श्रीभृशुंड गणेश | Shri Bhrushund Ganesh Temple | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide | Temples near Nagpur | Temples of Vidarbha
विदर्भ अष्टविनायक | Vidarbha Ashtavinayak Yatra Guide श्रीभृशुंड गणेश श्री भृशुंड गणेश मूर्तीचा इतिहास फारच प्राचीन आहे. भंडारा शहरापासून पूर्वेला तुमसर मार्गाला लागले की अवघ्या तीन किलोमीटरवरच मेंढा नावाचं गाव आहे. याच गावात इ.स. पूर्व ११ व्या शतकात भृशुंड ऋषींनी या गणेशाची स्थापना केली, अशी आख्यायिका आहे. आजचं मेंढा गाव म्हणजे पूर्वीचं नागांचं पद्मपूर राज्य. भृशुंडी ऋषी नाग वंशातीलच. त्यांनी स्थापन केलेली ही मूर्ती बघता क्षणीच थोडी चमत्कारीक वाटते. कारण या मूर्तीच्या मुखमंडळाच्या जागी मानवी नाकपुड्या,डोळे आणि किंचित दाढीमिशाही आढळतात. त्यामुळे ही गणेश मूर्ती दुर्मिळ ठरते. श्रींच्या वेगळ्या रुपामुळेच भाविकांमध्ये ही गणेश मूर्ती लोकप्रिय आहे. अखंड रक्ताश्म शीळेवर कोरलेली ही मूर्ती गाभाऱ्यात तळापासून आठ फूट उंच व चार फूट रूंद आहे. पूर्ण सिंदूर चर्चित मूर्ती चतुर्भूज असून मूशकारूढ आहे. उजवा पाय खाली सोडलेला व डाव्या पायाची मांडी घातलेली मूर्ती आहे. चारही हातांमध्ये पाश, अंकूश, मोदक असून उजवा वरद हस्त आहे. शिरोभागी पंचमुखी शेषफणा आहे. भृशुंड गणेशाचं मंदिर हेमाडपंथी आहे. मूर्तीची स्थाप...