गाविलगड | Gavilgad Killa | Forts near Nagpur | Forts in Vidarbha

मरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या पर्वत रांगात चिखलदऱ्याच्या पठारावर दक्षिण दिशेस सुमारे ६ किमी अंतरावर समुद्र सपाटीपासून २९४० फूट उंचावर गाविलगड उभा आहे. मेळघाटच्या घनदाट अरण्यात वसलेला गाविलगड जणू दक्षिण दिशेचा पहारेकरीच आहे. हा किल्ला गवळी लोकांनी बांधला, अशी अख्यायिका स्थानिक लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. परंतु या संदर्भात कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. मुजाहिद वंशाच्या अहमदशहा वली पहिला यांनी गाविलगड किल्ला निर्माण केल्याचा उल्लेख फार्सी इतिहासकार फिरिश्ता करतो.

गाविलगड | Gavilgad Killa | Forts near Nagpur | Forts of Vidarbha
गाविलगड | Gavilgad Killa | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

हा किल्ला उत्तरेतून दख्खनमध्ये येणाऱ्या मार्गावर बांधण्यात आला. त्यामुळे या किल्ल्याला दख्खनचे प्रवेशद्वार मानले जात असे. उत्तरेतून येणाऱ्या मुस्लीम सरदारांना दख्खनमध्ये प्रवेश करताना काही प्रमाणात संघर्षाला सामोरे जावे लागत असे. हा किल्ला नंतरच्या काळात बहमनी, निजामशाही, इमादशाही यांच्या अधिपत्याखाली होता. शेवटी १८ व्या शतकात भोसल्यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतल्याची नोंद उपलब्ध आहे. या किल्ल्याच्या तटबंदीत वेगवेगळ्या राजवटीत वाढ झाली व आतील भागांत अनेक बांधकामे केलेली आढळतात. त्यामध्ये प्रामुख्याने मशीद हे उत्तम उदाहरण आहे.

किल्ल्याची रचना वर्तुळाकार आहे. ६ मैल परिसरात तो पसरला आहे. अनेक भग्न इमारती,तलाव,मंदिर, राणीमहाल, समाध्या, वृंदावन, मशिदी व इतर लहानसहान वास्तु या किल्ल्यावर आहेत. तिन्ही बाजूला उंच आणि अभेद्य कडे असले तरी किल्ल्याचा वरचा घेर संपूर्ण चिरेबंदी दगडांचा आहे.

गाविलगड | Gavilgad Fort | Forts near Nagpur | Forts of Vidarbha

१८५७ च्या तात्या टोपेंच्या बंडाला आश्रय मिळू नये म्हणून ब्रिटिशांनी गाविलगडावरील दरबारगृह, सभागृह, सिंहासन व इतर अनेक इमारती अक्षरश: तोफेच्या गोळ्यांनी फोडून टाकल्या. तरीही या बलाढ्य गाविलगडाने त्यांना दाद दिली नाही. मुख्य इमारतीला मोठी तळघरे आहेत. भोसल्यांचा खजिना तेथे असायचा. १८०३ साली द्वितीय आंग्ल मराठा युद्धात हा किल्ला ताब्यात घेताना इंग्रजांना भरपूर कषट उपासावे लागले.

गाविलगडाजवळच चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. देवी लेणे हे शैलगृह, मेळघाट व्याघ्र प्रकल्प या सर्व पर्यटन स्थळांचे सानिध्य व ७०० वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार गाविलगड विदर्भाचा मानदंडच आहे.

कसे पोहोचाल | How to go to Gavilgad Fort in Marathi

रस्त्याने प्रवास करायचा असल्यास, महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधून अमरावतीपर्यंत नियमित एसटी बस आणि खासगी टॅक्सी उपलब्ध आहेत. अमरावतीपासून सुमारे १०० किमी अंतरावर असलेले चिखलदरा दाट जंगलं आणि डोंगरमाथ्यांच्या रम्य वाटेने सहज गाठता येते.

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात जवळचे स्थानक अमरावती आहे. तिथून बस किंवा टॅक्सीने चिखलदऱ्याचा प्रवास करता येतो. हवाई मार्गाने येऊ इच्छिणाऱ्यांसाठी नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वात सोयीस्कर पर्याय आहे. नागपूरपासून चिखलदरा सुमारे २३० किमी अंतरावर आहे. तिथून प्रवाशांना खासगी टॅक्सी, भाड्याने कार किंवा बसचा पर्याय उपलब्ध असतो.

केव्हा जायचे | When to go to Gavilgad Fort in Marathi

गाविलगड किल्ला रविवारी सकाळी ९ ते ६ वाजपर्यंत आणि आठवड्याच्या इतर दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजपर्यंत पर्यटकांसाठी खुला असतो.

भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ

गाविलगड किल्ला भटकंतीसाठी सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते मार्चदरम्यान असतो. या काळात हवामान आल्हाददायक आणि थंडसर राहते, त्यामुळे किल्ल्याचा इतिहास शोधणे आणि त्याचा देखणा नजारा अनुभवणे अधिक आनंददायक होते. हिवाळ्यात येथील थंडगार वाऱ्याचा स्पर्श आणि स्वच्छ आकाश किल्ल्याच्या भव्य वास्तुकलेचा आस्वाद घेण्यास परिपूर्ण वातावरण निर्माण करतात. पावसाळ्यात गाविलगड परिसर जणू निसर्गाच्या हिरव्या गालीच्याने नटलेला असतो. धुके आणि लहानसहान धबधबे या भागाच्या सौंदर्यात भर घालतात. मात्र, या काळात चिखल आणि ओलसर रस्त्यांमुळे किल्ल्यावर चढणे थोडे कठीण होऊ शकते. उन्हाळ्यात मात्र इथली उष्णता आणि रखरखाटामुळे भटकंती त्रासदायक वाटू शकते. इतिहासप्रेमी, साहसप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी गाविलगड किल्ला एक अद्वितीय ठिकाण आहे.

तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️

Comments

Post a Comment

तुमचं मत किंवा अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा! 🌍✍️

🔍 शोधा
लेख लोड होत आहेत...
🤖

📲 WhatsApp वर रोज Quiz, Polls आणि मजेशीर माहिती

GK Quiz, Polls, नवीन लेख आणि खास तथ्ये थेट तुमच्या WhatsApp वर! 😊

रोज नवीन काहीतरी मिळवा
👉 आत्ता Subscribe करा

✍️ तुमचा प्रवास अनुभव प्रकाशित करू इच्छिता?

तुमची कथा आम्हाला पाठवा आणि ती हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा 😊

👉 अनुभव पाठवा
💡
आजचा मराठी शब्द by WhatsUp मराठी
या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर पाहण्यासाठी कार्ड flip करा ↻
📌 अर्थ:
🌿 उगम:
🔄 समानार्थी:
अवखळ|खोडकर व मुक्त स्वभावाचा|देशज मराठी|चंचल|Eg. तिचे अवखळ हसू सगळ्यांना आवडते.
लाघव|नम्र गोडवा|संस्कृत|मृदुता|Eg. त्यांच्या बोलण्यात विलक्षण लाघव आहे.
नितळ|पूर्ण स्वच्छ व निर्मळ|देशज मराठी|शुद्ध|Eg. डोंगरातील पाणी नितळ आहे.
तरल|अत्यंत सूक्ष्म व भावपूर्ण|संस्कृत|कोमल|Eg. तिची कविता तरल भावनांनी भरलेली आहे.
रम्य|आनंददायी सुंदर|संस्कृत|मनोहर|Eg. सह्याद्रीचे दृश्य रम्य वाटते.
ओंजळ|हाताचा कप्पा|देशज मराठी|हातभर|Eg. त्याने ओंजळीत पाणी घेतले.
हळुवार|अत्यंत अलगद|देशज मराठी|मंद|Eg. हळुवार वारा वाहत होता.
मंजुळ|गोड आणि सुरेल|संस्कृत|मधुर|Eg. तिचा आवाज मंजुळ आहे.
मृद्गंध|पहिल्या पावसातील मातीचा सुगंध|संस्कृत|मातीकस्तुरी|Eg. मृद्गंध दरवळला.
आभाळमाया|असीम प्रेम|देशज मराठी|अपार माया|Eg. आईची आभाळमाया विसरता येत नाही.
धुंद|पूर्ण तल्लीन|देशज मराठी|मग्न|Eg. तो संगीतात धुंद झाला.
झुळूक|मंद वाऱ्याची लहर|देशज मराठी|समीर|Eg. थंड झुळूक आली.
नभ|आकाश|संस्कृत|गगन|Eg. नभ निरभ्र होते.
उमाळा|भावनांचा अचानक उफाळ|देशज मराठी|आवेग|Eg. त्याला आनंदाचा उमाळा आला.
साजिरी|सुंदर व मोहक|देशज मराठी|गोजिरी|Eg. ती साजिरी दिसत होती.
गंधाळलेला|सुगंधाने भरलेला|देशज मराठी|दरवळता|Eg. फुलांनी गंधाळलेले अंगण होते.
कवडसा|प्रकाशाची हलकी झलक|देशज मराठी|किरण|Eg. सूर्याचा कवडसा पडला.
जिव्हाळा|आत्मीय ओढ|देशज मराठी|आपुलकी|Eg. गावाशी त्यांचा जिव्हाळा आहे.
लय|तालबद्ध गती|संस्कृत|ताल|Eg. गाण्याची लय सुंदर होती.
कोमेजलेला|ताजेपणा हरवलेला|देशज मराठी|म्लान|Eg. कोमेजलेली फुले दिसत होती.
दरवळ|मंद सुगंध|देशज मराठी|सुगंध|Eg. चाफ्याचा दरवळ पसरला.
सावळा|गडद सौंदर्य असलेला|देशज मराठी|श्याम|Eg. सावळ्या ढगांनी आकाश भरले.
सतेज|तेजस्वी व टवटवीत|संस्कृत|प्रसन्न|Eg. तिचा चेहरा सतेज दिसत होता.
मधुमालती|सुगंधी वेल|संस्कृत|फुलवेल|Eg. अंगणात मधुमालती फुलली होती.
गुंफण|सुंदर विणलेली रचना|देशज मराठी|रचना|Eg. कथानकाची गुंफण अप्रतिम आहे.
हुरहूर|मनातील ओढ|देशज मराठी|व्याकुळता|Eg. जुन्या दिवसांची हुरहूर लागली.
निवांत|पूर्ण शांत|देशज मराठी|शांत|Eg. गावातील निवांत वातावरण सुखावह असते.
तुषार|पाण्याचे सूक्ष्म थेंब|संस्कृत|शिंतोडे|Eg. धबधब्याचे तुषार अंगावर पडले.
मंतरलेला|जादुई भासणारा|देशज मराठी|मोहक|Eg. पावसाळ्यातला सह्याद्री मंतरलेला वाटतो.
लवलवता|हलका डोलणारा|देशज मराठी|डुलणारा|Eg. दिव्याची ज्योत लवलवत होती.
उमेद|आशावादी ऊर्जा|फारसीमार्गे मराठी|आशा|Eg. तरुणांमध्ये उमेद आहे.
गोजिरी|नाजूक सुंदर|देशज मराठी|साजिरी|Eg. गोजिरी बाहुली सगळ्यांना आवडली.
मोहोर|फुलांचा पहिला बहर|देशज मराठी|बहर|Eg. आंब्याला मोहोर आला आहे.
सुगंधी|सुगंध असलेले|संस्कृत|दरवळते|Eg. सुगंधी फुले बहरली.
अमृततुल्य|अत्यंत मधुर|संस्कृत|अतिगोड|Eg. गावचा चहा अमृततुल्य लागतो.
झंकार|घणघणता नाद|संस्कृत|निनाद|Eg. घंटांचा झंकार झाला.
सहजसुंदर|नैसर्गिक सुंदर|देशज मराठी|स्वाभाविक|Eg. तिचे सहजसुंदर हास्य खुलले.
आसमंत|सभोवतालचा परिसर|संस्कृत|परिसर|Eg. आसमंत शांत होता.
सुकुमार|नाजूक व कोमल|संस्कृत|कोवळा|Eg. सुकुमार फुलांचा गंध दरवळला.
निर्झर|वाहता झरा|संस्कृत|झरा|Eg. डोंगरातून निर्झर वाहत होता.
नादमय|संगीतपूर्ण|संस्कृत|सुरेल|Eg. सभागृह नादमय झाले.
मनोहर|मन जिंकणारे|संस्कृत|रम्य|Eg. मनोहर दृश्य पाहून सारे थक्क झाले.
स्पंदन|हलकी जाणीव किंवा धडधड|संस्कृत|धडधड|Eg. संगीताचे स्पंदन जाणवत होते.
चैतन्य|जीवनशक्ती|संस्कृत|ऊर्जा|Eg. वसंत ऋतूत निसर्गात चैतन्य येते.
मृदुल|मऊ व कोमल|संस्कृत|नाजूक|Eg. मृदुल वाळूवर पावले उमटली.
अलवार|अत्यंत हळुवार|देशज मराठी|मंद|Eg. ती अलवार हसली.
स्वैर|बंधनमुक्त|संस्कृत|मुक्त|Eg. पक्षी स्वैर उडत होते.
सुरभि|सुगंध|संस्कृत|दरवळ|Eg. फुलांची सुरभि दरवळली.
दीप्ती|प्रकाशमान तेज|संस्कृत|तेज|Eg. तिच्या डोळ्यांत दीप्ती होती.
प्राजक्त|सुगंधी फुलझाड|संस्कृत|पारिजात|Eg. अंगणात प्राजक्त फुलला होता.
निरभ्र|पूर्ण स्वच्छ|संस्कृत|ढगविरहित|Eg. निरभ्र आकाश सुंदर दिसत होते.

अजून इंटरेस्टिंग...

चंद्रपुरातील पाषाणयुगीन मानवाचे गाव माहिती आहे का? ‘बोर’ नावाचे मूळ गाव सापडले | प्रा. सुरेश चोपणे | Author: Prof. Suresh Chopane | Chandrapur Stone Age Discovery | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism | Incredible India

काळ्या कोळशाच्या साम्राज्यात निसर्गाचा महाचमत्कार | Mahatma Gandhi Eco Park | Author: Sakhi | Mine Tourism | Vidarbha Tourism | Maharashtra Tourism

गोठवणाऱ्या थंडीत आयफेल टॉवरचा अद्‌भूत नजारा... पुस्तकांच्या पलीकडे, जगाच्या जवळ | Author: Yash Naseri | Eiffel Tower Paris | International & Global Tourism

फणिंद्रपुरातील संतमहात्म्यांची समाधीस्थळं तुम्ही बघितली काय? | Author: Mrunalini Waghmare | Samadhis in Old Nagpur | Vidarbha Tourism

नागपुरातील मोहिते वाडा : संघ शाखेची जन्मभूमी | Author: Amol Pusadkar | Mohite Wada, Birthplace of the Rashtriya Swayamsevak Sangh | Heritage Tourism | Maharashtra Tourism

चंद्रपूरच्या जंगलात दडलेले गायमुख श्री महादेव मंदिर | नरेंद्र चांदेवार | Gaaymukh Shri Mahadev Mandir | Author: Narendra Chandewar | Temples in Vidarbha | Temples in Maharashtra

दुष्काळाच्या पलीकडचा मराठवाडा: पावसाळ्यात खुलणारे अनोखे पर्यटनविश्व | Author: Dr. Mrunalini Fadnavis | Marathwada Tourism | Maharashtra Tourism

‘ये है मुंबई मेरी जान’ अनुभवांची अखंड सफर | Author: Himgauri Deshpande | Yeh Hain Mumbai Meri Jaan | Maharashtra Tourism | Incredible India

कोराडीचे महालक्ष्मी जगदंबा मंदिर : धार्मिक पर्यटन आणि विकासाचा नवा अध्याय | Author: Ram Bhakre | Koradi Mahalaxmi Jagdamba Temple | Temples in Vidarbha | Temples in Maharashtra

भगवद्गीतेच्या एका श्लोकाने घडवलेला इतिहास; ओपेनहायमर आणि ट्रिनिटी टेस्ट | मॅनहॅटन प्रोजेक्ट न्यू मेक्सिको | Author: Raajan | Trinity Site, New Mexico | First Nuclear Bomb Test 1945 | Manhattan Project