इथे साक्षात पांडुरंग येतो: विदर्भाचे 'पंढरपूर' धापेवाडा | Pandharpur of Vidarbha 'Dhapewada' | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism

नागपूर जिल्ह्यात कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा या गावाची ‘विदर्भाचे पंढरपूर’ अशी ख्याती आहे. येथील चंद्रभागा नदी तीरावर असलेले विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर प्रसिद्ध असून दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीनिमित्त ३०० ते ३५० पायी दिंड्या व लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे येतात. त्यामध्ये आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू येथील भाविकांचाही समावेश असतो. हे मंदिर १७४० मध्ये भोसले घराण्याच्या काळात बांधले गेले. ज्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन विठ्ठल–रुक्मिणी धापेवाडा येथे आले त्या कोलबा स्वामींचे मंदिरही येथे आहे. पंढरपूरला जाऊ न शकणाऱ्या भाविकांसाठी साक्षात पांडुरंग गुरुपौर्णिमेला येथे येतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिराव्यतिरिक्त येथे निसर्गरम्य 'धापेवाडा लेक' (Dhapewada Lake) देखील आहे, जिथे शांतता आणि निसर्गाचा आनंद घेता येतो.

Pandharpur of Vidarbha 'Dhapewada' 

धापेवाडा येथील मंदिराची आख्यायिका मोठी रोचक आहे. उमरेड तालुक्यातील बेला गावचे रहिवासी असलेले कोलबा स्वामी हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. ३०० वर्षांपूर्वी ते बेला गावातून धापेवाडा येथे येऊन राहू लागले. गावातील मालगुजार (खोत / जमीनदार) उमाजी आप्पा खोलकुटे यांनी त्यांना आश्रय दिला. प्रत्येक वर्षी कोलबा स्वामी धापेवाडा येथून पंढरपूरची वारी करीत असत. वयोवृद्ध झाल्यामुळे त्यांना वारी करणे जमेनासे झाले म्हणून ते व्यथित झाले होते. एका रात्री पांडुरंगाने त्यांना स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले की, माझ्या भेटीसाठी आता तुला पंढरपूरला येण्याची गरज नाही. तुझ्याच गावात चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या बाहुलीत (विहिरीत) आम्ही आहोत. स्वप्नदृष्टांताप्रमाणे कोलबा स्वामी आणि उमाजी आप्पा यांनी विहिरीत शोध घेतला असता तेथे त्यांना विठ्ठल व रुक्मिणीच्या मूर्ती सापडल्या. त्यानंतर त्यांनी मंदिर बांधण्याचे काम हाती घेतले. १७४० मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर १७४१ मध्ये ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला या मूर्तींची मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हापासून आजतागायत ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला विठ्ठलाची रथ यात्रा निघते.

साक्षात पांडुरंग येतो

पंढरपूरला जाऊ न शकणाऱ्या भक्तांसाठी दरवर्षी गुरुपौर्णिमेला पांडुरंग धापेवाडा या ठिकाणी येतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. चंद्रभागा नदीच्या तीरावर असलेल्या या मंदिराला तटभिंती आहेत. तटभिंतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर नामदेव पायरी असून तेथून पुढे गेल्यावर मंदिराच्या आवारात प्रवेश होतो. मुख्य मंदिर संपूर्ण दगडी बांधकामाचे असून सभामंडप व गाभारा अशी त्याची रचना आहे. मुख्य मंदिर जमिनीपासून काहीसे उंचावर आहे. येथील सभामंडप हा खुल्या प्रकारातील आहे. गाभाऱ्यात चांदीच्या मखरात विठ्ठल व रुक्मिणीच्या स्वयंभू मूर्ती आहेत. मंदिराच्या आवारात महादेव, श्रीदत्त, हनुमान व भक्त पुंडलिक यांची मंदिरे आहेत, तर मंदिराच्या आवाराच्या शेजारी दुर्गा मातेचे मंदिर आहे. मंदिराभोवती असलेल्या तटबंदीला आतील बाजूस ओवऱ्या असून त्यामध्ये उत्सवाच्यावेळी भाविकांना थांबता येते.

Pandharpur of Vidarbha 'Dhapewada' 

चंद्रभागेत स्नान

मंदिरासमोरून वाहणाऱ्या नदीचे नावही पंढरपूरप्रमाणे चंद्रभागाच आहे. पूर्ववाहिनी असलेली ही नदी मंदिराजवळ मात्र उत्तरवाहिनी होते. पुढे ती सावनेर तालुक्यातील पाटण सावंगीजवळ कोलार नदीला मिळते. विठ्ठलाचे दर्शन घेण्याआधी भाविक या नदीत स्नान करतात. येथे स्नान केल्याने पंढरपूरच्या चंद्रभागेत स्नान केल्याचे व या मंदिरात ३ वाऱ्या केल्यास पंढरपूरला केलेल्या एका वारीइतके पुण्य मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

पुरातन विहीर सापडली

धापेवाडा येथे चंद्रभागा नदीपात्रात जून २०२३ मध्ये अंदाजे ३५० वर्ष जुनी पुरातन विहीर सापडली. नदीचे खोलीकरण करत असताना ही विहीर उघडकीस आली असून, याच विहिरीतून शेकडो वर्षांपूर्वी विठ्ठल-रखुमाईची स्वयंभू मूर्ती सापडल्याची आख्यायिका आहे. नदी घाटाचे काम व खोलीकरण सुरू असताना मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूस ही बाहुली विहीर (कुंड) आढळली. या विहिरीच्या बांधकामात खाली लाकडी फ्रेम व त्यावर दगडाचे बांधकाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pandharpur of Vidarbha 'Dhapewada' 

कोलबा स्वामी समाधी मंदिर | Kolba Swami Samadhi Temple

विठ्ठल मंदिराच्या शेजारी संत कोलबा स्वामी यांचे समाधी मंदिर आहे. कोलबा स्वामी मठाच्या मठाधिपतींकडून वसंत पंचमीला स्वामींच्या समाधीचे पूजन करण्यात येते. स्वामींचे गुरू धर्मशेट्टीबाबा रंगारी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने वसंत पंचमीला येथे हजारो भाविकांची उपस्थिती असते. या दिवशी गावातील प्रमुख मार्गाने दिंडी काढण्यात येते. तसेच आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. आषाढी पौर्णिमा, वसंत पंचमी आणि रथ यात्रा (ज्येष्ठ शुद्ध द्वादशी) या तीन दिवशी येथे यात्रा असते.


Kolba Swami Samadhi Temple

कोण आहेत कोलबास्वामी महाराज

विदर्भातले आणि विणकर समाजातले प्रमुख श्रेष्ठ संत धापेवाडा संस्थानचे पहिले गादीपुरुष असलेले श्री सदगुरू समर्थ कोलबास्वामी महाराज हे संत परंपरेचे पाइक आहेत. आध्यात्मिक सामर्थ्य आणि अलौकिक तेज असलेले कोलबास्वामी हे विणकर समाजाच्या हृदय सिंहासनावर आजही विराजमान आहेत. विणकर समाजात त्यांना देवपुरुषाचा दर्जा प्राप्त झाला आहे.

कोलबास्वामींचा जन्म नागपूरपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरेड तालुक्यातील ‘वेळा’ या गावी ज्येष्ठ शुद्ध शके १५७८ म्हणजे इ.स.१६५६ ला झाला. ते शिवाजी महाराजांच्या समकालीन होते. विणकरी हा या गावचा प्रमुख व्यवसाय. या गावाला ‘बेला’सुद्धा म्हणतात. सात्विक कुटुंब असलेल्या रणदिवे परिवारातल्या कोलबास्वामींच्या वडिलांचे नाव देवाजी आणि आईचे नाव देवकाबाई असे होते. ज्येष्ठ शुद्ध सप्तमीला सूर्य मध्यानावर असताना भगवान विष्णुने देवाजीला दिलेल्या दृष्टांतानंतर कोलबाचा जन्म झाला. या गोंडस बाळाच्या जन्माच्या वेळेसच त्यांच्या शरीरावर शंख, चक्र, पद्म अशी सामुद्रिक शुभ लक्षणे असल्याने त्यांना अवतारी पुरुष समजण्यात आले, अशी माहिती आहे.

दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघल सम्राट औरंगजेब आपल्या लक्षावधी सैन्यासह दक्षिणेत तळ ठोकून बसला होता. पंढरपूरच्या विभागात मराठे आणि मुघल यांच्या लढाया सातत्त्याने सुरू होत्या. याच वेळेस कोलबास्वामींना पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेण्याची अनावर इच्छा झाली आणि त्यांनी तयारी सुरू केली. पण वेळ्यावरुन पंढरपूरला जाऊन परत सुखरूप येणे ही त्यावेळच्या परिस्थितीत अत्यंत कठीण गोष्ट होती. त्याच रात्री कोलबाजींना विठ्ठलाचे दर्शन झाले आणि ‘माझा ध्यास सोडून दे. शरीराला कष्ट देऊन तु इथे येऊ नको. मी स्वतः धापेवाड्याला येत आहे. तू तेथे जा माझा शोध घे आणि वास्तव्य कर’ असे सांगितले. त्यानंतर कोलबाने पंढरपूरला जाण्याचा विचार रद्द केला. पण व्यवसाय डबघाईला आला, आर्थिक परिस्थिती बिघडली…जवळ पैसा नव्हता आणि अशा विचित्र परिस्थितीत त्यांनी वेळा हे गाव सोडले आणि ते आपल्या तिन्ही पत्नींना सोबत घेऊन आताच्या कळमेश्वर तालुक्यातील धापेवाड्यास स्थायिक झालेत. हे नवीन ठिकाण निवडण्याचे कारण पांडुरंगाचा झालेला दृष्टान्त, धापेवाड्यास राहत असलेला प्रचंडमोठा विणकर समाज, विणकरांची बाजारपेठ आणि विठ्ठल-रुखमाईचा शोध..!

याच ठिकाणी त्यांची धर्मशेट्टीबाबा या गृहस्थाश्रमी असलेल्या पण संसारातून अलिप्त असलेल्या सत्पुरुषाशी भेट झाली. ते शंकराचार्यांच्या परंपरेतील महान योगी आणि सिद्ध पुरुष होते. शृंगेरी मठाच्या परंपरेतले त्रोटकाचार्यांचे शिष्य जयदेवपुरी-गंगापुरी-चूडामणी-मकरंदपुरी आणि धर्मशेट्टीबाबा अशीही शिष्य परंपरा आहे. हिंदुधर्माची महान शिकवण आणि योगशास्त्राचे धडे त्यांनी कोलबास्वामींना दिले.

या वेळेस कोलबास्वामींचा अभिषेक करून आणि हातात तलवार देऊन राजवस्त्रे परिधान करण्यात आली. ही तलवार म्हणजे क्षत्रीय वृत्तीचे निदर्शक असून त्या वेळची अराजकता व यवनांचे आक्रमण यातून समाजाचे संरक्षण करण्याचा संदेश त्यांनी विणकर समाजाला दिला.

खापा, वाकोडी, अहमदनगर, ठाणे, पुणे अशा अनेक ठिकाणी त्यांनी मठांची स्थापना करुन नीतिनियम घालून दिले. भयंकर दुष्काळामध्ये ‘सदावर्त’ राबवून लोकांना जीवनदान दिले. यामुळेच की काय कोलबास्वामींकरिता पंढरपूरचा विठ्ठल धापेवाड्यात चंद्राभागा नदीमधून धापेवाड्याला म्हणजे धर्मपुरीला मूर्तिरूपाने अवतरला, अशी भक्तांची श्रद्धा आहे. भक्तांच्या सोयीसाठी तेथे भोसल्यांचे कारभारी ‘उमाजी आबा’ यांनी विठ्ठल-रुखमाईचे सुरेख मंदिर बांधले.

असे हे दीर्घायुषी असलेले कोलबास्वामी १०५ वर्षे जगले. सन १७६१ च्या सोमवारी तिसऱ्या प्रहरी कोलबास्वामींनी पद्मासन घातले आणि स्वत:चे प्राण पंचतत्वात विलीन केले. आज धापेवाड्याल्या कोलबास्वामींच्या राहत्या घरात त्यांची समाधी आहे. त्यांच्या पिढीतल्या काशीनाथ महाराज, माधवनाथ महाराज, विठोबाजी महाराज आणि यादवराव महाराज यांच्यासुद्धा समाध्या या घरात बघायला मिळतात.


Pandharpur of Vidarbha 'Dhapewada' 

जवळपासची ठिकाणे | Places to visit near Dhapewada

महाभारतकालीन आदासाचा प्रसिद्ध गणपती, काही अंतरावर असलेले झोपलेल्या हनुमानाचे जामसावळी, जुन्या स्मशानातले भगवान शंकराचे कपिलेश्वर अशी अनेक निसर्गरम्य धार्मिक स्थळे धापेवाड्याच्या जवळपास अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावर बघायला मिळतात.

Pandharpur of Vidarbha 'Dhapewada' 

कसे पोहोचाल | How to plan trip to Dhapewada

नागपूरपासून ३० किमी, तर कळमेश्वरपासून ८ किमी अंतरावर आहे. कळमेश्वर, काटोल व सावनेरपासून एसटीची सुविधा आहे. खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात.

तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️

Comments

Post a Comment

🌍✍️ तुमचं मत नक्की कळवा. तुमची ओळख न सांगताही तुमचा अभिप्राय देऊ शकता.

🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
आजचा मराठी शब्दआजचा प्रश्न
या शब्दाचा अर्थ काय आहे?तुम्हाला याचे उत्तर माहीत आहे का?
उत्तरासाठी कार्ड उलटा
अर्थउत्तर
उगमअधिक माहिती
समानार्थीश्रेणी
वाक्यात उपयोग
WhatsUp मराठी पुन्हा उलटा
जानेवारी|फेब्रुवारी|मार्च|एप्रिल|मे|जून|जुलै|ऑगस्ट|सप्टेंबर|ऑक्टोबर|नोव्हेंबर|डिसेंबर
WORD|अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
WORD|लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
WORD|नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|डोंगरातील पाणी नितळ आहे.
WORD|तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
WORD|रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
WORD|ओंजळ|दोन्ही हातांचा केलेला कप्पा|देशज मराठी|हातभर|त्याने ओंजळीत पाणी घेतले.
WORD|हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|हळुवार वारा वाहत होता.
WORD|मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|तिचा आवाज मंजुळ आहे.
WORD|मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|पहिल्या सरीनंतर मृद्गंध दरवळला.
WORD|आभाळमाया|असीम, अपार प्रेम|देशज मराठी|अपार माया|आईची आभाळमाया विसरता येत नाही.
WORD|धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|तो संगीतात धुंद झाला.
WORD|झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|संध्याकाळी थंड झुळूक आली.
WORD|नभ|आकाश|संस्कृत|गगन|पहाटे नभ निरभ्र होते.
WORD|उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|त्याला आनंदाचा उमाळा आला.
WORD|साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|ती साजिरी दिसत होती.
WORD|गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
WORD|कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|फटीतून सूर्याचा कवडसा पडला.
WORD|जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
WORD|लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|गाण्याची लय सुंदर होती.
WORD|कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|फुलदाणीत कोमेजलेली फुले दिसत होती.
WORD|दरवळ|पसरणारा मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|चाफ्याचा दरवळ पसरला.
WORD|सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|सावळ्या ढगांनी आकाश भरले.
WORD|सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|तिचा चेहरा सतेज दिसत होता.
WORD|मधुमालती|सुगंधी फुलांची वेल|संस्कृत|फुलवेल|अंगणात मधुमालती फुलली होती.
WORD|गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
WORD|हुरहूर|मनातील अस्वस्थ ओढ|देशज मराठी|व्याकुळता|जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
WORD|निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
WORD|तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
WORD|मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
WORD|लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|दिव्याची ज्योत लवलवत होती.
WORD|उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|तरुणांमध्ये नवी उमेद आहे.
WORD|गोजिरी|नाजूक व सुंदर|देशज मराठी|साजिरी|गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
WORD|मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|आंब्याला मोहोर आला आहे.
WORD|अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|गावचा चहा अमृततुल्य लागतो.
WORD|झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|मंदिरातील घंटांचा झंकार झाला.
WORD|सहजसुंदर|नैसर्गिकरीत्या सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
WORD|आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|पहाटेचा आसमंत शांत होता.
WORD|सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
WORD|निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|डोंगरातून निर्झर वाहत होता.
WORD|नादमय|संगीताने भरलेला|संस्कृत|सुरेल|सभागृह नादमय झाले.
WORD|मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
WORD|स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|संगीताचे स्पंदन जाणवत होते.
WORD|चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
WORD|मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|मृदुल वाळूवर पावले उमटली.
WORD|अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|ती अलवार हसली.
WORD|स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|पक्षी स्वैर उडत होते.
WORD|सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|फुलांची सुरभि दरवळली.
WORD|दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|तिच्या डोळ्यांत वेगळीच दीप्ती होती.
WORD|प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|अंगणात प्राजक्त फुलला होता.
WORD|निरभ्र|ढगविरहित, पूर्ण स्वच्छ|संस्कृत|स्वच्छ|निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?|रायगड|६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातून वाहणारी सर्वात लांब नदी कोणती?|गोदावरी|त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे उगम पावणारी गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी असून तिला 'दक्षिण गंगा' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली?|१ मे १९६०|संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये अस्तित्वात आली.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?|कळसूबाई|अहिल्यानगर जिल्ह्यातील हे शिखर सुमारे १,६४६ मीटर उंच असून ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे.|भूगोल
GK|संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' कोणत्या गावी लिहिली?|नेवासे|अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथे भगवद्गीतेवरील ही मराठी टीका लिहिली गेली.|संस्कृती
GK|लोणार सरोवर कशामुळे तयार झाले?|उल्कापातामुळे|बुलढाणा जिल्ह्यातील हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बेसाल्ट खडकात उल्का आदळून तयार झालेले जगातील दुर्मीळ सरोवर आहे.|भूगोल
GK|तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला?|सिंहगड (कोंढाणा)|१६७० मधील या लढाईत तानाजी धारातीर्थी पडले; 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार प्रसिद्ध आहेत.|इतिहास
GK|अफझलखानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला?|प्रतापगड|१६५९ मध्ये सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाजवळ ही ऐतिहासिक भेट व संघर्ष घडला.|इतिहास
GK|मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?|दर्पण|बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये 'दर्पण' सुरू केले; त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक मानले जाते.|संस्कृती
GK|'केसरी' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?|लोकमान्य बाळ गंगाधर टिळक|१८८१ मध्ये मराठीतून 'केसरी' आणि इंग्रजीतून 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू झाली.|इतिहास
GK|'सत्यशोधक समाज' कोणी स्थापन केला?|महात्मा जोतिराव फुले|२४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात स्थापन झालेली ही संस्था सामाजिक समतेसाठी कार्यरत होती.|इतिहास
GK|'श्यामची आई' या पुस्तकाचे लेखक कोण?|साने गुरुजी|पांडुरंग सदाशिव साने यांनी नाशिकच्या कारागृहात हे पुस्तक लिहिले.|साहित्य
GK|'नटसम्राट' या गाजलेल्या नाटकाचे लेखक कोण?|वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)|कुसुमाग्रजांना १९८७ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.|साहित्य
GK|मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा होतो?|२७ फेब्रुवारी|कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.|संस्कृती
GK|वेरूळ येथील कैलास लेणे कोणत्या राजवटीत कोरले गेले?|राष्ट्रकूट|एकाच अखंड खडकात वरून खाली कोरलेले हे मंदिर जगातील स्थापत्यशास्त्रीय आश्चर्य मानले जाते.|इतिहास
GK|अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?|छत्रपती संभाजीनगर|बौद्ध चित्रकला व शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेली ही लेणी युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहेत.|पर्यटन
GK|एलिफंटा लेणी कोणत्या देवतेला समर्पित आहेत?|शिव|मुंबईजवळील घारापुरी बेटावरील त्रिमूर्ती शिल्प जगप्रसिद्ध आहे.|पर्यटन
GK|महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत?|पाच|भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ — बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत.|संस्कृती
GK|अष्टविनायक म्हणजे किती गणपती मंदिरे?|आठ|पुणे, रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विखुरलेली ही आठ स्वयंभू गणपती मंदिरे आहेत.|संस्कृती
GK|कृष्णा नदीचा उगम कोठे होतो?|महाबळेश्वर|सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्या उगम पावतात.|भूगोल
GK|छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?|शिवनेरी|पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या या किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी त्यांचा जन्म झाला.|इतिहास
GK|संत तुकाराम महाराजांचे गाव कोणते?|देहू|पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीकाठचे देहू हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.|संस्कृती
GK|संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?|आळंदी|पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली.|संस्कृती
GK|सेवाग्राम आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?|वर्धा|महात्मा गांधींनी १९३६ मध्ये येथे वास्तव्य सुरू केले; हे स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्वाचे केंद्र ठरले.|इतिहास
GK|पवनार आश्रम कोणाशी संबंधित आहे?|आचार्य विनोबा भावे|वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून विनोबांनी भूदान चळवळीचे कार्य केले.|इतिहास
GK|महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते?|ताडोबा|चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा १९५५ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित झाले; पुढे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तयार झाला.|वन्यजीव
GK|'संत्रानगरी' म्हणून कोणते शहर ओळखले जाते?|नागपूर|संत्र्यांच्या व्यापारामुळे मिळालेले हे नाव; नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.|भूगोल
GK|महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणते शहर मानले जाते?|पुणे|शिक्षण, साहित्य, नाट्य आणि संगीत परंपरेमुळे पुण्याला हे स्थान मिळाले आहे.|संस्कृती
GK|रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते?|रायरी|शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केली.|इतिहास
GK|पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?|१७६१|मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यातील या लढाईचा मराठा साम्राज्यावर मोठा परिणाम झाला.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेचे नाव काय?|जिजाबाई|जिजाऊंनी शिवरायांवर स्वराज्याचे संस्कार केले; त्यांना राजमाता म्हणून ओळखले जाते.|इतिहास
GK|छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळ घोषित झाले?|२००४|व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतील ही वास्तू मुंबईचे प्रतीक मानली जाते.|पर्यटन
GK|गेट वे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे?|मुंबई|१९२४ मध्ये पूर्ण झालेली ही वास्तू अरबी समुद्राच्या काठी उभी आहे.|पर्यटन
GK|'लोकहितवादी' या टोपणनावाने कोण लेखन करत असत?|गोपाळ हरी देशमुख|त्यांच्या 'शतपत्रे' या लेखमालेने एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारणेला दिशा दिली.|साहित्य
GK|मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला?|वि. स. खांडेकर|'ययाति' या कादंबरीसाठी १९७४ मध्ये त्यांना हा सन्मान मिळाला.|साहित्य
GK|जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?|गोदावरी|छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या धरणाच्या जलाशयाला 'नाथसागर' म्हणतात.|भूगोल
GK|कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?|सातारा|जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या धरणाच्या जलाशयाला 'शिवसागर' म्हणतात.|भूगोल
GK|महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते?|ताम्हण (जारूळ)|जांभळ्या रंगाची ही फुले पावसाळ्यात सह्याद्रीत मोठ्या प्रमाणात दिसतात.|निसर्ग
GK|महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?|शेकरू|मोठी उडणारी खार असलेला शेकरू भीमाशंकर अभयारण्यात प्रामुख्याने आढळतो.|वन्यजीव
GK|कास पठार कशासाठी प्रसिद्ध आहे?|रानफुलांच्या बहरासाठी|सातारा जिल्ह्यातील हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ पावसाळ्यानंतर फुलांच्या गालिच्यासाठी ओळखले जाते.|पर्यटन
GK|भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी ओळखले जाते?|शेकरू|पुणे जिल्ह्यातील हे अभयारण्य ज्योतिर्लिंगासाठीही प्रसिद्ध आहे.|वन्यजीव

अजून इंटरेस्टिंग...

विदर्भात समुद्र होता तेव्हा...! | Author: Prof Suresh Chopne | Ocean in Vidarbha Maharashtra? | Heritage Tourism | Maharashtra Tourism

श्रीकृष्णाच्या नगरीत... द्वारकाधीशांच्या चरणी, भाग १ | Author: Mrs. Manik Joshi | Dwarkadheesh Temple | Heritage Tourism | Incredible India

चंद्रपूर: निसर्ग, इतिहास, संस्कृती, लोकजीवन आणि वारशाचा समृद्ध पर्यटनपट | Author: Dr. Pallavi Tajne | Chandrapur Culture and Heritage | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism

महाराष्ट्रातील डार्क स्काय पर्यटन, शहरी गोंगाटापासून दूर, आकाशाच्या कुशीत | Dark Sky Tourism | Astro Tourism | Maharashtra Tourism Policy

भारताचा प्राचीन 'सिल्क रूट’ नाणेघाट | Author: Narendra Chandewar | Silk Route of India, Naneghat | Maharashtra Tourism

सेल्युलर जेलचा थरारक अनुभव : वेदना, त्याग आणि देशभक्तीचा इतिहास | डॉ. संपदा नासेरी | Author: Dr. Sampada Naseri | Cellular Jail Experience | Andaman & Nicobar Islands | Incredible India

गोठवणाऱ्या थंडीत आयफेल टॉवरचा अद्‌भूत नजारा... पुस्तकांच्या पलीकडे, जगाच्या जवळ | Author: Yash Naseri | Eiffel Tower Paris | International & Global Tourism

भामरागडमध्ये जलक्रांतीतून निर्मित ‘तलावांचे जाळे’ | अनिकेत प्रकाश आमटे | लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा | Bhamragad Lakes by Aniket Prakash Amte

विदर्भातही येऊन गेले होते गौतम बुद्ध: विदर्भातील बौद्ध सर्किट | Vidarbha Buddhist Circuit Travel Guide

भटाळा गावात आहे ‘भोंडा महादेव’ | Author: Himgauri Deshpande | Bhonda Mahadev Temple Bhatala | Temples of Vidarbha | Temples of Maharashtra