सुरेल|सभागृह नादमय झाले.
WORD|मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
WORD|स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|संगीताचे स्पंदन जाणवत होते.
WORD|चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
WORD|मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|मृदुल वाळूवर पावले उमटली.
WORD|अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|ती अलवार हसली.
WORD|स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|पक्षी स्वैर उडत होते.
WORD|सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|फुलांची सुरभि दरवळली.
WORD|दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|तिच्या डोळ्यांत वेगळीच दीप्ती होती.
WORD|प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|अंगणात प्राजक्त फुलला होता.
WORD|निरभ्र|ढगविरहित, पूर्ण स्वच्छ|संस्कृत|स्वच्छ|निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?|रायगड|६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातून वाहणारी सर्वात लांब नदी कोणती?|गोदावरी|त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे उगम पावणारी गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी असून तिला 'दक्षिण गंगा' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली?|१ मे १९६०|संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये अस्तित्वात आली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?|कळसूबाई|अहिल्यानगर जिल्ह्यातील हे शिखर सुमारे १,६४६ मीटर उंच असून ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे.|भूगोल
GK|संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' कोणत्या गावी लिहिली?|नेवासे|अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथे भगवद्गीतेवरील ही मराठी टीका लिहिली गेली.|संस्कृती
GK|लोणार सरोवर कशामुळे तयार झाले?|उल्कापातामुळे|बुलढाणा जिल्ह्यातील हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बेसाल्ट खडकात उल्का आदळून तयार झालेले जगातील दुर्मीळ सरोवर आहे.|भूगोल
GK|तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला?|सिंहगड (कोंढाणा)|१६७० मधील या लढाईत तानाजी धारातीर्थी पडले; 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार प्रसिद्ध आहेत.|इतिहास
GK|अफझलखानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला?|प्रतापगड|१६५९ मध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाजवळ ही ऐतिहासिक भेट व संघर्ष घडला.|इतिहास
GK|मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?|दर्पण|बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये 'दर्पण' सुरू केले; त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक मानले जाते.|संस्कृती
GK|'केसरी' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?|लोकमान्य बाळ गंगाधर टिळक|१८८१ मध्ये मराठीतून 'केसरी' आणि इंग्रजीतून 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू झाली.|इतिहास
GK|'सत्यशोधक समाज' कोणी स्थापन केला?|महात्मा जोतिराव फुले|२४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात स्थापन झालेली ही संस्था सामाजिक समतेसाठी कार्यरत होती.|इतिहास
GK|'श्यामची आई' या पुस्तकाचे लेखक कोण?|साने गुरुजी|पांडुरंग सदाशिव साने यांनी नाशिकच्या कारागृहात हे पुस्तक लिहिले.|साहित्य
GK|'नटसम्राट' या गाजलेल्या नाटकाचे लेखक कोण?|वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)|कुसुमाग्रजांना १९८७ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.|साहित्य
GK|मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा होतो?|२७ फेब्रुवारी|कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.|संस्कृती
GK|वेरूळ येथील कैलास लेणे कोणत्या राजवटीत कोरले गेले?|राष्ट्रकूट|एकाच अखंड खडकात वरून खाली कोरलेले हे मंदिर जगातील स्थापत्यशास्त्रीय आश्चर्य मानले जाते.|इतिहास
GK|अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?|छत्रपती संभाजीनगर|बौद्ध चित्रकला व शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेली ही लेणी युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहेत.|पर्यटन
GK|एलिफंटा लेणी कोणत्या देवतेला समर्पित आहेत?|शिव|मुंबईजवळील घारापुरी बेटावरील त्रिमूर्ती शिल्प जगप्रसिद्ध आहे.|पर्यटन
GK|महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत?|पाच|भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ — बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत.|संस्कृती
GK|अष्टविनायक म्हणजे किती गणपती मंदिरे?|आठ|पुणे, रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विखुरलेली ही आठ स्वयंभू गणपती मंदिरे आहेत.|संस्कृती
GK|कृष्णा नदीचा उगम कोठे होतो?|महाबळेश्वर|सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्या उगम पावतात.|भूगोल
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?|शिवनेरी|पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या या किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी त्यांचा जन्म झाला.|इतिहास
GK|संत तुकाराम महाराजांचे गाव कोणते?|देहू|पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीकाठचे देहू हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.|संस्कृती
GK|संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?|आळंदी|पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली.|संस्कृती
GK|सेवाग्राम आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?|वर्धा|महात्मा गांधींनी १९३६ मध्ये येथे वास्तव्य सुरू केले; हे स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्वाचे केंद्र ठरले.|इतिहास
GK|पवनार आश्रम कोणाशी संबंधित आहे?|आचार्य विनोबा भावे|वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून विनोबांनी भूदान चळवळीचे कार्य केले.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते?|ताडोबा|चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा १९५५ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झाले; पुढे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तयार झाला.|वन्यजीव
GK|'संत्रानगरी' म्हणून कोणते शहर ओळखले जाते?|नागपूर|संत्र्यांच्या व्यापारामुळे मिळालेले हे नाव; नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.|भूगोल
GK|महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणते शहर मानले जाते?|पुणे|शिक्षण, साहित्य, नाट्य आणि संगीत परंपरेमुळे पुण्याला हे स्थान मिळाले आहे.|संस्कृती
GK|रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते?|रायरी|शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केली.|इतिहास
GK|पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?|१७६१|मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यातील या लढाईचा मराठा साम्राज्यावर मोठा परिणाम झाला.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेचे नाव काय?|जिजाबाई|जिजाऊंनी शिवरायांवर स्वराज्याचे संस्कार केले; त्यांना राजमाता म्हणून ओळखले जाते.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळ घोषित झाले?|२००४|व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतील ही वास्तू मुंबईचे प्रतीक मानली जाते.|पर्यटन
GK|गेट वे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे?|मुंबई|१९२४ मध्ये पूर्ण झालेली ही वास्तू अरबी समुद्राच्या काठी उभी आहे.|पर्यटन
GK|'लोकहितवादी' या टोपणनावाने कोण लेखन करत असत?|गोपाळ हरी देशमुख|त्यांच्या 'शतपत्रे' या लेखमालेने एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारणेला दिशा दिली.|साहित्य
GK|मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?|वि. स. खांडेकर|'ययाति' या कादंबरीसाठी १९७४ मध्ये त्यांना हा सन्मान मिळाला.|साहित्य
GK|जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?|गोदावरी|छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या धरणाच्या जलाशयाला 'नाथसागर' म्हणतात.|भूगोल
GK|कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?|सातारा|जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या धरणाच्या जलाशयाला 'शिवसागर' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते?|ताम्हण (जारूळ)|जांभळ्या रंगाची ही फुले पावसाळ्यात सह्याद्रीत मोठ्या प्रमाणात दिसतात.|निसर्ग
GK|महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?|शेकरू|मोठी उडणारी खार असलेला शेकरू भीमाशंकर अभयारण्यात प्रामुख्याने आढळतो.|वन्यजीव
GK|कास पठार कशासाठी प्रसिद्ध आहे?|रानफुलांच्या बहरासाठी|सातारा जिल्ह्यातील हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ पावसाळ्यानंतर फुलांच्या गालिच्यासाठी ओळखले जाते.|पर्यटन
GK|भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी ओळखले जाते?|शेकरू|पुणे जिल्ह्यातील हे अभयारण्य ज्योतिर्लिंगासाठीही प्रसिद्ध आहे.|वन्यजीव

अजून इंटरेस्टिंग...

अंबामातेच्या नगरीची रोमांचक सफर | Ambadevi Mata Amravati | Author: Parijaat | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism

फाहियान : भारतातील बौद्ध वारसा शोधणारा प्रवासी | Fa-Hien and His Journey Through India | Travellers of the World

एकदा तरी अनुभवावे रवीन्द्रनाथांचे शांतिनिकेतन | Arundhati Deshmukh | Shantiniketan Experience in Marathi

दुष्काळाच्या पलीकडचा मराठवाडा: पावसाळ्यात खुलणारे अनोखे पर्यटनविश्व | Author: Dr. Mrunalini Fadnavis | Marathwada Tourism | Maharashtra Tourism

मार्को पोलो : आशियाकडे जाणारा मध्ययुगीन प्रवासी | Marco Polo Travel | Travellers of the World

"ईडा-पीडा, रोगराई, घेऊन जा गे मारबत!" | Marbats of Nagpur | Tourism in Vidarbha | Maharashtra Tourism

सेवाग्राम: केवळ भूतकाळाचा वारसा नाही, तर वर्तमानासाठीचा आरसा | Sevagram Ashram, Wardha | Heritage Tourism | Tourism in Vidarbha | Maharashtra Tourism

कौंडण्यपूर : श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाहाचे साक्षीदार | Kaundanyapur Travel Guide | Temples in Maharashtra

चला, नागपुरातील पर्यटनस्थळांची सैर करायला! | Tourist Spots in Nagpur, Vidarbha, Maharashtra | Nagpur Travel Guide

नागपूर - प्राचीन मंदिर पर्यटनाचा हब | Temples near Nagpur | Temples of Vidarbha