‘ये है मुंबई मेरी जान’ अनुभवांची अखंड सफर | Author: Himgauri Deshpande | Yeh Hain Mumbai Meri Jaan | Maharashtra Tourism | Incredible India

पर्यटन हे सांस्कृतिक देवाणघेवाणसाठी एक उत्तम मार्ग आहे. दैनंदिन जीवनातील धावपळ आणि तणावातून मुक्त होऊन विरंगुळा मिळवण्यासाठी पर्यटन उत्तम माध्यम आहे. म्हणूनच पर्यटनाला एका फिरत्या शाळेची उपमा दिली जाते. असं म्हणतात की, आनंद आणि समाधान मानण्यात असतं. बरेचदा तीर्थक्षेत्री, किल्ले, नद्या, डोंगर पर्वतरांगा आपण अनेकदा पाहिलेलं असतं. दर्शनाचा कधी आनंद घेतो, तर निसर्गरम्य वातावरणात मन प्रसन्न करून येतो. डोंगरावर चढताना मनात पेटून उठलेली ऊर्जा प्रत्येक आयुष्यात येणाऱ्या खासखळग्यांना असंच सामोरं जाण्याची जिद्द देऊन जाते. अनेक वेळा, त्याच त्याच ठिकाणी जाऊन सुद्धा आपल्याला वेगळाच आनंद उपभोगायला मिळतो, अनुभव शिकवून जातात.

Gateway of India

भारतातील सर्वात व्यस्त शहर म्हणून परिचित मुंबई हे अनेकांचं निवासस्थान आहे, कुणाचं माहेर, कुणाचं सासर, कुणाचं अर्थार्जनाचं स्थान, तर कुणी शिक्षणासाठी या शहरात जाऊन पोहोचतं. माझ्या या लेखात मी मात्र एक पर्यटक म्हणून मला मुंबईचा आलेला अनुभव लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. मुंबईची संस्कृती परंपरा, धर्म, व्यंजन, संगीत आणि ललित कला यांचे मिश्रण आहे. सर्व जगाचे लक्ष असलेली आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई! लहानपणी अनुभवलेली मुंबई आणि मोठेपणी डोळसपणे न्याहाळलेली मुंबई यात अंतर आहे.

सात बेटांचा समूह | Seven Islands that formed Mumbai

ऐतिहासिक वारसा, देखणी सागरी किनारपट्टी, झगमगती जीवनशैली आणि वैविध्यपूर्ण संस्कृती यामुळे मुंबई ही खऱ्या अर्थाने एक जागतिक महानगर आहे. स्वातंत्र्य लढ्यात मुंबईचे महत्त्व मोठे होते. आज मुंबई भारताची आर्थिक राजधानी आणि जागतिक महानगरी असली तरीही गेटवे ऑफ इंडिया यांसारखी ऐतिहासिक वास्तू, विविध सांस्कृतिक वारसा आणि संपन्न जीवनशैली यामुळे मुंबई एक अद्वितीय शहर ठरते. सात बेटांपासून विकसित झालेली ही नगरी आज देशाचे आर्थिक आणि मनोरंजन केंद्र आहे. थोडा विसावा देणारी, थांबून विचार करायला लावणारी, अनेक नाती जोडणारी.. तर कधी करकचून भांडायलाही लावणारी.. लोकल आणि तिचा अनुभव जेव्हा आपण घेतो त्या वेळेला तिला मुंबईची जीवन वाहिनी का म्हणतात, याचं वारंवार प्रत्यंतर येतं.

पर्यटक म्हणून आपण मुंबईला जातो त्यावेळी आपल्याला कारमध्ये निवांत बसून एसी ची हवा घेत मुंबई बघण्याचं आकर्षण वाटतं. जेव्हा आपण मुंबईच्या उंबरठ्यावर पाय ठेवायला लागतो त्यावेळीच गर्दीत चढताना होणारी तारांबळ, तिच्यातले धक्के, वाद आणि बरंच काही आपल्या रेल्वेतूनच आपल्याला बघायला मिळतं. हे नेत्र सुख विलक्षण असतं. दररोज लाखो प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवणाऱ्या या लोकलला, मुंबईच्या गतीचे आणि ऊर्जेचे प्रतीक म्हटले जाते. एकेकाळी सात बेटांचा समूह असलेली मुंबई आज भारताच्या उद्योग, वित्त, सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्राची केंद्रबिंदू बनली आहे. सर्वांना हे शहर मोठा आहे पण यातला खरेपणा म्हणजे या शहराची माणुसकी जोपासण्याची परंपरा! 

Mumbai Sealine

इथे गगनचुंबी इमारती आणि झोपडपट्ट्या दोन्ही शेजारी शेजारी गुण्यागोविंदाने नांदतात. पु. ल. देशपांडे यांची ‘बटाट्याची चाळ’ हे पुस्तक मुंबईतील चाळीमधील लोकांचे वर्णन करणारे पुस्तक आजही प्रसिद्धच आहे. चाळी फक्त मुंबईतच आहेत असे नाही. दुसऱ्या शहरांमध्येही होत्या; पण मुंबईमध्ये जेवढ्या चाळी आहेत, तेवढ्या इतर शहरांमध्ये नाहीत. या चाळ संस्कृतीनं संस्कार, माणुसकी, आपलेपणा या शहरात रुजवला. जुन्याचा अस्त झाला, पण त्या पाऊलखुणा जपल्या. भूतकाळाची पाने पलटून स्मरणरंजनाचे सुख अनुभवले. जुन्याच्या जागी आलेल्या नव्याचे स्वागत केले, त्याला आपलेसे केले. हे शहर जुन्या ट्रामच्या आठवणी सांगते, तेव्हा मेट्रोविषयीही उत्सुकता दाखवते. विविध भाषा, संस्कृती, चालीरीती, परंपरा याचे अनोखे मिश्रण अन्य कोणत्याही शहरात सापडणार नाही. इथे कोळीवाड्यातली धूम आहे, माऊंटमेरीची जत्रा आहे, दहीहंडीचा थरार आहे, गणेशोत्सवातील मंगल वातावरण आहे.

कबीरजी म्हणतात,
चाह गई, चिंता मिटी
मनवा बेपरवाह
जाको कछु न चाहिए
वो शाहन का शाह॥

म्हणतात ना, समाधान हेच सर्वात मोठं धन. अमेरिकेच्या मियामी शहरातील आर्क डेको शैलीच्या इमारती पाहण्यासाठी खास पर्यटक त्या शहरात येतात. दक्षिण मुंबईतील चर्चगेट, मरिन ड्राइव्ह तसेच मरिन लाइन्स परिसरातील इमारतीही आर्क डेको शैलीच्या आहेत.

खाद्यशैलीचा अनोखा संगम | Food Culture in Mumbai

खाद्य संस्कृतीवर बोलल्याशिवाय मुंबई अपूर्णच आहे. विविध प्रांतांतील खाद्यशैली आणि संस्कृतींचा एक अनोखा संगम मुंबईत आहे. ‘वडापाव’ ही मुंबईची ओळख असून तो आता जागतिक पातळीवर पोहोचला आहे. सोबतच भेळपुरी, शेवपुरी, पाणीपुरी, आणि तवा पुलाव यांचादेखील समावेश आहे. इडली-वडा-डोसा, ढोकळा, खांडवी आणि फाफडा हे पदार्थही मुंबईच्या खवय्यांच्या आहारात मोठ्या प्रमाणावर समाविष्ट आहेत. इराणी चहा, मस्का-पाव, इटालियन आणि बरंच काही रात्री उशिरापर्यंत उत्कृष्ट खाद्यपदार्थांसाठी गजबजलेली ठिकाणं मुंबईला आहेत.

Irani Cafe, Mumbai
Irani Cafe, Mumbai

‘ये है मुंबई मेरी जान’, असं प्रत्येक मुंबईकर अभिमानाने म्हणतो. रोजची आर्थिक चढाओढ, चंदेरी दुनियेची सफर ,फास्टफूडची तसंच क्रिकेटच्या देवाची अशी ही मुंबापुरी आहे. दररोज प्रगतीची नवनवी शिखरं गाठताना मुंबईला साथ असते ती इथं राहणाऱ्या प्रत्येक मुंबईकराची.

ओपन बसमधून मुंबई अनुभवताना...

भारत जैवविविधतेसाठी जगविख्यात आहे. अगदी सह्याद्रीच्या सर्वश्रृत कड्यांपासून ते ‘सुंदरबन’च्या जंगलापर्यंत भारत हा जैवविविधतेची खाण आहे. सागर किनारे दिल ये पुकारे म्हणत समुद्राच्या कडेला लाटा पाहात बसणे कित्येकांसाठी परवणी असते. गेटवे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, एलिफंटा लेणी याशिवाय, मुंबईत अजूनही अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही जाऊ शकता. ओपन बसमधून मुंबई अनुभवताना विलक्षण अनुभूती येते. आजुबाजूला असलेलं व्यापक विश्व, जा- ये करणाऱ्या अपरिचित माणसांची परिचीत दिनचर्या, हाॅर्नचे आवाज या सगळ्या गोंधळात लहानगी मुलं त्यांची निरागसता सगळं कसं काहीतरी सांगून जातं. खिडकीतून दिसणारं निसर्गरम्य दृश्य, डब्यातील प्रवाशांशी होणाऱ्या गप्पा आणि फलाटावरील खाद्यपदार्थांची रेलचेल मनाला ताजी करते. समांतर रेषा समजताना रेल्वे रुळांचं उदाहरण दिलं जातं. तसं पाहिलं तर न भिडणाऱ्या या रेषा आयुष्यातली अनेक वळणं सोप्पी करून जातात. 

खिडकीबाहेरचं नयनाभिराम दृश्य आणि अंतर्मनातलं समाधान यांचा सुंदर संगम म्हणजे रेल्वे प्रवास! मुंबई पर्यटक म्हणून बघण्यात (वारंवार) एक वेगळी मजा आहे. घरी जाताना रेल्वेतून मनाला आश्वासन दिलं परत यायचंच आहे कारण....दिल अभी भरा नहीं!

Yeh Hain Bambai Meri Jaan | Johnny Walker

तुम्ही येथे गेले आहात का? कंमेंट्स मध्ये तुमचे मत नक्की कळवा !

हिमगौरी देशपांडे
लेखक
वरोरा (चंद्रपूर)

Comments

  1. chhan mahiti ahe

    ReplyDelete
  2. मुंबई खरच दरवेळेला नवीन वाटते. छान अनुभव

    ReplyDelete
  3. मुंबई शहराच प्रत्येकाला असलेलं आकर्षण अत्यंत मार्मिक शब्दांत मांडलय,👌

    ReplyDelete
  4. जीवाची मुंबई झाल्यासारखे वाटले

    ReplyDelete
  5. Really Nice article,... Mumbai's love being tourist is great experience.... Your words makes the experience into beautiful words

    ReplyDelete

Post a Comment

🌍✍️ तुमचं मत नक्की कळवा. तुमची ओळख न सांगताही तुमचा अभिप्राय देऊ शकता.

🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
आजचा मराठी शब्दआजचा प्रश्न
या शब्दाचा अर्थ काय आहे?तुम्हाला याचे उत्तर माहीत आहे का?
उत्तरासाठी कार्ड उलटा
अर्थउत्तर
उगमअधिक माहिती
समानार्थीश्रेणी
वाक्यात उपयोग
WhatsUp मराठी पुन्हा उलटा
जानेवारी|फेब्रुवारी|मार्च|एप्रिल|मे|जून|जुलै|ऑगस्ट|सप्टेंबर|ऑक्टोबर|नोव्हेंबर|डिसेंबर
WORD|अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
WORD|लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
WORD|नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|डोंगरातील पाणी नितळ आहे.
WORD|तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
WORD|रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
WORD|ओंजळ|दोन्ही हातांचा केलेला कप्पा|देशज मराठी|हातभर|त्याने ओंजळीत पाणी घेतले.
WORD|हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|हळुवार वारा वाहत होता.
WORD|मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|तिचा आवाज मंजुळ आहे.
WORD|मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|पहिल्या सरीनंतर मृद्गंध दरवळला.
WORD|आभाळमाया|असीम, अपार प्रेम|देशज मराठी|अपार माया|आईची आभाळमाया विसरता येत नाही.
WORD|धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|तो संगीतात धुंद झाला.
WORD|झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|संध्याकाळी थंड झुळूक आली.
WORD|नभ|आकाश|संस्कृत|गगन|पहाटे नभ निरभ्र होते.
WORD|उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|त्याला आनंदाचा उमाळा आला.
WORD|साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|ती साजिरी दिसत होती.
WORD|गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
WORD|कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|फटीतून सूर्याचा कवडसा पडला.
WORD|जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
WORD|लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|गाण्याची लय सुंदर होती.
WORD|कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|फुलदाणीत कोमेजलेली फुले दिसत होती.
WORD|दरवळ|पसरणारा मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|चाफ्याचा दरवळ पसरला.
WORD|सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|सावळ्या ढगांनी आकाश भरले.
WORD|सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|तिचा चेहरा सतेज दिसत होता.
WORD|मधुमालती|सुगंधी फुलांची वेल|संस्कृत|फुलवेल|अंगणात मधुमालती फुलली होती.
WORD|गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
WORD|हुरहूर|मनातील अस्वस्थ ओढ|देशज मराठी|व्याकुळता|जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
WORD|निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
WORD|तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
WORD|मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
WORD|लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|दिव्याची ज्योत लवलवत होती.
WORD|उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|तरुणांमध्ये नवी उमेद आहे.
WORD|गोजिरी|नाजूक व सुंदर|देशज मराठी|साजिरी|गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
WORD|मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|आंब्याला मोहोर आला आहे.
WORD|अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|गावचा चहा अमृततुल्य लागतो.
WORD|झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|मंदिरातील घंटांचा झंकार झाला.
WORD|सहजसुंदर|नैसर्गिकरीत्या सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
WORD|आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|पहाटेचा आसमंत शांत होता.
WORD|सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
WORD|निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|डोंगरातून निर्झर वाहत होता.
WORD|नादमय|संगीताने भरलेला|संस्कृत|सुरेल|सभागृह नादमय झाले.
WORD|मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
WORD|स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|संगीताचे स्पंदन जाणवत होते.
WORD|चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
WORD|मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|मृदुल वाळूवर पावले उमटली.
WORD|अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|ती अलवार हसली.
WORD|स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|पक्षी स्वैर उडत होते.
WORD|सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|फुलांची सुरभि दरवळली.
WORD|दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|तिच्या डोळ्यांत वेगळीच दीप्ती होती.
WORD|प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|अंगणात प्राजक्त फुलला होता.
WORD|निरभ्र|ढगविरहित, पूर्ण स्वच्छ|संस्कृत|स्वच्छ|निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?|रायगड|६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातून वाहणारी सर्वात लांब नदी कोणती?|गोदावरी|त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे उगम पावणारी गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी असून तिला 'दक्षिण गंगा' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली?|१ मे १९६०|संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये अस्तित्वात आली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?|कळसूबाई|अहिल्यानगर जिल्ह्यातील हे शिखर सुमारे १,६४६ मीटर उंच असून ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे.|भूगोल
GK|संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' कोणत्या गावी लिहिली?|नेवासे|अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथे भगवद्गीतेवरील ही मराठी टीका लिहिली गेली.|संस्कृती
GK|लोणार सरोवर कशामुळे तयार झाले?|उल्कापातामुळे|बुलढाणा जिल्ह्यातील हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बेसाल्ट खडकात उल्का आदळून तयार झालेले जगातील दुर्मीळ सरोवर आहे.|भूगोल
GK|तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला?|सिंहगड (कोंढाणा)|१६७० मधील या लढाईत तानाजी धारातीर्थी पडले; 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार प्रसिद्ध आहेत.|इतिहास
GK|अफझलखानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला?|प्रतापगड|१६५९ मध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाजवळ ही ऐतिहासिक भेट व संघर्ष घडला.|इतिहास
GK|मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?|दर्पण|बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये 'दर्पण' सुरू केले; त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक मानले जाते.|संस्कृती
GK|'केसरी' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?|लोकमान्य बाळ गंगाधर टिळक|१८८१ मध्ये मराठीतून 'केसरी' आणि इंग्रजीतून 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू झाली.|इतिहास
GK|'सत्यशोधक समाज' कोणी स्थापन केला?|महात्मा जोतिराव फुले|२४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात स्थापन झालेली ही संस्था सामाजिक समतेसाठी कार्यरत होती.|इतिहास
GK|'श्यामची आई' या पुस्तकाचे लेखक कोण?|साने गुरुजी|पांडुरंग सदाशिव साने यांनी नाशिकच्या कारागृहात हे पुस्तक लिहिले.|साहित्य
GK|'नटसम्राट' या गाजलेल्या नाटकाचे लेखक कोण?|वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)|कुसुमाग्रजांना १९८७ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.|साहित्य
GK|मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा होतो?|२७ फेब्रुवारी|कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.|संस्कृती
GK|वेरूळ येथील कैलास लेणे कोणत्या राजवटीत कोरले गेले?|राष्ट्रकूट|एकाच अखंड खडकात वरून खाली कोरलेले हे मंदिर जगातील स्थापत्यशास्त्रीय आश्चर्य मानले जाते.|इतिहास
GK|अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?|छत्रपती संभाजीनगर|बौद्ध चित्रकला व शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेली ही लेणी युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहेत.|पर्यटन
GK|एलिफंटा लेणी कोणत्या देवतेला समर्पित आहेत?|शिव|मुंबईजवळील घारापुरी बेटावरील त्रिमूर्ती शिल्प जगप्रसिद्ध आहे.|पर्यटन
GK|महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत?|पाच|भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ — बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत.|संस्कृती
GK|अष्टविनायक म्हणजे किती गणपती मंदिरे?|आठ|पुणे, रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विखुरलेली ही आठ स्वयंभू गणपती मंदिरे आहेत.|संस्कृती
GK|कृष्णा नदीचा उगम कोठे होतो?|महाबळेश्वर|सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्या उगम पावतात.|भूगोल
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?|शिवनेरी|पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या या किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी त्यांचा जन्म झाला.|इतिहास
GK|संत तुकाराम महाराजांचे गाव कोणते?|देहू|पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीकाठचे देहू हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.|संस्कृती
GK|संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?|आळंदी|पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली.|संस्कृती
GK|सेवाग्राम आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?|वर्धा|महात्मा गांधींनी १९३६ मध्ये येथे वास्तव्य सुरू केले; हे स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्वाचे केंद्र ठरले.|इतिहास
GK|पवनार आश्रम कोणाशी संबंधित आहे?|आचार्य विनोबा भावे|वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून विनोबांनी भूदान चळवळीचे कार्य केले.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते?|ताडोबा|चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा १९५५ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झाले; पुढे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तयार झाला.|वन्यजीव
GK|'संत्रानगरी' म्हणून कोणते शहर ओळखले जाते?|नागपूर|संत्र्यांच्या व्यापारामुळे मिळालेले हे नाव; नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.|भूगोल
GK|महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणते शहर मानले जाते?|पुणे|शिक्षण, साहित्य, नाट्य आणि संगीत परंपरेमुळे पुण्याला हे स्थान मिळाले आहे.|संस्कृती
GK|रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते?|रायरी|शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केली.|इतिहास
GK|पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?|१७६१|मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यातील या लढाईचा मराठा साम्राज्यावर मोठा परिणाम झाला.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेचे नाव काय?|जिजाबाई|जिजाऊंनी शिवरायांवर स्वराज्याचे संस्कार केले; त्यांना राजमाता म्हणून ओळखले जाते.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळ घोषित झाले?|२००४|व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतील ही वास्तू मुंबईचे प्रतीक मानली जाते.|पर्यटन
GK|गेट वे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे?|मुंबई|१९२४ मध्ये पूर्ण झालेली ही वास्तू अरबी समुद्राच्या काठी उभी आहे.|पर्यटन
GK|'लोकहितवादी' या टोपणनावाने कोण लेखन करत असत?|गोपाळ हरी देशमुख|त्यांच्या 'शतपत्रे' या लेखमालेने एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारणेला दिशा दिली.|साहित्य
GK|मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?|वि. स. खांडेकर|'ययाति' या कादंबरीसाठी १९७४ मध्ये त्यांना हा सन्मान मिळाला.|साहित्य
GK|जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?|गोदावरी|छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या धरणाच्या जलाशयाला 'नाथसागर' म्हणतात.|भूगोल
GK|कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?|सातारा|जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या धरणाच्या जलाशयाला 'शिवसागर' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते?|ताम्हण (जारूळ)|जांभळ्या रंगाची ही फुले पावसाळ्यात सह्याद्रीत मोठ्या प्रमाणात दिसतात.|निसर्ग
GK|महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?|शेकरू|मोठी उडणारी खार असलेला शेकरू भीमाशंकर अभयारण्यात प्रामुख्याने आढळतो.|वन्यजीव
GK|कास पठार कशासाठी प्रसिद्ध आहे?|रानफुलांच्या बहरासाठी|सातारा जिल्ह्यातील हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ पावसाळ्यानंतर फुलांच्या गालिच्यासाठी ओळखले जाते.|पर्यटन
GK|भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी ओळखले जाते?|शेकरू|पुणे जिल्ह्यातील हे अभयारण्य ज्योतिर्लिंगासाठीही प्रसिद्ध आहे.|वन्यजीव

अजून इंटरेस्टिंग...

विदर्भात समुद्र होता तेव्हा...! | Author: Prof Suresh Chopne | Ocean in Vidarbha Maharashtra? | Heritage Tourism | Maharashtra Tourism

श्रीकृष्णाच्या नगरीत... द्वारकाधीशांच्या चरणी, भाग १ | Author: Mrs. Manik Joshi | Dwarkadheesh Temple | Heritage Tourism | Incredible India

चंद्रपूर: निसर्ग, इतिहास, संस्कृती, लोकजीवन आणि वारशाचा समृद्ध पर्यटनपट | Author: Dr. Pallavi Tajne | Chandrapur Culture and Heritage | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism

महाराष्ट्रातील डार्क स्काय पर्यटन, शहरी गोंगाटापासून दूर, आकाशाच्या कुशीत | Dark Sky Tourism | Astro Tourism | Maharashtra Tourism Policy

भारताचा प्राचीन 'सिल्क रूट’ नाणेघाट | Author: Narendra Chandewar | Silk Route of India, Naneghat | Maharashtra Tourism

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

गोठवणाऱ्या थंडीत आयफेल टॉवरचा अद्‌भूत नजारा... पुस्तकांच्या पलीकडे, जगाच्या जवळ | Author: Yash Naseri | Eiffel Tower Paris | International & Global Tourism

भामरागडमध्ये जलक्रांतीतून निर्मित ‘तलावांचे जाळे’ | अनिकेत प्रकाश आमटे | लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte

विदर्भातही येऊन गेले होते गौतम बुद्ध: विदर्भातील बौद्ध सर्किट | Vidarbha Buddhist Circuit Travel Guide

भटाळा गावात आहे ‘भोंडा महादेव’ | Author: Himgauri Deshpande | Bhonda Mahadev Temple Bhatala | Temples of Vidarbha | Temples of Maharashtra