विदर्भ म्हटलं की जंगलं, किल्ले किंवा वाघांची सफर आठवते. पण या भूमीत अजून एक शांत, दुर्लक्षित खजिना दडलेला आहे — बौद्ध वारसा. मौर्य काळापासून ते वाकाटक काळापर्यंत विदर्भात बौद्ध धर्माचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर होता. व्यापारी मार्ग, राजाश्रय आणि निसर्गसंपन्न प्रदेश यामुळे येथे अनेक स्तूप, विहार आणि गुंफा निर्माण झाल्या.
विदर्भातील बौद्ध सर्कीटमध्ये आहे तरी काय? | What is Buddha Circuit?
इ.स.च्या पहिल्या-दुसऱ्या शतकात विदर्भातील रामटेक, मनसर, भद्रावती, भोन, अडम, मुलचेरा, पातुर, सालबर्डी, पवनी, मांढळ आदि परिसरात बौद्ध धर्मीयांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. हे सर्व हीनयान पंथाशी संबंधित होते. सातवाहन काळात विदर्भात बौद्ध धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणात होता. गुप्त-वाकाटक काळात बौद्ध धर्माच्या महायान पंथाचा जोर होता. त्याची चिन्हे या भागात दिसून येतात.
Vidarbha Buddhist Circuit
पवनी, अडम, मनसर, भोन आदी ठिकाणी झालेल्या उत्खननात इ.स. पूर्व ४ थ्या व तिसऱ्या शतकापासून ते सातवाहन वाकाटक काळापर्यंत अस्तित्वात असलेल्या स्तुपांचे अवशेष सापडले आहेत. तसेच सालबर्डी गुफा, विजासन लेणी, पातुरची लेणी इत्यादींच्या अभ्यासावरुन प्राचीन काळात विदर्भात बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्याचे दिसून येते. विदर्भातील सर्वात प्राचीन मौर्यकालीन शिलालेख चंद्रपूर जिल्ह्यातील देवटक या ठिकाणी मिळाला आहे. त्यामध्ये सम्राट अशोकाच्या धर्माज्ञा कोरलेल्या आहेत. शुंग काळातही या भागात अनेक चैत्यगृहे आणि विहारांची निर्मिती झाली.
विजासन येथील बुद्ध लेणींचा परिसर १० एकर इतका आहे. यामध्ये टेकडी ५ एकर जमिनीवर वसली आहे. भिक्खु सागत नावाच्या स्थवीराच्या निमंत्रणावरुन भगवान बुद्ध याठिकाणी येऊन गेले व येथूनच ते अंब्यतिथ्यकला येथे गेल्याचे इतिहासकार सांगतात.
सातवाहन काळाच्या सुरुवातीला पवनीत चांडकापूर या महास्तुपाची निर्मिती झाली. दुसऱ्या शतकाच्या प्रारंभी कुषाण महाक्षत्रप रुपीअम्म ने पवनी येथे छायास्तंभ उभारला होता.
जगन्नाथ टेकडी महास्तुप तत्कालीन भारतातील सर्वात मोठ्या स्तुपांपैकी एक होता. तो गौतम बुद्धांच्या अस्थींवर किंवा त्यांच्या एखाद्या प्रसिद्ध शिष्याच्या अस्थींवर बांधला गेला होता,अशी माहिती आहे.
आज या ठिकाणी मोठी पर्यटन गर्दी नाही, पण इतिहास आणि शांतता शोधणाऱ्या प्रवाशांसाठी ही ठिकाणं खूप खास आहेत.
कोणकोणती ठिकाणं पाहावीत? | Tourist Places in Vidarbha Buddhist Circuit
विदर्भातील बौद्ध सर्किटमध्ये काही महत्वाची ठिकाणं आहेत जी तुम्ही explore करू शकता:
क्लिक करून वाचा
ही सर्व ठिकाणं वेगवेगळ्या काळातील बौद्ध प्रभाव दाखवतात — काही ठिकाणी भव्य स्तूप, काही ठिकाणी साध्या गुंफा, तर काही ठिकाणी शिलालेख.
प्रवाशासाठी काय खास?
हा प्रवास “tourism” पेक्षा जास्त experience आहे. इथे मोठे बोर्ड, गाईड्स किंवा गर्दी कमी आहे — पण शांतता, निसर्ग आणि इतिहासाची खोल जाणीव आहे.
प्रत्येक ठिकाणी एक वेगळी कथा आहे — भिक्षूंचं जीवन, व्यापारी मार्ग, राजाश्रय आणि धर्माचा प्रसार.
जर तुम्हाला slow travel, offbeat destinations आणि heritage exploration आवडत असेल, तर Vidarbha Buddhist Circuit तुमच्यासाठी एक परिपूर्ण अनुभव ठरू शकतो.
प्रवास कसा आखाल? | How to Plan Your Trip for Vidarbha Buddhist Circuit
-
सुरुवात: नागपूर (मुख्य केंद्र)
-
कालावधी: 10–15 दिवस
-
सर्वोत्तम वेळ: ऑक्टोबर ते फेब्रुवारी
-
प्रवास: स्वतःची गाडी किंवा रोड ट्रिप सर्वोत्तम
✨ तुम्ही विदर्भातील या बौद्ध स्थळांना भेट दिली आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा!
बुद्ध विदर्भात आले होते हे..
ReplyDeleteछान आर्टिकल
Amazing
ReplyDeleteGreat, खूप नवीन माहिती आहे ही
ReplyDeleteHappy buddha purnima
ReplyDeleteGreat initiative by Whatsup Marathi team.
ReplyDeleteVery interesting articles
ReplyDeleteBuddham sharanam gachami
ReplyDeleteमाहिती चांगली आहे
ReplyDeleteछान माहिती... नव्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा 🌺🌺
ReplyDelete