सह्याद्रीतील शिल्परत्न ‘अमृतेश्वर मंदिर’ | नरेंद्र चांदेवार | Author: Narendra Chandewar | Amruteshwar Temple | Maharashtra Tourism | Incredible India

कळसुबाई - हरिश्चंद्र वन्यजीव अभयारण्याला भेट देण्याचा प्रसंग नुकताच आला. या ठिकाणी सह्याद्री पर्वत रांगांमधील गिरीदुर्गसह अतिप्राचीन मंदिर पाहायला मिळतात. राजूरमार्गे भंडारदरा ते रतनवाडी असा प्रवास केल्यानंतर अमृतेश्वर मंदिर बघायला मिळते. प्रवरा नदीच्या उगमाजवळ आणि रतनगडाच्या पायथ्याशी वसलेले जुने अमृतेश्वर मंदिर म्हणजे अगदी डोक्यापासून पायापर्यंत कोरलेले दगडी शिल्पच आहे. हे मंदिर कोरीव कलेचा उत्तम नमुना मानले जाते.

Amruteshwar Temple
Amruteshwar Temple

महाराष्ट्रात वेरूळचे घृष्णेश्वर, अंबरनाथचे शिवमंदिर, नाशिकजवळील गोंदेश्वर, शिखर शिंगणापूरचे शंभू महादेव, त्र्यंबकेश्वर अशी शिल्पमंदिरे अगदी बोटावर मोजण्याइतकीच आहेत. या यादीत रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिराचाही समावेश होतो. शिलाहार राजा झंज याने गोदावरी ते भीमा या नद्यांच्या दरम्यान १२ शिवालये उभारली, त्यातील हे एक प्रमुख मंदिर आहे. सध्या या मंदिराची देखरेख भारतीय पुरातत्व विभागाकडे आहे. भारतीय पुरातत्त्व खात्याच्या नोंदीनुसार, अमृतेश्वर मंदिर १२व्या किंवा १३व्या शतकातील आहे. भंडारदरासारख्या लोकप्रिय पर्यटनस्थळाजवळच रतनगडाच्या पायथ्याशी हे मंदिर आहे. निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या मंदिराची रचना इतर शिवालयांपेक्षा वेगळी आहे. मंदिर पश्चिमेकडे तोंड करून असले तरी नंदीचा मंडप मात्र पूर्वेकडे आहे. या मंदिराला पूर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. पूर्वेकडून आत गेल्यास आधी नंदीमंडप, नंतर थेट गाभारा, त्यानंतर अंतराळ आणि शेवटी सभामंडप लागतो. गाभाऱ्यात येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी मार्ग आहेत. अशी रचना इतर शिवमंदिरांत फारशी दिसत नाही.

Amruteshwar Temple

'अमृतवाहिनी प्रवरा'

येथील आणखी एक खासियत म्हणजे गाभारा खोल असून तेथून पाण्याचे झरे वाहतात. हेच प्रवरा नदीचे उगमस्थान मानले जाते. अमृतेश्वर मंदिरातून उगम पावल्याने या नदीला 'अमृतवाहिनी प्रवरा' असेही म्हणतात. पावसाळ्यात मंदिराचा गाभारा पाण्याने भरलेला असतो; साधारण जून ते डिसेंबर या काळात शिवपिंडी पाण्याखाली राहते. यावरूनच भंडारदरा धरणातील पाण्याची पातळी कळत असते. पश्चिमेच्या वेशीने मंदिरात शिरताना दारावरील कोरीवकाम नजरेत भरते. दाराच्या दोन्ही बाजूंच्या खांबांवर बारीक नक्षीकाम असून अनेक देव-देवता तसेच मैथुनाची (कामसूत्र) शिल्पेही कोरलेली आहेत. दाराच्या ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे, तर खाली देव-देवता व अनेक सुरसुंदरी कोरल्या आहेत. सभामंडपातील दगडी खांब शेकडो लहान शिल्पांनी सजले आहेत. खांबाच्या वरच्या भागात भार वाहणारे यक्ष आहेत. सभामंडपाच्या भिंतींवर प्रकाशासाठी ठिकठिकाणी दगडी जाळी बनवलेली आहेत. अंतराळातून गर्भगृहात जाताना दरवाजाच्या चौकटीवर चारही बाजूंनी शिल्पे आहेत. खाली कीर्तिमुख, तर डाव्या-उजव्या बाजूला वेली कोरल्या आहेत. अंतराळापासून सुमारे सहा ते सात फूट खोल गाभारा आहे. तेथे सहा-सात पायऱ्या उतरून जावे लागते. गाभाऱ्यातील शिवपिंडीही विशेष आहे. शाळुंकाच्या वरील भागातील शिवलिंग तीन थरांत आहे; खालून वर गेल्यावर ते अरुंद होत जाते (तीन दगड एकावर एक ठेवल्यासारखे भासते). अशी शिवपिंडी फार क्वचित आढळते.

Amruteshwar Temple

गाभाऱ्यातून पूर्वेकडे बाहेर पडल्यावर समोर नंदीमंडप आहे. या मंडपात एक नंदी स्थापित असून बाजूला दोन मोडक्या नंदी मूर्ती आहेत. मंदिराच्या बाह्य भिंतींवर अनेक देव, दानव, यक्ष, अप्सरा, गंधर्व यांची कोरीव शिल्पे आहेत. तसेच अनेक ठिकाणी मैथुन शिल्पेही आहेत. मंदिराचे शिखर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण व शिल्पकलेच्या समृद्धीचे दर्शन घडवणारे आहे. त्यावर जाळीदार नक्षीचे उभे थर व त्यावर छोटी शिखरे बनवलेली आहेत. हे मंदिर 'भूमीज' शैलीतील आहे असे सांगितले जाते. प्राचीन वास्तुशास्त्रानुसार 'नागर' (उत्तर भारतीय) व 'द्राविड' (दक्षिण भारतीय) असे दोन प्रकार आहेत. या दोन्हीचा संगम म्हणजे 'वेसर' ही उपशैली. भूमीज शैली ही नागर शैलीचीच एक उपशैली असून तिची मंदिरे नर्मदेच्या परिसरात व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळतात.

Amruteshwar Temple

'विष्णूतीर्थ'

मंदिराच्या आवारात अनेक पुरातन मूर्ती, वीरगळ व काही तुटलेल्या मूर्तीही आहेत. मंदिराजवळ एक चौकोनी पुष्करणी असून तिच्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. पुष्करणीच्या चारही भिंतींवर छोटी मंदिरे आहेत; त्यात गणेश व विष्णूच्या विविध रूपांच्या प्रतिमा आहेत. स्थानिक लोक या पुष्करणीला 'विष्णूतीर्थ' म्हणतात. समुद्रमंथनातील १४ रत्नांतून हे मंदिर व तीर्थ निर्माण झाल्याची कथा त्यांच्यात प्रचलित आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. श्रावणातील प्रत्येक सोमवारीही हजारो भाविक दर्शनाला येतात. वास्तुकलेचा उत्तम आविष्कार असलेले हे मंदिर परिसरातील आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान आहे.

नरेंद्र गोपीनाथ चांदेवार
विभागीय वन अधिकारी

Comments

🔍 शोधा
लेख लोड होत आहेत...
🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
💡
आजचा मराठी शब्द by WhatsUp मराठी
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|Eg. तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|Eg. त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|Eg. डोंगरातील पाणी नितळ आहे.
तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|Eg. तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|Eg. सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
ओंजळ|हाताचा कप्पा|देशज मराठी|हातभर|Eg. त्याने ओंजळीत पाणी घेतले.
हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|Eg. हळुवार वारा वाहत होता.
मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|Eg. तिचा आवाज मंजुळ आहे.
मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|Eg. मृद्गंध दरवळला.
आभाळमाया|असीम प्रेम|देशज मराठी|अपार माया|Eg. आईची आभाळमाया विसरता येत नाही.
धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|Eg. तो संगीतात धुंद झाला.
झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|Eg. थंड झुळूक आली.
नभ|आकाश|संस्कृत|गगन|Eg. नभ निरभ्र होते.
उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|Eg. त्याला आनंदाचा उमाळा आला.
साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|Eg. ती साजिरी दिसत होती.
गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|Eg. फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|Eg. सूर्याचा कवडसा पडला.
जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|Eg. गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|Eg. गाण्याची लय सुंदर होती.
कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|Eg. कोमेजलेली फुले दिसत होती.
दरवळ|मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|Eg. चाफ्याचा दरवळ पसरला.
सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|Eg. सावळ्या ढगांनी आकाश भरले.
सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|Eg. तिचा चेहरा सतेज दिसत होता.
मधुमालती|सुगंधी वेल|संस्कृत|फुलवेल|Eg. अंगणात मधुमालती फुलली होती.
गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|Eg. कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
हुरहूर|मनातील ओढ|देशज मराठी|व्याकुळता|Eg. जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|Eg. गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|Eg. धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|Eg. पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|Eg. दिव्याची ज्योत लवलवत होती.
उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|Eg. तरुणांमध्ये उमेद आहे.
गोजिरी|नाजूक सुंदर|देशज मराठी|साजिरी|Eg. गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|Eg. आंब्याला मोहोर आला आहे.
सुगंधी|सुगंध असलेले|संस्कृत|दरवळते|Eg. सुगंधी फुले बहरली.
अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|Eg. गावचा चहा अमृततुल्य लागतो.
झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|Eg. घंटांचा झंकार झाला.
सहजसुंदर|नैसर्गिक सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|Eg. तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|Eg. आसमंत शांत होता.
सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|Eg. सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|Eg. डोंगरातून निर्झर वाहत होता.
नादमय|संगीतपूर्ण|संस्कृत|सुरेल|Eg. सभागृह नादमय झाले.
मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|Eg. मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|Eg. संगीताचे स्पंदन जाणवत होते.
चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|Eg. वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|Eg. मृदुल वाळूवर पावले उमटली.
अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|Eg. ती अलवार हसली.
स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|Eg. पक्षी स्वैर उडत होते.
सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|Eg. फुलांची सुरभि दरवळली.
दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|Eg. तिच्या डोळ्यांत दीप्ती होती.
प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|Eg. अंगणात प्राजक्त फुलला होता.
निरभ्र|पूर्ण स्वच्छ|संस्कृत|ढगविरहित|Eg. निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.

अजून इंटरेस्टिंग...

नागपुरातील मोहिते वाडा : संघ शाखेची जन्मभूमी | Author: Amol Pusadkar | Mohite Wada, Birthplace of the Rashtriya Swayamsevak Sangh | Heritage Tourism | Maharashtra Tourism

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

तुम्ही पण होऊ शकता पर्यटन उद्योजिका, महाराष्ट्र शासनाच्या ‘आई’ महिला पर्यटन धोरण | महाराष्ट्र स्टार्टप स्टोरीज | Tours & Travel Entrepreneurship for Women | Startups & Careers | Maharashtra Startup Stories

‘पुरण पोळी’ च्या गावाला जाऊ या....! आजनसरा | Author: Sakhi | Ajansara Temple | Temples in Maharashtra | Maharashtra Tourism

महाराष्ट्रातील डार्क स्काय पर्यटन, शहरी गोंगाटापासून दूर, आकाशाच्या कुशीत | Dark Sky Tourism | Astro Tourism | Maharashtra Tourism Policy

बांबूंच्या बेटातून करा ‘झुकझुक गाडी’ ची रम्य सफर | First Bamboo Garden of India, Amravati | Author: Parijaat | Maharashtra Tourism

भटाळा गावात आहे ‘भोंडा महादेव’ | Author: Himgauri Deshpande | Bhonda Mahadev Temple Bhatala | Temples of Vidarbha | Temples of Maharashtra

अलेक्झांडर बर्न्स : बुखाराकडे निघालेला ब्रिटिश प्रवासी | Alexander Burnes and Travels into Bukhara | Travellers of the World

हेन्री ऑक्सिंडन : शिवराज्याभिषेक पाहणारा इंग्रज प्रवासी | Henry Oxinden and His Journey to Maratha Land | Travellers of the World

भामरागडमध्ये जलक्रांतीतून निर्मित ‘तलावांचे जाळे’ | अनिकेत प्रकाश आमटे | लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte