कोराडीचे महालक्ष्मी जगदंबा मंदिर : धार्मिक पर्यटन आणि विकासाचा नवा अध्याय | Author: Ram Bhakre | Koradi Mahalaxmi Jagdamba Temple | Temples in Vidarbha | Temples in Maharashtra

नागपूर जिल्ह्यातील कोराडीस्थित प्रसिद्ध महालक्ष्मी जगदंबा मंदिर हे विदर्भातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. देवी महालक्ष्मी-जगदंबेच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. आता या पवित्र धार्मिक स्थळाचा विकास केवळ मंदिरापुरता मर्यादित न राहता धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचे केंद्र म्हणून होत आहे. 

विविध विकास प्रकल्पांमुळे कोराडी परिसराला आधुनिक पर्यटन स्थळाचे स्वरूप प्राप्त होत असून, भविष्यात हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक आणि मनोरंजन केंद्र म्हणून उदयास येण्याची चिन्हे दिसत आहेत.

Mahalaxmi Jagdamba Devi Temple

१६२ फूट उंच हनुमानाची भव्य मूर्ती

कोराडी मंदिर परिसरात साकारली जात असलेली तब्बल १६२ फूट उंचीची भगवान श्री हनुमान यांची भव्य मूर्ती सर्वात मोठा आकर्षणबिंदू ठरणार आहे. देशातील सर्वात उंच हनुमान मूर्तींपैकी एक असलेल्या या स्मारकामुळे कोराडीची ओळख राष्ट्रीय स्तरावर निर्माण होणार आहे. धार्मिक श्रद्धा आणि भव्य वास्तुकलेचा मिलाफ या माध्यमातून अनुभवता येणार आहे. फाउंडेशनपासून २०६ फूट उंचीची ही मूर्ती असून प्रत्यक्ष मूर्तीचा आकार १६२ फूट आहे. या ठिकाणी “सेव्हन-डी हनुमान चालीसा प्रोजेक्शन” करण्यात येणार असून भाविकांना हनुमानजींची विविध रूपं अनुभवता येणार आहेत. मूर्तीखाली हनुमानजींच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंगांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

Revenue Minister Govt. of Maharashtra, Chandrashekhar Bawankule ji at Koradi Temple

सामाजिक आणि आर्थिक उपक्रम | Social and Economic Initiatives by Government of Maharashtra

महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडीच्या माध्यमातून संस्थानचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री तसेच नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातही अनेक उपक्रम राबविले जात आहेत. स्वामिनी महिला सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. कलमकारी प्रकल्पांतर्गत शेकडो महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, अगरबत्ती उत्पादन युनिटमुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण घडत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विवाहयोग्य जोडप्यांसाठी आर्थिक सहाय्य देण्याचा उपक्रमही संस्थानमार्फत राबविला जात आहे. त्यामुळे धार्मिक संस्थेने सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण निर्माण केले आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमार्फत कोराडी परिसरात जागतिक दर्जाचा अम्युझमेंट पार्क आणि डायनासोर पार्क विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा उद्देश मनोरंजन, शिक्षण, पर्यटन आणि कौटुंबिक आनंद यांचा संगम घडवून आणणे हा आहे. यामुळे कोराडी परिसरातील पर्यटन क्षमतेत मोठी वाढ होणार असून सर्व वयोगटातील पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Mahalaxmi Jagdamba Devi Temple

डायनासोर पार्क

डायनासोर पार्क हा या प्रकल्पातील विशेष आकर्षण ठरणार आहे. येथे ३५ विविध प्रजातींचे जिवंत आकाराचे ॲनिमेट्रॉनिक डायनासोर उभारले जाणार आहेत. वास्तववादी ध्वनी प्रभाव, हालचाली, शैक्षणिक माहिती फलक आणि हिरव्यागार वातावरणामुळे मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि कुटुंबांसाठी हा एक रोमांचक आणि ज्ञानवर्धक अनुभव ठरेल. रात्रीच्या वेळी आकर्षक प्रकाशयोजनेमुळे या परिसराचे सौंदर्य अधिक खुलून दिसणार आहे. अम्युझमेंट पार्कमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मनोरंजन राईड्सची सुविधा असणार आहे. फ्रिसबी, स्विंग चेअर, सुनामी, सुपर जेट, झायक्लोन, लूप स्टारशिप आणि भूलभुलैया यांसारख्या राईड्स पर्यटकांना रोमांचकारी अनुभव देतील. मुलांपासून तरुणांपर्यंत आणि कुटुंबांपासून पर्यटकांपर्यंत सर्वांसाठी आनंद आणि मनोरंजनाची पर्वणी येथे उपलब्ध होणार आहे.

या संपूर्ण प्रकल्पात आधुनिक पायाभूत सुविधांनाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. प्रगत CCTV यंत्रणा, सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली, प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी आणि अग्निसुरक्षा व्यवस्था यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाणार आहे. डिजिटल प्रवेश पास, ऑनलाइन बुकिंग आणि स्मार्ट तिकीट स्कॅनिंग प्रणालीमुळे प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ आणि आधुनिक होणार आहे. तसेच बागा, सजावटीची प्रकाशयोजना, पादचारी मार्ग आणि बसण्याच्या सुविधा यामुळे परिसर अधिक आकर्षक बनणार आहे. प्रकल्पामध्ये भव्य प्रवेशद्वार उभारले जाणार असून ते साहस आणि प्रागैतिहासिक युगाच्या संकल्पनांचा सुंदर मिलाफ सादर करेल. याशिवाय पर्यटकांसाठी आधुनिक फूड कोर्टची सुविधा उपलब्ध होणार आहे. विविध खाद्यपदार्थ, स्वच्छ पिण्याचे पाणी, कुटुंबांसाठी बसण्याची व्यवस्था आणि स्वच्छ अन्न प्रक्रिया क्षेत्रांमुळे पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध होईल.कोराडी परिसरातील विकास केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकासालाही गती देणारा आहे.

कोराडी तलावाचे सौंदर्यीकरण | Koradi Lake Beautification

Koradi Lake

कोराडी ते नागपूर मुख्य मार्गाचे रुंदीकरण आणि डांबरीकरण, अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण, पाणीपुरवठा योजना आणि वीज वितरण यंत्रणेचे आधुनिकीकरण यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. कोराडी तलावाचे सौंदर्यीकरण आणि तलाव परिसराचा विकास करून पर्यटनाला चालना दिली जात आहे. महादुला परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्याचे कार्य सुरू असून सामाजिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच भारतीय विद्या भवन यांनी उभारलेल्या सांस्कृतिक केंद्रामुळे भारतीय संस्कृती, परंपरा आणि देशभक्तीची भावना तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले जात आहे. महालक्ष्मी जगदंबा संस्थानमार्फत आयोजित नि:शुल्क महा आरोग्य शिबिरांमुळे ग्रामीण आणि परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होत आहेत. डिजिटल शिक्षण साधने, शैक्षणिक सुविधा, युवकांसाठी क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम, लघुउद्योगांना प्रोत्साहन आणि स्थानिक रोजगार निर्मिती यामुळे कोराडी परिसर सर्वांगीण विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. धार्मिक श्रद्धा, आधुनिक पर्यटन, रोजगार निर्मिती, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक जतन यांचा सुंदर संगम म्हणजे कोराडीचा विकास प्रकल्प होय. भविष्यात कोराडी हे केवळ देवीच्या दर्शनासाठी नव्हे, तर धार्मिक पर्यटन, कौटुंबिक मनोरंजन आणि आधुनिक विकासाचे प्रेरणादायी केंद्र म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात विशेष ओळख निर्माण करेल, यात शंका नाही.

श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर, स्वयंभू जागृत शक्तिपीठ

३५० वर्षे जुने स्वयंभू जागृत शक्तिपीठ

नागपूरपासून १४ किमी अंतरावर असलेले कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर हे ३०० ते ३५० वर्षे जुने स्वयंभू जागृत शक्तिपीठ आहे. सुमारे १५० एकर परिसरात वसलेले महालक्ष्मी जगदंबेचे भव्य व सुंदर मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. विदर्भाची कुलस्वामिनी अशी या देवीची ख्याती आहे. नवरात्रीच्या काळात देवीच्या दर्शनाला १५ ते २० लाख भाविक येतात, अशी येथे नोंद आहे.

आख्यायिकेनुसार हजारो वर्षांपूर्वी या परिसरात जाखापूर नावाचे राज्य होते व तेथे झोलन राजा राज्य करीत असे. महापराक्रमी व बुद्धिमान असणाऱ्या या राजाला ७ पुत्र होते; परंतु त्याला कन्यारत्न हवे होते. यासाठी राजाने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतले. ब्रह्मदेवाने तुझ्या पोटी साक्षात महालक्ष्मी जन्म घेईल, असा वर दिला. काही दिवसांनी झोलन राजाच्या पत्नीला सुंदर कन्यारत्न झाले. ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे तिचे नामकरण महालक्ष्मी असे करण्यात आले. दिवसेंदिवस महालक्ष्मी मोठी होत होती. एकदा अचानक जाखापूर राज्यावर शेजारी राज्याकडून आक्रमण झाले. यावेळी मलाही युद्धभूमीवर घेऊन चला, असा आग्रह महालक्ष्मीने वडिलांकडे केला. लाडक्या मुलीचा हट्ट राजाला टाळता येईना म्हणून तो तिला स्वतः सोबत युद्धभूमीवर घेऊन गेला. घनघोर युद्ध सुरू असताना महालक्ष्मीने सांगितल्याप्रमाणे राजाने डावपेच टाकले आणि त्याचा या युद्धात विजय झाला.

विजयश्री मिळाल्यानंतर झोलन राजा राजकन्या महालक्ष्मीसह जाखापूर येथे परतत असताना महालक्ष्मीने त्यांना सांगितले की या प्रवासात ज्या ठिकाणी सूर्य मावळेल तेथेच मी थांबेन. त्यापुढे येणार नाही. त्याप्रमाणे कोराडी येथे आल्यानंतर सूर्य मावळला व महालक्ष्मी येथेच थांबून गुप्त झाली. ज्या ठिकाणी महालक्ष्मी गुप्त झाली त्याच ठिकाणी महालक्ष्मी देवीची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. तीच स्वयंभू मूर्ती आज कोराडी येथील महालक्ष्मी मंदिरात प्रतिष्ठापित आहे.

१७ व्या शतकात भोसले राजघराण्याच्या अखत्यारित हे मंदिर होते, त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आहे. मंदिराचा परिसर प्रशस्त असून तेथील वाहनतळावर एकाच वेळी हजारो वाहने उभी राहू शकतात. वाहनतळापासून मंदिराच्या मुख्य प्रवेश कमानीपर्यंतच्या मार्गावर शेकडो पूजासाहित्याची दुकाने आहेत. विदर्भात कोराडी येथील रांगोळी प्रसिद्ध असून मंदिर परिसरात असलेल्या शेकडो दुकानांमधून रांगोळीची विक्री होत असते. वृद्ध व अपंगांसाठी मंदिर समितीतर्फे मंदिरापर्यंत जाण्यासाठी खास वाहनांची सुविधा उपलब्ध केली आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार भव्य व वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर तेथे एक सुंदर उद्यान विकसित करण्यात आलेले पाहायला मिळते. रात्रीच्या वेळी मंदिरासह संपूर्ण परिसरात रोषणाई करण्यात येते.

Koradi Devi Temple, Koradi, Nagpur

हेमाडपंती बांधकाम

मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंती शैलीचे आहे. मंदिरातील खांब हे कलाकुसरीने युक्त आहेत. दर्शनमंडप, सभामंडप व गाभारा अशी मंदिराची रचना आहे. भव्य अशा सभामंडपाच्या मध्यभागी असलेल्या गाभाऱ्यात देवीचे स्थान आहे. या गाभाऱ्यात चांदीची सजावट असून चांदीच्या मखरातच देवीची मूर्ती आहे. ही मूर्ती ३ फूट उंचीची आहे. मूर्ती चतुर्भुज असून तिच्या हातांमध्ये त्रिशूळ, खड्ग, डमरू आणि धनुष्य आहेत. मूर्तीला चांदीचा मुखवटा लावण्यात आलेला आहे; परंतु मूळ दगडी मूर्तीच्या चेहऱ्याकडे पाहिल्यास सकाळी कन्या रूपात, दुपारी तरुण किंवा युवा रूपात आणि सायंकाळी प्रौढ किंवा वृद्ध रूपात दर्शन होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. नवरात्रीच्या दिवसांत भाविकांना या देवीच्या मूळ रुपाचे दर्शन घडविले जाते. या मंदिरापासून १ कि.मी. अंतरावर असलेल्या टेकडीवर तिचा भाऊ दत्तासूर यांचे मंदिर आहे.

उंच दीपमाळ

मंदिर परिसरात उंच दीपमाळ असून शिव–पार्वती आणि नंदी, गणेश व दक्षिणमुखी हनुमान यांच्या मूर्ती आहेत. मंदिरासमोरच भलामोठा औदुंबर वृक्ष आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून १० दिवस येथे देवीचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. यावेळी देवीच्या समोर असंख्य घट मांडून त्यावर मनोकामना दीपज्योती लावण्यात येतात. याची संख्या सुमारे १०,००० इतकी असते. नवसपूर्तीनिमित्त अशा अखंड दीपज्योती लावण्याची येथे प्रथा आहे.


Koradi Temple

कसे पोहोचाल | How to plan trip to Koradi Mahalaxmi Jagdamba Temple near Nagpur

नागपूरपासून १४ किमी, तर कामठीपासून १२ किमी अंतरावर आहे. नागपूर, कामठीपासून कोराडीसाठी एसटीची सुविधा आहे. खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात. श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत भक्तांसाठी खुले असते.

तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️

राम भाकरे
लेखक, ज्येष्ठ पत्रकार

Comments

  1. छान माहिती 🌺🌺

    ReplyDelete
  2. धार्मिक पर्यटनातून रोजगार संधीसाठी चांगला पुढाकार

    ReplyDelete
  3. nice writing by mr. bhakre

    ReplyDelete
  4. good writing, i want to visit koradi temple

    ReplyDelete
  5. छान लिखाण

    ReplyDelete
  6. Ram bhakre ji chhan lihilay

    ReplyDelete

Post a Comment

🌍✍️ तुमचं मत नक्की कळवा. तुमची ओळख न सांगताही तुमचा अभिप्राय देऊ शकता.

🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
आजचा मराठी शब्दआजचा प्रश्न
या शब्दाचा अर्थ काय आहे?तुम्हाला याचे उत्तर माहीत आहे का?
उत्तरासाठी कार्ड उलटा
अर्थउत्तर
उगमअधिक माहिती
समानार्थीश्रेणी
वाक्यात उपयोग
WhatsUp मराठी पुन्हा उलटा
जानेवारी|फेब्रुवारी|मार्च|एप्रिल|मे|जून|जुलै|ऑगस्ट|सप्टेंबर|ऑक्टोबर|नोव्हेंबर|डिसेंबर
WORD|अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
WORD|लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
WORD|नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|डोंगरातील पाणी नितळ आहे.
WORD|तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
WORD|रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
WORD|ओंजळ|दोन्ही हातांचा केलेला कप्पा|देशज मराठी|हातभर|त्याने ओंजळीत पाणी घेतले.
WORD|हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|हळुवार वारा वाहत होता.
WORD|मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|तिचा आवाज मंजुळ आहे.
WORD|मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|पहिल्या सरीनंतर मृद्गंध दरवळला.
WORD|आभाळमाया|असीम, अपार प्रेम|देशज मराठी|अपार माया|आईची आभाळमाया विसरता येत नाही.
WORD|धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|तो संगीतात धुंद झाला.
WORD|झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|संध्याकाळी थंड झुळूक आली.
WORD|नभ|आकाश|संस्कृत|गगन|पहाटे नभ निरभ्र होते.
WORD|उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|त्याला आनंदाचा उमाळा आला.
WORD|साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|ती साजिरी दिसत होती.
WORD|गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
WORD|कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|फटीतून सूर्याचा कवडसा पडला.
WORD|जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
WORD|लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|गाण्याची लय सुंदर होती.
WORD|कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|फुलदाणीत कोमेजलेली फुले दिसत होती.
WORD|दरवळ|पसरणारा मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|चाफ्याचा दरवळ पसरला.
WORD|सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|सावळ्या ढगांनी आकाश भरले.
WORD|सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|तिचा चेहरा सतेज दिसत होता.
WORD|मधुमालती|सुगंधी फुलांची वेल|संस्कृत|फुलवेल|अंगणात मधुमालती फुलली होती.
WORD|गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
WORD|हुरहूर|मनातील अस्वस्थ ओढ|देशज मराठी|व्याकुळता|जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
WORD|निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
WORD|तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
WORD|मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
WORD|लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|दिव्याची ज्योत लवलवत होती.
WORD|उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|तरुणांमध्ये नवी उमेद आहे.
WORD|गोजिरी|नाजूक व सुंदर|देशज मराठी|साजिरी|गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
WORD|मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|आंब्याला मोहोर आला आहे.
WORD|अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|गावचा चहा अमृततुल्य लागतो.
WORD|झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|मंदिरातील घंटांचा झंकार झाला.
WORD|सहजसुंदर|नैसर्गिकरीत्या सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
WORD|आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|पहाटेचा आसमंत शांत होता.
WORD|सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
WORD|निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|डोंगरातून निर्झर वाहत होता.
WORD|नादमय|संगीताने भरलेला|संस्कृत|सुरेल|सभागृह नादमय झाले.
WORD|मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
WORD|स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|संगीताचे स्पंदन जाणवत होते.
WORD|चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
WORD|मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|मृदुल वाळूवर पावले उमटली.
WORD|अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|ती अलवार हसली.
WORD|स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|पक्षी स्वैर उडत होते.
WORD|सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|फुलांची सुरभि दरवळली.
WORD|दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|तिच्या डोळ्यांत वेगळीच दीप्ती होती.
WORD|प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|अंगणात प्राजक्त फुलला होता.
WORD|निरभ्र|ढगविरहित, पूर्ण स्वच्छ|संस्कृत|स्वच्छ|निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?|रायगड|६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातून वाहणारी सर्वात लांब नदी कोणती?|गोदावरी|त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे उगम पावणारी गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी असून तिला 'दक्षिण गंगा' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली?|१ मे १९६०|संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये अस्तित्वात आली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?|कळसूबाई|अहिल्यानगर जिल्ह्यातील हे शिखर सुमारे १,६४६ मीटर उंच असून ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे.|भूगोल
GK|संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' कोणत्या गावी लिहिली?|नेवासे|अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथे भगवद्गीतेवरील ही मराठी टीका लिहिली गेली.|संस्कृती
GK|लोणार सरोवर कशामुळे तयार झाले?|उल्कापातामुळे|बुलढाणा जिल्ह्यातील हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बेसाल्ट खडकात उल्का आदळून तयार झालेले जगातील दुर्मीळ सरोवर आहे.|भूगोल
GK|तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला?|सिंहगड (कोंढाणा)|१६७० मधील या लढाईत तानाजी धारातीर्थी पडले; 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार प्रसिद्ध आहेत.|इतिहास
GK|अफझलखानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला?|प्रतापगड|१६५९ मध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाजवळ ही ऐतिहासिक भेट व संघर्ष घडला.|इतिहास
GK|मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?|दर्पण|बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये 'दर्पण' सुरू केले; त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक मानले जाते.|संस्कृती
GK|'केसरी' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?|लोकमान्य बाळ गंगाधर टिळक|१८८१ मध्ये मराठीतून 'केसरी' आणि इंग्रजीतून 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू झाली.|इतिहास
GK|'सत्यशोधक समाज' कोणी स्थापन केला?|महात्मा जोतिराव फुले|२४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात स्थापन झालेली ही संस्था सामाजिक समतेसाठी कार्यरत होती.|इतिहास
GK|'श्यामची आई' या पुस्तकाचे लेखक कोण?|साने गुरुजी|पांडुरंग सदाशिव साने यांनी नाशिकच्या कारागृहात हे पुस्तक लिहिले.|साहित्य
GK|'नटसम्राट' या गाजलेल्या नाटकाचे लेखक कोण?|वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)|कुसुमाग्रजांना १९८७ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.|साहित्य
GK|मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा होतो?|२७ फेब्रुवारी|कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.|संस्कृती
GK|वेरूळ येथील कैलास लेणे कोणत्या राजवटीत कोरले गेले?|राष्ट्रकूट|एकाच अखंड खडकात वरून खाली कोरलेले हे मंदिर जगातील स्थापत्यशास्त्रीय आश्चर्य मानले जाते.|इतिहास
GK|अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?|छत्रपती संभाजीनगर|बौद्ध चित्रकला व शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेली ही लेणी युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहेत.|पर्यटन
GK|एलिफंटा लेणी कोणत्या देवतेला समर्पित आहेत?|शिव|मुंबईजवळील घारापुरी बेटावरील त्रिमूर्ती शिल्प जगप्रसिद्ध आहे.|पर्यटन
GK|महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत?|पाच|भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ — बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत.|संस्कृती
GK|अष्टविनायक म्हणजे किती गणपती मंदिरे?|आठ|पुणे, रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विखुरलेली ही आठ स्वयंभू गणपती मंदिरे आहेत.|संस्कृती
GK|कृष्णा नदीचा उगम कोठे होतो?|महाबळेश्वर|सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्या उगम पावतात.|भूगोल
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?|शिवनेरी|पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या या किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी त्यांचा जन्म झाला.|इतिहास
GK|संत तुकाराम महाराजांचे गाव कोणते?|देहू|पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीकाठचे देहू हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.|संस्कृती
GK|संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?|आळंदी|पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली.|संस्कृती
GK|सेवाग्राम आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?|वर्धा|महात्मा गांधींनी १९३६ मध्ये येथे वास्तव्य सुरू केले; हे स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्वाचे केंद्र ठरले.|इतिहास
GK|पवनार आश्रम कोणाशी संबंधित आहे?|आचार्य विनोबा भावे|वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून विनोबांनी भूदान चळवळीचे कार्य केले.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते?|ताडोबा|चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा १९५५ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झाले; पुढे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तयार झाला.|वन्यजीव
GK|'संत्रानगरी' म्हणून कोणते शहर ओळखले जाते?|नागपूर|संत्र्यांच्या व्यापारामुळे मिळालेले हे नाव; नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.|भूगोल
GK|महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणते शहर मानले जाते?|पुणे|शिक्षण, साहित्य, नाट्य आणि संगीत परंपरेमुळे पुण्याला हे स्थान मिळाले आहे.|संस्कृती
GK|रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते?|रायरी|शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केली.|इतिहास
GK|पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?|१७६१|मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यातील या लढाईचा मराठा साम्राज्यावर मोठा परिणाम झाला.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेचे नाव काय?|जिजाबाई|जिजाऊंनी शिवरायांवर स्वराज्याचे संस्कार केले; त्यांना राजमाता म्हणून ओळखले जाते.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळ घोषित झाले?|२००४|व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतील ही वास्तू मुंबईचे प्रतीक मानली जाते.|पर्यटन
GK|गेट वे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे?|मुंबई|१९२४ मध्ये पूर्ण झालेली ही वास्तू अरबी समुद्राच्या काठी उभी आहे.|पर्यटन
GK|'लोकहितवादी' या टोपणनावाने कोण लेखन करत असत?|गोपाळ हरी देशमुख|त्यांच्या 'शतपत्रे' या लेखमालेने एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारणेला दिशा दिली.|साहित्य
GK|मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?|वि. स. खांडेकर|'ययाति' या कादंबरीसाठी १९७४ मध्ये त्यांना हा सन्मान मिळाला.|साहित्य
GK|जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?|गोदावरी|छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या धरणाच्या जलाशयाला 'नाथसागर' म्हणतात.|भूगोल
GK|कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?|सातारा|जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या धरणाच्या जलाशयाला 'शिवसागर' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते?|ताम्हण (जारूळ)|जांभळ्या रंगाची ही फुले पावसाळ्यात सह्याद्रीत मोठ्या प्रमाणात दिसतात.|निसर्ग
GK|महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?|शेकरू|मोठी उडणारी खार असलेला शेकरू भीमाशंकर अभयारण्यात प्रामुख्याने आढळतो.|वन्यजीव
GK|कास पठार कशासाठी प्रसिद्ध आहे?|रानफुलांच्या बहरासाठी|सातारा जिल्ह्यातील हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ पावसाळ्यानंतर फुलांच्या गालिच्यासाठी ओळखले जाते.|पर्यटन
GK|भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी ओळखले जाते?|शेकरू|पुणे जिल्ह्यातील हे अभयारण्य ज्योतिर्लिंगासाठीही प्रसिद्ध आहे.|वन्यजीव

अजून इंटरेस्टिंग...

विदर्भात समुद्र होता तेव्हा...! | Author: Prof Suresh Chopne | Ocean in Vidarbha Maharashtra? | Heritage Tourism | Maharashtra Tourism

श्रीकृष्णाच्या नगरीत... द्वारकाधीशांच्या चरणी, भाग १ | Author: Mrs. Manik Joshi | Dwarkadheesh Temple | Heritage Tourism | Incredible India

चंद्रपूर: निसर्ग, इतिहास, संस्कृती, लोकजीवन आणि वारशाचा समृद्ध पर्यटनपट | Author: Dr. Pallavi Tajne | Chandrapur Culture and Heritage | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism

महाराष्ट्रातील डार्क स्काय पर्यटन, शहरी गोंगाटापासून दूर, आकाशाच्या कुशीत | Dark Sky Tourism | Astro Tourism | Maharashtra Tourism Policy

भारताचा प्राचीन 'सिल्क रूट’ नाणेघाट | Author: Narendra Chandewar | Silk Route of India, Naneghat | Maharashtra Tourism

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

गोठवणाऱ्या थंडीत आयफेल टॉवरचा अद्‌भूत नजारा... पुस्तकांच्या पलीकडे, जगाच्या जवळ | Author: Yash Naseri | Eiffel Tower Paris | International & Global Tourism

भामरागडमध्ये जलक्रांतीतून निर्मित ‘तलावांचे जाळे’ | अनिकेत प्रकाश आमटे | लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte

विदर्भातही येऊन गेले होते गौतम बुद्ध: विदर्भातील बौद्ध सर्किट | Vidarbha Buddhist Circuit Travel Guide

भटाळा गावात आहे ‘भोंडा महादेव’ | Author: Himgauri Deshpande | Bhonda Mahadev Temple Bhatala | Temples of Vidarbha | Temples of Maharashtra