पचमढीत राजेंद्रगिरीवर 'मक्के की रोटी और टमाटर की चटनी' !! | Author: Amit Naseri | Pachmarhi Travel Experience | Incredible India

पचमढी एक उत्कृष्ट मॉन्सून पर्यटन स्थळ

कोरोना काळातले जवळपास दीड वर्ष घरात राहून आम्ही सर्वच कंटाळलो होतो. कुठेतरी फिरायला जावं असं वाटत होतं. जून महिन्यात एक रात्र पेंच नॅशनल पार्कमध्ये मुक्काम केला. बफरमध्ये सफारी सुद्धा केली पण मुलांना अजून कुठेतरी जावसं वाटत असतांना पचमढीचा कार्यक्रम बनला. पावसाळ्याचे दिवस होते. त्यात पचमढी एक उत्कृष्ट मॉन्सून पर्यटन स्थळ आहे यात काही शंकाच नव्हती. नुकतीच नवी हुंदई सँट्रो आमच्या घरी आली म्हणून त्याच गाडीतून ट्रीपवर जायच ठरलं.

म.प्र. पर्यटन ऑफिसमधून कर्णिकर बंगलोमध्ये रूम बूक केली. एकूण ३ रात्र ४ दिवसांचा प्रोग्राम आखला. त्यात जातांना आणि येतांना तामियामध्ये ब्रेक घ्यायचं ठरलं. दुपारचं आणि रात्रीचं जेवण आम्ही बाहेर रेस्टोरंटमध्ये घेणार असं ठरलं. जायच्या दिवशी सकाळी नाश्ता पॅक करून घेतला आणि छिंदवाडाला जातांना घाट चढायच्या अगोदर आम्ही सर्वांनी तो केला. दुपारचं जेवण सुद्धा पॅक केलेलं होतं जे आम्ही कर्णिकर बंगलो पोहोचल्याबरोबर केलं.

या नागपूर ते पचमढी प्रवासाला मी 'सिनिक ड्राइव्ह' म्हणून नमूद करीन. अर्थातच म.प्र. मध्ये शिरल्यावर रस्ते छान आहेत. एकदा तुम्ही परासियाच्या समोर निघाले की आजूबाजूचा परिसर पावसाळ्यात अतिशय हिरवगार आणि नजरेत भरणारा आहे. एकदा तामिया घाट उतरले की क्वचितच तुम्हाला रस्ता सरळ मिळेल. अनेक नागमोडी वळण असल्याने गाडी सांभाळूनच चालवावी. जंगल-नद्या-गावं पार करून आपण मटकुली पोहोचतो. तिथपर्यन्त रस्ता रुंद आहे. पण मटकुली ते पचमढी या ३५-४० कि.मी. घाटाचा रस्ता अरुंद आहे. समोरून गाडी येत असल्यास आपणच आपली गाडी सांभाळून काढावी हे माझं धोरण ठरलेलं होतं.

Bee Falls, Pachmarhi

पचमढीमध्ये राहताना जटाशंकर, धूपगढ, बी-फाल, गुप्त महादेव, पांडवलेणी, स्थानिक बाजार आणि तसेच एका हिल-स्टेशनमध्ये असणारी इतर महत्वाची ठिकाणं फिरण्याचा आनंद आपण सर्वच घेऊ शकता. या ट्रीपमध्ये आम्ही चौरागढचा ट्रेक वेळेअभावी नाही केला. पहिल्या दिवशी आम्ही जिप्सीतून फिरलो. पण त्यासाठी आधी डॉल्फिन लॉजवर जाऊन रांगेत उभं राहुन जिप्सी बूक करावी लागते हे आम्हाला रात्रीच कळलं होतं. तुम्हाला धूपगढसारख्या ठिकाणी जायचं असल्यास जिप्सी शिवाय पर्यायच नाही.

आत फिरण्यासाठी जसे रस्ते आहेत ते बघता आपण उगीचच साहस दाखवण्याच्या भानगडीत पडू नये. अगदी आडव्या - तिडव्या रस्त्यावरून गाडी चालवताना स्थानिक ड्रायव्हर आणि त्यांच्या ४ व्हील-जिप्सीना नेहेमीच्या सवईच आहे. एकूण पूर्णच दिवस लागतो. तुम्ही पचमढीत कुठेही जा, पायी चालायला किवा ट्रेक करायला खूप वाव आहे. अगदी बी फालमध्ये खाली उतरताना आणि नंतर वर येताना आपल्याला स्वत: च्या फिटनेसबद्दल कळून चुकतं. शहरात कार चालवताना एक गोष्ट लक्षात घ्यावी. इथले रस्ते अरुंद आहेत. समोरून गाडी येत असल्यास आपणच आपली काळजी घ्यावी. लोकं सुद्धा रस्त्यावरून पायी चालताना हॉर्न ऐकूनही बाजूला होत नाही !! आपणच तिथे पाहुणे म्हणून आलो आहोत.. पाहुणेच राहू !!

Gupt Mahadev, Pachmarhi
Gupt Mahadev, Pachmarhi

संपूर्ण पंचमढीमध्ये जिथेही आत जंगलात, धबधब्यापर्यंत पायी जाल, त्या-त्या रस्त्यावर तुम्हाला मॅगी आणि पकोडे बनवून खिलवणारे लोकं जागो-जागी टपऱ्या लावून बसलेले दिसतील. लिंबाचं सरबत आणि थंडपेय सुद्धा मिळेल. पायी फिरताना तशी पण भूक लागतेच. आमच्या पहिल्या दिवसाचा जिप्सीतून फिरण्याचा निर्णय योग्य ठरला. जवळपासचे धबधबे व इतर स्थळांवर कार नेणं थोडं कठीणच होतं. दुसऱ्या दिवशी प्लान थोडा बदलला. आम्ही बाजारातून एक वाटाड्या सोबत घेतला. तो सोबत असल्याने कारमधून फिरणं सोईस्कर झालं. त्यांनी आम्हाला हांडी खोह आणि गुप्त महादेवच्या रस्त्यावर असलेल्या वेग-वेगळ्या ठिकाणांवर तर नेलच आणि सोबत त्याच रस्त्यावर असलेल्या इतर फोटो स्पॉट्सवर सुद्धा नेलं.

Pic with family

मागल्या दोन दिवसाच्या वास्तव्यात सकाळचा नाश्ता आम्ही रिसॉर्ट वरच उरकायचो. पण दुपार आणि रात्रीच जेवण बाजारात असलेल्या रेस्टोरंट मध्येच घेतलं. मला बाहेर जेवताना नेहेमीच प्रश्न पडतो. पैसे खर्च करून सर्वच ठिकाणी जेवताना नेहमीच एक टिपिकल चव असल्याचं जाणवतं. इथेही तोच अनुभव येत होता. परतताना आमच्या वाटाड्यानी सहज विचारलं कि 'राजेंद्रगिरी' चलाल का? आम्ही हो म्हंटलं. भारताचे पहिले राष्ट्रपति डॉ राजेंद्र प्रसाद यांच हे आवडीचं ठिकाण. त्यांना इथे येऊन राहणं फार आवडायचं. त्यांच्याच स्मृतीत या जागेला राजेंद्रगिरी म्हंटलं जातं. जसं धूपगढ सूर्यास्त पाहण्याचं ठिकाण आहे, तशीच ही जागा सुद्धा सूर्यास्त पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण सूर्यास्तापेक्षा इथला अप्रतिम अनुभव मला नमूद करावासा वाटतो. कार पार्क केल्यावर तुम्हाला पायी चालत त्या सनसेट पॉइंटपर्यंत जायचं असतं. तिथपर्यंत पोहोचताना तुमच्या आजू-बाजूला दुकानांची रेल-चेल दिसते, काही माणसं लहान मुलांना घोड्यावर बसून छोटसं चक्कर मारताना दिसतात, एयर गन घेऊन फुगे फोडणारे स्टॉल पण आहेत. अर्थात लक्ष वेधून घेतं ते 'मक्के की रोटी - टमाटर की चटनी' च दुकान !!

राजेंद्रगिरीवर 'मक्के की रोटी और टमाटर की चटनी'

अब आया मजा !!

आम्ही सर्वच त्या दुकानात जाऊन पाहिलं तर एक महिला अगदी हसत मुखाने 'मक्के कि रोटी' थापून चुलीवर तयार करत होती आणि तिचा नवरा सर्वांना त्या गरम- गरम रोटी चटणीसोबत सर्व्ह करत होता. एकदम 'रूरल टच' वाटत होता. ती रोटी चुलीवर तयार होतानाचा सुगंध, तिथे पसरलेला धूर आणि सोबत चटणीची फोडणी असं दृश्य पाहिल्यावर आमच्या सर्वांच्या तोंडाला पाणीच सुटलं.

Bee Fall Experience

आणि त्याच वेळेस पाऊस सुद्धा पडत होता.
मग काय ?.. नेकि और पूछ पूछ ... ?
भाई ऐसा मौका कौन हाथ से जाने देगा ?

मक्के कि रोटी आणि चटणीवर तर ताव मारलाच सोबत गरम-गरम भज्यांची फर्माईश केली आणि ते सुद्धा खाल्ले !! चांगलाच तास-दीड तास आम्ही 'राजेंद्रगिरी' वर होतो.. आमच्या पंचमढी मुक्कामातला सर्वात सात्विक अनुभव आम्हाला घेता आला. तसं पाहिलं तर 'मक्के की रोटी' आणि 'सरसो का साग' असं कॉम्बिनेशन असतं पण इथे चेंज म्हणून 'टमाटर की चटनी' भलताच भाव खाऊन गेली.

राजेंद्रगिरीवर 'मक्के की रोटी और टमाटर की चटनी' 

हे सर्व कोणी प्रेमानी गरम- गरम सर्व्ह करत असेल तर त्या 'जरा हटके' अनुभवाची 'वॅल्यू' अजून वाढते !! त्या दुकानातली हीच जमेची बाजू होती असं मला इथे सांगावंस वाटतं.. आपण पर्यटक म्हणून जिथेही जातो तिथे शक्यतोवर थोडं वेगळा अनुभव घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे..

या ट्रीपवरुन परतताना रस्त्यात कणीस भाजताना दिसल्यावर कार थांबवून तो खाण्याचा आनंद आम्ही घेतला. तामिया घाटावर चढून गेल्यावर तिथल्या रेस्ट हाऊसच्या समोर असलेलं विहंगम दृश्य आम्ही चहा पिताना आपल्या डोळ्यात साठवून घेतलं. महाराष्ट्रात आल्यावर एक गावातून जाताना रस्त्यात भरलेल्या बाजारात कच्चा चिवडा खाल्ला.

पंचमढीच्या ट्रीपला पाच वर्षे झाली. आज सहज त्या ट्रीपचे फोटो पाहताना मुलांनी केलेली मजा मला आठवली आणि नकळत मी फ्लॅशबॅक मध्ये गेलो !!

कमेंट्स मध्ये आपले मत / अनुभव नक्की कळवा!


अमित नासेरी
लेखक
पर्यटन क्षेत्रात सल्लागार म्हणून २२ वर्षांपासून कार्यरत

Comments

  1. Great experience

    ReplyDelete
  2. chhan anubhav lihila ahe <3

    ReplyDelete
  3. रिमझिम पाऊस सोबत कांदा भाजी, makke की roti, tamatar chatani. मस्त.

    ReplyDelete
  4. पाचमढी ही एक अत्यंत छान जागा आहे

    ReplyDelete

Post a Comment

🌍✍️ तुमचं मत नक्की कळवा. तुमची ओळख न सांगताही तुमचा अभिप्राय देऊ शकता.

🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
आजचा मराठी शब्दआजचा प्रश्न
या शब्दाचा अर्थ काय आहे?तुम्हाला याचे उत्तर माहीत आहे का?
उत्तरासाठी कार्ड उलटा
अर्थउत्तर
उगमअधिक माहिती
समानार्थीश्रेणी
वाक्यात उपयोग
WhatsUp मराठी पुन्हा उलटा
जानेवारी|फेब्रुवारी|मार्च|एप्रिल|मे|जून|जुलै|ऑगस्ट|सप्टेंबर|ऑक्टोबर|नोव्हेंबर|डिसेंबर
WORD|अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
WORD|लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
WORD|नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|डोंगरातील पाणी नितळ आहे.
WORD|तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
WORD|रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
WORD|ओंजळ|दोन्ही हातांचा केलेला कप्पा|देशज मराठी|हातभर|त्याने ओंजळीत पाणी घेतले.
WORD|हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|हळुवार वारा वाहत होता.
WORD|मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|तिचा आवाज मंजुळ आहे.
WORD|मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|पहिल्या सरीनंतर मृद्गंध दरवळला.
WORD|आभाळमाया|असीम, अपार प्रेम|देशज मराठी|अपार माया|आईची आभाळमाया विसरता येत नाही.
WORD|धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|तो संगीतात धुंद झाला.
WORD|झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|संध्याकाळी थंड झुळूक आली.
WORD|नभ|आकाश|संस्कृत|गगन|पहाटे नभ निरभ्र होते.
WORD|उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|त्याला आनंदाचा उमाळा आला.
WORD|साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|ती साजिरी दिसत होती.
WORD|गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
WORD|कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|फटीतून सूर्याचा कवडसा पडला.
WORD|जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
WORD|लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|गाण्याची लय सुंदर होती.
WORD|कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|फुलदाणीत कोमेजलेली फुले दिसत होती.
WORD|दरवळ|पसरणारा मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|चाफ्याचा दरवळ पसरला.
WORD|सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|सावळ्या ढगांनी आकाश भरले.
WORD|सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|तिचा चेहरा सतेज दिसत होता.
WORD|मधुमालती|सुगंधी फुलांची वेल|संस्कृत|फुलवेल|अंगणात मधुमालती फुलली होती.
WORD|गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
WORD|हुरहूर|मनातील अस्वस्थ ओढ|देशज मराठी|व्याकुळता|जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
WORD|निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
WORD|तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
WORD|मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
WORD|लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|दिव्याची ज्योत लवलवत होती.
WORD|उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|तरुणांमध्ये नवी उमेद आहे.
WORD|गोजिरी|नाजूक व सुंदर|देशज मराठी|साजिरी|गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
WORD|मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|आंब्याला मोहोर आला आहे.
WORD|अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|गावचा चहा अमृततुल्य लागतो.
WORD|झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|मंदिरातील घंटांचा झंकार झाला.
WORD|सहजसुंदर|नैसर्गिकरीत्या सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
WORD|आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|पहाटेचा आसमंत शांत होता.
WORD|सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
WORD|निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|डोंगरातून निर्झर वाहत होता.
WORD|नादमय|संगीताने भरलेला|संस्कृत|सुरेल|सभागृह नादमय झाले.
WORD|मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
WORD|स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|संगीताचे स्पंदन जाणवत होते.
WORD|चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
WORD|मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|मृदुल वाळूवर पावले उमटली.
WORD|अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|ती अलवार हसली.
WORD|स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|पक्षी स्वैर उडत होते.
WORD|सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|फुलांची सुरभि दरवळली.
WORD|दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|तिच्या डोळ्यांत वेगळीच दीप्ती होती.
WORD|प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|अंगणात प्राजक्त फुलला होता.
WORD|निरभ्र|ढगविरहित, पूर्ण स्वच्छ|संस्कृत|स्वच्छ|निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?|रायगड|६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातून वाहणारी सर्वात लांब नदी कोणती?|गोदावरी|त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे उगम पावणारी गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी असून तिला 'दक्षिण गंगा' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली?|१ मे १९६०|संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये अस्तित्वात आली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?|कळसूबाई|अहिल्यानगर जिल्ह्यातील हे शिखर सुमारे १,६४६ मीटर उंच असून ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे.|भूगोल
GK|संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' कोणत्या गावी लिहिली?|नेवासे|अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथे भगवद्गीतेवरील ही मराठी टीका लिहिली गेली.|संस्कृती
GK|लोणार सरोवर कशामुळे तयार झाले?|उल्कापातामुळे|बुलढाणा जिल्ह्यातील हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बेसाल्ट खडकात उल्का आदळून तयार झालेले जगातील दुर्मीळ सरोवर आहे.|भूगोल
GK|तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला?|सिंहगड (कोंढाणा)|१६७० मधील या लढाईत तानाजी धारातीर्थी पडले; 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार प्रसिद्ध आहेत.|इतिहास
GK|अफझलखानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला?|प्रतापगड|१६५९ मध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाजवळ ही ऐतिहासिक भेट व संघर्ष घडला.|इतिहास
GK|मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?|दर्पण|बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये 'दर्पण' सुरू केले; त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक मानले जाते.|संस्कृती
GK|'केसरी' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?|लोकमान्य बाळ गंगाधर टिळक|१८८१ मध्ये मराठीतून 'केसरी' आणि इंग्रजीतून 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू झाली.|इतिहास
GK|'सत्यशोधक समाज' कोणी स्थापन केला?|महात्मा जोतिराव फुले|२४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात स्थापन झालेली ही संस्था सामाजिक समतेसाठी कार्यरत होती.|इतिहास
GK|'श्यामची आई' या पुस्तकाचे लेखक कोण?|साने गुरुजी|पांडुरंग सदाशिव साने यांनी नाशिकच्या कारागृहात हे पुस्तक लिहिले.|साहित्य
GK|'नटसम्राट' या गाजलेल्या नाटकाचे लेखक कोण?|वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)|कुसुमाग्रजांना १९८७ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.|साहित्य
GK|मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा होतो?|२७ फेब्रुवारी|कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.|संस्कृती
GK|वेरूळ येथील कैलास लेणे कोणत्या राजवटीत कोरले गेले?|राष्ट्रकूट|एकाच अखंड खडकात वरून खाली कोरलेले हे मंदिर जगातील स्थापत्यशास्त्रीय आश्चर्य मानले जाते.|इतिहास
GK|अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?|छत्रपती संभाजीनगर|बौद्ध चित्रकला व शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेली ही लेणी युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहेत.|पर्यटन
GK|एलिफंटा लेणी कोणत्या देवतेला समर्पित आहेत?|शिव|मुंबईजवळील घारापुरी बेटावरील त्रिमूर्ती शिल्प जगप्रसिद्ध आहे.|पर्यटन
GK|महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत?|पाच|भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ — बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत.|संस्कृती
GK|अष्टविनायक म्हणजे किती गणपती मंदिरे?|आठ|पुणे, रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विखुरलेली ही आठ स्वयंभू गणपती मंदिरे आहेत.|संस्कृती
GK|कृष्णा नदीचा उगम कोठे होतो?|महाबळेश्वर|सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्या उगम पावतात.|भूगोल
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?|शिवनेरी|पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या या किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी त्यांचा जन्म झाला.|इतिहास
GK|संत तुकाराम महाराजांचे गाव कोणते?|देहू|पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीकाठचे देहू हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.|संस्कृती
GK|संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?|आळंदी|पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली.|संस्कृती
GK|सेवाग्राम आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?|वर्धा|महात्मा गांधींनी १९३६ मध्ये येथे वास्तव्य सुरू केले; हे स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्वाचे केंद्र ठरले.|इतिहास
GK|पवनार आश्रम कोणाशी संबंधित आहे?|आचार्य विनोबा भावे|वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून विनोबांनी भूदान चळवळीचे कार्य केले.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते?|ताडोबा|चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा १९५५ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झाले; पुढे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तयार झाला.|वन्यजीव
GK|'संत्रानगरी' म्हणून कोणते शहर ओळखले जाते?|नागपूर|संत्र्यांच्या व्यापारामुळे मिळालेले हे नाव; नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.|भूगोल
GK|महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणते शहर मानले जाते?|पुणे|शिक्षण, साहित्य, नाट्य आणि संगीत परंपरेमुळे पुण्याला हे स्थान मिळाले आहे.|संस्कृती
GK|रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते?|रायरी|शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केली.|इतिहास
GK|पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?|१७६१|मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यातील या लढाईचा मराठा साम्राज्यावर मोठा परिणाम झाला.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेचे नाव काय?|जिजाबाई|जिजाऊंनी शिवरायांवर स्वराज्याचे संस्कार केले; त्यांना राजमाता म्हणून ओळखले जाते.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळ घोषित झाले?|२००४|व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतील ही वास्तू मुंबईचे प्रतीक मानली जाते.|पर्यटन
GK|गेट वे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे?|मुंबई|१९२४ मध्ये पूर्ण झालेली ही वास्तू अरबी समुद्राच्या काठी उभी आहे.|पर्यटन
GK|'लोकहितवादी' या टोपणनावाने कोण लेखन करत असत?|गोपाळ हरी देशमुख|त्यांच्या 'शतपत्रे' या लेखमालेने एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारणेला दिशा दिली.|साहित्य
GK|मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?|वि. स. खांडेकर|'ययाति' या कादंबरीसाठी १९७४ मध्ये त्यांना हा सन्मान मिळाला.|साहित्य
GK|जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?|गोदावरी|छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या धरणाच्या जलाशयाला 'नाथसागर' म्हणतात.|भूगोल
GK|कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?|सातारा|जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या धरणाच्या जलाशयाला 'शिवसागर' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते?|ताम्हण (जारूळ)|जांभळ्या रंगाची ही फुले पावसाळ्यात सह्याद्रीत मोठ्या प्रमाणात दिसतात.|निसर्ग
GK|महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?|शेकरू|मोठी उडणारी खार असलेला शेकरू भीमाशंकर अभयारण्यात प्रामुख्याने आढळतो.|वन्यजीव
GK|कास पठार कशासाठी प्रसिद्ध आहे?|रानफुलांच्या बहरासाठी|सातारा जिल्ह्यातील हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ पावसाळ्यानंतर फुलांच्या गालिच्यासाठी ओळखले जाते.|पर्यटन
GK|भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी ओळखले जाते?|शेकरू|पुणे जिल्ह्यातील हे अभयारण्य ज्योतिर्लिंगासाठीही प्रसिद्ध आहे.|वन्यजीव

अजून इंटरेस्टिंग...

विदर्भात समुद्र होता तेव्हा...! | Author: Prof Suresh Chopne | Ocean in Vidarbha Maharashtra? | Heritage Tourism | Maharashtra Tourism

श्रीकृष्णाच्या नगरीत... द्वारकाधीशांच्या चरणी, भाग १ | Author: Mrs. Manik Joshi | Dwarkadheesh Temple | Heritage Tourism | Incredible India

चंद्रपूर: निसर्ग, इतिहास, संस्कृती, लोकजीवन आणि वारशाचा समृद्ध पर्यटनपट | Author: Dr. Pallavi Tajne | Chandrapur Culture and Heritage | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism

महाराष्ट्रातील डार्क स्काय पर्यटन, शहरी गोंगाटापासून दूर, आकाशाच्या कुशीत | Dark Sky Tourism | Astro Tourism | Maharashtra Tourism Policy

भारताचा प्राचीन 'सिल्क रूट’ नाणेघाट | Author: Narendra Chandewar | Silk Route of India, Naneghat | Maharashtra Tourism

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

गोठवणाऱ्या थंडीत आयफेल टॉवरचा अद्‌भूत नजारा... पुस्तकांच्या पलीकडे, जगाच्या जवळ | Author: Yash Naseri | Eiffel Tower Paris | International & Global Tourism

भामरागडमध्ये जलक्रांतीतून निर्मित ‘तलावांचे जाळे’ | अनिकेत प्रकाश आमटे | लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte

विदर्भातही येऊन गेले होते गौतम बुद्ध: विदर्भातील बौद्ध सर्किट | Vidarbha Buddhist Circuit Travel Guide

भटाळा गावात आहे ‘भोंडा महादेव’ | Author: Himgauri Deshpande | Bhonda Mahadev Temple Bhatala | Temples of Vidarbha | Temples of Maharashtra